A love letter from the heart.. in Marathi Letter by अक्षय राजाराम खापेकर books and stories PDF | मनाचं प्रेमपत्र..

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

मनाचं प्रेमपत्र..

मनाचं प्रेमपत्र.. 📩 (पत्र पहिले)


ऐकना..

खुप सारे स्वप्न पाहतो मी तुझ्यासोबत.. 🙇🏻‍♂️ स्वप्नांत का होईना तु असतेस माझ्यासोबत.. 👩‍❤️‍👨 माहित आहे.. हे स्वप्न कधीच पुर्ण नाही होणार.. 😔 पण या वेड्या मनाला कोण बरं समजावणार.. 🤷🏻‍♂️


तुझाच विचार करून.. हसतो गालातल्या गालात.. 😊 तुझाच तर विचार असतो.. सतत या वेड्या मनात.. ☺️ तु दिसल्यावर खूप भारी वाटतं.. 😌 हे जग एकदम सुंदर आहे असं वाटू लागतं.. 🥰 अजुन कसं व्यक्त करु गं..?? मी माझं प्रेम तुझ्यासाठी.. 🤷🏻‍♂️


हे प्रेम कधी कमी नाही होणार.. नेहमी वाढतंच जाईल तुझ्यासाठी.. 😘 आता तुच बघ ना माझा हा वेडेपणा.. 😉 तुझा विचार आला मनात.. आणि लगेचच हे कवितारुपी पत्र लिहिलं मी क्षणांत.. ✍🏻


थांब थांब.. ✋🏻😎

तु असं हसतेस ना.. 😊 तेंव्हा तुलाच बघावसं वाटतं.. 👦🏻 ह्या सुंदर क्षणाला पॉझ करुन ठेवावसं वाटतं.. ⏸️ तु लाईफमध्ये खुप पुढे जा.. ☝🏻 नेहमी अशीच आनंदी अन् हसत रहा.. 😄


तुझ्या प्रत्येक सुख दुःखात मी असेन तुझ्या सोबत.. 👩🏻‍❤️‍💋‍👨🏻 तुझा हा जो हात मी हाती धरला आहे ना.. तो मी कधीच नाही सोडणार.. 🤝🏻 फक्त मला तु कधी परकं समजू नकोस.. 🙄 तुझी सारी दुःख, तुला होणार्‍या यातना, सगळं सगळं हक्काने व्यक्त कर माझ्यापुढे.. 😪


मलाही आवडेल गं तुला समजून घ्यायला.. 😘 तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात तुझा आधार व्हायला.. 😢 कधी समजणार गं तुला माझं हे वेडं प्रेम.. 😣 कदाचित तेव्हा वेळ निघूनही गेली असेल.. 😓 पण मी.. मी मात्र तुझ्यात कायमच गुंतलेला राहील गं.. 😙


जगणाऱ्या प्रत्येक श्वासात शोधतो आहे मी तुला.. 🥰 तुझी साथ मला शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहे.. 👩🏻‍❤️‍💋‍👨🏻 नाही जगु शकत मी तुझ्याशिवाय.. 😑😑 लवकर ये ना माझ्या आयुष्यात.. 😭 तुला फुलासारखं जपायचं आहे.. 🌸 खुप खुप प्रेम करायचं आहे.. 🥰😘

I Love You So Much.. 🌹😘


तुझ्या आठवणींत जगणारा.. 😢
फक्त तुझाच.. 🤝🏻🥰
एक प्रेमवेडा.. 😉

✍️🏻 अक्षय खापेकर.. ©
(All Copyright Reserved)


------------------- (समाप्त) ---------------------


मनाचं प्रेमपत्र.. 📩 (पत्र दुसरे)

ऐकना..

आज तुझी खूप आठवण येतेय क्षणाक्षणाला.. 😓 पण कसं समजावू मी माझ्या या वेड्या मनाला.. 😥माझ्या प्रत्येक श्वासात तु मला हवीहवीशी वाटतेय.. तुझ्याचसाठी तर ही अनामिक ओढ दाटतेय.. 😪


तुझ्या जवळपास असल्यानेही मनात बकुळ फुलून जातो.. 😍 प्रेमाचा पारवा त्यावर आनंदाने झुलून जातो.. 😃 तुझ्या प्रेमाचा गंध तर मन मोहवून जातो.. 🤩 कस्तुरीप्रमाणे मनाच्या डोहातील अंतरंगात तरळत राहतो.. 🤗


तुझं आसपास झुरणं मला हरवून जातं.. 😚 तुझ्या टपोऱ्या डोळ्यांत मला माझं भविष्य दाखवून जातं.. 🥰 तु दिसल्यावर मला वेड लागल्यागत होतं.. 💞 सारं जग तुच आहेस एवढंच मनाला वाटतं.. 😘


अजून कशा व्यक्त करु मी माझ्या मनीच्या भावना.. 🤔 तुझ्यासाठी त्या कधीच कमी नाही होणार किंबहुना.. 😐 तुच आहेस ध्येय माझं तुच माझी आस.. 😚 तुच आहे सर्वस्व तुच माझा श्वास.. 😘


आता तुच मला सांग की, जर तु माझा श्वास आहेस.. तर कुणी जगू शकतं का आपल्या श्वासाशिवाय.. 🤔 तुला रोज आठवून जगतोय मी राती.. 🌟 तारे मोजू नभातले कधीतरी घेऊन हात हाती.. 🤝🏻


थांब जरा अजून बाकी आहे.. ✋😎

स्वप्नांत तु भेटल्यावर तुझ्या डोळ्यांतली नशा मला वेगळंच वेड लावतेय.. 🤩 दोन्ही हातांची ओंजळ प्रत्येक देवाकडे तुलाच मागतेय.. 🤲🏻 तुझंही असंच होतंय का.. 🤔 कधीतरी घट्ट मिठी मारून तुही मोकळी हो ना माझ्यापाशी.. 💏


मला आवडेल तुला समजून घ्यायला.. 😚 तुझ्या प्रत्येक प्रसंगात तुझी साथ द्यायला.. 🤝🏻 मला आवडेल आयुष्यभरासाठी तुझं व्हायला.. 💏 तुझ्या सोबतीने आयुष्याची वाट चालायला.. 🤝🏻


होशील ना तु माझी.. 👐🏻
जन्मोजन्मीची जीवनसाथी.. 💏
वाट बघतोय ये लवकर आयुष्यात.. 😥😘


I Love You So Much.. 🌹😘


तुझ्या आठवणींत जगणारा.. 😢
फक्त तुझाच.. 🤝🏻🥰
एक प्रेमवेडा.. 😉

✍️🏻 अक्षय खापेकर.. ©
(All Copyright Reserved)


------------------- (समाप्त) ---------------------


क़्रमश: ...