spirituality in Marathi Magazine by Kalyani Deshpande books and stories PDF | अध्यात्म

Featured Books
  • DIARY - 6

    In the language of the heart, words sometimes spill over wit...

  • Fruit of Hard Work

    This story, Fruit of Hard Work, is written by Ali Waris Alam...

  • Split Personality - 62

    Split Personality A romantic, paranormal and psychological t...

  • Unfathomable Heart - 29

    - 29 - Next morning, Rani was free from her morning routine...

  • Gyashran

                    Gyashran                                Pank...

Categories
Share

अध्यात्म

अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याचा अभ्यास,अध्ययन करण्याचे शास्त्र. मी म्हणजे हे नश्वर शरीर नसून,मी म्हणजे आत्मा आहे असं शिकविणारे शास्त्र. दैनंदिन जीवनात आपण म्हणतो माझा हात, माझे डोके, माझे पाय, माझे शरीर, माझे मन एवढंच नाही तर माझा आत्मा असंही आपण म्हणतो म्हणजे हा 'मी' जो आहे तो कोणीतरी वेगळा आहे, मी म्हणजे ईश्वराचा अंश आहे. ह्या 'मी' ला जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म. ह्या मी मध्ये आणि हे विश्व निर्माण करणारी जी शक्ती आहे यांच्यातला दुवा, connecting link आहे आत्मा. रणांगणावर अर्जुन जेव्हा स्तिमित झाला होता, आपल्याच आत्मस्वकीयांचा वध कसा करायचा? असा प्रश्न त्याला पडला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला अध्यात्माची शिकवण दिली,जी आजही भगवत गीतेत आपण वाचू शकतो, ती म्हणजे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे,मरण येते ते शरीराला, आत्म्याला नव्हे,जसा मानव एक वस्त्र उतरवून दुसरे वस्त्र परिधान करतो,त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो, लौकिकार्थाने त्याचा पुनर्जन्म झाला असे आपण म्हणतो. (इथेच मला बऱ्याच गोष्टी पटत नाही. आत्मा जरी अमर असला तरी आपण आत्म्याला बघू शकतो का? आपले आप्तस्वकीय एकदा हे जग सोडून गेल्यावर त्यांच्या आत्म्याने कोणते शरीर धारण केले हे आपल्याला कळू शकते का? बरं हे नवीन शरीर धारण केल्यावर आपल्या पूर्वीच्या नातेवाईकांना तो आत्मा ओळखू शकतो का? ) ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं अध्यात्मातच मिळतात. अध्यात्माअनुसार नामस्मरण हे त्यावर सोल्युशन आहे. बऱ्याच लोकांना नामस्मरण करणे हे म्हातारपणाचे काम वाटते पण वास्तविकतः नामस्मरण करण्याला वयाचं बंधन नाही,हे भक्त प्रल्हाद,ध्रुव बाळ यांच्या उदाहरणातून आपल्याला कळते. जसा जसा मानवप्राणी नामस्मरण करत जाईल तसे तसे त्याचे काम,क्रोध,मद,मत्सर,लोभ,मोह हे सगळे विकार गळून जातील,त्याचे मन निर्विचार होईल,आणि ही पूर्णपणे निर्विचार मनाची अवस्था म्हणजे जीवात्मा परमात्म्याला शरण गेला आहे असं होईल. आणि एकदा का जीवात्मा परमात्म्याला शरण गेला की मग त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होईल ज्यामुळे तो सर्वांच्या शरीरापालिकडील आत्म्याला बघू शकेल याचाच अर्थ तो आपल्या आप्तस्वकीयांच्या आत्म्याला ही बघू शकेल आणि आधीच्या