Objection Over Ruled - 14 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 14

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 14

प्रकरण १४
न्यायमूर्ती नारवेकर यांच्या कोर्टात रेयांश आणि काया प्रजापति यांचे विरुद्ध प्राथमिक सुनावणी साठी प्रकरण सादर झाले आणि कोर्ट गर्दीने फुलून गेले.याचे कारण,सरकार पक्षा तर्फे ज्येष्ठ सरकारी वकील हेरंब खांडेकर जातीने उपस्थित होते आणि आरोपीचे वकील पत्र पाणिनी पटवर्धन ने घेतले होते.बरेच दिवसा नंतर पाणिनी पटवर्धन आणि खांडेकर यांचे वाक् तांडव, परस्परांवरील कुरघोड्या जनतेला अनुभवायला मिळणार होत्या.
मोहक पितांबरे, हेरंब खांडेकर यांचा पट्ट शिष्य हा सरकार पक्षातर्फे खटला चालवणार होता.
“ न्यायमूर्ती महाराज, आशा प्रकारच्या प्राथमिक सुनावणी मधे कोणतेही प्रस्तावनेचे भाषण करणे प्रथेस धरून नाही पण तरीही मला ते करावे लगत आहे याचे कारण असे की आम्ही सादर करणार असलेले पुरावे हे परिस्थिती जन्य असल्याने, बचाव पक्षातर्फे ते धुडकावून लावले जाऊ शकतात त्यामुळे आम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सांगितले जाणे मला आवश्यक वाटते.”मोहक पितांबरे म्हणाला.
“ आम्हाला सिद्ध करायचं आहे की रेयांश प्रजापति आणि मयत पुंड यांची बोटीवर झटापट झाली. रेयांशहा एक तयारीचा मुष्टी योद्धा होता.त्याच्या ताकदीपुढे पुंड चा निभाव लागला नाही आणि त्या झटापटीत पुंड चा मृत्यू झाला.आम्ही हे सिद्ध करू इच्छितो की वडिलांना वाचवण्यासाठी , कायाने असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की पुंड च्या मृत्यूचे वेळी वडील तिथे नव्हतेच . हे सिद्ध करण्यासाठी तिने हॉटेल मधे मीटिंग चे वातावरण दाखवण्यासाठी ”जे मद्याचे ग्लास आणि बाटल्या टेबलावर रचल्या होत्या, तसेच सिगारेट्स ची थोटके राक्षपत्रात टाकली होती त्या सर्वावरील ठसे हे काया आणि रेयांश प्रजापति चा उजवा हात समजला जाणारा जतीनभारद्वाज या दोघांचेच आहेत अन्य कोणाचेच नाहीत.”
“ पटवर्धन तुम्हाला काही प्रस्तावना करायची आहे ? ” न्यायाधीश नारवेकर यांनी विचारले
पाणिनीचा सहाय्यक सुकृत पाणिनीच्या कानात कुजबुजला, “ मोहकच्या भाषणाचा न्यायाधीशांवर प्रभाव पडलाय असं दिसतंय. तुम्ही काहीतरी बोलायला हवं सर,”
“ मला, म्हणजे बचाव पक्षाला अत्ता कोणतीही प्रस्तावना करायची नाही , जसजसा खटला पुढे जाईल तसे त्याचे स्वरूप बघून आम्ही निर्णय घेऊ.” पाणिनी म्हणाला
“ सरकार पक्षाने त्यांचा पहिला साक्षीदार बोलवावा.” न्यायाधीश म्हणाले.
तारकर पहिला साक्षीदार म्हणून बोलावला गेला. प्रेत सापडल्याचा पुरावा , प्रेताची ओळख, कुठे सापडले त्याचा तपशील, बोट कुठे लावली होती या बद्दल चा सर्व तपशील सादर केला.
“ तुम्ही उलट तपासणी घेऊ शकता ”मोहक पितांबरे म्हणाला.
पाणिनी उठून उभा राहिला. “ खून बोटीवर झाला? ”
“ हो ” तारकरने उत्तरं दिले.
“ बोट नक्की कुठे लावली होती ? ” पाणिनी ने विचारलं
“ मला वाटतंय पटवर्धन यांनी थोडा धीर धरावा .” खांडेकर म्हणाले. “ आम्ही या क्षेत्रातील एक तज्ज्ञ आणतोय साक्षीला.तो सगळे नकाशे वगैरे सादर करेल.”
“ तसे असेल तर मला तारकर ची उलटतपासणी पुढे ढकलण्याचा म्हणजे नंतर घेण्याचा अधिकार असावा.” पाणिनी म्हणाला
“ आमची काहीच हरकत नाही.”खांडेकरम्हणाले.
तारकर बाहेर पडला आणि खांडेकरने संबंधित तज्ज्ञ साक्षीसाठी बोलावला.
त्याने सर्व नकाशे ,आलेख वगैरेसादर केले आणि त्याची उलट तपासणी घेण्यास पाणिनी ने सुरुवात केली.
“ पुरावा क्रमांक एक म्हणून तू सादर केलेल्या नकाशात फुली मारलेल्या जागी बोट लावली होती? ” पाणिनी ने विचारलं
“ हो.बरोबर.”
“ त्या जागी पाणी किती खोल आहे?” पाणिनी ने विचारलं
साक्षीदार हसला. “ मला माहीत नाही. मी त्रिकोण मिती च्या सहाय्याने बोटी चे स्थान शोधून काढले आणि ते , नदी समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी म्हणजे नदी च्या मुखाच्या नकाशावर टाकले.”
“ आश्चर्यच वाटत मला.तिथल्या पाण्याची खोली माहीत नाही म्हणजे.”
पाणिनी म्हणाला
“ मी सर्वेक्षण करणारा माणूस आहे. पाणबुड्या नाही.” तो म्हणाला.
कोर्टातले सगळे हसले.खसखस पिकली.पाणिनीने त्या कडे लक्ष्य सुद्धा दिले नाही.
“ झाली माझी उलट तपासणी.”पाणिनी म्हणाला
त्या नंतर फोटोग्राफर ची साक्ष झाली.त्याने केबिन च्या आतला भाग,पुंडचे प्रेत पडले त्याचे ठिकाण, प्रेताची अवस्था, केबिन च्या बाहेरचे फोटो, बोटीचे आतून ,बाहेरून विविध कोनातून घेतलेले फोटो सादर केले.
त्याच्या उलट तपासणीत पाणिनी ने शांत पणे पुन्हा प्रश्न केला, “ त्या जागी पाणी किती खोल आहे?”
