Mala Space havi parv 1 - 11 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ११

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ११

मला स्पेस हवी भाग ११

मागील भागात आपण बघीतलं की नेहा कॅबमध्ये बसून बस स्टॅण्ड वर गेली. आता पुढे काय होईल बघू

कॅबमध्ये बसल्यावर नेहाने एक सुस्कारा सोडला. तिला भीती वाटत होती की निघताना सुधीर किंवा ऋषी मुळे तिच्या जाण्यात काही अडचणी येतील का? सहजपणे ऋषीने आपलं बंगलोरला जाणं स्वीकारल्यामुळे तिला बरं वाटलं.

ती सीटवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसली. नेहा आपल्या विचारात हरवली. तिला स्वतःला जेव्हा प्रथम जाणवलं की आपल्याला हवी तेवढी स्पेस मिळत नाही आहे तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती आणि यामुळेच हळूहळू तिला घर,नवरा मुलगा यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली.

सासरच नाही तर माहेरची नाती पण नकोशी झाली. कुठल्याच नात्यात तिला अडकून नये अशी इच्छा तिच्या मनात दिवसेंदिवस तीव्र होऊ लागली. तशी तिची अस्वस्थता वाढली. तिला आठवलं एक दिवस सुधीरच्या लक्षात आलं. त्याने विचारलं,

" नेहा आजकाल तुला काय झालंय? मी जवळ आलो की पूर्वीसारखे तुझ्या चेहऱ्यावर रोमांच उठत नाही. मी तुला हात लावला तर तुझ्याकडून थंड प्रतिसाद मिळतो. तुला माझा सहवास नकोसा झालाय का? की तुझी प्रणयराधनेतील इच्छा संपत आली आहे? काय होतंय सांग?"

" मला काही होत नाही."
नेहा थंड स्वरात म्हणाली.

" मग तू अशी थंड का असते? पूर्वीचा आवेग तुझ्यात दिसत नाही."

" नेहमी सगळं एकसारखच असणार आहे का?"
नेहाने वैतागून विचारलं.

" तुला बरं वाटतं नाही का?"

सुधीरने काळजीने विचारलं.

" मला बरं आहे."

" नेहा काही दिवसांपासून मी बघतोय तू खूप तुटक वागतेय . काग? असं काय होतंय तुला? मला तू सांगीतलं नाही तर कसं कळेल? ऑफीसमध्ये काही ताण आहे का?"


" काही ताण नाही.प्लीज मला एकटीला शांत झोपू दे. हात बाजूला कर."

नेहा सुधीरचा हात बाजूला करून सुधीरकडे पाठ करून झोपली. सुधीर कितीतरी वेळ नेहाकडे बघत तिच्या अस्वस्थतेचं कारण शोधत बसला.

आत्ता नेहाला हे आठवलं क्षणभर सुधीरचा कोमेजलेला चेहरा आठवला आणि तिला वाईट वाटलं. सुधीरची चूक नव्हती. आपल्यालाच त्याचा स्पर्श, त्याचं जवळ असणं नकोसं झालं होतं. पूर्वी सुधीरचा ओझरता स्पर्शही आपल्याला ऊद्दीपीत करून जायचा. कधी कधी तर रात्र कधी होते आणि आपण सुधीरच्या मिठीत शिरतो असं व्हायचं. त्यांचा गरम श्वास आपल्या अंगावर गोड शिरशिरी उमटवायचा. त्या क्षणाला सगळे चंद्र तारे आपल्या मुठीत असल्याचा भास व्हायचा.

स्वर्ग स्वर्ग जो म्हणतात तो आपल्याला सुधीरच्या सहवासात आणि त्याच्या मिठीत सापडायचा. पण अचानक आपल्याला हे सगळं नकोस व्हायला लागलं. या मागचं कारण आपल्याला सापडत नव्हतं म्हणून आपणं अस्वस्थ होतो. ते कारण शोधताना हळूहळू सगळ्यांचा सहवास नकोसा व्हायला लागला.

