Mala Space havi parv 1 - 39 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३९

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३९

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३९

मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाचं पहिली केमोथेरपी झाली. आता पुढे बघू.

आज प्रियंकाचं समुपदेशनाचं पहिलं सिटींग आहे.
प्रियंका बरोबर निरंजन,सुधीर आणि नेहा हेही विद्ध्वंस मॅडमच्या केबीनमध्ये आलेले आहेत.

"प्रियंका मॅडम तुम्हाला मॅडम ने आत बोलावलं आहे."
दवाखान्यातील रिसेप्शनीस्ट ने सांगितलं.

प्रियंका हळूच ऊठली. एकदा तिने निरंजनकडे बघीतलं. त्याने हातानेच तिला स्पर्श करत ,डोळ्याने धीर देत म्हटलं

"जा. घाबरू नकोस.आम्ही आहोत इथे."

प्रियंकाने केबिनमध्ये शिरताना विचारलंं

"मॅडम मी आत येऊ.?"

"हो.येनं.बस."

प्रियंका हळूच समोरच्या खुर्चीवर बसली.

"मी जया विद्ध्वंस. मी कॅंन्सर पेशंटना समुपदेशन करते."

"मी प्रियंका साठे."

"छान वाटलं तुला भेटून."

"मलापण छान वाटलं."

प्रियंकाला जया मॅडमचं हसणं खूप आवडलं. प्रियंकाच्या हसणं बघून जयाला जाणवलं हिला लवकरच फुलवावं लागेल. हिच्या हसण्यात दु:खाची किनार आहे. कॅंन्सर पेशंटच्या आयुष्यात दुःख असतंच. समुपदेशकाला त्या दुःखाची तीव्रता कमी करायची असते.

"प्रियंका तुमची पहिली केमोथेरपी झाली."

"हो."

"कसं वाटतंय?"

"खूप फरक जाणवला नाही."

"त्रास झाला काही?"

"नाही. पण मन थोडं खिन्न झालं."

"ते सुरवातीला होतं."

"केमोथेरपीचा खूप त्रास होतो असं ऐकलं".

"प्रियंका आता ऐकीव गोष्टींवर तू विश्वास ठेऊ नको. तुला केमोथेरपी ने काय होतं काय नाही हे तुझं तुलाच कळेल. काही जणांना त्रास होतो. तुलासुद्धा होऊ शकतो पण जर तू हिंमत ठेवलीस तर तुला हा त्रास जाणवणार नाही. कळतंय नं?"

"हो. "

"तू काॅलेजमध्ये कोणती फॅकल्टी घेतली होतीस?"

" सायन्स."

"वा! छान. तुला प्रॅक्टीकल चार अनुभव असेल"

"हो आहे नं."

"किती वेळ चालायचं प्रॅक्टीकल?"

"खूप वेळ."

"परीक्षेच्या वेळी काय वाटायचं?"

"बापरे! छातीत धडधड व्हायचं."

"प्रॅक्टीकलच्या दिवशी जेवण नसेल जात . हो नं?"

"नाही नं पोटात भितीची फुलपाखरं ऊडायची"

"अरेवा! प्रियंका तुला कळतंय का तू भीती सारख्या गोष्टीचा चक्क साहित्यिक भाषेत उल्लेख केलास."

त्याक्षणी प्रियंकाला ते लक्षात आलं.

"अय्या हो. मॅडम आत्ता पर्यंत इतक्या वर्षात माझ्या कधीच लक्षात आलं नाही."

प्रियंकाच्या चेहे-यावर आलेलं हसू बघून जयाला कळलं की ती प्रियंकाला खुलवू शकते.

"तुला प्रॅक्टीकलची भीती वाटत असताना तू त्या भीतीचं रूपांतर पुलपाखरामध्ये केल्याने तुझी अर्धी भीती त्रासदायक उरली नाही कारण त्यात पुलपाखराचा कोमलपणा नाजूक पणा आला."

"हो मॅडम खरच."

"आता या कॅंन्सरकडे पण फुलपाखरू म्हणून बघ मग तुला याच्या वेदना जाणवणार नाही."

हे जयाने म्हणताच क्षणी प्रियंकाचा चेहरा पडला.

"मॅडम मी आता क्षणभर माझा आजार विसरले होते. तुम्ही आता म्हणालात त्यामुळे"

"प्रियंका असंच आपण या कॅंन्सर नावाच्या राक्षसाला विसरायचं. खूप वेगवेगळ्या ॲक्टीव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत. ध्यान, व्यायाम करून तुझी आंतरिक आणि शारीरिक शक्ती वाढवायची आहे. याबरोबरीने तुला जे छंद असतील ते जोपासायचे आहेत."

"हो. मॅडम तुम्हाला खरं सांगू "

"अगं सांग नं "
"
तुम्ही हसत हसत खूप छान प्रेमळ स्वरात बोलता. मला तुम्ही खूप आवडल्या."

