Mala Space havi parv 1 - 62 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६२

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६२

मला स्पेस हवी पर्व १ भाग 62
 
त्यादिवशी दुपारी अनुराधा नेहाचं जेवण आटोपून समोरच्या खोलीत गेली. त्यानंतर नेहा झोपण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा फोन वाजला फोनवर सुधीर नाव दिसताच नेहाच्या कपाळा वर आठी आली तरी नेहाने फोन घेतला.
 
 
“हॅलो”
 
नेहा बोलते. नेहाचा थकलेला आवाज ऐकून सुधीर काळजीने विचारतो.
 
“नेहा काय झालं? तुझा आवाज असा का येतो आहे?”
 
सुधीर च्या आवाजात काळजी होती.
 
“काही नाही. थोडा ताप आलाय एवढच.”
 
नेहा अलिप्त राहून बोलत होती पण तिकडे सुधीरला नेहाची काळजी वाटायला लागली.
 
“ नेहा अगं तिथे तू एकटी आहेस. कोण आहे तुझी सेवा करायला ? बरं वाटतं नव्हतं तर येऊन जायचं ना पुण्याला परत. असं का करतेस ?इतकी कंटाळलीस का मला ?”
 
हे बोलताना सुधीरचा आवाज गहिवरला होता.
 
हे सगळं ऐकून नेहा म्हणाली,
 
“ मी आत्ताच जेवणानंतरची औषधं घेतली आहेत. माझ्या ऑफिस मधल्या दोघीजणी आळी पळीने माझ्याबरोबर येथे राहतात.”
 
“ म्हणजे अशी किती दिवस झाले तू आजारी आहेस? “
 
“झाले असतील दहा-बारा दिवस.”
 
नेहाने अत्यंत निर्विकारपणे उत्तर दिलं. त्यावर सुधीर म्हणाला,
 
“ नेहा अगं इतकी कशी अलिप्त झालीस? तुला दहा-बारा दिवस झाले बरं नाही आणि तू एकदाही फोन केला नाहीस. अगं मी आलो असतो सुट्टी घेऊन.”
 
ताडकन नेहा म्हणाली,
 
“मला नकोच आहे कोणी.”
 
“ मग तुला ऑफीसच्या कलीगची गरज का लागली ? म्हणजे स्वतःच्या जवळच्या लोकांना दूर लोटून तू तिथे बंगलोरला गेलीस आणि “
 
नेहा म्हणाली,
 
“ सुधीर प्लीज मला आता तुझं काही तत्वज्ञान ऐकायचं नाही. मला आता झोपायचं आहे.”
 
एवढे बोलून नेहाने फोन कट केला आणि झोपायचा प्रयत्न करू लागली. पण झोप काही येईना. तिच्या मनात खूप विचार येऊ लागले.
 
एका बाजूला सुधीरचा आवाज काळजीयुक्त होता. त्याच बरोबर दुसरीकडे अनुराधा आणि अपर्णा होत्या तसंच रमण शहा माझ्या काळजीपोटी ताप असताना इथे मला बघायला आला. तिला कळेना यामध्ये नक्की कोण आपलं आहे ?कोणाच्या बाजूने आपण उभं राहिला पाहिजे? विचार करून करून तिचा मेंदू थकला.
 
अनुराधाने येऊन विचारलं,
 
“ मॅडम तुम्ही हाक मारली का? मी टीव्ही पाहत होते. त्यामुळे लक्षात आलं नाही.”
 
“ नाही .अग एक फोन आला होता त्यावर मी बोलत होते.”
 
“ हो का बर. पण आता झोपता का ?औषधे दिली आहेत ना छान झोप लागेल .”
 
 
“हो .”
 
असं म्हणून नेहमी डोळे मिटून घेतले.
 
“ मॅडम टीव्ही चालू आहे म्हणून मी थोडं दार लोटून घेते.”
 
