Bhagy Dile tu Mala - 78 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ७८

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ७८

हर एक सुबहँ मेरी जिंदगी की
तेरी हसी मे गुम हो जाये
कुछ ना बचे मेरा मुझमे
तुझसेही मेरी पेहचान बन जाये....

पुन्हा एक सुंदर सकाळ स्वरा- अन्वयच्या आयुष्यातील. दोघेही सकाळी- सकाळी फिरायला निघालेले. स्वरा कालप्रमाणेच अन्वयकडे बघत होती पण आज परिस्थिती जरा वेगळी होती. लोक स्वराला विचित्र नजरेने बघत होते तरीही अन्वय शांतपणे त्यांना बघत होता आणि गंमत म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर आज सुंदर हसू होत. कालची ती चिडचिड, तो त्रास आज त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता म्हणून स्वरा आज त्याला बघून विचारात पडली होती. तिला नक्की कळत नव्हतं ह्या काही तासात अस काय झालं की अन्वयचे लोकांप्रती नजर बदलली पण तो हसतोय बघून तिलाही आनंद झाला होता. काही वेळ अशाच तिच्या विचारांचा खेळ सुरू राहिला आणि चेहऱ्यावर मिश्किल हसू आनत तिने अन्वयला विचारले," सर आज इतके आनंदी? तुमची कुणी खास गोपिका दिसली की काय? नाही म्हणजे काल दिवसभर जरा चेहरा पाडून बसलेले, काल आनंदाचा लवलेश नव्हता चेहऱ्यावर आणि आज असा चेहरा प्रसन्न ह्यामागे नक्की काय सिक्रेट आहे कळेल का मला सर?"

अन्वयने अगदी हळुवारपणे तिच्या डोळ्यात बघत उत्तर दिले," सर्वात सुंदर राधा बाजूला असताना गोपिकाची काय गरज मॅडम? आनंदी आहे आणि कायम राहील. तू सोबत आहेस ना मग हा आनंद सतत राहील माझ्या चेहऱ्यावर. तूच सोबत आहेस हेच कारण पुरेस आहे मला सतत आनंदी राहायला."

तो हसतच होता की तिने पुन्हा विचारले," मग काल का उदास होतात? ते पण एक क्षण नाही तर पूर्ण दिवसभर? काय सुरू होत नेमकं तुमच्या मनात? मला समजत होत पण विचारू शकले नाही. आज सांगा."

अन्वय क्षणभर तिच्याकडे हसतच उत्तरला," हे उत्तर माझ्यावर उधार राहील. नंतर देईल कधी ह्याच उत्तर. आज मूड नाहीये मॅडम."

स्वराने उदास होत विचारले," मग मूड कसला आहे बर तुमचा? मी काहिही विचारलं ना तर तुम्ही हे उधार राहील बोलून मला शांत ठेवता आणि मी वेंधळट नंतर विचारायचंच विसरून जाते."

ती जरा रुसली होती आणि अन्वय तिच्या नजरेत नजर मिळवित म्हणाला," मूड ना रोमांसचा आहे. म्हणशील तर सुरू करू इथेच?"

स्वराने त्याच्या डोळ्यात बघितले, त्यात तिच्यासाठी प्रेमाचे भाव होते शिवाय जगाला काय वाईल ह्याची चिंता तिला त्याच्या डोळ्यात अजिबात दिसत नव्हती म्हणून ती लाजरी- गोजीरी झाली आणि लाजतच तिने विचारले," सर्वांसमोर?? लोक काय म्हणतील?"

अन्वय जरा डोळे मिचकावत म्हणाला," तेच जे माझी आई म्हणते. बायको येणार म्हणून वेड लागलं ह्याला!! आता ह्याला दुसरे लोक दिसणार नाहीत बायकोसमोर!!"

त्याने उत्तर दिल आणि नेहमीप्रमाणे स्वराला हसू आवरेनास झालं. ती काही क्षण एकटीच वेड्यासारखी हसत होती, ह्यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू-लाजेचे संमिश्र भाव होते. समोर नक्की काय बोलू तिला समजत नव्हतं आणि पुन्हा अन्वय हसत म्हणाला," थिंक ऑफ द डेविल अँड डेविल इज हेअर!! तुला गोपिकाशी भेटायच होत ना तर त्यातली एक गोपिका भेटायला येतेय बघ. कदाचित तुला आज चांगलं समजेल की किती इर्शा करतील माझ्या गोपिका तुझ्यावर !! किती आवडतो मी त्यांना!!"

स्वराने हसतच विचारले," ते कसं बाबा? मला कळेल अस काही बोला बर!"

अन्वय हसत- हसतच उत्तरला," सांगण्यात काय मज्जा मॅडम!! तुम्ही फक्त बघत राहा मग समजेल. वाट बघ."

स्वराला तो काय बोलतोय ते समजत नव्हतं तर अन्वय तिला बघून केवळ हसत होता. काही क्षण त्यांचे असेच शांततेत गेले आणि समोरून एक मुलगी अन्वयच्या जवळ येत म्हणाली," अच्छा तो मैने जो सुना वो सही था!! तुम्हारी सच मे शादी हो गयी. अनव्य कॉंग्रेचूलेशन यार!!"

अन्वयने एकदम गोड हसतच म्हटले," थॅंक्यु यार!! तेरे विश के बिना तो मेरी शादि, शादी जैसेही लगग नही रही थि. तुमने विश किया ना अब अच्छा मेहसुसबकर रहा हु."