फोटोग्राफर ने उत्तरं देण्या आधीच कोर्टात पुन्हा हास्याची लकेर उठली.
“ मी फोटोग्राफी करणारा माणूस आहे. पाणबुड्या नाही.” तो म्हणाला.
“ झाली माझी उलट तपासणी.”पाणिनी म्हणाला
पुढची साक्षीदार म्हणून दिव्व्या पुंड चे नाव पुकारले गेले.
“ मयत पद्मनाभ पुंडची तू पत्नी आहेस? ” खांडेकर यांनी गंभीर आवाजात आणि आपलेपणाची भावना आणल्या सारखे करून विचारले.
“ हो.”
“ या खटल्यातला आरोपी रेयांश प्रजापति ला तू ओळखतेस? ”
“ हो ओळखते.गेली दहा वर्षे.”दिव्व्या पुंड म्हणाली.
“ ज्या दिवशी तुझं नवरा गेला त्या दिवशी एका विशिष्ट ठिकाणी त्याला भेटायला रेयांश ने बोलावलं होतं हे तुला माहीत आहे? ”
“ हो माहित्ये.प्रजापतिचा तसा फोन आला होता त्या दिवशी सकाळी साडे अकराला. आणि मीच घेतला होता फोन.”
“ तो रेयांश प्रजापति च होता कशावरून? ”
“ गेली दहा वर्षे मी त्याचा आवाज ओळखते आहे.”
“काय म्हणाला फोन वर तो? ” खांडेकरनी विचारले.
“ त्याला जेव्हा कळलं की तो घरी नाहीये, तेव्हा तो म्हणाला की पाच वाजता बरोबर त्याला बोटीवर पाठव, नेहेमीच्या जागी बोट असेल . अतिशय महत्वाचे काम आहे.”
“ हा निरोप तू तुझ्या नवऱ्याला दिलास? कधी दिलास?”
“ पुढच्या वीस मिनिटातच ” दिव्व्या पुंड म्हणाली.
“ कसा काय देऊ शकलीस तू त्याला निरोप?”
“ त्याचाच फोन आला होता. जेवायला येणार नाही रात्री असं सांगायला. मध्यरात्री नंतरच घरी येईन असे तो म्हणाला.”दिव्व्या पुंड म्हणाली
“ तू त्याला रेयांश प्रजापति चा निरोप दिल्यावर काय म्हणाला तो? ” खांडेकरनी विचारले.
“ तो म्हणाला , मी आधीच बोललोय रेयांश शी.............”
“ आमची हरकत आहे या प्रश्नाला.ऐकीव माहितीवर आधारित आणि संदर्भहीन प्रश्न.” पाणिनी ओरडला.
“ मान्य.” न्यायाधीश म्हणाले.
“ पटवर्धनना उलट तपासणी घ्यायची असेल तर घेऊ दे.” खांडेकरम्हणाले.
“ दहा वर्षे रेयांश ला ओळखते हे तिने सांगणे हा तुमच्यासाठी लावलेला सापळा आहे सर.” सुकृत म्हणाला. “ तुम्ही त्याच्या बद्दल तिला प्रश्न विचारावेत आणि त्यातून रेयांश चा पूर्वायुष्यातील प्रसंग कोर्टाच्या समोर यावा हा त्यांचा हेतू आहे ”
पाणिनीने सुकृत कडे लक्ष न देता मुद्दाम तोच प्रश्न विचारला. “ तू रेयांश ला दहा वर्षे ओळखते म्हणालीस, चांगली ओळखतेस त्याला.? ”
“ चांगलीच ओळखते.”दिव्व्या पुंड म्हणाली
पटवर्धन मी चांगली नौकानयन करणारी आहे.तो ही आहे.एका स्पर्धेत आमची ओळख झाली.”
“ तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त काळ तू त्याला ओळखतेस? ”पाणिनी ने विचारलं
“ हो.”
“ तुझ्याच ओळखी मधून तुझा नवरा आणि रेयांश प्रजापति या दोघांची ओळख झाली? ” पाणिनी ने विचारलं
“ होय”
“ रेयांश प्रजापति ला तू त्यानंतर बऱ्याच वर्षांनी भेटलीस?”
“ हो”
“ तू फोन केलास त्याला आणि तुमच्या जुन्या ओळखीचा उल्लेख केलास? ”पाणिनी ने विचारलं
“ हो ” दिव्व्या पुंड म्हणाली
दोन्ही सरकारी वकिलांच्या चेहेऱ्यावर आनंदाचे भाव उमटू लागले होते.त्यांचा चेहेरा फुलत चालला.पाणिनी पटवर्धन अगदी त्यांना हवे असलेले प्रश्नच विचारात होता. त्यांनी टाकलेल्या सापळ्यात अडकत चालला होता याची त्यांना खात्री होती.
“ तू नेमकं काय सांगितलस रेयांश ला? ”
दिव्व्या पुंड ने खांडेकरच्या नजरेला नजर दिली.आणि सांगू का असे नजरेनेच विचारले.खांडेकरनी मान हलवून संमती दिली.
“त्याच्या मुष्टी प्रहारामुळे पूर्वी एक माणूस मेला होता ही गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही असं मी त्याला सांगितलं. त्याला हे पटवण्यासाठी मला फार कष्ट पडले. ” दिव्व्या पुंड म्हणाली
न्यायाधीशांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
पाणिनीने त्याच्या प्रश्नांचा ओघ बिलकुल कमी न करता पुढे विचारलं, “ असं वचन रेयांशला देऊन सुद्धा तू तुझ्या नवऱ्याला हे गुपित सांगितलस?”पाणिनी ने विचारलं
“ त्याला पूर्वीच सांगितलं होत.”
“ तुझ्या नवऱ्याचे धंद्यातील इतर भागीदार, मित्र, उदा.सम्यक गर्ग वगैरे यानाही ते सांगितलेस? ”
“ हो सांगितले मी.”दिव्व्या पुंड म्हणाली
“ आणखी कोणाला? किती जणांशी बोललीस तू हे ?” पाणिनी ने विचारलं
“ कोणाला नाही .याच दोघांना फक्त..”
“ आणि ते या साठी सांगितलस की ते रेयांशला ब्लॅकमेल करून त्याच्या कडून धंद्यासाठी पैसे उकळू शकतील?”पाणिनी ने विचारलं
“ अजिबात नाही.”दिव्व्या पुंड म्हणाली
“ मग का सांगितलस ? ”
“ यासाठी ,की मला असं वाटलं की माझ्या नवऱ्याला हे जाणून घेण्याचा हक्क आहे.”
