Achanak Kahi Ghadle in Marathi Women Focused by Amit Redkar books and stories PDF | अचानक काही घडले

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

अचानक काही घडले

अचानक काही घडले
भारत आशिया खंडातील सर्वात मोठा एकमेव देश या भारतात बरेच राज्य अस्तित्वात आहेत. याच भारताल्या दोन राज्यातील ही गोष्ट
महाराष्ट्र आणि दुसरे बिहार
महाराष्ट्र राज्यातील मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि पटना ही बिहार राज्याची राजधानी. दोन्ही राज्यातील संबंध पण तसे चांगलेच. महाराष्ट्र राज्यांप्रमाणे बिहार राज्याचा विकास पण होत होता. बरेच आई, टी कंपन्या आपला व्यवसाय पूर्ण भारतात प्रत्येक राज्यात सुरू झाला पाहिजे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत होते.बरेच कंपन्या सक्सेस पण झाल्या.अशीच एक कंपनी पण मुंबईत बांद्रा या ठिकाणी सुरु झाली होती.ही एक डोमेस्टिक कुरिअर कंपनी होती.देशात प्रत्येक राज्यात या कंपनीचे ऑफिस होते. तसेच ऑफिस बिहार राज्यात पण होते.देशात अनेक कर्मचारी काम करत होते.कर्मचारी लोकांना या राज्यांतून त्या राज्यामध्ये ट्रान्सफर होत असे.अशी ही कंपनी खुप मोठी होत होती.
संजय राऊत हा मुलगा मुंबईत दादरमध्ये रहायला होतो.संजय त्याचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा अनेक कंपनी मध्ये जाऊन इंटरवी देऊन येत असे.तसाच त्याला याच कुरिअर कंपनीमध्ये जॉब मिळाला. संजय हा जॉब मिळतो म्हणून खूप खूश होता. त्याच्या घरातील इतर लोक म्हणजे त्याची आई,. त्याचे वडील याना पण मुलाला जॉब मिळतो म्हणून भरपुर आनंद होतो. जॉबमुळे संजय व्यवस्थीत सेटल झाला. मग त्याच्या आई आणि वडिलांना त्याचे लग्न झाल पाहिजे असे वाटत होते. त्याबद्दल त्याचे वडील संजय बरोबर बोलायचे म्हणून एक दिवस त्याला बाहेर भेटायला बोलवतात.ठरवल्याप्रमाणे संजय आणि वडील एकत्र एका हॉटेलमध्ये भेटायला येतात. गप्पागोष्टी झाल्यावर संजयचे वडील त्याला लग्नाबद्दल विचारतात. तुझे कोणत्या मुलीवर प्रेम आहे का याची चौकशी करतात. पण संजय नाही बोलतो संजय वडिलांना सांगतो की तुम्ही जी मुलगी ठरवाल ती मला चालेल संजय असे बोलतो मग त्याचे वडील त्यांच्या समाजातील मंडळाच्या ऑफिसमध्ये लग्नासाठी अर्ज दाखल करतात काही दिवसांनी एक स्थळ समोरून लग्नासाठी येते. मुलीच्या घरातील लोकांना भेटून बाकीचे बोलणी सुरू होते मुलगा मुलगी एकमेकाना पसंद करतात. मुलीचे नाव सीमा असते मुलगी सुंदर असते म्हणुन संजय पण लगेचच हो बोलतो. संजय आणि सीमाचे थाटामाटात लग्न होते.दोघांचा सुखाचा संसार सुरू होतो. सीमा एका बॅंकेत कामाला असते. सर्व सुरळीत सुरू असते तेव्हा अचानक संजयचे वडील हे जग सोडून निघून जातात.वडील गेल्यावर सर्व जबाबदारी संजयवर येते त्याला एक बहीण असते बहिणीचे चांगल्या ठीकाणी लग्न करण्याचे संजय आणि त्याची आई ठरवतात.संजय बहिणीचे लग्न पण चांगल्या मुलाबरोबर करून देतो पुढे संजयला एक मुलगा होता. घरातील वातावरण आनंदी असते. जॉब पण छान सुरू असतो एक दिवशी कंपनीमध्ये काही कर्मचाऱ्यांनी इतर राज्यात त्या राज्यातील नवीन कर्मचारी लोकांना गाईड करण्यासाठी मुंबई ऑफिसमधून जे सिनियर कर्मचारी असतात त्यांची ट्रान्सफर ऑर्डर निघते. त्यात संजय पण असतो.सुरवातीला संजयला चेन्नईला ट्रान्सफर मिळते. संजय चेन्नईला जातो. त्याच्या गैरहजेरीमध्ये सीमा सर्व घरातील जबाबदारी पार पाडत असते. रोज व्हीडिओकॉल तर्फे संजय पण खुशाली घेत असे काही दिवसांनी संजय पुन्हा मुंबईला येतो. याच दरम्यान संजयला आणखी एक मुलगा होतो. आई बायको आणि दोन्ही मुले असा परिवार पुढची काही वर्षे अशीच निघून जातात.संजय कंपनीमध्ये अजुन चांगल्या पदावर कार्यरत होतो.बिहार राज्यातील पटना या ठिकाणी कंपनी एक ब्रँच ओपन करते. त्यावेळी कंपनी संजयवर त्या ब्रँचची सर्व जबाबदारी सोपवीते.सुरवातीला संजय आपल्या संपूर्ण कुटुंबाला बिहार राज्यात घेऊन जायचे ठरवतो. पण सीमा बॅंकेत चांगल्या पदावर कार्यरत असते तिला ट्रान्सफर मिळत नसते.शिवाय दोन्ही मुलांना पण चांगले शिक्षण मिळेलच असे नव्हते. मुंबईत आधीच एका चांगल्या शाळेत संजयचा मोठा मुलगा जात असतो. परत त्याला दुसर्‍या ठीकाणी शाळेत घालायचे म्हणजे त्याचे पण नुकताच झाले असते म्हणुन संजय आणि सीमा या गोष्टीचा नीट विचार करून निर्णय घेतात त्यावेळी असा निर्णय घेण्यात येतो की संजय एकटाच बिहार राज्यात जातो.
संजयला कंपनी तर्फे एक चांगली खोली मिळते. संजय बिहार राज्यात जाण्यासाठी तयारी करतो. सीमा आणि मोठा मुलगा मुंबई विमानतळावर संजयला सोडण्यासाठी येतात.संजयचे सीमावर भरपूर प्रेम असते आणि सीमा पण संजयवर खूप प्रेम करत असते दोघांचाही एकमेकावर भरपूर विश्वास असतो. संजय, सीमा आणि मुलाला बाय करून आतमध्ये निघून जातो.सीमा मुलाला घेऊन घरी येते. संजय दुपारी बिहारला पोहोचतो. आणि सीमाला फोन करून कळवतो पहिल्या दिवशी संजय त्याच्या रूममध्ये राहतो. कुठे बाहेर जात नसतो.दुसर्‍या दिवशी संजय त्याच्या ब्रँचमध्ये जातो आधीच सर्व स्टाफ आलेला असतो संजयला पाहून सर्व एकत्र गूड मॉर्निंग बोलतात. संजय मॅनेजरला केबिन मध्ये बोलावून सर्व स्टाफबद्दल माहिती करुन घेतो एक एक करून सर्व स्टाफ केबिनमध्ये येऊन संजयला भेटतात.संजय शांत स्वभावाचा असतो म्हणून स्टाफ पण संजयला खूप मानू लागतो कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जेवण मिळत असते. पण बाहेरून असे किती दिवस खाणार घरचे जेवण मिळेल तर बरे होईल म्हणून संजय स्टाफमध्ये पण त्याबद्दल माहिती करुन घेतो तेव्हा त्या कंपनी मध्ये आणखी काही स्टाफ असतात जे बाहेरच्या राज्यातील असतात. त्याच्याकडे घरचे जेवण येत असते पटना जिल्ह्य़ातील यादववाडी या गावांत संजयचे ऑफिस होते.यादववाडी तसे गाव नाही शहर होत होते. पण संजय ज्या बिल्डिंगमध्ये राहत होता ती बिल्डिंग गावामध्ये होती. तिकडे एक कुटुंब राहत होते. यादव कुटुंब...यादव कुटुंब बर्‍याच वर्षांपासुन तिकडे राहत होते अगदी आताची 4 पिढी होती. यादव कुटुंबची शेती हा रोजगार असे. त्यांची बरीच जमीन असते.पण काही जमीन कर्ज असते म्हणून विकावी लागते आणि काही जमीन सावकार जवळ गहाण असते..यादव कुटुंबामध्ये रामलाल यादव हे प्रमुख होते. त्यांची बायको जानकी यादव, 2 मोठे मुलगे, त्यांची पण लग्न झालेलं असते. आणि रामलाल यादवला एक मुलगी असते.
