Aadhar - 1 in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | आधार - भाग 1

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

आधार - भाग 1

आधार या पुस्तकाविषयी थोडंसं

आधार नावाच्या शिर्षकातंर्गत लिहिलेली ही पुस्तक. बऱ्याच दिवसांपासून या शिर्षकाची पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. परंतु ना कथानक सापडत होतं. ना लिहिता आलं होतं. तशी यापुर्वी आयुष्य नावाची एक पुस्तक लिहिली आणि ठरवलं की आपण आधार नावाची पुस्तक लिहायची व लवकरच तिही पुर्ण झाली.
आधार नावाची ही पुस्तक. पुस्तकाचं कथानक हे पाच पात्रांना धरुन आहे. गुरु, आरती, सुरेखा, किर्ती व ज्योती. त्यात आणखी एक पात्र आहे. ते म्हणजे सायली. सायली यातील पाहूण्याचं पात्र वठवते. तेही अगदी दमदारपणे. तसं पाहिल्यास या पुस्तकाला लिहायला काही सामान्य अडथडे आलेत. काही भावनाही आल्यात की ज्यातून माहिती मिळत नव्हती. माहिती संप्रेषण करणारे घटक हे कामात व्यस्त होते. काही काल्पनिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यालाही घटकांचा विरोध असायचा. माहिती ही सत्यच हवी. तरीही भविष्याचा वेध घेवून बरेच जीवनपैलू काल्पनीक टाकलेत. त्यामुळंच ही पुस्तक वाचनीय झालेली आहे.
या पुस्तकाची नायिका ज्योती. खरं तर ज्योती हे पात्र म्हणजे यल्गार आहे. ते पात्र दिशा देत असतं तत्वज्ञानाच्या. दुःख तर येणारच. ते आपल्या प्रारब्धानंच येतं. परंतु त्याचा बाऊ करुन आपण त्याला घाबरत रडगाणं गात बसणं, हे भेकडपणाचं लक्षण. हे तत्वज्ञान ज्योती हे पात्र प्रसवतं आणि ती गोष्ट इतरांनी शिकण्यासारखीच आहे. ही पुस्तक एक प्रकारचा बोध देवून जाते.
या पुस्तकात ज्योतीव्यतिरीक्त इतरही काही पात्र आहेत. त्यांचा जीवनप्रवास आहे. परंतु तो मी मांडत नाही वा त्यांचं कथानक यात सांगत नाही. ते आपल्याला पुस्तक रुपानं वाचावं लागेल. शिवाय ज्योतीचं शेवटी काय झालं? गुरुचं शेवटी काय झालं? किर्तीचा जीवनप्रवास कसा राहिला? तद्वतच सुरेखाचे उत्तरदायित्व काय? सायलीनं पाहूणीची भुमिका कशी व्यक्त केली? इत्यादी प्रश्नही अनाकलनीय आहेत. ते पुस्तक वाचूनच समजेल.
मी यापुर्वी एकोणनव्वद पुस्तकांची निर्मीती केली. ही नव्वदवी पुस्तक आपणा वाचकांच्या सेवेत ठेवत आहे. आपण ही पुस्तक वाचावी व जसं माझ्या इतर पुस्तकांचं स्वागत केलं. तसंच याचंही स्वागत करावं ही विनंती.
मी ज्योती, किर्ती आणि इतर काही यात अभिव्यक्त झालेल्या घटकांचे आभार मानतो की त्यांनी काही माहिती सांगून माझ्या लिहित्या हाताला प्रेरणा दिली नव्हे तर बळच. कधी गंमतीदार प्रसंग लिहितांना काहींच्या भावनाही दुखावल्या असतील. त्याबद्दल क्षमाही मागतो. ही पुस्तक काल्पनीक कमी आणि वास्तविकतेचा खजिना आहे. त्यामुळंच कंटाळवाणेपणा नाही आणि कंटाळा सुरुवातीलाच येणार असेल तर कृपया ही पुस्तक वाचूच नये. मी ई साहित्य प्रतिष्ठानचेही आभार मानतो. कारण त्यांनी जर माझ्या पुस्तका ई साहित्य स्वरुपात प्रकाशीत केल्या नसत्या तर आज माझ्या नव्वद पुस्तका झाल्या नसत्या. शेवटी एवढंच म्हणेल की आपण वाचक या नात्यानं ही पुस्तक वाचावी व वाचून झाल्यावर मला एक फोन अवश्य करावा ही विनंती.

आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

आधार कादंबरी भाग एक
अंकुश शिंगाडे

शाळा शिक्षण मिळण्याचे केंद्र आहे. त्या शाळेतून शिक्षण शिकविलं जातं. त्याचबरोबर संस्कारीत मुल्यही. जे संस्कारीत मुल्य आपल्या आईवडिलांचा आदर करायला शिकवितात. तसाच आदर करायला शिकवतात गुरुंचा आणि त्याचबरोबर आदर, आपल्या परीसरातील लोकांचाही आदर करायला शिकवतात. परंतु आज तसं नाही. आज मात्र आपल्या आईवडिलांचा कोणी आदर करीत नाहीत. मग आपल्या गुरुंचा आदर कसा करतील? त्यानंतर आपल्या परीसरातील लोकांचाही आदर कसा करतील? आज तसा आदर कुणातच उरलेला नाही. कारण आज संस्कारच उरलेला नाही. जसा संस्कार काल होता.
काल लोकं पायी चालायचे. ते पायी चालत असतांना त्यांना तहान लागायची. त्यानंतर ते एखाद्या घरी प्यायला पाणी मागायचे. तसं पाणी मागताच प्यायला पाणी मिळायचं. त्यात अस्पृश्यांना सोडून. शिवाय काही ठिकाणी विहिरी असायच्या व त्या विहिरीवर एक बादली राहायची.
विहिरीवर बादली राहायची. परंतु त्या विहिरीला हात लावायची परवानगी नसायची. त्यातच अशा वेळेस एखादा व्यक्ती जर तो स्पृश्य असेल तर तो पाणी पाजायचा. शिवाय प्रवासाची साधनं नव्हतीच. त्यामुळं लांब अंतरावरुन प्रवास करतांना लोकं चारपाच दिवसाचं स्वयंपाकाचं साहित्य घेवून निघत. जे सुक्या अवस्थेत राहायचं. परंतु जेव्हा ते एखाद्या ठिकाणी प्रवासाला थांबायचे व त्यांना दम लागायचा. तेव्हा त्यांना चांगलं वाटावं यासाठी लिंबू व मीरच्या सहज लोकांना उपलब्ध होत. त्या लिंबू मीरच्या प्रत्येक दारात अडकविलेल्या असायच्या. लोकं सर्रासपणे त्या दारावर अडकविलेल्या लिंबूमीरच्या कोणालाही, लिंबू मीरच्या घेवू का? असे न विचारता घेत असत. कारण सर्वांना माहीत होतं की त्या लिंबूमीरच्याची प्रवाशी लोकांना मदत व्हावी म्हणूनच बांधलेली असायची.
आज मात्र तसं नाही. आज त्या लिंबूमीरचीत अंधश्रद्धाळूपणा शिरला. आज लोकं लिंबू मीरची तर लावतात आपल्या दारासमोर. परंतु ते कोणाची दृष्ट लागू नये म्हणून. आज जर त्या पुर्वीच्या पद्धतीनं चालून कुणाच्या दारासमोरची लिंबूमीरची घेतली तर बस. भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. पुर्वी तीच लिंबूमीरची अनोळखी व्यक्तीही काढून घ्यायचा अन् आज तीच लिंबूमीरची ओळखीचा व्यक्तीही काढून घेवू शकत नाही.
महत्वपुर्ण बाब ही की आज काही काही शाळेतूनही अशाच अंधश्रद्धा प्रसवल्या जातात की काय असंच वाटायला लागलं आहे एकीकडे, तर दुसरीकडे पाश्चात्य विचारसरणी जोर धरीत आहे. एकीकडे काही शाळेत अभ्यासक्रमात असलेली संतवाणी भजनाचं स्वरुप वाटतं. तर दुसरीकडे अभ्यासक्रमातून अंधश्रद्धेचा नाईनाट करणारी प्रकरणं समाविष्ट असतात. ज्यातून गाडगेबाबांनी सांगितलेलं तत्वज्ञान प्रसवलं जातं. आज मदतीची भावना लोप पावलेली आहे आणि संस्काराच्या नावावर वेगळंच काही सांगीतलं जातं की जे मनाला आणि तनालाही कधीच पटत नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास एकीकडे देवाला मानणारं तत्वज्ञान, तेही शालेय अभ्यासक्रमात. संतवाणीच्या स्वरुपात जरी नसलं तरी शाळेतील शिक्षक त्याला धार्मीक रंग देण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे देवाला न मानणारं तत्वज्ञान, जे मदतीची भावनाच अंतर्मनातून उध्वस्त करुन टाकते. त्यामुळंच की काय, मुलं शिकतात. कोणी डॉक्टर, इंजिनिअर बनतात. कोणी इतर काही. परंतु संस्कार दिसत नाही त्यांच्यात. ती मुलं आपल्याच स्वतःच्या आईवडीलांना विसरतात व त्यांची रवानगी वृद्धापकाळी वृद्धाश्रमात करतात. ते शिक्षकांनाही विसरतात. थोडेसे मोठ्यापणी शिकवणारे शिक्षक लक्षात राहतात. कारण त्यावेळेस समजदारीपणा आलेला असतो. परंतु ते त्या शिक्षकांना विसरतात की ज्यांनी त्यांना समज नसतांना, अगदी बोट धरुन लिहायला, वाचायला शिकवलं. तोच आजचा समाज ज्या आईवडीलांना विसरतो, तोच आजचा समाज ज्या शिक्षकांना विसरतो. तोच समाज खरं तर आपल्या शेजाऱ्यांना कसा विसरणार नाही? तो त्यांनाही विसरतोच. फक्त मतलबीपणासारखा वागतो तो समाज. यावरुन शिक्षणाला जरी बाबासाहेबानं वाघिणीचं दूध जरी म्हटलं तरी आजचं शिक्षण हे वाघिणीचं दूध नाही की जे गुरगुरेल. ते मेंढीचं दूध आहे. कारण आजचं शिक्षणरुपी दूध पिणारी माणसं आपल्याच पत्नीसमोर मेंढ्यासारखं काम करीत असतात. सारखी खाली मान घालून राहात असतात. ती म्हणेल तशी वागत असतात. खरं शिक्षण ह्या महिलाच घेत आहेत की ज्या महिला आज वाघिणीसारख्याच नाही तर सिंहासारख्या असतात. त्या शिकतात. म्हणूनच त्या सिंहासारख्या वागतात आणि मुलं तिच्यावर फिसलून तिच्या मतानुसार वागत असतात. तिचंच ऐकून तिच्या मनानुसार आपल्याच मायबापाला वृद्धाश्रमात टाकत असतात. येथूनच संस्कारीत मुल्य तुटली असून ती मुल्य समजून घेण्याची गरज आहे.
महत्वाचं म्हणजे कालच्या पती नावाच्या पुरुषांच्या जोखडातून आज स्वतंत्र झालेली स्री, आज पुरुषांना दाबून त्यांना शेळ्या, मेंढ्यांसारखी वागणूक देत असते. विशेष सांगायचं झाल्यास काल ज्या संस्कारीत मुल्यानुसार पुरुषांचा वरदहस्त वा धाक असल्यानं कालची स्री पुरुषांच्या मायबापाची नाही तर पुरुषांकडील पाहुण्यांचा आदर करायची. तेवढीच सरबराई देखील करायची. आज मात्र तसं नाही. आजची स्री सांस्कृतीक मुल्यानं स्वतंत्र तर झाली. परंतु जुनी सांस्कृतीक मुल्य विसरली व विसरली ती आपल्याच मायबापाचे संस्कार, त्यातच विसरली आपल्या गुरुंनी दिलेले संस्कार, विसरली ती आपल्या परीसरातील लोकांनी दिलेले संस्कार आणि तेवढीच विसरली चांगल्या सुसंस्कारीत मित्रांनी दिलेले संस्कार आणि भलत्याच मित्रांच्या नादात लागून चांगल्या संस्काराची राखरांगोळी करायला लागली. याला जबाबदार कोण? आईवडील की जे लहानपणापासून मोठे करतात, शिकवतात. गुरु की जे सुसंस्कार शिकवतात. आजुबाजूचा समाज की जो कुसंस्कार देत नाही. तसेच मित्र की जे चांगलंच ज्ञानामृत पाजतात. मग असं का होतं? काही मुली एकदम लांडग्यासारख्या का वागतात? त्या उदार मनानं का वागत नसाव्यात? याला जबाबदार कोणी आईवडील, गुरु, मित्रमंडळ, समाज जबाबदार नाही तर जबाबदार आहोत आपण. आपली बुद्धीमत्ता आणि आपले विचारच तुच्छ असतात आणि त्याच तुच्छ विचारात व मनात मंथरेसारख्या कुत्सीत बुद्धीची माणसं आणखीनच तुच्छ विचारांची भर घालतात. मग रामायण घडतं. राम सीतेसारखे मुलांचे आईवडील वनात जातात. अर्थात वृद्धाश्रमात जातात.
विशेष म्हणजे आजच्या काळातील महिलांनी असा विचार करावा की आपण तसं वागू नये. आपले मायबाप जसे देव, तसेच आपले सासू सासरेही देवच असतात याचं भान त्यांनी ठेवावं. जेणेकरुन त्यांना म्हातारपणी त्रास होणार नाही व त्यांना त्यांच्या अखेरच्या काळात वृद्धाश्रमात जावं लागणार नाही. यात शंका नाही. यात सांगायचं झाल्यास आज मुली स्वतंत्र झाल्या. त्यांना त्यांच्या मनासारखं वागता येतं. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी सासूसासऱ्याला वृद्धाश्रमात टाकावं आणि आपण आज वाघीण बनलो म्हणून त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घ्यावं. हे सत्य समजण्याची आज तरी तुर्तास महिलांना गरज आहे. त्यांनी या संस्कारीत गोष्टी समजून घ्याव्यात. अन् त्या गोष्टी समजून घ्यायच्या नसतील तर विवाहच करु नये म्हणजे झालं.
ज्योती..........एक शाळेतील मुलगी. तिच्या आयुष्यात आज फारच बदल झाले होते. आज तिला मिळालेला पती सालस स्वभावाचा होता व तो रात्रंदिवस काम करीत होता. तिही घरी शिवणकाम करुन पतीला आर्थिक बाबीत मदतच करीत होती. आज ती पाश्चात्य विचारसरणीची बनली होती व तिला वाटत होतं की जग कवेत घेवू की काय? तिला फिरणे फार आवडायचे व ती आपल्या पतीसोबत फिरायला जायची काश्मीरपर्यंत. त्यातच ती कपडे परिधान करतांना अंगावर कमी कपडे वापरायची. कधी वाईनही घ्यायची व म्हणायची की वाईन घेणं हे आज सामान्य झालेलं आहे. तिला बाईक चालवता येत असे, व्यतिरिक्त कारही.
ज्याप्रमाणे ज्योतीला कमी कपडे वापरणं आवडत होतं. त्याप्रमाणेच तिला तिची केससज्जा खुली ठेवणं आवडत होतं. मॉडर्न संस्कृती तिच्या नसानसात भरल्यासारखी वाटायची तिचे फोटो पाहून.
आज तिला काहीसा राग आला होता. जेव्हा गुरु तिच्याशी बोलत होता. गुरु तिच्या बालपणाचा मित्र होता. गुरुनं तिला विचारलं होतं,
"ज्योती, तुझं कोणावर प्रेम वैगेरे होतं का गं बालपणात."
तो त्याचा प्रश्न. तसा तो प्रश्न तिला काही आवडला नाही व ती मौन झाली. तिच्या मौनाचं कारण होतं तिनं बालपणात कोणावरही न केलेलं प्रेम. तशी ती पाहायला छान होती आणि त्याच काळात ती एखाद्या राजकन्येसारखी दिसायची. वागायची, बोलायची. तिचं बोलणं, वागणं यावरुन अंदाज येत होता की भविष्यात ही एखादी अभिनेत्रीच बनेल आणि आपल्या मायबापाचं नाव चमकवेल. परंतु तसं काही घडलं नव्हतं. कारण तसं घडायला ते एक तात्कालिक कारण घडलं की तिला अभिनेत्रीपणाच्या लालसेपासून दूर जावं लागलं.
ज्योती जेव्हा बारावीला गेली होती. तेव्हा ते बालपणच होते. दुधाचे ओठ सुकले नव्हते. व्यवहारीक गोष्टी कळत नव्हत्या. त्याच काळात तिचे वडील गेले. मग काय छत्र हरपलं आणि आभाळ कोसळल्यागत तिची अवस्था झाली होती.

