It should happen sometime... in Marathi Poems by Priyanka Kumbhar-Wagh books and stories PDF | कधीतरी असे घडावे...

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

कधीतरी असे घडावे...


कधीतरी असे घडावे
तू माझा नि मी तुझी व्हावे
सुख- दुःखांच्या वाटेवर
आपण संगती चालावे

कधीतरी असे घडावे
तू बोलावेस अन् मी ते ऐकावे
बोलता बोलता शब्दांनी
सप्तसुरांचे ताल छेडावे

कधीतरी असे घडावे
तुझे स्वप्न माझे व्हावे
तू उन्हात असताना
मी तुझी सावली व्हावे

कधीतरी असे घडावे
तू दीप अन् मी ज्योत व्हावे
तुझ्या अखंड तेजाने
मी निरंतर तेवत रहावे

कधीतरी असे घडावे
तू अन् मी एक व्हावे
माझा अतूट विश्वास तू
मी तुझा आधार व्हावे

माझा अतूट विश्वास तू
मी तुझा आधार व्हावे

- प्रियांका कुंभार (वाघ).

(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -


जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात अखंड बुडालेले असतो, तेव्हा दिवसरात्र फक्त त्याच व्यक्तीची आपण स्वप्नं पाहू लागतो. ती व्यक्ती सतत आपल्या सहवासात असावी अस वाटतं. आपल्या सुख - दुःखात ती आपल्या नेहमी सोबत असावी असेच वाटते.

त्या व्यक्तीने पाहिलेली सगळी स्वप्नं आपलीशी वाटतात. त्या व्यक्तीला नेहमी अनदांत बघावं अस सतत आपल्याला वाटतं.
त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपण दोन हात करण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. त्याची अगदी सावली बनून आपण त्याच्या सोबत असतो.

त्या व्यक्तीच्या इच्छा, आकांक्षा सगळ्या पूर्ण व्हाव्या आणि त्या व्यक्तीला काय हवं नको ते सगळं त्याला मिळावं या पलीकडे आपण देवाकडे काहीच मागत नाही. प्रेमात असल्यावर आपण स्वतःसाठी देवाकडे काही मगायचेच विसरून गेलेलो असतो.

भविष्यात कधी एकत्र होऊ की नाही माहीत नसते पण तरीही त्याची सोबत कायम मिळावी या साठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. सदैव सोबत राहण्याची गोड स्वप्नं
आपण बघू लागतो. त्या व्यक्ती शिवाय पुढील आयुष्याचा विचार करणे सुद्धा नकोसे वाटते. जणू काही मंत्रमुग्ध गाण्यातील स्वर च नाहीसे झाले असे भासते.

त्या व्यक्तीच्या असण्याने आयुष्यातील प्रत्येक पानावर विविध रंगांनी रंगवलेले सगळे क्षण इंद्रधनुष्या सारखे भासतात. त्या व्यक्ती सोबत घालवलेल्या प्रत्येक सुंदर क्षणाची अनुभूती परमानंद भासते. आपण त्या व्यक्तीच्या सानिध्यात असताना स्वतःचे भान विसरून जातो आणि ती व्यक्ती सोबत नसताना तिच्या गोड आठवणींनी गालातल्या गालात हसतो. केवळ एक व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्याने आपलं आयुष्य सुखद झाल्या सारखे वाटते.

इतरांपेक्षा अधिक विश्वास आपण त्याच व्यक्तीवर ठेवतो.एकमेकांचा आधार होऊन नव्या युगाची स्वप्नं रंगवतो. कधी देवाकडे काही स्वतःसाठी मागायचे असल्यास आपण फक्त त्याच व्यक्तीला मागतो. त्याच्या सुखासाठी प्राथर्ना करतो.
त्याच्यासाठी दीर्घायुष्य मागतो.त्याला चांगले अयोग्य मिळावे यासाठी आपण देवाकडे साकडं घालतो. नात्यातील गोडवा असाच टिकावा अशी मनोमनी ईच्छा बाळगतो.


****** ***** **** **** **** **** **** ***** ******* *** **** *** *** ****** ***** ******

(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -



(All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any from by any means, including photocopying, recording, or other electronic methods without the written permission of the author, except in the case of brief quotations embodied in reviews and certain other non commercial uses permitted by copyright law.)


*** *** **** ****** ****** ****** **** **** ******* ** **** ****** ****** ******* ****