.......सुमन... नाव असते तिचे. रामलाल सुमनचे लग्न करण्यासाठी जमीन गहाण ठेवतो.सुमनचे लग्न होते.पण सुमन काहीच दिवसात परत येते. तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे बरेच हाल करुन तिला परत पाठवले होते.लग्नात काही मागण्या पूर्ण नाही झाल्या त्यामुळेच सुमनचा नवरा भरपूर त्रास देऊन तिला रोज मारत असत.एक दिवस सुमनला दिवस जातात.पण तिचा नवरा ते मूल माझे नाही आहे तू कोणाचे तरी पाप माझ्या गळ्यात मारत आहेस असे बोलून तिला मारझोड करत असे.आणि त्या मारझोडीमुळे सुमनचे बाळ मरते. सुमन बेशुद्ध होते. तसे तिचे सासरचे तिला एका सरकारी हॉस्पिटल मध्ये सोडून पळुन जातात. आणि सुमनच्या वडिलांना फ़ोन करून सांगतात.सुमनचे वडील आणि भाऊ त्या हॉस्पिटल मध्ये जातात.तर सुमन एका बाकड्यावर झोपलेली असते.तिच्यावर उपचार सुरू नाही होत.म्हणून मग सुमनचे वडिल तिला घेऊन आपल्या गावाकडे येतात तिकडे एका हॉस्पिटल मध्ये तिला ठेवतात.डॉक्टर तपासून बाहेर येऊन सांगतात की मूल मेल आहे.आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे सुमन आता कधीच आई नाही होऊ शकणार. गर्भ पिशवीला मार लागला आहे म्हणून आता तिचा गर्भ काढावा लागला.सुमनचे वडील तिथल्या तिथे खाली कोसळू लागतात तिचे भाऊ पण वडिलांना सावरू लागतात हे सर्व सुमन पण ऐकते. आणि जोरजोरात रडू लागते.सुमनचे वडिल आणि भाऊ तिच्या सासरी जाब विचारण्यासाठी जातात तेव्हा तिकडे बरीच हाणामारी होते. सुमनच्या वडिल आणि भाऊ दोघांनाही भरपूर मारले जाते. आणि एका गाडीतून त्याच्या गावात फेकले जात. वडील आणि भाऊ कसेतरी घरी येतात.दुसर्‍या दिवशी रामलाल यादव पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घरातून बाहेर येतो तेव्हा तिकडे काही गुंड येतात आणि सुमनच्या वडिलांना आणि दोन्ही भावाना मारू लागतात दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकानाही मारले जाते. सुमनच्या आईला पण मारतात सुमनला पण मारू लागतात.सर्वांना मारून ते निघून जातात. थोड्यावेळाने सुमन शुद्धीवर येते. ती सगळीकडे पाहते तर तर सर्व जण बेशुद्ध असतात. पण तिचे वडील शुद्धीवर असतात.ती वडिलांना मिठी मारते आणि रडू लागते.सुमनची आई मारते.थोड्यावेळाने तिचे भाऊ आणि त्यांच्या बायका पण शुद्धीवर येतात. आई मेल्याचे जेव्हा सर्वांना समजते तेव्हा तिचे भाऊ याला सुमन जबाबदार आहे असे बोलून तिला मारझोड करतात. पण सुमनचे वडील मध्ये येऊन तिला बाजूला घेतात आणि दोन्ही मुलांना सांगतात मी अजून जिवंत आहे आणि तो पर्यंत माझ्या मुलीला कोणी काहीही करू शकत नाही वडिलांचे असे बोल ऐकल्यावर सुमनच्या भाऊंना भरपूर राग येतो आणि ते दोघेही आपल्या आपल्या बायकोला घेऊन घर सोडून निघून जातात. सुमन त्यांना अडवण्याचा खुप प्रयत्न करते पण ते ऐकून घेत नाही. सुमनच्या सासरच्या लोकांनी सुमन राहत असलेल्या गावांमध्ये जो आमदार असतो त्याच्या बरोबर हातमिळवणी केलेली असते एका व्यवसायमध्ये त्यांची भागीदारी होते. आणि त्यामुळे आमदार आणि त्याची माणसे हे सर्व करतात.बिहार राज्यात या गोष्टी नवीन नसतात तिकडे अशी गुंडगिरी सर्व जिल्हामध्ये असते आणि त्यात एकादे गरीब कुटुंब फसले जाते त्यातील एक कुटुंब म्हणजे रामलाल यादव कुटुंब
काळ पुढे निघत होता. तसे सुमन आणि तिचे वडील सावरायला लागले होते वडिल अपंग असल्यामुळे त्यांची जबाबदारी सुमनवर होती पटना शहरात गेल्या काही वर्षांत बराच सुधारणा झाल्या होत्या.सरकारमुळे देशातील इतर राज्यातील काही कंपनी आणि ऑफिस पटना जिल्ह्य़ात उदयाला आले होते.सुमन राहत असलेल्या गावांमध्ये असे बरेच ऑफिस आणि कंपन्या होते.त्या ऑफिसमध्ये आणि कंपनीमध्ये साफसफाई करण्यासाठी काही बायका आणि मुलींची गरज होती तेव्हा सुमनने ही अर्ज दाखल केला होता.त्या बिल्डिंगमध्ये बरेच ऑफिस होते. प्रत्येक ऑफिससाठी आया बाईची गरज होती. सुमनला जेव्हा कॉल येतो तेव्हा तिला संजयच्या ऑफिसमध्ये काम करायला जावं लागेल असे सांगितले जाते. ठरवल्याप्रमाणे सुमन संजयच्या ऑफिसमध्ये येते.संजयच्या ऑफिस मधील बॉय सुमनला संजयच्या केबिनमध्ये घेऊन जातो. संजय सुमनला पाहतो....एका पिवळ्या रंगाची साडी घालून आणि त्याच रंगाची टिकली लावलेली सुमन दिसायला सुंदर असते.पण त्या गावातील वातावरणात मोठी झाल्यामुळे आणि स्वतःच्या घरातील मागे काही दिवसात घडलेल्या अत्याचारामुळे सुमन पूर्णपणे हताश झाली होती. आणि त्यामुळे तिचा सुंदरपणा लपवून गेला होता.संजयच्या समोर जेव्हा सुमन येते तेव्हा संजय तिला पाहताच राहतो. पण लगेचच संजय भानावर येतो.आणि कोण आहे ही... असे ऑफिस बॉयला विचारतो.ऑफिस बॉय बोलतो सर ही कामवाली बाई आहे.आपल्या बिल्डिंग सेक्रेटरीने पाठवले आहे.तेवढ्यात संजय लगेचच बोलतो हो मला बोलला होता तो,संजय सुमनला खुर्चीवर बसायला सांगतो तर सुमन जमिनीवर बसते.तेवढ्यात संजय तिला उठवून खुर्चीवर बसायला सांगतो.सुमन साडीचा पदरने तोंड धरून संजयच्या पुढ्यात बसते. संजय तिला काय काय काम करणार विचारतो. सुमन बोलते. सर्व करेन साहेब, तुम्ही जे बोलाल ते सर्व.संजय तिला पगार ठरवुन सांगतो उद्या पासून येत जा.आता आज नको कारण सर्व स्टाफ आता आला आहे.त्यामुळे तुला साफसफाई करण्यासाठी अवघड होईल
...सुमन हो बोलून निघून जाते.
संध्याकाळी रूममध्ये आल्यावर संजय नेहमीप्रमाणे सीमाला व्हीडिओ कॉल करतो आणि खुशाली विचारतो.सीमा आणि मुले बोलून झाल्यावर फ़ोन कट करणार तेवढ्यात सीमा संजयला जेवणाचे काय केले का तुम्ही, असे विचारते.संजय सांगतो.अजून तरी कॅन्टीनचे खात आहे ऑफिसमध्ये सांगितले आहे कोणी घरातून जेवण देणारे मिळेल तर मला सांगा म्हणून, बघू मिळेल कोणीतरी..सीमा संजयला बोलते. की तुम्हाला बाहेरचे खाऊन त्रास होईल म्हणून लवकर काय ते करा. संजय हो बोलतो. मग सीमा फोन कट करते.दुसर्‍या दिवशी सुमन ऑफिसमध्ये सकाळी लवकरच येते आणि ऑफिस साफ करून घेते. थोड्यावेळाने बाकीचे स्टाफ पण येतात सुमन तिचे काम करून निघून जातो.संजय पण ऑफिसला येतो तर नेहमीप्रमाणे ऑफिस जरा वेगळे वाटते साफसफाईमुळे ऑफिस सुंदर दिसत असते संजयचे केबिन पण छान दिसत होते. संजयला आनंद होतो संजय मॅनेजरला बोलतो बाई चांगली आहे.दुपारी सर्व कॅन्टीनमध्ये जेवण करायला येतात.तेव्हा संजय पण येतो कोणी कोणी आपल्याला डब्यात जेवण करत असते तर कोणी कॅन्टीन मध्ये तयार झालेले खात होते.तेवढ्यात एक स्टाफ मटार उसळ संजयला हवी का विचारतो संजय सुरवातीला नको बोलतो पण नंतर त्या उसळचा सुगंध आल्यावर लगेच दे म्हणून सांगतो.संजयला उसळ खूप आवडते बरेच दिवसांनी घरचे जेवण मिळाले होते तेव्हा संजयने चांगलेच ताव मारला होता.जेवण झाल्यावर सर्व लॉबीमध्ये थांबले असतात तेव्हा संजय लगेचच त्या माणसाला बोलवून घेतो आणि उसळ बद्दल चौकशी करतो.तो स्टाफ संजयला सांगतो की ती उसळ मी नाही बनवली आणि माझ्या बायकोने ही नाही बनवली माझी बायको तर दिल्लीला आहे. मी आणि आपल्या ऑफिसचे अजून काही मेंबर आम्ही एकत्र भाडे शेअर करून राहतो.ती उसळ तर आमच्या कामवाली बाईने केली.आणि ती कामवाली आज पासून आपल्या ऑफिस मध्ये पण साफसफाईचे काम करायला येऊ लागली आहे संजय लगेचच बोलतो की त्या सुमनने केली उसळ तेवढ्यात तो स्टाफ हो बोलतो.मग संजय त्याला बोलतो की गेले बरेच दिवस मी पण घरच जेवण करून देणारे कोण भेटते का ते शोधत होतो बरे झाले सुमनला विचारतो आता, दुसर्‍या दिवशी सुमन ऑफिसमध्ये आल्यावर संजय तिला ऑफिस केबिन मध्ये बोलावून घेतो सुमन केबिनमध्ये येते आणि पुन्हा जमिनीवर बसते.पण संजय तिला खुर्चीवर बसायला सांगतो.सुमन तरीही बसत नसते. ती उभीच राहते आणि पुन्हा पदरने तोंड धरून असते.संजय तिला बोलतो हे सर्व करायची काही गरजच नाही.पण असो आता तुमची ती रीत असेल ना, संजय बोलतो. सुमन मी तुला यासाठी बोलवून घेतले कारण मला समजले की तू जेवण पण करतेस. आपल्या ओळखीच्या काही लोकांना तू जेवण बनवून देतेस ना, सुमन बोलली.. हो साहेब.. मी करते जेवण संजय बोलला मग उद्यापासून माझ्यासाठी पण करू शकशील का, कारण इकडे आल्यापासून घरच जेवण मिळत नाही कॅन्टीनचे खावे लागते.सुमन बोलली. हो मी करेन तुमच्यासाठी, पण तुमच्या घरी येऊन करावे लागेल कारण मी करून नाही देत, करायला येते.संजय बोलला ओक्के ओक्के मग चालेल मी सामान आणून ठेवतो. मी राहतो तिकडे एक किचन पण आहे तू हवे तर आजच जा तुझी बाकीचे कामे झाली की कारण मला तू संध्याकाळी जेवण करशील तर चालेल मग दुपारी पण तेच होऊन जाईल.सुमन बोलते ओके मग तुमच्या खोलीची चावी द्या मी आज जाऊन करते काहीतरी, संजय तिला 5000 हजार रुपये देतो. आणि सामान घेऊन जा असे सांगतो शिवाय अजून लागले तर मागून घे म्हणून सांगतो.संजय पटना ब्रँच मध्ये व्यवस्थीत सेटल होतो कंपनी पण संजयवर खुप खूश असते संध्याकाळी जेव्हा संजय घरी जातो तेव्हा खोलीत गेल्यावर त्याला एकदम प्रसन्न वाटू लागते.
सुमन घरी असते
संजयला पाहून ती एका कोपर्‍यात ऊभी राहते आणि बोलते मी तुमचे जेवण बनवून ठेवले आहे.संजय ते सर्व पाहून खूप खूश होतो आणि तिला विचारतो अजून काही पैसे... तेवढ्यात सुमन बोलते नाही साहेब उलट उरले आहेत तुमच्या महिना भर पुरेल येवढेच सामान घेऊन आले मी.संजय बोलतो मग उरलेले पैसे तु ठेव अजून काही लागले तर सांग.
सुमन हो बोलून निघू लागते.
संजय तिला पाहतो ती पण संजयला पाहते दोघांच्या नजरेत एक ओढ असते. पण ती दिसत नसते.