“ आणि सम्यक गर्ग चे काय? तुला असं वाटलं की त्याला ही हे जाणून घेण्याचा हक्क आहे? ” पाणिनी ने विचारलं
“ ही साक्ष फार भरकटत चालल्ये न्यायमूर्ती महाराज.” खांडेकरम्हणाले.
“ अजिबात नाही , ”पाणिनी म्हणाला “ उलट पक्षी,ही साक्षीदार रेयांश च्या पूर्वीच्या आयुष्यावर बोलायला किती उत्सुक होती हे कोर्टाच्या लक्षात आले असेल.त्यामुळे तिचे मन कसे पूर्व ग्रह दूषित आहे हे मला दाखवून द्यायचं आहे त्याचं प्रमाणे कोर्टाच्या रेकोर्ड वर तिला रेयांश विषयीच्या ज्या घटनेची नोंद व्हायला हवी आहे त्याच प्रश्नाचं उत्तरं मी तिच्या कडून काढून घेतोय. सरकारी वकिलांनी माझ्यासाठी टाकलेल्या जाळ्यात मी नाही ते स्वत:च चालत आलेत.”
“ हे स्वाभाविक आहे की तिचे मत रेयांश विषयी कलुषित असणार. शेवटी त्याने तिच्या नवऱ्याचा खून केलाय म्हटल्यावर.....” खांडेकर म्हणाले.
“ मिसेस पुंड,पटवर्धनच्या प्रश्नाला उत्तरं द्या.” खांडेकर यांचे ऐकून न घेता न्यायाधीश म्हणाले. “ पटवर्धनयांचा प्रश्न होता की सम्यक गर्ग ला सुद्धा तुझ्या नवऱ्या प्रमाणेच ,रेयांश चे पूर्वायुष्यातील गुपित जाणून घेण्याचा हक्क होता असे तुला वाटतंय का? ”
“ तो माझ्या नवऱ्याचा व्यवसायातील साथीदार होता.” दिव्व्या पुंड म्हणाली
“ म्हणून त्याला हक्क होता? ” पाणिनी ने विचारलं
“ त्या अर्थाने हो.”दिव्व्या पुंड म्हणाली
“ म्हणजे तुम्हाला असलेली माहिती ही नवऱ्याच्या व्यवसायासाठी मालमत्ता असल्या सारखी होती? ” पाणिनी ने विचारलं
“ अजिबात नाही.” ती म्हणाली.
“ पण माहितीचा वापर मात्र तसा केला गेला की.” पाणिनी पटवर्धनम्हणाला.
“ कोणी केलं तसा वापर ? ”दिव्व्या पुंड म्हणाली
“ तुझ्या नवऱ्याने.” पाणिनी म्हणाला
“ ही ऐकीव माहिती ठरेल.कायद्यात त्याला किंमत नाही.” खांडेकरम्हणाले. “ तिचा नवरा आणि रेयांश प्रजापति यांच्यात जे घडलं ते तिला माहीत असायचं कारण नाही. जर नवऱ्याने सांगितले तरच तिला माहीत होण्याची शक्यता आहे.ते दोघे पती पत्नी असल्याने त्यांच्यातील संवाद हा गोपनीय असणार”
“ प्रश्नाचा अर्थ हा आहे की तिला या गोष्टीचं ज्ञान होत की नाही.” न्यायाधीश म्हणाले.
“ मला नव्हती माहिती ” मिसेस पुंड गोड आवाज काढून म्हणाली.
“ पण तुझं प्रजापति शी या विषयावर बोलणे होण्यापूर्वी तुझं नवरा त्याला कधीही भेटला नव्हता?” पाणिनी ने विचारलं
“ नाही.”
“ पण प्रजापतिच्या पूर्वायुष्यातील घटना तू त्यांना सांगितल्या नंतर पुढच्या आठ दहा दिवसातच त्यांनी त्याला भेटून त्यांच्या धंद्यात त्याला गुंतवणूक करायला भाग पाडले? ”पाणिनी ने विचारलं
“ गर्ग भेटला असेल अस नाही मला वाटत.” मिसेस पुंड म्हणाली.
“ आर्थिक व्यवहार तुझं नवरा बघायचा म्हणून गर्ग ने प्रजापति ला भेटायचं संबंध नव्हता अस म्हणायचं आहे का तुला? ”पाणिनी ने विचारलं
“ हो तसेच.”
“ म्हणून फक्त तुझा नवराच भेटला का प्रजापति ला? रोख स्वरुपात पैशाची मदत मिळावी म्हणून? ”
पाणिनीने साक्षीदाराकडे बोट नाचवत विचारलं “ प्रजापतिला ब्लॅकमेल केल्या बद्दल तू तुझ्या नवऱ्याची कान उघडणी केलीस का? ”
“” ओह ! काय भरकटत चालल्ये ही उलट तपासणी? ” खांडेकर उद्गारले. “ नवऱ्या विरोधात मुद्दे आहेत हे .कायद्या प्रमाणे बायको त्याच्या विरुद्ध साक्ष नाही देऊ शकत.”
“ नवरा बायको मधील खाजगी संवाद या नावाखाली ही हरकत मान्य.” न्यायाधीश म्हणाले.
“ शनिवारी, ज्या दिवशी प्रेत सापडले आणि मी तुझ्याघरी आलो होतो त्या कडे तुझे लक्ष वेधू इच्छितो.” पाणिनी म्हणाला “ तू तेव्हा रडत होतीस ? ”
“ ही योग्य उलट तपासणी नाही.आमची हरकत आहे.” सरकारी वकील म्हणाले.
“ तिची मानसिकता दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे.” पाणिनीने स्पष्ट केळे.
“ऑबजेक्शन ओव्हर रुल्ड.उत्तरं द्या प्रश्नाचे. ”
“ रडत होते.”पुंड म्हणाली.
“ आणि तेव्हाच इन्स्पे.तारकर आला तिथे? आणि मी तुला सांगितलं होत की हा माणूस खुनाशी संबंधित पोलीस विभागाशी संबंधित आहे , कोणाचा खून झाल्याचे तुला समजलं आहे का अस मी तुला विचारलं तेव्हा तू एक वाक्य उच्चारताना अचानक थांबलीस ते वाक्य म्हणजे ‘ कदाचित मा... माझ्या.... बरोबर का?”पाणिनी ने विचारलं
“ हो बरोबर.”