नेहा हो म्हणाली. अनुराधा नेहाच्या खोलीचा दार हळूच लोटून आणि समोरच्या खोलीत गेली. इकडे नेहा डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत होती पण तिच्या मनात खूप विचार गोंधळ घालत होते. विचारांची आवर्तन सुरू होती. एका मागून एक एका मागून एक येणारी ही आवर्तनं तिच्या मनाला त्रास देऊ लागली. काय करावं आधीच थकव्यामुळे तिला सुचत नव्हतं. त्या थकव्यामध्येच अचानक रमण शहाने येऊन तिला धक्का दिला होता. रमण शहा आपल्यात गुंतला आहे त्यात आज सुधीरचा काळजीयुक्त आवाज ऐकला तिला काही सूचेना.
 
सुधीर हा तिचा पहिला विश्वासू माणूस आहे .रमण शहा बद्दल एवढा विश्वास कसा द्यायचा? कारण तो काही तिच्या नात्यातला नाही की खूप जुन्या ओळखीचा नाही. सुधीर बरोबरच्या नात्याचा कंटाळा आल्यामुळे नेहा बंगलोरला आली. आणि पुन्हा रमण शहा नावाच्या नात्यात गुंतायचं?
 
नेहाच्या मनात गोंधळ उडाला होता.
 
अनुराधा, अपर्णाचं नातं सुखाचं आहे पण रमण शहाचं माहित नाही. क्षणिक सुखावर आधारलेलं असू शकतं. मनाला आणखीन त्रास देणार.असं नातं नको. विचार करून करून थकल्यावर कधीतरी नेहाचा डोळा लागला.
 
 
सुधीरने फोन ठेवला पण त्याचं मन काळजीने भरून गेलं. नेहा स्पेस हवी म्हणत आपल्या पासून दूर गेली. पण आपण कुठे तिच्या पासून अजून दूर गेलो आहे? नेहा बद्दल आपल्या मनात अजूनही पूर्वीचच प्रेम आहे मग नेहा इतकी अलिप्त कशी झाली ? याचं सुधीरला कोडं पडलं. नेहाशी फोनवर बोलणं झाल्यापासून सुधीरला ऑफिसमध्ये काही सुचेना.‌ काय करावं? बंगलोरला नेहा कुठे राहते हे सुद्धा तिने आपल्याला अजून सांगितलेलं नाही. कसं जाणार? तिला भेटावसं खूप वाटतं. काय करावं?
 
 
सुधीरचा रडवेला चेहरा बघून निशांत आपल्या जागेवरून उठून सुधीर जवळ आला आणि त्याने विचारलं,
 
“सुधीर अरे काय झालं ?इतका का उदास दिसतोयस?”
 
त्यावेळेला सुधीरने सांगितलं ,
 
“अरे सहज मी नेहाला फोन केला होता तर ती तिकडे आजारी पडलेली आहे. दहा-बारा दिवस झाले पण तिने मला फोन करून सांगितलं नाही. तिच्या ऑफिसच्या कलीग तिच्याकडे पाळीपाळीने येऊन राहत आहे आणि तिची सेवा करतात आहे.”
 
“काय ? सुधीर हे तर आश्चर्यकारक आहे. नेहाने तुला फोन करायला हवा होता.”
 
 
“अरे मी म्हटलं तिला मी आलो असतो. तर तिने ताडकन नाही मला तू यायला नकोय असं म्हणून फोन बंद केला.”
 
 
“ सुधीर हे अति झालं रे !”
 
 
निशांत म्हणाला
 
“काय करू रे मी? माझ्या मनात अजून नेहा बद्दल प्रेम आहे. नेहाच्या मनात का नाही? मी कुठे चुकलो? लांब जाऊन सुद्धा तिला माझ्यातली चांगले बाजू दिसली नाही का ?”
 