आपल्या पोटच्या मुलांचा स्पर्श सुद्धा माझ्यात मातृत्वाची जाणीव निर्माण करत नव्हता. ऋषीला आपणच नऊ महिने पोटात वाढवलं आहे का अशी शंका आपल्याला आली. हेकाय होतंय तेच तर इतके दिवस कळत नव्हतं.

सगळ्या नात्यांपासून दूर जायची इच्छा मनात तीव्र रूप धारण करू लागली तसे आपणच घाबरलो. पूर्वी ऋषीने भूक लागली म्हणायच्या आधीच आपल्याला कळत होतं आणि आपण धडपडत ऋषीसाठी खाऊ बनवायचो. अचानक ही मनात येणारी संवेदना बंद झाली. असं कसं झालं?

ऋषीला काय खायला आवडतं हेही आपण विसरलो असं का झालं? या प्रश्नाची उत्तरं आपल्याला सापडत नव्हती म्हणून आपण हवालदिल झालो होतो पण हे कोणाच्याच लक्षात येत नव्हतं. सगळ्यांना फक्त हेच जाणवलं की मी खूप कोरडी झाले आहे.

मी अशी कोरडी नाही. माझ्यात हा बदल का झाला मला कळत नाहीय. कोणत्याही नात्यांमधील ओलावा मला जाणवत नाही हे का झालंय हेच तर मला कळत नव्हतं. मी पूर्वीपासून अशी कोरडीठक्क नव्हते. कशामुळे झाले हेच शोधतेय.पण माझी अस्वस्थता शोधायला मदत करायला सुधीरही आला नाही.

सुधीरला माझी अस्वस्थता कळतच नव्हती. मला खूप आशा होती की सुधीर मला मदत करेल मी ज्या अधांतरी अवस्थेत उभी आहे तिथून मला मार्ग शोधायला मदत करेल पण असं काही घडलं नाही. आपला जीवनसाथी पण आपल्या मनाची घालमेल समजून घेऊ शकत नाही ही जाणीव मनाला खूप त्रास देत होती.

आपल्याला पण समजत नव्हतं की आपली अवस्था सुधीरला कशी समजावून सांगू? या विचारांच्या आंदोलनामध्ये कितीतरी दिवस मी जगायचं म्हणून जगत होते, बोलायचं म्हणून बोलत होते घरी आणि ऑफीसमध्ये काम करायचं म्हणून करत होते. कशातच माझा जीव गुंतत नव्हता.


मला माझी स्पेस मिळत नाही आहे म्हणून हे सगळं घडतंय हे जेव्हा आपल्याला कळलं तेव्हा मनाला शांतता मिळाली. तेव्हा आपण स्पेस म्हणजे आपल्याला काय हवंय यावर विचार करू लागलो. जेव्हा आपल्याला त्याचं उत्तर मिळालं तेव्हाच आपण प्रमोशन घेऊन बंगलोरला जाण्याचा निर्णय घेतला.

मला आमचं घर सोडायचं नव्हतं पण यात गुंतायचं पण नव्हतं मग त्यावर प्रमोशन घेऊन जाण्याचा निर्णय चांगला आहे, हा निर्णय योग्य आहे हेच आपल्याला योग्य वाटलं म्हणून हा निर्णय घेतला. काही दिवसांनी आपल्याला पुन्हा घराची, सुधीरची ऋषीची ओढ जाणवली तर आपण आपल्या घरट्यात परतणार आहे हे मला आजही माहीत आहे.

नेहा कितीतरी वेळ याच विचारात गुंतली होती की कधी ती बसस्टॅंडवर आली तिलाच कळलं नाही. कॅब थांबली आणि ड्रायव्हर बोलला त्या आवाजाने ती भानावर आली.
" मॅडम बस स्टॅण्ड आला."

" हो."

नेहाने त्याला पैसे दिले आणि कॅबमधून उतरली. डिकीतून सामान काढून ती दोन्ही बॅगा घेऊन बापाशी जाणार तर तिला तिची आई आणि अक्षय तिच्या दिशेने येताना दिसले. तिच्या मनात आलं आता आईकडून उपदेश ऐकावा लागणार.

