Moksh - 13 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 13

The Author
Featured Books
  • इश्क दा मारा - 79

    यश यूवी को सब कुछ बता देता है और सब कुछ सुन कर यूवी को बहुत...

  • HOW TO DEAL WITH PEOPLE

                 WRITERS=SAIF ANSARI किसी से डील करने का मतल...

  • Kurbaan Hua - Chapter 13

    रहस्यमयी गुमशुदगीरात का समय था। चारों ओर चमकती रंगीन रोशनी औ...

  • AI का खेल... - 2

    लैब के अंदर हल्की-हल्की रोशनी झपक रही थी। कंप्यूटर स्क्रीन प...

  • यह मैं कर लूँगी - (अंतिम भाग)

    (भाग-15) लगभग एक हफ्ते में अपना काम निपटाकर मैं चला आया। हाल...

Categories
Share

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 13

10 x 10 ची लाल रंगाची खोली दिसत होती .
खाली फरशी नसून शेणाने सारवलेली तुलतूलित भुई होती.

खोलीत चारही बाजुंना असलेल्या लाल रंगाच्या दहा फुट उंचीच्या भिंतींवर काळ्या कोळश्याने पौराणिक मंत्र रेखाटळेले , तर कुठे अभद्र सैतानी हिडिस आकाराचे चेहरे कोरले होते.

जसे की टक्कल पडलेल डोक, त्या टक्कल पडलेल्या डोक्यातून दोन शिंग उगवलेली, बैलासारख तोंड असलेला माणुस - बाकी शरीर मानवाच होत.
त्याच्या हातात एक कू-हाड दिसत होती.


अळ्या, झुरळ , नाना त-हेच्या कृमी युक्त कीटकांची नासकी शरीर असलेल्या सैतानांची छ्वी तिथे भयंकर रित्या काळ्या कोळश्याने कोरलेली होती..

कोणी मानवाच अवयव फाडुन खात होत.....तर कोणी रक्ताने माखलेल तोंड दाखवत हसत होत..

तर कुठे तामसी साधनेतल्या साधणांची
सुद्धा आकार रेखाटले होते..

दोन- तीन विविध प्रकारच्या चांदण्या, अशुभ उलट असलेली स्वास्तिक, आस्थी मंडळ, पेटलेल हवनकूंड आणि हवनकूंडातून निघणा-या आगीवर एक कवटी अणि गुणाकार आकारात दोन हाड तिच्या भोवती हवेत तरंगत होती..

तर एक जुनाट घड्याळ दिसत होत..ज्या घड्याळा बाजुलाच एक सुई तरंगत होती.
पुढच चित्र होत..टाचण्या टोचलेल लिंबू, आणी शेवटला एक मानवी आकाराची बाहूली होती.

शेणाने सारवलेल्या भुवईवर मधोमध हवनकूंड पेटल होत.

त्यात नेहमीसारखी ती रक्ताळलेली लाल आग पेटली होती.

सामान्य आगीचा रंग तांबड असत ! मग ही आग अशी लाल रंगाने का धगधगत होती?

हवनकूंडाच्या चारही बाजुंना बक-याचे शरीरविरहीत काळया रंगाचे केसाळ धड ठेवले होते.

त्या मृत धडाची अवस्था पिवळेजर्द डोळे उघडे आणि गुलाबी रंगाची जिभ बाहेर आलेल्या अवस्थेत होती.

त्या प्रत्येक धडावर हळद ,कुंकू, बुक्का अस विविध मिश्रण टाळूवर चिमूटभर टाकलेल दिसत होत.

एक विचीत्र उत्तेजक अगरबत्ती तिथे जळत होती, जिच पांढर धूर खोलीभर पसरलेल...


बिजाग-यांचा
' ...कर्र्कर्र्रर्र्र्र्र्र..'...
आवाज करत तो खोलिचा दरवाजा उघडला.
उघड्या दरवाज्यातून काळ्या रंगाची साडी घातलेली म्हातारी संथ गतीने खाली मान घालत चालत आत आली.

