Nagarjun - 5 in Marathi Love Stories by Chaitrali Yamgar books and stories PDF | नागार्जुन - भाग ५

Featured Books
  • The Devil (2025) - Comprehensive Explanation Analysis

     The Devil 11 दिसंबर 2025 को रिलीज़ हुई एक कन्नड़-भाषा की पॉ...

  • बेमिसाल यारी

    बेमिसाल यारी लेखक: विजय शर्मा एरीशब्द संख्या: लगभग १५००१गाँव...

  • दिल का रिश्ता - 2

    (Raj & Anushka)बारिश थम चुकी थी,लेकिन उनके दिलों की कशिश अभी...

  • Shadows Of Love - 15

    माँ ने दोनों को देखा और मुस्कुरा कर कहा—“करन बेटा, सच्ची मोह...

  • उड़ान (1)

    तीस साल की दिव्या, श्वेत साड़ी में लिपटी एक ऐसी लड़की, जिसके क...

Categories
Share

नागार्जुन - भाग ५

" बरं बरं..असु दे..." तो तसा पटकन उठतो आणि बोलतच चालायला लागतो ही, " ते मी हेच सांगायला आलो होतो कि आजच्या आज घर खाली करून द्या मला नाहीतर उद्याच माझ्याबरोबर बोहल्यावर चढ...." तो चप्पल घालतच बोलतो...


" काय...??" ती तो निघाला म्हणून आपल्या आयडिया वर खुश झाली होती पण त्याच बोलणं ऐकून ती ताडताड उडालीच आपल्या जागेवर...



" मिस्टर अरविंद...." तोच एक कठोर आवाज आला..तसं दोघांनी तिकडे पाहिलं ...तिची अम्मी समोर होती तिच्या..जिच्या डोळ्यांत सध्या आगीच्या ज्वाळा दिसत होत्या...तिला पाहताच नकळत नगमाचे ओठ इअर टू इअर रूंदावले...आणि अरविंदचा चेहरा तर बघण्यालायक झाला होता....



" अम्मी बरं झालं तू लवकर आलीस...." नगमा पुढे आनंदाने बोलणार च होती कि तिच्या अम्मी ने हातानेच तिला शांत रहा म्हणून खुणावले आणि त्या तरा तरा चालत अरविंदसमोर येऊन उभ्या राहिल्या...आणि पुढच्याच क्षणी अरविंद दोन्ही ही गालाला हात लावून त्या दोघी मायलेकींकडे खाऊ कि गिळू या नजरेने पाहत होता...अम्मी ने दोन चांगल्याच लगावल्या होत्या कि हातांची पाच ही बोटे दोन्ही गालांवर उमटली होती...



" आगे ऐसी हरकतें मेरी बेटी के साथ कि तो याद रखना..." अम्मी त्या अरविंद ला नजर खाली चा इशारा करत ,बोट नाचवत बोलते, " ह्या डोळ्यांच्या बुब्बुळांच्या गोट्या करून तुझ्याच हातात खेळायला देईल...समजलं...आणि हो..काय भाड्याचा तुझा हिशोब असेल तो सांग ...आज संध्याकाळ पर्यंत...आम्हीच हे घर सोडतोय...." त्या चांगल्या ठणकावत त्याला बाहेरचा रस्ता दाखवत बोलतात....



" ठिक आहे...संध्याकाळी येतोय बघ..ना तुमच्या दोघींचा हिशोब केला तर नाव लावणार नाही अरविंद म्हणून..." पण तो मग्रुरी अरविंद ही कुठे ऐकणारा होता...तो ही त्यांना धमकी देऊनच सोसायटी बाहेर पडला होता...



" अम्मी ...तू रात से कहा गायब थी..." अरविंद जाताच अम्मी ने दार लावलं आणि किचनमध्ये जायला निघाली...तशी तिच्या मागे नगमाची ही वरात होतीच...


" बोल ना अम्मी ..कहा थी..." अम्मी काही न बोलता नाष्टा करण्याच्या मागे लागली असल्याने तिने आपल्या अम्मीच्या खांद्याला धरून आपल्या कडे वळवत विचारते...



" तुझे क्या करना है..तेरी अम्मा जिंदा है या मरी...तुने किया ना अपने मन का..." अम्मी तिचा हात झिडकारून रागात बोलते, " तू देऊन आलीस ना राजीनामा...केला का माझा विचार...?? मग आता ही का नाटकी...." त्या खूप रागात होत्या...तिला कळत कि अम्मी आता काहीच ऐकायला तयार होणार नाही..नंतर बोलता येईल म्हणून ती वळून आपल्या बेडरूमकडे जायला लागते...