“ ते वाक्य अर्धवट सोडलास तेव्हा तुझ्या मनात होत की नवऱ्याचा खून झाला असावा?”पाणिनी ने विचारलं
“ हो ”
“ त्याचाच खून झाला असावा अस का मनात आलं तुझ्या ?” पाणिनी ने विचारलं
“ कारण तो रात्रभर घरी आला नव्हता.मला माहिती होत की प्रजापति ने माझ्या नवऱ्यावर हिशोब पुस्तकात घोटाळा केल्याचा आरोप केला होता, आणि प्रजापति पासून पद्मनाभ ला धोका वाटत होता.” ती म्हणाली.
“ माझी क्रॉस संपली. ” पाणिनीम्हणाला.
खांडेकरफेर तपासणी साठी उभे राहिले.
“ पुंड,तारकर खाली दिसल्यावर लगेच पटवर्धन ने तुला सल्ला दिला की कांदे सोल म्हणजे त्यामुळे डोळ्यात पाणी आले असे दाखवता येईल ? ”
“ नक्कीच मी सल्ला दिला तिला.”पाणिनी म्हणाला
“ उत्तरं दे ” खांडेकर पाणिनी पटवर्धन कडे पूर्ण दुर्लक्ष करून पुंड ला म्हणाले.
“ हो ”पुंड म्हणाली
“ का सल्ला दिला पटवर्धन ने ?” खांडेकरनी विचारलं
“ मिस्टर पटवर्धन, या प्रश्नाला तुम्ही हरकत घेऊ शकता. साक्षीदाराचा अंदाज आहे हा या मुद्द्याचे आधारावर.” न्यायाधीश म्हणाले.
“ अजिबात ऑब्जेक्शन घ्यायचे नाही मला.उलट पक्षी हे रेकोर्ड वर येउ दे की मी तिला तिचा चेहेरा असा का दिसतो याचा खुलासा व्हावा म्हणून सल्ला दिला.”पाणिनी म्हणाला
“अजून काही प्रश्न आहेत तुमचे खांडेकर?”
“ नाहीत युअर ऑनर ”
“ पटवर्धन, तुमचे आहेत काही प्रश्न? ”
“ नाहीत युअर ऑनर ” पाणिनी म्हणाला
“ तुमचा पुढचा साक्षीदार बोलवा ” न्यायाधीश नारवेकर म्हणाले.
“ नेहेमीच्या पद्धतीपेक्षा मी जरा वेगळा साक्षीदार बोलावू इच्छितो पण मी त्याची साक्ष बरोबर इतर साक्षीदारांशी आणि पुराव्याशी जुळवून दाखवीन नंतर.” खांडेकरम्हणाले.
“ ठीक आहे ” नारवेकर म्हणाले.
“ प्रबोधला बोलावण्यात यावे.” खांडेकरम्हणाले.
तो हजर झाला. खांडेकरनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“ शुक्रवारी तू सर्फ अँड सन हॉटेल मधे तेरा आणि चौदा नंबरच्या खोल्या बुक केल्या होत्यास?” खांडेकरनी विचारलं
“ हो सर.” प्रबोधम्हणाला.
“ या संदर्भात तुझं बचाव पक्षापैकी कोणाशी बोलण झालं होत?”
“ माझी हरकत आहे या प्रश्नाला. सरकारी वकिलांनी हे विचाराव की या साक्षीदाराने आरोपी पैकी कोणाशी फोन वर बोलणे केले होते का आणि आरोपींनी जर ते मान्य केले तर ते आरोपीवर बंधनकारक राहील अन्यथा हा साक्षीदार त्यांना जे काही बोलला असेल तर ते आरोपीवर बंधनकारक नाही.”पाणिनी म्हणाला
“ हे बरोबर आहे.” न्यायाधीश म्हणाले.
“ पण न्यायाधीश महाराज, मला ते दुसऱ्या साक्षीदाराच्या साक्षीशी जोडून घ्यायचय.मला हे दाखवायचय की हा साक्षीदार त्या हॉटेल मधे राहिला होता हे आरोपीला माहिती होते.”
“ ठीक आहे तुमचा प्रश्न बदलून फक्त हा विशिष्ट मुद्दा विचारा”न्यायाधीश म्हणाले.
“ बर आहे.” खांडेकरम्हणाले. “ मी तुम्हाला विचारतो मिस्टर प्रबोध की तुम्ही आरोपी पैकी कोणाला कळवले होते का, की तुम्ही कुठे राहिला आहात ते?”
“ प्रजापतिचा खास माणूस भारद्वाज याला.” प्रबोध म्हणाला. “ मी त्याला विचारलं की जमीन खरेदी च्या कराराची कागदपत्रे मला मिळतील का? मी हॉटेल चे नाव सांगितले आणि दुपार पर्यंत मला कळवा असे......”
“भारद्वाज बरोबर चे हे संवाद ऐकून नक्की काय सध्या होणार आहे मिस्टर खांडेकर?” न्यायाधीश म्हणाले. “ ही सर्व माहिती भारद्वाज ने आरोपीला सांगितली आणि त्याचा या प्रकरणावर मोठा परिणाम होणार आहे असं तुम्हाला अभिप्रेत आहे का? तसं असेल तरच मी परवानगी देतो.”
“ धन्यवाद,मी तुम्हाला विचारतो,प्रबोध,तुम्ही सर्फ अँड सन हॉटेल मधून कधी बाहेर पडलात? ” खांडेकरनी विचारलं
“ सकाळी दहा च्या सुमाराला.”प्रबोधम्हणाला.
“ आणि भारद्वाज बरोबर तुमचं बोलणं कधी झालं ?”
“ शुक्रवारी पावणे पाच वाजता आणि शनिवारी सुद्धा.”
“ तुमच्या बरोबर असणारे लोक दोन खोल्यात राहिले होते?” खांडेकरनी विचारले.
“ हो ”
“ कोण होते हे लोक ? ”
“ माझ्या व्यवसायाशी संबंधित होते. भविष्यात धरण क्षेत्रात जाणारी जमिनी कुक्कुट पालनासाठी घ्यायची , कालांतराने सरकारने ती जागा ताब्यात घेतली की त्या जागेला मोठी किंमत सरकार देणार , म्हणजे कुक्कुट पालनापेक्षा या जागे तूनच जास्त पैसा काढायचा असा हा प्रकार होता. ”
“ म्हणून तुम्ही ती जागा बघायला गेलात? ”खांडेकरनी विचारले
“ हो”
“ तुम्ही ते हॉटेल सोडल्या नंतर , आरोपीशी तुमचं बोलणं झालं का? आणि कशा बद्दल झालं? ”खांडेकरनी विचारले
“ आरोपीने मला सांगितलं की तुझ्या बरोबर त्या हॉटेलात कोण लोक होते असे तुला कोणी विचारले तर त्याचं उत्तरं द्यायला तू सरळ सरळ नकार दे ”
“ यावर तू काय उत्तरं दिलेस? ”खांडेकरनी विचारले
“ मी म्हणालो काहीच हरकत नाही.” प्रबोधम्हणाला.
