Bhagy Dile tu Mala - 33 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ३३

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ३३



आंखोसे आशिकी का इजहार कर दिया
बिन बोले तुझे तेरा इमान दे दिया
अगर पाना है सुकून तो चले आना मेरे दर पे
मै तेरा जवाब हु तुझे हर दर्द से आझाद कर दूंगा


स्वरा केबिनमध्ये पोहोचली तेव्हापासून स्वराच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभर कमी झाला नव्हता आणि तिला बघून अन्वयच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा कमी होण्याचं नाव घेईना. अन्वयला स्वप्नांतही वाटलं नव्हतं की त्याला स्वराला इतक्या सहज, पहिल्याच दिवशी बंधनातून मुक्त करायला पाऊल टाकता येईल पण नशिबाने त्याला संधी दिली आणि परिणाम असा झाला की स्वराच्या चेहऱ्यावरच हसू आज काही केल्या जात नव्हत. स्वरा किती तरी दिवसाने ह्या वातावरणात मुक्त श्वास घेत होती आणि स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ तिला खूप दिवसाने अनुभवता येऊ लागला.

एक अरसा हो गया था
एक पल मुस्कुराते हुये
तुम आये तो बदल गयी जिंदगी
अब बेवजह मुस्कुराने मेभी बडा मजा है

आज ऑफिसच वातावरण पूर्णता बदलल होत. अन्वयचा राग बघून सर्व कलीग सिरीयसली काम करत होते. एवढंच काय आज कुणीच कुणाशी क्षणभर बोललं नव्हतं तर इकडे स्वरा आज निवांत होती. तीच काम तर सुरू होत पण आज कितीतरी दिवसांनी तिच्या कामाची प्रशंसा झाल्याने काम करतानाही तिच्या चेहऱ्यावर हसू होत. ह्याआधी अस नाही की ती कधी हसत नव्हती पण चेहऱ्यावर स्कार्फ असल्याने ते हसू कुणीच पाहू शकले नव्हते पण आज ते सुंदर हसू अन्वयच्या नशिबी आलं आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. इथे स्वराची अशी स्थिती होती तर तिकडे अन्वयच कामात मन लागत नव्हत. तो तिच्यात असा हरवला होता की त्याला तिच्यातून बाहेर निघता आल नव्हत. स्वरात अस काय होत जे अन्वयला आवडून गेलं होतं? त्याने तिच्यात अस काय पाहिलं होतं जे इतर लोक पाहू शकले नव्हते? ह्याच उत्तर कदाचित वेळच देणार होती पण स्वराच्या आयुष्यात नकळत हळूच एक व्यक्ती आला होता जो तिला जगायला शिकविणार होता. कधी हसून तर कधी रागावून, कधी चिडवून तर कधी प्रेमाने आणि आयुष्यात अजूनही कितीतरी रंग तिला बघायचे आहेत ह्याची जाणीव करून देणार होता.

ती सायंकाळची वेळ होती. ऑफिस सुटलं आणि नेहमीप्रमाणे सर्व हळूहळू जाऊ लागले. तीही त्यांची जाण्याची वाट पाहू लागली होती. आज जवळपास बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या पण ह्या गोष्टीत काही बदल झाला नव्हता. अन्वयही हे सर्व समोरून बघत होता. आता सर्व कलीग बाहेर निघाले हे बघताच स्वरा ही केबिनच्या बाहेर पडली. आतापर्यंत सर्व ठीक होत पण बाहेर येताच स्वराने पुन्हा एकदा स्कार्फ काढला आणि चेहऱ्यावर बांधून क्षणात पसार झाली. अन्वय आतापर्यंत खुश होता पण तिने स्कार्फ पुन्हा एकदा बांधताच त्याच्या चेहऱ्यावरच हसू गायब झाल आणि त्याच्या डोक्यात एकच गोष्ट आली, " अन्वय तू तिला ऑफिसमध्ये तर स्कार्फ घालण्यास मनाई केली आहेस पण बाहेर सुद्धा नको घालू अस कोणत्या अधिकाराने सांगशील? " अन्वय तिचा बॉस होता त्या अधिकाराने त्याने तिला ऑफिसमध्ये स्कार्फ घालण्यापासून मनाई केली होती पण बाहेरच्या जगात तिला तसच राहावं लागणार म्हणून त्याला क्षणभर वाईट वाटलं होतं. ती बाहेर निघाली आणि तोही आपली बॅग घेत बाहेर पडला. बाहेर निघताच त्याने दूरवर नजर टाकली पण त्याला ती कुठेच दिसली नाही आणि खिन्न मनाने तो घराकडे निघाला.