" आणि हो..." त्या ही परत आपल काम करायला लागतात..तस त्यांना आठवत आणि त्या बोलायला लागतात,तशी अम्मी आपल्याशी बोलत आहे याचा आनंद होऊन ती ही टर्न होते...." आता हे घर सोडायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर जॉब ही बघा आणि घर ही...पंधरा दिवस आपण माझ्या एका मैत्रिणीच्या घरी राहू शकतो...तिच्या मुलाची एंगेजमेंट आहे सो तिथे पाहुणे म्हणून आसरा देईल ही आणि तिने तसं ही तुला मेंहदी आणि संगीत फंक्शन चं ऑर्गनायझेशन का काय असतं ते करायला बोलावलं आहे..." त्या तिला सांगत होत्या कि धमकावत होत्या त्यांचं त्यांनाच माहित...


" पण अम्मी..." तिला मात्र ही असली कामे नव्हती करायची...तिने आय टी मध्ये करिअर केलं होतं आणि त्यातच तिला जॉब ही करायचा होता...तर लग्नातील मेहंदी वैगेरे तिने छंद म्हणून कोर्स केला होता,सुट्टी मध्ये...



" ते पण बिण घाल तुझ्या चुलीत...तू मी जे सांगतेय ते गप्पगुमान ऐकायचं ... जा आता आवरून ये नाष्ट्याला आणि लगेच दुसर आजपासुन ..आतापासुनच घर शोधायला सुरूवात कर ..परत लग्नाच्या तयारीत तुला वेळ भेटणार नाही..." त्या तिच काही एक न ऐकता तिला आवरायला बेडरूममध्ये पाठवतात...ती ही मग पाय आपटतच निघून जाते...अम्मी जाताच गालातल्या गालात हसतात, " ऐ लडकी भी ना अभी भी बच्ची कि तरह ही है..." म्हणत...



" काय विचार केला आहेस...??" केबिन मध्ये शांत बसुन विचार करत असलेल्या अर्जून ला पाहताच रोहित विचारतो..



" तिला परत बोलवायच ..काही करून मला ती परत हवी आहे माझ्या लाईफ मध्ये..." तो आपल्याच नादात बोलतो...


" म्हणजे तू तिला माफ केलं...??" रोहित चा विश्वास बसत नव्हता पण डोळ्यांत आनंद ही तितकाच होता ते ऐकून..



" माफ तर मी केव्हाच केलं आहे...तसंही यात तिची एकटीची ही काहीच चूक नाही...थोडंफार प्रमाणात माझं ही चुकलंच कि..." ईकडे अर्जून ही अजूनही आपल्याच नादात बोलत होता...



" ओह व्वाव यार...मग तू सकाळीच का नाही अडवलं किट्टू ला..." तसा रोहित खुश होऊन बोलतो..



" किट्टू...?? आता ती मध्येच कुठून आली ...?? आणि तिला का मी अडवू..." तो डोळे फिरवून बोलतो...



" म्हणजे...?? अरे असं का करतो भाई तू...?? तू आताच बोलला ना किट्टूला ..." पण यावर रोहित ही आता चांगलाच गोंधळला होता...



" एक एक मिनिट..." अर्जून त्याच्याकडे संशयिताने पाहत बोलतो, " होल्ड...ॲन्ड डोन्ट टेल मी....ईतका वेळ म्हणजे तू तिच्याबद्दल बोलत होतास तर..." तो डोळे मोठे करत विचारतो..


" अं हो..." यावर रोहित थोडा नरमतो, " पण तू कुणाबद्दल बोलत होतास ...??"



" मी तर ते आपलं..." आता यावर काय उत्तर द्यावं म्हणून शांतच बसतो अर्जून...



" म्हणजे तू ईतका वेळ वहिनी ..नगमा वहिनी बद्दल तर नव्हता ना बोलत ..." रोहित नगमा चं नाव घेताना जरा कचरत च विचारतो..कारण आधी एक चुकीचं नाव घेतलं होतं आणि त्यात आता परत तिच नाव घेऊन त्याच्या ज्वालामुखी ला तो अजुन फुंकर जे घालत होता...



" हं..." म्हणून अर्जून विंडो मधून बाहेर पहायला लागतो...पुढे यावर दोघे काहीच बोलत नाही..त्याची पर्सनल सेक्रेटरी त्यांना कॉफी देऊन जाते..पण तरी ही त्यांच्यातला तो अबोला अजून संपला नव्हता...अर्जून नगमा मध्ये अजून ही अडकला होता तर त्याला अजूनही तिच्यात अडकलेल पाहून रोहित ही हैराण होऊन त्यालाच पाहत होता...



