Mala Space havi parv 1 - 32 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३२

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३२

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३२

मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाला कॅंन्सर झालाय आणि तो शेवटच्या स्टेजला आहे.

सकाळ होताच सगळे उठले. खरंतर उठले म्हणणं योग्य नाही. उठण्यासाठी आधी झोपावे लागते. प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे कळल्यावर रात्रभर सगळेच खूप ताणात होते. त्यामुळे झोपेचं गलबत त्यांच्या डोळ्याच्या किना-यापर्यंत पोहचलच नाही. सगळे टक्के जागे होते.

सकाळी सुधीरच्या आईने बाबांना विचारलंं,

" कधी जाऊया प्रियंका कडे.?"

"थोड्यावेळाने."

"आज अंगातलं त्राण गेलय. अंगातली सगळी शक्ती कोणीतरी ओढून नेली आहे असं वाटतं आहे."

"खरय तुझं. बोलायची सुद्धा इच्छा नाही ग."

सुधीरचे बाबां म्हणले.

"हं. प्रियंका तर कोलमडली असेलच. निरंजनचीपण काय अवस्था झाली असेल?

'काहीच कळत नाही. सुधीरला हाक मार."

"हो."

म्हणत सुधीरची आई उठली. ऊठण्यासाठी खूप कष्ट पडले त्यांना. हळूहळू चालत त्या सुधीरच्या खोलीपाशी गेल्या. हळूच दारावर टकटक करत त्यांनी हाक मारली.

"सुधीर ऐ सुधीर ऊठतोस का? "

थोड्यावेळाने नेहा दार उघडून बाहेर आली.

"ऊठला का सुधीर"

"नाही ऊठवते . मी आधी चहा करते. रात्रभर अस्वस्थ होता."

"होग आमचं पण मन था-यावर नव्हतं. प्रियंका कडे जायला हवं."

"हो. मी चहा करते नंतर सुधीरला ऊठवते मग केव्हा जायचं ते ठरवू."

"जाऊया लगेच"

"आई एवढ्या सकाळी ? त्या सगळ्यांना पण रात्री नीट झोप लागली नसेल. आपण एवढ्या सकाळी गेलो आणि ते झोपले असतील तर? "

"ठीक आहे. तू चहा कर मग सुधीर आणि त्याचे बाबा काय म्हणतात तसं करू."

"हो."

नेहा चहा करायला स्वयंपाकघरात गेली.

एखाद तासानंतर सुधीरचे सगळे प्रियंकाच्या सासरी गेले.

फ्लॅटचं दार उघडलं प्रियंकाच्या सास-यांनी . त्यांनी या सगळ्यांना कसंबसं या म्हटलं आणि आत गेले. सुधीरचे बाबा त्यांच्या जवळ बसले. त्यांच्या खांद्यावर जसा त्यांनी हात ठेवला ते रडायला लागले. त्यांना रडताना बघून सुधीरच्या बाबांच्या डोळ्याला पण पाण्याच्या धारा लागल्या. सुधीरची आई,नेहा सुधीर सगळे स्तब्ध उभे होते.कोणालाच काय करावं सुचत नव्हतं.इतक्यात प्रियंका आतल्या खोलीतून बाहेर आली.

प्रियंकाने आईकडे बघीतलं आणि धावत येऊन त्यांना मिठी मारली. दोघी रडू लागल्या. नेहा प्रियंकाच्या पाठीवर थोपटू लागली.

"आई लग्नाला वर्षच झालंय तोच काग हे माझ्या नशिबी आलं?"

आई काहीही ऊत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या.काय ऊत्तर देणार होत्या तिला. त्यांच्या तोंडून फक्त एक हुंदका बाहेर पडला. खूप वेळाने प्रियंकाच्या रडण्याचा आवेग कमी झाला पण हुंदके येत होते.

निरंजन आणि त्याची काही न बोलता फक्त ऊभे होते.काल जेव्हा रिपोर्ट मिळाला त्यांचं वेळी निरंजन आणि त्याचे आईबाबा हतबल झाले. प्रियंकाला तर काहीच कळत नव्हतं ती निरंजनला म्हणाली

"निरंजन आत्ता कुठे आपल्याला एकमेकांच्या मनाचा सूर सापडायला लागला होता आणि एवढ्यात मला बोलावलं देवाने.का एवढी कृर खेळी खेळला ?"