सुमन निघून जाते
संजय थोड्यावेळाने सीमाला फ़ोन करून सांगतो जेवण करायला बाई मिळाली आहे जेवण करताना व्हीडिओ कॉल करुन काय काय आहे ते सर्व सीमाला दाखवून देतो सीमा पण खूश होते आणि तिचे टेंशन जाते.सुमनच्या हाताला वेगळीच चव असते संजयला जेवण खुप आवडते. संजय दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये आल्यावर सुमनला बोलावून सांगतो सुमन पण हसून आणि लाजून निघून जाते.असे बरेच दिवस चालू असते पुढे 8 महिने निघून जातात.संजयने बर्‍यापैकी ब्रँच ऑफिस ट्रेन केले होते.मग संजयला ऑफिस तर्फे परत मुंबईला ये असे सांगितले जाते.संजय बोलला हो अजून महिनाभर थांबतो आणि येतो महाराष्ट्र राज्यमध्ये पुण्यात एक ब्रँच ओपन होणार होती तिकडे संजयला जायचे होते.नेहमीप्रमाणे सुमन संध्याकाळी घरी येते आणि जेवण करून संजयची वाट पहात असते संजय आणि सुमनची आता बर्‍यापैकी मैत्री झाली होत.सुमन पण रात्री संजय बरोबर जेवण करत असे. सुमन संजय आपल्या नवरा आहे आणि नवराची कामे ज्या पद्धतीने केली जातात तशीच सर्व कामे सुमन करत असते.अगदी संजयचे कपडे,शूज,पट्टा या सर्व गोष्टी पण सुमन रात्री काढून जात असे एक दिवस संजयला उशीर होतो तेव्हा सुमन संजयची वाट पाहात असताना झोपून जाते संजय घरी येतो तेव्हा सुमन झोपलेली असते मग संजय तिला जेवणाच्या टेबलावरून उचलून सोफ्यावर तेवतो आणि स्वतःच्या हाताने जेवण घेऊन बेडरूममधे जाऊन झोपतो.दुसर्‍या दिवशी सकाळीच 5 वाजता सुमनला जाग येते. ती पटकन उठून आधी संजयला पाहते आणि तशीच घरातून निघून जाते.सुमनला संजयच्या घरातून निघताना काही जण पाहतात. सुमन जिथे जिथे घर काम करते त्या सर्व ठिकाणी कोणीतरी तिला पाहत असते.आणि एक दिवस जे झाले ते सर्व होणार असे कधीच कोणाला वाटले नव्हतेसुमनला जी माणसे फॉलो करत होते ते सर्व तिच्या नवराने पाठवले गुंड होते. सुमनचा नवरा आणि सासरच्या मंडळींना सुमन कडून डिवोर्स हवा असतो. म्हणून तो सुमनला समाजामधे ती एक वाईट बाई आहे असे पुरावे जमा करत होता.गावांमध्ये खास करुन डिवोर्स हा त्या गावातील सरपंचच्या समोर घेतला जातो कोर्टमध्ये कोण जास्त जात नसत. सुमनचा नवरा आणि सासरच्या लोकाना सरपंचला हे दाखवायचे होते म्हणून तो सुमन विरोधी पुरावे गोळा करत होता आणि एक तो येतो संपूर्ण गाव जमा होते सरपंच पण येतो रामलाल यादवला आणि सुमनला बोलतात.सुमनच्या नवऱ्याला आणि सासरच्या मंडळींनी बोलवतात. दोन्ही लोकांना आपल्या आपल्या बाजू मांडण्याची परवानगी दिली जाते तेवढ्यात सुमनच्या सासरच्या मंडळींनी आम्हाला कोणत्याही प्रकारची बाजू नाही मांडण्याची आहे. आम्हाला सरळ मार्गाने डिवोर्स हवा आहे सरपंचने विचारले असे का करत आहात तुम्ही काय झाले आहे तेव्हा सुमनचे सासरच्या मंडळींनी काही व्हीडिओ दाखवले आणि सांगितले सुमन ही वाईट मुलगी आहे तिचे बर्‍याच पुरूष लोकांबरोबर संबंध आहे ती गरोदर पण आमच्या मुलापासून नाही झाली होती ती तिच्या कोणत्या तरी यार बरोबर झोपून गरोदर झाली होती.सुमनच्या वडिलांना हे सर्व सहन होत नव्हते ते अपंग असून पण त्या सासरच्या लोकांच्या अंगावर धावून गेले मग सुमनने मध्ये येऊन वडिलांना बाजूला केले सुमनला हे सर्व खरे आहे का विचारले तेव्हा ती म्हणाली हे सर्व खोटे आहे कारण या लोकांना लग्नानंतर हुंडा हवा होता तो हुंडा माझे वडील देऊ शकत नव्हते आणि म्हणून हे लोक मला त्रास देत होते आणि मी गरोदर यांच्या मुलापासून झाली होती माझ्याबरोबर झोपायला त्याला लाज नाही वाटली पण मुलाची जबाबदारी आली तेव्हा लगेचच माझे नाही असे बोलून मला मारझोड केली आणि हॉस्पिटलमध्ये सोडून पळुन गेले.अश्या माणसाबरोबर मलाच नाही रहायचे मला पण डिवोर्स मान्य आहे सुमनचा नवरा हे ऐकल्यावर तिच्या अंगावर धावून येतो. तेवढ्यात सुमन पण एका कोपर्‍यात असलेला दांडा उचलून प्रतिकार करते.आणि वडिलांबरोबर तिकडून निघून जाते.या गोष्टीचा तिच्या सासरच्या मंडळींनी खुप राग येतो ते लोक पण रागाने निघून जातात पण जाताना बोलून गेले तुला जिवंत नाही सोडणार.
सुमन वडिलांना घेऊन घरी येते
थोड्यावेळाने संजयचा फोन येतो संजयला आता मुंबईमध्ये जावे लागणार होते संजयची ट्रान्सफर पुण्यात होणार होती.म्हणून सुमनला भेटून तिचा उरलेला पगार देण्यासाठी संजय तिला फोन करतो.पण सुमन फोन उचलत नसते.
संजय आपल्या ऑफिसच्या काही खास लोकांना घरी बोलावून घेतो आणि ऑफिसची सर्व जबाबदारी सोपवून देतो ऑफिसचे कलीग त्याला विचारपूस करतात की सर आता तुम्ही परत कधी येणार संजय बोलतो आता माझी ट्रान्सफर पुण्यात आहे. जिकडे नवीन ऑफिस ओपन होते तिकडे मी जाणार आहे त्यामुळे आता पटनामध्ये परत कधी येईन माहिती नाही सर्व जण निरोप घेऊन निघतात.संजय पण सीमाला फोन करून सांगतो मी परवा पर्यंत घरी येईन कारण रात्री 1 वाजता रेल्वे टाइम आहे. संजय रेल्वेने जात होता कारण संजयला रेल्वे प्रवास पण अनुभवचा होता. ठरवल्याप्रमाणे संजय निघण्यासाठी घरामधून निघतो रात्रीचे 11.30 वाजलेले असतात. संजयला सुमन आज नाही भेटू शकली म्हणून वाईट वाटते.सुमनच्या गावांमधून एक रस्ता रेल्वे स्टेशन परिसरात जातो हे संजयला माहीत होते. म्हणून संजयने तो ज्या गाडीतून जात होता ती गाडी त्याने त्याच रस्तावरुण घेऊन जाण्यासाठी सागितले.संजय सुमनच्या गावांमध्ये आला तेवढ्यात समोर पाहिले तर एक घर जळत असताना त्याला दिसते. संजय लगेच गाडी थांबवायला सांगतो आणि पळत पळत त्या दिशेने जातो. तेव्हा संजयला दिसते त्या घरातील काही लोक ओरडून ओरडून मदत मागत असतात.संजय निरखून पाहतो तर त्याला सुमन दिसते. सुमनला पाहिल्यावर संजय एकदम तिच्या दिशेने पळत सुटतो.आणि त्या जळत असलेल्या घरात उडी मारून आत जातो.आतमध्ये 3 जण असतात सुमन तिचे वडील आणि तिची एक मैत्रिण सुमनची मैत्रिण तिच्या बरोबर साफसफाईची कामे करायची. पण तिला मुंबईत एका हॉटेलमध्ये काम मिळते आणि हेच सांगायला ती सुमनच्या घरी येते पण दुर्दैवाने ती त्या आगीत सापडते.सुमनची मैत्रिण त्या आगीत पूर्णपणे जळून खाक होते. पण सुमन आणि तिचे वडील व्यवस्थीत असतात. संजय सुमनला आणि वडिलांना घेऊन मागच्या बाजूला येतो.सुमन मैत्रिणला वाचायला परत आत जात असते. पण संजय तिला अडवतो आणि वडिलांना अगोदर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले असे बोलून तिला मागे खेचून घेतो सुमनच्या वडिलांना त्रास होत असतो सुमन वडिलांबरोबर बसुन त्याच्या जवळ येते तेव्हा तिचे वडील तिला बोलतात सुमन मी आता नाही वाचू शकत असे बोलून तिचे वडील तिच्या हाताला पकडून संजयला जवळ बोलवून घेतात. आणि संजयला सांगतात बेटा माझा प्रवास आता इकडेच संपला. आणि माझा मुलीचा पण, माझ्या मुलीला वाचव कारण ती जिवंत आहे हे समजले तर तिचे सासरचे आणि या गावातील लोक तिला जगू नाही देणार सुमनचे वडील संजयचा हात हातात घेऊन सुमनच्या हातात देतात आणि माझा मुलीला सांभाळा तिला तुमच्याबरोबर घेऊन इकडून निघून जावा. या जन्मात मी तुमचे उपकार नाही फेडू शकत पण पुढच्या जन्मी नक्कीच फेडू माझ्या मुलीला घेऊन जा असे बोलून सुमनचे वडील प्राण सोडतात सुमन वडिलांच्या छातीवर डोके ठेवून रडते तेवढ्यात तिकडे काही लोक येताना आणि आरडाओरड करताना दिसतात संजय लगेचच सुमनला घेऊन पळून जातो. सुमन ऐकत नसते संजय तिला तरीही खेचून स्वतःच्या गाडीमध्ये बसून गाडी घेऊन निघून जातो.संजय आणि सुमन पटना रेल्वेस्टेशन परिसरात येतात. तेवढ्यात सुमन संजयचा हात सोडून देते. संजय तिला विचारतो काय झाले. सुमन बोलते.. कमी वयात लग्न झाले म्हणून प्रेम कधीच समजले नाही. ज्याचा बरोबर लग्न केले त्याने कधीच प्रेम नाही दाखवले, दाखवली ती फक्त हवस....प्रेम काय असते हे गेल्या 8 महिन्यात समजले जेव्हा तुमच्या सहवासात आले. संजय मला नाही माहिती हे चूक की बरोबर पण मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. कधी झाले, कसे झाले, का झाले, नाही माहीत पण प्रेम झाले. मला माहित आहे तुमच लग्न झाले आहे तुम्हाला 2 मुले आहेत पण मी वचन देते की मी तुमच्या लग्नामध्ये कधीच येणार नाही. तुमचे पहिले तेच.. जे तुमचे आहेत. नंतर मी...माझा जीव वाचवण्यासाठी माझ्या वडिलांनी माझा हात तुमच्या हातात दिला तो मी तेव्हाच धरून ठेवेन जेव्हा तुम्ही माझ्या बरोबर लग्न कराल. सुमनच्या अश्या वागण्याचा संजयला अचानक धक्का बसतो संजय सुमनला बोलला सुमन आता तू माझ्याबरोबर आधी मुंबईला चल मग आपण नंतर काय ते ठरवूया पण सुमन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तिने लगेच संजयचा हात सोडून दिला आणि ती सरळ मार्गाने चालू लागली संजय तिच्या मागे मागे चालू लागला आणि तिला थांबवू लागला. पण सुमन काहीच ऐकत नव्हती तसेच एका एकट्या मुलीला असे मधेच सोडून जाणे संजयला पण योग्य वाटत नव्हते संजयने चालता चालता सुमनचा हात पकडून तिला थांबवले. आणि तिला म्हणाला सुमन तुला मी ईकडे सोडून नाही जाऊ शकत. प्लीज तू माझ्याबरोबर चल सुमन म्हणाली तुम्ही माझ्याबरोबर लग्न नाही केले तर मी जीव देईन पण बिन लग्नाची एका परक्या राज्यात नाही येऊ शकणार कारण आधीच माझ्या चारित्र्यावर बरेच बोलले गेले आहे. आणि त्यात जर मी तुमच्याबरोबर मुंबईत आली तर लोक मला तुमची रखेल बोलतील. तेव्हा ते सर्व ऐकून जीव देण्यापेक्षा आतच जीव देते किवा कुठेतरी निघून जाते उगाच तुमच्या डोक्याला ताप नको तुम्ही तुमच्या मार्गाने जावा मी माझे काय ते बघेन असे बोलून सुमन परत हात सोडवून पुढे चालू लागते तेवढ्यात एका मंदिराची घंटा वाजू लागते रात्रीचे 12 वाजलेले असतात.रविवारची रात्र आणि सोमवार सुरू होणार असतो रात्री 12 वाजता शिव मंदिरात पूजा केले जाते असे बरेच वर्ष चालू असते. ते मंदिर पटना रेल्वे परिसरात एका डोंगरावर असते त्या मंदिरात ही पूजा गेले अनेक वर्षे सुरू असे. त्या दिवशी पण अशीच पूजा करण्यासाठी घंटा वाजू लागते.सुमन आणि संजय लगेच थांबतात त्यांची नजर त्या डोंगरावर जाते. शेवटी हताश होऊन संजय सुमनचा हात पकडून त्या डोंगरावर असलेल्या मंदिरात जातो. मंदिरात घंटा दणाणून वाजत असतात एक ब्राम्हण सुमन संजयच्या समोर येतो आणि दोघींच्याही कपाळावर कुंकू लावतो. जय शिव महादेव असे नारे देतो.तेवढ्यात संजय त्या ब्राम्हणला बोलतो गुरुजी आम्हाला लग्न करायचे आहे सुमन संजयकडे एक टकमक पाहत राहते ब्राम्हण बोलतो ठिक आहे तुम्ही ईकडे बसा मी..