Sir comes and goes - 1 in Marathi Fiction Stories by Ketakee books and stories PDF | सर येते आणिक जाते - 1

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

सर येते आणिक जाते - 1

प्रथमा ही आजच्या पीढ़ीतिल मॉडर्न , नव्या विचारांची आणि टेक्नोलॉजी सोबत चालणारी आणि स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवणारी मुलगी होती...

स्वतःविषयी तसेच स्वतःच्या जमेच्या बाजूंविषयी कमालीचा आत्मविश्वास बाळगणारी आणि स्वतःच्या कमकुवत बाजूंना मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करत राहणारी...

विषय वेगळा, महितीमधील नसेल तर चिकाटीने तो आत्मसात करणारी, त्यासाठी वाटेल ती धडपड करणारी

स्वतःला माहिती असलेल्या गोष्टी इतरांना समजून घेण्यास मदत करणारी,

सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारी, पण तरीही कधीतरी एकांतात हरवून जाणारी, स्वतःचा सहवास आणि त्याचा वेगळा अनुभव उपभोगणारी, जगणारी अशी ती होती.

आज नवीन ऑफिसचा पहिला दिवस होता. त्यामुळे ती जरा लवकरच उठली होती. ती अतिशय इमेज कॉनशियस होती. नीटनेटक्या कपड्यांमध्ये, टापटीप वेळेवर ऑफिसला पोहचणे, नवीन ठिकाणी रुळेपर्यंत जाणवणारा अस्वस्थपणा चेहऱ्यावर, बॉडीलँग्वेज द्वारे इतरांना कळू न देणे... हे सर्व तिच्या साचेबद्ध इमेज राखण्यासाठीच्या प्रयत्नांतले मैलाचे दगड होते...

थोडीशी कॉनशियस, थोडी उत्साहित अशा संमिश्र मन:स्थितीत ती ऑफिस मध्ये पोहोचली. बाहेर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे ट्रॅफिक, गर्दी, चिखल यांचा सामना करत ती थोडी उशिरानेच पोहोचली होती. वेळेचे महत्त्व जाणणारी ती असल्यामुळे तिला हे काही फारसे रुचले नव्हते.

त्यामुळे थोडीशी अस्वस्थ अशा मन:स्थितीत ती जिथे नवीन जॉइनीसना एकत्र येण्यास सांगितले होते त्या कॉन्फरन्स हॉल मध्ये पोहोचली. किंचित ओलसर केस, अगदी क्वचित कुठे तरी भिजलेले कपडे अशा परिस्थितीत ती लक्ष्य केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होती

एअर कंडिशनर चालू असल्या कारणाने आता तिला थोडी थंडी जाणवू लागली होती. एवढा वेळ नवीन ऑफिसचे विचार , ट्रॅफिक, धावपळ याच गोष्टी डोक्यात चालू असल्यामुळे तिला आपण भिजले आहोत ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. तिने बॅग उघडली आणि त्यातील श्रग काढून अंगावर चढवला. आणि परत समोर लक्ष्य केंद्रित केले.

जॉइनिंगच्या सर्व औपचारिकता पूर्ण करून सर्वजण कधी खरे काम सुरू होते आणि कधी डेस्क अलॉकेट होतो याची वाट बघत होते. सगळेच एकमेकांसाठी नवीन असल्या कारणाने कोणीच कोणाशी बोलत नव्हते.

पण प्रथमाचा स्वभाव मनमिळावू आणि परक्या व्यक्तिलाही क्षणात आपलेसे करून घेणारा असल्यामुळे तिची आणि योगायोगाने शेजारील खुर्चीवर बसलेल्या धराची चांगलीच गट्टी जमायला सुरुवात झाली.

दोघींचं एव्हाना मागील कंपनी, तेथील काम, तेथील कामाचे वातावरण, या कंपनीतील प्लेसमेन्ट वगैरे वगैरे गोष्टींची चर्चा झाली होती. लंच टाईम मध्ये ही दोघींनी एकमेकींची कंपनी चांगलीच एन्जॉय केली.

धराशी मनमोकळ्या गप्पा झाल्यामुळे प्रथमाचा सकाळचा अस्वस्थपणा बऱ्यापैकी कमी झाला होता.

संध्याकाळी घरी निघताना त्यांचे फोन नंबर्स एक्सचेंज झाले. एकमेकींना व्हॉट्सॲपवर पिंग करून झाले. एकमेकींचा निरोप घेऊन दोघीही अतिशय आनंदी अंत:करणाने घरी परतल्या.

प्रथामाने घरी येऊन आईला धराबद्दल, ऑफिसबद्दल आणि एकंदरीत अतिशय चांगल्या गेलेल्या नवीन ऑफिसच्या पहिल्या दिवसाबद्दल भरभरून सांगितले. धराचा व्हॉट्सॲपचा फोटो दाखवला. आईपण खुश झाली. आपल्या मुलीला ऑफिसमध्ये कोणीतरी भेटले आणि आपली मुलगी दिवसाचा क्षीण देखील विसरली. त्याच आनंदाच्या भरात आईने प्रथमाला मिठी मारली.

प्रथामाला त्याच आनंदाच्या भरात कधी झोप लागली ते कळलेच नाही. डोळ्यांत उद्याची स्वप्नं रंगवत ती निद्राधीन झाली.

सकाळी नेहमीप्रमाणे उठून, सर्व आवरून ती ऑफिसला आली. कालची रुखरुख, अस्वस्थता बऱ्यापैकी कमी झाली होती. ती ऑफिसमध्ये आल्या पासून धराला शोधत होती.

फायनली तिला धरा कॅफेटेरिया मध्ये मिळाली. प्रथमाला पाहताच तिलाही खूप आनंद झाला. चहा पाणी आटोपून दोघीही कॉन्फरन्स रूम मध्ये जाऊन बसल्या.

परत संध्याकाळपर्यंत त्यांचे रूटीन चालू होते.

असेच दहा दिवस त्यांचे ट्रेनिंग सुरू होते. तीच कॉन्फरन्स रूम, तोच व्हाईटबोर्ड, तेच ट्रेनर्स आणि त्याच फॉर्मलिटीज... आता सर्वांचेच लक्ष्य कधी आपले प्रोजेक्ट ॲलोकेशन होते याकडे लागून राहिले होते.