Sahaahi Janki v karli dripavarche Chache - 5 in Marathi Children Stories by Balkrishna Rane books and stories PDF | सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 5

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 5

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ५
दुसर्या दिवशी पहाटेच जानकीने शामला झोपेतून उठवले. अभयची निघण्याची तयारी झाली का ते पहायला तिने शामला पाठवले.ती स्वतः तयार झाली होती. कासोटा घातलेले मोरपंखी रंगाच लुगड वर लाल रंगाचा पोलका.. बाजूबंद...निळ्या रंगाच्या बांगड्या..चंद्रकोरीच्या आकाराचे ठसठशीत कुंकू..पायात चामड्याच्या चपला...चामड्याच्या कमरपट्टा त्यात तलवार लटकत असलेली असा पेहराव तिने केला होता.
ती बाहेर चांद घोड्यावर मांड ठोकून तयार होती.एवड्यात अभय व शाम तिथे आले. येताना अभय प्रतापरावांना भेटून आला होता.मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन असं वचन त्याने प्रतापरावांना दिले होते. जानकीला पाहताच तो स्तब्ध झाला.ते घरंदाज आरसपानी सौंदर्य बघून तो भारावला होता.
दुसर्या घोड्यावर शाम व अभय स्वार झाले. अभयने लगाम हाती घेतला होता.आज तो खूपच उत्साही दिसत होता.उजूनही उजाडलं नव्हते.अंधुक प्रकाशात दोन घोडे दौडत नक्र बेटाच्या पश्चिमेला चालले होते.त्या शांत वातावरणात टापांचा आवाज ठळकपणे जाणवत होता.अभयची घोडेस्वारी पाहून तो कसलेला घोडेस्वार आहे हे जानकीच्या लक्षात आले.हळूहळू पूर्वेकडे आकाशात नारींगी रंगाची पखरण सुरु झाली.पक्ष्यांचा किलबिलाट वाढला.वातावरण उत्साही व प्रसन्न झाले.काही कालावधीतच ते सारे किनार्यावरवर आले.किनार्यावर बांधून ठेवलेली होडी शामने सोडवली.
घनुष्य -बाण, झाकण असलेली कणकीची दोन उभी भांडी ज्यात पाणी ठेवलेलं होतं, ( ही भांडी शामने बनवली होती),झुणका भाकरीची टोपली हे सारं शामने होडीत ठेवले.एवड्यात त्यांच्या डोक्यावरून पिंगळ्या उडत गेला.त्याने विशिष्ट आवाज काढत शामला इशारा दिला.शामनेही तसाच आवाज काढला व ओरडला...
" मी थोड्याच वेळात येतो.."
" तूला खरच त्याची भाषा समजते?" अभयने विचारले.
शाम फक्त हसला.
" अभयला चला.सुंदरवाडीला पोहचेपर्यंत दुपार होईल. शाम आजोबांकडे लक्ष दे." जानकी म्हणाली.
" म्हणजे शाम येत नाही.आपण दोघच जाणार? आणि येताना तुम्ही एकट्याच येणार?" अभयने चिंताक्रांत होत विचारले.
" मला सवय आहे." जानकी ने उत्तर दिले.
" या टापूवर खड्गसिंगाची माणसे असतात असं मी ऐकलंय. हे चा़चे खूप क्रूर आहेत म्हणे."
" होय, पण मी कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला सक्षम आहे. या देशीच्या राजाला कळवूनही त्यांनी काहीच केलं नाही. कदाचित त्यांना आपल्या मौज -मजे समोर प्रजेची काळजी नसेल."
" नाही, कदाचित त्यांच्या पर्यंत ही वार्ता पोहचवली गेली नसेल. महाराज रयतेची खूप काळजी घेतात."
" असेलही,पण तुम्हाला एवढं वाईट का वाटलं?" जानकी ने विचारले.
" तसं काही नाही .सहज म्हणालो."
शाम व जानकीने होडी पाण्यात लोटली. अभय होडीत बसताच जानकीने वल्ही मारत होडीला दिशा दिली.सोनेरी सूर्यकिरणांनी पाणी चमकत होतं. खाडीतून मार्ग काढत जानकी ने होडी समुद्राच्या दिशेने हाकली.कर्ली बेटाच्या मार्गे न जाता ती थोडं किनार्याच्या जवळून होडी नेत होती.वाटेत मच्छीमारांच्या होड्या मासेमारी करुन परतत होत्या.त्या दादूच्या माणसांच्या कोळीवाड्यातल्या होड्या होत्या.




