Kouff ki Raat - 7 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग ७

The Author
Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

खौफ की रात - भाग ७

भाग 7 (


मित्रांनो ! पौराणीक रितिरिवाजांनुसार अस म्हंटल जात ,की मेलेल्या मांणसाच प्रेत जो पर्यंत आगीत भस्म होत नाही ...

जो पर्यंत चिता जळत नाही,

तो पर्यंत त्या प्रेतास त्या मेलेल्या मांणसास काही वाईट-साईट बोलू नये, अन्यथा अमानवी कालचक्र फिरत,नियमानुसार ते प्रेत ते शब्द ऐकत, आणि त्याचा तो मुक्ती साठी तेरा दिवस भटकणारा अतृप्त दुखी भावनाहिंत असलेला आत्मा सुडभावना उत्पन्न करतो... व त्याचे परिणाम व्याग्र -कोप , भयंकर परिणामकारक ठरू शकतात.

ते प्रेत जिवंत होत. ....वाईट बोलणा-याला भयानक शिक्षा देत!

हे कितपत खर आहे , आणि कीतपत नाही हे अनुभव असणा-यासच ठावुक

निळचंद्र (निळ्या) आणी सोपान दोघेही सावकाराच्या मृत आईबद्दल असंच काहीतरी अपशब्द, बोलत होते ना ? मग त्या दोघांसोबत काही भयानक प्रकार तर घडणार नव्हता ना ? काही अनाहूत तर होणार नव्हत ना ? या पाहूयात या कथेत ...!



रामपुर गावातल्या सावकाराच्या जुनाट दुमजली वाड्याबाहेर ....

एक काळी मांजर फे-या घालत होती.

गोळ चेह-याची , दोन पिवळ्याजर्द डोळ्यांची,व त्यात दोन काले टीपके असलेली, डुलत-डुलत ती काली मांजर फे-या घालत होती...

फे-या घालतावेळेस ती मांजर आपले दोन्ही कान एंटीना सारखी डावी तर कधी उजवीकडे फिरवत होती.

काहीतरी संकेत तिला मिळत होत का? कसली चाहूल लागली होती का? तिला आपल्या नजरेतून कसल्यातरी अघटीत घटनेची चाहूल लागत होती का? अस म्हंटल जात की प्राण्यांच्यात वेग-वेगळ्या शक्ति असतात,ते खरं आहे का?

देवानेच त्यांना ती शक्ति दिलेली आहे अस म्हंटल जात.

ती शक्ति कोणती ? ते एक सत्य प्रकरण पाहुयात !

जसे की पुढे काही वाईट घडणार असेल तर त्या मुक्या जनावरांना मानवा आधीच कळत.

आमच्या गावी एक म्हातारी राहत होती.
वय झाल्याने म्हातारी आजारी होती...शरीर खंगळ होत..

हाड मांसाला चिकटलेल देह अंथरूणाला बिलगून होत.

म्हातारी कधी मरेल सांगता येत नव्हत.

म्हातारीने बैल गाय अशी खुप सारी प्राणी पाळले होते...त्यांच्यावर खुप जिव लावला होता..

मांणसापेक्षा मुके जनावर आपल्या मालकावर खुप प्रेम करतात अस म्हंटल जात ! आणी ते अगदी खर आहे.

ते कस ते पहा बर !

गोठ्यात बांधलेला सोन्या नावाच्या बैलाला म्हातारीने लहानपणापासूनच खुप जिव लावला होता..

तोच बैल अचानक रात्री मोठमोठ्याने ओरडू लागला.

घरातल्यांनी गोठ्यात जाऊन पाहिल..तर सोन्याच्या डोळ्यांतून अश्रु येत होते...

तो आपली मान नकारार्थी हळवत होता.

मग.. . शेवटी ..अर्ध्यातासाने...त्याने खाली मान टाकली...
पन अद्याप त्याच्या डोळयांतून अद्याप अश्रु निघतच होते..

मग सर्वजन घरात निघून गेले.

आणी
दुस-याच दिवशी सकाळी म्हातारी वारली...

मग सर्वाँना समजल की सोन्या का ओरडत होता ! वाकडीतिकडी मान का हळवत होता !

ह्यात किती तथ्य आहे , मला ठावूक नाही !
ह्या घटनेचा साक्षीदार मी सुद्धा आहे ...पन कोणी विश्वास ठेवाव आनी कोणि नाही , हा ज्याचा त्याचा प्रश्न!

असो कथेकडे वळूयात..


सामान्य मानवी शरीर ....

त्यातले अवयव , हाड, स्नायू , आतल्या नसा, .आणि हाळचाल करण्याची पद्धत

.ह्या सर्व क्रिया प्राण्यांमध्ये दहापटीने जास्त कार्यरत असतात.

