Mala Space havi parv 1 - 37 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३७

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३७

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३७

मागील भागात आपण बघीतलं की निरंजन आणि सुधीरला डाॅक्टर केमोथेरपी बद्दल सांगतात.

"परवा प्रियंकाची केमोथेरपी आहे. "

"हो. खूप त्रास होतो असं ऐकलं आहे."
आई म्हणाली.

"आई सगळ्यांनाच खूप त्रास होतो असं नाही असं डाॅक्टर म्हणाले. पण थोडाफार होत असेलच"

"मला वाटतं ते पेशंटच्या प्रकृतीवर सुद्धा अवलंबून असेल."
नेहा म्हणाली.

"हो तसं असेलच."
आई म्हणाली.

"सुधीर त्या समुपदेशन करणा-या मॅडमची कधी वेळ घेतोय?"

सुधीरच्या बाबांनी विचारलं.

"आज फोन यायला हवा निरंजनचा."

'त्याचा फोन नाही आला तर तू कर."
बाबा म्हणाले.

"हो मी करीन. नेहा तू त्या मॅडमचा नंबर घेतलास का?"

"निरंजनचा फोन येऊ दे मग मी रंजनाला सांगते. ती आपल्याला जी वेळ हवी आहे ती रंजनाला सांगू मग ती मॅडमची वेळ घेईल."

"ठीक आहे. आई तू टेन्शन घेतलंय का?"

सुधीरने विचारलं.

आईचा तणावग्रस्त चेहरा बघून सुधीरने विचारलं.

"अरे केमोथेरपी,औषधं हे सगळे उपचार आपण करू पण कॅंन्सरच्या आजारामुळे तिला जो त्रास होतो तो आपण कसा वाटून घेता येईल?"

नेहाने हळूच आईंना जवळ घेतलं.नेहाच्या स्पर्शाचे आईंच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.

"हे बघ. इथे तू रडतेस ठीक आहे पण प्रियंका समोर कधीच असे डोळे वाहू द्यायचे नाही कळलं?"
बाबा म्हणाले.

"कळतं हो मला. नऊ महिने प्रियंकाला वाढवलंय. ती नाळ प्रियंका जन्माला आली म्हणून कापली पण मनाशी जोडलेली नाळ कशी कापता येईल? मन सारखं सैरभैर होतं. कसं समजाऊन त्याला कळत नाही?"

"आई मी समजू शकते तुमच्या भावना. पण सध्या प्रियंकाचं मनोबल वाढवण्यासाठी आपण खूप काळजी पूर्वक वागायला हवं."

नेहा म्हणाली.

"आई प्रियंकाचा कॅंन्सर लास्ट स्टेजला आहे. तरी ती आत्ता पर्यंत बरीच चांगली आहे. तिच्या तब्येतीत आणखी सुधारणा व्हावी म्हणून आपण तिचं समुपदेशन करणार आहोत ना. मग आपणच जर खचलो तर तिला धीर कसा देणार ?"

"कळतंय मला.मी आता नाही रडणार."

"हे बघ प्रियंका समोर नसताना आपण आपल्या भावना व्यक्त करू शकू.पण ती समोर असताना किंवा तिच्याशी फोनवर बोलताना आपण सावधपणे बोलायला हवं. तू मला सांग निरंजन आणि त्याचे आईबाबा कुठे आपल्या भावना मोकळ्या करतील? ते तर सतत प्रियंकाच्या आजूबाजूला असतात. त्यांना किती जड जात असेल स्वतःला सावरणं?"

"हं"

एक दीर्घ उसासा आईने सोडला आणि थरथरत्या हाताने आपले डोळे पुसले. त्यांच्या सारखीच नेहा, सुधीर आणि त्याच्या बाबांची अवस्था होती पण तिघांचं मन जरा मजबूत असल्याने ते शांत होते.

हे तिघं बोलत असतानाच सुधीरचा फोन वाजला. फोनवर निरंजनचं नाव आलं.सुधीरने फोन घेतला.

"हॅलो"

"सुधीर निरंजन बोलतोय."

"बोल."

"त्या मॅडमची कधी वेळ घेता येईल?"

"तू सांग तुला कधी जमेल?"

"ऊद्या संध्याकाळी जमेल का?"

"मी नेहाला सांगतो त्यांना विचारायला."

"ठीक आहे."

"संध्याकाळी तुला कोणतीही वेळ चालेल नं?"

"हो."

"निरंजन टेन्शन घेऊ नकोस."

"टेन्शन घ्यायचं नाही हटलं तरी येतच. संध्याकाळी मॅडमना भेटल्यावर जरा माझ्या बरोबर थांबशील? तुझ्याशी बोललं की जरा मन मोकळं होईल."