जन्मातला त्याचा आप्तस्वकीय आता कुठल्या जन्माला आलाय हे सुद्धा त्याला दिव्य दृष्टीच्या आधारे कळू शकेल परंतु त्या जीवात्म्याचे विकार गळून गेल्यामुळे त्याला आपल्या आप्तस्वकीयाचा मोह होणार नाही व तो भावनाविवश न होता मर्यादेत राहील. त्या जिवात्म्याला हे कळेल की आधीच्या जन्मात असलेला आपला नातेवाईक याचा या जगातला रोल संपल्यामुळे त्याने आधीचं शरीर त्यागलं आणि नवीन शरीर धारण केल्यामुळे तो आता या जगाच्या रंगभूमीवर वेगळ्या रोल मध्ये गेला आणि त्या रोल अंतर्गतच असलेली कर्तव्ये त्याला आता करावी लागणार. अध्यात्म शिकविते की हे जग खरे नसून परमेश्वराने निर्मिलेली एक माया आहे, सत्य एकच आहे ते म्हणजे ब्रह्म. पूज्य आद्य शंकराचार्यांनी म्हंटलेलंच आहे ब्रह्म सत्य जगंमिथ्या. ईश्वराने आपल्याला ह्या जगात ब्रम्ह काय आहे जे जाणून घेण्यासाठीच पाठवलेलं आहे,पण आपण प्रपंचामध्ये गुरफटून जातो आणि परमार्थ करायला आपल्याला वेळच मिळत नाही. प्रपंच म्हणजे संसार आणि परमार्थ म्हणजे ब्रम्ह जाणणे. अध्यात्म प्रपंचातल्या जबाबदाऱ्या टाळण्यास सांगत नाही परंतु केवळ त्याच्यातच व्यस्त न होता भगवतप्राप्ती हे प्रत्येक मानवाचं अंतिम ध्येय आहे हे अध्यात्म शिकविते. अनेक शरीरातुन फिरून मोठ्या कष्टाने आत्म्याला मानवदेह मिळतो तो फक्त सांसारिक गोष्टी करण्यासाठी नव्हे तर नामस्मरण करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी,ब्रम्ह जाणून घेण्यासाठी, मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण सतत जन्म घेत राहू, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून राहू. पण काही लोकं संसारात न गुंतता परमार्थात गुंततात आणि त्यामुळे हळूहळू ते त्यांच्या मधल्या मी ची प्रगती करतात, आणि पूर्ण ज्ञान झाल्यावर ते मुक्त होऊन जातात आणि ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायम सुटतात. आणि त्या ब्रम्हात शाश्वत विलीन होऊन जातात, शाश्वत आनंदाचा अनुभव घेतात. अध्यात्म फार मोठं आहे माझ्या परीने जमेल तसं मी ते वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या सारखी सामान्य व्यक्ती त्या अध्यात्म शास्त्राच्या अभासक्रमात पहिल्या च वर्गात आहे. पुढच्या वर्गात जाण्यासाठी माहीत नाही किती वेळ किंवा जन्म लागतील? पण अध्यात्माच्या पाहिलीतल्या अभ्यासक्रमातले काही नियम जे मला वाटतात ते इथे नमूद करते. १. आपली कर्तव्ये प्रामाणिक पणे करणे २. कोणाचाही द्वेष,मत्सर,हेवा न करणे ३. अहंकार कमी करणे ४. आपलं जे नाही,त्याचा मोह न करणे ५. सगळ्यांप्रति आदरभाव,स्नेहभाव वाटू देणे ६. नियमित नामस्मरण करणे. हे नियम पाळण्याचा मी प्रयत्न सुरू केलेला आहे ते पूर्णपणे पाळल्या जायला बराच वेळ लागेलही पण नियमित प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर काही काळाने जमेलही. ह्या सहा नियमांचं पालन जर जगात सगळ्यांनी केलं तर खून,मारामाऱ्या,बलात्कार,युद्ध असे कुठलेच दुष्कृत्य होणार नाहीत. चीन,पाकिस्तान ने हे नियम पाळले असते तर करोना निर्माण झाला नसता, भारताला युद्ध करावे लागले नसते सगळे शांतीने,समाधानाने जगू शकले असते.
◆◆◆