“ खोटी साक्ष दिल्याची पार्श्वभूमी म्हणून तुम्ही हे विचारताय का?”पाणिनी ने विचारलं
“ होय.” खांडेकरम्हणाले.
पाणिनी हसला. “ तिने त्याला कोणतीही खोटी गोष्ट सांगायला लावलेली नाही.उत्तर देऊ नको असे सांगणे म्हणजे खोट सांगायला लावणे असं होत नाही.”
“ अप्रत्यक्ष पणे तोच अर्थ होतो.” खांडेकरम्हणाले.
“ वकिलांनी आपापसात भांडू नका.”नारवेकर नी तंबी भरली. “ तुमची झाल्ये का साक्ष घेऊन मिस्टर खांडेकर? ”
“ हो. संपलेत माझे प्रश्न. ”खांडेकरम्हणाले.
“ पटवर्धन, तुम्हाला उलट तपसणी घ्यायच्ये ?”
पाणिनीने मान हलवून हो म्हणून सांगितले “ प्रबोध, हॉटेलात तुझ्या बरोबर असलेल्या लोकांची खोटी नावे सांग असं तुला काया प्रजापति ने सांगितलं ? ”
“ नाही तसे काही नाही सांगितलं ”
“ किंवा त्या लोकांचे किंवा त्यांच्या धंद्याचे खोटे वर्णन कर, असं सांगितलं ?” पाणिनी ने विचारलं
“ नाही. तिने फक्त काही बोलू नको, उत्तर देऊ नको असं सांगितलं.” प्रबोधम्हणाला.
“ तिचे वडील त्या हॉटेलात नव्हते असे सांग म्हणून तिने सांगीतले का तुला?”
“ नाही तसे नाही सांगितले.”प्रबोधम्हणाला.
“ फक्त कोण होते त्या कोणाचीही नावे सांगू नको एवढेच सांगितले ना?”पाणिनी ने विचारलं
“ हो ”
“ कोणाचीही , याचा अर्थ त्यात वडील ही समाविष्ट आहेत? ”पाणिनी ने विचारलं
“ आता माझ्या लक्षात आलं तुम्हाला नेमकं काय हवय.” प्रबोधम्हणाला. “ तिथे कोण होते त्या पैकी कोणाचीही नावे सांगू नको अशी तिने सांगितले.त्यात वडील ही होतेच पण तिने वेगळे नमूद नाही केले की वडलांचे नाव सांगू नको म्हणून.”
“ बस ! मला एवढेच काढून घ्यायचे होते.”पाणिनी अत्यानंदाने म्हणाला. “ मी आव्हान देतो तुम्हाला खांडेकर,कायाने प्रबोध ला खोटी साक्ष द्यायला लावली हे सिद्ध करा.”
“ गुन्ह्याच्या ठिकाणी वडील नव्हते हे सिद्ध करण्याचा आरोपीचा डाव आहे हा.” खांडेकरम्हणाले.
“ ते गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हते हे सिद्ध करण्यासाठी ते हॉटेलात होते हे सिद्ध व्हायला हवे, म्हणजे कोणीतरी साक्ष द्यायला हवी की ते हॉटेलात होते.आणि कायाप्रजापतिप्रबोधला असं नाही सांगितलं की वडील हॉटेलात होते म्हणून साक्षदे. उलट पक्षी वडील तिथे होते हे या बद्दल मौन धर असेच सांगितले.”पाणिनी म्हणाला
“ ते काहीही असले तरी सुद्धा वडील हॉटेलात होते असेच सरकार पक्षाला वाटावे असंच तिचा प्रयत्न होता.”खांडेकरम्हणाले.
“ तुम्हाला काय वाटते हा तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे.कायद्याने काय अर्थ घेतला जाईल हे महत्वाचे आहे.” पाणिनीने टोमणा मारला.
“ मी सिद्ध करीन पुराव्याने.” खांडेकरओरडले. “ मी पुन्हा तारकर ला बोलावू इच्छितो ”
तारकर येऊन पिंजऱ्यात उभा राहिला.
“ शनिवारी पद्मनाभ पुंड चे प्रेत सापडले त्या दिवशी तुझं आणि आरोपी काया चं बोलणं झालं होत?” खांडेकरनी विचारलं “ आणि झालं असेल तर कुठे? ”
“ डोब हट नावाच्या रेस्टॉरंट मधे. ” तारकरम्हणाला. “ माझ्या बरोबर तेव्हा एक पोलीस होता आणि रेयांश प्रजापति होते.”
“ तेव्हा काय बोलली काया?”
“ ती म्हणाली तिचे वडील एका गुप्त राजकीय बैठकीत होते आणि त्यातील लोकांची नावे सांगणे योग्य नाही होणार पण ते कुठे होते हे सांगण्यात काही गैर नाही.ते बाबांनी सांगावं ” तारकरम्हणाला.
“ ती बैठक सर्फ अँण्ड सन मधे झाली असं ती म्हणाली का?” खांडेकरनी विचारलं
“ अप्रत्यक्ष पणे तिने सूचित केलं ”
“रेयांश प्रजापति ने काय सांगितलं ? ” खांडेकरनी विचारलं
“ रेयांश बोलला नाही काही पण त्याने अचानक काहीतरी आठवल्या सारखा अविर्भाव केला आणि आपल्या खिशात हात घालून चाचपल्या सारखे करून किल्ली बाहेर काढली. ती सर्फ अँण्ड सन ची होती. थोडक्यात म्हणजे त्याने तिथे राहिल्याचे थेट शब्दात सांगितले नाही परंतू त्याच्या वागण्यातून ते दाखवून दिले.”तारकरम्हणाला.
“ हा साक्षीदाराने केलेला अंदाज आहे किंवा त्याला काय वाटलं त्याचं कथन आहे.हे रेकॉर्डवर घेऊ नये.” पाणिनी म्हणाला
“ बरोबर आहे.” न्याय मूर्ती म्हणाले. “ साक्षीदार हा अनुभवी पोलीस अधिकारी आहे त्याने अंदाज व्यक्त करू नये आरोपी नेमके काय म्हणाला त्याला, एवढेच सांगावे.”
तारकरहसला.“ रेयांशने खिशातून किल्ली काढून माझ्या कडे दिली.ती किल्ली सर्फ अँण्ड सन ची होती ” तो म्हणाला.