************************************************

आई........ आईवडिलांची लाडाची मुलगी ती. ती सर्वात लहान होती. तशी ती जास्त आईची लाडाची होती वडीलांपेक्षा. आई तिची प्रेरणा होती तर वडील तिचे आधारस्तंभ. मग काय साऱ्या समस्याच समस्या.
तो वसंत फुलला होता. नव्या दमाने त्याचं आगमण झालं होतं. शिशिर नुकताच संपला होता. झाडाचे पानं गळले होते आणि आता झाडावर नवी पालवी आली होती. त्यातच ज्योती एका झाडाखाली बसली होती. आज ती तब्बल पन्नास वर्षाची झाली होती. तिनं भरजरी कपडे वापरले नव्हते तर तिच्या अंगावर कमी रुंदीचे कपडे होते. तशी एक वाऱ्याची झुळूक आली. ती तिला स्पर्शून गेली. तसं तिला आठवलं तिचं तरुणपण.
आज ज्योती तरुण झाली होती. तशी ती फार मोठी झाली नव्हती. वर्ग आठवीत गेली असेल बहुतेक. अचानक काय झालं ते तिलाही कळलं नव्हतं. दैवानं नव्हे तर नशिबानं घात केला होता. कोणत्यातरी कारणानं तिच्या आईच्या डोळ्यानं दिसणं कमी झालं होतं. मग काय वडीलांसह संपुर्ण परीवारावर फार मोठं संकट कोसळलं.
ज्योतीला एक बहिण होती. तिचं नाव पुजा होतं. पुजा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू होती. ती खेळ खेळण्यासाठी बाहेर बाहेरच असायची. मग काय घरची कामं आईच्या डोळ्याला दिसत नसल्यानं ज्योतीवरच आली. आता ज्योती घरची सर्व कामं, त्यातच स्वयंपाक, भांडी घासणं, अंघोळ करणं व झाडलोट करत असे. शिवाय शाळाही. तेव्हा ती कामं करतांना तिला वैताग येत असे. कारण घरी ती एकटीच नव्हती तर तिच्यासोबत तिचे तीन भाऊ, तिचे वडील आणि तिची आईही असायची. त्या सर्वच्या सर्व सहा लोकांची कामं करतांना अति त्रासच व्हायचा. तसं पाहिल्यास तिला घरकामात तिचे तीनही भाऊ मदत करीत असत. परंतु ती मदत तुटपुंजी असायची. शिवाय तिला आपल्या आंधळ्या आईलाही औषधपाणीही द्यावं लागायचं. तेही एक काम होतंच.
ज्योती साधारण हुशार होती. तशी ती अभ्यासात साधारणच होती. ती सुंदर होती. तशी ती आधीपासूनच पाश्चात्य विचारसरणीची. तिला घरी अतोनात दुःख होतं. परंतु ती जेव्हा शाळेत यायची. त्या शाळेत तिच्या चेहर्‍यावर कोणतंच असं दुःख जाणवायचं नाही. असं वाटायचं की ती अतिशय आनंदी आहे व जगात तिच्यासारखा कोणीच आनंदी नाही.
भाऊ तिच्यापेक्षा मोठे असले तरी ते वयानं लहानच होते. कधी भाऊ घरी राहायचे आईची सेवा करायला. तसंच औषधपाणी द्यायला. ते तीनही भाऊ तिच्यापेक्षा मोठे होते. त्यांचही शिक्षण होतंच. परंतु ते घरी राहात होते आणि ज्योतीला शाळेत पाठवत होते. तिच्या शिक्षणाला खंड नको असा त्यांचा विचार होता. त्यामुळंच ज्योती शाळेत तरी गैरहजर नसायची. जरी तिच्या आईच्या डोळ्याला दिसत नसलं तरी.
आईच्या डोळ्याला दिसणं बंद झालं होतं. तिच्या औषधाला पै पै पैसा लागत होता. एक वडीलच होते की जे कमावते होते. आता घर चालवणं कठीण झालं होतं अगदी. कारण वडीलांचा पैसा पुरत नव्हता औषधपाण्यामुळं आणि परीवारही मोठाच होता. अशातच तिच्या बहिणीचा म्हणजे पुजाचा ॲथलेक्टीक्स मध्ये राज्यातून दुसरा क्रमांक आला व तिला आंतरराष्ट्रीय खेळ खेळण्यासाठी फ्रान्सला पाठवायचं ठरवलं.
पुजाची फान्सला जाण्याची फार इच्छा होती आणि तिला विश्वासही तेवढाच होता की ती फ्रान्सला जावून तिथंही नंबर मारुन येईल.
पुजा ज्योतीची बहिण. आई आंधळी झालेली. तिच्या औषधाला पैसा लागत असलेला. घरी खाणारी तोंडही जास्तच. शिवाय त्यांच्याही कपड्यालत्त्याला पैसा लागतच होता. त्यामुळंच तिच्याजवळही पैसा नव्हता. शिवाय महत्वाकांक्षा अपार होती. गुणांची काही कमी नव्हती व त्याच गुणांच्या भरवशावर पुजा फ्रान्समध्ये जावून आली. तिनं स्पर्धेत भागही घेतला. परंतु प्रारब्धच ते. ती त्या स्पर्धेत टिकून शकली नाही व ती बाद ठरली.
पुजा फ्रान्समधून परत आली होती. तिच्यावर तशी जबाबदारीच होती. ती मोठी होती वयानं. ती सर्वात मोठी होती. ती पाहात होती की आई आंधळी झालेली आहे. शिवाय भाऊ सर्व लहान. त्यातच ती सर्व परिस्थिती पाहून वडीलांचंही मानसिक संतुलन बिघडलेलं. त्यांची बुद्धीच काम करीत नव्हती व तेच घडलं.
डोळ्यातून पाणी येईल अशीच नियती वागत होती. मग काय वडीलांनी नियतीसमोर हार मानली व आपलंच जीवन संपवून टाकलं. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत.
पाच भावंडं. त्यात सर्वात मोठी पुजा आणि लहान असलेली ज्योती. मग काय, नियतीसोबत युद्ध सुरु झालं अस्मितेचं. शाळा, खेळ सांभाळून पुजा वागत होती. नशीब परीक्षा घेत होतं. पुजाला त्याची जाणीव होती. खेळण्याचा छंद संपुष्टात आला होता. संपूर्ण आशा संपल्या होत्या. जीवनात वसंत. परंतु जगण्यात काहीच उरलं नाही असं पुजाला वाटत होतं. शिशीरच वाटत होता आयुष्य जगतांना. परंतु तिला ना धड जगता येत होतं, ना तिला धड मरताही येत नव्हतं.
वडील मृत झाले होते. आईही आंधळी होती. संसाराचा गाडा चालवायचा होता. काय करावं सुचत नव्हतं. आता शिक्षण सोडून कोणतंतरी काम शोधणं बाकी होतं. त्यामुळं पुजा प्रयत्न करीत होती काम शोधण्याचा. अशातच तिला धावपटूच्या दर्जावर दहाव्या वर्गात असतांनाच नोकरी लागली व सर्वांना हायसं वाटलं. आता थोडासा पैशाचा प्रश्न मिटला होता. परंतु घरच्या कामाचं काय? घरच्या कामाचा ताण ज्योतीवर आला होता. कारण पुजाला दिवसभर नोकरी करावी लागायची. त्यातच ती शिकतही होती उच्च शिक्षण. तसं ते शिकण्याचं वयच होतं.
पुजाला सरकारी नोकरी लागली होती. एक प्रकारचा आधार निर्माण झाला होता. नियतीनं जरी डोळ्यातून पाणी आणलं असलं तरी नियतीवर पुजानं विजय मिळवला होता व स्वतः जबाबदारी स्विकारुन ती ते शिवधनुष्य पेलवत होती.
पुजानं आर्थिक भार उचलला होता. तिला नोकरी करावी लागायची पैशासाठी. कारण पैसा ही त्यांचं पोट भरण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट होती. ती घरच्या कामात जास्त हातभार लावायची नाही. त्यामुळंच घरच्या कामाची सर्व जबाबदारी ज्योतीवर आली.
ते प्रेम करण्याचं वय. पुजा तेवढी दिसायला सुंदर नव्हती. त्यातच तिचं संपूर्ण लक्ष तिच्या खेळात होतं. त्यामुळंच ती कोणाला भाव देत नव्हती. परंतु ज्योती पाहायला सुंदरच होती. ती कुरळ्या केसाची असून त्या केसाची केससज्जा ही रोमांचकारी होती. अर्थात बापकट होती ती. तिनं लहानपणी विचार केला होता की आपण तरुण होताच चांगली मौजमजा करु. परंतु प्रारब्धच ते. कसली मौजमजा करणार? शेवटी तो मौजमजेचा विचार त्यागून तिला आपलं पुर्ण लक्ष घरच्या कामात गुंतवावं लागलं आणि बस. ते लक्ष गुंतवीत असतांना तिचं प्रेमाकडे लक्ष गेलं नाही. ती विचलीत झाली व ठरवलं की आपण प्रेम करावं तेही विवाहानंतरच.
पुजा.......ज्योतीची मोठी बहिण. ती अंगावर जबाबदारी झेलून घराचा सांभाळ करीत होती. त्यातच आपला छंदही जोपासत होती. तिच्या छंदाला काही लोकं प्रतिसाद देत होते. त्यात काही समवयस्कही होते तर काही वयोवृद्ध तर काही लहान मुलंही होती.
पुजाच्याही अवतीभवती काही समवयस्क मित्रमंडळ फिरत होतं. जसे फुलाभोवती भुंगे फिरतात तसे. परंतु पुजा त्या भुंग्यांना दाद देत नव्हती. कारण तिच्यावर जबाबदारी होती. ते तीन भाऊ आणि तिची लहान बहिण ज्योती. तशी ती तेवढी पाहायला सुंदरही नव्हतीच. परंतु ज्योती सुंदर असल्यानं पुजाचे समवयस्क मित्र पुजाला सोडून ज्योतीच्याच अवतीभवती फिरायला लागले होते. त्यांना कदाचीत असं वाटत असेल की पुजाचं जावू द्या. ती आपला छंद जोपासते. तिला काबूत करणं कठीण. कारण ती छंदावर प्रेम करते. त्यामुळं आपल्यावर करणार नाही. तसं पाहिल्यास पुजाचं वागणंही साधंच होतं. त्यामुळंच ते तरुण समवयस्क भुंगे ज्योतीच्या मागं लागले होते. जणू त्यांना वाटत असेल की पुजा नाही तर काय झालं, ज्योती तरी आपल्याला भाव देईल. परंतु तिथंही गणित चुकत होतं. ज्योती जरी सुंदर वाटत असली आणि ती जरी पाश्चात्य पद्धतीनं जीवनशैली जगत असली तरी तिलाही कळत होती घरची परिस्थिती. ती कशी काय तिच्या मागं लागणाऱ्या भुंग्याना भाव देणार. तिला त्या गोष्टीचा रागच यायचा आणि राग यायचा प्रेम या गोष्टीचा. शिवाय तिला प्रारब्धावरही रागच यायचा. वाटायचं की काय हे प्रारब्ध. हे प्रारब्ध माझ्याच वाट्याला यायचं होतं काय?
पुजाचं काम करणं. घरची जबाबदारी असल्यानं एका पुरुषांसारखी नोकरी करणं व आईसह सर्व भावंडांना सांभाळणं. हे त्यावेळेस वाखाणण्याजोगच होतं. तद्वतच ज्योतीचं घरदार सांभाळणं. पैशाचा व्यवहार करणं. त्यातच शिक्षण करणं. हे एक कसबच होतं. कारण पुजा पुरुषासारखी कमवीत जरी असली तरी ती व्यवहार करण्यासाठी पैसे ज्योतीजवळच द्यायची. त्यामुळंच ज्योतीची सगळी त्रेधातिरपीट उडायची. मग काय? आईचं औषध व व्यवहारीक खर्च करतांना जी ज्योतीची तारांबळ उडत होती. ती वाखाणण्याजोगीच होती. कधीकधी तर तिला रडूच कोसळायचं.
ती तिची रडण्याची गोष्ट. ती समजून घ्यायची तिची बालमैत्रीण. जी तिच्यासोबत असायची तिच्या खांद्याला खांदा लावून. तिचं नाव होतं सुरेखा.

