Sanyog aani Yogayog - 2 in Marathi Magazine by Gajendra Kudmate books and stories PDF | संयोग आणी योगायोग - 2

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

संयोग आणी योगायोग - 2

मी असाच आतुरतेने मला ज्या दिशेने जायचे होते त्या दिशेला बघत उभा होतो. नेमक्या त्याच वेळेस माझ्या विरुद्ध दिशेतून एक स्कुटी त्या बस स्टॉप जवळ काही अंतरावर अचानक येऊन थांबली. त्या स्कुटीला बघून माझा मनाला वाटलं कि या स्कुटी वरील व्यक्तीला लिफ्ट मागून बघू. तेच मी त्या स्कुटी वरील व्यक्तीचा चेहऱ्याकडे बघितले तर ती व्यक्ती हेल्मेट घालून होती त्यामुळे मला त्या व्यक्तीचा चेहरा काहीच दिसत नव्हता. तेव्हाच माझी नजर त्या व्यक्तीचा कापडाकडे गेली , तर ती व्यक्ती सलवार घालून होती. सलवार बघताच माझे मन जे काही काळापूर्वी आनंदित झाले होते ते एकाएक शांत आणि उदास झाले होते. कारण कि ती व्यक्ती एक स्त्री होती म्हणून मी त्या स्त्री कडे पाठ फिरवून तसाच उभा राहिलो आणि तिचा तेथून जाण्याची वाट बघू लागलो. माझे लक्ष जरी त्या स्त्रीचा विरुद्ध दिशेने होते, परंतु माझे चित्त मात्र पाठीमागील त्या स्त्रीकडे होते. मी वारंवार माझी घडी बघत होतो, ते मला उशीर होतोय म्हणून नव्हे तर ती स्कुटी वरील स्त्री लवकर का बर जात नाही म्हणून. एकतर माझ्या स्त्रीजातीबद्दल तिरस्कार आणि नेमका त्या पर स्त्रीचा सहवास हे मला अधिकच बेचैन करत होते. एक वेळेस तर मला असे वाटले कि सरळ जाऊन तिला म्हणावे कि, लवकर येथून जा. परंतु माझा स्वाभिमान मला तशी परवानगी देत नव्हता.
असेच करता करता १० मिनिटे निघून गेली आणि ती स्कुटी आणि ती स्त्री तेथून गेलीच नाही. परंतु खट खट असा आवाज मात्र माझा कानावर येत होता. इच्छा नसतांना हि मला त्या दिशेने बघावे लागले. मी वळून बघीतले तर ती व्यक्ती खरच एक तरूण आणि सुंदर अशी स्त्री होती. तिने तिचा हेल्मेट काढला होता म्हणून मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मी बघितले तेव्हा तिचा सुंदर चेहरा मात्र घामाने चूर झालेला आणि संपूर्ण तिचा सलवार घामाने चिंब भिजला होता. कारण कि ती स्त्री तिचा स्कुटीला वारंवार किक मारत होती. तिची स्कुटी अन्यास पणे त्या बस स्टॉप चा काही अंतरावरच येऊन बंद झाली होती. तिची नजर माझ्याकडे जाण्याचा अगोदरच मी पुन्हा तिचाकडे पुर्ववत पाठ फिरवून उभा राहिलो होतो. त्या स्त्रीने हि हताश होऊन माझ्याकडे न जाने कित्येकदा बघितले असेल. माझे लक्ष जरी माझ्या जाण्याचा दिशेने होते, मात्र माझे चित्त आणि कान त्या स्कुटीकडेच होते. तेवढ्यात माझ्या कानात तिचा गोड आवाज ऐकू आला. ती म्हणत होती, “तुलाही इथेच बंद व्हायचे होते काय? आधीच घरी जाण्यास फारच उशीर झालाय. घरी आई बाबा माझी वाट बघत आणि व्याकूळ होऊन माझी काळजी करत असतील .” रस्त्यावर त्या वेळेस आणखी कुणीच नव्हत म्हणून ती स्वतःशीच बोलत होती आणि ’ खट खट’ गाडीची किक मारत होती. तिचे ते बोलने ऐकून माझे मन हि व्याकूळ होऊ लागले होते, परंतु मी माझ्या मनाला ताब्यात ठेवले होते. तो खरच संयोग होता कि योगायोग माझे मन सगळ काही विसरून त्या स्त्रीची मदत करण्यास सरसावत होते. एकदा तर मनात आले कि, स्वतःहून तिचा बरोबर बोलावे आणि तिचा समस्येबद्दल तिला विचारावे, परंतु माझा स्त्रिया बद्दलचा तिरस्कार त्यावेळेस राहून राहून डोक वर काढत होता.
