That night... in Marathi Horror Stories by Chinmayi Deshpande books and stories PDF | त्या रात्री...

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

त्या रात्री...

(मी प्रथमच कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे समीक्षा मार्फत नक्कीच सांगा)

ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे आणि ह्याचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही. अस काही आढळल्यास तो निव्वळ योगा योग समजावा. ह्या कथेतून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. निव्वळ मनोरंजन हा हेतू आहे.

**********************************

आज फारच उशीर झाला होता ऑफिस मधून निघायला. आता लग्न ठरलयं सुट्टी साठी अर्ज दिला आहे मग काम तर ओव्हरटाईम ने पूर्ण करून घेणारच! आईला फोन करून कळवलं सुद्धा मी तसं. जरा जास्तच स्ट्रिक्ट आहे ती, काळजी पण खूप वाटते तिला माझी. काम आटोपून घाईतच निघाले. रिक्षा ची वाट बघत थांबले. रस्त्यावर फार कोणी दिसत नव्हत. ऑफिस मधले सगळे सुद्धा आता निघून गेले होते. आणि कोणासोबत घरी जाणं मला योग्य वाटत नव्हत. म्हणून थोड पुढे चालत जाऊन रिक्षा कीव बस ची वाट बघावी असा विचार करून मी चालू लागले. जास्त कोणीच न्हवतं आज रस्त्यावर पण माझ्या सोबतीला अवकाळी पाऊस मात्र होता. कडकडणाऱ्या वीजा आणि थंडगार वारा माझ्या अंगावर शहारे आणत होता. वेगळाच भासत होता मला आज हा पाऊस. कदाचित लग्न ठरल्यावर प्रत्येक मुलीला आयुष्य वेगळं भासतं तसचं काहीसं झालं असावं माझं. लग्नाचा विचार करत भर पावसात छत्रीखाली मी गालातच हसत होती आणि तेवढ्यात मला रिक्षाचा आवाज आला. मी मागे वळून बघितलं तर एक रिक्षा माझ्या जवळ आली. मी लगेच रिक्षात जाऊन बसले. मोबाईलवर मेसेज केला माझ्या होणाऱ्या आहोंना 'रिक्षात बसले वीस पंचवीस मिनिटात पोहोचेन. तुम्ही काय करताय? जेवण झाल का?' रिप्लाय ची वाट बघत होते. त्यांनी फोन केला आणि फोन वर बोलत वेळ पुढे जात होता. घर अजून बऱ्याच अंतरावर होतं. थोडं पुढे गेल्यावर रिक्षा अचानक थांबली. रिक्षा चालवणारे काका उतरले खाली आणि मला सांगितलं की टायर पंक्चर झाला आहे थोडा वेळ लागेल. मी थोड्यावेळ थांबले पण त्यांना फारच वेळ लागत होता. तेवढ्या वेळात तर मी घरी पोहोचेन असा विचार करून काकांना रिक्षा चे भाडे देऊन मी चालतच पुढे निघाले. झपाझप पावले टाकत मी चालता चालता अचानक थांबले. माझ्या समोर दोन रस्ते होते. एक लॉंगकट आणि दुसरा शॉर्टकट. अर्थातच मला शॉर्टकटने जाणच योग्य वाटत होतं. पण, रात्रीचे ९ वाजून गेले होते आणि ८ नंतर त्या वाटेवरून कोणीही येत नाही हे मला माहित होते. आणि आईने तर त्या रस्त्याकडे बघायचे सुद्धा नाही अशी सक्त ताकीद दिली होती. काहीतरी अफवा पसरवल्या होत्या, त्यावर माझ्या आईचा फार विश्वास. कायतर म्हणे त्या वाटेवरून रात्री निघालेले लोक घरी कधी परतलेच नाही. म्हणजे खरचं? छे! काहीही... माझा नाही विश्वास. विचार करता करता माझी पावलं कधी त्या वाटेकडे वळली मला देखील कळलं नाही. आमावस्येची रात्र आणि त्यात ढग दाटून आले होते. कडकडणाऱ्या विजा मला समोरचा मार्ग दाखवत होत्या. निर्जन रस्ता, त्याच्या एका बाजूला दाट झाडी तर दुसऱ्या बाजूला हिरवं गार जंगल, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज कानी पडत होता. मी चालत पुढे पुढे जात होते. पाऊस जरा जास्तच वाढला आणि वेगाने वारा सुरू झाला. ऐका हातात छत्री, दुसऱ्या हाताने ड्रेस ची ओढणी सावरत आणि खांद्यावर बॅग घेऊन चालणं कठीण वाटत होतं. मी रस्त्याच्या कडेला झाडाखाली थांबले. पावसाचा वेग कमी झाल्यावर निघायचा विचार