Objection Over Ruled - 7 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 7

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 7


प्रकरण सात
पाणिनीपटवर्धन आपल्या ऑफिस ला आला आणि आपल्या जवळच्या किल्लीने दाराचे लॅच उघडले.आत पाहतो तर सौम्या टेबला वर डोके ठेऊन, हात उशाशी घेऊन चक्क झोपलेली दिसली.
“ काय ग अजून घरी नाही गेलीस? ” पाणिनी ने विचारले.
“ तुम्ही काया बरोबर गेलात तिथे काय झालं त्याची उत्सुकता होती त्यामुळे थांबले इथेच ” सौम्याम्हणाली.
“ जेवण तरी झालाय का तुझं?”
“ नाही , मी बाहेरून सॅण्डविच मागवले फक्त.”
“ तू आता तातडीने घरी जा.इथून पुढे मी तुला कायम माझ्याच बरोबर नेत जाईन म्हणजे तुझ्या खाण्या पिण्याची अळंटळं होणार नाही”पाणिनी म्हणाला
नंतर पाणिनी ने तिला सर्व हकीगत कथन केली.नंतर पाणिनी तिला घेऊन एका छान रेस्टॉरंटला गेला. त्यांना ओळखणारे वेटर्स लगेच तिथे धावत आले.त्या दोघांनी त्यांच्या ऑर्डर्स दिल्या.सौम्या ने तिच्या पर्स मधून कनक ओजस ने दिलेले रिपोर्ट आणि फोटो बाहेर काढून पाणिनी कडे दिले.अत्यंत सविस्तर असा एक टाइप केलेला अहवाल आणि त्याला जोडलेला एक सारांश असे त्याचे स्वरूप होते.खाता खाता पाणिनी ने त्यावर नजर टाकली.सारांश लिहिलेले पान सर्वात वर होते.ते पाणिनी ने प्रथम वाचायला घेतले.
सारांश:
पाणिनी, सविस्तर जोडलेल्या अहवालाचा आणि त्या सोबतच्या फोटोंचा हा सारांश आहे.
रेयांश प्रजापति हा सावकारी करतो.पण फार धोका पत्करणारा सावकार नाही.पद्मनाभ पुंड आणि सम्यक गर्ग या दोघांनी त्याला कुक्कुट पालनाच्या धंद्याला जागा खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम उभारण्यासाठी भरीला पडले.तुझा एक अंदाज बरोबर ठरला की ती जमीन भविष्यात धरणाखाली जाणार आहे त्यामुळे तिला किंमत आहे.सम्यक गर्ग ला माझ्या माणसांनी नजरेखाली ठेवलाय.
खून हा बोटीवरच झालाय.शुक्रवारी संध्याकाळी.ही बोट साधारण पस्तीस फूट लांबी असलेली आहे.त्याचा वापर रेयांश प्रवासासाठी करत नाही तर सायंकाळचे काही तास निवांत घालवण्यासाठी करतो.तो दर शुक्रवारी बोटीवर राहतो. वाचन करतो , मासे मारी करतो.भारद्वाज नावाचा रेयांश चा एक खास माणूस आहे. त्याचा उजवा हात . तो बोटीवर येतो काही तातडीचा निरोप असला तर.
एक दोन वेळा पुंड त्या बोटीवर गेला होता आधीच परवानगी घेऊन , त्याने एकदा त्याच्या बरोबर सम्यक गर्ग ला पण नेला होता.त्या बोटीवर विजेची सोय नाही.मेणबत्त्यांच्या प्रकाशाची सोय आहे.जेवण सुद्धा लाकडाच्या चुलीवर केले जाते.बोट चालवायला एखादी जादा मोटार सुद्धा नाही.प्रेत हे बोटीच्या उजव्या बाजुला घरंगळत गेल्या चे दिसते.पण पुरावा असं दर्शवतो की खून विरुद्ध बाजूला म्हणजे डाव्या बाजूला झाला असावा आणि ओहोटीच्या वेळी ते घरंगळत उजवीकडे आले असावे.डोक्याच्या मागच्या बाजूला एकच जोरदार तडाखा बसल्यामुळे मृत्यू आला असल्याचे दिसते.पोलिसांच्या निष्कर्ष बद्दल मला अजून माहिती मिळाली नाही पण एक मोठा मुद्दा म्हणजे, एका डेक वरून दुसऱ्या डेक वर जाण्यासाठी असलेल्या वाटेवर एका स्त्री च्या बुटाचा रक्तरंजित ठसा पोलिसांना दिसला आहे.
माझा सविस्तर अहवाल सोबत जोडला आहे.तुला काही हवं असेल तर मला फोन कर.
तुझा,
कनक