जस की सामान्य मानवी डोळे फक्त प्रकाशात पाहू शकतात .

अंधारात सुद्धा पाहण्यासाठी मानवाला प्रकाशाची गरज लागते ...

परंतू सरपटणारी जनावर, हवेत ऊडणारे पक्षी, जमिनिवर चालणारे चार पायांचे प्राणी हे त्यांच्या डोळ्यांनी अमानवी, अघोर, हिंस्त्र,क्प्टी, पाश्वी, वाईट शक्तितीची अनुभूती घेऊ शकतात ...त्यांना पाहू शकतात .. !

जे मानवी डोळे अनुभवू शकत नाहीत...

त्या प्राण्यांच्या डोळ्यांना दिसणारे ते अमानवीय धागे ...

ती एनर्जी...

अगदी तसंच काहीतरी सावकाराच्या वाड्यात तर नव्हत ना?

की त्याची चाहूल त्या पाळीव प्राण्यास लागली होती?

कुत्र्या, मांजराना ह्या अमानवी शक्तिची चाहूल लागताच ते आपल्या मानवांना तिकडे न जाण्यासाठी सुचित करतात , त्या दिशेला पाहुन ते भुंकतात, गुर-गूरतात, कारण त्यांच्या नजरेस ते पाश्वी, हिडिस रुप दिसत असतं.

जे आपण पाहू शकत नाही, कधीच नाही. गावात शहरात रात्री-अपरात्री रस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या शंभर प्रतिशन मधल्या चालीस टक्के कुत्र्यांना अचूक वेध घेता, पेरानॉर्मल्सला अस काही दिसुन आल....आहे की त्यांना मानवाच्या बुद्धीपलिकडे घेऊन जाणार अकल्पित द्रुश्य दिसत असतं .

त्या चाळीस टक्के कुत्र्यांची सवारी, ही कुठे असते माहीतिये का?

शुश्श...मित्रांनो शांतता राखा सांगतो मी!

त्या चाळीस टक्के कुत्र्यांची जागा शहरातले जुनाट स्मशान, तोडक्या मडक्या... भग्न पावलेल्या ईमारती,

कोणती तरी सुनसान अंधारी गल्ली,

तर कुठल तरी मोठ कबरांच कब्रस्तान ह्या असतात.

ह्या जागेतुन रात्र होताच कालोखाचे असंख्य अमानवी दुनियेचे लाल रंगाचे दरवाजे उघडले जातात ,

आणि त्या उघडणा-या दरवाज्यांतुन लाखो-करोडोने अतृप्त आत्म्यांचा शिरकाव पृथ्वीवर व्हायला सुरुवात होते.

थय,थय नाचत सैतान बाहेर पडतो,जो मानव दिसेल त्याच्या मागे जायच, त्याच्या शरीरात घुसायच.

दबा धरुन बसायचं.

मित्रांनो 1990 पासून अशा घटना सुरु झाल्या, आणि ह्या सर्व घटना 2000 पर्यंत सुरु राहील्या.

त्या नंतर ह्या सर्व घटनांचा जोर ओसरायला सुरुवात झाली.

जणु त्यांना अमानवी,हिडिस, हिंस्त्र शक्तिना कोणितरी आवर घालत होत,

आजही घालत आहे.

आणी त्या शक्ति कोणि सूपर हिरो नाही! तर त्या शक्ति आहेत!

ही भुतळावरील अखंड प्राणीप्रजात...जी रात्रभर त्या स्मशान, कब्रस्तान, अंधा-या गल्ली,पडक्या इमारतींन भोवती ग्रुप-ग्रुपने त्या लाल दरवाज्या समोर उभ राहून त्या अमानवी शक्तिंना भुतळावर येण्यापासुन रोखतात.

आपण मानवास एक प्रश्न नक्की पडला असेल ?

की भल त्या अमानवी शक्तिंना थांबवण्याकरीता त्या पाळीव प्राण्यांकडे कसली जादूई शक्ति असेल?

तर त्याच उत्तर आहे.

त्यांच ते जोर-जोरात भुंकण,

..गुर-गुरण... हेच ते शस्त्र आहे.

ज्या शस्त्रास ते अमानवी पांढ-या फट्ट चेह-याचे,पांढ-या कातडीचे अतृप्त आत्मे घाबरतात, त्या दरवाज्यात पुर्ण रात्रभर घुटमळत राहतात.

आणि मग एकदा का दिवस उजाडला की तो लाल दरवाजा अतृप्त आत्म्यांचा मार्ग बंद होतो.

मग असंच हे चक्र फिरत राहत, हीच क्रिया पुन्हा-पुन्हा रोज-रोज घडत असते.

क्रमश
कंमेंट, रेटिंग, स्टिकर प्रोत्साहन..वाचक मित्रांनो..नक्की द्या.!😊🙏🏼