The Smoker..... And Desires..... in Marathi Moral Stories by Vishal Pawar books and stories PDF | The Smoker..... And Desires.....

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

The Smoker..... And Desires.....

तुमच्या आयुष्यातील पहिल्यांदा धूम्रपान करण्याचा अनुभव कसा होता; काय कारण होते आणि याबद्दल तुमच्या काय

आठवणी आहेत?.. हो कसे वाटले..??

आणि हा प्रश्न विचारणे साहजिकच आहे.

कारण 87% लोकांनी वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची पहिली सिगारेट वापरून पाहिली होती आणि 95% लोकांनी वयाच्या 21 व्या वर्षी केली होती. आणि हे प्रमाण महाविद्यालयीन विद्यार्थी मध्ये 10 मधील 7 विद्यार्थी धूम्रपान रोज सेवन करतो. असे असले तरी देखील या विषयावर जास्त काही बोलण्यात येत नाही. कारण सिगारेटवरील एकूण कर 52.5 टक्के आहे. 2024, भारतातील सिगारेट बाजारातील महसूल INR US$13.4 अब्ज इतका आहे.

- Hindustan Times

बाजाराचं मोठ्या असल्याने सरकार देखील कर वाढवून या वर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करतोय असे बोले जाते. आता नियंत्रण करतोय की कर वाढवून जास्त महसूल आत करतोय. ते सरकारला च माहिती.

हे सर्व सांगण्या मागील हाच हेतू आहे की 18 ते 21 हे वय कॉलेज जाणारे मुलांची असते. हे व्यवन या वया पासून ते मृत्यूपर्यंत त्या व्यक्तीला सोडता येत नाही..

माझ्या मित्र जो धूम्रपान च्या आहारी गेले आहे मी त्याला विचारलं की कधी पासून हे चालू आहे... ??

तो: सिगारेट पहिली फुकली तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. अठरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे मी सिगारेट व दारूला पहिल्यांदा हात लावला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी व्यसनात वाढ झाली. नंतर दिवसाला एक दोन घेतो.

कारण विचारल्या स... धूम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. हे त्यांचे उत्तर होते. याचामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते. पुरुषा प्रमाणेच महिलाही धूम्रपान करत असतात.

सर्व साधारणपणे धूम्रपान म्हणजे धूर आत ओढणे असा होतो. सध्या धूम्रपान करण्यासाठी अनेक पदार्थांचा वापर केला जातो, उदा. तंबाकू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थाचा ही वापर केला जातो. आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हक्का या पद्धतीचा वापर केला.
जातो. नाश करण्यासाठी धूम्रपान केले जाते. हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धूम्रपान करत असतात.

शरीरावर धूम्रपानाचे परिणाम :

Cancer. Smoking causes most lung cancers and can cause cancer almost anywhere on the body.

Breathing problems and chronic respiratory conditions.

Heart disease, stroke and blood circulation problems.

Smoking also increases risk for tuberculosis, certain eye diseases, and problems of the immune system, including rheumatoid arthritis.

(कर्करोग. धूम्रपानामुळे बहतेक फुफ्फुसाचा कर्करोग होतो आणि शरीरावर जवळपास कुठेही कर्करोग होऊ शकतो. श्वासोच्छवासाच्या समस्या आणि तीव्र श्वसन स्थिती निर्माण होते

हृदयरोग, पक्षाघात आणि रक्त परिसंचरण समस्या उद्भवतात. धूम्रपानामुळे क्षयरोग, डोळ्यांचे काही आजार आणि संधिवातासह रोगप्रतिकारक प्रणालीच्या समस्यांचा धोका
वाढतो.)

खूप च घातक असूनही. काही माणसांना सांगितल्या स ते म्हणतात.. "एक दिन तो सबकों मरना ही है"। हीच लोक ज्यावेळीं जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात असताना हे प्रश्न विचारल्यावर.. उत्तर असे मिळते.. आम्हाला सांगणार कोणी नव्हेत. हे म्हणून मोकळ होतात.

असे असले तरी आपण आपल्या जवळील व्यक्ती जी व्यसन ग्रस्त आहे. त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी काय केले...??

हाच प्रश्न मी स्वतः ला देखील विचारले.... की मी माझ्या जीवाळ मित्राच्या धूम्रपान व्यसन वरती काय उपाय केला बंर..??