यावर निशांत म्हणाला,
 
“ सुधीर हे बघ आपल्याला कोण कसं वाटतं हे आपण ठरवू शकतो .पण आपण दुसऱ्याला कसं वाटू हे आपण नाही ठरवू शकत. नेहाच्या मनात तू कसा आहेस हे तिला माहिती आहे. नेहा तुला कशी वाटते हे तुला नक्की माहिती आहे .”
 
“अरे पण नेहा माझ्याशी बोलायला तयारच नसते. मग मी काय करू ?”
 
“तू बंगलोरला जा. भेट तिला .”
 
निशांत म्हणाला.
 
“पण निशांत ती भेटायला ही तयार नाही. ती कुठे राहते हे पण मला माहिती नाही. ऑफिस कुठे आहे? ऑफिसचा नंबर मला माहिती नाही. इतक्या अलिप्त पणे ती गेली. मी काय करू ?”
 
यावर निशांतही विचारात पडला. तो म्हणाला,
 
“ सुधीर तुझ्या आयुष्यात खूपच गुंता होऊन बसलाय. असं काय झालं की ज्यामुळे नेहा इतकी चांगली मुलगी असून तडका फडकी तुला सोडून गेली?”
 
 
“ निशांत मला वाटतं प्रियंकाच्या जाण्या नंतर जे नातेवाईक येऊन आमच्याकडे राहिले होते ना त्यांनी जो घोळ घातला त्यामुळे आमच्या संसारात गोंधळ निर्माण झाला आहे.”
 
“ असं काय झालं सुधीर?”
 
“ अरे ते नातेवाईक इतकी विचित्र वागले. इतके नेहाला कामं सांगायचे ,नेहा कडून अपेक्षा करायचे नेहा पाहुणे म्हणून ते सगळं करायची. अरे पण तुम्ही दुःखाची सांत्वना करायला आलात तिथे तुम्ही स्वतःचं आदरातिथ्य आणि मान सन्मान कसं काय अपेक्षित करता? या गोष्टीचा नेहाला राग आला. ही काय दोन-चार दिवसांची गोष्ट नाही आमच्याकडे किती दिवस पाहूणे येत होते. प्रत्येक वेळेला त्या प्रत्येक पाहुण्यांची खातीरदारी करता करता नेहाला कंटाळा आला.”
 
 
“ या सगळ्या नातेवाईकांबरोबर तू उगीचच नेहाच्या रागात भरडला गेलास ना सुधीर.”
 
 
“ खरं आहे रे निशांत. पण काय करू मी माझ्या नशिबात हेच होतं असं मला वाटतं.”
 
 
“नाही सुधीर हे असं शांत बसून चालणार नाही. ती आजारी आहे. तुझा जीव इथे राहत नाहीये. तू जाऊन बघ बंगलोरला तिच्याकडे. भेट तिला. तीन महिन्यात तिच्या मनात काही बदल झाला असेल तर तू तिला इकडे घेऊन ये .”
 
 
“पण असं कसं येता येईल? ती आता तिथे जॉब करते.”
 
“ठीक आहे. जॉब करते काही दिवस विश्रांतीसाठी घेऊन ये. इथे आल्यावर जर तुझ्याविषयी तिला पुन्हा ओढ वाटली तर पुन्हा ती इकडे येण्याचा प्रयत्न करू शकते किंवा तू काही दिवस तिकडे राहू शकतो.”
 
 
“निशांत माझं ना डोकं चालत नाहीये रे .काय होऊन बसलं. इतकी गुणी मुलगी आहे नेहा. मला माहितीये तिच्या घरच्यांना पण इतका धक्का बसलेला आहे. इतकी गुणी मुलगी हा असा उफराटा निर्णय कसा घेऊ शकते याचंच त्यांना आश्चर्य वाटतं आहे. “
 
 
“तिच्या भावाने, आईने सांगून बघितलं नाही का रे नेहाला?”
 