समोरची मुलगी आणि अन्वय हसत बोलत होते तेव्हा अन्वय तिच्याबद्दल अस का बोलून गेला तिला कळत नव्हतं. अन्वय स्वराचा चेहरा वाचत होता त्यामुळे ती काय विचार करतेय त्याबद्दल त्याला सर्व कळत होतं. अन्वय तिचा चेहरा वाचत गंमत घेत होता. अन्वय हसतच होता की समोरची मुलगी स्वरासमोर हात करत उत्तरली," मै संजना अन्वय की दोस्त. शादी की बहोत बहोत मुबारक बात."

स्वराने हसून तीच विश स्वीकारलं आणि तिघेही समोर चालू लागले. स्वराला अजूनही कळत नव्हतं की अन्वय इतका गोड का हसतोय आणि ते हसन अजूनही नाहीस झालं नव्हतं. काही क्षण शांततेत गेले आणि संजना संधी शोधत म्हणाली," अन्वय सच मे आंटी ने जैसे बोला था वैसीही बहु लाई है. सारे सोसायटीमे चर्चे है तुम्हारे कल से. शायद बहु के साथ ज्यादा ही वक्त बिता रही है आंटी इसी वजहसे वो बाहर नही आयी वरणा अब तक तो वो सारे सोसायटीको बहुका सुंदर मुखडा दिखा चुकी होती. पर कुछ भी कहो अन्वय आंटी ने मे जो कहा था वो सच मे करके दिखाया. दुनिया की सबसे सुंदर बहु धुंड लायी है वो वो पर मै एक बात से खफा हु की इंतने सुंदर बहु की मूह दिखायी क्यू नही की?? हम खाली हात थोडी आते, गिफ्ट लेकर आते थे. हमे भी हक नही है क्या स्वयम तुम्हारी इतनी सुंदर चांद जैसी बिवी देखणे का? चलो जो हुवा वो जाणे दो लेकिन मै आउंगी आंटी से मिलने उनको बता दो. उनके सुंदर बहु को देखणे हम सभी सोसायटी वाले आऐंगे. चलो फिलहाल मुझे काम है. आती हु मै. उन्हे याद से केह देना."

ती आली तशीच हसतच पसार झाले आणि स्वराने हसतच विचारले," हे काय होत सर? ही दहा वेळ सुंदर बहु सुंदर बहु का म्हणत होती? एक वेळ म्हटलं असत तरी समजलं असत ना मला? मग एवढ्या वेळ म्हणायचीे काय गरज होती?"

अन्वयने तिच्याकडे बघत हसतच विचारले," तुला काहीच समजलं नाही आता ती काय बोलून गेली ते? पक्का समजलं नाही की नाटक करते आहेस?"

स्वराने त्याच्याकडे बघत म्हटले," समजलं असत तर विचारल असत का मी? सांगा ना. आता म्हणू नका हा की उधार राहील नाही तर मार खाणार माझ्याकडून."

अन्वय आताही काही क्षण हसतच राहिला. स्वरा त्याच्याकडे बघत होती त्याचही त्याला भान नव्हतं. काही क्षणात त्याने स्वतःच स्वतःच हसू आवरल आणि हळूवार आवाजात उत्तरला," ते काय आहे ना ती मला आणि आईला टोमणा मारत होती. मी तुला म्हटलं ना मागच्या काही वर्षात मी जवळपास सर्व मुलींना नकार दिला. त्यातली ही एक आईच्या मैत्रिणीची मुलगी. मी सतत नाही म्हणत बसायचो आणि आईने आवेशात एक दिवस म्हटलंच की इथे माझ्या मुलासाठी एक पण शोभणारी मुलगी नाही. मी आणेन माझ्या मुलांसाठी बायको तेव्हा पूर्ण सोसायटी तिला बघत राहील. आता तुझा चेहरा तर माहीत आहे मग असे रागाने बोलू शकत नाहीत तर टोमन्याने उत्तर देत आहेत. काय करतील बिचाऱ्या. एका क्षणात सर्वांची मन तुटली ना त्यांची! मग तुला बघून इर्शा तर होणारच."

अन्वय हसतच राहिला तर स्वरा जरा शांत झाली. काही क्षणाने अन्वयच्या ते लक्षात आलं आणि तो हसू आवरत उत्तरला," स्वरा तुला वाटत असेल ना कसा आहे मी? लग्नाच्या आधी सर्वांवर रागवायचो आणि इथे माझ्यासमोर ती तुला इतकं सर्व ऐकवून गेली तरी मी शांत बसलो किंबहुना आताही हसतोय. अस नाहीये स्वरा, खर सांगू तर ह्यातला एकही व्यक्ती इतका लायक नाही की मी त्याला तुझ्या सुंदरतेबद्दल सांगू शकेल. त्यांच्या बुद्धीची तेवढी क्षमताच नाही की त्यांना स्वरासारखी मुलगी क्षणात समजेल म्हणून बोललो नाही. तुला समजून घ्यायला संवेदनशील मन लागेल आणि असा व्यक्ती मला मिळालाच तर त्याला समजवायची गरज नाही. त्याला स्वरा आपोआप समजेल. अशा लोकांना समजावून काय फायदा ना स्वरा आणि सांगितलं तरी त्यांच्या बुद्धीला जे पटत तेच करतील म्हणून बोललो नाही."