तिच्या डोक्यावर साडीचा काळसर पदर होता.
हात निर्जीव पणे खाली झुकले होते.

तशीच ती चालत खोलीत आली होती.

खोलीत तीचा प्रवेश होताच , तिच्या मागे असलेला दरवाजा आपोआप ब्ंद होऊ लागला..

दरवाजा ब्ंद होतांना पुन्हा तोच ' कर्रकर्रकर्र ' जिवघेणा आवाज घुमला..

शेवटच्याक्षणाला कोणीतरी वेगाने दरवाजा ओढावा तसा तो दरवाजा धाड आवाज करत ब्ंद झाला होता.

दरवाजा ब्ंद झाला तसा त्या म्हातारीच्या मुखातून एक हलकस हसू फुटल्याचा आवाज आला..

" हिहिही!" हसतांना तिच्या दोन्ही खांद्यांची हाळचाल झाली.. अस दोन तीन वेळा झाल..आणी मग शेवटला एका सुरात ती हसू लागली...

" हिहिहिहिहिखिखिखिखीखी!"
हसतांना तीच्या खांद्यांची हाळचाल सुरुच होती.

तिचा तो किन्नरी हास्याचा स्वर खोलीभर गुंजत होता.

" मेले ..मेले.... खपले एकदाचे .....सुतिक लावल म्या गावाला... मयतांचा दिवा पेटीवला... रे राकिसा... येशीवच्या मसनावर शेकूटी पेटीवली...हिहिहिहिही...!

....आबा..बा बब.बं.बब..बब......!" वेड्या विकृत मानवासारखी ती म्हातारी आपल काटकूळा हात तोंडावर मारू लागली....

मग तीने मध्येच हात मारायच थांबवल..आणि म्हंणाली.

" आकारमाश्याsssss हिहिहिहिहिही!"
त्या शिवीवर तीने जरा जास्तच जोर दिल..आणि तीच्या खर्जातल्या.. हास्याचा आवाज खोलीत भीतीभावहिंत पणे ... घुमू लागला..

" ए रघ्या !"
मध्येच आलेल्या त्या आवाजाने तीच हसू थांबल..!
खोलीत नीरव शांतता पसरली..
तिच्या चेह-यावर गंभीर भीतीयुक्त भाव पसरले.
त्या म्हातारीच्या खांद्यामागे खोलितल्याच एका भिंतींला चिटकून नरहरप्ंत उभे होते.

त्यांच्या खप्पड चेह-यावर निळसर रंगाचा उजेड पडला होता.

प्रेताड चुणा पोतलेला चेहरा, जाड भुवया, केशरी
खवचट किळसवाणे बुभल, गाळफाड आत घुसली होती. दात विचकत हसत तर मध्येच वाढलेल्या भुवया ते उडवत त्या म्हातारीच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत होते...तेच ते फिकट निळसर रंगाने उजळलेल थोबाड भयाण भासत होत..

" काय आहे रे मेल्या ! कितीदा सांगितल नाव घेऊ नको माझ म्हंणून ! हं?"

ती म्हातारी दात ओठ खात किन्नरी स्वरात म्हंणाली. तीच्या स्वरात जरासा क्रोध , संताप होता.

" कशाला आला आहेस इथ बोल?"
ती खेकसली..

नरहरपंताच प्रेत अद्याप वाकुल्या दाखवत दात विचकत भुवया उडवत तिच्या पाठमोरी आकृतीकडेच पाहत होते...

" बोल लवकर !" ती पुन्हा खेकसली..

" माझ्या मरणावर ट्पला आहेस का तू माxxचोत..- महापाताळ्या ! हं? मी पाठीमागे बघायची वाट पाहतोयस व्हयरे म्हढ्या! तूझ्या आईचा घो तुझ्या ..!" तरतरा चालत ती म्हातारी हवनकूंडासमोर चालत आली आणि पटकन तिने तिथे खाली बैठक मारली..!

