A well here and there in Marathi Moral Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | म्हणींच्या कथा - इकडे आड तिकडे विहीर

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

म्हणींच्या कथा - इकडे आड तिकडे विहीर

इकडे आड तिकडे विहीर

शब्दशः(अक्षरशः) अर्थ: ह्या बाजूला आड आहे आणि त्याबाजूला बघितलं तर विहीर आहे त्यामुळे कुठे जावं कळत नाही,दोन्ही बाजूला जायला रस्ता नाही.

गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ): चहूबाजुनी अडचणी आल्याने कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे कुठला उपाय करावा हे न कळण्याची परिस्थिती निर्माण होणे. द्विधा मनस्थिती होणे कोणता निर्णय घ्यावा हे न कळणे.

वरील म्हणीवर आधारित कथा:
कथा क्रमांक एक

रजत आणि पालवी चं लग्न झालं. दोघे एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांचं लव्ह मॅरेज झालं असंही म्हणता येईल.

दोघांच्या घरून काही विरोध नव्हता पण रजत च्या आईला नोकरी न करणारी सून हवी होती परंतु रजत पुढे त्यांचं काही चाललं नाही.

"रजत मला वाटलं होतं तू लग्न करशील तर माझ्या सोबतीला माझी सून येईल. कधी घरकामात मला मदत करेल पण आता ही नोकरी करणारी असल्याने सतत बाहेर बाहेरच राहील.",सुशीला बाई म्हणाल्या.

"अगं आई! घरकामाचे टेन्शन नको घेऊ आपण आणखी एखादी मोलकरीण लावून टाकू. आणि रोज जरी पालवी बाहेर असेल तरी शनिवारी रविवारी ती तुला घरकामात मदद करेलच. तसंही संध्याकाळी आम्ही घरी आल्यावर तुझ्यासोबतच राहू.",रजत म्हणाला.

इकडे पालवी ला सुद्धा सासू सोबत राहण्यात इंटरेस्ट नव्हता परंतु रजत ने तिला आपण आई बरोबरच राहणार आहोत वेगळ्या फ्लॅट मध्ये राहण्याची गरज नाही, आहे तो फ्लॅट चांगला प्रशस्त असल्याने एकत्र राहण्यात आपल्याला अडचण येणार नाही असं आधीच स्पष्ट सांगितलं होतं.

लग्नानंतर चे एक दोन आठवडे सहज निघून गेले. रजत आणि पालवी पूर्वीप्रमाणे ऑफिस ला जाऊ लागले.

आईला आणि पालवी ला त्रास होऊ नये म्हणून रजत ने स्वयंपाकिण बाई लावली होती. तीने केलेली पोळी भाजी घेऊन दोघे ऑफिस मध्ये जात असत.

काही दिवसांनी रजत चं पालवीची एवढी काळजी घेणं सुशीला बाईंना खटकू लागलं. पालवी फक्त आपापलं च काम करते सासू सासऱ्यांशी अलिप्तपणे वागते असं त्यांना वाटू लागलं.

तर इकडे पालवी ला रजत ममाज बॉय आहे आणि तो आईचंच ऐकतो तसेच आपली सासूबाई सतत सगळ्या बाबींमध्ये दखल अंदाजी करते असं तिला वाटू लागलं.

दोघीजणी एकमेकींच्या तक्रारी रजत च्या कानावर घालू लागल्या.

पालवी रजत ला ऑफिसमध्ये जाताना येताना घरी बेडरूममध्ये सतत आईच्या तक्रारी ऐकवू लागली.

"रजत मी तर सतत त्यांचं मन रक्षण करण्याचा प्रयत्न करते पण तुझी आई नेहमी नाराजच असते. मी केलेला कुठलंही काम कुठलाही पदार्थ त्यांना आवडत नाही. त्यांच्या मैत्रिणींजवळ आम्हाला वाईट सून मिळाली असं त्या सांगत असतात."

तिकडे पालवी जवळपास नसताना सुशिलाबाई रजत ला ऐकवू लागल्या.

"रजत पालवी ला मी आवडत नाही बहुतेक. ती नीट बोलतच नाही माझ्याशी. ती तिच्या तिच्यातच मग्न असते. कधी मनमोकळेपणे बोलत नाही. सतत माहेरच्यांशीच बोलत राहते. बरेचदा तिच्या मैत्रिणींशी बोलताना तिने माझा उल्लेख डस्टबिन असा केलेला ऐकला आहे. सासू असते म्हातारी पण त्यांना डस्ट बिन म्हणते का कोणी?"

रजत ने सगळं ऐकून घेतलं आणि तो आईला म्हणाला,
"आई मी तिला समजावतो पण तू सुद्धा थोडं तिला सांभाळून घे. तिचं काही चुकत असेल तर शांतपणे तिला तिची चूक जाणवून दे. पदार्थ ती तुझ्याएव्हढी चविष्ट नसेल जरी बनवत तरी थोडं ऍडजस्ट करून घे. आणि तुझ्या मैत्रिणींना मला वाईट सून मिळाली असं तरी म्हणू नको हे ऐकल्यावर तिला काय वाटेल"

"बाई बाई! बायकोला समजवायचे सोडून तू मलाच समजावत बसला होय रे! चांगले पांग फेडतो बेटा",सुशीला बाई रागाने म्हणाल्या.

रजत खाली मान घालून पालवी ला समजवायला गेला.

