Bhagy Dile tu Mala - 27 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग २७

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग २७

बेआब्रू करके पुछते होे
तकलीफो की वजहँ
हुनर लोगोसेही सिखा है
या खानदानी पेशा है

मुलाखतीचा दिवस. स्थळ दादर. ११ वाजले होते. स्वरा अर्ध्या तासांपासून एकटीच बेंचवर बसून होती. आधी तिचा जेवढा कॉन्फिडन्स होता तेवढा ह्यावेळी तिच्याकडे नव्हता. मागचे मुलाखतीचे अनुभव त्याला जबाबदार होते. स्वरा जरा घाबरली होती. तिच्या डोक्यात कितीतरी प्रश्न सुरू होते कारण आज जॉब मिळाली नसती तर कदाचित तिने काय केलं असत तिलाच माहिती नव्हत. ती विचारात हरवली होतीच की रिसेप्शनिस्ट म्हणाली," मॅडम आपल्याला आतमध्ये बोलावलं आहे."

रिसेप्शनिस्टचा आवाज येताच स्वराने आपल्या चेहऱ्यावर गोड हसू आणलं आणि हळूहळू पावले टाकत मुलाखत घेण्यात येणार होती तिथे जाऊ लागली. तस अंतर काही सेकंदाच होत पण आज स्वरासाठी ते खूप मोठं होत कारण ह्या एका गोष्टीवर तीच पूर्ण भविष्य ठरणार होतं. ती घाबरत-घाबरतच दारावर पोहोचली आणि नम्र स्वरात म्हणाली," मे आय कम इन सर."

समोरून आवाज आला," येस प्लिज कम."

स्वरा हळूच दार ढकलत आतमध्ये पोहोचली. तिच्यासमोर दोन लोक होते. एक वयाने ५० क्रॉस केलेला व्यक्ती होता तर दुसरी ३५-४० मधला एक व्यक्ती बसला होता. त्यांना न्याहाळतच स्वरा चेअरवर बसली. ती थोडी घाबरली होती अस त्यांनाही जाणवलं होत म्हणून आधी त्यांनी तिला पाणी ऑफर केलं. काहीच क्षणात तिची मुलखात सुरू झाली. सर प्रश्न विचारत होते आणि ती उत्तर देत होती. सुरुवातीला अडखडणारी स्वरा नंतर पटापट उत्तर देत आहे हे बघून दोन्हीही चेहरे मोहरले होते. तीच त्याच्या चेहऱ्यावरच लक्ष होत. त्यांना तिला बघून काही वाटत नव्हतं म्हणून ती बेटर फिल करू लागली होती. मुलाखत घेणारे तज्ञ होते कारण त्यांनी अशी एकही गोष्ट नव्हती जी स्वराला विचारली नव्हती आणि स्वराने अशी एकही गोष्ट नव्हती जी त्यांना सांगितली नव्हती. सुमारे अर्धा तास तिची मुलाखत सुरू होती. मुलाखत संपताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि त्यातले सिनियर व्यक्ती म्हणाले," मिस स्वरा क्वाइट इम्प्रेसिव!! तुझ्यासारखी टॅलेंटेड व्यक्ती मी एवढ्या मुलाखत घेतल्या त्यात कधीच बघितली नाही. आय एम इम्प्रेस!! आय.आय.टी. टॉपर शोभतेस हा!!"

त्यांचं उत्तर एकूण स्वराला खूप आनंद झाला होता पण तो जास्त काळ टिकला नाही आणि पुन्हा ते म्हणाले," बट स्वरा माझे काही प्रॉब्लेम्स आहेत. मान्य की तुझ्यात टॅलेंट आहे पण तुझा चेहरा आमच्या ऑफिसमध्ये वातावरण गढूळ करू शकतो. कदाचित तुझ्यासमोर सर्व ऑकवर्ड फिल करू शकतात. मला स्वतःला काही प्रॉब्लेम नाही पण आम्ही बिजनेस चालवतो तेव्हा इतरांकडून तक्रार नकोत. तक्रारी आल्या की मग नको ते त्रास उद्भवतात आणि मग त्याचा कामावर प्रभाव पडतो. यु नो मी काय म्हणतो आहे ते? डू यु अंडरस्टॅण्ड? "

स्वराने उत्तर ऐकलं आणि तिला कळून चुकलं की इथेही नकार आहेच त्यामुळे पुढचं बोलणं ऐकायच्या आधीच ती चेअर वरून उठून जाऊ लागली. त्यांनी ते बघितलं आणि हळूच म्हणाले," मिस स्वरा कुठे जात आहात?"

