Mala Space havi parv 1 - 53 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५३

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५३

मला स्पेस हवी पर्व १ भाग 53
 
मागील भागात आपण बघितलं की रमण शहा नेहावर लुग्ध झालेला आहे आणि तो नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय रमण शहा स्मार्ट माणूस आहे. नेहाला मात्र या सगळ्याची काहीही कल्पना नाही आता पुढे काय घडतंय बघू
 
 
सकाळी नेहा नेहमीप्रमाणे उठली. ती दूध तापवून चहा करायला घेणार तेवढ्यात तिच्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला. मेसेज टोन वाजला तसं तिने बघितलं त्याच्यावर रमण शहाचं नाव दिसलं तिला आश्चर्य वाटलं इतक्या सकाळी याने आपल्याला का मेसेज करावा? काल तर आपली ओळख झाली. नेहा कोणाच्या समोर समोर करणारी मुलगी नसल्यामुळे रमण शहाचा डाव तिच्या लक्षात आला नाही. तिने मेसेज लगेच काही बघितलं नाही. चहा केला आणि पेपर चाळत असताना चहा पिता पिता पुन्हा एकदा तिच्या डोक्यात आलं की रमण शहाचा मेसेज आलाय म्हणून तिने मेसेज उघडून बघितला त्याच्यावर मैत्रीचा संदेश देणारा एक छान सुविचार होता.
“ मैत्रीचं सुकाणू हाती घेतलं तर आयुष्याचा समुद्र
सहज पार करता येतो.”
 
हा सुविचार वाचून नेहाला वाटलं परवाच ओळख झाली. आपण प्रत्यक्ष भेटून या विषयावर डिस्कशन केलं आणि आज याने लगेच मला मैत्रीचा संदेश पाठवला. तिला आश्चर्य वाटलं. तिने काही रिप्लाय न देता मोबाईल बाजूला ठेवून पेपर वाचायला सुरुवात केली.
 
रमण शहाने आणखीन एक छान ब्लॉग तिला पाठवला की ज्याच्यावर सकारात्मक विचाराची देवाण-घेवाण होईल असा तो ब्लॉग होता. नेहाला पेपर वाचताना पुन्हा तिच्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला. तिने मोबाईल बघितला पुन्हा रमण शहा नाव दिसलं. तिला आश्चर्य वाटला हा काय आपल्याला मेसेज पाठवतोय म्हणून तिने मेसेज उघडून बघितला तर तिला तो मेसेज आवडला. खूप छान सकारात्मक पद्धतीने लिहिलेला मेसेज होता कोणाचा तरी फॉरवर्ड केलेला होता तिला छान वाटलं. तो मेसेज वाचून काहीही उत्तर न देता मेसेज बंद केला.
 
रमण शहांनी बघितलं की त्याच्या दोन्हीही मेसेजना रीड केल्या गेलं आहे कारण ब्ल्यू टिक दिसत होती. तो समजला की नेहाने आपली दोन्ही मेसेज वेळ न घालवता वाचले म्हणजे आता आपल्याला पुढे जायला हरकत नाही. रमण शहा पद्धतशीरपणे आवडणाऱ्या व्यक्तीकडे पावलं टाकून मैत्रीचा हात पुढे करत असे.
 
पेपर वाचताना पुन्हा तिला मेसेज आला आता तिच्या कपाळावर आठ्या आल्या. तिला वाटलं हा माणूस काय अगदी पहिल्या भेटीपासूनच आपल्याला मेसेज पाठवतोय पण मोबाईलवर रंजनाचा मेसेज होता. नेहाने लगेच तो मेसेज वाचला.
 
‘नेहा बंगलोरला गेलीस आणि मला विसरलीस का ग? तुझा एकही कॉल नाही आला आत्तापर्यंत. काय करतेस? सेट झाली का? नवीन फ्लॅट मिळाला का? ऑफिसमध्ये सगळ्यांच्या ओळखी झाल्या का? ते सगळे सहकार्य करतात का?”
 
रंजनाने इतके प्रश्न विचारावेत यात नेहाला काही गैर वाटलं नाही. कारण रंजना ही तिची जुनी मैत्रीण होती. रंजना आणि नेहा दोघे साधारणतः पंधरा दिवसाच्या अंतराने स्वस्तिक टूर्स ट्रॅव्हल्स मध्ये नोकरीला लागल्या होत्या. रंजना जरा पंधरा दिवस आधी लागल्याने तिला ऑफिस थोडेफार ओळखीचं झालं होतं .त्यामुळे रंजना आणि नेहा दोघींची पक्की मैत्री झाली. रंजना पंधरा दिवस आधी जरी नोकरीला लागली असली तरी तिची तेवढी कोणाशी ओळख नव्हती त्यामुळे नवीन आलेल्या नेहाशी तिचे पटकन जमले आणि दोघी पक्क्या मैत्रिणी झाल्या.
 