तेरे हर दर्द का इलाज मैं नही
ये सोचकर दिलं बैठ जाता है
तेरी हसी देखणे का मेरा हक होते हुये भी
ये दुपट्टा मुझे तेरे दीदारसे क्यू तरसाता है ?

आज स्वराच्या स्वभावात कमालीचा बदल झाला होता. ती स्टेशनला पोहोचली तशीच ट्रेन मिळाली आणि ती गार वारा अनुभवत चालू लागली. काल तिला घरी जाताना खूप भीती वाटत होती पण आज तिच्या चेहऱ्यावर टेन्शन अजिबात दिसत नव्हतं. ती स्वतःच्या आनंदात हरवली होतीच की वांद्रे स्टेशन आलं आणि माधुरी तिच्या बाजूला येत उभी राहिली. माधुरीला बघताच स्वराने तिला घट्ट मिठी मारली आणि आनंदातच उत्तरली, " काय माधुरी मॅडम कसा गेला तुमचा दिवस?"

माधुरीला, स्वराला नक्की काय झालं कळत नव्हतं तरीही तिला आनंदी बघून ती हसत उत्तरली, " माझा तर मस्त गेला. पण माझं सोड ताई, तू सांग तुझा कसा गेला दिवस? आला का तुझा नवीन बॉस? काय म्हणाला तुला? "

स्वरा जरा उदास होतच म्हणाली, " हो आलाय दिल्लीहून. खडूस कुठला!! किती ओरडला माझ्यावर माहिती आहे तुला? "

माधुरी तिला चिडवत म्हणाली," आमच्या फुलासारख्या कोमल मुलीवर ओरडायची त्याची हिम्मत कशी झाली? काय कारण होत बर की पहिल्याच दिवशी आमच्या मुलीवर ओरडला? तू काही त्याला शिव्या वगैरे दिल्या नाहीस ना? "

स्वरा उदास स्वरातच उत्तरली, " कारण काय असणार? माझ प्रेझेन्टेशन प्रशांत सरांनी सादर केलं. त्यांना तयारी करायला वेळच मिळाला नाही आणि मग काय त्यांची त्याने क्लास लावली. प्रशांत सरांना प्रेझेन्टेशन द्यायला जमलं नाही तर त्यांनी मला बोलावून घेतलं आणि वेळेवर प्रेझेन्टेशन सादर करायला लावलं. बर की मला सर्व येत होतं नाही तर किती ओरडला असता खडूस माझ्यावर मलाच नाही माहिती. मी स्कार्फ घालून होते तर म्हणाला कसा मिस स्वरा इथे फॅशन शो नाहीये की स्कार्फ घालून प्रेझेन्टेशन देत आहात. पुन्हा म्हणाला की यानंतर स्कार्फ घालून ऑफिसला फिरायचं नाही. नाही तर एकेकाला सरळ करेन. त्याला काय माहिती मी आवडीने थोडी घालते स्कार्फ. नाईलाज आहे म्हणून घालते ना? खडूस कुठला!! "

माधुरी तीच बोलणं ऐकून क्षणभर हसतच होती. माधुरी नक्की का हसते आहे हे स्वराला कळत नव्हतं म्हणून स्वरा ओरडतच म्हणाली, " तुला पण गंमत वाटत आहे होय? तो ओरडला ते आवडलं तुला?"

माधुरीने अजूनही हसन बंद केलं नव्हतं तर स्वरा आता शांत झाली होती. माधुरीने पुढच्याच क्षणी तिचा हात पकडत म्हटले, " ताई तुला त्याचा राग दिसला पण त्याने तुला स्कार्फ मधून मुक्त केलं ते नाही दिसलं का? भलेही रागाने तर रागाने पण त्याने तुला बंधमुक्त केलं आणि खऱ्या अर्थाने तुझ्या टॅलेंटची कदरही केली. आजपर्यंत काम तू करत होतीस पण क्रेडिट कुणी दुसर घेऊन जायचं पण आज कामही तुझं आणि क्रेडिटही तुझंच. सांग बर ह्यात काय चुकीच झालं? तुला त्याचा राग दिसला पण त्याने तुझ्यासाठी नकळत काय केलं ते नाही समजलं का?"