लग्नासाठी काही सामान लागेल त्याचा बंदोबस्त करतो ठरवल्याप्रमाणे ब्राम्हण संजय आणि सुमनला एका अग्नीपेटी जवळ बसायला सांगतो. सुमन आणि संजय समोरच बसतात ब्राम्हण एक एक मंत्र बोलून संजयला सुमनच्या कपाळावर कुंकू लावायला सांगतो. आणि मग एक मंगळसुत्र संजयच्या हातात देऊन त्यात कुंकू भरायला सांगतो आणि सुमनच्या गळ्यात घालायला सांगतो. मंगळसुत्र गळ्यात घातल्यावर सुमन संजयकडे पाहून रडू लागते. संजय तिचे डोळे पुसत रडू नकोस सांगतो थोड्यावेळाने ब्राम्हण दोघांनाही उठून उभे राहण्यासाठी सांगतात. आणि अग्नी भोवती फेर्‍या मारायला सांगतात. ब्राम्हण जसे बोलतात अगदी तसेच सुमन आणि संजय करत असतात दोघांचेही लग्न होते. सुमन आणि संजय ब्राम्हणच्या पाया पडून झाल्यावर संजय 3000 रुपये दक्षिणा ब्राम्हणच्या हातात देतो आणि सुमनचा हात पकडून रेल्वे स्टेशनवर जातो. मुंबईची रेल्वे आधीच फलकावर येऊन ऊभी असते. संजय सुमनचे ऑनलाईन तिकीट काढून तिला पण स्वतःच्या कॅबिनमध्ये घेऊन जातो संजय आणि सुमन एकत्रित एकाच केबिन मधून प्रवास करत असतात. संजय सुमनला खिडकी जवळ बसवतो आणि स्वतःहा तिच्या बाजुला बसतो सुमन खिडकीच्या बाहेर पाहताना तिचे केस उडून संजयच्या चेहर्‍यावर येतात संजय लगेचच केस बाजूला करण्यासाठी हात चेहर्‍यावर घेतो तेच सुमन पण हात जवळ घेते दोघेही एकमेकांना पाहत राहतात हळूहळू जवळ येत असतात आणि तेवढ्यात अचानक फोन येतो फोन आल्यावर संजय पटकन मागे होतो आणि फोन उचलून हॅलो बोलतो तर समोर सीमा असते सीमा संजयला विचारते तुम्ही बसला का रेल्वेमध्ये संजय लगेचच हो बोलतो मग सीमा विचारते परवा सकाळी तुम्ही मुंबईला येणारना संजय बोलतो नाही मी मुंबईला नाही येणार आहे. मधुनच पुण्यात जाऊन मग तिकडेच ऑफिसचा चार्ज घेऊन सगळे व्यवस्थीत करून येईन. सीमा बोलते अचानक प्लॅन का बदलले संजय बोलतो ऑफिसचे वरीष्ठ बोलले असे करायला. अजून 2 दिवस उशीर होईल मग पूर्ण 8 दिवस मी घरीच असणार आता मला नको अडवू सीमा पण हो ठिक आहे असे बोलून फ़ोन कट करते. थोड्यावेळाने सुमन विचारते की आपण मुंबईला नाही जाणार संजय बोलतो. मी तुला पुण्यात ठेवणार आहे तिकडे ऑफिसचा फ्लॅट आहे तिकडेच तु रहा मला पुण्यात कोणी ओळखत नाही म्हणजे आपण तिकडे बिनधास्त राहू शकतो. सुमन बोलली तुम्ही जसे ठरवल तसे होऊ दे आणि मग सुमन संजयच्या खांद्यावर डोके टेकून झोपून जाते.सुमनच्या गावाकडे तिच्या जळलेल्या घराबाहेर सर्व गाव जमा होते काही पोलीस स्थानिक आमदार सुमनचे सासरचे लोक बरेच जण येतात पोलीस आग आटोक्यात आल्यावर आतमध्ये जातात आणि 2 बॉडी घेऊन बाहेर येतात. एक बाईची आणि एक माणूस असतो. सरपंच बोलतो हा रामलाल यादव आहे आणि ही त्याची मुलगी सुमन आहे. घरात कदाचित शॉर्ट सर्किट झाले असणार आणि दोघेही बाप बेटी जळून मेले असणार. अश्याप्रकारे पोलिसांना जबाब दिला जातो. सुमनचे भाऊ तिकडे येतात आणि उगाचच रडायची अ‍ॅक्टींग करत बसतात. पोलीस जबाब घेऊन निघून जातात. सरपंच सुमनचे सासरचे लोक आणि आमदार एकमेकांना पाहत हसून निघून जातात. सर्वांना वाटते सुमन आणि तिचे वडील आता जिवंत नाही आहेत कारण ज्या मुलीचा जळालेला मृतदेह होता तो सुमनच्या मैत्रिणीचा होता. सुमनची मैत्रिण पूर्णपणे जळून गेली होती. म्हणून तिची ओळख सुमन आहे असे लोकांना वाटते सुमनची मैत्रिण अनाथ होती तिचे मागे पुढे कोणीच नव्हते म्हणून तिला कोणीच शोधण्यासाठी येणार नव्हते त्यामुळे सुमन आता बिहार राज्यासाठी पूर्णपणे मेली होती...
2 दिवसांनी संजय आणि सुमन पुण्यात येतात ठरवल्याप्रमाणे संजय ऑफिसचा चार्ज घेऊन रूमची चावी घेतो आणि सुमनला घेऊन एका शॉपिंग मॉलमध्ये जातो तिकडे तिला महाराष्ट्र पद्धतीने काही कपडे विकत घेऊन देतो आणि जेव्हा सुमन महाराष्ट्र पद्धतीचे कपडे म्हणजे साडी नेसून बाहेर येते तेव्हा तिचे हे कुठेतरी झाकलेले सौंदर्य पटकन दिसू लागते. संजय सुमनला पाहून तसाच उभा राहतो सुमन संजय जवळ येऊन मान खाली घालून उभी राहते संजय आपल्या हाताने तिची मान वर करून तिच्या नजरेला नजर देत डोळे मारतो. तेवढ्यात सुमन लाजून पदर तोंडावर धरते आणि जोरात बोलते ...हाय दययां.. सर्व जण पाहू लागतात संजय पण हसून सुमनला हाताला पकडून तिकडून निघून जातो रूम वर आल्यावर संजय आतमध्ये जाऊन एक डबा घेऊन त्यात तांदूळ घालून बाहेर आणतो कंपनीची रूममध्ये सर्व फॅसिलिटी सह तयार असते. आपल्याला फक्त कपडे घेऊन जायचे असते. म्हणून घरातच सर्व मिळत होते. सुमन पायाने डबा हळूच पाडून घरात प्रवेश करते संजय तिला अगोदर सर्व घर दाखवून देतो. फ्रेश झाल्यावर संजय जेवण ऑर्डर करतो दोघेही जेवण करतात जेवण झाल्यावर दोघेही लिव्हिंग रूममधे बसुन टीव्ही पाहत असतात. रात्रीचे 12 वाजतात. तेव्हा संजय आतमध्ये बेडरुममधे जातो थोड्यावेळाने सुमन पण आत येते संजय बेडवर बसलेला असतो. सुमन जवळ येऊन बसते दोघेही एकमेकांना पाहत एकमेकांच्या मिठीत येतात. आणि त्यांच रात्री मिलन होते. संजय सुमनचा नवीन आयुष्यचा प्रवास सुरू होतो. पण संजय साठी हा प्रवास करणे म्हणजे एक जोखमीचे होते. मुंबईला एक बायको आणि 2 मुले, पुण्यात एक बायको असाच प्रवास संजयच्या आयुष्यात सुरू होऊ लागला.
संजय सोमवारी सकाळी 6 वाजता मुंबई मधून निघत असे पुण्यात येण्यासाठी, आणि सकाळी 10 वाजता पुण्यातील ऑफिसमध्ये जात असे. सोमवार ते शुक्रवार असेच चालू असते. आणि मग शुक्रवारी 6 वाजता ऑफिसमधून निघत असे तो 9 वाजता मुंबईला येत असे म्हणजे सोमवार ते शुक्रवार सुमन बरोबर आणि शुक्रवार ते सोमवार सीमा बरोबर.. एक नवरा 2 बायका असा परिवार संजयच्या आयुष्यात सुरू होता.
सुमनला सीमाबद्दल माहिती होते म्हणून काय प्रॉब्लेम नसायचा पण सीमाला काहीच माहिती नव्हते आणि तेच संजयला लपवून ठेवायचे होते असे करता करता 1 वर्षे होऊन गेले. पुण्यात ज्या बिल्डिंगमध्ये सुमन राहत होती त्या बिल्डिंगमध्ये तिची बर्‍याच बायकांबरोबर ओळख झाली होती तेव्हा त्यातील एक बाई सुमनला मराठी बोलण्याची विनंती करते पण सुमनला मराठी येत नसते तेव्हा त्या बायका विचारतात असे का पण, तू तर महाराष्ट्रीयन आहेस ना तुझे नाव सुमन राऊत आहे ना राऊत तर मराठी लोक आहेत तेव्हा सुमन बोलते माझे मिस्टर महाराष्ट्रीयन आहेत मी बिहार राज्यामधून आले आमचा प्रेम विवाह झाला आहे. सुमनचे हे बोलणे ऐकून सर्व जण एकमताने हसू लागतात. तेवढ्यात एक जण तिला बोलते तु मराठी शिकू शकते तुझ्या मिस्टरना सांग मराठी शिकवणीला तुझे नाव घालायला. तु तर घरीच असतेस मग तु जाऊ शकते. आपल्या नाक्यावर एक क्लास आहे तिकडे अ‍ॅडमिशन घे तिकडे इंग्लिश पण शिकवतात तुला फायदा होईल सुमन त्यांचे बोलणे ऐकून शुक्रवारी जेव्हा संजय घरी येतो तेव्हा ती रात्री बेडरुममधे गेल्यावर संजयच्या जवळ येते संजयच्या केसांवर हात फिरवत सांगते मला मराठी आणि इंग्रजी शिकायचे आहे इकडे समोरच एक क्लास आहे तिकडे माझे अ‍ॅडमिशन करून द्या. संजय तिचे हे बोलणे ऐकून थोडावेळ काहीच बोलत नाही आणि नंतर तिला विचारतो की तुझे शिक्षण काय झाले आहे सुमन बोलते मी 10 पास आहे 60 टक्के घेऊन पण आता माझ्या जवळ कोणतेही कागद नाही आहेत ते सर्व जळून खाक झाले असणार. संजय बोलतो त्याची काही गरज नाही आपण उद्याच जाऊन अ‍ॅडमिशन घेऊ ठरवल्याप्रमाणे दोघेही दुसर्‍या दिवशी क्लासरूममध्ये जातात अ‍ॅडमिशन घेतात पुढे बरेच दिवस सुमन क्लासरूममध्ये सर्व लेक्चर अटेंड करत असे आणि एक दिवस ती पूर्णपणे मराठी आणि इंग्रजी बोलायला शिकते. सुमन हुशार असते म्हणुन ती सर्व पटकन शिकते संजय आणि सुमन मग मराठीमध्ये बोलत असे संजयमुळे सुमन पूर्णपणे बदलून जाते. ती बिहार राज्यातील गावातील मुलगी आहे असे नंतर जराही वाटत नव्हते सुमनला एका बॅंकेत जॉब ऑफर येते सुमन संजयला विचारून जॉब जॉइन करते संजयच्या दोन्ही बायका आता बॅंकेत जॉबला होत्या. आणि मग एक दिवस सुमन संजयला एकवीरा आईचे दर्शनासाठी लोणावळामध्ये जाऊया का विचारते. ठरवल्याप्रमाणे दोघेही लोणावळा मंदिरात जाण्यासाठी बाहेर जातात. देवीचे दर्शन घेतल्यानंतर संजय जुन्या पुण्यामार्गाने कार घेऊन जात असतो. तेच समोर एक अपघात झालेला दिसतोय सुमन संजयला गाडी थांबवून चेक करायला सांगते. सुरवातीला संजय तिला नाही बोलतो. पण शेवटी ती त्याला तयार करतेच. दोघेही त्या अपघात झालेल्या कार जवळ जातात. तर आतमध्ये एक कुटुंब असते. नवरा, बायको आणि एक 6 वर्षाची मुलगी. पुरुष मनुष्य जाग्यावर मरतो. पण बाई जिवंत असते. आणि मुलगी पण सुखरुप असते. संजय पोलिसांनी फ़ोन करून अपडेट देतो आणि त्या मुलीला बाहेर काढून सुमनच्या हातात देतो. ती मुलगी सुमनच्या मिठीत जाऊन बसते पोलीस त्या बाईला समोरच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण नवरा मरतो हे त्या बाईला समजते तर ती पण अजून डिप्रेशनमध्ये जाते दुसर्‍या दिवशी सुमन आणि संजय त्या लहान मुलीला घेऊन तिचा आईला भेटायला जातात तेव्हा तिकडे एक वकील आलेला असतो त्या लहान मुलीची आई सुमनला जवळ बोलावून घेते संजय पण मागे उभा असतो वकील पुढे येतात आणि संजय, सुमनला सांगतात की या बाईने हिची सर्व प्रॉपर्टी तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या नावावर करायचे ठरवले आहे. संजय बोलतो का असे का केले या बाईने तर वकील बोलला गेले काही दिवस तुम्ही आणि तुमच्या बायकोने यांच्या मुलीला सांभाळून घेतले त्यामूळे त्या बाईने असे केले संजय बोलतो. पण त्या आता बर्‍यापैकी व्यवस्थीत आहेत ना तेवढ्यात वकील बोलतो नाही त्यांची काहीच ग्यारंटी नाही आहे डॉक्टर बोलले त्या कधीही जाऊ शकतात आणि त्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्याचे अजुन कोणी नातेवाईक नाही आहेत हे 3 जण आणि त्याचे कुटुंब हाच परिवार, त्यांनी त्यांच्या डेड सर्टिफिकेट मध्ये लिहिले आहे की त्यांची मुलगी प्रिया ही 18 वर्षाची होईपर्यंत त्यांची प्रॉपर्टी संजय आणि सुमन राऊत सांभाळून घेतील. प्रियाचे लग्न झाल्यावर तिचा निर्णय असेल त्या प्रॉपर्टीचे काय करायचे. संजय आणि सुमन प्रियाला घेऊन घरी येतात प्रियाला सांभाळत असताना सुमनला तिचा जॉब सोडावा लागतो. पण सुमन या गोष्टीला तयार होते कारण तिला माहिती होते की ती कधीच आई नाही होऊ शकत म्हणून प्रियाला तिने सांभाळून घेतले. प्रिया सुमनला आई आणि संजयला बाबा बोलू लागली प्रियाचे नाव संजयने जे होते तेच लावले ते चेंज नाही केले पण मानलेले आई वडील असे स्कूल मध्ये सागितले.
