Bhetli tu Punha - 18 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | भेटली तू पुन्हा... - भाग 18

The Author
Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

भेटली तू पुन्हा... - भाग 18












त्याचं वेळी रात्री मुंबई मध्ये....


" सोडा त्यांनला, पाहीजेल तर आमचा जीव घ्या त्यांनला सोडा" रामचंद्र म्हणजेच रुद्रच्या काकांचा विश्वासू नोकर होता तो बोलला.

" तुमचा जीव घेऊन काय करू हा....प्रॉपर्टी काय तुमच्या नावावर आहे का?" समोरून एक काळा बलदंड गुंड बोलला.

" मालक तुम्ही काय बी काळजी करू नकासा" रामचंद्र बोलले.

मालकांना म्हणजेच जीवनला खुर्चीत बांधून ठेवले होते. आता बऱ्यापैकी त्यांच्या तब्बेतीत सुधार झाला होता.


" अव बोला की त्यासनी काय तरी " सावित्रीबाई बोलल्या.


"ये! गप्प बसा रे आल्यापासून काय टीव टीव लावल्या, बॉस येतीलच थोड्या वेळात मग समजेल" गुंडाचा मुखीय बोलला.




********



" अनु ऐकून तर घे माझं" आदि अनुच्या मागे जाग बोलला.

अनु रागाने त्याला सोडून रस्त्यावर एकटीच पुढे पुढे जात होती.

इतक्यात एक व्हॅन अली व अनुला जबरदस्ती ओढून गाडीतून घेऊन गेली. आदि त्या गाडीच्या मागे धावला पण गाडी तर सुसाट सुटली होती.


गाडीचा नंबर घेऊन त्याने यश ला कॉल केला.

" हॅलो! यश एक नंबर पाठवला आहे तो कोणाचा आहे ते पाहून सांग लगेच" आदिचा बॉसी आवाज आला.

" ओके"

लगेच त्याने साहिलला ही कॉल केला.

" साहिल, पटकन सगळे रस्ते बंद कर, आणि मी एका गाडीचा नंबर पाठवला आहे ती गाडी आडव" आदि एकदम एखाद्या मोठ्या ऑफिसर सारखा सर्वांना ऑर्डर्स देत होता.

" हो! पण काय झाले काय? आणि अनु कुठे आहे?" साहिलने काळजीने त्याला विचारले.

" झ गाडीचा नंबर तुला पाठवला आहे त्या गाडीतून तिला किडण्याप करण्यात आले आहे" आदि हताश पणे बोलला.

" काय? आणि इतकं होऊ पर्यंत गु कुठे होतास?" साहिल थोडं रागात बोलला.

" अरे! ती माझ्यावर चिडून जात होती.. मी तिला खूप आवाज दिला पण तिच्या मागे मला येताना पाहून ती रडत पळत सुटली आणि..."

"बर टेन्शन नको घेऊ मिळेल ती शोधू आपण, तू स्वतःला सावर बाकी मी बघतो"

" हुंम"




*******


रामचंद्रना खूप मारल्याने ते डोळे बंद करून मान टाकून बसले होते. आपल्या नवऱ्याला अस पाहून सावित्रीबाई ही रडत होत्या. तर जीवनच्या ही डोळ्यातून पाणी येत होते.


इतक्यात खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि एक उंच व शरीराने मजबूत अशी व्यक्ती आत आली. तो होता रुद्र.

" हाय काका कसे आहात, माझ्या लोकांनी तुम्हाला जास्त त्रास तर दिला नाही ना?" रुद्र काकांच्या जवळ झुकुन बोलला.


" आता तुम्ही काय बोलणार म्हणा... मागच्यावेळी वाचला हेच खूप झालं" रुद्र हसता हसता रागाने बोलला.

" तुला मी सोडणार नाही" रामचंद्र बोलले.

"शु....शु.... अस ओरडून काहीच उपयोग नाही"

"पण तू कोण आहेस? जो काकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव ही धोक्यात घालायला तयार आहे"
रुद्र रामचंद्रचा चेहरा निहाळत बोलला.

"ये सोड, तुला कस समजलं ते सांग?" रामचंद्र कठोर आवाजात बोलले.

"कस म्हणजे तुमच्या अति मंद माणसांमुळे" रुद्र कुस्तित हसत बोलला.

"कोण?"