केला. आईला कळवण्यासाठी फोन करणार तर नेटवर्क चा पत्ताच न्हवता. आता नेटवर्क पण गेल्याने माझी थोडी चीड चीड होऊ लागली. पण आता दुसरा काही पर्याय सुद्धा नाही असा विचार करून मी तिथेच उभी राहिले. माझं लक्ष समोर गेलं, एक गोंडस मुलगी उभी होती. साधारण दहा - बारा वर्षांची असेल. पावसा पासून बचाव होण्या साठीच उभी असावी असा विचार करून मी तिच्या जवळ गेले. तिचा लाल रंगाचा फ्रॉक पूर्ण भिजला होता. तिने माझ्याकडे बघितले सुद्धा नाही. ही इथे एकटी काय करतेय हा प्रश्न मला पडला आणि मी तो तिला विचारला सुद्धा. 'मी इथेच राहते' असं म्हणाली ती. 'तू इकडे एकटी कशी? ह्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलसं' मी हे वाक्य बोलताच तिने माझ्याकडे बघितलं आणि स्मितहास्य केलं. कदाचित ही इथे जवळच राहत असेल असा विचार करून मी गप्प बसले. 'दीदी मी हरवली आहे मला घरी सोडशील का?' असं तिने विचारलं. पाऊसाचा जोर थोडा कमी झाला. मी तिला तिच्या घरी सोडण्याचा विचार केला. त्या मुलीला असं एकट सोडून जाणं मला योग्य न्हवत वाटत. 'तुझं घर कुठे आहे म्हणजे कोणत्या दिशेला आहे हे तरी माहीत आहे का तुला?' असं विचारल्यावर तिने जंगला च्या दिशेने बोटं दाखवले. मी मोबाईल मध्ये वेळ बघितली नऊ वीस झाले होते. लहान मुलीला रस्त्यात एकटं सोडणे मला बरोबर वाटलं नाही. मी तिला घरी सोडण्या साठी निघाले. ती पुढे व मी तिच्या मागे चालतं होती. त्या शांत जंगलातील वाटेवर फक्त आमच्या पावलांचा आवाज येत होता. आता जवळ जवळ आम्ही जंगलाच्या आत मध्या भगी आलो होतो. मी तिच्या मागे चालत होती. थोडं पुढे गेल्यावर ती अचानक थांबली. तिला स्तब्ध उभं पाहून मी सुद्धा थांबले. मी तिच्याकडे एकटक बघत एक-एक पाऊल पुढे टाकत होते. मला हवेत आता थोडा गारवा जाणवू लागला. वाऱ्याची थंड झुळूक माझ्या अंगाला स्पर्शून जात होती. मी तिच्या पाठीवर हात ठेवणार इतक्यात तिने तिची मान वळवली. मी घाबरून दोन पाउल मागे झाले. तिचा गोंडस चेहरा आता पूर्ण कुरूप झाला होता, तीचे टपोरे डोळे आता रक्तासारखे लालबुंद झाले होते. ती जोरजोरात हसत माझ्याकडे बघत होती. मी पूर्ण घाबरली होती. माझे हाथ पाय गार पडले होते. भरपावसात मला घाम फुटला होता. ती अशीच हसत हसत अचानक जंगलात पळून गेली. मी सुन्न झाली होती. मला काहीच कळत न्हवतं नक्की आता काय झालं. क्षणाचाही विलंब न करता मी तिथून मागे फिरले व रस्त्याच्या दिशेने निघाले. मी झपाझप पावले टाकत जात होते आणि अचानक ती माझ्या समोर आली. ती माझ्या जवळ जवळ येत होती. मी पुन्हा मागे वळले आणि दुसरीकडे पळू लागले. मी जिथे पळत जात होते तिथे तिथे ती पुन्हा माझ्या समोर येत होती. मी ओरडू लागले पण तिथून माझा आवाज कोनापर्यंत जाणे शक्यच नव्हते. ती पुन्हा माझ्या समोर आली आणि पुन्हा मला विचारलं 'दीदी मी हरवली आहे मला घरी सोडशील का?' मी खूप घाबरले, मला भोवळ आली आणि मी खाली कोसळले. थोड्यावेळाने मी उठले घाईतच पळू लागले आणि कशी बशी जंगलातून बाहेर आले. पाऊस पण आता थांबला होता. मी अगदी फुल्ल स्पीड ने घरचा रस्ता गाठला. घराजवळ येऊन थांबले. आता आई चिडली असणार तिला कसं मनवू हाच विचार करत घरात गेले. आई तिचं काम करत होती आणि सारखी घड्याळ बघत होती. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती माझ्याशी बोलतच न्हवती. अशीच एकदा मी लहानपणी माझी नवीन वॉटर बॉटल शाळेत विसरून आलेली तेव्हा माझ्यावर रागवलेली. आता सुद्धा चिडलेली तेव्हा पेक्षा खूप जास्तच चिडलेली बहुतेक. पण चिडणारच ना कारण आज मी माझी नवीन वॉटर बॉटल नाही, तर माझं शरीरच त्या जंगलात सोडून आली होती......


समाप्त:

©ChinmayiDeshpande