"अरे विचारतोस काय. मी थांबेन नेहा येईल घरी."

"ती थांबली तरी हरकत नाही."

"ठीक आहे ते वेळेवर बघू."

"ठीक आहे ठेवतो."

"हो."

सुधीर फोन ठेवतो.

"काय म्हणाला निरंजन?"

'मॅडमचीऊद्या वेळ घे. नंतर म्हणाला माझ्या बरोबर थांबाल का? तुमच्याशी बोललं तर मन मोकळं होईल."

"अरे थांबा तुम्ही दोघं.या कठीण प्रसंगी तो कोणाशी बोलणार? मन मोकळं केलं तर त्याचंही स्वास्थ्य ठीक राहील. आम्ही ऋषीकडे बघू."
आई म्हणाली.

"हो आई. तू म्हणतेस ते बरोबर आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलं की सगळंच बिघडतं."

"नेहा तुझ्या मैत्रिणीला सांग ऊद्याची वेळ मिळत असेल तर घे. त्या जी वेळ सांगतील ती घे कारण ऊद्या संध्याकाळी पुर्ण वेळ निरंजनने यासाठीच ठेवला आहे."

"ठीक आहे आत्ताच तिला फोन करून सांगते."

"नेहा रात्रीचे नऊ वाजले आहेत तिला विचार बोलू का नाही तर तिला मेसेज कर."

"नको बाबा. फोनच करते एरवी मेसेज केला असता पण आपल्याला ऊद्याचीच वेळ हवी आहे आणि रंजनाला माहिती आहे मी तिला कधीही फोन करेन. तुम्ही नका काळजी करू."

"ठीक आहे.कर फोन. तुझी मैत्रीण असल्यामुळे तुला जास्त माहिती."

"नेहा रंजनाला फोन करून तिच्याशी बोलते. बोलणं झाल्यावर फोन ठेवून नेहा म्हणाली,

"बाबा ती आत्ताच मॅडमशी बोलून आपल्याला वेळ कळवते आहे. मॅडमच्या कानावर रंजनाने आधीच प्रियंकाची केस सांगीतली आहे."

"होका! चला बरं झालं म्हणजे ऊद्या त्यांना भेटलात की पुढचं सगळं नियमीत होईल."

****

संध्याकाळी आठ वाजता निरंजन, सुधीर आणि नेहा समुपदेशक विद्ध्वंस मॅडमच्या केबीनमध्ये बसलेले असतात.

"नमस्कार मॅडम मी निरंजन साठे.माझी बायको कॅंन्सर पिडीत आहे. हे प्रियंकाचे भाऊ आणि वहिनी."
सुधीर आणि नेहा मॅडमना नमस्कार करतात.

"नमस्कार.मला रंजनाने सांगीतलं आहे. निरंजन तुमची मिसेस वयाने खूपच लहान आहे. मी तिचं समुपदेशन करीनच पण तिच्या आजूबाजूला जे आहेत किंवा सतत राहणार आहेत त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एकदा केमोथेरपी सुरू झाली की पेशंटची मानसिक स्थिती खूप नाजूक होते. त्यांचे मूड सतत बदलत असतात. त्यांची भावनिक आंदोलनं कधी कधी आपल्याला कळत नाही. तेव्हा आपल्या हातून काही तरी वेगळी कृती किंवा तोंडून वाक्य निघू शकतं त्यावेळी ते कसे वागतील हे सांगता येणार नाही. म्हणून आपण सतत त्यांच्या भवती सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर हे पेशंट व्यवस्थित असतात.त्यांना आनंदी बघून आपल्यालाही आनंद होतो."

"हो मॅडम लक्षात आलं तुम्ही काय म्हणता ते."

'मी त्यांचे काही छंद जोपासायला सांगीन. आवडत्या गोष्टीत माणूस खूप रमतो. त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्या करायला लागल्या की कॅंन्सरची वेदना, आपल्या जवळ असलेल्या मर्यादित वेळेचं दु:ख त्या विसरतील. असं झालं तर त्या लवकर या स्टेजमधून बाहेर येतील.

कॅंन्सर असल्याने त्यांना काय पथ्य पाळायचे हे तर डाॅक्टर सांगतीलच. आपण ती पथ्य पाळायला हवी. जसं त्यांचा आहार त्यांचा व्यायाम हे सगळं व्यवस्थित सांभाळलं की त्यांच्या छंदाच्या जोपासनेतून त्यांचा वेळ छान आनंदाने व्यतीत होईल . यामुळे त्यांची जगण्याची वर्षे वाढतील.

ध्यानामुळे आणि पेशंटला हवी तेवढी आवश्यक विश्रांती मिळाली तर पेशंटचं मन शांत होण्यात मदत होते.