तेव्हापासून दोघेही लंच टाईम मध्ये बरोबरच डबा खात असत. एकमेकांच्या गोष्टी सहजपणे एकमेकींना शेयर करत असत. त्या सुमारास रंजनाचा लग्न जवळपास ठरत आलेलं होतं. नेहाचा अजून काही लग्नाचा विचार नव्हता. एकूण काय नेहा आणि रंजना यांची जुनी मैत्री असल्यामुळे रंजनाचा मेसेज वाचून नेहाला छान वाटलं.
 
बंगलोरला येण्यापूर्वी नेहा आणि रंजना दोघींची जरा झगमग झाली होती पण मैत्रीच्या रम्य बंधनामुळे ती कधी विरून गेली ते दोघींनाही कळले नाही. म्हणूनच रंजनाने नेहाला मेसेज केला. रंजनाचा मेसेज वाचून नेहाने त्याला आवडीने रिप्लाय केला तिने लिहिलं,
 
“ रंजना तुला विसरणार मी कसं शक्य आहे. आपल्या दोघींची नोकरी एकाच वेळेला स्वस्तिक मध्ये सुरू झाली. पंधरा दिवस तू मला सिनियर आहेस पण त्याचा फारच फायदा तू घेते बर का ! तू मला खूप ज्ञान शिकवतेस. हसू नकोस पण मी मात्र तुला मिस करते हं.”
 
असा मेसेज टाईप करून नेहाने मोबाईल बाजूला ठेवला. नेहा ऑफिसला जाण्याची तयारी करू लागली. तिच्या लक्षात आलं की जाहिरातीसाठी जे नव्याने स्क्रिप्ट लिहायचे होते त्यासाठी तीनही लेखकांना आपल्याला मिटींगला बोलवायचे आहे. नेहाच्या हेही लक्षात होते त्या लेखकांना मिटींगला बोलवण्यापूर्वी रमण शहांची परवानगी घ्यायला लागणार होती. कारण ते दोन लेखक त्यांचे होते.
 
स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडे असलेल्या लेखिकेची परवानगी घेण्याची गरज नव्हती. नेहाने भराभर काम उरकून आपला डबा तयार करून ऑफिसला निघायला तयार झाली.
 
नेहा ऑफिसमध्ये पोचली तशी तिने अपर्णाला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले.
 
“ मी आत येऊ मॅडम?”
 
अपर्णाने विचारलं
 
“हो ये.”
नेहाने हातानेच इशारा करत समोरच्या खुर्चीवर अपर्णाला बसण्याची परवानगी दिली. अपर्णा खुर्चीवर बसली तशी नेहा म्हणाली,
“ अपर्णा आपल्याकडे जी लेखिका आहे तिला एकदा आपण संधी देऊ असं मला वाटतं.त्यानंतरही तिचं काम आपल्याला आवडलं नाही तर आपण अतुलला हे काम सांगावं असं मला वाटतं.”
 
“ बरोबर आहे मॅडम. कारण तिला आपण एकदा काम दिलेलं आहे. त्यामुळे तिचं काम आपल्याला आवडलं की नाही याची ती वाट बघत असणार. त्यामुळे आत्ता तिला आधी संधी देऊ आणि तुम्ही म्हणता तसं जर तिचं काम आवडलं नाही तर आपण अतुलला संधी देऊ. हे योग्य राहील.”
 
नेहा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचं मत विचारत असे. आपलं म्हणणं आपल्या सहकाऱ्यांना नेहा इतकी छान समजावून सांगायची की नेहाचं म्हणणं त्यांना पटायचं. आताही नेहाने तेच केलं.
 
 
“बरोबर.”
 
नेहा म्हणाली.
 
“ पण मॅडम त्या दोन लेखकांना बोलवण्यासाठी तुम्हाला रमण शहांना सांगावं लागेल.”
 
“हो.”
 
नेहा म्हणाली हे बोलताना नेहाला सकाळी रमण शहाचे आलेले मेसेज आठवले. तिला खरंतर यामुळे आज रमण शहांना फोन करायची इच्छा नव्हती पण टूर्स मॅनेज झालेले होते आणि त्याची जाहिरात करण्यासाठी तिला त्या लेखकांना आपल्याकडे मिटींगला बोलवणं आवश्यक होत यासाठी नाईलाजाने का होईना नेहाला रमण शहांना फोन करणं भाग होतं.नेहाने रमण शहांना फोन लावला.
 