स्वराने क्षणभर हसतच विचारले," पण तुम्ही मला हे सर्व का सांगत आहात?"

अन्वय तिच्याकडे बघून उत्तरला," तुला राग आलाय ना माझा, मी उत्तर दिलं नाही त्याचा म्हणूनच तोंड पाडून बसली आहेस ना?"

स्वरा आता हसतच उत्तरली," अरे देवा!! तुम्हाला अस वाटलं का? मी तर तिचे टोमने पण एन्जॉय केले. मला समजलं थोडं फार पण खर सांगू तर मी ते सर्व एन्जॉय केलं. मी अन्वयची आहे हे ऐकताच त्यांना माझ्याबद्दल असुरक्षितता वाटते आहे ते बघून जास्त आनंद होतोय मला.. जो कुणाचा झाला नाही तो माझा झालाय हे बघून कोण जळणार नाही? आता त्यात त्या बिचारीची काय चूक बर? माझं थोडस नशीब चांगलं की मला तुम्ही मिळाले!! सो हे टोमणे एन्जॉय करणं तर बनतच. असे रोज मिळाले तरीही मला काही प्रॉब्लेम नाहीच.."

अन्वय तिच्या हसण्याकडे बघत उत्तरला," मग दोन मिनिटं तोंड का पाडून बसली होतीस?"

स्वरा पुन्हा एकदा जरा गंभीर झाली आणि विचार करत म्हणाली," मी फक्त हा विचार करतेय की नेमकी सुंदरतेची व्याख्या काय आहे? तुम्हाला माहिती आहे का?"

अन्वय मिश्कीलपणे हसत उत्तरला," खर सांगू तर नाही! तू जेव्हापासून आयुष्यात आलीस ना तेव्हापासून सुंदरता हा शब्द कायम ऐकत आलोय म्हणून मीही त्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. मिळालं की देईन तुला पण तोपर्यंत मलाही शोधायच आहे ह्याच उत्तर. लोक सतत सुंदरता सुंदरता करत असतात तेव्हा ती आहे काय हे शोधायला मलाही फार आवडेल."

बोलत बोलत अन्वय- स्वरा समोर जात होते आणि स्वराने मोबाईलमध्ये बघितले. ते निघून बराच वेळ झाला होता आणि स्वरा म्हणाली," बर नवरोबा तुम्ही द्या उत्तर नंतर! आता घरी जाऊया. चहा पासून स्वयंपाक सर्व आवरायचा आहे. पुन्हा आजपासून ऑफिस सो घाई होईल ऐनवेळी."

तो काही बोलणार त्याआधीच तिने त्याचा हात पकडून समोर न्यायला सुरुवात केली. ते समोर जातच होते की अन्वयने हसतच विचारले," तुला टोमणे ऐकून मज्जा आली ना??"

" हो मग...खूप एन्जॉय केलं मी. आता तर रोज ऐकायला मिळेल.", ती हसतच उत्तरली

आणि अन्वय पुन्हा म्हणाला," क्या बात है!! मग आज माझ्या मातोश्रीचे कडवे बोल पण ऐका. तिने नीट स्वागत नाही केलं ना तुझं मग आता होईल स्वागत. तेही अगदी जोमाने."

स्वराने प्रश्नार्थक नजरेने विचारले," म्हणजे? मला समजेल अस काही बोला ना!! आज काय तुम्ही कोड्यात बोलायचच ठरवलं का?"

अन्वय थोडा मोठ्याने हसतच उत्तरला," आज बोलायची गरजच नाही मला. १० मिनिट वाट बघ तुझं तुला उत्तर मिळेल पण मनाची तयारी करून घे आज. सासूरवास हा शब्द कदाचित अनुभवता येईल तुला. तू ठाम आहेस ना की मधात पळू नको तुमच्या?"

स्वराला समजलं तो काय म्हणाला ते आणि ती हसत उत्तरली," ते होय!! त्याची तयारी तर मी केव्हाच केलीय. तुम्हाला नाही समजणार अन्वय सर सासू- सुनेच्या वादामध्ये पण एक वेगळीच मज्जा आहे. तुम्ही फक्त बघताना एन्जॉय करा. बाकी सोडून द्या माझ्यावर. मी आहे ना मग कसलं टेन्शन??"

तिच्या चेहऱ्यावर क्षणभरदेखील उदासी नव्हती आणि अन्वय आता स्वतःच स्वतःवर हसू लागला. कदाचित ती काय आहे हे ओळखण्याच्या प्रवास अजूनही बाकी आहे हे त्याला ह्या क्षणात समजलं होत.

सकाळचे जवळपास ७ वाजले होते. स्वराने चेहऱ्यावर पाणी घेतले आणि किचनकडे जाऊ लागली. अन्वय बेडरूच्या दाराला टेकून समोरच दृश्य बघत होता. स्वराने सलवारची ओढणी घट्ट कमरेला बांधली आणि किचनच्या मध्ये पाय टाकू लागली. ती पाय टाकणारच होती की अन्वयच्या आईचा भारदस्त आवाज आला," ए मुली तिथेच थांब!!"