कला, नृत्य, संगीत, लेखन किंवा हस्तकला यासारख्या सर्जनशील क्रिया पेशंटला त्याच्या भावनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत करतात तसंच हातात घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात. ही कार्य केल्याने पेशंटच्या मनाला आनंदही मिळतो.

या सगळ्यामुळे त्यांचा प्रत्येक दिवस जो वेदना मय व्हायचा तो आनंदात जातो. त्यांना वेदना होतातच पण मिळणाऱ्या या आनंदामुळे त्यांना वेदना जाणवत नाहीत. त्यांंची सहनशक्ती पण वाढते.

मिस्टर निरंजन तुम्ही काळजी करू नका. समुपदेशनामुळे त्यांच्या वागण्यात बदल होईल. आवडत्या गोष्टींमध्ये रमल्याने त्यांची चीडचीड कमी होईल. फक्त त्यांच्या भवती नकारात्मक वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या."

"हो मॅडम आम्ही सगळेच ती काळजी घेऊ. "
निरंजनने आश्वासन दिलं.

"तुमच्या घरी कोणीही आलं तरी यांना बाहेर बोलवायची गरज नाही. समजा यांना बाहेर यावसं वाटलं तर तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर येऊ देऊ नका. कारण कॅंन्सर पेशंटना पटकन संसर्ग होतो."

"हो मॅडम. हीपण काळजी घेऊ."
निरंजन म्हणाला.

"ठीक आहे. ऊद्या केमोथेरपी चालू होणार. केमोथेरपी ने त्यांना थोडा थकवा आल्यासारखं होईल तर आपण चार दिवसांनी त्यांचं पहिलं सेशन घेऊ. नंतर चार दिवसांनंतर पुन्हा त्यांची केमोथेरपी होईल. मग नंतर पुन्हा चार दिवसांनंतर सेशन घेऊ.असं करू."

"ठीक आहे."

"पाच दिवसांनी वेळ कोणती ते तुम्हाला कळवते."

"चालेल.येतो आम्ही."
"या "
विद्ध्वंस मॅडम म्हणाल्या.

सुधीर,नेहा, निरंजन तिघही केबीनमधून बाहेर आले.

निरंजन खूप टेन्शन मध्ये होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवत सुधीर म्हणाला,

"निरंजन सगळं होईल व्यवस्थित. आपण सगळेच आहोत प्रियंका बरोबर. "

"सुधीर खूप हमसून हमसून रडावसं वाटतं. प्रियंकाची सोबत काही दिवसांचीच आहे ही जाणीवच खूप अस्वस्थ करून जाते. आत्ता तर आमचे सूर छान जुळायला लागले होते. न सांगता एकमेकांच्या मनातलं आम्ही ओळखायला लागलो होतो. तेवढ्यात हिची जाण्याची वेळ आली. देव एवढा कृर कसा होऊ शकतो? घरी आम्ही तिघही ऊसनं अवसान आणून वावरतो. ऊगीचच काही तरी विनोद करत असतो.

मीच नाही आईबाबांचीपण अवस्था विचित्र झाली आहे. मी घरी असलो की ते दोघं फिरायला जातात आणि आमच्या घराजवळच्या देवळात शांत बसून राहतात. जितकं पाणी डोळ्यावाटे वाहून जाईल तेवढं वाहू देतात. मन रितं झालं की हळूहळू थकलेल्या चालीने घरी येतात. मीही कुठल्यातरी बगीच्यात जाऊन बसतो. आईबाबांना माहिती आहे.की ऑफिस संपलं की मी अर्धा तास तरी बागेत जातो. पण रोज जमत नाही.

प्रियंकालाही कळलय आपण फार दिवसांचे सोबती नाही त्यामुळे जितका जास्त वेळ माझ्या बरोबर घालवता येईल तेवढं ती बघते. खूप कठीण झालं आहे सगळं"

निरंजन रडायला लागतो. सुधीर त्याला सावरतो. कारण ते तिघही त्या क्लिनिक जवळ उभे असतात. जाणारे येणारे चमत्कारिक नजरेने निरंजनकडे बघत असतात. निरंजन एवढा दु: खाच्या तळ्यात बुडालेला असतो की तो कसलीच फिकीर करत नाही. स्वत:च्या मनावरचा ताण कमी करण्याच्या प्रयत्नात असतो.

निरंजनची अवस्था बघून सुधीर आणि नेहापण त्याला रडू देतात. सुधीर निरंजनला जवळ घेतो. सुधीर आणि नेहाचे डोळेपण ओलावतात.

__________________________________

पहिल्या केमोथेरपी नंतर प्रियंका मध्ये काही बदल होईल का बघू पुढील भागात.