स्वरा नम्र स्वरात उत्तरली," सॉरी सर उठून जातेय त्यासाठी पण गेले २ वर्ष जेव्हढ्याही मुलाखत दिल्या त्यात सर्वाना माझं टॅलेंट आवडलं पण चेहरा नाही. मला माहित नव्हतं की जॉब साठी चेहरा आवश्यक असतो म्हणून म्हटलं तुम्हाला नकार द्यायला लावायच कष्ट का देऊ म्हणून स्वतःच जात होते."

ते व्यक्ती क्षणभर हसले आणि हळूच म्हणाले," स्वरा बस अजून माझं बोलणं झाल नाहीये. त्यानंतर खुशाल जा."

सरांनी म्हटल्यावर तिच्याकडे दुसऱ्या पर्याय उरला नाही आणि ती पुन्हा एकदा चेअर वर बसली आणि पुन्हा एकदा सर म्हणाले," खर सांगू तर सरांनी सांगितलं म्हणून तुला जॉब द्यावी लागणारच होती पण त्याहीपेक्षा मी ही जॉब तुला टॅलेंटच्या भरवशावर देतोय. तुला मी नाही म्हटलच नाही फक्त एक गोष्ट आहे रॅदर दॅन अट आहे."

स्वरा चेहरा गंभीर करत म्हणाली," काय सर?"

ते पुन्हा एकदा हसत म्हणाले," मी जरा स्वार्थी होतोय स्वरा आय नो!! मला तुझ्यासारख टॅलेंट सोडायचही नाही आणि तुझा चेहरा सहसा स्वीकारताही येणार नाही. सो ह्यावर एक पर्याय आहे. बघ स्वरा बिजनेस मध्ये असे कठीण निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मी स्पष्ट बोलेन. तुला आम्ही जॉब देऊ पण तुला सर्वांसोबत बसता येणार नाही. तुला आम्ही एक स्पेशल रूम देऊ त्यातून तू सर्व मॅनेज कर. तुझा इतर कुणाशी संपर्क येणार नाही ह्याची काळजी घे. मला कुणाकडून तक्रार येणार नाही ह्याची काळजी घे. बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाही. डू यु अंडरस्टॅण्ड?"

स्वरा हसतच म्हणाली," म्हणजे मी ह्या ऑफिसमध्ये काम करेन पण एकाच रूम मधून सर्व ऑपरेट करेन. कुणाशी बोलायच नाही की समोर यायचं नाही."

सर हसतच म्हणाले, " हो तसच! आम्हाला तुझ्या टॅलेंटची गरज आहे आणि तुला जॉबची. मला तुझ्या चेहऱ्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण इतराना होऊ शकतो आणि ही परिस्थिती कायम राहील अस माझं म्हणणं नाही. तुला लोकांनी स्वीकारल की तू सर्वाना जॉईन होऊ शकतेस. तुला हवं तर वेळ घे निर्णय घ्यायला काही प्रोब्लेम नाही. "

स्वराच्या चेहऱ्यावर क्षणभर मिश्किल हसू आलं होतं आणि ती हळूच म्हणाली," सर खर तर हे आधी घडलं असत तर वाईट वाटलं असत पण आता मला ह्या एकांताची सवय झाली आहे. सो मला मान्य आहे आणि पुढे कधीच कुणाला जॉईन होणार नाही. शक्यतो सर्वांच्या आधी येईन आणि उशिरा जॉईन. आर यु ओके विथ धीस?"

सर तिला हात मिळवितच म्हणाले," गुड डिसीजन स्वरा!! मी बाहेर सांगतो, तू जॉब लेटर घेऊन जा आणि तुला हवं तेव्हा जॉईन हो."

स्वराने मिश्किल हसत हात मिळविला आणि जाऊ लागली. तेवढ्यात पुन्हा एकदा सर म्हणाले, " स्वरा एक विनंती आहे. प्लिज ह्याबद्दल बाहेर कुणाला कळू देऊ नको की मी अस बोललो आहे म्हणून प्लिज!!"