पुढे बरेच वर्ष निघून गेली प्रिया पण 12 वर्षाची झाली एक दिवशी सीमा संजयला भेटायला पुण्यात आली सीमा अचानक आली तिच्या बँकेतर्फे तिला पुण्यात जावे लागले. मंगळवारचा दिवस होता सीमा काम झाल्यावर संजयला फोन करते. आणि मी पुण्यात आहे तुम्ही कुठे भेटायला येणार. संजय थोडा दचकून बोलतो हो मी येतो भेटायला. सीमा संजय भेटतात. तेव्हा सीमा संजयला घर दाखवा म्हणून सांगते संजय तिला नाही बोलत नसतो. आणि सुमनला आधीच मेसेज करतो की सीमा आली आहे तू थोड्यावेळाने कुठेतरी बाहेर निघून जा. जसा प्लॅन केला तसेच होते. सीमा घरी येते बसते दोघेही चहा घेतात आणि मग 4 वाजता सीमा निघण्यासाठी बाहेर येते संजय पण तिच्याबरोबर असतो बसस्टाफ जवळ संजय, सीमा उभे असतात. तेवढ्यात प्रियाचा लक्ष जातो ती संजयला पाहून जोरात बाबा हाक मारते. प्रियाची हाक आणि सीमाची नजर एक होतात. प्रिया धावून संजय जवळ येते मागुन सुमन धावून येते सीमा सुमन आणि प्रिया एकाच वेळी एकत्र येतात. आणि संजयची बोलतीबंद होते. काय बोलावे सुचत नसते संजय पूर्णपणे घामाघूम होतो सीमा संजयला हसुन विचारते ही मुलगी तुम्हाला बाबा बोलते आहे तेवढ्यात सुमन येते आणि बोलते हो ती तिच्या वडिलांना पापा बोलते. आणि संजयना बाबा बोलते सीमा बोलते ओक्के म्हणजे ओळख आहे तुमची. संजय घाम पुसून बोलतो हा हा हिचे वडील आणि मी मित्र आहोत. तेवढ्यात सीमाची बस येते. आणि सीमा संजयला मिठी मारून बसमध्ये चढते सुमन फारसे लक्ष देत नसते. कारण तिने संजयला आधीच वचन दिले होते की ती त्याच्या लग्नामध्ये कधीच येणार नाही. पण प्रियाला काही समजत नसते. घरी गेल्यावर प्रिया सुमनला विचारते की आई बाबानी असे का केले. तेव्हा सुमन बोलते प्रिया काही गोष्टी अश्या असतात त्या झाकून ठेवावे लागतात आणि तुझ्या बाबांना या गोष्टीच किती त्रास होत असेल याच विचार न केलेलाच बरा प्रिया 12 वर्षाची असते त्यामुळे ती बरीच समजूतदार असते ती सुमनला फक्त येवढेच बोलते कि आई बाबाचा काय प्रॉब्लेम आहे हे नाही माहीत. पण एक स्री म्हणून तुला किती योग्य वाटते ते तूच ठरव, एक स्री दुसर्‍या स्रीला मुर्ख बनवते ना, हे तुला किती योग्य वाटते आणि तू हे विसरू कशी शकते की ती पण एक स्रीच आहे. प्रियाचे बोलणे सुमनच्या लक्षात येते. पण ती त्या गोष्टीचा फारसा विचार नाही करत. संजय आणि सुमन आणि सीमा यांच्या प्रेमाचा त्रिकोण हा असाच चालू असतो.
पुढे बरीच वर्षे निघून जातात सीमाची मुले मोठी होतात. आणि सुमनची मुलगी प्रिया पण मोठी होते. प्रिया एका मेडिकल कॉलेजमधे असते. तिकडे तिची ओळख वैभवबरोबर होते वैभवचे आई वडील मुंबईत असतात. वैभवचे वडील सीमाचे मानलेले भाऊ असतात त्यामुळे वैभव पण मुंबईत संजयच्या घरी येत जात असे. संजयचा मोठा मुलगा सुजल आणि वैभव चांगलेच मित्र असतात. वैभव आणि प्रियाची मैत्री होते, आणि मग प्रेम होते, दोघांचेही मेडिकल शिक्षण पूर्ण होते आणि प्रॅक्टिससाठी दोघेही मुंबईला येतात. तिकडे वैभव प्रियाची सुजल बरोबर ओळख करुन देतो नेहमीप्रमाणे भेटत राहणे या गोष्टी सुरू असतात एक दिवस प्रिया वैभवला लग्नाबद्दल विचारते तेव्हा वैभव तिला सांगतो की मी आधी तुझ्या वडिलांना भेटणार आणि मग माझ्या घरी सांगणार मी पुढच्या वीकेंडमध्ये पुण्यात येणार आहे तेव्हा तुझ्या वडिलांना भेटेन तेवढ्यात प्रिया बोलते वीकेंडला माझे वडील मुंबईला असतात त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी पण आपण तिकडेच भेटू ठरवल्याप्रमाणे प्रिया संजयला आणि सुमनला याबद्दल बोलते. संजय तिला सांगतो ठीक आहे या रविवारी त्याला भेटायला सांग रविवारी प्रिया संजयला फ़ोन करून कुठे भेटायचे ते सांगते. संजय आपल्या मुंबईच्या घरातून बाहेर पडतो. तर सुजल पण त्यांच्या सोबत बाहेर येतो संजय सुजलला विचारतो तु कुठे जात आहेस तेवढ्यात सुजल बोलतो मला वैभवच्या घरी सोडा दोघेही एकमत होऊन निघतात. जसे ठरले तसेच करतात सुजल वैभवच्या घरी जातो संजय पुढे जाऊन प्रियाला भेटतोय संजय आणि प्रिया वैभवची वाट पहात असतात तेवढ्यात सुजल आणि वैभव समोरच दिसतात प्रिया पट्कन आवाज देते वैभव वैभव तेवढ्यात सुजल पाहतो आणि वैभवला सांगतो प्रिया तिकडे आहे दोघेही प्रिया आणि संजयच्या दिशेने येतात आणि एकमेकांना भेटायला जवळ येतात तेच संजय आणि वैभव, सुजल एकमेकांच्या समोर उभे राहतात एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात तेच प्रिया पटकन बोलते बाबा हाच वैभव आणि त्याचा मित्र सुजल, संजयला काय बोलावे सुचत नसते वैभव आणि सुजल एकदम लाललाल होऊ लागतात 4 जण एकत्र बसतात वैभव संजयला हाय करतो आणि प्रिया बरोबर लग्न करायचे आहे तुमची परवानगी असेल तर बरे होईल असे बोलुन सुजलकडे पाहू लागतो सुजल रागाने तिकडून निघून जातो तेवढ्यात वैभव त्याच्या मागे जातो आणि थांब सांगतो पण सुजल ऐकण्यासाठी मनस्थितीत नसतो वैभव त्याला कसाबसा परत घेऊन येतो प्रिया संजय आणि वैभव, सुजल एकत्र बसतात. संजयला वैभवची माहिती आधीच असते कारण वैभवला संजय लहानपनापासून ओळख असतो. बोलुन झाल्यावर प्रिया आणि संजय निघून जातात. पण आपल्या आईला फसवले आपले वडील असे काय करू शकतील या गोष्टीचा विश्वास सुजलला बसत नव्हता. पण एकदा तरी वडिलांना याबद्दल विचारले पाहिजे असे बोलुन सुजल घरी निघून येतो. प्रियाला घरी सोडून संजय परत मुंबईला जाण्यासाठी निघतो.तर सुमन त्याला विचारपूस करते काय झाले तुम्ही लगेच का जात आहात. तेव्हा संजय तिला सांगतो नक्की काय झाले ते. सुमन पण जरा विचारत पडते. आणि संजयला सांगते. तुम्ही लवकर जा आणि सर्व सांभाळून घ्या. संजय लगेचच मुंबईला येतो. घरी आल्यावर सर्व काही नॉर्मल असते. सुजल पण त्याच्या रुममध्ये असतो. संजय नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन बाहेर लिव्हिंगरूम मध्ये येतो. सीमा पण येते आणि विचारते काय झाले. तुम्ही तर पुण्यामध्ये गेला होतात ना, मग परत कसे आलात. तेव्हा संजय विचारतो तुला कोण बोलले. ती बोलली सुजल बोलला. संजयने परत विचारले अजून काय बोलला सुजल, सीमा बोलली काही नाही. असे बोलून सीमा किचनमध्ये जाते. संजय लगेचच सुजलच्या रुममध्ये जातो वडिलांना पाहिल्यावर सुजल बोलतो पापा मला तुमच्या बरोबर बोलायचे आहे तेव्हा संजय बोलतो हो बोलुया आपण, असे बोलुन दोघेही बिल्डिंगच्या गच्चीवर जातात आज बर्‍याच दिवसांनी बाबा आणि मुलगा एकत्रित आले आहे म्हणून एकत्र असतील असा समज सीमा करून घेते आणि फारसे लक्ष देत नाही. गच्चीवर गेल्यावर सुजल वडिलांना मिठी मारतो आणि बोलतो बाबा माझ्या आईच आणि आमचे काय चुकले का, संजय पण भावूक होऊन सुजलची मिठी सोडुन बाजूला होतो आणि बोलतो की तुमचे काहीच नाही चुकले, चुकलो फक्त मीच कारण हा जॉब, मी नाही करायला हवा होता कारण या जॉब मुळे काही नाती माझ्याशी जोडली गेली आणि जी नाती आहेत त्यांना मी व्यवस्थीत वेळ नाही देऊ शकलो. सुजल ऐकून थोडा पुढे येऊन परत वडिलांना पाहत विचारतो बाबा काय झाले आहे तेव्हा संजय बोलतो. सुजल बेटा गेली काही वर्ष माझ्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी अचानक काही घडत गेल्या. तू 5 वर्षेचा असताना माझी ट्रान्सफर बिहार राज्यात होते. आणि तिकडेच सुमन नावाच्या मुलीबरोबर मला लग्न करावे लागते. आणि जर मी हे लग्न नसते केले तर एका मुलीचा जीव गेला असता. तिचा जीव गेला असता तर माझे