स्वरा आता पक्किच शांत झाली. स्वराने ह्याबाजूने अन्वयबद्दल विचार केलाच नव्हता. आतापर्यंत माधुरीवर रुसणार्या स्वराकडे कुठलंच उत्तर नव्हतं आणि माधुरी पुन्हा म्हणाली," मी तुला काल म्हटलं होत ना. तू फक्त नकारात्मक विचार करते आहेस. कदाचित तो चांगला असेल तर ?? बघ मिळालं आज तेच उत्तर. केलं त्याने तुला बंधमुक्त आणि मला वाटत समोरही करेल. तू बस देखते जा आगे आज होता क्या है मेरी जान?"

स्वराला तस बोलण्यात कुणीच हरवत नसे पण आज माधुरीच्या शब्दांसमोर तिने जणू चुप्पीच साधली. ती काहीच बोलत नाहीये, तिच्या मूडमध्ये काहीच बदल होत नाहीये हे पाहून माधुरी पुन्हा म्हणाली, " बर ते सोडा ताईसाहेब मला सांगा तो दिसतो कसा?"

आता स्वराने तोंड उघडले आणि विचार करत म्हणाली," तेवढा खास नाही पण आहे छान. दिसायला थोडा गोरा, हेल्दी,उंच .इन शॉर्ट दिसतो बऱ्यापैकी. का ग तु हे सर्व का विचारत आहेस मला? "

माधुरी आता हसतच उत्तरली, " बहुतेक साहेबांना आमच्या ताईसाहेब पहिल्याच भेटीत आवडल्या आहे तेव्हा म्हटलं विचारावं कसे दिसतात आमचे जीजू? तुला आवडला का तो?"

माधुरी हसत होती आणि स्वरा तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली. तिला राग आला होता तर माधुरी आताही हसतच होती. काही क्षण तसेच गेले आणि स्वरा उत्तरली," माधुरी सत्य परिस्थिती आणि स्वप्न ह्यात जसा खूप फरक असतो ना तसच माझं आहे. मला कुणी पसंद करणे आणि सत्यात पाहणे ह्यात खूप फरक आहे. कुणी एखादा मुर्खच असेल जो ह्या चेहऱ्याच्या प्रेमात पडेल. मला वाटत कुलकर्णी सरांनी सांगितलं असेल त्याला. ते म्हणाले होते ना की त्यांना वाईट वाटलं मला बंदिस्त करून तर कदाचित त्यांनीच सर्व सांगितलं असावं."

ती विचार करतच होती की माधुरी पुन्हा उत्तरली, " जर त्याने स्वतःच ते सर्व केलं असेल आणि त्याला तू खरच आवडली असणार तर मग सांग काय करशील? "

स्वरा हसतच उत्तरली," माधुरी स्वप्न पहायचे दिवस तुझे आहेत तेव्हा मला विनाकारण जें पूर्ण होणारच नाहीत ते स्वप्न नको दाखवू आणि समजा तस असेलही तरीही मी कुणाला माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. मला नकोय प्रेम वगैरे. मी माझ्यासाठी समर्थ आहे."

तिच्या उत्तराने माधुरीने हसन बंद केलंच. आता दोघीही शांतपणे प्रवास करू लागल्या होत्या. काहीच क्षणात वसई आली आणि दोघीही एकमेकांना बाय करून घराकडे निघाल्या.