स्वरा हसतच बाहेर पडली. तिच्या हसण्यात त्यांना उत्तर मिळालं होतं.

आज तिला जॉब मिळाली होती पण वाईट ह्या गोष्टीच वाईट वाटलं होतं की आता जेल मध्ये असणाऱ्या कैद्यासारखं जीवन जगाव लागेल पण त्याही पेक्षा ती खुश होती कारण ह्या जीवणापेक्षा तिला जास्त त्रास घरच्यांना कुणी काहीही बोलण्याचा होत असे त्यामुळे ती पुन्हा एकदा अपमानास्पद जीवन जगायला तयार झाली होती. ती निराश होती पण तिला माहीत नव्हतं की हाच प्रवास तिच्या आयुष्यातला सुंदर प्रवास ठरणार आहे. जो कुणीच तिच्यापासून हिरावून घेणार नाही.

********************

ए हुस्न के जादूगर
जरा ख्वाहिश सून मेरी
बना दे मेरा हाल ऐसा की
दुनिया दिवानी हो जाये मेरी

" पीडिता " ह्या शब्दातच नकोसा असणारा प्रवास आहे. सामान्य माणसाला आयुष्यात कदाचित दोन तीन वेळा नव्याने सुरुवात करावी लागते पण ऍसिड अटॅक व्यक्तीला रोज नवीन आणि नव्याने प्रवास सुरु करावा लागतो. इतर व्यक्तींच आयुष्य लोक बदलेलं, जागा बदलली की नव्याने बहरू शकत पण ऍसिड अटॅक ग्रस्त मुलींचा त्यांचा चेहराच वैरी असल्याने त्यांना कधीच मानाची वागणूक मिळत नाही. त्यांच्याकडे सर्वच असत पण प्रत्येक वेळी कुठे ना कुठे माघार घ्यावी लागते, कुठे ना कुठे त्यांना लोक जाणीव करून देतातच की नक्की तुम्ही काय आहेत. स्वराच्या आयुष्याचा पुन्हा एक प्रवास सुरु झाला. शेवटचा होता का? देव जाने …

स्वरा १५ दिवसात मुंबईला आली होती. तिला त्यावेळी आईबाबांना एकट सोडणे शक्य नव्हते पण तिचा नाईलाज होता त्यामुळे ह्यावेळीही तिने एकटीनेच यायचा निर्णय घेतला. मुंबई तस खर्चिक शहर. इथे जेवढे कमावतो तेवढे खान्या-पिण्यातच खर्च होतात त्यामुळे स्वराला मुख्य शहरात महागाची रूम करणे शक्य नव्हते शिवाय तिचा चेहऱ्यामुळे दुसर कुणी सोबत राहणार नाही म्हणून सिंगल रूम तिला बघावी लागणार होती. ह्यात तिला पूजाच्या एका मैत्रिणीने मदत केली आणि स्वरा वसईला सेटल झाली.

मुंबई म्हणजे मायानगरी. कितीतरी लोकांची स्वप्न हे शहर पूर्ण करत अस स्वराने ऐकलं होत. आज तीही त्या शहराचा एक भाग होणार होती. तिला सरांनी आधीच सांगितलं असल्याने की तुला सर्वाआधी यावं लागेल म्हणून अगदी पहाटे-पहाटे ती उठली होती आणि स्वयंपाक वगैरे आवरून तयार झाली. तिने बॅग हातात घेतली आणि दाराच्या बाहेर जाऊ लागली तेव्हाच स्कार्फवर तीच लक्ष गेलं. ह्याच स्कार्फमुळे पूजा एकदा तिच्याशी भांडली होती म्हणून त्या स्कार्फला बघताच स्वरा हळूच हसत म्हणाली," सॉरी पूजा तू चांगली आहेस म्हणून संपूर्ण जग चांगलं नाही. आजपासून माझं बंदिस्त जीवन सुरू झालं आहे. ऑफिसमध्ये बसूनही चेहरा दाखवायचा नसेल तर बाहेर लोकांना का दाखवायचा ना? सॉरी माहिती आहे तू रागावशील पण हरकत नाही. आजपासून हीच माझी ओळख आहे. "