************************************************

सुरेखा ही तिची पाचवीपासून तर दहावीपर्यंतची मैत्रीण. त्या मैत्रीणीला ज्योतीच्या घरची परिस्थिती थोडीफार माहीत होती. जेव्हापर्यंत ती सोबत होती. तिच्या आईचं आंधळेपण. त्यावर तिनं काळजी घेणं. हे सारं काही माहीत होतं तिला. ती सांगत नव्हती घरची परिस्थिती. तरीही सुरेखा तिची सतत चौकशी करायची. तसे तिचे वडील नशेच्या आहारी असल्यानं तिलाही आर्थिक हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. तिच्या देखील घरात सुखशांती नव्हतीच. तिचेही वडील तसं पाहिल्यास मदिराप्राशन करायचे. त्यामुळंच परिस्थितीला तोंड द्यायचं धाडस तिच्यात निर्माण झालं होतं.
ज्योती दहावी झाली. तेव्हा तिची बहिण पुजा सरकारी नोकरीला लागली होती. त्यातच तिनं आपल्या बहिणीला म्हटलं,
"ताई, मी विज्ञान शाखेत प्रवेश घेवू इच्छिते. तुझं काय म्हणणं आहे?"
ज्योती आपल्या बहिणीला तसं बोलताच बेताची परिस्थिती असूनही पुजानं तिला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची परवानगी दिली व तिनं दुरच्याच महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र सुरेखाच्या वडीलामुळं तिची परिस्थिती एकदमच नाजूक असल्यानं तिनं एका साध्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिनं त्यावेळेस कला शाखेत प्रवेश घेतला होता.
ज्योतीचं आता महाविद्यालय वेगळं होतं. तसं सुरेखाचंही महाविद्यालय वेगळच होतं. दोघींच्या प्रवेश शाखाही वेगळ्याच होत्या. त्यातच आता त्यांना नव्या महाविद्यालयीन मित्र मैत्रीणी मिळाल्या होत्या. त्यात त्या अगदी नित्यनेमानं रमत असत. आता दहावीपर्यंत असलेल्या मित्र मैत्रीणीची आठवण येत नसे. ज्योतीला तर मित्र वा मैत्रीणी ठेवणं आवडत नव्हतं. तिला वाटायचं की जर मी मैत्रीण ठेवलीच आणि तिला घरी आणलं तर तिला आपल्या घरची परिस्थिती माहीत होईल. मग मित्रत्व तुटेल. हीच भीती सतावत होती ज्योतीला आणि आपल्या घरी जर आपण मैत्रीण आणली तर आपल्या वडीलांची नशा आपल्या मैत्रीणीला दिसेल या भीतीने सुरेखाही मैत्रीपासून दूर जात होती. सुरेखा तसेच ज्योती ह्या जरी दहावीपर्यंत चांगल्या जीवलग मैत्रीणी असल्या तरी आता ना सुरेखाची भेट होत होती ज्योतीशी. ना ज्योतीची भेट होत होती सुरेखाशी. अशातच सुरेखा शिकत असतांना तिचा विवाह करायचं ठरवलं तिच्या घरच्या लोकांनी. मग सुरेखाला मनोमन आनंद झाला. विचार होता की परमेश्वरा. मला फक्त निर्व्यसनी आणि सांभाळणारा पती मिळू दे आणि परमेशानं तिची गोष्ट निश्चितच ऐकली व तिला निर्व्यसनी पती मिळाला. तेवढाच सांभाळणाराही.
सुरेखाचा जेव्हा विवाह झाला. तेव्हा तिला तिच्याच शहरात देण्यात आलं होतं. ती भरल्या कुटूंबातच पडली होती. आता तिच्या शिकण्यावर प्रश्नचिन्हंच उभं झालं होतं. वाटत होतं की मी पतीच्या घरी उच्च शिक्षण घेईल. परंतु ते तिला करता आलं नाही. लवकरच नोकरी निमित्त्याने सुरेखाच्या पतीने तिला दुसऱ्याच शहरात नेले. तिथं ती एकटीच राहिली.
नवंनवं शहर होतं ते. तिथं करमत नव्हतं तिला. वाटत होतं की आपण आपल्याच शहरात खुश होतो. आपला बाप जरी मदिराप्राशन करीत असला तरी आपला बाप का बाप होता की ज्यानं लहानपणापासूनच आपल्याला त्याच शहरात वाढवलं. दूर जावू दिलं नाही आणि आता आपला पती........आपल्या पतीनं तर आपल्याला न विचारता इथं आणलेलं. ना इथं मैत्रीची माणसं. ना इथं मायाळू माणसं. त्यातच तिचा पती जेव्हा कामावर जायचा. तेव्हा तिला करमत नव्हतं. ती एक खंतच होती. असाच तो एक दिवस उजळला की त्या दिवशी ती भाजीपाला घ्यायला बाजारात गेली. त्यातच तिची भेट एका म्हातारीशी झाली.
ती म्हातारी. त्या शहरात ती भाजीपाला विकायची. सुरेखानं भाजी घेतली आणि भाजीपाल्याचे पैसे त्या आजीबाईला देवू केले. तोच ती आजीबाई म्हणाली,
"बेटा या शहरात नवी आली हाय का?"
"होय. का बरं?"
"सहज इचारलं बेटा. येत जा अशीच माह्याचजोवर भाजीपाला घ्याले."
सुरेखाला म्हातारी माणसं आवडायची. त्यातच त्या म्हातारीचं ते कनवाळू बोलणं. तेही तिला पसंत पडलं होतं. तशी ती तिच्याकडं आता दररोज भाजीपाला घेण्यानिमीत्यानं जायला लागली. तसं त्या म्हातारीनं एक दिवस म्हटलं,
"बेटा, मलेबी एक पोरगी होती. ते मरण पावली. नवरा बी गेला. आतं मी एकटी हाय. मन उदास वाटत होतं. म्हून हा धंदा टाकलाय. करमत नव्हतं नं घरी."
म्हातारीनं म्हटलेले ते शब्द. ते शब्द कानावर पडताच सुरेखा म्हणाली,
"आजी, मलाही करमत नाही. मी काय करु?"
आजीनं सुरेखाचं बोलणं ऐकलं व म्हटलं,
"तू........तू या शयरात नवकरी कर. अगं काम अंगाशी असलं तं गमतं सगळं."
ती म्हातारी.........ती म्हातारी बोलून गेली खरी. परंतु ते शब्द सुरेखाला बरंच काही शिकवून गेले. करमत नाही म्हणून तिनं लागलीच आपल्या पतीला सायंकाळी घरी आल्यावर म्हटलं,
"मला घरी करमत नाही. मला नोकरी करायचीय. जरा काम लावून द्या."
सुरेखाचं ते बोलणं. त्यावर विचार करुन लागलीच तिच्या पतीनं तिला काम लावून दिलं. आता सुरेखाही नोकरी करायला लागली होती.
सुरेखानं अशीच नोकरी केली काही दिवस. ती तिच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून. अशातच ज्योतीचा विवाह जुळला. ती तिची जीवलग मैत्रीण होती. तिच्या विवाहाची पत्रीकाही सुरेखाला होती. परंतु ती तिकडेच अडकल्यानं तिला तिच्या विवाहाला येता आलं नाही. ती खुश होती आपल्या परीवारात. लवकरच तिला पुत्ररत्न प्राप्त झाले व तिला संपुर्ण मित्र मंडळींचा विसर पडला. आता आठवत नव्हते ते कोणीच दहावीचे मित्र. फक्त आठवत होती सर्व सासरची मंडळी. त्यातच काही माहेरची मंडळी. विचारही केला नव्हता की गतकाळातील तिची मैत्रीण ज्योती तिला भेटेल. विचारही केला नव्हता की गतकाळातील ते सर्व दहावीचे मित्र मैत्रीणी भेटतील. जे मित्रमंडळ दहावीनंतर भटकलं होतं. गतकाळाच्या आठवणीत हरवून गेलं होतं.
सुरेखाला नोकरी होती. सुरेखाला नोकरी होती, तेव्हापर्यंत काही नाही. तिला कोणताच फरक पडला नव्हता. परंतु जसं तिच्या पतीचं स्थानांतरण झालं. ती राहात असलेल्या शहरात. तेव्हा मात्र निश्चितच फरक पडला होता. आता गतकाळ आठवत होता आणि आठवत होत्या त्या गतकाळातील आठवणी. तसाच आठवत होता तिला भूतकाळ. त्या भूतकाळात तिला आठवत होती तिची बालमैत्रीण ज्योती. ज्योती कशी असेल? का असेल? सारेच प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. त्यातच तिला आठवत होती तीच दहावीपर्यंतची दुसरी मैत्रीण जया आणि ते सर्व मित्रमंडळ.
तिला जसा गतकाळ आठवायला लागला. तसं वाटायला लागलं की आपण त्या बालमैत्रीणीची भेट घ्यावी. त्यामुळंच ती अतिशय आशेनं यायची त्यांची भेट घ्यायला. परंतु ती त्यांची भेट तरी कशी घेणार? सोबत पती असायचे आणि ती मुलं. त्यांनाच सांभाळता सांभाळता दिवस जात होते. शिवाय तो पती कितीही चांगला असला तरी त्यांच्या मर्जीच्या बाहेर जाता येत नव्हतं सुरेखाला. मग ती कशी जाणार. त्यांच्या मर्जीच्या बाहेर. शेवटी तिला आपल्या गतकाळातील आठवणी पुसाव्या लागल्या व आपल्या परीवारातच हरवून जावं लागलं.
सुरेखाची मुलंबाळं लहान होती. वेळ कसलाही मिळत नव्हता. काढणार तरी कसा? अशातच एक दिवस वेळात वेळ काढून ती जयाच्या आईकडे गेली. परंतु माहीत झालं की जया त्या शहरात नाही. ती कुणातरी सोबत पळून गेली आहे. तिचा थांगपत्ताही घरच्यांना नाही. ती कुठं राहते. कुठं नाही. जीवंत आहे की नाही हेही माहीत नाही असं तिच्या आईनं सांगीतलं होतं. त्यानंतर तिचा तिनं फोन क्रमांक मागितला. परंतु तोही मिळाला नाही. शेवटी तिचा भ्रमनिराश झाला. त्यानंतर ती ज्योतीच्याही घरी गेली व कळलं की ज्योतीचाही विवाह झालेला असून ती त्या शहरात राहात नाही व ती नोकरी करीत असते. मग काय, ते माहीत होताच तिनं त्यांचा नाद सोडला व ती सुखकारक जीवन जगू लागली होती.
काही दिवस असेच निघून गेले होते. सुरेखानं नोकरी सोडली होती. ती कायम स्थिरावली होती शहराच्या भुमीत. ज्या भुमीत तिचं बालपण गेलं होतं. तसाच तिचा जन्मही झाला होता. संकटं येत होती. परंतु ती तेवढी मोठी नव्हती. तिच्या बालपणात जी संकटं होती. तिचा आता लवलेशही नव्हताच. शिवाय ती खुश होती. त्याचं कारण होतं तिचा पती. ती त्रस्त होती, आपल्या विवाहापर्यंत बालपणापासून. कधी पेन्सिल मिळायची तिला तर कधी पेन. कधी स्कर्ट तर कधी फ्रॉक. कारण वडीलाला सरकारी नोकरी असूनही त्यांच्या मदिराप्राशनच्या नादात सारा पैसा जात होता आणि तिचं संपूर्ण आयुष्यही जात होतं. परंतु आता पतीचा आधार होता. पती हा मदिराप्राशन करणारा नसल्यानं.