त्या आवाजाने स्वरा जागच्या जागी थांबली. तिने समोर बघितले. आई तिच्या बाजूने येत होत्या. त्यांचे मोठं-मोठे डोळे बघून स्वराची क्षणभर बोलतीच बंद झाली होती. ती गळ्यातील पाणी पोटात गिळत तिथेच त्यांना बघत राहिली. तीच हृदय मोठ्याने धडधड करत होत. त्या जवळ येत होत्या आणि स्वराची नजर त्यांच्या बाजूने फिरत होती. त्या अगदीच जवळ आल्या आणि थोड्या मोठ्यानेच म्हणाल्या," अशी चूक पुन्हा करू नकोस!! माझ्या किचनमध्ये अंघोळ केल्याशिवाय कुणीही आलेलं मला आवडत नाही. मी माझ्याच मुलांना ती कधी सवलत दिली नाही तर तुझा प्रश्न येतच नाही."

स्वरा त्याने डोळे फाडून बघतच होती आणि त्या पुन्हा उत्तरल्या," सर्वात आधी मी स्पष्ट स्पष्ट तुला सांगते..ह्या घरावर तुझा पूर्ण हक्क आहे तेव्हा तू ईथे काहीही करू शकतेस पण एक गोष्ट लक्षात घे की तुझा हक्क फक्त घरावर आहे, इथल्या माणसांवर नाही. तुझा ह्या घरात एकच हक्काचा माणूस आहे तो म्हणजे तुझा नवरा. बाकी ना तुझे इथे कोणी आहेत ना उद्या असतील तेव्हा उगाच नाती जोडायचा प्रयत्न करू नकोस. मी रागात वगैरे तुला बोलत नाहीये फक्त तुला तुझ्या ह्या घरातील मर्यादा सांगते आहे. हे शब्द कायम लक्षात ठेव. आता सर्वात महत्त्वाचं. मला राग माझ्या मुलावर आहे तुझ्यावर नाही, तो मला म्हणाला होता की माझ्या चुकीची शिक्षा तिला देऊ नका सो ते मला पटलं पण ह्याचा अर्थ असा नाही की मला राग येणार नाही. फक्त ते तुझ्यावर आहे की येऊ द्यायचा की नाही ते?? तू माझ्यापासून जेवढी दूर राहशील तेवढी माझ्या रागापासून तुला सुटका मिळेल. तेव्हा प्रयत्न कर की माझ्यासमोर येणार नाहीस. माजे लोक इथे कायम येत-जात राहतात. जसा तुझा माझ्याशी संबंध नाही तसाच त्या माणसांशी संबंधही नाही तेव्हा त्यांच्यासमोर येऊन मला तुझ्यावर ओरडायला लावु नकोस. शक्यतो प्रयत्न कर की मी घरात असताना माझ्यासमोर येणार नाहीस कारण चूक जरी त्याची असली तरी तुझ्यामुळे ती चूक आहे हे मला जाणवत राहील आणि मग माझा राग आवरणार नाही. मी रागात काहीही बोलते आणि मला रागावून माझ्या घराची शांत खराब करायची नाही. आशा आहे माझं बोलणं डोक्यात घट्ट बसवून घेतलं असणार?"

स्वरा फक्त आईकडे बघत होती. तिच्या घशाला कोरड पडली होती म्हणून तिच्या तोंडून आवाज निघत नव्हता आणि आई ओरडतच म्हणाल्या," समजलं की नाही?"

ती कशीबशी बोलून गेली," हो आई समजलं.."

तोच आवाज मोठा झाला आणि ओरडल्या," आताच म्हणाले ना तुझे इथे कुणीच नाही. काय समजलं मग तुला?"

स्वरा आता नजर खाली करून शांत होती आणि पुन्हा त्या स्वतःचा राग आवरत म्हणाल्या," ते सोड एक गोष्ट राहिली सांगायची. तू आपला स्वयंपाक बनव आणि दोघेही रोज आपल्या बेडरूममध्ये जेवायचं. मी रोज सकाळी ८ ला नाश्ता बनवायला घेते. एक तर त्याआधी नाही तर मग ९ नंतर जे काही करायचं ते करायचं. रात्रीही १० नंतर नाही तर मग ८ आधी जेवण बनवून पूर्ण व्हायला हवं. त्यात मला काही वाद नकोत. माझ्या मधात अजिबात यायचं नाही. आज पहिला दिवस आहे म्हणून मी मॅनेज करते. उद्यापासून वेळेवर सर्व करायचं. तू घरातल्या सर्व वस्तू वापरू शकतेस कारण त्याच्यावर तुझ्या नवऱ्याचा हक्क आहे पण बाकी कशावरच नाही. हे जेवढ्या लवकर समजून घेशील तेवढं चांगलं आणि हो जर माझ्या काही लोकांनी तुला बोल सुनावले तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. मी मधात पडणार नाही सांगून दे तुझ्या नवर्याला. अंघोळ करून ये आणि कोणत्या वस्तू कुठे आहेत ते बघून घे. नवर्याला सांगशील की नेहमीप्रमाणे घराच्या खर्चात वाटा द्यावा. इथे काहीच फ्री मिळणार नाही."

स्वरा त्यांच्याकडे बघतच होती की त्या पुन्हा म्हणाल्या," झालं बाईसाहेब माझं प्रवचन. जा अंघोळ करा आणि आवरा लवकर म्हणजे आम्हीही आमच्यासाठी लवकर बनवू शकू. नाही तर उपाशी मरू. तस पण कुणाला फार पडतो म्हणा इथे आम्ही काय करतो त्याने? तू सांभाळून राहा नाही तर तुझा नवरा उगाच आम्हाला पुन्हा ऐकवेल."