काहीच नुकसान झाले नसते पण मला हिच गोष्ट आयुष्यभर खोचक राहिली असती. आणि त्यामुळे मला हे पाऊल उचलले गरजेचे होते. सुमनचे तिच्या गावांमध्ये मध्ये बरेच अत्याचार झाले होते आणि त्यात तिचे आई ,वडील मारले गेले. सुमन एकटीच होती जी वाचली. आणि ती माझ्यामुळे, पण बिहार राज्यातील सुमनच्या गावांमध्ये सुमन 16 वर्षांपूर्वी मेली सुमनबरोबर मी लग्न केले पण आणि तिला पुण्यातील एका फ्लॅटमध्ये रहायला आणले मला आधीच तुम्ही 2 मुले होतात म्हणून सुमनने तुलाच मुलगा मानले तुझे फोटो पाहत ती मन मारून घेत होती. तेवढ्यात सुजल बोलला मग प्रिया तुम्हाला बाबा का बोलते. संजय बोलतो प्रिया आमची मुलगी नाही आहे ती फक्त आमची मानलेली मुलगी आहे आम्ही एकदा एकवीरा आईचे दर्शनासाठी लोणावळामध्ये गेलो होतो तेव्हा एका कुटुंबाचा अपघात होतो त्या गाडीमधे 3 जण असतात नवरा बायको आणि एक 6 वर्षाची मुलगी त्या मुलीचे वडील मरतात. आणि तिची आई पण वाचण्यासाठी धडपडत असते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिच्या त्या लहान मुलीला ती बाई आमच्या हातात देते आणि बोलते माझ्या मुलीला मी बरी होई पर्यंत सांभाळून घ्या. मी तुमचे उपकार नाही विसरणार म्हणुन मग प्रियाला मी आणि सुमन घरी घेऊन आलो 15 दिवस प्रिया सुमन जवळ होती. 15 दिवसांनी हॉस्पिटल मधून फोन येतो की प्रियाची आई मेली पण जाण्यासाठी पूर्वी एक वकीलपत्र देऊन गेली असे तिकडे उपस्थित असणाऱ्या वकिलाने सांगितले. त्या वकीलपत्रमध्ये असे नमूद केले होते. की जोपर्यंत प्रिया 21 वर्षाची होत नाही तोपर्यंत सर्व प्रॉपर्टी संजय आणी सुमन जवळ सुरक्षित राहील प्रिया 21 वर्षाची झाली की ती तिच्या प्रॉपर्टीचे जे काही करायचे ते करेल. आम्ही ते वकीलपत्र घेऊन प्रियाला सांभाळून घेतले. पण मी फक्त तिला आपली मानस मुलगी मानले. माझे नाव तिला नाही दिले. तिचे नाव आहे तेच ठेवले. सुमन आणि मी तिचे आई वडील झालो असे काही गोष्टी घडत गेल्या आणि आज अश्या प्रकारे सर्वात अगोदर तुला समजले. सुजल मी तुझ्या आईवर भरपूर प्रेम करतो. ती आहे मधूनच मी आहे मला तिला गमवावे लागेल असे काहीच करायचे नाही. म्हणून मी इतके वर्ष सुमन आणि प्रियाला लांब ठेवले पण आता नियतीने पण काय समोरच आणून ठेवले बघ की नेमके वैभव आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रिया माझी मानलेली मुलगी आणि वैभव तुझ्या आईचा भाचा आता सीमाला सर्व समजणार आणि ती मला सोडून जाणार सुजल मी तुमच्या शिवाय नाही राहू शकत आता काय करायचं तूच सांग.
सुजल वडिलांना जवळ घेतो आणि आणि सांगतो असे काही नाही होणार बाबा काही तरी मार्ग नक्कीच निघेल वैभव बरोबर मी बोलतो तुम्ही प्रियाला सर्व सांगून टाका वैभव आणि तुमचे काय नाते आहे ते. आणि दोघेही परत घरी निघून येतात सीमा घरी आल्यावर सुजल आणि संजयला जेवताना सांगते की आपल्या वैभवचे लग्न ठरले आहे. पुण्याची मुलगी आहे प्रिया नावाची, प्रेम विवाह आहे. मेडिकल कॉलेजमध्ये जमले. सुजल पटकन बोलतो. हो आई मला माहित आहे, आज आम्ही भेटलो तेव्हा तो बोलला. तेवढ्यात सीमा बोलली की अरे हो आज तू पण होतास ना वैभव बरोबर त्या मुलीच्या वडिलांना भेटायला गेला होता ना तुम्ही. कसे आहेत तिचे वडील, आणि ती पण, सुजल बोलतो. आई तिचे वडील खुप चांगले आहेत अगदी आपल्या बाबा सारखे आहेत. सीमा लगेचच बोलते आपले बाबा जगातील बेस्ट बाबा आहेत त्याच्याशी तुलना म्हणजे नक्कीच प्रियाचे वडील पण ग्रेटच असणार. सुजल आणि संजय एकमेकांना पाहत राहतात आणि जेवण करायला सुरुवात करतात. थोड्यावेळाने संजय आणि सीमाबेडरूम मध्ये जातात तेव्हा सीमा संजयला सांगते की वैभवचे लग्न आहे तर तुम्ही 8 दिवस सुट्टी घ्या जमले तर, संजय बोलतो मी ट्राय करतो.दुसर्‍या दिवशी संजय पुण्यात जातो आणि सुमनला सर्व सांगतो. सुमन त्याला सावरून सांगते सर्व नीट होईल तुम्ही काही काळजी नका करु तेवढ्यात प्रिया तिकडे येते आणि सांगते बाबा वैभवच्या घरी जायचं आहे तेव्हा तुम्ही दोघेही माझ्याबरोबर चला संजय चटकन सुमनकडे पाहतो सुमन संजयला डोळ्याने खुणावते आणि शांत रहायला सांगते. ठरवल्याप्रमाणे वैभवचा फ़ोन येतो की तुझ्या आईला आणि वडिलांना येत्या रविवारी आमच्या पुण्यातील घरी घेऊन ये. प्रिया तसे सुमनला सांगते. प्रिया संजयला पण फ़ोन करून सांगते संजय हो बोलतो आणि वेळ मारून घेतो.
रविवार उजाडतो प्रिया सुमनला बाबा कुठे आहेत विचारत. तेव्हा सुमन सांगते तुला बाबानी लोकेशन सेंट करायला सागितले आहे. ते डायरेक्ट येणार बोलले. मग प्रिया आणि सुमन वैभवच्या घरी जाण्यासाठी निघाले. प्रिया आणि सुमन वैभवच्या घरी आले तेव्हा प्रिया संजयला फोन ट्राय करू लागली. पण फ़ोन लागत नव्हता मग सुमन वैभवच्या वडिलांना आणि आईला भेटली. सर्व बोलणी झाली़ आणि सगळे निघण्यासाठी बाहेर आले तेवढ्यात संजयने सुमनला मेसेज केला की वैभवला आणि प्रियाला नुसते घेऊन समोरच एक बसडेपो आहे तिकडे ये. सुमन वैभवला विनंती करते की तू आमच्याबरोबर चल, वैभवचे वडील पण वैभवला सांगतात. हो जा बस स्टॉपवर सोडून ये तुझ्या सासु बाईला, वैभव पण हसून हा बोलतो. तिघेही बस स्टॉप जवळ येतात तेवढ्यात संजय तिकडे कार घेऊन येतो. आणि प्रियाला आवाज देतो. प्रिया खुष होऊन संजय जवळ जाते. आणि मिठी मारते. आणि सांगते बाबा तू का नाही आलास वैभवच्या वडिलांना भेटायला, चल जाऊन भेटू. संजय प्रियाला सांगतो प्रिया तुझ्याबरोबर बोलायचे आहे वैभव तू पण चल तेवढ्यात वैभव बोलतो काका मला सर्व माहिती आहे सुजल बोलला. संजय बोलतो पण आता प्रियाला समजले पाहिजे. प्रिया एकदम हादरून जाते आणि विचारते काय झाले आहे काही प्रॉब्लेम आहे का, तेवढ्यात वैभव बोलतो प्रॉब्लेम आहे पण आपण ठरवले तर नीट होईल सर्व. प्रियाला काहीच समजत नसते मग संजय तिच्याजवळ येऊन तिला सांगतो प्रिया बेटा चल गाडीत बस सांगतो सर्व, आणि सर्वजण गाडीत बसतात. संजय गाडी पुण्यातील एका शांत ठिकाणी घेऊन जातो. आणि थांबवून ठेवतो प्रियाला सांगतो प्रिया बेटा कदाचित मी तुझ्या आणि वैभवच्या लग्नात असेन की माहिती नाही. प्रिया विचारात पडते. आणि बोलते बाबा काय झाले आहे तुम्ही अचानक असे का बोलत आहात. तेवढ्यात सुमन प्रियाला जवळ येऊन बोलते प्रिया मी सांगते काय प्रॉब्लेम आहे ते.असे बोलून सुमन अगदी सुरवातीपासून प्रियाला सर्व सांगते. प्रिया हे सर्व ऐकून एकदम गप्प होते. तिला हे माहिती असते की संजय आणि सुमन तिचे मानलेले आई वडील आहेत पण हे माहिती नव्हते संजयचे 2 लग्न झाले आहेत. त्यामुळे तिला एकदम धक्काच बसतो. पण सुमनचे ऐकल्यावर ती थोडी शांत होते. थोड्यावेळाने संजय तिच्या सोबत मागे येऊन बसतो आणि तिला सांगतो प्रिया मला माफ कर मी लग्नात तुझा बाबा म्हणून नाही येणार पण वैभवचा काका म्हणून नक्कीच येणार. पण प्रिया तयार नसते ती बोलते नाही मला हे माहित नाही तुमच्या बरोबर काय झाले ते. मला फक्त एवढेच माहिती आहे की तुम्ही माझे बाबा आहात कारण मला माझे जन्म देणारे आई वडील आठवत पण नाही मी तुम्हाला बाबा आणि आई म्हणून नेहमी या माझ्या आईलाच पाहिले आहे बाबा मी लग्न होऊन जाणार आहे माझी हीच इच्छा आहे की तुम्हीच माझे कन्यादान केले पाहिजे नाहीतर मी कधीच तुम्हाला माफ नाही करणार आणि कधीच तुमच्याबरोबर बोलणार नाही असे बोलून प्रिया सुमनला मिठी मारून रडू लागते. संजयला काहीच समजत नसते काय करायचे ते.