" मी तुझ्या सारखी मूर्ख नाही ! समजल ?
महाशक्तिशाली आहे मी ! महाप्रलयंकारी आहे मी ..असंच जाळ्यात फसणार नाही मी कोणाच्याही...! " त्या म्हातारीच्या मागून अद्याप भिंतीला खेटून उभे दात विचकत हसणारे नरहरपंत दिसत होते..

त्या म्हातारीने हळुच खांद्यांमागून एक तिरकस कटाक्ष मागे टाकला...

" बोल कशाला आला आहेस ? शरीर भेटल ना तुला जाना मग भोग घे , माझ्याकड काय आहे ? "
त्या म्हातारीच्या स्वरात तिखटपणा होता.
उद्धट स्वर होता तो..

" अरे ह्याट, थु ! " नरहरपंत थुंकले....
त्या भयान चेह-यावर क्रोधिंत आसुरी भाव उमटले..

" हा असला देह ! भिकारचोट नोकराचा , दिवसभर हमाली करत फिरण्याचा ! हा म्हातारा बहादूर .. ! मला तरून देह हवाय , हा म्हातारलेला नाही...मला उपभोग घेण्यासाठी तरून ....तरतरीत
शरीरयष्टी असलेला देह हवाय ..हा म्हातारलेला नाही..! आणी जर मला तस देह मिळाल नाही..तर त्या एडकाला मी सर्व सांगून टाकेल..की कोण आहेस तू ? आणी कस फसवत आहेस त्या सैतानाला..!"

नरहरपंत खेकसले.

त्यांच्या एक नी एक शब्दावर त्या म्हातारलेल्या चेह-यावरचे ओठ उघडे ते उघडेच राहिले..जणु ती घाबरली असावी.

" नाही ! तू अस करणार नाहीस ? तुला देह हवाय ना ? मी देइल..मी देइल...तुला...देह.. ! "

" कोणाचा? तरून असेल ना ? तरच मी पछाडेल त्याला नाहीतर असंभव !"

" त्याची चिंता करू नकोस ! आपल्या हवेलीत
एक तरणाबांड पो-या आलाय , त्योच बळी देते तुला ..!"

नरहरपंतांच्या निळ्सर प्रकाशाने उजळलेल्या चेह-यावर आसुरी हास्य उमटल..

" काय नाव आहे त्याच ?"
खर्जातला आवाज.

" आर्यंष....!"
ती म्हातारी इतकेच म्हंटली.


xxxxxxxxxxxxxxxxxx

दुपारच्या एन साडे तीन वाजेच्या सुमारासच आकाशात काळसर धुळीकण उमटली होती...

काळ्या ढगांची शेकडो, दुखी , शोकयुक्त , मळभी, अ-आनंदीत ढग.

त्या ढगांनी सुर्याचा नामोनिशान मिटवल होत..
देवपाड गावावर हा असा दिवसा उजेडा रात्रीसारखा
अंधार माजला होता.

तीन मईत गावातून निघुन गेल्यावर घरातल पाणी बायकांनी बाहेर ओतळ होत.

सकाळच अन्न गाई गुरांना खायला दिल होत.

बायकांनी नविन पाणी भरून झाल्यावर
घरांची दार लावून स्वत:ला आणी त्यांच्या लेकरांना आत कोंडून घेतलेल..

घराला असलेल्या खिडक्यांमधून बाहेर वर आकाशात एक दोन स्त्रीया पाहत होत्या...

त्या काळभोर आकाशातल्या ढगांना पाहून
मनात उदासीनता, भीति भय उतपन्न होत होत.

लेकरांना कवटाळून आया माया घरात दबकून बसल्या होत्या.

वाड्यातली ब्याद बाहेर आलीये ही
वार्ता गावात वा-या सारखी पसरलेली आणि ती ऐकून सर्वाँच भीतिने मांजर झाल होत..