सुरेखाला आठवत होता तिच्या भविष्याचा काळ. ज्या काळात तिला रंगारंग खायला मिळत नव्हतं. ज्या काळात तिला शिकता आलं नव्हतं. ज्या काळात तिच्या आईला कामावर जावं असं वाटत होतं. परंतु इच्छा असूनही तिची आई कामावर जावं शकत नव्हती. कारण ती एका सरकारी कर्मचाऱ्याची पत्नी होती नव्हे तर समजायची. त्यामुळंच तिला बाहेरची कामं करायला लाज वाटायची. तसं त्या काळात पत्नीनं बाहेर कामाला निघणं म्हणजे वाईट प्रथाच समजली जायची. त्यामुळंच सुरेखाच्या आईनं सगळं सहन केलं. परंतु ती कामावर गेली नाही.
सुरेखा कामावर जात नव्हती. तिचा पती दररोज नित्यनेमाने कामावर जायचा. ती मात्र घरीच राहायची. सर्व मुलं शिक्षणाची झाली होती. ती शाळेत जात होती. आता पुन्हा पुर्वीसारखंच कंटाळवाणं वाटायला लागलं होतं. त्यात तिला घरची आठवण यायची. तेव्हा ती गाडीनं घरी जायची. परंतु विरंगुळा तरी ती कितीसा करणार! तिला कंटाळवाणं जीवन जगावं लागत होतं. अशातच तिला आठवत होता कधीकधी तिचा भूतकाळ. त्या भूतकाळात आठवत होतं ते महाविद्यालयातील जीवन. परंतु दहावीचा काळ तिच्या आयुष्यातून कोरडा पाषाणागत झाला होता. ते ठसे पुसले गेले होते कोरड्या पाषाणागत. त्या आयुष्याच्या कोरड्या पाषाणावर कोणत्याही प्रकारच्या आठवणीच्या हिरवळीच्या छटा नव्हत्याच. त्या आठवणी कोरड्याच्या कोरड्याच झाल्या होत्या.
आज सुरेखा एकटीच होती घरी. तशी ती दररोजच घरी एकटीच असायची. परंतु दररोज तिला गतकाळ आठवायचा नाही. कधी गतकाळ आठवलाच तर आठवायचं ते महाविद्यालयीन जीवन. ज्या जीवनात तिचा विवाह शिकत असतांनाच तिच्या मायबापानं अकालीच लावून दिला होता व तिच्या शिकण्यावर बंधन आणलं होतं. परंतु तसं जरी बंधन आलं असलं तरी तिनं आपल्या पतीला म्हटलं की मला शिकायचंय. मग बस तिच्या पतीनं तो चांगला असल्यानं तिला तथास्तू म्हटलं व ज्योतीरावाच्या सावित्रीबाई सारखं तिच्याही शिक्षणाची दारं उघडली.
सुरेखा जास्त शिकली होती. परंतु ती काही नोकरी करण्याच्या फंदात पडली नाही. ती घरीच होती. अशातच तो एक दिवस उजळला व ती एकटीच घरी होती. सर्व मुलं शाळेत गेली होती. ती आता मोठी झाली होती. त्यांना आता न्यायला आणायला जावं लागत नव्हतं. ती स्वतःच येत जात होती. तसा तिला आठवत होता तो बालपणातील काळ. ते दहावीचं मित्र मंडळ. ज्या मित्रमंडळात काही अभागी मुलंही होते.
गुरु व चारु.......त्या बालपणीच्या मित्रमंडळात गुरु नावाचे दोन मुलं होते. गुरु हुशार होता अभ्यासात. तर चारु तेवढा नव्हता.
गुरु आणि चारु आठवत होता सुरेखाला. त्यांचा व्यवहार आठवत होता तिला. त्याचबरोबर आठवत होतं ते सारं मित्रमंडळ आणि ते गुरु आणि चारुचं असलेलं एकतर्फी प्रेम. बिचारे वेडे झाले होते की काय? ते दोघंही कुणावरही नजर टाकत असावेत असंच वाटत होतं तिला.
सातवीपर्यंतचा काळ. सातवीपर्यंत गुरु तिच्या वर्गात होता. त्यावेळेस ती ज्योतीच्या घरी जायची. तिथं सर्व मित्रमंडळ गोळा होत होतं. तिथं खेळत होतं मित्रमंडळ. ज्यात गुरुही असायचा. परंतु तेव्हा संदर्भ वेगळेच होते. प्रेम, माया या गोष्टी आठवायच्या नाहीत तिला. त्यावेळेस चारु नव्हताच. परंतु जशी ती आठवीत गेली. त्यावेळेस चारु नावाचा एक मुलगा शाळेत प्रवेशला. तो दिसायला देखणा होता. शिवाय पैशानंही चांगला. त्याचे वडीलही सरकारी नोकरीच करायचे. शिवाय ते पीत नसल्यानं त्यांच्याकडे पैसे भरपूरच असायचे. मात्र गुरु हा एका शेतकऱ्यांचा मुलगा होता. त्याचेकडे तेवढे पैसे नसायचे.
गुरु आठवीत गेला होता. तो सातवीपर्यंत मुलींशी बोलत होता. परंतु जसा तो आठवीत गेला. तसे सारे संदर्भ बदलले. गुरुला आता प्रेम, माया या सर्व गोष्टी कळायला लागल्या होत्या. शिवाय बालपणातील प्रेम आणि तरुणपणातील प्रेम यात बरंच अंतर होतं.
ज्योती व सुरेखा या जीवलग मैत्रीणी. त्यांच्यासोबत सातवीपर्यंत गुरु बोलत होता. परंतु जसा गुरु आठवीत आला. तेव्हा तो थोडासा तरुण झाला होता व तरुणपणातील प्रेम आणि माया त्याला कळायला लागल्या होत्या. तसं त्याला आता त्याच्या वडीलांच्या तोंडचे वाक्य आठवायला लागले होते की मी तुला शहरातील शाळेत टाकतो. परंतु त्या वातावरणात आम्ही सोबत नाही. चांगलं राहायचं. वाकडं पाऊल टाकायचं नाही आणि वडील भाटव्यानं म्हटलं होतं की मुलींवर प्रेम करायचं नाही. मुलींवर प्रेम केल्यानं जीवन बरबाद होतं. पहिलं आपलं करीयर पाहायचं. मगच प्रेम करायचं. जर तुला नोकरी लागली ना. तर शेकडो मुली तुझ्या मागं लागतील. परंतु तू का जर वाकडं पाऊल टाकलं तं याद राख. मी तुझी पावलंच तोडून तुझ्या हातात देईल आणि जेथून तुला शिकायला शहरात आणलं. तिथंच पाठवून देईल.
ते संस्कार. ते वडीलांचं म्हणणं. त्यातच वडील भाटव्याचंही म्हणणं. ते आता तो तरुण झाल्यानं त्याला आठवत होतं. त्यामुळंच त्यानं आठवीत आल्यावर विचार केला होता की कालपर्यंत ठीक होतं मुलींशी बोलणं आणि त्यांचे डबे खाणं. आता आपण तरुण होत आहोत. आता काही डबे खाणं बरोबर नाही. त्यातच मुलींचे डबे खाणंही. त्यानं आठवीत येताच मुलींशी बोलणं बंद केलं होतं व तो मुलींशी बोलत नव्हता. मात्र याउलट चारुचं होतं. तो मुलींशी बोलायचा. त्यांना चॉकलेट वा खाऊ चारायचा. त्यावरच काही मुली भाळल्या होत्या. प्रेमाचे संदर्भ म्हणून नाही तर खाऊ खाण्यासाठी. ज्यात सुरेखा आणि ज्योतीचाही त्यात समावेश होता. परंतु त्या गोष्टी काही चारुला कळत नव्हत्या.
ज्योती आणि सुरेखाचा स्वभाव प्रेमळच नाही तर फ्री होता. त्या कुणाशीही मनात आढेवेढे न ठेवता बोलत असत. त्यामुळंच त्यांच्याकडं पाहून वाटायचं की त्यांचं कुणावर प्रेम नक्कीच असावं. परंतु तसं काही नव्हतं.
गुरु आज बोलत नव्हता ज्योती आणि सुरेखाशी. कारण त्याला प्रेम व माया तसेच बालपणातील प्रेम आणि तरुणपणातील प्रेम याचा अर्थ कळला होता म्हणून. तेच हेरलं त्या दोन्ही मैत्रीणींनी. त्यांना गुरुचा स्वभाव माहीत होता. गुरुच्या घरची परिस्थितीही त्यांना माहीत होती. त्याची परिस्थिती काहीशी त्यांच्याच घरच्या परिस्थितीशी मिळती जुळतीच होती. शिवाय गुरुचा स्वभाव त्यांना माहीत असल्यानं गुरुवर त्या प्रेम करीत नसल्या तरी गुरु आवडत होता त्यांना. कारण त्यांनी पाहिलं होतं की सातवीपर्यंत त्यांनी ज्याही गोष्टी शेअर केल्या होत्या, त्याच्यासोबत. त्या गोष्टीवर गुरुनं त्यांना समजावून सांगून चांगलेच सल्ले दिले होते. समजावून सांगीतल्या होत्या त्या गोष्टी. विवाहापुर्वीचं प्रेम हे सगळं थोतांड असतं हे त्याच काळात गुरुनं सांगीतलं होतं त्यांना त्या इवल्याशा वयात आणि आता तो गुरुमंत्र देवून तो स्वतःच इयत्ता आठवीत जाताच दूर गेला होता. अशातच तो त्यांच्याशी बोलत नसल्यानं एक दिवस तो नववीत असतांना सुरेखा आणि ज्योती त्याचेजवळ आल्या. त्यातील सुरेखा म्हणाली,
"गुरु, तू जसा सातवीपर्यंत आमच्याशी बोलत होता. तसा आता का बोलत नाहीस?"
ते सुरेखाचे शब्द. ते त्याच्या ह्रृदयाला टोचून गेलेत. तसा तो म्हणाला,
"अं, सहजच."
"सहज म्हणजे?"
"मला आता बोलावंसं वाटत नाही मुलींशी. आता आपण थोडे मोठे झालोत."
"मोठे वैगेरे काही नाही. तू बोलत जा आमच्याशी."
सुरेखा जशी बोलली. तशी ज्योतीही तशीच त्याचेशी बोलून गेली. तसं पाहिल्यास चारु हा आठवीत शाळेत आला असला तरी त्यानं चांगलाच जम बसवला होता. तो सर्वांना खाऊ चारत असल्यानं तो सर्वांचा लाडका बनला होता. त्याचेशी सर्व मुली बोलत होत्या. परंतु गुरु आता कुणाशी बोलत नसल्यानं त्याच्याशी आता कोणीच मुली बोलत नव्हत्या. शिवाय गुरुच्या न बोलण्याशी एक तात्कालिक कारणही घडलं होतं. ते म्हणजे मुलांचं त्याला समजावणं. तो सातवीत असतांना त्याचे विचार मुलींना पटत होते. म्हणूनच मुली बोलत होत्या त्याचेशी हे पाहून काही मुलं त्याची वाढती बोलाचाली पाहून म्हणायचे की एवढा मुलींशी बोलू नकोस. एवढं बोलणं बरोबर नाही. ते तुझ्यासारख्याला शोभत नाही.
ते त्याला काही मुलांचं सांगणं. ते प्रतिष्ठेला शोभत नाही म्हणणं. हे त्याकाळात काही समजत नव्हतं गुरुला. ते का तसे बोलत असावेत. तेही कळलं नाही. त्यातच तो तसं न बोलण्यानं त्यालाच फायदा झाला. तो अभ्यास करु लागला. प्रेमाच्या चक्करमध्ये पडलाच नाही व तो पुढील काळात अर्थपुर्ण जीवनाचा साक्षीदार ठरला होता.