“हॅलो”
 
रमण शहांनी फोन घेत विचारलं. फोनवर नेहाचं नाव झळकल्यआवर रमण शहाच्या मनाला गुदगुल्या झाल्या.
वरून तसं न दाखवता त्याने आपल्या आवाजावर संयम ठेवला.
 
“शहा साहेब मला हे विचारायचे की तुमचे दोन लेखक आणि आमची एक लेखिका या तिघांनी एका टॉपिक वर स्क्रिप्ट लिहिलं आहे पण तिघांनीही सगळे मुद्दे कव्हर केले नाहीत. कुठे काय सुटलेला आहे हे मी आणि माझी असिस्टंट अपर्णा दोघींनी नोट डाउन करून ठेवलेलं आहे. मी फोन याच्यासाठी केला की तुमचे दोन लेखक आणि आमची एक लेखिका तिघांना एकदा मीटिंगसाठी आमच्या ऑफिसमध्ये बोलवायचं आहे. तिघांना मी पर्सनली सर्व सविस्तर सगळी आमची रिक्वायरमेंट सांगीन. कदाचित मेलमध्ये वाचून त्यांना नीटसं कळलं नसेल म्हणून ही मीटिंग आवश्यक आहे. हे जर यशस्वी झाली तर लगेचच जाहिरातीचं शूट आपण करू शकतो म्हणून तुमची परवानगी असेल तर मला त्यांचे फोन नंबर कळवावे.”
 
यावर रमण शहा लगेच म्हणाला,
 
“हो मॅडम याला माझी पूर्ण परवानगी आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्क्रिप्ट लिहायचं आहे त्यासाठी तुम्ही दोघांनाही मीटिंग करिता तुमच्या ऑफिसमध्ये बोलावू शकता. मी तुम्हाला दोघांचेही फोन नंबर मेसेज करतो. मला काही प्रॉब्लेम नाही.”
 
यावर नेहाने
“थँक्यू साहेब”
 
अस म्हणत फोन ठेवला. नेहाने लगेच फोन ठेवल्यामुळे रमण शहा थोडा नाराज झाला पण आज दोन मेसेज तिने रीड केले आहे ही सकारात्मक बाजू रमण शहाने मनाशी धरून ठेवली आणि एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर आलं.
 
नेहाने रमण सहाशे काय बोलणं झालं हे अपर्णाला सांगितलं. तेवढ्यात नेहाच्या फोनचा मेसेज टोन वाजला. रमण शहाने दोन्ही लेखकांची नाव आणि फोन नंबर पाठवले होते. ते नंबर नेहाने अपर्णाला पाठवताना म्हटलं,
 
“अपर्णा मी त्या दोन लेखकांचे नाव आणि फोन नंबर तुला पाठवले आहेत. या दोघांना तू आता फोन कर आणि त्यांना कधी बोलवायचं ती तारीख सांग तसंच आपल्या लेखिकेलाही फोन करून तारीख सांग.”
 
यावर होकारार्थी मान डोलवत अपर्णा विचारलंं,
 
“मॅडम कधी बोलवायचं आहे?”
नेहा म्हणाली,
 
“अपर्णा शक्यतो परवाच बोलूया कारण परवा त्यांना पूर्णपणे कल्पना देऊन इथेच जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करण्यासाठी आपल्या कॉन्फरन्स रूममध्ये बसवूया. तिथे तिघांना एकमेकांशी चर्चा करत जाहिरातीचं स्क्रिप्ट लिहायचं असेल तर लिहिण्याची परवानगी देऊया.”
 
“मॅडम यांनी काय होईल? गोंधळ होईल ना? असं अपर्णाने म्हणताच नेहा तिला समजावून सांगत म्हटलं,
“हे बघ याने गोंधळ होणार नाही. कदाचित तिघेजण एकमेकांशी चर्चा करून एक छानशी जाहिरात करू शकतील . तिघांनाही आपण एकाच वेळी आपल्याला जाहिरात कशी हवी आहे हे सांगितलं आहे त्यामुळे गडबड गोंधळ होणार नाही. जर आपला प्रयोग यशस्वी झाला तर आपण या तिघांना सगळ्या जाहिराती आपल्याला काय हवं आहे याचं डिटेलिंग करत सांगू आणि त्यांना एकत्र बसवून जाहिरात तयार करायला लावू.”
कसं वाटतंय? पटतंय का? या अर्थी नेहाने अपर्णाकडे बघत नजरेनेच विचारलंं.
 
अपर्णाला नेहाचा मुद्दा पटला. होकारार्थी मान हलवत
 
अपर्णाने हो म्हटले त्यांचं वेळी मनात म्हणाली
 
“मॅडम तुस्सी ग्रेट हो”
 
आणि अपर्णा हसली.
 