ती रात्रीची वेळ होती. स्वराच जेवण आटोपलं आणि ती निवांत गादीवर पडली. काल रात्री तिला झोप लागली नव्हती म्हणून आज ती लवकर झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण आजही काहीशी तशीच स्थिती होती. ती इकडून तिकडे पलटी मारत होती पण तिला झोप काही येत नव्हती. तिला अस का होतंय माहिती नव्हत. झोप लागत नसल्याने ती तशीच बेडवर पडून राहिली आणि पुन्हा एकदा तिच्या खाली डोक्यात माधुरीचे शब्द दरवळू लागले," ताई जर त्याने स्वतःहून केलं असेल ते सर्व तर आणि त्याला तू आवडली असणार तर?" ह्या प्रश्नाचं उत्तर तिने माधुरीला तर दिलं होतं पण तरीही तीच मन आज तिला स्वस्थ बसू देत नव्हत. ती विचार करता करता सकाळच्या क्षणात पोहोचली आणि क्षणभर तिथेच स्थिरावली. तिला आठवला तो क्षण जेव्हा ती स्कार्फ काढून सर्वांकडे बघत होती. हळूहळू तिच्या नजरेसमोरून एक एक चेहरे समोर जाऊ लागले. त्या एकाही चेहऱ्यावर तिला आनंद दिसला नव्हता उलट तिचा जळलेला चेहरा पाहून सर्वांनी तिच्यापासून डोळे फिरवले होते. तर ती समोर जाता-जाता स्थिरावली त्या चेहऱ्यावर. ती पाहत होती की त्याच्या चेहऱ्यावर हसू होत. क्षणभरही भीतीचा लवलेश तिला दिसला नव्हता. ती आठवू लागली आणि तिला लक्षात आलं की तो अर्धा तास अन्वय फक्त तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी होत जे ती पाहत होती पण तिला काहीच सापडलं नाही. आता त्याला तस बघून तीही आनंदी झाली होती. समोर विचार करतच होती की स्वराने पटकन डोळे उघडले आणि उठून बसली. तिला क्षणभर स्वतःच्याच विचारांवर ताबा उरला नाही आणि तिने ते पाहिलं ज्याकडे तीच लक्ष गेलं. ते सर्व विचार येताच तिला माधुरीचे शब्द खरे वाटू लागले होते. त्याच्या चेहऱ्यावरच तेज त्याच बाजूने इशारा करत होत आणि पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर घाम सुटला. तिला क्षणभर स्वतःलाच भीती वाटू लागली. ह्याआधी तीच्या आयुष्यात जेव्हा अस झालं होतं तेव्हा एक वादळ येऊन गेल होत तेव्हा आता नक्की काय होईल ह्या विचाराने तिची झोप उडाली. तिला आज त्याबद्दल विचार करायचा नव्हता पण राहून राहून तेच विचार डोक्यात येत होते. रात्र सरत होती पण स्वराला अजूनही झोप लागली नव्हती. माधुरीच्या शब्दाने तिची आज झोपच उडवली होती.

आज कितीतरी वेळ तिला झोप लागली नाही आणि लागली तेव्हा पुन्हा एकदा उठायला उशीर झाला होता. तिने पुन्हा एकदा धावत-पळतच ऑफिस गाठल. वेळ कालच्या एवढीच झाली होती. खर तर अन्वय येण्याआधी सर्व निवांत ऑफिसला येत असत पण तो आल्यापासून सर्व वेळेआधी येऊन बसत होते. ती येण्याआधीच सर्व कामाला लागले हे बघून तिला जरा भीती वाटत होती. तिने केबिनमध्ये जाता-जाता एकदा अन्वयच्या केबिनवर नजर टाकली. त्याच वेळी त्यानेही तिच्यावर नजर टाकावी आणि स्वराची नेमकी धांदल उडाली. त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत नव्हती म्हणून घाबरत घाबरतच ती आपल्या केबिनला पोहोचली. केबिनला पोहोचताच तिने बॅग बाजूला ठेवली आणि गणरायाला प्रणाम करून खुर्चीला टेकली. ती आता थोडी रिलॅक्स वाटत होती आणि तेवढ्यात अमर काका केबिनमध्ये येत म्हणाले," स्वरा मॅडम तुम्हाला अन्वय सरांनी लगेच बोलावलं आहे. लवकर या. "

काका समोर निघून गेले आणि स्वरा अजून विचारात पडली. एक तर रात्रभर तर ती अन्वयचाच विचार करत होती आणि पुन्हा एकदा अन्वयचाच चेहरा बघावा लागेल, त्याच्या नजरेला उत्तर द्यावे लागेल म्हणून ती थोडी घाबरली होती. तिचे पाय खुर्चीवरून उठायला तयार नव्हते आणि पुन्हा एकदा काका येऊन गेले. आता तिच्याकडे जाण्याशिवाय पर्यायच नव्हतं त्यामुळे गणरायाचे दर्शन घेत ती पुन्हा एकदा अन्वयकडे जाऊ लागली. जाताना तिची नजर ऑफिसच्या कलीगकडे गेली. आज सर्व कस शांत होत त्यामुळे कुणाचीच तिच्यावर नजर गेली नव्हती. हळूहळू पावले टाकत ती अन्वयच्या केबिनसमोर पोहोचली आणि घाबरतच उत्तरली," मे आय कम इन सर?"