धाय मोकलून प्रियंका रडायला लागली. निरंजनने तिला जवळ घेऊन थोपटलं. निरंजन काहीच बोलू शकला नाही. प्रियंकाचं सांत्वन करायला त्याच्या जवळचे शब्द मुके झाले होते.त्यांच्यात काही सामर्थ्यच उरलं नव्हतो.


खूप वेळाने तिचा धपापलेला ऊर आणि रडून थकलेला श्वास संथ होत गेला.

"निरंजन मला तुझ्या मांडीवर झोपू दे नंतर वेळ नाही मिळाला तर?"

निरंजनला हे शब्द ऐकल्यावर आपल्या काळजावर कुणीतरी धारदार सुरीनेवार केला आहे असं वाटलं.

"नको ग असं बोलू प्रियू."

निरंजन फक्त एवढंच बोलू शकला.रडतच त्याने प्रियंका चं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. हळुवारपणे तिच्या केसातून हात फिरवू लागला.

खूप वेळानंतर प्रियंका शांत झाली.

"निरंजन माझ्या जाण्यानंतर तू पुन्हा लग्न कर . माझ्या आठवणीत आयुष्य घालवू नकोस."

"प्रियू आत्ता असं काही बोलायचं नाही. तू बरी होणार आहेस."

"नाही निरंजन. हा रोग असा बरा होणारा नाही. ते शाब्दिक बुडबुडे नको आहेत मला."

यावर निरंजन काहीच बोलू शकला नाही.

निरंजनचे आईबाबा आपल्या खोलीत जात असताना त्यांची पावले निरंजनचे खोलीपाशी थबकली कारण वरील संभाषण त्यांच्या कानी पडलं. तेही त्यांचं बोलणं ऐकून हतबल झाले. अत्यंत अगतिक होऊन ते आपल्या खोलीत गेले

"काय ग तू एवढं देवाचं करतेस तरी देवाला आपलीच सून सापडली.?"

*"मी काय सांगू.?आपले कर्म असतात मागच्या जन्मीचे"

"मागचा जन्म कोणी बघीतला?"


"एवढी गुणी मुलगी आपल्या निरंजनच्या आयुष्यात आली म्हणून आपण किती आनंदात होतो. आपला आनंद इतका क्षणिक ठरेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं."

"हं."

या हुंकाराने निरंजनचे बाबां काही बोलू शकले नाही.

"मला नं मा़झ्यापेक्षा प्रियंकाच्या आईची काळजी वाटते आहे. नऊ महिने आपल्या पोटात त्यांनी प्रियंकाला वाढवलं, तिला जन्म दिला, तिच्यावर संस्कार केले एवढं मोठं होईपर्यंत वाढवलं. आता तिचं लग्न करून दिल्यावर किती आनंदात असतील. आजी होण्याचं स्वप्न बघत असतील आणि किती घोर निराशा त्यांच्या पदरी पडली असेल. माझ्या डोळ्यासमोर राहून राहून त्यांचा अगतिक झालेला चेहरा येतो आणि माझं मन कळवळलं."

"आता आपण निरंजन आणि प्रियंका दोघांनाही खूप सांभाळून घ्यायला हवं."
निरंजनचे बाबा म्हणाले.

आत्ता प्रियंकाच्या आईला बघून कालचा हा प्रसंग निरंजनच्या आईला आठवला. त्या मूकपणे प्रियंकाच्या आईकडे बघत होत्या. त्याही नि:शब्दपणे निरंजनच्या आईकडे बघत होत्या. दोघी माऊली फक्त डोळ्यातून एकमेकींशी बोलत होत्या. शब्देविणू त्या दोघी एकमेकींशी संवाद साधत होत्या, आपल्या मनातील दु:खाचा कढ मोकळा करत होत्या. दोन माऊली आपल्या मुलांच्या आयुष्यात आलेल्या या भयंकर प्रसंगाने हतबल झाल्या होत्या.

निरंजनची आई हळूहळू सुधीरच्या आई जवळ येऊन बसली. प्रियंका आईला घट्ट मिठी मारून बसली होती. निरंजनच्या आईने सुधीरच्या आईचा हात हातात घेऊन थोपटला. सुधीरच्या आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्या पाण्याबरोबर त्यांचा दु:खाने विदिर्ण झालेला चेहरा निरंजनच्या आईला बघवला नाही. त्यांनी हळूवारपणे त्यांच्या डोळ्यातील वाहणारं पाणी अलगद पुसलं आणि न बोलता आपले धीराचे शब्द डोळ्यातूनच व्यक्त केले.