************************************************

गुरु आणि चारु हे दोन मित्र. ते सुरेखा आणि ज्योतीच्या शाळेत शिकत होते. शिवाय ते त्या शाळेत शिकत असतांना गुरु बोलत नव्हता मुलींशी. खास करुन सुरेखा व ज्योतीशी. ज्योती आणि सुरेखाची परिस्धिती दयनीय. तशी गुरुचीही. मग गुरु सातवीपर्यंत जसा बोलत होता आपल्याशी तसाच आताही बोलायला हवा. म्हणूनच त्यांनी प्रयत्न चालवले होते व एक दिवस त्याच्याजवळ येवून सुरेखा बोलून मोकळी झाली होती. त्या दिवसापासून सुरेखाशी व ज्योतीशीच नव्हे तर तमाम मुलीशी तो बोलायला लागला होता.
गुरु आता मुलींशी बोलायला लागला होता. तसा तो एक दिवस उजळला. त्या दिवशी शाळेची सहल गेली होती. तसा गुरु बोलत होताच मुलींशी. परंतु आताही तो मोकळ्या मनानं बोलत नव्हता. कमी बोलत होता. तसा तो सहलचा दिवस. त्या दिवशी गुरुही सहलीला गेला होता. तसं सगळ्या सहलीत सर्वांनी छान मजा केली व आता बस माघारी फिरली होती. तोच एका तालुक्याच्या ठिकाणी बस थांबली व बसच्या बाहेर केळेवाला केळी विकायला आला. तशी ज्योती व सुरेखा त्याचेजवळ आली. म्हणाली,
"गुरु, केळी चार ना केळी."
गुरुला त्यांनी म्हटलेले शब्द. तसा गुरु गरीबच होता त्यावेळेस. त्यांना वाटत होतं की गुरु काही केळी घेणार नाही. परंतु ते मुलींचं बोलणं. मुलीच त्या. त्यांची गुरुला दया नाही येणार तर कोणाला? शेवटी गुरुनं म्हटलं,
"घ्या केळी."
ते गुरुचं बोलणं. त्यावर ज्योती म्हणाली,
"आम्हाला एक डझन नाही पाहिजेत. तीन डझन केळी हवीत."
"तीनही डझन केळी घ्या."
"मग पैसे कोण देणार?"
"मी देतोय ना सर्व पैसे." गुरु म्हणाला. तसे त्यानं सर्व तीन डझन केळीचे पैसे दिले. त्यानंतर मुलींनी गुरुला केळी खायला दिलीत. त्यावर गुरुनं एक केळ घेतलं व तो म्हणाला,
"मला केळी आवडत नाहीत. तुम्ही खा. मी तुमच्यासाठीच घेतली केळी."
त्यावर सुरेखा म्हणाली,
"जर तू खाणार नसेल केळी तर आम्ही का बरं खावी?"
"तसं नाही गं. मला केळी अजिबातच आवडत नाहीत. तू आधी ही अर्धी केळी घे. बाकीची आम्ही खातोय."
"नगं मला."
"हे बघ, तू खाणार नसेल तर ही संपूर्ण केळी घेवून जा आपल्या घरी." सुरेखा म्हणाली.
सुरेखा म्हणाली. तसा गुरुला विचार आला. काय करावं? ही एवढी केळी घरी नेवून काय करावं. तसा तो म्हणाला,
"मी यातील दोन केळी आणखी घेतो. बाकीची तुम्ही खा."
"आम्ही एवढी कशी खाऊ?"
"मग घरी न्या."
गुरुचं ते शेवटचं उत्तर. त्यानंतर त्या दोन्ही मुलींनी अर्धी अर्धी केळी आपापल्या घरी नेली. ते पाहात त्याला अगदी हायसं वाटत होतं.
गुरुला आठवत होता तो दहावीचा वर्ग की ज्या वर्गातील तो शेवटचा दिवस होता. निरोप समारंभ पुरता पार पडला होता व आता तो निघणार होता आपल्या घरी. सर्व विद्यार्थी निघून गेले होते त्या शाळेतील. फक्त सुरेखा थांबली होती. ती गुरुची वाट पाहात होती. काय कारण होतं ते गुरुलाही माहीत नव्हतं. तसं चारुनं सांगीतलं की सुरेखा थांबली आहे तुझ्यासाठी. तिला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी."
चारु तसा मुलींना भडकविणारा मुलगा होता. त्याला काय वाटत होतं कुणास ठाऊक. परंतु त्याचा प्रत्यय गुरुला बरेचदा आला होता. आता मात्र गुरु घाबरला होता सुरेखाला. ती काय बोलणार याचा त्याला विचार होता. हिंमत होत नव्हती तिच्याशी बोलायची. परंतु हिंमत करुन तो तिच्याशी बोलायला गेला. कारण त्यावेळेपुर्वी सुरेखाशी एका व्यवहारीक प्रकरणावरुन भांडण झालं होतं.
तो शेवटचा दिवस. त्या दिवशी सुरेखा आणि ज्योती उभ्या होत्या. ज्योती सुरेखाची वाट पाहात होती. तसा वाट पाहात असलेल्या सुरेखाजवळ भीतभीतच गुरु गेला आणि भीतभीतच म्हणाला,
"बोल सुरेखा, काय झालं? कशी काय थांबली? काय बोलायचंय तुला?"
"सहज गुरु. मला यासाठी थांबावं लागलं की......."
ती बोलत होती. परंतु तिला बोलणं अडखळत होतं. बोलणं होत नव्हतं. तसं तिनं डोळ्यातून पाणी काढलं आणि म्हणाली,
"गुरु, मला माफ कर. मी फार त्रास दिला तुला. खरं तर मी तुला त्रास द्यायला नको होतं."
सुरेखानं म्हटलेले ते शब्द. तिनं ते शब्द का म्हटले हे गुरुला कळेना. त्यामुळंच त्याला ती तशी बोलताच काही कळेनासं झालं होतं. परंतु मनोमन तो विचार करु लागला. म्हणाला,
"सुरेखा, तुझं काहीही चुकलेलं नाही आणि आता माफीही मागण्याची गरज नाही."
ते त्याचं शेवटचं बोलणं. तशी ती निघून गेली पाठीमागं पाहात. आज ती बऱ्याच वर्षानंतर भेटली होती. गुरुला. जुन्या आठवणी एकेक डोळ्यासमोरुन तरळत होत्या. ती संसारात खुश होती. तिला काहीच आठवत नव्हतं. परंतु त्याला सर्व आठवत होतं. कुणी त्याला प्रेम म्हणत होतं. परंतु ते प्रेम नव्हतं तर तो एक प्रकारचा जिव्हाळा होता. ते तरुण तरुणीचं प्रेम नव्हतं तर ते आपलं समजून घेणाऱ्या माणसाचा कनवाळूपणा होता. ते मित्रत्वाचं नातं....... आज तेच मित्रत्वाचं नातं आठवत होतं त्याला. तो चारुही आठवत होता. ती सुरेखाही आणि त्यासोबतच आठवत होती ती ज्योतीही.
गतकाळ मागे गेला होता बराच लांब. त्याला परत कधीच आणता येत नव्हते. त्यातच आता आयुष्याच्या वळणावर गुरु आणि ज्योती व सुरेखाची भेट झाली होती. त्याचबरोबर भेटले होते ते सर्व मित्र. आताही त्यांच्यात पाहिजे त्या प्रमाणात तोच जिव्हाळा होता. ते तरुणपणाचं प्रेम नव्हतं. गुरु फार आनंदीत झाला होता आज. आज तो आपल्या जुन्या मैत्रीणीशी बोलत होता. कारण त्याला विशेष जिव्हाळा होता त्यांच्यात. ज्याप्रमाणे एखादी अधरवेल एखाद्या आंब्याच्या झाडाला लटकते. तसं नातं त्यांच्यात आजही निर्माण झालं होतं. ते नातं घट्ट होतं. परंतु आज त्याचे बंध सैल झाले होते. कारण त्या दोघींचेही विवाह झाले होते व त्यांना पतीही चांगले मिळाले होते. ते त्यांचेवर अतिशय प्रेम करीत होते नव्हे तर जीव ओवाळून टाकत होते. तरीही आनंद झाला असल्यानं गुरु बोलत होता त्यांचेशी. त्यावेळेस ती गोष्ट एका मित्राला माहीत झाली व तो म्हणाला,
"प्रिय गुरु, तू समाजसेवक आहेस, शिक्षक आहेस, मुख्याध्यापकचा पण प्रभार बघितला आहे तू. तूझं काम, लिखाण हे कौतुकास्पद आहे, यात शंका नाही. परंतु नुकत्याच भेटलेल्या मैत्रीणीशी इतके वेळ संभाषण करणे हे तुझ्यासारखा व्यक्तीला शोभून दिसत नाही. यामुळे हेच दिसत आहे की तुझ्याकडे खूप फावला वेळ आहे. मित्रा, आपली प्रतिष्ठा आपण जपलीच पाहिजे, त्यासोबतच आपण त्यांच्याशी हितगुज करीत असताना आपल्या शब्दांचा वापर हा आपल्या प्रतिष्ठेनुरूप करायला हवा. आपल्या शाळेतील अनेक मित्र मैत्रिणी भेटतील यापुढे आणि आज बऱ्याच वर्षानंतर भेटल्या, नक्कीच बोलायला हवं. परंतु सतत चिल्लर गोष्टीमुळे भेटण्याचा उद्देश दिसून येत नाही. निव्वळ टुकार गोष्टीमुळे होवू शकते की आपण आज भेटलेलो आहोत, ते उद्या सोडून जातील. मग ते कधीच भेटायला येणार नाहीत. तेव्हा आशा आहे की मी जो काही मुद्दा मांडलेला आहे, तो तुला समजला असेल.
यामध्ये कुणाच्याही भावना दुखवायचा माझा उद्देश नाही."
तो मित्र बोलून गेला. तसा दुसऱ्या मित्रानं ते ऐकलं व म्हटलं,
"मी तुझ्याविषयी बोलतोय. पोरी बद्दल नाही. आतातरी सुधर. तुझ्या डोक्यात वाईट विचार आणि तुझी नजर वाईट आहे."
ते मित्रांचं बोलणं. त्यानंतर गुरु काय समजायचं ते समजला व त्यानं म्हटलं की मी भान ठेवील याचे. त्यानंतर त्यानं त्या मुलींशी बोलणं बंद केलं होतं.
गुरु विचार करीत होता त्याच्या चुकण्यावर. काय चुकलं होतं ते कळेना. तो काळ ठीक होता की त्या काळात याच मुलांनी गुरुला मुलींशी बोलण्यास मनाई केली होती. त्याचा फायदाच झाला होता त्याला. त्या मुलींशी न बोलण्यानं त्याचं जीवन सुधारलं होतं. परंतु आज? आज का बरं त्या मित्रांनी मुलींशी बोलणं बंद करायला लावलं होतं, ते त्याला कळेना. त्या बोलण्यावर तो बराच विचार करीत होता. तसा बराच विचार त्यानं केला. कारण कळत नव्हतं. शेवटी विचारांती त्याला समजलं. ते कारण होतं त्यांचा विवाह. आज त्यांचा विवाह झाला होता. पती होता त्यांना आणि मुलंही. त्या संसारात खुश होत्या आणि तेवढ्याच आनंदीही. त्यामुळंच त्या मित्रांना वाटत होतं की त्या मुलींचा संसार तुटू नये. कदाचीत गुरुच्या जास्त बोलण्यानं त्या मुलींचे पती नाराज होतील. त्यांची मुलंही नाराज होतील व ते आपल्या बालमैत्रीणींना त्रास देतील.
ते मित्र. ते मित्र असे होते की त्यांनी त्या बालवयातील काळात त्याला मुलींशी बोलण्यापासून अडवून त्याला जाग्यावर बसवलं होतं. हे सर्व त्या काळात घडलं होतं आणि आता त्याच मित्रांनी गुरुला मुलींशी बोलण्यापासून अडवून मुलींचा संसार वाचवला होता. कारण त्या मित्रांना ही देखील शंका होती की एखाद्याचा पती संशयी राहू शकतो.
मित्रांचं ते विचार करणं बरोबर होतं. कारण आजच्या काळात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती होत्या. लोकं वेगवेगळ्या विचाराचे होते व ते लोकं आपल्या मनात वेगवेगळ्या शंका ठेवू शकतात याची स्पष्ट आणि पुरेशी जाणीव असणारे ते मित्र आज गुरुला कौतूकास्पद वाटत होते. त्याच मित्रांनी गतकाळात गुरुला सावध केलं होतं. त्यामुळंच आज तो घडला होता आणि आजही तेच मित्र गुरुला सावध करीत होते आणि त्यालाच नाही तर त्या मैत्रिणींच्या संसाराला तुटण्यापासून वाचवीत होते.

