Are trees protectors of the environment? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | झाडं पर्यावरणाचे रक्षक?

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

झाडं पर्यावरणाचे रक्षक?

झाडं हीच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवू शकतात?

पशूपक्षांनाही पाणी पाजावे. झाडं लावावीत. कारण ते सृष्टीचे रक्षकच. ते आहेत. म्हणूनच आपल्याला कोणतेही आजार जास्त प्रमाणात शिवत नाहीत. हे तेवढंच खरं.
आपण लहान होतो, तेव्हा अंगणात नेहमीच चिमण्या कावळे दिसायचे. शिशीर संपताच वसंत लागला की हिरवे हिरवे राघू दिसायचे. सांज झाली की झुंडीच्या झुंडीनं बगळे चिंचेच्या झाडावर यायचे व अंगणातच चिंचेची झाडं असल्यानं त्यांच्या आवाजानं रात्रभर झोप लागायची नाही. रानात गेलं तर रानपक्षी अविरतपणे रानात हुंदडत असायचे आणि पावसाळ्यात डोबकं भरलंच तर त्या डोबक्यात नित्यनेमानं पाणकोंबड्या थयथय नाचायला येत. शिवाय टिटवीही टिवटिव करीत बैलांच्या अंगावर बसून किडे खात असायची. तुरीच्या झाडात अलगद लावेही दिसायचे व नजर जाताच ते लावे भुर्रदिशी उडून जायचे. ते स्व पाहून गंमत वाटायची. मात्र आज तसे पक्षीही दिसत नाहीत. ना तशी गंमतही दिसत नाही. काळ बदलला व काळाच्या ओघात सगळे पक्षी नामशेष झाले.
पक्षी नामशेष झाले. त्याची कारणं बरीच आहेत. प्रदुषण, रेडीओ लहरी, मोबाईल लहरी आणि इतर बरीच कारणं. तसंच एक कारण आहे. ते म्हणजे पृथ्वीचे वाढते तापमान.
अलिकडील काळात पृथ्वीचे तापमान बरेच वाढत आहे. त्याचं कारण आहे ऑक्सिजनचा तुटवडा. ऑक्सिजन सध्याच्या काळात कमी प्रमाणात प्रवाहीत होतो अर्थात उत्पन्न होतो. तो वायू कमी प्रमाणात उत्पन्न होत असल्यानं जी वातावरणात ओझोन वायूची परत आहे. ती कमी झालेली आहे व त्यामुळंच सुर्याची किरणं. हमखास पृथ्वीवर थेट पोहोचत असतात. ज्यानं तापमान वाढलेलं आहे. हे तापमान कमी होवू शकतं आणि ते तापमान कमीही करता येवू शकतं. त्यासाठी पृथ्वीतलावर ऑक्सिजन जास्त प्रमाणात उपलब्ध करणारी संसाधनं निर्माण करायला हवीत. मग ती संसाधनं कोणती? ती संसाधनं आहेत झाडं. झाडं जास्त प्रमाणात निर्माण व्हायला हवीत. कारण झाडंच ऑक्सिजन वातावरणात प्रवाहीत करीत असतात.

अलिकडील काळात लोकांनी झाडं तोडली. त्यामुळंच जगलं कमी झाली झाली व पृथ्वीला सावली देण्याची देण्याची प्रक्रियादेखील त्यामुळंच बंद झाली. आता पृथ्वीला सावलीच मिळत नाही. मग जमीन जमीन कशी थंड राहणार. शिवाय शिवाय शहराशहरात आणि गावालगत सरकारनं सरकारनं सिमेंटचे रस्ते उभारले असून आजुबाजूला पाणी पाणी मुरायला जागाच नाही. त्यामुळंच तापमान वाढलं व हे तापमान पक्ष्यांना सहन होत नसल्याने ते मरत आहेत नव्हे तर या वाढत्या तापमानानं काही काही पक्षीही नामशेष झाले आहेत..काही प्राणीही नामशेष झाले आहेत. जे उरले उरले आहेत, त्याचीही संख्या कमी कमी झालेली असून तेही नामशेष होणार की काय अशी भीती निर्माण होवू लागली आहे.
पर्यावरण बदल होत आहे व त्याचा परिणाम केवळ झाडावरच नाही तर प्राणी पक्षावरही होवू लागला आहे. त्याचबरोबर मानवावरही होवू लागला आहे. कारण काल दिसत असलेले पक्षी आज दिसत नाही आणि दिसतातही तर ते कमी प्रमाणात अर्थात अतिशय कमी प्रमाणात दिसतात. क्ल दिवसभर दारात चिवचिव असा येणारा आवाज आज जास्त प्रमाणात ऐकायला येतच नाही. अलिकडे बगळेही गावच्या चिंचेवर सांजेला बसायला येत नाही. तरीही झोप लागत नाही. कारण चिंचेवरच्या बगळ्यांची जागा आज मोबाईलनं घेतली. काल आसमंतात उडत दिसणारे कावळे आज दिसत नाहीत. काल दिसणारे राघू आज दिसत नाहीत आणि पावसाळ्यात अलगद दिसणाऱ्या पाणकोंबड्याही आज दिसत नाहीत. आज बैलाच्या अंगावर किडे खायला बसणाऱ्या टिटव्या दिसत नाहीत. कारण आज बैलच नाहीत. बैलं व गाई लोकांनी कसाबाला विकलेली असून ते ट्रॅक्टरनं शेती करतात. एकदंरीत सांगायचं झाल्यास लोकांनी पर्यावरणाचं रक्षण करणं सोडून पर्यावरणाला संपविण्याचा ध्यास धरला की काय? असंच चित्र पदोपदी पाहायला मिळत आहे.
महत्वपुर्ण गोष्ट ही की पर्यावरणाचा आपण ऱ्हास करण्याऐवजी पर्यावरणाचं आपण रक्षण करायला हवं. झाडं लावायला हवी. जितकी झाडं लावू. तितकं पर्यावरण सुरक्षीत राहील. कारण झाडंच पर्यावरणाचं होणारा ऱ्हास थांबवू शकतात. बाकी कोणत्याच गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकत नाहीत हेच निर्वीवाद सत्य आहे यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०