स्वरा तिथेच उभी होती तर आई किचनमधून बाहेर पडल्या. स्वराला स्वतःला सावरायला काही क्षण गेले होते. तिने मनाची तयारी नक्कीच केली होती पण वाईट वाटण स्वाभाविक होत म्हणून ती काही क्षण शांतच होती. अन्वय तिला बघतच होता. आईचा प्रत्येक शब्द त्याच्या मनात बसला होता म्हणून त्याचा चेहरा पडला होता. सेम स्थिती स्वराची होती पण तिच्या लक्षात आलं की अन्वय आपल्याला मागून बघतोय म्हणून चेहेऱ्यावर हसू आणत ती मागे वळाली. स्वराला बघताच अन्वयनेही चेहऱ्यावर हसू आणलं आणि ती हसतच त्याच्या समोर गेली. काही क्षण त्याच्या नजरेला नजर देत उत्तरली," काय नवरोबा मज्जा आली ना सासू- सुनेचा वाद बघून? हे तर काहीच नाही. आता रोज बघायला मिळेल तुम्हाला. एकदम भारी क्षण असतात हे तुम्हाला नाही कळणार त्यातली मज्जा!!"

स्वरा हसत- हसतच समोर बाथरूममध्ये गेली तर अन्वय तिच्याकडे तसच बघत होता. त्याला नक्की काय रिऍक्ट करावं काहीच कळत नव्हतं.

स्वरा धावत-धावतच बाथरूमला गेली आणि अंघोळ करून धावत- धावतच त्याच्यासमोरून किचनला गेली. अन्वय आताही तिच्याकडे किचनच्या दारात उभा राहून बघत होता. स्वराचा आज किचनमध्ये पहिलाच दिवस असल्याने तिला कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हेच शोधायला कितीतरी वेळ लागला. ती आताच अंघोळ करून आली होती तरीही ती काहीच वेळात घामाघूम झाली होती. तिने अगदी १५-२० मिनिटात त्याच्या हातात चहा आणून दिला आणि पुन्हा एकदा किचनमध्ये पोहोचली. अन्वय चहा घेतच तिला बघू लागला. अन्वयला आज तीच खरच कौतूक वाटत होतं. काही वेळेपूर्वी आईने इतकं काही सूनवल्यावरही स्वरा तेच घेऊन बसली नव्हती उलट ती जोमाने कामाला लागली म्हणून काही क्षण आधी उदास झालेला अन्वय तिला कुतूहलाने बघू लागला होता. ती किचनमधले काम करता-करताच चहा घेऊ लागली आणि अन्वयच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू परतल. अन्वय काही क्षण तिच्याकडे बघत बसला आणि नंतर स्वतःची तयारी करायला बाथरूमला गेला. त्याने निवांत अंघोळ केली आणि बाहेर बेडरूममध्ये येऊन बसला. तिने त्याच्यासमोर नाश्ता आणून ठेवला होता आणि स्वता पुन्हा किचनमध्ये पळाली. त्याने पुन्हा एकदा किचनकडे लक्ष दिले. स्वरा ओट्यावर प्लेट ठेवून खात होती. सतत घाम येत असल्यामुळे ती जरा त्रासली होती तरीही तिने काम करणे सोडले नाही. अन्वय प्रत्येक क्षण आज प्रेमाने तिच्याकडे बघत होता. आज तिच्याकडे बघून त्याच प्रेम आणखीच वाढल होत. तिने म्हटलं होतं तस तिने खरच मनाची तयारी केली होती पण मनाची तयारी केल्यावर त्रास कमी होतो का??


सकाळचे जवळपास १०.३० वाजले होते. अन्वय आपली तयारी आवरून निवांत बेडवर बसला होता. स्वराचे कामही आटोपले होते. ती धावतच बेडरूममध्ये आली. तिला आज जरा निवांत बसायचं होत पण तिच बेडरूमला येताच घड्याळाकडे लक्ष गेलं आणि ती हळूवार स्वरात उत्तरली," सॉरी अन्वय सर!! बराच उशीर झाला. मला फक्त १० मिनिट द्या. मी येते तयार होऊन."

ती बेडवरून उठणारच की अन्वयने तिचा हात पकडत बेडवर बसविले आणि तिच्या चेहऱ्याकडे कुतूहलाने बघत म्हणाला," बस आधी. १० मिनिट निवांत राहा मग कर काय ते!!"

ती पटापट श्वास घेत उत्तरली," पण ऑफिसला उशीर होईल. तुम्हाला ओरडा खावा लागेल माझ्यामुळे. तुम्ही टाइमचे पक्के आहात ना मग तुम्हीच उशीरा गेले तर कस होईल?"

अन्वय तिच्याकडे बघत हसतच उत्तरला," मॅडम बॉसला उशीर झालेला चालतो आणि बॉसच्या बायकोला कुणीही काही बोलायची हिम्मत करणार नाही. केली हिम्मत तर जॉबवरून नाही काढणार का त्याला? सो ते टेन्शन विसरून जा आणि निवांत श्वास घ्या.."

