Geet Ramayana Varil Vivechan - 54 in Marathi Mythological Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | गीत रामायणा वरील विवेचन - 54 - डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

गीत रामायणा वरील विवेचन - 54 - डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे

रामराज्यात सगळे सुखाने जगत असतात. कोणाला कुठलेच दैन्य नसते अयोध्येत नंदनवन फुलले असते.

श्रीराम-सीता देवी,लक्ष्मण-उर्मिला,भरत-मांडवी, शत्रुघ्न-श्रुतकीर्ती सगळ्यांचे संसार आनंदाने सुरू असतात.


यथावकाश सीता देवी गरोदर होतात आणि त्यांना अद्भुत डोहाळे लागतात. एकदा शयनगृहात बसलेले असताना सीता देवींचा चेहरा फिकट आणि थकलेला दिसत असता श्रीराम म्हणतात,


"सीते तुला काही होतेय का? काही हवंय का? तुझी चर्या थकलेली वाटतेय"


त्यावर सीता देवी श्रीरामांना म्हणतात,


"हे रघूकुलतीलका शब्दात सांगण्यास मला संकोच वाटतोय. पण मला आजकाल उगीच वनात जावेसे वाटते. पाखरांसारखे मुक्त विहारावे,गावे बागडावे वाटतेय. कानात बासरी चा स्वर ऐकू येतो. असे वाटते वनातील एखादे पाडस कुशीत घ्यावे त्याचे विशाल निर्मल डोळे मला फार आवडतात. त्याच्यावर मला वात्सल्याचा वर्षाव करावासा वाटतोय. रेशमी वस्त्रांपेक्षा सुती वस्त्रे घालावीत, पाणी आणताना ती भिजावीत,एक घागर कटीवर एक माथ्यावर असे घेऊन पाणी आणावे असे मला वाटतेय.


कधी वाटते की जमीन खणून कंदमुळे काढावीत व सहजपणे सोलून ते अमृतासमान असलेले ताजे अन्न खावे. संध्याकाळी एखाद्या आम्र वृक्षाखाली बसावे. आम्रकुसुम ओंजळीत घ्यावे, सिंहगर्जना ऐकाव्यात.

कधी वाटते भाता पाठीला लावून मृगयेला जावे, जे जे श्वापद दिसतील त्यांना बाणाने मारत सुटावे.

कधी वाटते प्रभात काळी यज्ञ वेदीजवळ बसावे वेद अध्ययन करावे.",सीता देवी असे म्हणत असता श्रीराम हे जगा वेगळ्या डोहाळे बघून हसायला लागतात. त्यावर सीतादेवी त्यांना म्हणतात,


"माझें हे बोलणे तुम्हाला खुळ्या सारखे वाटत असतील म्हणून हसता आहात न! पण माझा हा हट्ट नसून हे डोहाळे आहेत. ते तरी पुरवाल न! मी हे अत्यंत मनापासून म्हणते आहे. स्वामी! अश्या वेळी आपल्याला विनोद कसा काय सुचू शकतो?"


(पुढचा भाग उद्या तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)


ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे चोपन्नावे गीत:-


ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे

डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे


मज उगा वाटतें वनीं विहारा जावें

पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें

कानांत बासरी वंशवनांतिल वाजे


वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें

मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे

चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें


वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं

घागरी कटिवर, करांत घ्यावी झारी

मस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें


वाटतें खणावें, कंदमुळें काढावीं

तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं

चाखून बघावें अमृतान्‍न तें ताजें


सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं

गळतील सुगंधित जधीं मंजिरी भालीं

करतील गर्जना दुरुन वनाचे राजे


घेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं

वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं

पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें


वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं

वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी

लालिमा मुखावर यावा पावकतेजें


कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा?

एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा

का विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे?

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे चोपन्नावे गीत:-


ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे

डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे


मज उगा वाटतें वनीं विहारा जावें

पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें

कानांत बासरी वंशवनांतिल वाजे


वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें

मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे

चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें


वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं

घागरी कटिवर, करांत घ्यावी झारी

मस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें


वाटतें खणावें, कंदमुळें काढावीं

तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं

चाखून बघावें अमृतान्‍न तें ताजें


सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं

गळतील सुगंधित जधीं मंजिरी भालीं

करतील गर्जना दुरुन वनाचे राजे


घेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं

वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं

पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें


वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं

वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी

लालिमा मुखावर यावा पावकतेजें


कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा?

एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा

का विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे?

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे चोपन्नावे गीत:-


ओठांत थांबुनी सशब्द आशा लाजे

डोहाळे पुरवा रघुकुलतिलका, माझे


मज उगा वाटतें वनीं विहारा जावें

पांखरांसारखे मुक्त स्वरांनीं गावें

कानांत बासरी वंशवनांतिल वाजे


वाटतें धरावें कुशींत पाडस भोळें

मज आवडती ते विशाल निर्मळ डोळे

चुंबीन त्यास मी, भरविन चारा चोजें


वल्कलें भिजावीं जळांत माझीं सारीं

घागरी कटिवर, करांत घ्यावी झारी

मस्तकीं असावें दुजा घटाचें ओझें


वाटतें खणावें, कंदमुळें काढावीं

तीं हलक्या हातें लीलेनें सोलावीं

चाखून बघावें अमृतान्‍न तें ताजें


सांजेस बसावें आम्रतरूच्या खालीं

गळतील सुगंधित जधीं मंजिरी भालीं

करतील गर्जना दुरुन वनाचे राजे


घेऊन धनुतें, बांधुन भाता पाठीं

वाटतें फिरावें वनांत मृगयेसाठीं

पाडीत फिरावें दिसेल श्वापद जें जें


वाटतें प्रभातीं बसुनी वेदीपाशीं

वेदांत करावा प्रकांड अध्वर्यूशी

लालिमा मुखावर यावा पावकतेजें


कां हंसतां ऐसें मला खुळीला देवा?

एवढा तरी हा हट्ट गडे पुरवावा

का विनोद ऐसा प्रिया, अवेळीं साजे?

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★