पुढे काही दिवस असेच निघून जातात एक दिवस सीमा संजयला बोलते मी उद्या दादा जवळ पुण्यात येणार आहे तेव्हा वैभवच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जाणार आहे तुम्ही पण या आपण भेटायला जाऊ. संजयला अजुनच टेंशन येते त्याने लगेचच सुमनला आणि प्रियाला सागितले आणि त्या दोघींनाही प्रियाच्या आई वडील राहत असलेल्या घरी जाण्यासाठी सागितले. सीमा पुण्यात आली आणि तिने संजयला फोन केला आणि सागितले मी दादाच्या घरी जाते तुमचे काम झाले की मला फ़ोन करा. संजय बोलला हो चालेल आणि मग सीमा प्रियाला फोन करते. आणि सांगते मी वैभवची आत्या आहे. मी पुण्यात आहे. मला तुला भेटायचे आहे. आपण भेटायचे का? प्रिया लगेचच हो बोलते. आणि घरचा पत्ता देते. सीमा संजयला फ़ोन करून मधेच भेटायला बोलावते आणि ते दोघेही प्रियाला भेटायला जातात.सीमा, संजय प्रियाच्या घरी येतात. तेवढ्यात प्रिया लगेचच सीमाला पाहते. आणि तिला आठवते की आपण या बाईला अगोदर कोठेतरी पाहिले होते. पण तिच्या लक्षात येत नसते. ती सुमनला पण सांगते. तेव्हा सुमन बोलते असेल इथे पुण्यात कुठेतरी पाहिले असणार. त्या पुण्यात येत असणार ना, प्रिया हो बोलून सीमा बरोबर गप्पा मारत बसते. सीमा आणि संजय निघण्यासाठी...बाहेर येतात. सीमा संजयला बोलते तुम्ही आता सुट्टी घ्या लग्न 10 दिवसांनी आहे. आणि घरातले लग्न आहे. दादाला मदत होईल संजय बोलतो हो 2 दिवसांनी सुट्टी घेतो. आता काही कामाचा लोड आहे तो कोणाला तरी द्यावा लागेल. सीमा बोलली पण घ्या सुट्टी आठवणीने. आणि आता तुम्ही मुंबईला येणार आहात ना?संजय बोलतो. हो मग तुला एकटीलाच कसे पाठवून देणार, येतो मी, आपण कारनेच जाऊया सीमा आणि संजय कारने मुंबईला जाण्यासाठी निघतात. सुमन आणी प्रिया पुन्हा आपल्या घरी येतात सुमन प्रियाला समजावून सांगते की तू तुझ्या बाबांना त्रास करून देऊ नकोस ते जे काही बोलत आहेत ते मान्य कर तेवढ्यात प्रिया बोलते आई बाबांना फक्त त्यांचे अगोदरच लग्न आणि ती माणसे हवी आहे त्यांना आपल्या दोघांचे काहीच देणे घेणे नाही आहे असेच वाटते. मग सुमन तिला परत एकदा समजावून सांगते की तसे काही नाही आणि बाबांचा तो परिवार आपल्यासाठी वेगळा नाही आहे. ते पण आपलेच आहेत. ते परके नाही कारण त्यांचे नाते हे आपल्या बाबान बरोबर बांधले गेले आहे. म्हणून ते पण आपलेच आहेत आणि बाबांचा सीमा ताईवर खुप विश्वास पण आहे आणि प्रेम पण सीमा ताई माझ्यासाठी मोठया ताई आहेत आणि तुझी मोठी आई म्हणून त्यांचा आदर करावेच लागणार. जर बाबा बोलत आहेत त्यांना कन्यादान नाही जमणार तर त्यांना नको जबरदस्ती करू आणि आता ते आले की त्यांना सॉरी बोल प्रिया तिच्या आईचे ऐकून हो बोलते.संजय सुट्टी साठी अर्ज देऊन घरी येतो. आणि सुमनला सांगतो मी तिकडेच राहणार आहे आता. सर्व जबाबदारी तुझ्यावर सोडून जातो प्रियाला तूच व्यवस्थीत तयार करून लग्नाला घेऊन ये. लग्न पुण्यात आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही आदल्या दिवशी पुण्यात येऊ मी तुला फोन करत राहीन पण एक गोष्ट लक्षात ठेव की. काही विपरीत घडू नये मी नंतर सर्व व्यवस्थीत करेन. सुमन संजयचे बोलणे ऐकून घेते आणि हो बोलते. मी सर्व व्यवस्थीत करून घेईन सांगते. सुजल आणि वैभव एकमेकांना भेटायला येतात. तेव्हा सुजल वैभवला बोलतो की टेंशन आले आहे माझ्या आईला समजले तर काय होईल. तेवढ्यात वैभव बोलतो काही नाही होणार कारण आत्या समजदार आहे तिला काही समजले जरी तरी ती लग्नात काही करेल असे मला नाही वाटत ती जे पण करेल ते योग्य करेल तू टेंशन नको घेऊ.
लग्नाचा दिवस उजाडला जातो. सर्व जण आपली आपली तयारी करत असतात संजय सुमनला फोन करून प्रियाची चौकशी करतो. आणि हॉलमध्ये भेटू सांगतो. वैभवच्या घरी पण सर्व तयार होऊन हॉलमध्ये मध्ये जाण्यासाठी निघतात. दोन्ही परिवारातील नातेवाईक हॉलमध्ये जमा होतात. वैभव अगोदरच येऊन त्याचे जे काही लग्न विधी आहेत ते करत असतो. तेवढ्यात प्रिया पण हॉलमध्ये मध्ये येते प्रिया खूप सुंदर दिसत असते. सुमन पण तिच्या बरोबर असते. जेव्हा प्रिया सुमन आणि काही नातेवाईक हॉलमध्ये येतात तेव्हा प्रियाचे वडिलांना भेटायला वैभवचे नातेवाईक पण पुढे येतात. ते प्रिया आणि सुमनचे स्वागत करतात. आणि प्रियाच्या वडिलांबद्दल विचारणा करतात. तेव्हा सुमन बोलते ते येतील मागुन, त्यांना काम आले, म्हणून ते डायरेक्ट नाही आले. वैभवच्या घरी चर्चा होऊ लागली की प्रियाचे वडील मागे पण आले नव्हते आणि आता पण नाही ही बातमी सीमाच्या कानावर पडते. सीमा लगेचच वेळ मारून घेऊ लागते. सीमा बोलते ही सर्व चौकशी तुम्ही आधी करायला हवी होती. आता लग्नात नको ही चर्चा, असे बोलून सीमा वैभवच्या रूममध्ये जाते. संजय तिकडेच असतो. पण काहीच करू शकत नसतो. सुजल संजय जवळ येतो आणि बोलतो बाबा काय हे प्रियाला बाबा असताना ही तिला असे बिना बापाचे टोमणे ऐकावे लागत आहे. बाबा काहीच मार्ग नाही का यावर, तेवढ्यात संजय बोलतो .जर असे होऊन काही तरी चांगले होणार असेल तर बरे आहे जे होते आहे ते. त्यामुळे आपण गप्प राहिलेले बरे, आणि तुझी सुमन आई सर्व सांभाळून घेईल. गेले 15,16 वर्षे तिने मला खूप सांभाळून घेतले आहे. आणि आता ही घेईल. लग्नासाठी सर्व एकत्र जमा होतात. प्रिया आणि वैभव पण एकत्र मंडळात समोरासमोर उभे राहतात आणि एकमेकांना पाहत राहतात. तेवढ्यात वैभवला प्रियाचा चेहरा थोडा उदास दिसतो. वैभव प्रियाला बोलतो प्रिया नको अशी उदास होऊ आज आपले लग्न आहे. तेव्हा प्रिया बोलते ज्या लग्नात मुलीचे वडील जवळ असूनही वडील म्हणून वागत नसतील त्या लग्नात ती मुलगी कशी खूश असणार. तेवढ्यात तिकडे सुजल येतो. आणि प्रियाला बोलतो. वडील नसले तर काय झाले तुझा भाऊ आहे ना, मी करेन भावाचे कर्तव्य, आणि वडिलांचे पण, प्रियाला जवळ घेऊन तिला गप्प करतो. सीमा आणि सुमन हे पाहत उभ्या असतात.प्रिया संजयकडे पाहत रडत असते. गुरुजी नवरा आणि नवरीला मंडपात येण्यासाठी विनंती करतो. आणि लग्न लावण्यासाठी मंत्र बोलू लागतो. संपूर्ण हॉलमध्येमध्ये सर्व नातेवाईक एकत्र येऊन पाहत असतात. नंतर गुरुजी आवाज देतात. मुलीच्या आई आणि वडिलांना बोलवावे. कन्यादान करायचे आहे. गुरुजी नुसते असे म्हणाले आणि सुजल, वैभव, प्रिया संजयकडे पाहू लागले. सुमन पण हळूहळू मंडपात येऊ लागते. तेवढ्यात वैभवचे वडील सुमनला प्रियाच्या वडिलांनबद्दल विचारणा करतातच सुमन गप्प बसते. आणि संपूर्ण हॉलमध्ये एक शांतता पसरली जाते. सुमनला काय बोलावे सुचत नसते ती एकदम एका जागी स्थिर ऊभी राहते आणि हात जोडून विनंती करते. की कन्यादान मी एकटीच करणार आहे. हे ऐकल्यावर वैभवच्या आईला एकदम राग येतो. आणि ती पुढे येऊन बोलते तुम्ही कन्यादान करणार म्हणजे, प्रियाचे वडील कुठे आहेत. मागे पण तुम्ही बोललात ते येणार आहेत. पण ते काय आले नाही. आणि आज पण ते अजून पण कुठे दिसत नाही. तुम्ही आमच्यापासून काय तरी लपवून ठेवत आहात. आम्हाला या लग्नानंतर समजले तर त्याचा त्रास होण्यापेक्षा आताच काय ते सांगून टाका नाहीतर आम्ही लग्न मोडतो. वैभवची आई असे बोलून गेल्यावर सुमन एकदम शांत होऊन रडू लागते. सुमनच्या अश्या वागण्याचा वैभवच्या वडिलांना आणि नातेवाईक लोकांना पण राग आला. आणि सुमनच्या वडिलांनी वैभवला मांडवातून उतरण्याची ऑर्डर दिली. सर्व एकमेकांशी चर्चा करू लागले. सगळीकडे कुजबूज सुरू होऊ लागली. वैभव वडिलांना म्हणाला बाबा प्रियेचे वडील नसलेल्या काय फरक पडतो तिची आई तर आहे ना मग बस झाले. वैभवचे वडील रागाने वैभव जवळ बोलले तु लहान आहेस बेटा तुला तरी माहिती आहे का हिचे वडील कुठे आहेत. जर ते वारले असते. तर आपल्याला आधीच समजले असते. पण ते जिवंत आहेत मग इथे का नाही. काय लपवून ठेवले आहे आपल्यापासून ते समजल पाहिजे. नक्की प्रियाला वडील आहेत की ती कोणाचे तरी...... असे बोलून वैभवचे वडील गप्प होतात. सुमनला हे ऐकल्यावर एकदम राग येतो. आणि ती पटकन बोलते. कोणाचे म्हणजे काय?..काय? बोलता आहे तुम्ही, तुम्हाला समजते काय? तुम्ही स्वतःला सुरक्षित समजता ना मग असे आरोप करताना तुम्हाला काहीच वाटत नाही. सुमनच्या अश्या वागण्याचा वैभवच्या वडिलांना राग येतो आणि ते बोलतात हे लग्न मोडले आम्ही निघतो असे बोलून ते वैभवचा हात पकडून त्याला घेऊन जाणार तेच मागून आवाज येतो...थांबा....तेवढ्यात सर्व जण एकदम मागे पाहतात..... तर मागे सीमा ऊभी असते... सीमाला पाहून वैभवचे वडील तिला बोलतात सीमा पाहिले ना हे काय चाललंय ते, सीमा पटकन बोलते दादा थांब! सीमा मागे येऊन संजयचा हात पकडून संजयला मांडवाच्या दिशेने घेऊन येते.. संजयला पण काहीच समजत नसते. संजय एकदम कावराबावरा होतो. सीमा आणि संजय मांडवात येतात. आणि सीमा संजयला कन्यादान करण्यासाठी ठेवलेल्या पाटावर बसवते. आणि वैभव, प्रियाला पण बसायला सांगते. सर्वांना वाटते सीमा आणि संजय कन्यादान करण्यासाठी पुढे येत आहेत. पण संजयच्या बाजूला असलेल्या पाटावर सीमा जवळ येऊन सुमनचा हात पकडून तिला त्या पाटावर बसवते.आणि संपुर्ण हॉलमध्ये मध्ये एकदम शांतता पसरली जाते. संजयला एकदम धक्का बसतो आणि संजय सीमाला बोलतो सीमा हे सर्व काय? सीमा संजयला आणि संपूर्ण हॉलमध्ये असलेल्या नातेवाईक मंडळीना हात जोडून सांगते की प्रियाला वडील आहेत आणि ते संजय आहेत......
एखादी वीज चमकते तसा हॉलमध्ये सीन होऊन जातो आणि सर्व जण परत कुजबूज सुरू करू लागतात.वैभवचे आई वडील पुढे येऊन सीमाला विचारतात सीमा हे सर्व काय आहे. तेवढ्यात सीमा बोलते हो दादा मी जे बोलत आहे ते खरे आहे. प्रिया संजयची मानलेली मुलगी आहे. प्रिया 6 वर्षाची असताना तिचे आई वडील एका अपघातात वारले आणि तेव्हा पासून तिला संजय आणि सुमन सांभाळत आहे.