“ त्यानंतर रेयांश प्रजापति तुझ्या बरोबर सर्फ अँण्ड सन ला आला आणि त्याने त्याचा त्या हॉटेलात विसरलेला दाढीचा रेझर तुला दाखवला आणि ओळखला?” खांडेकरनी विचारलं.
“ होय सर”
“ आणि काया ने तुला सांगितलं की तिच्या वडिलांचा दाढीचा रेझर त्या हॉटेलात मिळेल असं?” खांडेकरनी विचारलं.
“ हो सर.” तारकरम्हणाला.
“ पटवर्धन , तुम्ही घ्या उलट तपासणी” खांडेकरम्हणाले. “ माझे प्रश्न संपलेत.”
पटवर्धन सभ्यपणे, सौम्या पणे हसून उभा राहिला “ स्वत: कायाने तुला सांगितलं की तिच्या वडिलांचा रेझर हॉटेलात होता म्हणून? ”
“ हो ” तारकरम्हणाला.
“ तिचे वडील त्या हॉटेलात गेले होते असे तिने तुला सांगितलं का? ” पाणिनी ने विचारलं
“ तसं स्पष्ट शब्दात तिने सांगितलं नाही पण तिला तेच सुचवायच होतं.” तारकर उत्तरला.
“ रेझर तिथे होता म्हणजे वडील तिथे गेले असले पाहिजेत असे अनुमान तू काढलंस?” पाणिनी ने विचारलं
“ हो.”
“ रेयांश प्रजापति ने पण तुला सांगितलं की त्याचा रेझर तिथे होता ?”पाणिनी ने विचारलं
“ हो, नंतर सांगितलं.आणि तिथे गेल्यावर रेझर दाखवला ” तारकरम्हणाला.
“ तो रेयांश चा रेझर होता? ”पाणिनी ने विचारलं
तारकरअस्वस्थपणे चुळबुळला “ मला नाही माहिती.” तो म्हणाला.
“ आता कसं बरोबर बोललास ! ” पाणिनीम्हणाला. “ रेयांश म्हणाला त्याचा रेझर त्या हॉटेलात होता , काया म्हणाली बाबांचा रेझर हॉटेलात सापडेल. तुला हॉटेलात ‘एक’ रेझर सापडला. तो सापडलेला रेझर रेयांश चा आहे की नाही हे ठरवायला तू काहीही केलं नाहीस.” पाणिनीम्हणाला.
“ तो तिथे मुद्दामचं ठेवण्यात आला होता ” तारकर म्हणाला.
“ तुझं अंदाज किंवा अनुमान नको आहे.त्या रेझर ची मालकी शोधायचा तू प्रयत्न केलास का तेवढेच सांग.” पाणिनी म्हणाला
“ नाही केलं तसा प्रयत्न. मी असंच गृहीत धरलं की तो रेयांश चा आहे.” तारकरम्हणाला. त्याच्या चेहेऱ्यावर आता तणाव दिसू लागला होता.
“ थोडक्यात तुला हॉटेलात एक कुठला तरी रेझर सापडल्यावर त्यांच्यावर दबाव आणून कबूल करायला लावायचा प्रयत्न केलास की रेयांश त्या हॉटेलात होता. आणि त्याने त्याला नकार दिला.बरोबर आहे ना? ”पाणिनीने खोदून विचारलं
“ त्याने अर्धवट नकार दिला.” तारकरम्हणाला.
“ अर्धा, नकार, एक चतुर्थांश नकार,अशा मोजपट्टी ला अर्थ नाही.नकार दिला का एवढंच सांग. हो की नाही.या शब्दात सांग.”पाणिनी म्हणाला
“ हो . नाकारलं त्याने ते.”
खांडेकर काहीतरी बोलायला गेले पण तेवढ्यात न्यायाधीश हसून म्हणाले “ चालू देत तुमचे प्रश्न , मिस्टर पटवर्धन.”
“ तारकर, रेयांश प्रजापति ने तुला स्पष्ट कल्पना दिली की जर तू त्याला सर्वांसमोर विचारलस की तो काल रात्री त्या हॉटेलात राहिला होता का तर तो सरळ सरळ नाही म्हणून सांगेल. बरोबर आहे ना मी म्हणालो ते? ”पाणिनी ने विचारलं
“ हो तसच म्हणाला तो, पण त्याचा अर्थ मी असा घेतला की तो तिथे होता पण त्याला ते सर्वांसमोर कबूल करायचं नाही ” तारकरम्हणाला.
“ तारकर, आपल्याला तुझ्या अंदाजावर हा खटला चालवायचा नाहीये. आरोपी प्रत्यक्ष काय बोलला त्यावर चालवायचा आहे.”
“ आम्ही डोब हट रेस्टॉरंट मधे होतो तेव्हा त्याची मुलगी काया म्हणाली की तिचे वडील सर्फ अॅण्ड सन मधे होते.” तारकरम्हणाला
“. एक मिनिट, ”पाणिनीमधेच म्हणाला. “ मी त्यावेळी तिथे हजर होतो.काया असं म्हणाली की सर्फ अॅण्ड सन मधे राजकीय मंडळीची गुप्त बैठक काल रात्री झाली असायची शक्यता आहे.आणि वडलाना उद्देशून असं म्हणाली की बाबा , राजकीय मंडळीना संरक्षण न देता, तुम्ही कुठे होतात ते सांगायची वेळ आली आहे. याला प्रतिसाद म्हणूनच रेयांश ने त्याच्या खिशात हात घालून एक किल्ली बाहेर काढली आणि टेबल वर ठेवली ,ती तू लगेच झडप घालून पकडलीस आणि पाहिलस की टी किल्ली सर्फ अॅण्ड सन हॉटेल ची होती. बरोबर आहे की नाही ? ” पाणिनी ने विचारलं
“ हो बरोबर आहे.” तारकरअस्वस्थ होऊन म्हणाला.
“ याचाच अर्थ , रेयांश प्रजापतिने स्वत:च्या तोंडून तुझ्या समोर सांगितलं नाही की तो सर्फ अॅण्ड सन मधे राहिला होता.”पाणिनी म्हणाला
“ त्याने त्या हॉटेल ची किल्ली तर दिली ना मला? त्याचा दुसरा अर्थ काय होतो?” तारकरने वैतागून विचारलं
“ पण किल्ली दिल्यानंतर त्याने तुझ्या नजरेला नजर देत स्पष्ट सांगितलं की जर तू त्याला विचारलस की तू सर्फ अॅण्ड सन मधे होतास का तर तो सरळ सरळ नाकारेल म्हणून ?” पाणिनी ने विचारलं
“ मला नक्की आठवत नाही काय संवाद घडले तेव्हा .” तारकरम्हणाला.