स्वरा त्याचे शब्द येताच क्षणभर हसली. ती आज जरा जास्तच थकली होती..फॅन सुरू असूनही घाम काही कमी झाला नव्हता म्हणून अन्वय बाजूला पडलेल्या टॉवेलने तिचा घाम पुसत म्हणाला," लव्ह यु स्वरा अँड थॅंक्यु!!"

स्वराने हसतच विचारले," आता हे कशासाठी??"

अन्वयने तिच्या हाताला किस करतच उत्तर दिले," बस असच!! मन केलं तर म्हटलं.."

स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्याचा चेहरा वाचन तिच्यासाठी काही कठीण काम नव्हतं. त्याच्या डोळ्यांनी तिला क्षणात उत्तर दिलं आणि तीही त्याच्याकडे बघतच राहिली. काही क्षण असेच गेले आणि स्वराने विचारले," अन्वय सर आता असेच बघत राहणार तर मी कशी बर जाऊ फ्रेश व्हायला?"

अन्वय तिच्या डोळ्यात बघत उत्तरला," मग नको जाऊ. इंफॅक्ट दोघे पण नको जाऊया. मस्त रोमांस करू दोघे. काय म्हणतेस?"

स्वरा त्याला बाजूला करत वॉशरूमकडे पळाली आणि धावता- धावताच उत्तरली," तुम्हाला काय बस बहाणा पाहीजे अन्वय सर रोमांसचा. मी नाही म्हणत नाहीये पण रात्री करू. आता ऑफिसला जाऊ. काम पण महत्त्वाचं आहे ना. मी टिफिन बनवले ते बॅगमध्ये ठेवा मी आलेच फ्रेश होऊन."

तिने वॉशरूमचे दार बंद केले आणि अन्वय तिच्याकडे बघून हसत राहिला. तिच्या त्या गोड स्माईलने अन्वयचा मूड क्षणात बदलला.

एक हसी काफी है
मेरा दिन बनाने के लिये
रोमांस तो एक बहाणा है
तेरी हसी लबो पे लाने का..

काहीच क्षण गेले होते. अन्वय कारमध्ये बसून स्वराची वाट बघत होता. तीही धावत-पळतच आली. तिने सिट बेल्ट बांधला आणि अन्वयने हळुवार कार सुरू केली. अन्वय हळूहळू गाडी चालवत असताना तिच्यावर अधून-मधून लक्ष देत होता. ती आज जरा काम करून थकली असल्याचं जाणवत होतं, अन्वयला भीती होती की आई जेव्हा स्वराला बरच काही एकवेल तेव्हा ती कशी रिऍक्ट करणार होती पण तिच्या चेहऱ्यावर त्याला ते काहीच दिसलं नाही त्यामुळे क्षणभर त्याला तिचा अभिमान वाटला होता फक्त त्याने तिला बोलून दाखवल नाही. काही क्षण असेच तिला पाहण्यात गेले आणि स्वरा हसतच उत्तरली," सर असेच मला बघत राहिलात ना तर आपला अपघात पक्का आहे. मग मला नाही वाटत की आपण ऑफिसला जाऊ अस. एक सेकंद पण मला लाजवायची संधी सोडणार नाही ना तुम्ही??"

ती अन्वयकडे बघत नव्हती पण बोलताना तिच्याही चेहऱ्यावर हसू होत. अन्वयची काही वेगळी स्थिती नव्हती पण तो काहीच बोलला नाही. स्वराने आपल्या तोंडावर अलगद हात ठेवला आणि हळूच हसत पुन्हा उत्तरली," अन्वय सर तुम्ही रोमांसची एक संधी पण सोडणार नाही ना? आईसमोर पण मागे जरा जास्तच रोमँटिक सुचत होत तुम्हाला. इतका रोमांस कुठून येतो बर?? फक्त संधीची वाट बघत असता तुम्ही. एखाद्या दिवशी मला लोक म्हणतील की नवर्याला मुठीत ठेवलं आहेस तेव्हा काय उत्तर देऊ बर मी सर्वाना?"

अन्वय आता पहिल्यांदा हसतच उत्तरला," जे खर आहे ते सांग. आहे नवरा मुठीत तर आहे त्यात काय!! मी काय एकमेव आहे बायकोच्या मुठीत राहणारा? माझे बाबा आणि तुझे बाबा दोघेही आहेतच की आणि राहिला प्रश्न रोमांसचा तर स्वरा मॅडम तुम्ही मला प्रियकर म्हणून थोडीशी पण संधी दिली नाही रोमांस करायला. होकार दिला तर सरळ लग्नाला मग काय करणार ना गरीब माणूस? म्हणून मी आता ठरवलं आहे की संधीची वाट बघायची नाही तर संधी आपण स्वतःच निर्मान करायची. मी तर करणार रोमांस मग लोक काहीही म्हणू दे. लोकांना कोण घाबरत बर??"

स्वरा त्याच गोड बोलणं ऐकून स्वताला लाजण्यापासून थांबवु शकली नाही. काही क्षण तिचे लाजण्यातच गेले आणि हळूच पण गोड स्वरात ती उत्तरली," बर बाबा तुम्हीच जिंकलात! बोलण्यात तुम्हाला कुणी हरवू शकत का? हा पण अन्वय सर ऑफिसमध्ये मला सतत बघत बसू नका हा. नाही तर लोक मला चिडवतील. तेव्हा आधीच सांगतेय अस काही करू नका. प्लिज एवढं तर करणार ना??"