जानकी व अभय

" जानकी ताई ,कुठं चाललासा? पाव्हणं कुठच?"
" सुंदरवाडीला चाललेय थोडं सामान आणायचय. हे परदेशी आहेत. त्यांना सुंदरवाडीला बंदरावर सोडणार."
" जपून चला."
जानकीने मान हलवली. कोळ्यांच्या होड्या रांगेत निघून गेल्या. आता ऊन जाणवू लागले होते.पण तेवढाच भन्नाट वाराही होता.वार्यामुळे होडी भराभर पाणी कापत चालली होती. अभय टक लावून वल्ही हातात धरून उभ्या असलेल्या जानकीकडे पाहत होता. आणखी काही घटीकेनंतर ही मुलगी आपल्यासोबत असणार नाही ही जाणीव त्याला अस्वस्थ करत होती.तिचा धाडसीपणा...करारी स्वभाव...त्याला आवडला होता.
" अरे ..देवा...एक भलामोठा देवमासा...होडीच्या दिशेने येतोय." जानकी ओरडली.
अभयने समोर बघितले. पाण्याचा कारंजा वर उडत होता...त्या पाठीमागे सुमारे सात हातांवर शेपटीचा फटकारा मारत तो मासा वेगाने होडी च्याच दिशेने येत होता.त्याची धडक बसली तर होडीच काही खरं नव्हतं.
अचानक अभय उठला व होडीतला धनुष्यबाण त्याने उचलला.अचानक झालेया हालचालींमुळे होडी डुचमळली.जानकी थोडी पुढे झुकली.अभयच्या हाताचा आधार घेत तिने स्वतःला सावरले.
" नको, होडी बाजूला घेते. जाऊ दे त्याला."
जानकीने झपाझप वल्ही मारत होडी देवमाश्याच्या मार्गावरून बाजूला घेतली.अभय धनुष्यावर बाण चढवून सज्ज होता.त्याची बाण पकडण्याची पध्दत....प्रत्यंचा ताणून बाणाच्या टोकाकडे बघत नेम धरणे..रूंद खांदे अन्
मजबूत मनगट बघून जानकीच्या लक्षात आलं की तो एक उत्तम धनुर्धारी व लढवय्या आहे. त्याच व्यक्तित्व रहस्यमय वाटत होतं.त्याने आपली खरी ओळख लपवली असं तिला वाटू लागले.बघता-बघता देवमासा दूर निघून गेला.




देवमासा

अखेर मध्यान्ह होण्यापूर्वी ती दोघ सुंदरवाडी बंदरावर पोहचली.तिथे अनेक गलबत लागलेली होती.अरबी,हबशी, तसेच गोरे व्यापारी गलबत घेऊन फिरत फिरत सुंदरवाडी बंदरावर येत.ते एक मोठे व्यापारी बंदर बनले होत. मीठ ...मसाल्याचे पदार्थ...खारवलेले मासे... विविध शस्त्रे...तांदूळ ...गहू..इथे मिळत.शिवाय सुंदरवाडीच्या समुद्रात मिळणारे गुलाबी मोती यासाठी हे बंदर जगप्रसिद्ध होते.इथल्या मोत्यांना जगभर मागणी होती.आज बंदरावर खूपच गर्दी होती. जानकी व अभय बंदराच्या पायर्या चढले.