अपर्णा नेहाच्या केबीनमधून बाहेर गेल्यावर नेहा राजेशला इंटरकाॅम वरून फोन करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेते.
 
“ आत येऊ मॅडम.”
 
“ हो. या. बसा.”
 
राजेश समोरच्या खुर्चीवर बसतो.
 
“ राजेश त्या तीन लेखकांना मी परवा आपल्या ऑफिसमध्ये बोलावलंय. “
 
“ कशाला?”
 
राजेशने हा प्रश्न विचारताच नेहा त्याला सगळं सांगते आणि हेही सांगते की ते तिचं आल्यावर तुम्ही आणि अपर्णा मॅडम दोघंही उपस्थित रहा.”
 
“ ठीक आहे मॅडम. निघू मग.”
 
“ हो.”
राजेश निघून गेल्यावर नेहा कामात बुडाली.
 
****
 
त्यादिवशी ठरल्याप्रमाणे ते तिघही लेखक सकाळी बरोबर अकरा वाजता स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये आले. आले ते सरळ नेहाच्या केबीनमध्ये आले.
 
“ मॅडम आत येऊ?”
 
नेहाने काम करताना मान वर करून बघीतलं तर हे तिघही लेखक आले होते. अपर्णा आणि राजेश नेहाच्या केबिनमध्ये आधीच हजर होते.
 
“ या.बसा.”
 
तिघही बसले.
 
“ नमस्कार मी नेहा.
“नमस्कार मॅडम.”
 
तिघांनी नमस्कार केला.
 
“ स्वस्तिक टूर ॲंड ट्रॅव्हल कंपनीत मी टूर आणि ॲडव्हर्टायझिंग विभागाची प्रमुख आहे. या आहेत अपर्णा मॅडम या जाहीरात विभागात आहेत.”
 
तिघांनी अपर्णाला आणि अपर्णाने त्यांना नमस्कार केला.
“ हे राजेश सर टूर विभागात आहेत.’
 
या वेळी सुद्धा त्या तिघांनी आणि राजेशने एकमेकांना नमस्कार केला.
 
त्यानंतर तिघांनी आपली ओळख करून दिली.
 
“मी प्रसाद क्षेमकल्याणी.”
 
“मी दिपक जाधव.”
 
“मी सौ. वनिता पांडे.”
 
 
‘सर्व प्रथम मी तुमच्या तिघांची माफी मागते. माफी यासाठी की एक दिवसाच्या म्हणजे खूप शाॅर्ट नोटीसवर तुम्हाला इथे बोलावलं. तुम्हाला त्यामुळे तुमची कामं ॲडजेस्ट करून यावं लागलं असेल. काही महत्त्वाच्या कामाला बाजूला ठेवून नाही नं यावं लागलं? असेल तर त्याबद्दल साॅरी.”
 
थोडंसं अवघडलेपणाने नेहा म्हणाली.
 
“नाही मॅडम काम तर रोज असतातच. जाहिरातीचं स्क्रिप्ट रायटिंग करणं हे तर आमचं काम आहे.”
 
सौ.वनिता पांडे हसत म्हणाल्या .
 
‘मॅडम जाहिरात लिहिणं हे आमचं पॅशन आहे. त्यासाठी काही करावं लागलं तरी माझी तयारी असते.”
 
प्रसाद क्षेमकल्याणी म्हणाले.
 
‘मॅडम माझ्या भावना या दोघांसारख्याच आहेत. “
 
दीपक जाधव म्हणाले.
 
“ठिक आहे मग आपण काम सुरू करू.अपर्णा तुम्ही यांनी लिहिलेल्या स्क्रीप्ट यांना द्या.’
 
“हो”
 
म्हणत अपर्णाने तिघांनाही त्यांनी लिहिलेल्या स्क्रीप्ट दिल्या.
 
“प्रत्येक जण आपली ओरिजनल स्क्रीप्ट बघा. आमच्या तिघांकडे प्रत्येकाच्या स्क्रीप्टची झेरॉक्स आहे. आता सुरवातीला मी प्रसाद क्षेमकल्याणी यांच्या स्क्रीप्टचं वाचन करते. क्षेमकल्याणी तुम्ही तुमचं स्क्रीप्ट बघा.’
 
“ हो मॅडम”
म्हणत प्रसाद क्षेमकल्याणी यांनी आपलं स्क्रीप्ट उघडलं.
 
नेहाने स्क्रीप्ट वाचायला सुरुवात केलीच होती की तिच्या कानावर आवाज आला
 
“आत येऊ का मॅडम?”
 
नेहाने मान वर करून बघीतलं आणि तिला धक्का बसला.
 
________________________________
नेहा का दचकली? बघू पुढील भागात.