"मलापण तू आवडलीस प्रियंका. तुझ्या चेहे-यावरून कळतं तू फाईट देणारी मुलगी आहेस रडणारी नाही. खरय नं मी म्हणाले ते?"

"हो."

प्रियंका हळूच लाजत आणि हसत म्हणाली.

"प्रियंका आता तू आपल्या आजूबाजूच्या लोकांना तुझ्या आजाराची आठवण होणार नाही अशी तुझी वागण्याची शैली ठेव."

"म्हणजे कशी?"

सदैव हसत राहण्याचा प्रयत्न कर. आपल्याला वेदना आहे पण ती फार मोठी नाही ही गोष्ट मनात सतत जागृत ठेवायची."

"त्याचा फायदा होतो?"

"होतो. तुझ्या मनाला जेव्हा हे पटेल तेव्हा तुझ्या शरीरालाही ते हळूहळू पटेल. तुला ध्यान कसं करायचं हे शिकवल्यावर तुला हे जमायलाच लागेल."

"मी तसा प्रयत्न करेन."

"ठीक आहे. आज एवढंच. पुन्हा आपण कधी भेटायचं हे तुला सांगेन."

"ठीक आहे येऊ मी?"

"हो."

जयाने हसून प्रियंकाला निरोप दिला.

प्रियंकाही हसली. येताना थकलेल्या पावलांनी आलेली प्रियंका जाताना उत्साहाने केबीनबाहेर पडली.

प्रियंकाच्या चेह-यावरचं हसू आणि आनंद बघून निरंजन, सुधीर आणि नेहा तिघही आश्चर्य चकित झाले पण मनातून तिचा हसरा चेहरा बघून सुखावले.

"निरंजन खूप छान आहेत या मॅडम."

"होनं. तुला आवडल्या नं?"

"हो खूप. नेहा त्या इतक्या छान बोलतात ग."

"दिसतय तुझ्या चेहऱ्यावरून. तुला मॅडम आवडल्या नं मग छान झालं."

"चला निघूया."
निरंजन म्हणाला.

सुधीरने प्रियंकाला जवळ घेऊन तिच्या पाठीवर थोपटत,

"चला. निरंजन चालता का घरी
सुधीरने निरंजन कडे बघून म्हटलं विचारलंं.

"आज नको.प्रियंकाला खूप दगदग होईल."

"सुधीर आम्ही ऊद्या येऊ.आईला सांग आजचं सेशन खूप छान झालं."
प्रियंका हस-या चेहे-ज्ञाने म्हणाली.जयाने सांगीतलेली गोष्ट तिने आत्ता पासूनच अंमलात आणायला सुरुवात केली.

"हो नक्की सांगतो."

"चल प्रियंका ये ऊद्या.आम्ही निघतो."
नेहा प्रियंकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली.

एकमेकांचा निरोप घेऊन चौघेही आपापल्या वाटेने घरी गेले.

******

गाडीवर जाता जाता सुधीर नेहाला म्हणाला,

"नेहा या मॅडमच्या समुपदेनाने प्रियंकामध्ये खूप फरक पडेल असं वाटतं."

"हो मला पण असंच वाटतंय."

"आज बघ मॅडमच्या केबीनमधून बाहेर आल्यावर प्रियंका किती आनंदात दिसली."

"तेच नं. जर अशीच आनंदी राहिली त्याच्या तर लवकर बरी होईल. हो नं सुधीर?"

बराच वेळ सुधीर काहीच बोलला नाही. तो बोलत का नाही हे बघून नेहाने विचारलंं,

"सुधीर काय झालं? बोलत का नाही?"

"नेहा प्रियंकाची कॅंन्सरची लास्ट स्टेज आहे.आपण सगळे उपचार करणार आहे. पण लास्ट स्टेजला असलेला कॅन्सर बरा होईल की नाही याची खात्री आपण कशी देणार?"

"अरे पण म्हणून आपण निगेटीव्ह का बोलायचं?"

"नेहा आपण निगेटीव्ह बोलायचं नाहीच पण वास्तवाचं भान पण ठेवायचं. प्रियंकासमोर मात्र ती लवकर बरी होणार हाच ऊत्साह तिला द्यायचा."

नेहा विचारात पडली.

"सुधीर हे असं वागणं किती कठीण आहे. तिच्या समोर ऊत्साह आणि खरं कारण उडवायचा प्रयत्न करणं कठीण आहे रे.!"

" कठीण आहे पण करावं लागेल. ती लास्ट स्टेजला असून तिच्यात जगण्याची इच्छा खूप प्रबळ आहे. म्हणून ती अजून ऊभी आहे. आपण तिचा उत्साह आणि तिच्यात सकारात्मक ऊर्जा वाढवली आणि चमत्कार होऊन ती जगली खूप वर्ष तर किती छान होईल?"