अन्वय त्यावेळी कुणाशी तरी फोनवर बोलत होता त्यामुळे त्याने तिला हातानेच इशारा करून बसायला सांगितले. ती काहीच क्षणात समोर बसली. रात्रीच्या विचाराने तिची अन्वयकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. त्यामुळे ती मान खाली टाकून राहिली. तिचे हात पाय थरथर कापू लागले होते. ती थोडी नर्व्हस झाली होती तेवढ्यात अन्वय म्हणाला, " मिस स्वरा तुम्हाला विसरण्याचा आजार आहे का?"

त्याच्या प्रश्नाने ती क्षणभर विचारात पडली. अन्वय असा का म्हणाला होता तिला कळलंच नव्हतं. तिला त्याला प्रश्न विचारायचा होता म्हणून तिने मान वर केली आणि त्याच्या स्माईलमध्ये हरवली. पुन्हा एकदा तिच्यासमोर त्याचे डोळे उभे राहिले. त्या डोळ्यात वेगळीच चमक होती. तिला त्याच्या डोळ्यात आता एकटक पाहणे कठीण जाऊ लागले आणि ती अडखळत म्हणाली," काय विसरले सर मी?"

अन्वय हसतच उत्तरला," मी काल म्हटलं होतं ना तुम्हाला ऑफिसमध्ये स्कार्फ घालायचा नाही तरीही अजून माझं ऐकलं नाही तुम्ही."

स्कार्फच नाव घेताच तिने चेहर्याला हात लावून बघितला. खरच ती टेन्शनमध्ये स्कार्फ काढायला विसरली होती. अन्वयच बोलणं ऐकू येताच तिने पटकन स्कार्फ काढला आणि पुन्हा खाली पाहू लागली. तिला अस बघून अन्वयला क्षणभर हसू आवरत नव्हतं. तर तो हसतोय हे बघून स्वराला त्याचा राग येत होता पण त्याच्या डोळ्यात बघण्याची तिची हिम्मत होत नव्हती म्हणून नजर खाली करतच ती म्हणाली," सर तुम्ही कशाला बोलावलं होतं मला?"

अन्वय हसतच उत्तरला, " गुड क्वशन! खूप वेळाने तुम्ही पहिल योग्य काम केलंत. सो मिस स्वरा मी तुम्हाला हे सांगायला बोलावलं आहे की तुम्ही जर कुठे नवर्यासोबत बाहेर जाणार असाल, आई-बाबांना बाहेर भेटायला जाणार असाल तर आताच सुट्ट्या काढून घ्या? मी देईन सुट्ट्या. "

स्वराने आता मान वर करत रागावतच म्हटले," सर ह्यासाठी बोलावलं तुम्ही? "

अन्वय हसतच उत्तरला, " हो मग तुम्ही काही वेगळं ऐकलं का?"

ती जरा आता चिडली होती पण बॉसला कस रागवायच म्हणून राग दाबत म्हणाली," नो थँक्स सर! मला नवरा नाही आणि राहिल आई-बाबा सोबत बाहेर जायचं तर त्यासाठी सुट्ट्या काढायची गरज नाही. मी त्यांना इथेच बोलावून घेईल. जाऊ सर मग मी? "

ती उठून जाणारच की अन्वय हळुवार आवाजात म्हणाला, " लवंगी मिरची!! अगदी झणझणीत!"

स्वराला त्याचा आवाज गेला आणि ती मागे वळून रागातच म्हणाली, " काय म्हणाला सर तुम्ही? "

अन्वय हसतच उत्तरला, " हे म्हणालो की इथे बॉस नक्की कोण आहे कळत नाहीये. तुम्ही की मी? "

ती शांत होत म्हणाली, " अफकोर्स सर तुम्ही! "

ती विचार करतच होती की अन्वय म्हणाला, " मग मिस स्वरा तुम्हाला खरच वाटत का मी तुम्हाला फक्त सुट्ट्या हव्या का विचारायला बोलावलं आहे?"