आता उत्कंठा मात्र तिची आणि माझी अधिकच अनावर झाली होती. एक वेळ अशी आली कि, मी स्वतः तीचाशी थेट बोलण्यास तिचा दिशेने जाण्यास वळलो तोच योगायोगाने ती सुद्धा माझ्याशी बोलण्यासाठी माझ्याकडे येण्यास आणि माझासोबत बोलण्यास निघणार होती. परंतु मला तिचाकडे वळताना बघून तिला वाटले कि मी तीचाबरोबर बोलणार आहे म्हणून ती गप्प झाली आणि तेथेच थांबली. तिने त्याच स्थितीत काही काळ वाट माझ्या बोलण्याची बघितली आणि शेवटी तिनेच मला येऊन म्हटले, “Excuse Me ! Please, कृपया मला थोडी मदत कराल काय ?” मी तिचा आवाज ऐकूनही न ऐकल्यासारखा तसाच उभा राहिलो काहीही प्रतिक्रिया न करता. मग तिने पुन्हा काही वेळेने मला पुन्हा म्हटले, “Please, माझी गोष्ट जरा ऐकता काय, मिस्टर ” तेव्हा नाईलाजाने मला तिचाकडे बघावे लागले. ती बोलली, “ Please, माझी थोडी मदत कराल काय? ” तिचे बोलने सविस्तर न ऐकताच मी उध्दटपणे मोठ्या आवाजात तिचा बोलण्याचा मध्येच बोललो, “मला गाडी रिपेअर करता येत नाही !” ती पुढे बोलली, “ माझी गोष्ट तर शांतपणे ऐकून घ्याल काय ? Please ! ”
मग मी पुन्हा बोललो, बोला ! ती म्हणाली, “ तुम्हाला गाडी रिपेअर करता येत नाही, याची मला काहीच हरकत नाही आहे. पण मला तुमचा फोन जरा द्याल काय ? ” मी पुन्हा उध्दटपणे उच्चारलो, “ कशाला हवाय माझा फोन, तुम्ही तुमचाच फोन घ्या आणि वाट्टेल ते करा ” ती आधीच त्या गाडीमुळे हताश आणि हैराण झाली होती. त्याच बरोबर ती तिचा गाडीची किक मारून मारून घामाचोड होऊन थकली होती. त्यामुळे तिचा स्वर हि फारच थकल्यागत येत होता. तरीही तिने तिचा राग आणि आक्रोश सांभाळून ठेवला होता आणि तशाच परिस्थितीत ती फारच विनम्रतेने माझ्या सोबत बोलत होती. तर ती पुन्हा मला बोलली, “ अहो, Please ! मला तुमचा फोन द्या ना, मला माझा घरी फोन करून आई बाबांना सांगायचे आहे कि काळजी करू नका, मी जरा उशिराने घरी येईल. माझी गाडी बंद झाल्याने आणि हे सगळ यासाठी कि, माझ्या फोनची बॅटरी संपली आहे आणि माझा फोन बंद झाला आहे. ” ते शब्द बोलता बोलता ती बिचारी धापा टाकु लागली होती. मग मात्र मी अनमनाने तिला फोन दिला, परंतु तिला लाउड स्पीकर वर बोलण्यास सांगितले, काय जाने कुणास फोन लावेल म्हणून. तिने तिचा घरचा नंबर डायल केला आणि फोन स्पीकरवर लावला. समोरून तिचा बाबांनी फोन उचलला आणि बोलले, “ हॅलो, कोण बोलतोय ? कोण पाहिजे तुम्हाला ?” यावर ती उत्तरली, “ हॅलो, बाबा ! मी सीमा बोलते, माझी गाडी... ” समोर तिने सगळ प्रकरण तिचा बाबांना सांगितले. तर तिचा बाबांनी समोर प्रश्न केला,“ तर मग बेटा, तुझ्याबरोबर कोण आहे आणि हा फोन कुणाचा आहे. तुझा फोन कुठे आहे, तू सुखरूप आहेस ना ?” तर तिने सविस्तर तिचा बाबांना सांगु लागली होती आणि संयोग आणि योगायोग आपला खेळ खेळू लागले होते.
शेष पुढील भागात ...........