Tu Bhet na re Roj Roj Navyane - 2 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 2

The Author
Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 2

आज महिना होत आला होता गौरीला जॉईन होऊन, पण ती जास्त कोणाशी बोलत नव्हती...

जिया ही तिथेच कामाला होती...गौरीच्या शेजारच्या टेबलवर ती असायची, ती मात्र जाम बडबडी होती...
आणि गौरीला मिसळून घेऊ पाहत होती.....गौरी मात्र सगळ्यांपासून लांब राहू पाहत होती.

गौरी दुपारचा टिफिन आणत नसे, सगळे जेवायला गेले तरी ही तिथेच बसून असायची....काम मात्र परफेक्ट असायचं तीच. पंधरा दिवसांतच तिने सगळं काम समजावून घेतले होते.

सर अन मॅनेजर दोघे ही तिच्या कामावर खुश होते, पण तिची वागणूक पाहून सगळ्यांना अस वाटायचं की तिला खूप घमंड आहे.

ती जास्त मिक्स होत नाही हे पाहून विकी विचारात पडला .

"नेमका हिला प्रॉब्लेम काय आहे?, ना ही कोणातं मिक्स होते,ना कोणाला जवळ येऊ देते..."

एक दिवस सगळे जेवायला गेले होते, आणि नेहमी प्रमाणे ती एकटीच आपल्या टेबलवर बसलेली संकेतला दिसली.

तो त्याचा डबा घेण्यासाठी आला होता. मधे एक काचेचा दरवाजा होता. तो दरवाज्यातून आत येत होता तेव्हा त्याला दिसलं की गौरी कोणाशी तरी बोलत आहे.
पण ना तिने मोबाईल कानाला लावला होता, ना हेडफोन...

मग ती कोणाशी बोलत आहे? असा प्रश्न त्याला पडला. तो आत आला व आपल्या टेबलकडे गेला. तशी गौरी शांत झाली. पण संकेत मात्र अजून ही तिलाच पाहत होता.ती मात्र त्याच्याकडे न पाहता कॉम्प्युटर वर काम करत होती.

" गौरी, जेवायला येत आहेस ना..." त्याने गौरी जवळ जाऊन विचारले, पण त्याची नजर तिच्या मोबाईल आणि तिच्या कानाकडे होती.

"नाही, तुम्ही जा..." ती त्याच्याकडे पाहून बोलली.

"ओके..."म्हणून तो ही तिथून निघून बाहेर आला.

तो बाहेर येऊन पुन्हा तिच्याकडे पाहू लागला.ती पुन्हा कोणाशी तरी बोलत होती, आणि आता हसत ही होती.
हे पाहून तो घाबरला आणि थोडं पळतच कॅन्टीन कडे गेला.

कॅन्टीन मध्ये त्याला अस पळत आलेलं पाहून त्याचे मित्र त्याला विचारू लागले.

"काय झालं रे ?,तू असा का पळत आलास..."

"ते...गौरी कोणाशी तरी बोलत होती.."

"हा मग, ती कोणाशी तरी बोलली तर तुला काय प्रोब्लेम आहे... तीच कामच आहे ते"

"अरे ती फोनवर नव्हती बोलत..."

"हा मग..."

"अरे आता तुम्हाला कस सांगू?..."

"तोंडानेच सांग ना..." अस म्हणून सगळे हसू लागले.

थोडावेळ गप्प बसून पुन्हा तो बोलू लागला.

"म्हणजे मी जेव्हा डबा घ्यायला गेलो तेंव्हा मी तिला बोलताना पाहिलं पण, तिच्या हातात ना तर मोबाईल होता ना कानात हेडफोन्स, म्हणून मी आत जाऊन बघितलं तर ती शांत झाली.."

"अरे येड्या, तीच झालं असेल बोलून म्हणून ठेवली असेल कॉल..."