स्वराची आता शिट्टी बिट्टी गुल झाली होती आणि ती पटकन येऊन चेअरवर बसली. चेअरवर बसताच अन्वय म्हणाला," तर मी सुट्ट्याबद्दल ह्यासाठी म्हटलं कारण तुम्हाला काही महिने सुट्ट्या मिळणार नाहीत. काल तुम्ही जे प्रेझेन्टेशन सादर केलं त्या प्रोजेक्टची मी पूर्ण जबाबदारी मी तुम्हाला सोपवतोय. एकदा जबाबदारी सोपवली की तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. ह्या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला कुठलीच मदत करणार नाही सो आजपासून काम हाती घ्या. प्रोजेक्ट यशस्वी व्हायलाच हवा. अंडरस्टुड? "

स्वराला आता थोडं टेन्शन आलं होतं आणि ती हळुवार आवाजात उत्तरली," एवढा मोठा प्रोजेक्ट मी कसा तो पूर्ण करणार? ते पण तुमच्या मदतीविना. मला नाही जमनार सर! "

अन्वय आता हसतच उत्तरला, " काय मिस टॉपर हवा फुस्स! मला कुणीतरी म्हणाल होत की मिस टॉपर कधीच हार मानत नाही. कुठलंही काम लगेच हातात घेऊन फत्ते करतात पण इथे तर एकूणच हवा गुल झाली. तरीही मी सर्वाना म्हणतो की मुलींना काम देत नका जाऊ. त्यांच्या बस मध्ये नाही हे सर्व पण माझं कुणी ऐकतच नाही. मुली आहेत ह्या त्यांना चूल आणि मूल शिवाय काय जमणार? इट्स ओके मिस स्वरा मला आधीच विचार करायला हवा होता की एका मुलीला हे झेपणार नाही. सॉरी तुमच्यावर विश्वास केल्याबद्दल. मी देतो दीपकला काम. "

अन्वय दीपकला आवाज मारणारच तेवढ्यात ती मोठ्याने म्हणाली," अन्वय सर! मुली काय काय करू शकतात ते आता तुम्हाला दाखवतेच!! हा प्रोजेक्ट तर आता मीच करणार आणि यशस्वी करून दाखवणार. तुम्ही फक्त बघतच राहा."

ती रागाने उठून केबिनबाहेर पळाली तर अन्वय तिच्याकडे बघून क्षणभर हसत होता.

तेरी गुस्से वाले शकलं मेभी प्यार छुपा है
तुझे पता नही उसे देखणे को मेरा दिलं कितना तरस रहा है

स्वराने आपल्या केबिनला पोहोचताच स्कार्फ पटकन टेबल वर फेकला आणि हळू आवाजात स्वतालाच म्हणाली," काय समजतो हा स्वतःला? माझी इज्जत काढतो काय? ह्याला माहिती नाही मी कोण आहे तर आता जागा दाखवतेच बघ आणि माधुरी तू म्हणत होतीस ना ह्याला मी आवडले वगैरे असेल तर हा तुझा गैरसमज आहे. बघ कसा उद्धट आहे तो? तुला चुकीच वाटलं होतं त्याच्याबद्दल. त्याच्यात पण पुरुषी अहमपणा आहे आणि तो तोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही."

ती स्वतःशीच पुटपुटत होती तर अन्वय तिला आपल्या केबिनमधून लपून बघत होता. तिचा रागावलेला चेहरा बघून अन्वय हसतच उत्तरला," लवंगी मिरची!! "

ती रागात त्याला शिव्या देत होती तर तो तेवढ्याच प्रेमाने तिच्याकडे हसून बघत होता.

काही तरी होत दोघांच्यामध्ये जे कुणी पाहिलं नव्हतं
प्रेम नव्हतं ते पण त्यापेक्षा कमीही नव्हतं.

कुछ हसीन लम्हे चुरालू
तेरी हामी के बगेर
तुझसे प्यार करणा
कोई गुन्हा तो नही..!!

क्रमशा ....