************************************************


ज्योती........ज्योतीचा विवाह झाला होता. तिलाही सुरेखासारखाच चांगला पती मिळाला होता. सुरेखाचा पती तिच्यावर प्रेम करीत होता. तिला विवाहापुर्वी प्रेम मिळालं नव्हतं. आज तिला तसं प्रेम मिळालं होतं.
पुजा सरकारी नोकरीवर होती. तिच्यावर जबाबदारी होती घरची. तिची बेताची परिस्थिती. त्यानंतर तिनं त्या परिस्थितीवर मात करुन घरची परिस्थिती सावरली होती. त्यातच तिला वाटत होतं की आपण विवाह केल्यास आपला तर विवाह होईल. परंतु आपला विवाह झाल्यानंतर आपल्या बहिणीचा विवाह आपल्याला करता येणार नाही. कारण आपला विवाह झाल्यावर आपल्याला आपल्या पतीच्या मर्जीनंच चालावं लागेल.
ज्योती महाराणीच वाटायची आता एखाद्या राजवाड्यातील. जर ती महाराणी सारखा वेष परीधान करायची तर कधी ती एखाद्या लहानशा दहावीतील मुलींसारखी वाटायची. तिचं बोलणंही तसंच बदललेलं असायचं. ज्यावेळेस ती एखाद्या महाराणीसारखा वेष धारण करायची. तेव्हा तिचं वागणं, तिचं बोलणं एखाद्या महाराणीला लाजवेल असंच असायचं. तशीच ती जेव्हा एखाद्या वेळेस स्कर्ट वा शालेय वस्त्र परिधान करायची. तेव्हा ती एखाद्या शाळेतीलच मुलीसारखी वाटायची. तेव्हाही तिचं वागणं आणि बोलणं देखील बदललेलंच असायचं.
ज्योतीला वेगवेगळे वस्र परिधान करण्याची सवय होती. त्यात तिला आनंदच वाटत होता. तसाच वातावरणीय बदल जेव्हा जेव्हा होत असे. तेव्हा तेव्हा तिचे कपडे घालण्याची सवय बदलत असे. ती कधीकधी तर हॉट वस्रही परिधान करीत असे व हॉट वस्रातही ती अगदी शोभून दिसत असे.
ज्योतीला केवळ महाराणीय संस्कृतीच आवडत नव्हती तर तिला विलासी जीवन व तसंच जगणंही आवडत होतं. त्यातच तिच्या वागण्यावर तिच्या पतीचाही आक्षेप नव्हताच.
ज्योती वाढली होती एका कंटाळवाण्या वातावरणात की जिथं मायेचा ओलावा जरी असला तरी एक प्रकारचं संतापाचं वातावरण होतं. ती जरी लहानपणापासून एका चैन वातावरणात जगली असली तरी तिचा विलासीपणा तिला जास्त काळ भोगता आला नाही. परिस्थितीनं अशा वळणावर आणलं होतं तिला की ज्या वळणावर केवळ काटेच काटे होते. ते काटे बोचत होते तिला. एवढे बोचत होते की जीवन जगणं असह्य वाटत होतं. ती असहायता सहन करीत करीत ती बारावी झाली होती. बहिण तिला शिकवीत होतीच.
ज्योतीला आवडत होतं महाराणीसारखं वागणं. एकदा तिनं महाराणीसारखा वेष धारण केला होता व बसली होती घरच्या सोप्यावर. तो सोपाही महाराजा सोफाच होता. मग तिनं आपल्याच मैत्रीणींना म्हटलं,
"काढा गं माझा फोटो?"
मैत्रीणींनी तिचा फोटो काढला. त्यानंतर ती सुखावली व तिला आनंद वाटला.
ज्योतीचे वाईट दिवस जात होते. अशातच तिच्यासाठी मुलीही बघणं सुरु होतं. ती तरुण झाली होती. त्यामुळं मुलं शोधणं आलंच.
ज्योतीवर तिच्या बहिणीचा मित्र असलेला माधव नावाचा एक मुलगा प्रेम करीत होता. ज्योतीची बहिण पुजा जिथं सराव करायची. त्याच मैदानात तोही पोलिसांच्या प्रशिक्षणाचा सराव करायचा. तो तिला सतत पत्र लिहित असे व आपलं प्रेम व्यक्त करीत असे. तशी ज्योतीही त्याला पत्र लिहित असे व तिही आपलं प्रेम व्यक्त करीत असे. तो निरतिशय प्रेम करायचा तिच्यावर. तसा तो प्रेमात अतिशय वेडाच झाला होता. इतका वेडा झाला होता की त्यानं एकदा तर तिला रक्तानंच चिठ्ठी लिहिली होती.
तो तिला म्हणत असे की तिनं त्याचेशी विवाह करावा. परंतु ती त्याला होकार देणार कशी? ती म्हणत असे की आपण विवाह कसा करावा? पुजाताई आहे. ती काय म्हणेल. त्यावर तो म्हणत असे. पुजाला जावू दे. आपण पळून जावू.
पळून जावून विवाह करणे. ज्योतीच्या ते रक्तातही नव्हतं. तसा पळून जाणे हा शब्द माधवनं वापरताच तिच्याही तळपायाची आग मस्तकातच गेली होती. तरीही त्यावर नियंत्रण ठेवत तिनं त्याला म्हटलं,
"मी पुजाताईला विचारल्याशिवाय आपला विवाह करु शकत नाही. तिला विचारावं लागेल आणि तुला जर वाटत असेल की या ज्योतीनं तुझ्याशी विवाह करायला हवा तर तू तिला विचार त्याबद्दल."
ते ज्योतीचे शब्द. ते शब्द त्यानं ऐकले. तसा त्यानं काही प्रतिसाद तिला दर्शवला नाही. मात्र तिला आठवत होती तिची पुजाताई. ज्या पुजाताईनं तिला सावरलं होतं. तिनं केवळ ज्योतीलाच सावरलं नव्हतं तर सर्व कुटूंबांना सावरलं होतं तिनं. तिचे ते वडील मरण पावताच ती वडीलाची जागा तिनं घेतली होती. ती जबाबदारी पेलून तिनंच पुरुषांसारखीच पुरुषांना लाजवेल अशीच कामगीरी केली होती. तिचेच उपकार होते की ती शिकली होती संगणक आणि ब्युटीपार्लरचा अभ्यासक्रम. जो अभ्यासक्रम पुढील जीवनात तिच्या कामात येणार होता. पुजाताई तिच्यासाठी सर्वश्रेष्ठ होती. त्यामुळंच ती पुजाताईला विचारल्याशिवाय विवाहाचा निर्णयही घेवू शकणार नव्हती.
ते दिवसच वाईट होते ज्योतीसाठी. अतिशय वाईट दिवस जात होते ज्योतीचे आणि त्याला छेद देत देत ती आपलं जीवन उभारत चालली होती. ते रक्ताचं पत्र आज कालबाह्य झालं होतं. पुजाताईला आपल्या विवाहाबद्दल विचारणा कर असं माधवला ज्योतीने म्हणताच माधवची हिंमत झाली नाही व तो माघारी फिरला.
संकटांनी पुजाचा आणि ज्योतीचा पिच्छा सोडलाच नव्हता. ती संकटं वारंवार येतच होती. तसं एक संकट आलंच आणि तेही संकट एवढं तीव्र होतं की ते अवकाळी पावसासारखंच वाटत होतं. तो एकदाचा प्रसंग तिला आठवत होता. तो तिच्या महाविद्यालयीन जीवनातील प्रसंग नव्हता. कारण महाविद्यालयीन काळ नुकताच पुर्ण झाला होता. ती आता संगणकाचा जाब करीत होती.
तिचं महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झालं होतं. काही खाजगी शिकवण्या लावल्या होत्या. ज्यात ब्युटीपार्लर व संगणकाचं प्रशिक्षण ती देत होती. अशातच ती एक घटना घडली. तिची आई कोमात गेली होती. मग काय, पुन्हा एक फार मोठा गंभीर प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिची आई तब्बल पाच सहा महिने तरी कोमात राहिली होती. काही दिवसांनी ती दैवयोगानं शुद्धीवर आली. परंतु अशा परिस्थितीत त्या दरम्यानचा काळ कसरतीतच गेला.
सारेच संकटं. एक एक घटना घडत होती आणि एका एका घटनेला तोंड देणं सुरु होतं. ती वैतागली होती अशा सतत समोर येत असलेल्या संकटांना. मग सवयच पाडली तिनं. ठरवलं की आता कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटांना घाबरायचं नाही. संकटं तर येणारचं. ते आपलं प्रारब्धच. त्याचा बाऊ करायचा नाही. हिंमतीनं सामोरं जायचं. त्यानंतर एक तरुण आला तिच्या जीवनात व पुजाच्या पहिलंच ज्योतीचा विवाह थाटामाटात पार पडला.
काळ सपाट्यानं सरकत होता. अशातच विवाहानंतर तिचं जीवन थोडंसं सुधारलं. तिला पती चांगला मिळाला. परंतु तिनं ठरवलं. आपण सतत माहेरी संकटांचा सामनाच केला. आता जगायचं. संकट येतही असतील, तरी त्या संकटांना घाबरुन जायचं नाही. जे काही होते, ते चांगल्या साठीच होते. असंही ठरवलं ज्योतीनं मनात. मग निर्णय घेतला की आता काहीही का असेना. काल आपल्याला आपल्या माहेरी फार त्रास झाला. आर्थिक अडचण फार जाणवली. कारण खाणारी तोंड जास्त होती आणि कमविणारे हात कमी. आता आपण हे कमविणारे हात वाढवायचे. खाणारी तोंड कमी करायची. शिवाय ऐषआरामाचं जीवन व्यथीत करायचं.
ज्योतीचा तो विचार. अशातच ती गरोदर होती. घरात आनंदीआनंद होता. गरोदर असतांना तिचे फारच लाड पुरवले जात होते. मुलगाच होईल असं वाटायला लागलं होतं. सारेच नातेवाईक मुलगाच होईल, अशा प्रकारचं भाकीत करीत होते. अशातच सातवा महिना उजळला.
सातवा महिना उजळला व तिचा सातवा महिना साजरा केला. तसं तिला औक्षण घातलं व त्यानंतर तिच्यासमोर एका ताटात काही प्लेटा आणण्यात आल्या. त्या झाकून होत्या. मग तिला सांगण्यात आलं की तिनं त्यातील एखादी प्लेट उचलावी.
ज्योतीनं प्लेट उचलली. त्याखाली एक कचोरी होती. त्या कटोरीत एक पेढा होता. तो पेढा निघताच काही नातलग म्हणाले,
"हिला मुलगाच होणार."
ज्योतीला मुलगाच होणार. सर्वांना आनंद झाला. घरी पतीलाही आनंद झाला. त्याचबरोबर आनंद झाला तिला. कारण तिलाही मुलगाच हवा होता. तो पेढा तिच्या पतीनं काहीसा तिला भरवला. काहीसा आपण खाल्ला आणि सातवा महिना साजरा झाला. काही जणांनी तिला मुलगा होईल असं मीच म्हटलं होतं याची पुष्टीही केली.
आज नववा महिना लागला होता. अशातच तो दिलवरीचा काळ आला व तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आणि दिलेवरी झाली. ज्योतीनं एका सालस कन्येला जन्म दिला होता. मुलगी गोंडस होती. सुंदरही होती.
पेढा........मुलगी होताच काहींना तिचा सातवा महिना आठवला. तिनं पेढा उचलला होता व पेढा उचलताच भाकीतही करण्यात आलं होतं की तिला मुलगी नाही तर मुलगाच होणार आहे. अन् आता मुलगी? हे कसं काय घडलं? सारी निसर्गाचीच करणी. विधात्याची लीला. आता मुलगी काय आणि मुलगा काय? पुढं पाहू. दुसऱ्या बाळाला जन्माला घालू. मुलगा होईल.
ते दिलेवरीचे दिवस. ते दिवस पुरते निघून गेले होते. काही दिवस असेच निघून गेले व पती पत्नीत चर्चा झाली. पतीचं बोलणं. आपण दुसरं अपत्य ठेवायचं. पहिलं अपत्य मुलगी झाली. आता मुलगा हवाय. मग काय तसा विचार मनात करताच ज्योतीनं विवाहानंतर निर्णय घेतला होताच की तिला आर्थिक परिस्थितीचा फार त्रास झाला होता. आता आपण ऐषआरामात जगायचं. तसं पतीनं तिला दुसरा मुलगा हवाय म्हणताच ती म्हणाली,
"मला आता नकोय मुलगा आणि मुलगी. मला माझी बाळी एकटीच हवी."
तिचा तो विचार. तसा तिचा पती सुंदरच विचारांचा होता. त्यानं तिच्या निर्णयावर जबरदस्ती केली नाही. तसं तिला झालेल्या त्या मुलीला तिनं आज लहानाचं मोठं केलं होतं. आज तिची ती मुलगी तरुण झाली होती. परंतु आज तिला तिचा निर्णय फसलेला वाटत होता. कारण तिची मुलगी आज मोठी जरी झाली असली तरी ती एकलकोंडी बनली होती व तिला कोणीच भाऊ वा बहिण नसल्यानं ज्या पुजानं तिला मदत केली होती आई आंधळी झाल्यावर. तसं आपल्याला काही झाल्यास आपली बाळी काय करेल? कोण तिला आधार देईल? याचाच ती विचार करीत होती. यासाठी ती पश्चाताप करीत होती.
तिच्या जीवनात दुःख होतं. ते दुःख असलं तरी स्वतःला ती दुःखी समजत नव्हती. तिला एकच मुलगी असल्याचंही दुःख नव्हतंच तिला. ना तिनं कधी नियतीलाही दोष दिला होता. ते दुःख तर तिनं आपल्या अंतर्मनात गाडून टाकलं होतं. हे असंच चालायचंच. संसारच आहे तो. असे ती समजत असे. तशी ती कोणालाही आनंदीत असल्याचं सांगत असे. तसंच ती आपल्याला एकच मुलगी हवी होती असंही सांगत असे. तसा काळ सरकलाच होता व अशा बदलत्या काळात तिची भेट तिचाच बालमित्र असलेल्या गुरुशी झाली. जो तिचा बालपणीचा मित्र होता. त्यानं तिचं अंतर्मन ओळखलं होतं. ती सुखी असली तरी गुरुला ती दुःखीच वाटत होती. कारण ती त्याचेशी सतत संवाद करीत असे. त्याला कधीकधी आपल्या लहानपणापासून आपल्यासोबत घडलेल्या घटना सांगत असे आणि आता आपल्याला त्या संकटांची सवय झाली आहे असंही ती सांगत असे आणि आपणच एकमात्र नियतीचे शिकारी नाही तर असे बरेच जण आहेत, असंही कधीकधी ती म्हणत असे.
ते तिचं बोलणं. तिचं बोलणं नियतीला दोष देणारं नव्हतं. तिला वाटत होतं की आपलेच काही कर्म असतील की आपल्याला हे भोग भोगावे लागले.
ते तिचं बोलणं. ते जरी नियतीला दोष देणारं नसलं तरी ते तिला पश्चाताप करणारंच असावं असंही गुरुला वाटू लागलं होतं. तसा तो तिला एक दिवस म्हणाला,
"बघ, असं सांगून चालत नाही. ती वास्तविकता आहे आणि ती वास्तविकता आपण टाळू शकत नाही. याबाबतीत आपल्याच शाळेतील एका मित्राचं उदाहरण देतो की ज्याची नियतीनं क्रूर थट्टा केली."