ती स्वतःशीच पुटपुटली आणि स्कार्फ चेहऱ्याला घट्ट बांधत घराबाहेर निघाली. मुंबई अस एक शहर जिथे लोक झोपत नाही. इथे प्रत्येक व्यक्तीच स्वप्न पूर्ण होत पण स्वराच कुठलंच स्वप्न उरल नाही हा विचार करून स्वरा सहज हसून गेली. ती हळूहळू पावले टाकत वसई स्टेशनवर पोहोचली आणि समोरची गर्दी बघून अवाक झाली. तिने आयुष्यात पहिल्यांदा एवढी गर्दी बघितली होती. ती गर्दीला न्याहाळतच होती की ८.३० ची लोकल आली. स्वरा समोर जाणारच की तिने बघितल लोकांची झुंड आपल्याकडे येत आहे. एवढी मोठी गर्दी धावून येताना बघून स्वरा मागे हटली. लोक पटापट चढले आणि ट्रेन समोर निघाली तर स्वरा एवढी गर्दी बघून घाबरली होती . तिला घाम सुटला होता. तिला वाटलं की समोरच्या ट्रेनने जाऊ तेव्हा गर्दी कमी असेल म्हणून ती थांबली पण गर्दी आणखीच वाढत होती. स्वराने दोन तीन ट्रेन सोडल्या पण स्थिती काहीशी बदलली नव्हती. ती आज पहिल्यांदा लोकलने जाणार होती आणि आजच हे सर्व बघून तिच्या काळजात धसकन झालं होतं. स्वराची अशी स्थिती बघत एक मुलगी मागे हसत होती. तिला राहवलं नाही आणि हळूच तिच्या जवळ येत म्हणाली, " ताई आपण एकमेकांना ओळखत नाहीं तरीही सल्ला देतेय इथे वाट पाहणारे कायम वाट पाहतच असतात सो ट्रेन येईल तसेच चढा. लोक मागून धक्का देतील आणि आपण समोर जाऊ आपोआप. नाही तर तुम्हाला इथेच वाट पाहत बसावं लागेल. ही मुंबई आहे ताई. इथे वाट पाहणारे कायम वाटच पाहत बसतात. "

स्वरा त्या मुलीकडे बघून क्षणभर हसली. ते पुढे काही बोलणार त्याआधीच पुन्हा एक ट्रेन आली आणि ह्यावेळी ती मुलगी स्वराचा हात पकडत पटकन ट्रेन मध्ये चढल्या. ती खरच म्हणाली होती. स्वरा फक्त समोर उभी होती आणि लोकांनी तिला धक्का मारत ट्रेनमध्ये ढकलले. स्वराला हा अनुभव नवीन होता पण भारी होता त्यामुळे ती क्षणभर हसू लागली. समोरची मुलगी पुडच्याच क्षणी म्हणाली," कसा होता मग ताई अनुभव?"

स्वरा हसतच उत्तरली," खूप मजेशीर! आता रोज युद्ध करावं लागणार आहे बहुतेक!! "

स्वरा हसतच होती की त्या ताई पुढे म्हणाल्या, " सॉरी! मी माझी ओळख करून देते. मी माधुरी. मी वांद्रेला जाणार आहे आणि तू?"

स्वरा हसतच उत्तरली," मी स्वरा. मी दादरला जाणार आहे."

माधुरी आता हसतच उत्तरली," अरे वा! एक स्टेशन अंतर फक्त! आपण सोबत जाऊया रोज. मज्जा येईल. चालेल ना तुम्हाला?"

स्वराने हसतच म्हटले, " हो नक्की जाऊया! तशी पण मी ह्या शहरात नवीनच आहे सो मला तुझी साथ होईल. "

आज अनपेक्षितपणे स्वराला एक मैत्रीण मिळाली. माधुरी स्वरापेक्षा एक दोन वर्षाने लहान. तीही जॉब करायची. लहान असल्याने तिच्यात थोडा अल्लडपणा होता त्यामुळे ती शांत बसत नव्हती तर स्वरा तीच बोलणं ऐकून हसत होती. कधीतरी स्वराही अशीच होती त्यामुळे ती माधुरीवरून नजर हटवू शकली नव्हती. माधुरी जरी तिच्यासाठी अनोळखी असली तरीही तिच्याशी बोलून स्वराला खूप छान वाटलं होतं. आज ऑफिसचा पहिला दिवस असल्याने स्वरा नर्व्हस होती पण माधुरीने हसवून तिचा दिवस बनविला होता. माधुरी एक तास पटर पटर करत होती पण तिने स्वराच्या दिवसाची सुंदर सुरुवात केली होती. वांद्रे स्टेशन आलं आणि माधुरी बाय बोलून निघून गेली तर स्वरा दादर येण्याची वाट पाहू लागली. पुढच्या १०-१५ मिनिटातच ती दादरला पोहोचली. अगदी थोड्याच अंतरावर तीच ऑफिस होत आणि ती ऑफिसला पायीच निघालं.