" नेहा अगं तू काही सांगीतलं नाही आज कोणत्या बसने जातेय?" आईने तिला फैलावर घेणा-या स्वरात विचारलं.

" तरी तुम्हाला कळलच नं."

नेहा हसत बोलली.

" अरे मी सहज फोन केला सुधीरला विचारायला की नेहा कधी जातेय तर त्याने सांगितलं की ती गेली बसस्टॅंडवर म्हणून आईला घेऊन सरळ इथेच आलो."

" नेहा मधून मधून येणार आहेस नं?"

आईच्या बोलण्यावर नेहाने काहीच उत्तर दिलं नाही.
"नेहा अगं हे काय वागणं आहे तुझं? अशी का वागते आहेस?"

" मी निघू का माझी बस लागली आहे."

" हो जा.हॅपी जर्नी "
अक्षय ही लगेच थंड स्वरात म्हणाला.

नेहा दोन्ही बॅगा घेऊन बासपाशी गेली.

" अक्षय अरे या मुलीला झालंय काय? किती कोरडेपणा आलाय हिच्यात! "

" तेच नं काहीच कळत नाही. नेहा अशी का झाली? आपण बहुतेक नेहाला पूर्ण ओळखतच नाही असंच मला आता वाटायला लागलं आहे."

" खरय रे. अरेपण मी तर जन्म दिला आहे तिला. मलापण नेहा कळली नाही याचं आश्चर्य वाटतंय."

" मला ऋषीची काळजी वाटतेय.अरे सुधीरच्या आईवर आता किती काम पडेल. ऋषीचं सगळं करताना किती दमायला होईल. लहान मुलांना सांभाळणं इतकं सोपं नाही."

" होनं आई . पण या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतोय. तिला कुठे या गोष्टींशी देणंघेणं. मला स्पेस हवी असं सांगून गेली सरळ निघून. "

" आपणही थोडा हातभार लावायला हवा."

" तो कसा ?"

अक्षयने काही न समजून विचारलं.

" अरे मधून मधून ऋषीला आपल्याकडे आणत जाऊ. सगळ्यांमध्ये छान रमेल. सुधीरच्या आईबाबांना पण जरा आराम मिळेल."

" हो तू म्हणतेस ते बरोबर आहे. करूया तसं."

" आई मला सुधीरची काळजी जास्त वाटते. तो या क्षणासाठी मानसिक रित्या तयार नाही.‌त्याला नेहा नाही हे पचवणं कठीण होणार आहे."

" होनं.अशी स्थिती कधी आपल्या संसारात येईल असं त्याला कसं वाटेल? अरे त्याला काय कोणालाच वाटणार नाही. हे म्हणजे विचित्र संकट आहे. ते कोणाला समजणारे नाही."

" हं. आता मला काही दिवस तरी सुधीरला वारंवार भेटणं आवश्यक आहे. त्याला माॅरल सपोर्ट देणं आवश्यक आहे. आज प्रियंका असती तर सुधीरला तिने आधार दिला असता."

" प्रियंका फार समजूतदार मुलगी होती. सुधीरचे आईबाबा प्रियंकाच्या धक्क्यातून अजून पुरते सावरले नाही तोच हा धक्का बसला त्यांना. खूप केविलवाणे झाले असतील. अक्षय एकदा जाऊन येऊ आपण सुधीरच्या घरी."

" हो.अग बस स्टॅण्ड वर पण येऊ नको म्हणून सांगीतलं नेहाने सुधीर आणि ऋषीला याचं मला आश्चर्य वाटतंय."

" आपल्याला सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटतंय त्यात ही एक. चल निघाली तिची बस."

" हो चल निघूया.

नेहाची बस अक्षय आणि त्याची आई जिथे उभे होते तिथून एक वळसा घेऊन निघून गेली. बसमध्ये नेहा दिसते का म्हणून तिची आई बघत होती. नेहा दिसली नाही. बस हळूहळू दिसेनाशी झाली.अक्षय आणि त्याची आई निघाले मनात अनेक प्रश्न साठवून
________________________________
बंगलोरला पोचल्यावर नेहा ऋषीला फोन करेल का बघू पुढील भागात.