" बरं चल मी जातो... भरपुर कामे आहेत आज..." कॉफी संपताच आता तिथे अजून‌ काही कारणच नसल्याने तिथं थांबायचं म्हणून रोहित ही निघून जातो...तो गेल्यावर ही अर्जून बराच वेळ तिच्याच आठवणीत झुरत होता...मोबाईल वर एफ एम वर तेव्हा आर एच टी डी एम मधलं गाणं वाजत होतं..ज्या गाण्यामुळे तो अजून आतुन तीळ तीळ तुटत होता....



" सच कह रहा है दीवाना दिल
दिल ना किसी से लगाना
झूठे हैं यार के वादे सारे
झूठी हैं प्यार की कसमें
मैंने हर लम्हां
जिसे चाहा जिसे पूजा
उसी ने यारों मेरा दिल तोड़ा तोड़ा
तन्हा तन्हा छोड़ा..
सच कह रहा है..."



" अम्मी ..मैं शाम को आती हू..." नाष्टा होताच नगमा अम्मी ला सांगून निघून गेली होती... पण अम्मी मात्र तिच्या भविष्याचा विचार करून करून रडत होती दिवसभर...शिवाय आजच तिला असं ईग्नोर करण त्यांच्यासाठी ही मुश्किल च होतं...



" चला चाळीस हजार रूपये काढा आणि घर खाली करा..." संध्याकाळी ठरल्याप्रमाणे अरविंद आला होता घरी आणि अम्मी ला खुप उद्धटपणे बोलत होता...बघ्यांची गर्दी वाढली होती...सकाळी काय झालं हे कुणाला माहित नव्हतं पण आता त्या अरविंद ने सोबत दोन माणसं ही आणली असल्याने सर्व च उत्सुकतेने डोकावून पाहत होते...



" अरे बाप रे...हा तर खरंच आलाय ..पण ही कार्टी कुठे उलथली आहे..." त्याला पाहताच अम्मी मनात बोलते..



" कसला विचार करते बेगम तू...सकाळी च बोलले होते ना तू मला ..." तिला असं गोंधळून गेलेल पाहून तो कुत्सितपणे हसत सोफ्यावर बसत , निर्लज्जपणे बोलत होता..." तुला चांगली ऑफर केली होती...तुझ्या पोरीला उद्या माझ्याबरोबर जर..." तो ईतका घाणेरड्या पद्धतीने तोंड करून बोलत होता कि त्याला ऐकताना ही किळस यावी...



" ऐ...तोंड सांभाळून बोल..." तोच मागून आवाज आला तसं दोघांनी पाहिलं तर दारात नगमा आणि एक आंटी....तीच जी तिच्या अम्मी ची मैत्रिण होती ... दोघींना एकत्र पाहून अम्मीला आश्चर्य तर वाटलं होतं पण तितकं च मनाला समाधान ही वाटलं होतं...



" किती चाळीस हजार च हवेत ना..." त्या आंटी आपल्या पर्समधून नव्या कोर्या दोन दोन हजार च्या वीस नोटांच बंडल काढत बोलते..( नोटा बंदी नव्हती हं त्यावेळी...) " हे घे ( तोंडावर बंडल फेकत ) आणि चल निघ येथून...तुला चावी नंतर माझा माणूस देईल आणून तुझ्या या फडतूस फ्लॅट ची..." त्या तुच्छतेने त्याच्याकडे पाहत बोलतात..



" बघून घेईन हं..‌" तो दात ओठ खातच रागाने अम्मी कडे पाहत चरफडत च निघून जातो...



" बघायला पण यायच नाही..तुझा व्यवहार क्लिअर झाला आहे..नीघ हिथून..." पण आंटी ही बोलायला ऐकणार नव्हत्या..त्यांनीही त्याला आपल्याच घरातून हाकलून लावलं होतं..


" ऐ पब्लिक ...चला आता तुम्ही पण फुटा...संपला फुकटचा शो..." तो जाताच आता नगमा पुढे येते आणि दारातल्या त्या गर्दीला पाहून चिडून बोलते...तसं सर्वजण पटकन पांगतात आणि ती ही धाडकन दरवाजा लावून घेते...




पात्रांची ओळख


अर्जून पंडित ( कथेचा नायक...)
नील आणि सुरभी पंडित ( नायकाचे आई वडिल,दिल्लीचे मोठे बिझनेसमन )
कोमल पंडित ( नायकाची बहिण )
रोहित व प्रिती पंडित ( नायकाचे कझन व वहिनी कम अर्जून ची मानलेली बहिण)
सुनील आणि लाचो ( नायकाचे काका काकू...रोहितचे मॉम डॅड...)



नगमा शेख ( नायिका )
शबनम शेख ( नायिकाची अम्मा...)


सध्या तरी एवढेच पात्र ..नंतर जसजसे येतील तश तशी ओळख होईलच ..


क्रमशः