पाणिनीने कनक ला फोन लावला. “ हातात पेन्सिल आहे का ? ” पाणिनी ने विचारले.
“ नाव लिहून घे , प्रबोध. घेतलंस ? आता आणखी एक नाव घे लिहून. सर्फ अॅण्ड सन मोटेल. या प्रबोध नावाच्या माणसाने या मोटेल मधली रूम १४ बुक केली होती.मला या माणसाची पूर्ण माहिती हवी आहे.”
“ ठीक आहे पाणिनी.मी लागतो कामाला.” ओजस म्हणाला.
“ प्रेत सापडलं कुणाला पहिल्यांदा?”पाणिनी ने विचारले.
“प्रणव पालेकर नावाचा एक माणूस आहे त्याला दिसलं.तो पुंड ला भेटण्यासाठी बोटीवर गेला होता. ” ओजसम्हणाला
“ ठीक आहे सम्यक गर्ग कोर्नीस होटेल मधे आहे म्हणालास ना तू? पोलिसांनी त्याला भेटण्यापूर्वी मी त्याला भेटू इच्छितो.खर तर पोलिसांच्या कसे लक्षात नाही आलं त्याला भेटायचं हे मला आश्चर्य वाटतंय.”
“ कुक्कुट पालन आणि त्यासाठी धरण क्षेत्रातील जमीन या बद्दल पोलिसांना अजून काहीच माहीत नाही त्यामुळे त्यांना गर्ग ला भेटायचे सुचले नसावे. ”ओजस म्हणाला.
“ काही असेल तर तुला फोन करतो ” पाणिनी म्हणाला
“ काया प्रजापति चे काय ? ” सौम्याने विचारले.
“ तिने मला खर्चापोटी आगाऊ रक्कम म्हणून नोटांची थप्पी दिली आहे.” सौम्याला नोटा दाखवत पाणिनी म्हणाला
“ तिला वाटलं की खूप खर्च येईल या सर्वाला.” सौम्याम्हणाली.
“ मला सांग सौम्या, ही पाचशेच्या नोटांची थप्पी अगदी नवीन आणि बँकेतून काढून आणल्यावर असते तशी आहे.त्यावर बँकेचे सील व शिक्का पण आहे , सौम्या,आज शनवार आहे, बँका आज अर्धा दिवस असतात म्हणजे ही रक्कम दुपार पूर्वीच काढली गेली असावी.” पाणिनी म्हणाला
“ म्हणजे तुम्हाला अस म्हणायचं आहे का , की खून झाल्याचे तिला माहीत होत आणि त्यामुळेच आधीच तिने पैसे काढून आणले होते?”सौम्याने शंका व्यक्त केली.
“ मी हे तिला विचारलं नाही जाणून बुजून.”पाणिनी म्हणाला “ सौम्या, तुझ्या बाबतीत अगदी अशीच घटना घडली असती आणि खुनाच्या वेळी तिथे नसल्याचे तुला सिद्ध करायला लागले असते तर ज्या पद्धतीने काया आणि रेयांश प्रजापति ने सिद्ध करायचा प्रयत्न केला त्या पेक्षा अधिक चांगला पर्याय तुला च काय पण कोणालाच सुचला नसता. राजकीय पुढाऱ्या बरोबर होतो,पण मीटिंग एवढी गुप्त होती की तिथे जमलेले कोणीही मान्य करणार नाहीत की ते मीटिंग ला होते.कारण ती बातमी बाहेर फुटली तर मोठा राजकीय भूकंप होईल. या मीटिंग चा पुरावा म्हणून काय तर त्या चौदा नंबरच्या खोलीत पडलेली सिगारेट ची थोटकं, दारूचे रिकामे ग्लास आणि बाथरूम मधला रेयांश प्रजापति चा रेझर ! पोलिसांनी रेयांश ला हाय वे वरच्या रेस्टॉरंट मधे गाठणे, रूम ची चावी तुमच्या कडे आहे का हे काया ने रेयांशला विचारणे, माहीत नसल्यासारखे भासवून रेयांशने अजाणते पणाने आपल्या खिशात हात घालून किल्ली आहे का याची चाचपणी करणे,आणि ती सापडल्यावर आश्चर्य व्यक्त करणे, रेझर विसरल्या बद्दल ही खेद व्यक्त करणे ! वा !! वा!! या पेक्षा आपली अनुपस्थिती म्हणजे अॅलीबी सिद्ध करायला दुसरा चांगला पर्याय काय असू शकतो ?”पाणिनी म्हणाला
“ एकंदरीत तुम्हाला हे सर्व खोटे आहे असे वाटतंय तर ” सौम्याम्हणाली. “ पण यातील खोटेपणा पोलीस नाही का सिद्ध करू शकणार?”
“ पोलीस करू शकतील का या पेक्षा पोलीस करतील का हा प्रश्न योग्य आहे.” पाणिनीम्हणाला.
“ ती काया आणि रेयांश प्रजापति दोघेही विलक्षणच आहेत.” सौम्या म्हणाली.
“ सर, मी तुमच्या बरोबर कोर्निस होटेल मधे येत्ये,गर्गला भेटायला. ” सौम्या म्हणाली , पाणिनी काही बोलायच्या आतच तिने पर्स मधून दोन गोष्टी बाहेर काढल्या, आपली नोटस् घ्यायची वही आणि लिपस्टिक.
“ चला. ती म्हणाली.”

( प्रकरण सात समाप्त)