 
“अरे अक्षयचं आणि नेहाचं खूप वाजलं यावरूनच. अक्षयचच नाही तिच्या आईशी सुद्धा वाजलं. तिची आई म्हणाली ‘इतकी विचार करणारी मुलगी आज अशी का वागतेय? इतका तडका फडकी निर्णयावर का आली? सगळ्या नात्यांमधून अशी अलिप्त का झाली ?हेच मला कळत नाहीये.’ आता जिथे तिची आईच हे म्हणते आहे तिथे आपण काय करणार ? तिची आई तर तिला जन्मापासून ओळखते ना ?”
 
“हो रे ते तर बरोबर आहे. आई शिवाय कोणीच आपल्या मुलाला किंवा मुलीला ओळखू शकत नाही. पण तरीही तू एकदा प्रयत्न करून बघ किंवा असं कर ना तू ती आजारी आहे म्हणून तिच्या आईला सांग फोन करायला.”
 
 
“ नको रे बाबा एवढ्यावरूनच नेहाचं जर बिनसलं तर ती जर आता यायला तयार असली तरी येणार नाही. त्यापेक्षा मी कोणालाही फोन करायला सांगत नाही.”
 
“मग काय करणार? तुझा ती फोन घेत नाही ना? आज सकाळी कसा काय तुझा फोन घेतला?”
 
 
“ पुष्कळदा माझ्या फोनवरून ऋषी बोलतो ना म्हणून कदाचित तिला वाटलं असेल म्हणून तिने फोन घेतला असेल. तिने फोन घेतला म्हणून मला तिचा आवाज कळला. तिचा आवाज खूप थकलेला आहे.”
 
 
“म्हणून मी तुला म्हणतो आहे की कोणी ओळखीचं नाही का ? ज्यांच्याकडूनं तिच्या बंगलोरच्या ऑफिसचा नंबर मिळू शकेल.”
 
निशांत म्हणाला. बराच वेळ सुधीरने विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं तो म्हणाला,
 
“अरे निशांत नेहाची मैत्रीण आहे रंजना. तिच्या ऑफिसमध्ये आहे .ती नेहाच्या लग्नातही आली होती. आमच्याकडे बरेचदा येऊन गेली आहे .”
 
“ अरे मग तिला माहिती असेल ना नेहाचा तिथल्या ऑफिसचा नंबर ?”
 
 
“हो माहिती असेल. मी असं करतो मी तिलाच फोन करून विचारतो तिथल्या ऑफिसचा नंबर. मग तिथे ऑफिसमध्ये फोन करून तिच्या घरचा पत्ता मागतो .”
 
“ गुड. तसं झालं तर तू तिला भेटायला बंगलोरला जा.”
 
“ हो मीच भेटायला जाईल निशांत थँक्यू “
 
“सुधीर थँक यु कसला म्हणतोस ?”
 
“अरे तुझ्याशी आता मी बोललो त्यामुळे हा मार्ग सुचला. मगाशी तर मी असाच गोंधळलेला बसलो होतो.”
 
सुधीररचा हात हातात घेऊन निशांत म्हणाला,
 
“ ठीक आहे चालायचंच. खूपदा आपल्यावर आलेल्या कठीण काळात आपल्याला योग्य निर्णय काय घ्यायचा ते समजत नाही. कारण दु:खाने आपला मेंदू मुका आणि बधीर झालेला असतो. तेव्हा समोरचा व्यक्ती योग्य मार्ग दाखवतो. कारण त्याचा मेंदू कार्यरत असतो. तू घाबरू नको आणि त्या मैत्रिणीला फोन कर तिचा तरी नंबर आहे का तुझ्याजवळ ?”
 
 
तेव्हा सुधीर च्या लक्षात आलं ,
 
“बापरे आता तिचा नंबर कसा शोधू?”
 
“ मग असं कर सुधीर पुण्यात कुठे आहे नेहाचा ऑफिस? तिकडे जा .”
 
“ हो असं करतो .तिच्या ऑफिसमध्ये जातो आणि बंगलोरच्या ऑफिसचा नंबर घेतो.”
 