.........सुमन संजयची दुसरी बायको....
असे नुसते ऐकले आणि पुन्हा सर्व कुजबूज करू लागले. तेवढ्यात सीमाच बोलते तुम्हाला सर्वांना हाच प्रश्न पडला असेल ना की हे नेमकं काय सुरु आहे तर मी सांगते. संजयना आमचे लग्न होण्याच्या आधीच एक अचानक काही घडते. तसा जॉब मिळतो.जॉब मिळतो आणि पुन्हा अचानक काही घडते. तस बिहार राज्यात ट्रान्सफर होते.आणि त्याच बिहार राज्यात अचानक काही घडत. तसेच सुमन बरोबर ओळख होते. आणि त्यांना लग्न करावे लागते. सुमनला घेऊन पुण्यात आल्यावर पुन्हा अचानक काही घडत. तसेच प्रियाची जबाबदारी सुमन आणि संजयवर येते.गेले 16 वर्ष हा माणूस 2 बायका आणि 3 मुलांची जबाबदारी घेत होता. आणि हे करताना त्याला किती यातना झाल्या असतील याचा आपण विचार केला पाहिजे. येवढे करताना पण त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम कायम राहिले. त्यांच्या आयुष्यात अचानक काही गोष्टी घडत गेल्या पण त्या त्यांनीच स्वतःच्या खांद्यावर घेतल्या. दोन्ही घरे त्यांनी सांभाळून घेतली पण स्वतःला होणाऱ्या त्रासला कधीच दाखवून दिले नाही. हे सर्व असेच चालू असते आणि त्यात माझे आणि सुमनचे काहीच नुकसान नव्हते आम्ही मजेत होतो. कारण आम्ही हे मनापासुन स्विकारले होते.पण वैभव आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात पडले आणि वैभव नेमका माझाच भाचा होता हे संजयना समजले आणि सर्व तिकडेच विस्कळीत झाले.....दादा संजयचे सुमन बरोबर लग्न झाले कारण हे संजयला करावे लागले नाहीतर सुमनला मरावे लागले असते.संजयने सुमनचा जीव वाचवण्यासाठी लग्न केले आणि प्रियाचा सांभाळ करण्यासाठी तिला मुलगी मानले. त्यामुळे मुलीला वडील आहेत. मग हे कन्यादान ते करू शकतात. मी तूला हात जोडून विनंती करते हे लग्न मोडू नकोस, यांचे लग्न होऊन, जाऊदे.तेवढ्यात संजय उठून उभा होतो. आणि सीमा जवळ येऊन तिचा हात हातात घेऊन तिला बोलतो तुला हात जोडायची काही गरजच नाही. कारण आम्ही काही वाईट केले नाही आहे. मी जे केले ते परिस्थिती नुसार केले. आता पण समोर नाही आलो कारण मला समाजाचे काही देणेघेणे नाही. फक्त मला तूला गमवायचे नव्हते. म्हणून मी मागे मागे राहिलो. पण आता तुला समजले ना, मग हो मीच प्रियाचा बाबा आहे. आणि सुमनचा नवरा आहे. आणि आता हेच माझे कुटुंब आहे. बाकी प्रिया आणि वैभवचे एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्यांना आयुष्यत एकत्र येऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे तेच ठरवतील आता लग्न करायचे की नाही. वैभव पुढे येऊन त्याच्या वडिलांना सांगतो मी प्रिया बरोबर लग्न करणार. संजय काकाच्या बाबतीत जे काही घडले त्याचा आमच्या लग्नाशी काही संबंध नाही. वैभव गुरूजीना बोलावून सांगतो. गुरूजी कन्यादान करा तेवढ्यात वैभवचे वडील बोललात आम्ही लग्न नाही मोडणार कारण आमच्या मुलाची इच्छा आम्ही पूर्ण नाही करणार, तर कोण करणार, पण मला एक विचारायचे आहे. की हा सर्व ड्रामा लग्नात का? सीमा बोलते तिला सर्व माहिती होते. मग सीमा तू संजयला का नाही सागितले. आणि आतच का? सीमा बोलते की मला हे माहित आहे असे हे संजयला समजावे असे मला आणि सुमनला वाटत नव्हते. जे जसे चालू होते तसेच चालू राहू देण्याचे होते. पण दादा तू लग्नात परिस्थिती अशी आणून ठेवली की मला मधेच तोंड घालावे लागले. संजय सीमा जवळ येऊन बोलतो. तुला हे माहीत होते. हे सुमनला कसे माहीत, तेव्हा सीमा बोलते की मला हे सर्व सुमन बोलली. आणि एकच सर्व वातावरण शांत होते. सर्व सुमनकडे पाहू लागतात. सुमन संजयकडे पाहत राहते. संजय सुमन जवळ येतो तेव्हा सुमन घाबरून शांत ऊभी राहते. कारण सुमनचे संजयवर खूप प्रेम असते. संजय सुमनला विचारतो सुमन हे सर्व काय आहे.तेव्हा सुमन बोलते. हो सीमा ताईला मीच सर्व सागितले. आणि हे आता नाही सागितल. तर 12 वर्षांपूर्वी सागितले. संजयच्या बाबतीत पुन्हा एकदा अचानक काही घडत, तसेच घडले.
संजय एकदम शांत झाला. आणि जमिनीवर कोसळला. तेव्हा लगेचच सीमा आणि सुमन दोघेही संजयला सावरतात. सुमन बोलते मी सीमा ताईला सर्व सागितले हे तुम्हाला सांगायला हवे, असे मी ठरवले, पण सीमा ताई बोलल्या संजयला आता काहीच सांगू नकोस मी वेळ आल्यावर सर्व सांगेनच. आणि सीमा ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे त्याचे ऐकलेच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काहीच नाही बोलली. प्रिया सुमन जवळ येऊन विचारते. आणि बोलते आई तू मला पण का नाही सागितले. तेव्हा सुमन बोलते. खरे तर सीमा ताईला सर्व सागितले याचे कारण तुच आहेस. गेल्या आठवडय़ात सीमा ताई आपल्याला भेटायला आल्या होत्या. तेव्हा तू मला बोलत होतीस की या बाईना कुठे तरी पाहिले पण आठवत नाही. तेव्हा मी तुला बोलली होते हो असेल कुठेतरी पण खरे हेच आहे की तू सीमाताईला कुठे पाहिले ते मला माहीत होते. तू 12 वर्षाची असताना सीमा ताई एकदा पुण्यात आली होती. तेव्हा सीमा ताई तुझ्या बाबांना घेऊन बस स्टॉपवर ऊभी होती. आणि तू पटकन तिकडे गेलीस आणि बाबांना आवाज दिला तेव्हा बाबा सीमा ताईला बोलले. की तू त्यांच्या मित्राची मुलगी आहेस. आणि हे ऐकल्यावर तू घरी येऊन मला विचारले होते. असे बाबा का बोलले, आणि तेव्हाच तू हे पण बोललीस, की आई बाबा तर पुरुष आहेत. त्यांचे काय असेल ते असूदे. पण तू एक स्री आहेस. आणि एका स्रीने दुसर्‍या स्रीला असे फसवले तर ते योग्य आहे का? एक स्री मधून तुला काय वाटतं याचा तू विचार कर, आणि तेव्हा मला समजले की मी चूक करत आहे. अगोदरच मी खुप मोठी चुक केली होती. सीमा ताईच्या बाबतीत. मी त्यांच्या नवऱ्याला आपला नवरा करून घेतले होते. आणि हे योग्यच नव्हते. म्हणून मी संजयच्या मोबाईल मधील सीमा ताईचा नंबर घेऊन त्यांना भेटायला मुंबईला गेली. आणि सर्व सागितले. पण सीमा ताईचे मन खुप मोठे, आणि त्यांनी मला त्यांची सवत मान्य केली. संजयना त्या काहीच नाही बोलल्या. हे सर्व ऐकून संजयला धक्का बसला. पण त्याने प्रियाला सागितले कि आता मी आधी माझ्या मुलीचे कन्यादान करणार नंतर आपण आपल्या घरातील गोष्टीचा विचार करूया. संजय वैभवच्या वडिलांनाचा हात हातात घेऊन बोलला की, दादा चला लग्न उरकून घेऊ. वैभवचे वडील पण तयार झाले. आणि नंतर गुरुजी परत जवळ येऊन कन्यादानसाठी बोलू लागले. तेव्हा प्रिया बोलली थांबा, मला आधी थोडेसे बोलायचे आहे. वैभवने विचारले काय झाले प्रिया, तेव्हा प्रिया बोलते. की मला हे लग्न करायच्या आधी तुझ्या घरच्यांबरोबर बोलायचे आहे. वैभव विचारतो काय बोलायचे आहे तूला आता.. हो मला हेच बोलायचे की लग्न झाल्यावर आई आणि बाबा किवा तुझ्या घरच्या कोणत्याही लोकांनी मला परत माझ्या आई आणि बाबा बद्दल बोलू नये हा विषय इकडेच संपला आहे कारण मला टोमणे ऐकायला आवडत नाही मी जे आहे ते स्पष्ट बोलते. त्यावर वैभव बोलला प्रिया आता तू तुझ्या घरातील लोकांबरोबर असणार आहेस. परके कोणी नसणार. त्यामुळे तुला टोमणे मारून कोणीही नाही बोलणार. आणि जर बोलले तर काय उत्तर दिले पाहिजे ते मी देईन, असे बोलून वैभव प्रियाला घेऊन मांडवात येतो. आणि रीतसर लग्न होते. सर्व आपल्या आपल्या घरी जातात. सुमन, सीमा आणि संजय पण निघत असतात. सुजल आणि लहान मुलगा रुपेश तिकडेच असतात. तेवढ्यात सीमाच बोलते. आता मुंबईला जाऊया का? की सकाळी निघायचे. संजय बोलला नको उद्या जाऊ, असे बोलून सर्व पुण्यातील घरी निघून जातात. दुसर्‍या दिवशी सकाळी सीमा तयारी करते. मुलेही तयार असतात. पण सुमन तयार नसते. म्हणून सीमा तिला बोलते. की सुमन तू पण आता मुंबईला चल. तू एकटी इकडे का राहणार, आता आपण एकत्र राहूया. तेव्हा सुमन बोलते नाही ताई मी इकडे पुण्यात राहीन. आपण वेगवेगळे राहूया, कधीतरी एकत्र येऊ, लांब राहून आपल्यामध्ये अजून गट्ट नाते होईल, आणि आपल्या संजयना पण काही त्रास नाही होणार. जे जसे चालू होते तसेच राहूदे कारण प्रिया पण इकडेच आहे. तिचे माहेर इकडे असणे गरजेचे आहे. सीमा आणि संजयला पटले. पण सुमनने सीमा जवळ अजून एक गोष्ट मागितली. तेव्हा सीमा बोलली बोल तुला अजून काय हवे आहे. तेव्हा सुमन बोलली की सुजल माझ्याकडे राहिल, आणि रुपेश तुमच्या जवळ, कधीतरी रुपेश माझ्याकडे, आणि सुजल तुमच्याकडे, मला पण माझ्या मुलांबरोबर राहून द्या. सीमाच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात सुमन पुढे येते. आणि डोळ्यातले पाणी पुसत बोलते. ताई आता आपण सर्वच वाटून घेऊ पण वेगवेगळे राहून. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. संजयला हे सर्व पाहून एकदम भरून येत आणि संजय बोलतो. काही गोष्टी अचानक घडतात. तेव्हा त्या गोष्टी खुप त्रास देतात. पण अश्या गोष्टी अचानक घडल्या तर परत परत घडत राहिले पाहिजेत......
अश्या प्रकारे संजयच्या आयुष्यात अचानक काही घडले आणि सर्व व्यवस्थीत झाले..
कारण ज्या गोष्टी अचानक घडतात. त्याच गोष्टीला
म्हणूनच बोलले जाते.
.......अचानक काही घडले.....
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा वास्तव जीवनाशी काहीच संबंध नाही. केवळ लोकांचे मनोरंजन होण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आणि जर तसेच काही साम्य आढळले तर तो फक्त एक योगायोग समजावा हिच विनंती
लेखक:- अमित अशोक रेडकर