अन्वय जरा विचार करतच उत्तरला," ही नाइंसाफी आहे बायको माझ्यावर!! लग्नाचे सुरुवातीचे दिवस बायकोला नाही तर काय बॉसला बघणार. मी तर बघेन आणि मला वाटलं तर सरळ माझ्या केबिनला बोलावेन तुला मग निवांत बघत बसेल. मला आवडेल तस वागायला. तुज्ज तू बघ, मला आवडेल तेच करेन मी."

स्वरा पहिल्यांदा त्याच्याकडे बघत म्हणाली," आणि मी नाही आले तर?"

अन्वय जरा मोठ्याने हसत उत्तरला," मग तुझी ऑफिसमधून कायमची सुट्टी. बॉसच बोलणं तर ऐकाव लागेलच. तिथे सुटका नाही. तेव्हा माझं ठरलं मी तर मस्त बघणार आहे तुला. खूप मज्जा येईल आज."

अन्वय हसतच होता की स्वरा उत्तरली," अच्छा जी!! सुट्टी तर करून बघा माझी. तिथे माझी सुट्टी झाली की घरी तुमची सुट्टी करेन. आजच आईच बोलणं ऐकलं ना तुम्ही! तुम्हाला माझ्याशिवाय जेवण कुणी देणार नाही. सो माझ्याशी पंगा तुम्हाला महागात पडेल. आता बोला करणार माझी सुट्टी?"

अन्वय जरा तोंड पाडतच उत्तरला," मी विसरलोच होतो की तू घरी बॉस आहे. खडूस बॉस!! स्वरा मग मला नाही मिळणार का तुला सतत बघायला? कसा जाईल मग माझा दिवस?? धीस इज नॉट डन हा स्वरा!"

स्वराने त्याच्याकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर अगदी लहान मुलासारखे भाव होते म्हणून ती हसतच उत्तरली," तुम्हाला तिथे माझ्या परवानगीची काय गरज?"

अन्वयने हसतच उत्तर दिले," म्हणजे तुलाही आवडत ना मी तुला बघितलेलं?"

अन्वयने असा प्रश्न मांडला की स्वराकडे त्याच उत्तरच नव्हतं. आता तर ती त्याच्याकडे बघायला पण लाजत होती आणि अन्वय तिच्यावर हसत होता. आज कारमध्ये पूर्ण वेळ अन्वय तिला हाच प्रश्न विचारून त्रास देत होता पण स्वराने आपली चुप्पी काही तोडली नाही.


जवळपास ११.३० वाजले होते जेव्हा अन्वय-स्वरा ऑफिसला पोहोचले. अन्वयने कार पार्क केली आणि स्वरा थोडी फास्ट फास्टच समोर जाऊ लागली. ती अन्वयपेक्षाही फास्ट धावत होती. ती ऑफिसच्या दारावर पोहोचलीच होती की तिला पूर्ण ऑफिस दारावर उभं असलेलं दिसलं. स्वरा त्यांना बघत घाबरून तिथेच उभी राहिली. मागून अन्वय हसतच तिच्याजवळ पोहोचला आणि तिचा हात पकडत म्हणाला," काळजी नको करू. तुला भेटायलाच सर्व जमले आहेत. चल समोर."

अन्वयने तिचा हात पकडत समोर नेले आणि एक पन्नाशीतले गृहस्थ मध्ये राहून तिला बुके देऊ लागले. बाकी सर्व त्यांच्या आजूबाजूला होते. स्वरा त्यांच्याकडे बघतच होती की ते म्हणाले," स्वरा मॅम अँड अन्वय सर हार्टली कॉंग्रेचूलेशन फॉर युअर मॅरेज!!"

त्यांनी हात समोर केला आणि आणि स्वरा त्यांच्याशी हात मिळवत म्हणाली," थॅंक्यु सर!!"

त्यांचं झालंच होत की ऑफिसमधली सर्व मंडळी तिला विश करू लागले..ती ते सर्व बघून अगदी भारावून गेली होती आणि अन्वय होता की तिच्याकडे बघून हसत होता. एक तो दिवस होता की जेव्हा पहिल्याच दिवशी तिला कुणाचे नाव माहिती झाले नव्हते आणि आज ओळखी नसणारेही तिला शुभेच्छा देत होते. एवढंच काय तर त्यांच्या एकाच्याही नजरेत ती घृणा दिसत नव्हती. ह्यामागे अन्वय आहे हे तिला समजलं होत. तिने हसून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि अन्वय मोठ्याने म्हणाला," सॉरी गाईज!! अभि हम लेट है. लंचमे सबसे मुलाकात कराउंगा. नाऊ प्लिज जॉईन द टेबल्स."

अन्वयचा आवाज येताच सर्व आपल्या टेबलवर गेले आणि अन्वय हसतच म्हणाला," माहि प्लिज स्वरा को अपणे टेबलपर लेकर जाओ. काम क्या करणा है, वो जाणती है सो ऊस बारे मे उसे कोई प्रॉब्लेम नही होगा."

जाता- जाता अन्वय स्वराला म्हणाला," ऑल द बेस्ट!! घाबरू नकोस. इथे कुणीच तुला त्रास देणार नाही. काही वाटलं तर सरळ मला कॉल कर. नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. छान मेहनत कर, इथे माझ्या नावाने नाही तर तुझ्या नावाने तुला ओळखायला हवं."