गुरु तिच्यासोबतच शिकला होता. त्याला त्या शाळेतील प्रसंग आठवत होते. त्यातीलच तो एक किस्सा होता.
"कोणाचं उदाहरण? कोणता असा मुलगा होता आपल्या शाळेत की ज्याची नियतीनं क्रूर थट्टा केली."
"ऐक तर. मी त्याचं नावही सांगतो आणि तुला कळेलही ते."
असं म्हणत तो तिला सांगू लागला त्या वर्गमित्राची कहाणी. ज्या कथेला वास्तवाची जोड होती.
किर्ती....... गुरुच्या वर्गात असलेली एक मुलगी. तिचा पती शाळेतीलच एक वर्गमित्र होता. दोघांचंही प्रेम होतं बालपणापासूनच. तो पती दिसायला सुंदर होता.
किर्तीही पुजासारखीच मैदानावर धावपटूचे खेळ खेळायची. तिचीही इच्छा होती की तिनं मोठी धावपटू बनावं. परंतु ते स्वप्न तिचं पुर्ण झालं नाही. शिवाय ते स्वप्न सोडून तिनं पुढील काळात आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं व ती शिकत गेली. ती बहुतेक अठरावीपर्यंत शिकली होती.
सागर तिचा पती. तो फक्त बारावीच शिकला होता. त्यानंतर तो कामाला लागला होता. तो पुढं शिकू शकला नाही. कारण त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. मन लागलं देखील नाही. परंतु त्यानं किर्तीचा पिच्छा सोडला नव्हता.
किर्तीवर सागरचं अतिशय प्रेम होतं. तो बारावी जरी शिकला असला तरी त्यानं किर्तीचा पिच्छा सोडला नव्हता. अशातच किर्ती व त्याचा विवाह थाटामाटात पार पडला. तो आंतरजातीय विवाह होता.
आंतरजातीय विवाह.......तो तिनं का केला? त्यामागील कारण होतं तिला वडील नसणं. तिचे वडील ती दुसरी तिसरीत असतांनाच मरण पावली होती. आईही फारशी कामाला निघाली नव्हती. तेही चार भाऊबहिणच होते. अशातच वडीलाचं छत्र हरवलं व ते संपुर्ण कुटूंब देशोधडीला लागलं. अशातच सागरचा प्रवेश झाला.
सागर ती शाळेत असतांनाच तिच्या घरी यायचा. हालचाल विचारायचा. कधी तिला तर कधी तिच्या आईला मदत करायचा. तसे त्याचे वडीलही नोकरीवर होतेच. त्यांना बक्कळ पैसा होताच. तो कधी कधी किर्तीला पैशाचीही मदत करीत असे.
किर्तीचीही एक मोठी बहिण होती. तिनं आजही विवाह केलेला नव्हता. तिनं आपलं शिक्षणही केलं नाही. ती मोठी असल्यानं वयात येताच तिनं घरची जबाबदारी सांभाळली. बहिणीला मदत केली. तिला शिकवलं. लहानाचं मोठं केलं. त्याचबरोबर तिनं आपल्या भावांनाही शिकवलं. त्यांनाही लहानाचं मोठं केलं. त्यांचेही विवाह करुन दिले. अशातच सागरनं हिंमत करुन किर्तीच्या बहिणीला म्हणजेच उर्मीलेला किर्तीशी विवाह करण्याची मागणी घातली.
ती त्याची विवाहाची मागणी. ती त्याची हिंमत. ती हिंमत पाहताच उर्मीलेनं आपल्या बहिणीच्या जीवनाचा विचार केला. तसं तिला आठवलं. तिचं शिक्षण. किर्ती उच्च शिकली होती आणि सागर? सागर काही शिकला नव्हता. तो फक्त बारावीच होता. एक घर होतं आणि तेही घर त्याच्या वडीलांचंच होतं. शिवाय त्याची अशी फारशी मिळकत नव्हतीच. मग काय, विचार आला. विचार आला उर्मीलेला की आपल्या बहिणीचा विवाह सागरशी करायचा कसा? तो तर शिकलेला नाही. तसा दुसरा विचार आला.
उर्मीला विचारच करीत होती दोघातील शिक्षणाचा की तिच्या मनात दुसरा विचार आला. सागर तिला लहानपणापासून मदत करायचा. मदत करीत आला होता. त्यानं हेही पाहिलं नव्हतं की किर्ती त्याला मिळेल की नाही. तो फक्त आपलं कर्म करीत होता. फळाची अपेक्षा करीत नव्हताच तो. अशातच उर्मीलेनं किर्तीला बोलावलं. तशी किर्ती आली व तिला उर्मीलेनं म्हटलं,
"मला तुझ्या विवाहाबद्दल होकार द्यायचा आहे. सागरनं तुझ्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. तुला सागर पसंत आहे काय?"
किर्तीनं उर्मीलेचे ते शब्द ऐकले. तशी ती ओशाळली. तिला थोडीशी लाज वाटली. तिला काय उत्तर द्यावं तेच कळेना. तशी ती खाली मान घालूनच बसली होती. मौन बाळगून होती. काही वेळ शांतता होती. स्मशान शांतता. ती स्तब्धता भंग करीत उर्मीला पुन्हा म्हणाली,
"अगं किर्ती, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही."
उर्मीलेचं ते बोलणं. ते बोलणं पुर्ण होताच ती म्हणाली,
"ताई, तू जेही काही करशील. ते मला मान्य असेल. जर तू म्हणशील की सागरशी विवाह कर. तर मी सागरशीही विवाह करेल व तू नकार देशील तर मी सागरलाही नकार देईल. तू ज्याचेशी माझा विवाह लावून देशील. त्याचेशी मी विवाह करेल."
किर्ती आपलं अंतर्मन व्यक्त करीत होती आपल्या मोठ्या बहिणीजवळ, उर्मीलेजवळ. तसं मधातच ते बोलणं तोडत उर्मीला म्हणाली,
"अगं किर्ती, मी जर म्हटलं विहिलीत उडी मार तर मारशील काय? हा तुझ्या विवाहाचा प्रश्न आहे. तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. तू शिकलेली आहेस. तुझं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि सागर शिकलेला नाही. तो फक्त बारावीच आहे आणि आता बारावीला अंगुठाछापच म्हटलं तरी चालेल. एवढं सगळं असतांना मी तुला डोहात तरी कशी ढकलू? म्हणूनच मी तुझं मत मागीतलं तर तुही मला काही सांगू शकत नाहीस."
ते उर्मीलेचं बोलणं. त्यावर पुन्हा किर्ती चूपच बसली. तोच उर्मीला परत म्हणाली,
"किर्ती, मी तुझा विवाह सागरशीच लावून दिला तर तुला कसं वाटेल. आता सांग की तू खुश आहेस का?"
ते उर्मीलेचं बोलणं. तसं तिचं बोलणं होताच किर्तीचे डोळे पानावले व ती आपल्याच मोठ्या बहिणीजवळ ढसाढसा रडायला लागली. त्याचं कारणही तसंच होतं. ते कारण म्हणजे उर्मीलेनं वडीलांची भुमिका पार पाडली होती.
किर्तीला रडतांना पाहून उर्मीलेनं तिचं डोकं आपल्या दोन्ही हातात घेतलं. ते आपल्या छातीला लावलं व तिच्या पाठीवरून ती हात फिरवू लागली व म्हणू लागली,
"किर्ती, मी तरी काय करु? कुठून आणू तुझ्यासाठी विवाहयोग्य वर शोधून. अगं, आपले बाबा गेलेत. तेव्हापासून नियतीनं आपल्याकडं पाठच फिरवली. कोणताच नातेवाईक आपल्याकडं फिरकत नाही. ना कोणी शब्दानंही विचारत नाही. कसे आहोत. कसे नाही. याचं कोणालाच सुतोवाच नाही. काय करु मी. अगं, तू सागरशीच विवाह कर. सागर एक चांगला मुलगा आहे. तो आपल्याला अगदी लहानपणापासूनच मदत करीत आला आहे. तुला खरंच सुखी ठेवेल तोच. तू सुखी राहशील त्याच्या घरी. विश्वास ठेव. मी काही असा व्यर्थ निर्णय घेणार नाहीच."
उर्मीलेचं ते बोलणं. त्यावर किर्तीनं विश्वास ठेवला. तसं पाहता तिचं प्रेम होतंच सागरवर. मग काय? सागरशी तिचा ती एवढी शिकलेली असतांनाही उर्मीलेनं तिचा विवाह पार पाडला. तिनं प्रसंगी आपला विवाह केला नाही.
आज किर्ती सुखी होती. ती आपल्या बहिणीला अंतर देत नव्हती. तिच्या बहिणीनंही आगामी काळात सर्वच भावाबहिणीचे विवाह केले होते. परंतु स्वतःचा विचारही केला नव्हता विवाहासाठी. आपली इच्छा.......आपलं अंतर्मन कशीतरी दाबून उर्मीला जगत होती रामायणातील त्याच उर्मीलेसारखी. जी लक्ष्मणाची पत्नी होती. ती होती म्हणूनच रामाला रावणावर विजय मिळवता आला होता व आज ही कलियुगातील उर्मीला होती म्हणूनच किर्ती आणि सागरचा विवाह पार पडला होता. तोही थाटामाटात. तसाच तोही चौदा वर्षानंतर. जणू त्यांना त्यांच्या प्रेमाला जाहीर करायला चौदा वर्षच लागले होते.
सागर आणि किर्तीचा विवाह थाटामाटात पार पडला होता. परंतु विवाहानंतरही किर्ती खुश नव्हती. कितीतरी वर्षापासून तर त्यांना भाग्याचं पुत्ररत्नच दिलं नव्हतं. अन् शेवटी एक मुलगी झाली, तिही दिव्यांगणाच. ती दिव्यांगणा नव्हतीच. कारण चांगली खेळायची. नृत्य करायची. पाहुण्यांचा आदर सत्कार करायची. कोणाला चुकीनं जरी तिचा पाय लागला तर नतमस्तक व्हायची. स्वारी म्हणायची. परंतु थोडी गतीमंद होती.
तिचं नाव सोनू होतं व सोनू नृत्य अतिशय सुंदर करीत होती. शिवाय ती कला काही तिला कोणं शिकवली नव्हती. तरीही तिला नृत्य अस्खलीतपणानं जमत होतं. तसंच तिच्या वडीलांनाही पेंटींग. ते कधीकधी बाहेरगावी देवांच्या मुर्त्या रंगवायला जात असत.
सोनू जेव्हा लहान होती. तेव्हा तर ती तीन वर्षपर्यंत चालूच शकली नाही आणि चार वर्ष बोलूही शकली नव्हती.
सोनू एकुलती एक मुलगी होती सागर आणि किर्तीची. ती देव देव करता झाली होती. त्यासाठी तब्बल चार वर्ष वाटही पाहावी लागली होती. शिवाय ती झाल्यावर ती दिव्यांग निघाली. थोडासा त्यांना पश्चाताप झाला. परंतु त्यांनी निर्णय घेतला. आपण तिच्यासाठीच जगावं. तिला अपार सुख द्यावं. तिला प्रेमाची कमतरता पडू देवू नये. जर आपण दुसरं अपत्य होवू दिलं तर आपलं प्रेम विभागल्या जाईल व आपण तिला प्रेम देवू शकणार नाही.
त्यांचा तो निर्णय. तसा तो निर्णय रास्त होता. त्यांनी असा निर्णय घेतला होता की जो निर्णय त्या मुलीला तिच्या अखेरपर्यंतच्या काळापर्यंत सुखच देणार होता. तो भविष्यातील निर्णय होता. जे भविष्य अंधारलेलं असलं तरी त्या भविष्यात असीम उज्वलता भरलेली होती. ज्या भविष्यानं ह्रृदयातील अंधारलेल्या ग्रहांना निश्चितच प्रकाश मिळणार होता व त्या प्रकाशानं ते तारे तेजोमय होणार होते.
अंधारलेलं सोनूचं आयुष्य. ते आयुष्य जरी अंधारलेलं असलं तरी त्या आयुष्याला प्रकाशाची झालर होती. ती झालर प्रतिबंधित झाली होती. तो प्रकाश अंधार देणारा नव्हता तर उजेडच देणारा होता. असं वाटत नव्हतं की काय हे आयुष्य. या आयुष्यात काही आनंदच नाही.
आनंद जरी नसला त्यांच्या आयुष्यात, तरी ते आयुष्य अनमोल होतं. ते आयुष्य अनमोल बनलं होतं. जेव्हा कळलं होतं त्याही आयुष्यात. जेव्हा सोनू दिव्यांगणाच नाही तर नृत्यांगणा बनली होती. ती चांगलं नृत्य करीत होती नव्हे तर आज त्यांच्या मायबापाला तिचा अभिमान वाटत होता. शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे ती मोठमोठ्या कार्यक्रमात विशेष प्रावीण्य पटकावीत होती. त्यामुळंच ती दिव्यांग असली तरी तिच्या दिव्यांग पणाचे काहीच दुःख नव्हते तिच्या परीवारात. ना किर्तीच्या परीवाराला दुःख होतं.
आजचा दिवस किर्ती आणि सागरसाठी महत्वाचा दिवस होता. आज सोनूला नृत्यात मानाचा पुरस्कार मिळाला होता. त्यात तिच्या आईवडीलांचाही सत्कार केल्या गेला होता. तसाच सत्कार केला जात असतांना सागरला आठवला तो त्याचा भुतकाळ. ज्या काळात त्याचा विवाह झाला होता व त्याच्या विवाहाला जवळपास एकच वर्ष झाला होता. त्याला अपेंडीक्सचं फोड झालं होतं व ते फोड पोटातच फुटलं होतं. वेदना तीव्र होत होत्या. अशातच त्यानं आपली पत्नी असलेल्या किर्तीला फोन केला. ती विवाह झाल्यापासून नोकरी करीत होती.
सागरचा आलेला तो फोन. तो फोन येताच किर्ती लगबगीनं घरी आली. तिनं त्याला लगबगीनंच भर्ती केलं. त्याला खर्च लागत असल्यानं तिनं त्याला सरकारी रुग्णालयात भरती केलं. परंतु ते सरकारी रुग्णालय. तिथं डॉक्टर त्याचेवर उपचार करायला तयार नव्हते. ते दिरंगाई करीत होते. शिवाय ते दिरंगाई करीत असतांना किर्तीनं पाहिलं. तशी ती त्या रुग्णालयातील डॉक्टरवर ओरडली. मग डॉक्टर धावून आला व वेळीच ऑपरेशन करुन त्यांनी त्याचा प्राण वाचवला. शिवाय त्यात महत्वाची भुमिका केली, ती त्याची पत्नी असलेल्या किर्तीनं. त्यानंतरही त्याचं ऑपरेशन झाल्यावर त्याच्या शरीराला धाग्याचे टाके सहन होत नसल्यानं त्याचं बिनटाक्याचं ऑपरेशन झालं व त्या दरम्यान ते टाके सुकवीत असतांना किर्तीनं त्याची अतिशय काळजी घेतली होती की ती वाखाणण्याजोगीच होती. किर्ती कधीही न कंटाळता त्याची रोज बँडेजपट्टी करीत असे. त्यामुळंच तो वाचला होता आणि आज तो दिसत होता जीवंत. तो जीवंत होता किर्तीच्याच कृपेनं. ती जर नसती तर तोही आज जीवंत नसता आणि त्यातच सोनूचाही जन्म झाला नसता. ना सोनू असती ना आज तिला पुरस्कार मिळाला असता. आज त्याला पुरस्काराबाबत अभिमान वाटत होता. तेवढाच अभिमान त्याला सोनू आणि किर्तीबद्दलही वाटत होता.