“ हं तसंच कर. आता त्या मैत्रिणीचा नंबर शोधत नको बसू. तिथे ऑफिसमध्येच त्या मैत्रिणीला डायरेक्ट भेट .”
 
“ठीक आहे मी तसंच करतो.”
 
 
यानंतर सुधीर जरा शांत झाला सुधीरचा हात थोपटून निशांत आपल्या जागेवर गेला. निशांच्या मनात आलं असे सुधीरचे कोणते ग्रह बिघडले आहेत ? सुधीरच्या आयुष्यात काय काय घडतय ! कितीतरी अडथळे येतात आहेत. कसा हा तिढा सुटेल? यावर निशांतचं डोकं विचार करू लागलं.
 
 
बऱ्याच वेळाने सुधीर शांत झाला आणि सुधीरने ठरवलं की लंच टाईम मध्ये जेवणाऐवजी आपण नेहाच्या पुण्याच्या ऑफिसमध्येच जाऊन बघायचं आणि तिथून बंगलोरच्या ऑफिसचा फोन नंबर घ्यायचा. त्या नंबर वर आपल्याला नेहाच्या घरचा पत्ता मिळू शकेल. हे ठरवल्यावर सुधीर बराचसा सावरला. त्यानंतर त्याने अक्षयला फोन लावला,
 
“ हॅलो बोल रे सुधीर .”
 
“अक्षय सकाळी सहज मी नेहाला फोन केला होता.”
 
“ सहज ? सहज कशा करता केला होता ?”
 
अक्षयने आश्चर्याने विचारलं.
 
“ अरे असंच मनात आलं म्हणून मी फोन केला तेव्हा लक्षात आलं की ती दहा-बारा दिवसापासून आजारी आहे.”
 
‘काय सांगतो? मग आता कशी आहे आणि काय करतेय?”
 
ह्या अक्षयच्या प्रश्नावर सुधीर म्हणाला,
 
“ अरे तिच्या ऑफिसच्या कलीग आळीपाळीने घरी येऊन तिची सेवा करतात आहे .”
 
 
यावर अक्षयने विचारलं की,
 
“ तिने तुला का नाही कळवलं ?”
 
“कुणास ठाऊक ?मला नाही माहिती. पण आता मी त्याच विचारात असताना निशांतने हे मला सांगितलं की पुण्याच्या तिच्या ऑफिसमध्ये जाऊन बंगलोरच्या ऑफिसचा पत्ता आणि नंबर घे. नंबर वर फोन करून नेहा कुठे राहते बंगलोर मध्ये तो पत्ता माग. मग तिकडे जाऊन तिला भेटून ये जर ती थोडी निवळली असेल तर तिला विश्रांतीसाठी पुण्याला घेऊन ये.”
 
 
“सुधीर निशांत बरोबर बोलतोय. तू कधी तिचा नंबर घेतो आहेस ऑफिसचा?”
 
“ मी विचार करतोय आत्ता लंच टाईम मध्ये जाऊन तो नंबर घ्यावा.”
 
“ ठीक आहे तू जाऊन ये कारण मी जरा इकडे साईटवर आलेलो आहे त्यामुळे मला येता येणार नाही.”
 
“ नको नको तू तुझं काम बघ. मी नंबर घेऊन येतो मग तुला सांगतो.”
 
“ सुधीर तुला नंबर मिळाला की तू फोन करून नेहाचा पत्ता घेतलास की सांग. आपण दोघं बरोबर बंगलोरला जाऊ. “
 
“ठीक आहे. मला गरज आहेच तुझ्या सोबतीची.”
 
सुधीर अक्षयला म्हणाला आणि तो लंचटाईमची वाट बघू लागला. आता सुधीरचं कामात लक्ष लागेना. त्याच्या डोळ्यासमोर सारखा नेहाचा चेहरा येत होता.
 
 
________________________________