सगळे त्याला वेड्यात काढत होते....म्हणून तो गप्प बसला खरा , पण त्याच्या डोक्यातून ती गोष्ट काही केल्या गेली नाही. या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा आणि मगच यांना सांगायचं अस मनातच ठरवून तो शांत बसला.

सगळे जेवून पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागले. संकेतच मात्र कामात लक्ष नव्हतं, तो राहून राहून गौरी कडेच पाहत होता.

संध्याकाळी कामावरून घरी जायला उशीरच झाला होता.
गौरी गेटच्या बाहेर आली अन इकडे तिकडे पाहू लागली. पण जवळपास तिला ऑटो काही दिसली नाही. आता तीच्याकडे स्टॉप प्रयत्न चालत जाण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नव्हता.

विकीही त्याच मार्गाने जात होता तेव्हा त्याला गौरी दिसली. ती चालत निघालीच होती. तस विकी गाडी तिच्याजवळ नेत बोलला.

"गौरी, तुला ड्रॉप करू का, अंधारही पडला आहे सो...."

"नो सर , थँक् यु, बट आय विल मॅनेज..."

"हो माहीत आहे तू मॅनेज करशील पण ऍट लिस्ट स्टॉप प्रयत्न सोडू शकतो की मी, म्हणजे तुला जास्त उशीर होणार नाही..."

ती नाहीच म्हणत होती. म्हणून विकी निघून जात होताच की अचानक आकाशातून विजांचा कडकडण्याचा आवाज झाला. त्या आवाजाने गौरी घाबरली. विकी अजून ही जवळच होता.

"सर..."
तिच्या आवाजाने त्याने तिच्याकडे पाहिले.

"स्टॉप प्रयत्न ड्रॉप करा, तिथून मी जाईन.."

"ओके...बस.."

"कुठे सोडू तुला, आय मिन तुझं घर कुठे आहे ?"

"रिक्षा स्टॉप जवळ सोडा , तिथून जवळच आहे..."

"अच्छा..."

विकीला अजून तिच्याबद्दल जाणून घ्यायचं होत पण तिच उत्तर ऐकून शांत बसणच ठीक राहील अस त्याला वाटलं.

विकीने तिला रिक्षा स्टॉपला सोडलं आणि निघून गेला.
गौरी तिथून पुढे चालत गेली व रेल्वेस्टेशन कडे निघाली.
रेल्वेस्टेशन ला जाऊन ती रेल्वेची वाट पाहू लागली.

विकी ही रेल्वेस्टेशन वर आला होता. त्याच्या मामाचा मुलगा नील येणार होता आज , त्यालाच घेण्यासाठी तो रेल्वेस्टेशन वर आला होता. नील ची रेल्वे येण्यासाठी अजून अर्धातास लागणार आहे हे समजल्यावर विकी तिथेच एका बेंचवर बसला.

त्याने घरी आईला कॉल करून वेळ होईल असे सांगितले व कॉल कट करून त्याने सहज समोर पाहिले तर त्याला गौरी दिसली.

तो तिला बोलावणार होता पण ती दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर उभी होती.आणि तिच्याकडे जायचं म्हणलं तरी ब्रिज क्रॉस करून जावं लागणार होतं. तो तिच्याकडे जायला उठलाच होता की मध्ये दुसरी रेल्वे आली. तिची रेल्वे आली आणि ती आत गेली. रेल्वे थोडयावेळातच सुटली.

विकी मात्र विचारात पडला,"ही तर गौरी होती ना..., मी तर तिला रिक्षास्टॉप ला सोडलं होत...,मग ती रेल्वेस्टेशनवर काय करत होती .ती ही कोणाला घेण्यासाठी आली असेल का ?? , हो तसच असेल कारण मध्ये रेल्वे आली तशी ती तिथे नव्हती...म्हणजे ती नक्कीच कोणाला तरी रिसिव्ह करण्यासाठी आली असेल..."

रेल्वेच्या हॉर्न मुळे तो भानावर आला. नील ची रेल्वे आली होती.