जिवाच्या भीतिने पुर्णत गाव घरात लपुन बसला होता..

एन तीनच्या सुमारासच गावात जीवघेणी शांतता पसरली होती.

स्मशानातून मयताला गेलेली मांणस....
घरी परतताच अंगणात आंघोळ धूऊन पटकन घरात घुसले होते.

स्मशानात आता कोणीच राहिल नव्हत ,
अक्षरक्ष मैतांच्या घरातल वारस सुद्धा ...निघुन गेली होती..

मोकळ्या स्मशानात तिन्ही प्रेत चटा चट आगीत
बसून जळत होते.

त्या तीन जळणा-या चित्तेंआतून वर निघणा-या पांढरट धुरातून पुढे एक वाट पुढे जातांना दिसत होती.

ज्या वाटेने काहीवेळा अगोदर मंजूलाल गेला होता.

पन तो एकटा नव्हता !

मन्या? होय ! अगदी बरोबर ओळखलत तुम्ही.

मन्याने मंजूलालच बोलन चोरून ऐकून त्याच्या मागोमाग जाण्याच ठरवल होत.

कारण पैसा मानवाची नियत , त्याचे संस्कार सर्वकाही बदलू शकतो.

हे कलियुगी सत्य आहे .

स्मशानात खुप मोठ मोठाल्या उंच उंच झाडांच्या प्रजाती होत्या.

कोणी लावल्या ? कधी लावल्या? हे कोणालाच ठावूक नव्हत ! गावातली म्हंणतात इंग्रजांची म्हढ तिथ गाडली होती ..आणी त्या म्हढ़ांवर एक एक झाड लावल होत..

उंच उंच झाडांच्या शेंड्यांवरून काळ्या ढगांचे पुंजके वाहत होते.

फांद्यांवरची हिरवी पान जऊळांच्या
उजेडाने विषारी निळसर झाली होती .

त्याच झाडांच्या खालून एक काळसर रंगाची पायवाट पुढे जातांना दिसत होती.

पायवाटेच्या दोन्ही बाजुला एक फुट उंचीच बाजरी गवत वाढल होत.

छाती इतक्या वाढलेल्या झुडपांचा सुद्धा तिथे बोहरा होता .

त्याच एका झुडपाची फांदी बाजुला सारत मंजूलाल आल्या पायवाटेने चालत पुढे निघुन गेला.

मंजूलाल दहा पावल चालून पुढे गेलेला दिसत होता.... तो पुढे जाताच

तसे

त्याच्या मागून भिका-यासारखा दिसणारा मन्या चोरासारख चालत लपत छपत आला...

मंजूलालच्या मनाला कसलीतरी चाहूल लागली..
शेवटी तो सुद्धा पोलिसच होता.

त्याच्या मनाला कोणीतरी आपल पिच्छा करत आहे असं जाणवल होत.

मंजूलाल एका जागेवरच थांबल..

मंजूलाल थांबला हे पाहून मन्याची पाऊल सुद्धा जागेवरच थांबली..

मंजूलालने जर आपल्याला पाहिल तर तो आपल्याला नक्कीच ठार करेल !

ह्या भीतिने तो त्या झुडपात लपला...

मंजूलालने मागे वळुन पाहिल ...
हिरव्या गार गवताची शाळू, मोठ मोठाली झाडे ..सर्वकाही स्तब्ध उभे राहून डोळे वटारूण त्याच्याकडेच पाहत होते...

एकक्षण त्याला भीतिच वाटली.

हा असा जीवघेणा परिसर त्याने कधी अनुभवला नव्हता ! कारण ही जागाच झपाटलेली होती..

श्रापित होती..

मानवी जगापेक्षा काहीतरी वेगळी होती.
अपरिचित भयान, आस्तित्व घेऊन जगणार कोणीतरी होत इथे !...

होय कोणितरी होत ...

क्रमश :