हो.. फक्त धूम्रपानामुळे होणारे घातक परिणाम वर lecture.. बाकी काही नाही.. आणि दुसऱ्या दिवशी त्याला धूम्रपान करताना पहिल्यावर तु काही सुधारणार नाहीस.. हे बोलून त्याला तो च lecture अजून एकदा देऊन तर काही फरक जाणवतं नाहीये..

मग काय उपाय असेल बंर....????

1. त्या व्यक्ती ची मनस्थिती समजून त्यांच्या आत मधील समस्या ज्या मधून तो लपतोय, पळ काढतोय.. त्या समस्यांवर समाधान काढावे. किंवा निधान समस्या ऐकून त्याचे मन हलके करावे.

( कारण जी व्यसन ग्रस्त असते. ती कुठे ना कुठे मानसिक ताण मुळे.. किंवा स्वतःच्या अपयशांना विसरण्यासाठी व्यसनाला एक साधन म्हणून पाहत असते. "जरी थोड्या क्षणासाठी स्वतःच्या व्यक्तीमत्वा ला किंवा अस्तित्वाला हरवून स्वतः च्या खरे अस्तित्व शोधण्याचा निरर्थक प्रयत्न करतात". )

2. काही चालू ठेवतात फक्त एक ककारण तेही धूम्रपानामुळे तणाव आणि चिंता कमी होते. धूम्रपान केल्याने तुम्हाला आराम मिळतो असा सामान्य समज आहे. पण प्रत्यक्षात धूम्रपान केल्याने चिंता आणि तणाव वाढतो. धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये मध्ये कालांतराने नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते.

3. फॅशनेबल. धूम्रपान करणाऱ्या किशोरवयीन मुलांची उच्च टक्केवारी (61%) सहमत आहे की धूम्रपान करणे फॅशनेबल आहे . समाजात वेगळे दिसण्याचा प्रयत्नात स्वतः च्या आयुष्य अवेचण करुन घेतात.

4. पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) लक्षणे, नकारात्मक मनःस्थिती आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव यांचा सामना करण्याचा हा एक मार्ग आहे. धूम्रपान न करता भावनांना सामोरे जाण्याचे मार्ग दाखवतो. समुपदेशन तुम्हाला सामना करण्याचे मार्ग शिकवू शकते आणि प्रियजनांकडून पाठिंबा मिळणे देखील मदत करू शकते.

शेवटी.. ईच्छाशक्ती वर नियंत्रण करणे.. हे वाटते तितके सोपे नसते. असे म्हणतात की हजारो वर्षापासून मानवाच्या ईच्छा, सवयी, (तलब), आकांक्षां मुळेच पराभूत केला जातो किंवा होतो. "जर धूम्रपान सोड्याचे असेल तर मनस्थिती ही स्थिर करावे लागले आणि स्वतःच्या वर शाश्वती ठेवावे लागेल. याच क्षणी तुम्हाला असे वाटत असेल की कोणाकडे आहे आणि काय नाही यामधील विसंगतीमुळे उ‌द्भवलेल्या इच्छा असतात. याचा आणि धूम्रपान सेवन करण्याचा सबंध तरी काय आहे...

धूम्रपान करणारे सारखे 'तलब' (Addiction means a desire or hunger for something) लागले आहे राव... असे बोलतात... कारण त्यांना धूम्रपान ची (Addiction) लागली असते.

आपण सर्व माणसे आहोत ज्यामध्ये वस्तू किंवा लोकांचे व्यसन होण्याचा गुण आहे. एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले की त्यातून बाहेर पडणे खूप अवघड असते. पण होय, बाहेर येणे शक्य आहे.

तुमच्या बाबतीत, मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला धूम्रपान करण्यापासून रोखण्यासाठी किमान प्रयत्न केले असतील. तो प्रयत्न हे सर्व सांगतो.

बरं, वैयक्तिक नोंदीवर ही नम्र विनंती आहे की काहीही असो, कृपया धूम्रपान कायमचे थांबवण्याचे ध्येय ठेवा, कारण धूम्रपान हे "आत्महत्या मोहिमेला" दिलेले नाव आहे.

"So smoking is the perfect way to commit suicide without actually dying. "


Writing by..

-- Vishal pawar" Mr... Philosopher "