आज किर्ती आधार ठरली होती सागरची. दोघांची मन एकवटली होती. तशीच ती गुंफली होती एकमेकात. त्यांना ना सोनूच्या दिव्यांगपणाचं दुःख वाटत होतं. ना त्यांना स्वतःला दुसरं मूल नाही याचं दुःख होत होतं. ते आपल्या मुलीसाठी खपत होते दिवसरात्र नव्हे तर ते तिला प्रेमच देत असत.
ज्योतीचंही अगदी तसंच होतं. तिही आज खुश होती आपल्या आयुष्यात. दोघांचीही जीवनगाथा मिळतीजुळतीच होती. ज्योतीचा आधार तिचा पती बनला होता. तो तेवढ्याच ताकदीनं तिला आनंदी ठेवत होता नव्हे तर मार्गदर्शनही करीत होता. त्या दोघींमध्ये मिळतेजुळतेपणाच होता. ज्योतीचे वडील ती बारावीत असतांना गेले तर किर्तीचे वडील ती दुसरीत असतांनाच गेले. ज्योतीलाही एकच मुलगी होती आणि किर्तीलाही एकच मुलगी होती. तसंच दोघींचंही पालनपोषण त्यांच्या मोठ्याच बहिणीने केलं होतं. दोघीही स्वतःला दुःखी समजतच नव्हत्या. ना त्या दोघीही नियतीला दोष देत होत्या. तेच आठवत होतं आज गुरुला. तशी त्याला आपली जीवनगाथा आठवली. ती त्यानं किर्तीला शेअर केली होती. त्याचीही जीवनगाथा मिळतीजुळतीच होती त्यांचेशी. त्यालाही त्याच्याच मोठ्या बहिणीनं लहानाचं मोठं केलं होतं. तो मात्र स्वतः स्वतःला दुःखी समजत होता. तसाच तो नियतीला दोष देत होता. तो नियती मानत होता. परंतु अंधश्रद्धेपासून तो कोसो दूरच होता. तो विज्ञानवादी दृष्टिकोनातून जगायचा. विज्ञानवाद त्यानं स्विकारला होता व त्याचा त्याला फायदाही झाला होता. त्यालाही एकच मुलगी होती की जिला एकेकाळी कमी ऐकू येत होतं. परंतु त्यानं विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारुन एका डॉक्टरकरवी उपचार केला. आज त्याच्या मुलीला चांगलं ऐकायला येत होतं व आज ती ठणठणीत बरी झाली होती. त्यामुळंच तो कोणतेही आजार हे आनुवंशिक असतात. यावर विश्वासच ठेवत नव्हता.
दिव्यांग असणं हा काही गुन्हा नाही. तसाच दिव्यांग दोष असणं हे काही पाप नाही. तसेच दिव्यांग असणं हा काही गुन्हाही नाही. तरीही बरीचशी मंडळी कोणी दिव्यांग असेल तर त्याची हेळसांड करीत असतात, असे पाहण्यात आले आहे. परंतु तशी हेळसांड करण्याऐवजी त्यांनाही आधार द्यायला हवा की जेणेकरुन त्यांनाही आत्मबळ मिळेल व तेही आपल्या स्वतःचा विकास करु शकतील. जो विकास देशहिताला तारक ठरु शकेल.
दिव्यांगपणा......... हा अलिकडील काळातील शापच समजला जातोय. कारण जो व्यक्ती आजच्या काळात दिव्यांग दिसला की त्याच्याकडं लोकांची पाहण्याची दृष्टी ही बरोबर राहात नाही. मनात किंतु परंतु सारखे शब्द उपस्थीत होत असतात.
दिव्यांगपणा हा अलिकडील काळात अवयवात येणारा विद्रुपपणा. जर कोणी पाहायला विद्रूप असेल. ज्यांच्या शरीराची ठेवण व्यवस्थीत नसेल वा ज्याला कमी ऐकायला येत असेल, ज्याला प्रमाणापेक्षा कमी दिसत असेल, ज्याला बुद्ध्यांक कमी असेल, ज्याला बरोबर चालता येत नसेल, अशांना दिव्यांग समजलं जातं.
काही लोकं म्हणतात की मागील जन्मात ज्यानं पाप केलं, त्याला दिव्यांग मूल जन्मास येतं वा या जन्मात ज्यानं पाप केलं, त्यास दिव्यांग मूल जन्मात येतं. परंतु तसं काही नसतं. त्यामुळंच उचलली जीभ आणि लावली टाळूला असं कोणीही करु नये.
दिव्यांग व्यक्तीचा जन्म कसा होतो वा दिव्यांग मुलं का जन्माला येत असतील? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. त्याची बरीच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आनुवंशिकता. जर आधीच्या पिढीतील एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर पुढच्या पिढीतील व्यक्ती दिव्यांग नक्कीच जन्मास येवू शकतो. दुसरं कारण आहे, जर गर्भधारणेच्या वेळेस गर्भ नको असे वाटून गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्या तर त्याचाही परिणाम गर्भावर होवून जन्मास येणारं मुल हे दिव्यांग बनू शकतो. तिसरं कारण म्हणजे सतत गर्भ राहूच नये म्हणून घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्या वा रसायने बाळ गर्भात असतांना त्यावर परिणाम करुन जातात. चवथं कारण म्हणजे गर्भ ज्यावेळेस गर्भपिशवीत समावतो. तेव्हा जास्त उत्तेजक पेय पिणे, मादक, नशा येणारे पेय पिणे, पदार्थ खाणे. या गोष्टीही दिव्यांग मुलाच्या जन्मास कारणीभूत ठरतात. पाचवं कारण आहे कुपोषण. जर गर्भार मातेला गर्भधारण केलेला असतांना चांगलं सात्वीक अन्न खायला मिळालं नाही तरही दिव्यांग व्यक्ती जन्मास येत असतो. शिवाय गर्भार व्यक्ती गर्भ पोटात असतांना आजारी पडणे, गर्भार व्यक्तीने अति प्रमाणात एखादी वस्तू खाणे, झोप येत नसल्याने झोपेच्या गोळ्या घेणे, एखाद्या वेळेस गर्भाला प्राणवायूचा पुरवठा न होणे, रक्तात आयोडीनची योग्य मात्रा नसणे, गर्भाची एक्सरे चाचणी वारंवार करणे, गर्भ असतांना स्रिया पडल्याच तर त्यांना मार लागत असतांना गर्भालाही मार लागणे, वजनदार वस्तू उचलल्यास त्याचा गर्भावर परिणाम होणे, वेळेआधी प्रसुती होणे, परिसरातील मोठा आवाज ऐकणे, नात्यातील व्यक्तीसोबत विवाह होणे, वाढलेल्या वयात विवाह होणे, प्रदुषण असणे इत्यादी बरीच कारणं दिव्यांग व्यक्तीच्या जन्मासाठी आवश्यक आहेत.
दिव्यांग व्यक्ती जन्मास येण्याचं महत्वपुर्ण कारण म्हणजे गर्भ लवकर न थांबणे. याला जबाबदार असतात गर्भनिरोधक गोळ्या वा आपलं खानपान. आपलं खानपान जर व्यवस्थीत असेल, आपण गर्भ निरोधक गोळ्या घेत नसेल तर गर्भ व्यवस्थीत टिकत असतो. तो गर्भपिशवीत लवकर थांबतही असतो. परंतु जर आपले खानपान व्यवस्थीत गर्भाक्षयास अनुकूल नसेल वा आपण गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असतील तर गर्भपिशवी आंकृचन पावते. ज्यातून गर्भ लवकर थांबत नाही. तसाच कदाचीत थांबलाच तर दिव्यांग मुलं जन्मास येवू शकतात. म्हणूनच आपलं खानपान व्यवस्थीत असावं. गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर टाळावा किंवा मुल जन्मास घालण्यापुर्वी त्याचा वापरच न केलेला बरा.
दिव्यांग व्यक्ती सुधारु शकतात काय? कोणालाही असा पडलेला प्रश्न. याचंही उत्तर नाही असंही येईल आणि हो असंही येईल. त्याचं कारण आहे त्या दिव्यांग व्यक्तीची टक्केवारी. जर तो दिव्यांग टक्केवारीच्या कमी टक्केवारीत बसत असेल, तर तो पुर्णपणे बरा होवू शकतो. त्यावर औषधीशास्रात औषधी उपलब्ध असतात. साधारणतः कर्णबधीर असलेली, वाचादोष असलेली, दृष्टीदोष असलेली, गतीमंद असलेली, मतीमंद असलेली दिव्यांग मुलं औषधानंही बरी होवू शकतात. त्यामुळंच घाबरण्याचं कारण नाहीच. मग कोणी कितीही भीती दाखवत असला तरी. कारण दिव्यांग व्यक्तीबद्दल बरेच समज गैरसमज समाजात रुढ आहेत. शिवाय जरी अनुवंशशास्रानुसार आनुवंशिकता हे जरी दिव्यांग व्यक्ती जन्माचं एकमेव कारण असलं तरी आताच्या पाश्चात्य काळात ते कारण होवू शकत नाही. कारण अलिकडील काळात वातावरणाचा अभ्यास केल्यास वा लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केल्यास दिव्यांग व्यक्ती जन्माला जबाबदार असलेले आनुवंशिकता वा इतर काही कारणं. ही कारणं केव्हाच कालबाह्य झालेले आहे. आता नवी कारणं पुढे आलेली आहेत. ती कारणं आहे आपलं खाणपान. आज आपलं खाणपान बरोबर नाही. चीनसारख्या इतरही प्रगत देशात कोणते कोणते प्राणी खातात यावर बंधन नाही. साप, गोम, पाली इत्यादी. अलिकडील काळात तर विवाह सोहळ्यात लोकांना स्वादिष्ट वाटावं म्हणून केमीकल टाकली जातात. मुलं वा मुली बर्गर, पिज्जा आवडीने खातात. न्युडल्स, मंचुरियन हेही पदार्थ आवडीने खाल्ले जातात. शिवाय चिकन फॉक्स सारखे पदार्थही खाल्ले जातात. असे पदार्थ बनवितांना जे केमीकल वापरले जाते. ते केमीकल शरीराला व्याधीकारक असते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर ते पदार्थ गर्भाला हानीच पोहोचवत असतात. ज्यातून दिव्यांग जीवही जन्मास येवू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. मोठमोठ्या रेस्टॉरेंटमध्ये खाल्ले जाणारे मांस हे काही ताजं नसतं. ते फ्रीजमध्ये केमीकल लावूनच टिकवलं जातं व जशी त्या डिशची आर्डर मिळाली. तसं ते बाहेर काढलं जातं. आपल्याला ते माहीत नसतं व आपण आवडीनं खातो. त्यानंतर ते रक्तात मिसळतं. रक्ताद्वारे गर्भातही जातं व गर्भाला नुकसान करीत असतं. ज्यातून दिव्यांग लोकांचा जन्म होवू शकतो. आता कोणी म्हणतील की गर्भ जेव्हा पोटात होता. तेव्हा तर आम्ही काहीच खाल्लं नाही. परंतु त्यापुर्वी तसे पदार्थ लहानपणापासूनच खाल्ले जातात व ते पदार्थ लहानपणापासूनच गर्भपिशवी बनत असतांना त्यावर परिणाम करुन जात असतात हे विसरता कामा नये.
महत्वाची गोष्ट ही की आपल्या घरी एखादा विकलांग व्यक्ती जन्माला येत असतांना आपल्याला दुःख होते. त्यानंतर आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो. कोणी त्याला आनुवांशिक भोग समजतात तर कोणी त्याला आपण केलेल्या कर्माची फळं समजतात. परंतु हे तेवढंच खरं जरी असलं तरी शंभर प्रतिशत ते खरं नाही. कारण त्याला जबाबदार असतं आपण घेतल्या गर्भनिरोधक गोळ्या व गर्भ राहण्यापुर्वीचा काळ. गर्भ जर पोटात गर्भधारणेच्या अनुकूल काळात म्हणजे वयाच्या अठरा ते पंचवीस दरम्यान राहात असेल तर बाळ सुदृढ राहीलच यात शंका नाही. कारण तेव्हा गर्भाच्या वाढीस अनुकूल वातावरण शरीरात असतं. ते वातावरण गर्भाला विकलांग होण्यापासून कदाचीत वाचवत असतं. एरवी विकलांग वा दिव्यांग न बनविण्याला पोषक असतं असंच म्हणता येईल. यात शंका नाही.
दिव्यांग मूल जन्मास येतं हा दोषच आहे. परंतु तो दोष टाळता येवू शकतो. आपण आपलं खानपान व्यवस्थीत केलं तर...... गर्भाक्षयाला न पटणारे पदार्थ आपण त्याज्र करायला हवेत. शिवाय अन्नात मांस वा पिज्जा बर्गर घेण्याऐवजी हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांचा समावेश केलेला बरा. तसाच मुलींचा विवाहही एकवीस ते पंचवीस या दरम्यानच करायला हवा. जेणेकरुन विकलांगतेला पोषक वातावरण निर्माण होवू शकणार नाही. हे तेवढंच खरं.
गुरुचा तो मित्र. त्याची मुलगी जरी दिव्यांग असली आणि त्याला जरी तिचा जन्म आनुवंशिक वाटत असला तरी तो तिचा जन्म त्याचं खानपान व उशिरा राहिलेला गर्भ. यातून झालेला होता. गर्भ न राहण्याचं कारण असेल गर्भनिरोधक गोळ्या. कारण त्यांचं बऱ्याच दिवसांपासून प्रेम होतं एकमेकांवर. त्यावेळेस कधीकाळी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर झालाच असेल ही शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय त्या गर्भनिरोधक गोळ्यांचं तत्व रक्तात मिसळलंच असेल आणि रक्ताद्वारे गर्भपिशवीत. ज्यातून पुढील काळात गर्भपिशवी आंकृचन पावली असेल व तशी संतती जन्मास आली असेल. शिवाय त्यांचा विवाह झाल्यानंतर दोन तीन वर्ष त्यांनी तंग वातावरणात घालवलीत. जेव्हा त्याला अपेंडीक्स झालं होतं. त्या काळात चिंताच होती. शिवाय अपेंडीक्स सुधारणा जेव्हा झाली, तेव्हा त्याच्या पत्नीचं वय गर्भधारण करण्याचं नव्हतंच. त्यामुळंच गर्भाला अनुकूल असणारं पोषक वातावरण किर्तीला मिळालं नसेल व त्याचा परिणाम म्हणून किर्तीला दिव्यांग मुलगी जन्मास आली असेल. ही शक्यता नाकारता येत नाही.
किर्ती व सागरला जरी दिव्यांग मुलगी जन्माला आली असली तरी सागर आणि किर्ती दुःखी नव्हतेच. ते खुशच होते. कारण त्यांची मुलगी नृत्यांगणा बनली होती. त्यामुळंच किर्तीची व सागरची ती अवस्था पाहणारा गुरु. त्याला आपली जीवनगाथा आठवली व तोही आपल्या जीवनगाथेचा एकेक पैलू आठवू लागला होता.