Geet Ramayana Varil Vivechan - 49 in Marathi Mythological Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | गीत रामायणा वरील विवेचन - 49 - भूवरी रावण वध झाला

Featured Books
  • પ્રેમસંયોગ - 2

    ધ્યાંશી કેબિનમાં પ્રવેશી ત્યારે કેબીનનું વાતાવરણ એકદમ શાંત હ...

  • ભાગવત રહસ્ય - 266

    ભાગવત રહસ્ય -૨૬૬   શંકરાચાર્યજીએ કહ્યું છે-કે- પરમાત્માનો સા...

  • સૂર્યાસ્તમાં સૂર્યોદય - ભાગ 9

    { મિત્રો આપણે આગળના ભાગમાં જોયું કે સતિષભાઈને હાર્ટ એટેક આવ્...

  • ગર્ભપાત - 3

    ગર્ભપાત - ૩  ઢીંગલી અચાનક સોફા પરથી ઊભી થઈ અને એક વિચિત્ર પ્...

  • લૉગઆઉટ

    લૉગઆઉટ- રાકેશ ઠક્કરબાબિલ ખાન પર ‘નેપો કિડ્સ’નો ટેગ લાગેલો હો...

Categories
Share

गीत रामायणा वरील विवेचन - 49 - भूवरी रावण वध झाला

राम निराश झालेले असतात ते विभीषणाला तसेच सारथी मातली ला रावणाला काही वरदान मिळालं आहे का हे विचारतात.
तेव्हा इंद्र सारथी मातली त्यांना अगस्ती ऋषींनी दिलेला बाण वापरायचा सल्ला देतो आणि विभीषण दूताकरवी रावणाच्या नाभीत अमृत कुपी असून त्याला नाभीत बाण मारल्यावरच त्याचा मृत्यू होईल असा निरोप देतो. ते ऐकून रामांच्या मनात आशा निर्माण होते. ते अगस्ती ऋषींनी दिलेला बाण रावणाच्या नाभीत मारतात आणि रावण धनुष्यासकट कोसळून धारातीर्थी पडतो.

रावण मेलेला पाहून राक्षस इकडे तिकडे पळू लागतात. वानर सेना त्यांच्यावर तुटून पडते. राक्षसांचा बिमोड होतो. वानर सेना विजयोत्सव साजरा करते. वरून आकाशातून देव,गंधर्व पुष्पवृष्टी करतात. सगळे मुनी ऋषी श्रीरामांना आणि वानर सेनेला भरभरून आशीर्वाद देतात. सगळ्या दिशा लखलखत्या सूर्याच्या प्रकाशात उजळून निघतात. पृथ्वी वरचा आतंक संपुष्टात आला असतो. सूर्याचा प्रकाश स्थिर झाला असतो अत्यंत भाग्याचा दिवस उजाडला असे सगळ्यांना वाटते.

समस्त वानर सेना श्रीरामांना फुल वाहून त्यांचे पूजन करते. सगळे सत्याचा विजय झाला असल्याने आनंदाने जयघोष करू लागतात. श्रीरामांच्या रूपाने शंख चक्र गदा धारण करणारा, सगळ्या विश्वाला निर्माण करणारा श्रीविष्णू मानवरूपात पृथ्वीवर अन्यायाविरुद्ध लढण्यास आला. धर्माला मानणारा,संतांना रक्षिणारा,दुर्वास ऋषींची लाथ आपल्या छातीवर झेलणारा (वत्स लांच्छन ) साक्षात श्रीविष्णू स्वतःसाठी नाही तर जगासाठी लढायला आला आहे. श्रीराम म्हणजे श्रीविष्णू आहे आणि सीता देवी म्हणजे साक्षात लक्ष्मी देवी आहेत हे त्यांना माहीत असूनही ते मानव रुपात असल्याने त्याबाबत अज्ञानी आहेत. असे सगळे देव व ऋषी गाऊ लागतात.

(पुढचा भाग उद्या तोपर्यंत जयश्रीराम🙏🚩)

महाकवी ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे एकोणपन्नासावे गीत:-

देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला

दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
रविप्रभेतें स्थिरता आली
पातली महद्भाग्यवेला

'साधु साधु' वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्‍नर
प्रमोद उसळे भूलोकावर
सुरांचा महारिपू मेला

रणीं जयांचे चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
श्रीरामांचे करिती पूजन
वाहुनी फुलें, पर्णमाला

'जय जय' बोला उच्चरवाने
कल्पतरूंचीं फेका सुमनें
फेका रत्‍नें, मणीभूषणें
जयश्री लाभे सत्याला

श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदोत्पादक त्रिभुवनजीवन
मानवी रामरूप ल्याला

हा उत्पत्ति-स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
आसरा हाच ब्रह्मगोलां

वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला

हा श्री विष्णू, कमला सीता
स्वयें जाणता असुन, नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

महाकवी ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे एकोणपन्नासावे गीत:-

देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला

दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
रविप्रभेतें स्थिरता आली
पातली महद्भाग्यवेला

'साधु साधु' वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्‍नर
प्रमोद उसळे भूलोकावर
सुरांचा महारिपू मेला

रणीं जयांचे चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
श्रीरामांचे करिती पूजन
वाहुनी फुलें, पर्णमाला

'जय जय' बोला उच्चरवाने
कल्पतरूंचीं फेका सुमनें
फेका रत्‍नें, मणीभूषणें
जयश्री लाभे सत्याला

श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदोत्पादक त्रिभुवनजीवन
मानवी रामरूप ल्याला

हा उत्पत्ति-स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
आसरा हाच ब्रह्मगोलां

वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला

हा श्री विष्णू, कमला सीता
स्वयें जाणता असुन, नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

महाकवी ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे एकोणपन्नासावे गीत:-

देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला

दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
रविप्रभेतें स्थिरता आली
पातली महद्भाग्यवेला

'साधु साधु' वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्‍नर
प्रमोद उसळे भूलोकावर
सुरांचा महारिपू मेला

रणीं जयांचे चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
श्रीरामांचे करिती पूजन
वाहुनी फुलें, पर्णमाला

'जय जय' बोला उच्चरवाने
कल्पतरूंचीं फेका सुमनें
फेका रत्‍नें, मणीभूषणें
जयश्री लाभे सत्याला

श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदोत्पादक त्रिभुवनजीवन
मानवी रामरूप ल्याला

हा उत्पत्ति-स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
आसरा हाच ब्रह्मगोलां

वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला

हा श्री विष्णू, कमला सीता
स्वयें जाणता असुन, नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★