आज ऑफिसला पहिलाच दिवस असल्याने स्वरा थोडी घाबरली होती. ह्या दहा मिनिटांच्या प्रवासात स्वरा क्षणभर गोंधळली होती तरीही तिने हिम्मत करून ऑफिस गाठलच. स्वरा ऑफिसमध्ये पोहोचली आणि आतमध्ये डोकावून पाहू लागली. तेव्हा फक्त १० वाजले असल्याने अजून कुणीच ऑफिसला आल नव्हतं. ऑफिसला कुणीच नसल्याने तिला थोडं बर वाटल होत आणि ती निवांत ऑफिस मध्ये जाऊ लागली तेवढ्यात कुलकर्णी सर तिच्यासमोर येत म्हणाले," वेलकम स्वरा!! आज तू ऑफिसला येणार असल्याने मीही लवकरच आलो. चल तुला तुझी केबिन दाखवतो. काम तर तुला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे त्यामुळे ते मला सांगायची गरज वाटत नाही."

कुलकर्णी सरांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली होती तर स्वरा चेहऱ्यावर कुठलेही भाव न आणता तशीच आतमध्ये जाऊ लागली. कुलकर्णी सर समोर चालु लागले तर ती त्यांच्या मागे मागे चालू लागली. थोड्याच वेळात तिला केबिन सांगून एका अंधार्या गुफेत नेण्यात आल होत. हो अंधारी गुफाच होती ती. मेन रूम पासून थोड्या अंतरावर पण कुणाच्याच सहज लक्षात येणार नाही अशी ती रूम होती. स्वरा आतमध्ये पोहोचली आणि तिने रूमवर चैफेर नजर टाकली. रूम जरी ऑफिसच्या एका कोपऱ्यात असली तरीही सुसज्ज होती. कदाचित तिच्यासाठीच छान सजविण्यात आली होती. स्वरा रूमवर नजर टाकतच होती की कुलकर्णी सर म्हणाले," कशी वाटली केबिन स्वरा?"

स्वरा हसतच उत्तरली," छान आहे सर!"

सर पुन्हा हसत म्हणाले, "/ओके देणं यु कॅन स्टार्ट युअर वर्क. जर माझी काही मदत लागली तर सांग. मी इथेच आहे शिवाय इथे काही लँडलाइन नंबर्स आहेत. ज्याला कॉल लावायचा असेल त्याचा इथे नंबर तुला सहज सापडेल. चल येतो मी. "

सर जातच होते की स्वरा त्यांना अडवत म्हणाली, " सर मी स्कार्फ घालूनच काम केलेले चालेल ना? "

सरांनी तिच्याकडे हसून बघितलं आणि हळूच म्हणाले, " तुला आवडेल ते कर आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली. तुझ्या रूमच्या बाहेर एक टेबल आहे तुला काही द्यायचं असेल तर तिथे ठेव आणि समोरच्याला काही आणायच असेल तर तो तिथे ठेवेल मग तू घेऊन घे बाकी काही लागलं तर तो फोन आहे त्यावर कॉल कर."

स्वराला ते सर्व ऐकून थोडं वाईट वाटलं होत कारण तिला जेलमध्ये आल्याचं फिल होत होत तरीही स्वतःचे भाव लपवत ती म्हणाली," शोअर सर!"