निरंजनजवळ सुधीर बसला होता. सगळे एकमेकांना धीर देत होते पण सगळेच मुळापासून उध्वस्त झाल्यासारखे झाले होते. त्या सगळ्यांना दु:खाच्या वादळाला झेलताना बघणं नेहाला सहन होत नव्हतं. तिला या सगळ्यांना कसं सावरावं कळत नव्हतं कारण आलेलं संकट लहान सहान नव्हतं.

ज्या रोगाचं नाव उच्चारताच कोणीही घाबरेल,आपली विचारशक्ती गमावेल असा या कॅंन्सर नावाच्या रोगाने प्रियंकाच्या आयुष्यात शिरकाव केला होता. निरंजन आणि प्रियंकाने नुकतीच संसाराची रांगोळी रेखाटला सुरुवात केली होती.

अजून कितीतरी रंग त्या रांगोळीत भरायचे होते. अन् हा खूप मोठा घाव परमेश्वराने त्यां दोघांवर घातला होता. या क्षणी परमेश्वर नेहाला खूप कृर भासला. इतक्या अवेळी कोणाचं आयुष्य संपवायचं असतं का? परमेश्वराला जराही कणव आली नाही का? मी या सगळ्यांना कसं सावरू? माझ्यात एवढी ताकद कुठे आहे? माझ्या जवळ सांत्वनासाठीसुद्धा शब्द नाहीत. कसं यांना सावरणार?

हे एवढं मोठं दु:ख कसं पेलवेल निरंजनला आणि प्रियंकाला?

नेहाच्या मनात आलं आपण लग्न होऊन आलो आणि किती कमी वेळात प्रियंका आपली जिवलग मैत्रीण झाली. हे इतकं सुंदर नातं माझ्या आयुष्यात परमेश्वरा तू आणलस आणि इतक्या झटकन तू माझ्या आयुष्यातून ते नातं वजा करतोय? का असं करतोय. आमच्या दोघींपैकी कोणाला शिक्षा देतोय. प्रियंका या आजाराच्या सगळ्या वेदना सहन करेल पण त्याच बरोबर मलाही या वेदना होतात आहे. त्या वेदनेची दाहकता मी कशी सहन करू तूच सांग?.

नेहाच्या मनात विचारांचं तांडव सुरू होतं. ती नुसतीच उभी होती.

"आई हा असा घाव देव माझ्यावर करेल असं स्वप्नात वाटलं नव्हतं."

प्रियंका शांत झाली होती पण बोलताना तिचा आवाज रडवेला होता. तिची आई तिला यावर काय ऊत्तर देणार? त्या मूकपणे तिच्या कडे नुसत्या बघत होत्या.

आईच्या हातावर थोपटत प्रियंका म्हणाली,

"आई लग्नाला एक वर्ष झालं आता बाळाचा विचार करू असं त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं पण देवाने आम्हाला ती संधीच दिली नाही. असं का केलं असेल ग त्याने?"

खरंतर या प्रश्नाला काही उत्तरच देता येणार नाही. ऊत्तर दिलं तर ती फुकटची शाब्दिक बुडबुड्यामधील सांत्वना ठरली असती म्हणून त्या काहीच बोलल्या नाही.

प्रियंकाच्या या प्रश्नावर निरंजनच्या आईला त्या दिवशीचा प्रसंग आठवला. निरंजन आणि नेहा खूप खूश होते. त्यांच्या आनंदाचं कारण कळल्यावर त्या येणा-या नातवंडाच्या कल्पनेत रमल्या.

निरंजनचे बाबां आता सावरलं होते. निरंजनही सावरला होता. सगळे थोडे सावरले होते पण दु:खाचा झंझावात त्यांना सावरू देत नव्हता. सगळेजण प्रियंका अजून कोसळू नये म्हणून ते सगळे आपण सावरलो आहोत असं तिला दाखवत होते आणि स्वतःची दु:ख झेलण्याची क्षमता वाढवत होते.

खरच या दोन्ही कुटुंबावर न टळणारी आपत्ती आली होती. तिचा झंझावात सहन करत प्रियंकाला सावरायचं खूप अवघड काम दोन्ही कुटूंबावर आलं होतं.
_______________________________
बघू आता पुढे कशी ही दोन्ही कुटुंबे प्रियंकाला सावरतात.