रात्रीच्या त्या सुंदर वातावरणात तो नवविवाहितांसाठी असलेला जहाज संथ गतीने पुढे पुढे जात होता...!
त्या जहाजावर चार जोडपी संगीताच्या तालावर आपल्या जोडीदारांसोबत मंद गतीने नाचत होती...!
काही वेळानंतर जो तो भूक लागली म्हणून खाली निघून गेले.... शिवाय अंकित आणि त्रिनेत्राच्या....!!
दोघ अजूनही एकमेकांच्या डोळ्यात हरवून एकमेकांसोबत डान्स करत होते....!
काही वेळानंतर त्रिनेत्राच्या पोटात भुकेमुळे दुखू लागले तशी ती अंकितला भानावर आणत म्हणाली,"अहो जरा ऐका ना.... मला खूप भूक लागली आहे...!!"
तसा तो भानावर येत तिला म्हणाला,"ओऽऽ सॉरी, नेत्रा... तुझ्यात एवढा हरवलो होतो की, भुक तहानच विसरून गेलो.... थांब आताच खाली कॉल करून जेवण इथेच मागून घेतो.... मला तुझ्यापासून एक क्षणभरही लांब राहायचे नाही....!!"
त्याचा तो रोमँटिक अंदाज बघून त्रिनेत्रा लाजून गुलाबी झाली.
अंकितने आपले दोघं खिसे शर्ट तपासले परंतु त्याला मोबाईल सापडला नाही.
तसा तो निराश होऊन नेत्राला म्हणाला,"नेत्रा आपल्या दोघांचे मोबाईल तर खालीच रूममध्ये आहेत... हे तर मी विसरूनच गेलो....!"
नेत्राला आता भुक सहन होत नव्हती म्हणून ती अंकितला म्हणाली,"अहो मग खाली जाऊन डिनरही सांगा आणि दोघांचे मोबाईलही सोबत घेऊन या....तोपर्यंत मी इथेच तुमची वाट बघते....!"तिचे हे वाक्य ऐकून अंकित तिला जवळ करत म्हणाला, "मला खाली जाऊशी तर नाही वाटत... पण, जाव तर लागणार आहे....नाहीतर खूप उशीर होईल...!" असं म्हणत तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत खाली निघून गेला.
त्रिनेत्रा जहाजाच्या काठाजवळ जात ती रात्रीची शांतता अनुभवत होती आणि मनातला मनात आजच्या पहिल्या रात्रीचा विचार करत होती.
अंकितने लग्नानंतर तिची खूप काळजी घेतली होती. तिच्या इच्छाशिवाय स्पर्श देखील तिला त्याने केला नव्हता.
लग्नाच्या महिनाभरानंतर तिने स्वतःहून अंकितला स्वीकारण्याची तयारी दाखवली. तसा अंकित आनंदीत झाला. तो तर तयारीतच होता. त्यानेच जहाजाची कल्पना तिला सांगितली.... तशी तिने लाजत त्याला संमती दर्शविली.
ते सगळं आठवून नेत्रा आताही गालात हसत लाजत होती. इतक्यात तिला तिच्या पाठीमागे कोणीतरी असल्याची चाहूल लागली आणि ती झटक्यात वळाली.
तिने समोर बघितले तशी तिला धडकीच भरली. तिच्यासमोर एक व्यक्ती पूर्ण काळ्या कपड्यात उभी होती.डोक्यावर त्या व्यक्तीने एक काळी हॅट घातली होती.
काही कळण्याच्या आत त्या व्यक्तीने त्रिनेत्राला धक्का दिला परंतु त्या व्यक्तीने तिला ती पडू नये म्हणून एक हात धरून ठेवला.
भीतीमुळे तर नेत्राची वाचाच गेली. तिला ओरडता देखील येत नव्हते. त्या व्यक्तीने डोक्यावरील टोपी काढली तशी नेत्रा स्तब्ध होत त्या व्यक्तीला बघू लागली.
ती व्यक्ती सावकाश तिच्याजवळ जात तिच्या कानात काहीतरी बोलते.... तशी नेत्रा स्वतःहून आपला हात त्या व्यक्तीच्या हातातून सोडवत स्वतःला समुद्रात झोकून देते.
खाली पडताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र कुठेतरी अडकून तुटून समुद्रात पडतो. त्यानंतर ती त्या वाहत्या समुद्रात पडते.
तिचे डोळे हळूहळू बंद होऊ लागले..... ती खोल खोल समुद्रात बुडू लागली.... तशी तिला जुन्या आठवणी आठववू लागल्य2.
त्रिनेत्रा अमरेंद्र सूर्यवंशीची एकुलती एक मुलगी.... कोमल मनाची, सडपातळ बांध्याची, गोऱ्या रंगाची, उंची पाच फूट आठ इंच, नाजूक बाहुलीसारखे डोळे, सरळ नाक, लांब मान, गुलाबी ओठ,भुरे केस जे नेहमी वाऱ्याच्या तालावर उडत राहायचे. ती दिसायला एखादी राजकुमारीच होती आणि आपल्या वडिलांची ती जीव की प्राण होती.
अमरेंद्ररावांनी तिला नेहमी फुलासारखे जपले होते. ती लहान असताना तिच्या आईचा म्हणजे जयाताईचा मृत्यू झाला होता.तिचा त्यांनी आईचे आणि वडिलांचे दोघांचेही प्रेम देऊन सांभाळ केला होता.
त्रिनेत्राच्या आईच्या मृत्यूनंतर तिचे वडील खूप अबोल झाले होते परंतु, फक्त तिच्यासाठीच ते परत जोमाने आयुष्य जगू लागले होते.त्यांनी खूप मेहनत करून आपली सूर्यवंशी नावाची कंपनी उभारली होती. बघता बघता ती कंपनी विस्तारत गेली. छोट्याशा त्रिनेत्राच्या सोबत अमरेंद्रराव आपले दुःख विसरू लागले होते. त्यांच्या ऑफिसात त्यांनी नेहमी विश्वासू आणि इमानदार लोकांना कामावर ठेवले होते.
अमरेंद्ररावांनी आपली मुलगी कमकुवत राहू नये म्हणून तिला त्यांनी प्रत्येक गोष्टी शिकवल्या. तिने ही त्या उत्तम प्रकारे आत्मसात केल्या.वर्षभरातील सगळ्या गतआठवणी आठवू लागल्या....!!