“ काया तेव्हा म्हणाली नाही का, की बाबा अहो तुमचा रेझर राहिलाय तिथे म्हणून.?”पाणिनी ने विचारलं
“ होय.बरोबर असेच म्हणाली ती.” तारकरम्हणाला.
“ आणि त्याचा अर्थ तू असा घेतलंस की तिचे वडील हॉटेल मधे होते?” पाणिनी म्हणाला.. “ तारकर, या ठिकाणी आरोपीने वस्तुस्थिती ला धरून विधान आशा प्रकारे केलंय की पोलिसांना ते खोटे वाटतंय.खोटी साक्ष त्याला म्हणतात की जे न्यायाधीशांसमोर खरं बोलायची शपथ घेऊनही खोटे सांगितले जाते.” पाणिनीम्हणाला.
“ प्रबोधने काय सांगावे कोर्टात असंआरोपीला वाटत होतं ते म्हणजे खोटी साक्ष द्यायला लावल्या सारखेच आहे.”तारकरम्हणाला.
“ अस्स ? त्याला खोटे बोल कोर्टात असं कोणी सांगितलं होत का? ” पाणिनीने विचारलं
“ ओह ! हे सगळ झालंय मगाशी.” तारकरम्हणाला.
“ हो ना झालंय , तूच पुन्हा विषय काढलास . असो, तुला अजून एक विचारतो,शनिवारी सकाळी तुला बोटीवर बोलावण्यात आलं होत,पद्मनाभचे प्रेत सापडल्यावर?”पाणिनी म्हणाला..
“ हो सर.”
“ तिथे तपासणी करत असताना , एका डेक वरून दुसऱ्या डेक वर जाण्याच्या जिन्यावर तुला रक्तात माखलेले बुटाचे ठसे आढळले?”पाणिनी म्हणाला..
“ मी येतोय त्या विषयाकडे. दुसऱ्याच्या साक्षीच्या वेळी.” घाई घाईत खांडेकरओरडले.
“ मी आत्ताच येतोय त्या विषयाकडे.याच साक्षीच्या वेळी.” पाणिनीखवट पणे म्हणाला. “ उत्तर द्या इन्स्पेक्टर ! ”
“ हो मिळाले.”
“ तू हे पहायचा प्रयत्न .........” पाणिनीविचारू लागला पण खांडेकरमधेच म्हणाले,
“ अरे देवा, ही उलट तपासणी फारच भरकटत जात्ये. मी या पुढे कायाचा बूट पुरावा म्हणून जमा करणार आहेच, त्याची ओळख पटवणार ,त्याला रक्त लागले असल्याचे रेकॉर्ड वर आणणार .सगळ पद्धतशीर पणे करणारच आहे.पटवर्धन उगाचच घाई का करताहेत?”
“ हे बघा, तारकर हे त्या ठिकाणाची तपासणी करणारे पोलीस इन्स्पेक्टर आहेत.त्यांच्या कामाच्या संदर्भात पटवर्धन माहिती घेत असतील तर काय हरकत आहे? आणि पटवर्धन यांनी तुम्ही ठरवलेल्या क्रमानेच जावे असे बंधन त्यांच्यावर नाही. शेवटी रक्त लागलेल्या बुटाचा विषय या साक्षीदाराकडून कोर्टाला समजला काय किंवा तुमच्या दुसऱ्या साक्षीदाराकडून समजला काय फरक काय पडतो? ” न्याय मूर्तींनी कडक जाणीव करून दिली. “ तारकर, उत्तर द्या ”
“ हो ,अशा प्रकारचे ठसे आढळले मला. माझ्याकडे तो बूट सुद्धा अत्ता आहे.”
तारकरम्हणाला.
“ पुरावा क्रमांक पाच म्हणून सादर झालेला फोटो पहा.” पाणिनी म्हणाला. “ या फोटोत एक मेणबत्ती दिसते आहे.”
“मला माहित्ये ,तिथे एक मेणबत्ती होती. ”तारकरम्हणाला.
“ नीट अभ्यास कर फोटोतल्या मेणबत्तीचा. त्यात काही वेगळे पण जाणवतोय तुला?” पाणिनी म्हणाला..
“ नाही. बोटीत ज्या ठिकाणी प्रेत सापडलं, तिथल्या केबिन मधल्या टेबलावर टी चिकटवून ठेवलेली होती.” तारकरने उत्तर दिले.
“ मेणबत्ती किती जळून संपली होती?”पाणिनी म्हणाला..
“ साधारण एक इंच.किंवा त्याहून कमी असेल ”
“ तेवढीच म्हणजे एक इंच मेणबत्ती जळण्यासाठी किती वेळ लागतो याचा प्रयोग तू करून बघितलास का? त्याच कंपनीची तेवढ्याच जाडीची मेणबत्ती घेऊन आणि बोटीवरील केबिन मधे जसे वातावरण होते त्याच वातावरणात मेणबत्ती लाऊन?” पाणिनी म्हणाला..
“ नाही केलं प्रयोग.तशी गरज नाही वाटली.” तारकरम्हणाला.
“ गरज का नाही वाटली?” पाणिनी म्हणाला..
“ त्या मेणबत्तीला काहीच महत्व नाही. कारण पुंड कधी मेला हे आम्हाला माहीत आहे.कसा मेला ते ही माहीत आहे.अंधार पडायच्या खूप आधी तो मेला.त्यामुळे मेणबत्तीचा संबंध येत नाही.”
“ एक गोष्ट लक्षात आली का , तुझ्या , की मेणबत्ती अगदी लंबात उभी नाही, थोडी कलली आहे ? ”पाणिनी म्हणाला..
“ हो, ते लक्षात आलं.”
“ किती अंशात कलली आहे हे माहित्ये? अठरा अंशाच्या कोनात ”पाणिनी म्हणाला.
“ असू शकेल ” तारकरम्हणाला.
“ तेवढ्याच अंशाच्या कोनात का कलली हे शोधायचा प्रयत्न केलास का? ”पाणिनी म्हणाला..
“दिवसाच्या उजेडात खून करताना दिसावं म्हणून खुन्याने घाईघाईत मेणबत्ती कशीतरी टेबलावर चिकटवली असावी.त्यानंतर खून झाल्यावर पटकन निघून जाताना ती काटकोनात उभी करायचे तो विसरला असावा. ”तारकरउपरोधिक भाषेत म्हणाला.
“ या पेक्षा दुसरी चांगली कल्पना नाही तुझ्याकडे?”पाणिनी म्हणाला..