"पालवी आई कशी वागते ते तू मला सांगितलं तिला मी समजावलं आहे पण तुझं तिला डस्ट बिन म्हणणं कितपत योग्य आहे? आज आपण तरुण आहोत उद्या आपणही म्हातारे होणारच न! मग असं बोलणं तुला शोभत नाही."

पालवी तोंडावर हात ठेवून म्हणाली," बापरे! म्हणू नये पण किती खोटं बोलते तुझी आई! मी कधीच म्हंटल नाही त्यांना डस्ट बिन. आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करतायेत त्या."

दोघींचं म्हणणं ऐकल्यावर रजत चं डोकं दुखायला लागलं. दोघीही आपलं म्हणणं च खरं करत होत्या. त्यांना स्वतः ची चूक दिसतच नव्हती.

काही दिवस जरा बरे गेले आणि पुन्हा सासासुनांनी आपले फणे वर काढले. त्या सतत येता जाता रजत ला तक्रारी ऐकवून ऐकवून त्याचं डोकं किट्ट करू लागल्या.

शेवटी एका दिवशी तर दोघींची खडाजंगी जुंपली.

दोघीही समोरासमोर येऊन भांडू लागल्या.

रजत ची आई त्याला " बघ ही तुझी बायको कशी आहे?" आणि बायको "बघ ही तुझी आई कशी आहे?" असं म्हणू लागल्या.

शेवटी दोघीही रजत ला म्हणाल्या,
"एक तर ह्या घरात राहतील नाहीतर मी",पालवी

"एक तर ही घरात राहील नाहीतर मी राहीन",सुशीला बाई

"पालवी तू असं कसं काय म्हणूं शकतेस? माझी आई आहे ती. तिला एकटं सोडून कसं काय जाणार? आणि ती एकटी कुठे जाणार?",रजत ने पालवी ला म्हंटल पण तिचं तोंड वाकडं ते वाकडं च राहिलं.

रजत त्याच्या आईलाही म्हणाला,"आई असं नको म्हणू! पालवी माझी बायको आहे, तुझी सून आहे ती कुठे जाणार? आणि तू तरी कुठे जाणार? त्यापेक्षा आपण सामोपचाराने राहू ह्यातच आपलं भलं आहे."
परंतु सुशिलाबाई नाक मुरडून दुसरीकडे च बघू लागल्या.

दोघींनी पुन्हा आरोप प्रत्यारोप करणं सुरू केलं.

त्या दोघींचा अवतार बघून रजत हबकूनच गेला. त्याने दोघींना समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला पण दोघीही बधायला तयार नव्हत्या.

आई दूर गेली तरी पंचाईत आणि बायको दूर गेली तरी पंचाईत त्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती.

( वरील कथा ही इकडे आड तिकडे विहीर ह्या अर्थाने लिहिली आहे पण बऱ्याच वाचकांचा गोंधळ उडाला त्यांना ती घरोघरी मातीच्या चुली अशी वाटल्याने खाली आणखी एक कथा समाविष्ट केलेली आहे.)

कथा क्रमांक दोन:-

"पिंट्या जाय बरं! तुझे बाबा दुपारी रोज जेवायला घरला येतात ते आलेच नाही आज संध्याकाळ झाली तरी! जा वावरात जाऊन पहा बरं!",पिंट्याची आई

पिंट्या तासाभरात रडत रडतच येतो.
"आय! आय! भाईर ये!",पिंट्या आक्रोश करत म्हणतो.

"काय झालं रे!असा कावून करून राहिला तू?",पिंट्याची आई काळजीने म्हणाली.

"आये! बाबा न फास लावला व! वावरातल्या चिंचेच्या झाडाला! "

"माय! बाईsss हे काय आक्रीत झालं व माय! मालक हे काय केलं तुमी!!",असं म्हणत पिंट्याची आई शेताकडे धावली.
पिंट्याच्या मोठ्या तीन बहिणी कावऱ्या-बावऱ्या होऊन बघू लागल्या जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना हुंदका आवरला नाही. सगळ्या पोरी पिंट्या शेताकडे धावले.

शेतातले दृश्य खुप हृदय हेलावून टाकणारं होतं. झाडाला गळफास लावून धोंडिबा झुलत होता. जीभ डोळे बाहेर आले होते. धोंडीबाच्या कुटुंबीयांचा आक्रोश ऐकवल्या जात नव्हता. लोकांनी त्याला खाली उतरवलं.
धोंडीबाची डाव्या हाताची मूठ बंद होती.गावकाऱ्यांपैकी कोणीतरी ती मूठ उघडली आणि त्यातली चिठ्ठी काढली आणि मोठ्याने वाचली.

'यंदा तुरीचं पीक पूर्ण जळून गेलं. खाया पियाचे फाके पडले त्यातच बालीचा नवरा ट्रॅक्टर साठी हटून बसला. ट्रॅक्टर घेऊन दिल्याशिवाय पोरीला नांदायला नेत न्हाई म्हनतो.
सावकाराकडे घर आधीच गहाण हाय त्याच्याकडे पैकं मागायला गेलो तर तो लाहन्या सुमीचा हात त्याच्या बदफैली मुलासाठी मागू लागला. इकडे जावयाला पैकं न्हाई दिलं तर बाली कायमची घरीच बसलं आन सावकाराचं ऐकलं तर सुमीचा हकनाक बळी जाईल इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती झालिया.'

चिठ्ठी संपली होती. धोंडिबा त्याच्या बायको तीन पोरी आणि एक मुलगा यांना कायमचा संकटात टाकून निघून गेला होता.
★☆★☆★☆★