"खरच रे.निरंजन खूप खचला आहे."

"त्याला माहिती आहे. जितके दिवस प्रियंका आहे तेवढे दिवस आहे हे त्याने मान्य केलंय"

"खूप कठीण असतं रे इतक्या कमी वयात आपला जोडीदार आता फार दिवसांचा सोबती नाही हे कळणं."

"आपण निरंजन आणि प्रियंका यांचं मनोबल जितकं जास्त ऊंचावता येईल तेवढं ऊंचावता प्रयत्न करायचा."
सुधीर म्हणाला.

"खरय. आपल्या आई बाबांना पण आपल्याला सांभाळायला हवं."

"हं. नेहा या सगळ्या धावपळीत ऋषीकडे दुर्लक्ष नको व्हायला."

"नाही होणार.मी सगळं मॅनेज करीन. वाटलं तर ऋषीला आईकडे सोडून ऑफिसला जात जाईन."

"तसं केलं तर दिवसभर आईबाबा करतील काय? त्या ऋषीकडे बघून निदान ते आपलं दुःख काही प्रमाणात विसरतात. रिकामे राहिले तर त्यांच्या तब्येतीच्या नसलेल्या तक्रारी सुरू होतील."

"आईबाबांना ऋषीला सांभाळणं खूपच त्रासाचं जायला लागलं तर मी ठेवीन आईकडे."

"हं. तसं करू शकते. आईबाबांना आता रिकामं ठेवणं योग्य नाही. ते जितके बिझी राहतील तेवढीच त्यांची तब्येत ठीक राहील."

" हो. बरोबर बोललास."

घरापाशी येताच वाॅचमनने दार उघडलं. सुधीर आणि नेहा सोसायटीत शिरले.

****

"कसं झालं आजचं समुपदेशन?"

निरंजनच्या बाबांनी खुणेनेच निरंजनला विचारलंं. त्यानेही हसून होकारार्थी मान डोलावली.

निरंजनच्या आईबाबांना प्रियंकाचा हसरा चेहरा बघून बरं वाटलं.

'आई त्या विद्ध्वंस मॅडम खूप छान आहेत."

"होका?"

" हो. इतक्या सहजपणे त्यांनी माझ्याशी संवाद साधला की मलाही आश्चर्य वाटलं."

"तुला आवडलं का?"

"हो. त्यांनी पहिल्याच भेटीत माझी कॅंन्सर बद्दलची भीती घालवली. आई मला माहिती आहे मी शेवटच्या स्टेजला आहे पण मला जगायचंय आहे. तुमच्यासाठी, निरंजनसाठी मी अजून काहीच केलं नाही."

"अगं तू आमच्या घरात आणि आमच्या ओंजळीत किती आनंदाचे क्षण घातलेलं हे आम्हाला माहीत आहे .आता तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची."
आई म्हणाली.

"बाबा मी गुगल वर बघीतलं लास्ट स्टेजला कॅंन्सर पेशंटची अवस्था कशी असते. त्यामानाने मी खूप चांगल्या अवस्थेत आहे हा चमत्कार आहे. मला अजून चांगलं आणि खूप दिवस जगायचं आहे. मला मॅडम ध्यान आणि व्यायाम शिकवणार आहे. त्याने मी आणखीन छान होईन."
प्रियंकाच्या या बोलण्यावर फार काही सुचलं नाही निरंजनच्या बाबांना पण ते एवढं म्हणाले,

" प्रियंका तू धीट आहेस. पण सारखंं गुगलवर नको ते सर्च करत जाऊ नकोस."

" बाबा मॅडम अगदी हेच म्हणाल्या खूप ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही."

निरंजनच्या आईबाबांना प्रियंकाच्या डोळ्यातील चमक बघून, चेहे-यावरचा आनंद बघून छान वाटलं तसंच आश्चर्यही वाटलं.

"देवा माझी प्रियंकाला लवकर बरी कर. आणि खूप वर्ष ठणठणीत जगव."

अशी मनातच प्रार्थना निरंजनच्या आईने केली.

आईने हसत प्रियंकाचा गालगुच्चा घेतला. प्रियंका लाजून आपल्या खोलीत गेली. निरंजनच्या आईबाबांनी एकमेकांकडे बघून हळूच आपल्या डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसल्या. खोलीतून हे निरंजनने बघीतलं. त्याचं मन भरून आलं. प्रियंका स्वतःशीच हसत आपल्या कपड्यांच्या घड्या करत होती.
निरंजनने मनातला दु:खाचा आवंढा गिळत खुर्चीवर मागे डोकं टेकवून डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून मात्र पाणी वाहू लागले.

_________________________________
हळुहळू पुढे काय घडेल बघू.