“ काय असणार याहून वेगळी? ” तारकरउद्गारला.
“ ठीक आहे माझी उलट तपासणी संपली.”
पाणिनी हसून म्हणाला.त्याच्या चेहेऱ्यात खांडेकरना प्रचंड आत्मविश्वास दिसला.ते थोडे चपापले.
“ त्या मेणबत्तीत असं काय मोठ रहस्य असणार आहे?” खांडेकर पुटपुटले.
“ ते रहस्य हाच माझा बचाव आहे.”पाणिनी म्हणाला.
“ तुमचा पुढचा साक्षीदार बोलवा.” न्यायाधीश म्हणाले.
खांडेकरनी अथर्व किणी चे नाव पुकारले.
“ सर, काया आणि मी शेअर टॅक्सी मधे बसलो तेव्हा हाच माणूस सह प्रवासी म्हणून बसला होता.एक नंबरचा बडबड्या होता आणि आमचे कडून गप्पांच्या ओघात माहिती काढायचा प्रयत्न करत होता.” सौम्या , पाणिनीच्या कानात पुटपुटली.
त्याने खांडेकरना शेअर टॅक्सी मधे बसल्या पासून वुडब्रिज हॉटेल मधे जाऊन ,बस स्टेशन वरील लॉकर मधून बुटाचे पार्सल पोलिसांसमोर उघडले गेले येथ पर्यंत सर्व हकीगत सांगितली.त्या बुटाची तपासणी केली तेव्हा रक्ताचे डाग लागलेले दिसले हे पण त्याने सांगितले.
“ घ्या उलट तपासणी ,पटवर्धन.”
खांडेकरच्या आवाजात एक आव्हान दिल्याचे भाव होते.
“ तू कायाप्रजापति चा पाठलाग करत होतास? ” पाणिनीने विचारले
“ हो”
“ या कामावर तू एकटा नव्हतास.बरोबर ना? काय नाव होतं तुझ्या मदतनीस गुप्त हेराचे? ”
साक्षीदाराने खांडेकरकडे पहिले. उत्तर देऊ की नको याची त्याला सूचना हवी होती.
“ आमची हरकत आहे याला.” खांडेकरम्हणाले.
“ ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड ” न्यायाधीशनी निर्णय दिला. “ नाव सांगा ”
“ हर्षद खासनीस ”अथर्व किणी म्हणाला.
“ अत्ता कुठे आहे तो? ” पाणिनी म्हणाला..
“ अरे ! मला कसे माहिती असेल ते? ”किणी म्हणाला.
“ याचा अर्थ तुला स्वतःच्या ज्ञानाप्रमाणे हर्षद खासनीस कुठे आहे ते माहीत नाही , बरोबर?”पाणिनी म्हणाला..
“ अर्थात ”
“ तो पोलीस म्हणून सेवेत आहे का हे तुला माहिती आहे?”पाणिनी म्हणाला..
“ असावा तो नोकरीत. अधिकृत रित्या मला माहीत नाही.”
“ तो सध्या सुट्टीवर गेलाय.आणि त्याने कुठे गेलं ते तुला कळवलय.”
“ ऑब्जेक्शन ” खांडेकर ओरडून म्हणाले.
“ओव्हर रुल्ड ” न्यायाधीशांनी फटकावले.
“ का गेलं अचानक सुट्टीवर ?” पाणिनी म्हणाला..
“ सहजच. नेहेमीच्या कामातून जरा विरंगुळा म्हणून.”अथर्व म्हणाला.
“ सुट्टीवर जायची ही योग्य वेळ नाही असं नाही तुला वाटत?”पाणिनी म्हणाला..
“ मला नाही सांगता येणार”
“ तुला माहित्ये, की खर तर हर्षद खासनीस ला रविवारीच म्हणजे तुझ्या बरोबर असताना त्याचं दिवशी सुट्टीवर जायचे होते.”पाणिनी म्हणाला.
“ मला माहीत नाही हे.” अथर्व म्हणाला.
“ त्याने तुला तसं सांगितलं नाही?” पाणिनी म्हणाला..
“ नाही ”
“ मग अचानक त्याने सुट्टीवर जायचा निर्णय घेतला. का? ”पाणिनी म्हणाला..
“ संगीतलं ना मी तुम्हाला, मला माहिती नाही म्हणून.”
“ कायाच्या पर्स मधून त्या लॉकर ची पावती खाली पडली तेव्हा ती उचलून सौम्या च्या हातात देणारा माणूस म्हणजे हर्षद खासनीस होता का आणि म्हणून तो अचानक सुट्टीवर गेला का?”पाणिनी म्हणाला..
“ मला नाही माहीत कारण.” अथर्व म्हणाला.
“ पण,रस्त्यावर पडलेली पावती सौम्याच्या हातात देणारा तोच होता हे तुला माहीत आहे? ”
“ शपथेवर नाही सांगू शकणार.कारण खाली पडलेला कागद मला नीट दिसला नाही.” अथर्व म्हणाला.
“ तू किती अंतरावर होतास ? ” पाणिनी म्हणाला..
“ आठ ते दहा फुटावर.”
“ तरी तुला तो नीट दिसला नाही म्हणतोस? ठीक आहे हर्षद खासनीस ने तुला सांगितलं नाही की त्याने ती लॉकर ची पावतीखाली पडलेली पावती उचलून सौम्या च्या हातात दिली म्हणून? ”पाणिनी म्हणाला..
“ ऑब्जेक्शन युवर ऑनर ” मोहक पितांबरे म्हणाला. “ हर्षद खासनीसआणि अथर्व यातील संवाद हे या खटल्याचा भाग नाही होऊ शकत.”
“ मी मान्य करणार आहे हरकत ” न्यायाधीश म्हणाले. “ हर्षद खासनीस अचानक रजेवर का गेला याची सरकारी वकिलांना माहिती आहे का?”
“ त्याची पंधरा दिवसांची रजा शिल्लक होती.” मोहक म्हणाला.
“ पण आत्ताच ती रजा घ्यायची असा निर्णय का घेतला हे माहीत आहे का?” न्यायमूर्तीनी विचारले.
“ नाही माहिती.” मोहक उत्तरला.
“ आणखी काही विचारायचं आहे? दोन्ही वकिलांपैकी कोणाला?”न्यायमूर्तीनी विचारले.
“ नाही”
“ पुढचा साक्षीदार कोण आहे? ”न्यायमूर्तीनी विचारले.
“ डॉक्टर निनाद नानिवडेकर”
( प्रकरण १४ समाप्त)