अन्वयच्या चेहऱ्यावरच हसू बघून तीच उरल-सुरल टेन्शनही गेलं. अन्वय केबिनमध्ये गेला तर स्वरा माही सोबत जाऊ लागली. स्वराचा टेबल माहीच्या बाजूलाच लावला असल्याने दोघेही पटकन टेबलवर बसले. स्वराने गणेशाची मूर्ती हळूच बॅग मधून काढली आणि हळूच टेबलवर ठेवली. स्वराने बाप्पाला डोळे मिटून प्रणाम केले आणि हळूच माही म्हणाली," स्वरा मॅम हमे अन्वय सरने आपके बारे मे सब कुछ बता दिया है तो टेन्शन मत लिजिये यहा आपको कोई भी दुनिया की नजर से नही देखेगा. सिर्फ एकही इंसान है जीनकी नजर आपसे नही हटेगी."

स्वराने गोंधळून विचारले," कौन?"

माही हसतच उत्तरली," आपके अपने पती!! वो तो केबिनसे आपकोही देख रहे होगे. उनस्व कैसे बचीयेगा?"

स्वराचा चेहरा पुन्हा लाजून लाल झाला होता आणि स्वरा आपला चेहऱ्यावरचे भाव लपवत उत्तरली," ऐसा नही है!! वो काम के वक्त बहोत सिरीयस होते है."

माहीने हसतच उत्तर दिले," ऐसा आपको लगता है पर सच ये है की आप उनको कामसेभी ज्यादा खास है. वो मुंबईये आये थे ना तो मेरे पास स्वरा- स्वरा केहते रेहते थे. तब तो आप पास नही थे अब तो हो. तो आपही सोच लो वो अंदर बैठ कर क्या कर रहे होगे."

ती बोलत होती आणि स्वराच्या चेहऱ्यावर लाली पसरत होती. माही पुन्हा हसतच उत्तरली," शायद आपको जवाब मिल गया है. वैसे सरने आपका ध्यान रखने की जिम्मेदारी मुझे दि है सो अगर कुछ भी जरूरत हो तो मुझे बता देना."

स्वरा काही बोलणार त्याआधीच तिचा फोन वाजला. ती फोन हातात घेणारच की पुन्हा माही म्हणाली," अन्वय सरका ही मॅसेज होगा. देख लो केह रहे होंगे की कही मै आपको उनके सिक्रेट तो नही बता रही!! देख लो देख लो."

स्वराने मॅसेज ओपन केला.

" ती माहीरा जे काही सांगत आहे ना त्यावर लक्ष नको देऊ. तस काहीच नाहीये."

स्वरा क्षणभर त्याचा मॅसेज बघून हसलीच आणि माही उत्तरली," मुझे कैसे पता ऐसें सोच रही है ना आप. मैने कहा था की आप जब मुझे मिलोगे तब मै आपके बारे मे सब बताने वाली हु इसलीये मॅसेज किया है. बाय द वे मै काम करती हु आप अपणा रोमांस जारी रखे."

स्वराला माहीसमोर काय बोलू समजत नव्हतं. माहीरा कामाला लागली आणि स्वराने मॅसेज टाइप केला..

" ती काहीही म्हणो!! तुम्ही कशाला आमच्याकडे लक्ष देऊन आहात. अन्वय सर पुरे झाला हा चावटपणा!! चला कामाला लागा. मलाही जरा काम करू द्या. प्रॉमिस घरी गेल्यावर तुम्हाला अडवणार नाही पण प्लिज काम करू द्या ना आता."

काहीच क्षणात अन्वयचा रिप्लाय आला..

" आता ही रात्र केव्हा होईल काय माहिती?"

स्वराने मॅसेज बघितला आणि हसतच उत्तरली," नवरोबा बाय.."

" बाय….", अन्वय

स्वरा- अन्वय कामात व्यस्त झाले. आज स्वरा खूप दिवसाने काम करत होती. एक तर तिची सकाळी खूप धावपळ झाली होती त्यात आईचे शब्द ऐकून तिने दुःखी व्हायला हवं होत पण अन्वयने तिचा असा मूड बनवला की ती थकवा आणि सकाळचा प्रसंग क्षणात विसरून गेली होती. काय होत अन्वय स्वराच नात? त्यांना कदाचित माहीत होतं की त्रास क्षणाक्षणाला सोबत असतील पण त्यांना हेदेखील माहीत होतं की कुणीही- कुणाला क्षणभर दुःखी होऊ देणार नाही. कदाचित हाच त्यांचा पुढचा प्रवास असणार होता. ना भविष्याची चिंता ना लोकांच्या बोलण्याचा त्रास. ते सोबत असताना कदाचित जगालाही बोलून बोलून हार मानावी लागेल पण ही तर फक्त सुरुवात होती त्यांच्या आव्हानांची. पुढे तिच्या नशिबात रोज नव्याने काय लिहून ठेवल होत ह्याचा तिलाही अंदाजा नव्हता म्हणूनच कदाचित तिला आनंदी ठेवायला अन्वयने स्वभावाच्या विपरीत जाऊन रोमांस करायला सुरुवात केली होती कारण हेच क्षण होते जे तिला हसवणार होते बाकी वेळ कदाचित???

लाखो इमतेहान भी पार कर जायेंगे
तुम साथ तो दो हम मोहब्बत का नया इतिहास बना लेंगे..