सुंदरवाडी
" इथं तुम्हाला पुढे जाण्यासाठी एखादं गलबत मिळेल." जानकी म्हणाली. तिने मोहरांची पिशवी जी कनवटीला लावली होती ती काढली.
" तुम्हाला काही मोहरा हव्यात का? ह्या घ्या."
अभयने त्या मोहरा घेतल्या.
" तुम्ही माझ्यावर खुप उपकार केलेत."
" आमचे आजोबा नेहमी म्हणतात की गरजवंताला मदत करावी."जानकी म्हणाली.
जानकी ने परत पिशवी कनवटीला लावली.दोघ गर्दीतून वाट काढत पुढे सरकू लागली.अचानक जानकीने दोन झेपा व एक कोलांटी उडी मारत एका माणसाला ठोसा लगावला.तो हडकुळा इसम खाली पडला .एवढ्यात अभयने धाव घेत त्याची मान पकडली व त्यांच्या हातातली जानकीची मोहरांची पिशवी काढून घेतली.
" शवर्लीका, तूझा हात छान चालतो..पण मी नेहमी सावध असते समजले!" जानकी म्हणाली.
आपण पकडले गेलो हे लक्षात येताच तो गयावया करत रडू लागला.
" याला, बंदरावरच्या शिपायांच्या ताब्यात देवूया."
अभय म्हणाला.
" नको, जाऊ दे त्याला."
" ताई साब दोन दिवस अर्धपोटी होतो.म्हणून हे धाडस केले.माझ दुबळ शरीर बघून मला कुणी कामही देईना."
तो शवर्लीक म्हणाला.
" ठिक आहे तू माझ्यासोबत नक्र बेटावर येतोस?"
त्याने मान हलवली.
" ह्या चोराला तुम्ही बेटावर का नेत आहात?" अभयने विचारले.
"पूर्वी आमच्या वाड्यावर बरेच नोकर होते.पण एका अप्रिय घटनेनंतर आजोबांनी सगळ्या नोकरांना काढून टाकले.आता आजोबांकडे लक्ष द्यायला कुणीतरी पाहिजेच."
" पण याला?"
" होय, मला हा उपयुक्त वाटतो.तुम्हाला तर इच्छित स्थळी जाण्याची घाई आहे ना?"
"होय.पुन्हा भेटूच." अभय नमस्कार करत वळला.का कोण जाणे त्याचा आवाज थोडा कातर झाला होता.पण जानकीचे त्याकडे लक्षही नव्हते..
जानकी व शवर्लीक बाजारपेठेतून फेरफटका मारू लागले.रस्त्याच्या दुतर्फा अनेक विक्रेते आपले समान घेऊन बसले होते.काळे व पांढरे मीठ,मसाले...पांढर्या सुवासिक तांदळाच्या राशी,बाजरी...नाचणीच्या राशी,ज्वारी- बाजरी, याशिवाय दोर्या, केरसुण्या,मातीची भांडी अशी दुकाने तिथे होती.एके ठिकाणी एक व्यापारी गुलाबी व निळे मोती विकत होता.जानकी क्षणभर थबकली.ते मोहक मोती खरेदी करण्याचा तिला मोह झाला.पण तिने स्वतःला आवरले.या क्षणी तरी या मोत्यांचा तिला काहीच उपयोग नव्हता.तिच्या बाबांची सुटका...व आईचा बदला घेतल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती. तिने थोडं धान्य खरेदी केले.
एका अरबी व्यापार्याने मखमली कापडावर विविध शस्त्रे विकायला ठेवली होती.रुंद पात्यांच्या तलवारी, तीक्ष्ण धारेचे दुधारी खंजीर, छोटे फेकून मारता येणारे खंजीर. जानकी ने निळसर रंगाचा धारदार खंजीर खरेदी केला. छोटे वितभर लांबीचे काही खंजीर व टोकदार तीर खरेदी केले.
" काका, धूर तयार होणारा दारूगोळा आहे का?"
" धुऐंवाला गोला...हां...हां है. देतो." तो दाढीवाला अरब म्हणाला.एक मुलगी... शस्त्रे खरेदी करते हे त्याच्यासाठी अजबच होत.त्याच्याकडे चोर,दरोडेखोर,ठग व चाचे लोक शस्त्रे खरेदी करत. सारं सामान बारदानात बांधून ते त्याने शवर्लीकाच्या हाती दिले.
होडीत सारे सामान ठेऊन ती निघाली. बसून वल्ही मारता- मारता तिने विचारले.
" काका, तुमचं नाव काय? तुम्ही कुठे काम करत होता."

" माझे नाव चरण! या पूर्वी मी कर्लीद्विपावर डाकूंकडे काम करत होतो."
कर्ली द्विपाचे नाव ऐकताच जानकी चमकली. तिचे डोळे रागाने लाल झाले.
" म्हणजे खड्गसिंगाकडे?"
" हो...होय.पण मी तिथे जेवण बनवत होतो.पण मला ते आवडत नव्हतं...ते सारे लोक भयानक आहेत.दोन दिवसांपूर्वी एक हबशी गलबत तिथे माल घेऊन आले होते...त्या गलबतात लपून मी पळ काढला.आता मी जर त्यांना सापडलो तर ते माझे हालहाल करून मारतील."
तिच्या चेहर्यावरचे भाव बघून तो घाईगडबडीने म्हणाला.
" किती लोक आहेत त्या बेटावर... ?"
" शंभरावर डाकू तिथे आहेत. त्यांच्या बायकाही तिथे आहेत."
"तिथे कुणी. ..कैदी वैगरे?"
" पाच -सहा कैदी आहेत.त्याना खूपच राबवून घेतात.. त्यांच्या सतत अपमान करतात.चंद्रसेन नावाच्या एका व्यक्तीला तर खूपच छळतात."
" चंद्रसेन!कसे...कसे आहेत ते...?" जानकी ने थरथरत्या आवाजात विचारले.
" खूपच वाईट अवस्था आहे त्यांची. पण ते तुमचे कोण लागतात?" शवर्लीकाने विचारले?
" माझे बाबा आहेत ते!" जानकी भरल्या डोळ्याने म्हणाली.शवर्लीकाचा आपल्याला बराच उपयोग होईल हे तिच्या लक्षात आले.
परताना तिने मुद्दाम कर्लीद्विपा सभोवतालच्या छोट्या टापूंना फेरा मारत होडी हाकली.दुसर्या टापूवर खड्ग सिंगांचा फडकणारा काळा झेंडा ज्यावर कवठीच चिन्ह
होते ते पाहून तिच पित्त खवळले.धनुष्यावर बाण चढवत ती उभी राहिली. तिने नेम धरत बाण सोडला. झाडाला बांधलेला तो झेंडा सपकन कापला जात खाली पडला.
जानकी ने खड्गसिंगांला युध्दाचा इशारा दिला होता.



खड्गसिंगाचा झेंडा जानकी ने पाडला.
------*****-----****-----***------***---