सर बाहेर निघाले आणि स्वरा चेअर वर बसली. तिने बॅगमध्ये असलेली गणेशाची मूर्ती टेबलवर ठेवली आणि त्याना नमन करून तिने कामाला सुरुवात केली. अगदी काहीच वेळ झाला होता. हळूहळू लोक ऑफिसला येऊ लागले होते. कुणीही आले की आधी स्वरांच्या केबिनकडे त्यांचं लक्ष जायचं. अस एकदा नाही कितीतरी वेळ झालं होतं म्हणून स्वरा कामावर लक्ष देऊ शकत नव्हती. एक - एक करता करता आता पूर्ण ऑफिस भरलं. कुलकर्णी सर सर्वाना एकत्र करून काहीतरी सांगत होते. सांगताना सुद्धा स्वराकडे इशारा केला जात असल्याने ते तिच्याबद्दल सांगत आहे ह्याबद्दल तीळ मात्र शंका नव्हती. स्वराही त्यांच्याकडेच बघत होती. सरांनी त्यांना काहीतरी सांगितलं आणि ते सर्व पुन्हा आपापल्या जगावर जाऊन बसले. तिने पुन्हा एकदा आपल्या कामात लक्ष दिलं पण हे सर्व तिला इतकं ऑकवर्ड वाटत होतं की तिच्याने कामच होत नव्हतं. कुणी समोर दारावर फाइल द्यायला आला की तिच्याकडे बघायचा आणि ती पुन्हा नर्व्हस फिल करू लागायची. त्यांच्या विचित्र नजरा तिला त्रास देत होत्या पण त्यातून सुटका तिला मिळाली नाही.

ऑफिसच्या पहिल्या दिवशी शक्यतो दोन्ही बाजूने ओळख करून दिली जाते पण स्वराला कुणाबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यामुळे तिला बेचैन होऊ लागलं होतं. ती आज इतकी नर्व्हस होती की तिने चहा सुद्धा बोलावला नाही. जेवण एकट्यातच केलं. वॉशरूमला सुद्धा कुणी गेलं तर नाही ना ह्याची खात्री केल्यावरच ती जायची. आजचा पूर्ण दिवसच तिचा असाच गेला. टेबलवर फायलीचा गठ्ठा होता पण काम काहीच झालं नाही. सायंकाळचे ६ वाजले आणि सर्व घरी जाऊ लागले. स्वरा ते सर्व जाण्याची वाट पाहतच होती की कुलकर्णी सर आतमध्ये येत म्हणाले," काय ग कसा गेला दिवस? "

ती घाबरतच म्हणाली, " सॉरी सर! आज खूप नर्व्हस झाले म्हणून कामच झालं नाही. फाइल्स अशाच पडून आहेत सर्व. सॉरी सर!! "

सर हसतच म्हणाले, " हरकत नाही. दोन तीन दिवसात सवय होईल. चला आता निघुया. "

स्वराने लॅपटॉप बंद केला आणि बॅग घेत बाहेर पडली.

स्वरा घराकडे निघाली. स्वराला स्वतःचा आत्मसम्मान बाजूला ठेवून जॉब करणे शक्य नव्हते त्यामुळे आज पहिल्याच दिवशी जॉब सोडून देण्याची तिची इच्छा झाली. ती विचार करतच होती की आईचा फोन आला. आई तिच्या ऑफिसबद्दल विचारत होती. तीही आज खोटखोटंच पण भरभरून सांगत होती. आईने काही क्षणातच फोन ठेवला आणि क्षणभरापूर्वी जॉब सोडण्याचा मनांत आलेला विचार तिने रद्द केला. तिलां कळून चुकलं होत की आपण जॉब करणे किती गरजेचे आहे. त्यामुळे तिने मन घट्ट केले आणि पुढच्या प्रवासास सज्ज झाली.

तेरे शहरने सब कुछ ले लिया
सिवाय सांसो के
तेरे जहन मे क्या चल रहा है
अब तो मुझे बता दे

आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा आपल्याला तत्त्व बाजूला सारून निर्णय घ्यावा लागतो. आयुष्यात तत्त्वांना एक महत्त्व असतच पण कधी कधी गरज इतकी महत्त्वाची होऊन जाते की तत्त्वाची आदारांजली वाहने आवश्यक होऊन जाते. स्वरा सोबत तसच झालं होत पण हे अस जगणं केव्हांपर्यंत चालणार होत. तिला एका नॉर्मल व्यक्तिप्रमाणे जगण्याचा अधिकार नव्हता का? आणि असेल तर तो तिला केव्हा मिळणार होता? केव्हा लोक तिला एक नॉर्मल व्यक्ती म्हणून ट्रीट करणार होते की जीवनभर असच चालणार होत. प्रश्न हजार होते पण उत्तरे कदाचित नाहीच.

क्रमशा ....