"शरद... तुमचाच माणूस होता ना? हुंम" रुद्र रंचदरची हनुवटी पकडून रागाने दात ओठ घात बोलला.

"न...नाही"

"नाही...हा... त्यांच्याच मोबाईल मध्ये तुझा नंबर मिळाला म्हणून तर तुला व तुझ्या मालकाला शोधू शकलो"

"म्हणजे..."

"हा म्हणजे.... म्हणजे... खूप करतो रे...शरद माझे प्लॅन्स तुला सांगायचा ना नेहमी मी त्याला रंगे हात पकडलं मग काय रडू लागला, गयावया करू लागला पण आपण कोणावर ही अन्याय करत नाही पोहचवलं त्याला ही ढगात" अस म्हणून तो मोठ्याने हसू लागला.

त्याच राक्षसी हास्य पाहून जीवन मनातून घाबरले.

"आता मला तू सांग या थेरड्याला कस वाचलं मी तर याला बिल्डिंग वरून ढकलून दिले होते"


"त्यांची चांगली कर्म होती म्हणून ते अजून जिवंत आहेत, वेळ आलेली पण काळ नव्हता ना आला" सावित्रीबाई ज्या इतका वेळ शांत होत्या त्या बोलल्या.


"ओहहह! माय अँगरी ओल्ड वुमन..."

"कस वाचलं ते सांग बाकी बकबक ऐकायला मला वेळ नाहीये"


"तू त्यांना मारण्याचा प्रयत्न केला पण नियतीच्या मनात वेगळंच होतं त्याना मृत समजून तू ज्या दरीत टाकले ना तिथून ते एका झाडात अडकले आणि तुझे हे कृत्य एका इसमाने ओहिले आणि पोलिसांना खबर दिली. त्याचा जबाब घेतल्यास समजलं की त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जखमी व्यक्तीची ओळख पटायला थोडा उशीरच झाला कारण चेहरा पूर्णपणे बिघडलं होता. पण जेव्हा समजलं तेव्हा झटकच लागला आम्हला की गोव्याचे सर्वात मोठे बिझनेसमॅने असे जखमी आहेत.मग त्यांचा खुन्याचा शोध सुरू झाला पण समजलं की त्यांचा पुतण्या म्हणजे तूच सगळं खडवून आणलं पण आमच्याकडे ठोस पुरावे नव्हते म्हणून माग हा प्लॅन केला."


"गुड प्लॅन, प्लॅन खूपच चांगला होता तुमचा पण तुम्ही एक चूक केली की शरद सारख्या मूर्ख माणसावर विश्वास टाकला, त्यामुळेच आज तुम्ही मला सापडला, त्याला तर मी कधीच संपवला" अस म्हणून तो मोठ्याने हसू लागला.


"काय.....????"




*********



" हा बोल आदि" साहिल बोलला.

" मिळाली का ती गाडी?"

" नाही अजून, मला वाटत की ते कच्या रस्त्याने गेले असतील"

" कच्चा रस्ता...?"

" हो जंगलातून एक कच्चा रस्ता आहे जो पुढे जाऊन हायवे ला मिळतो"

" मग हायवे वर नाका बंदी केली आहे का?"

" हो पण आता तिथे मी कॉल केला होता, त्याच्या आधी जर ती गाडी तिथून पास झाली असेल तर गाडी मिळणं मुश्कील आहे"



"एक मिनिट थांब गावडे सरांचा मॅसेज आहे काही तरी तू सांग तिथे नाकाबंदी करायला अन माझ्याकडे ये"

" हो आलोच"


थोड्यावेळातच साहिल आणि मोरे आदि जवळ आले. आदि त्यांच्या प्रायव्हेट रूममध्ये बसला होता. मोठ्या स्क्रीनवर आदि लोकेशन चेक करत होता.

"आदि कशाचे लोकेशन ट्रेस करत आहेस?"

"गावडे सरांचा मॅसेज आला आहे त्यांना ही पकडला आहे त्या रुद्र ने मला वाटतं त्यानेच अन्वीला पकडले असणार, म्हणून मग मॅसेज ज्या ठिकाणावरून आला आहे ते लोकेशन चेक करत आहे" आदि स्क्रीनकडे पाहतच बोलला.

" आदि सर हा एरिया मला माहित आहे आणि इथे एक फॅक्टरी आहे आहे जी खुओ वर्ष्यापासून बंद आहे" मोरे एकदम जोष मध्ये येऊन बोलला.

" कुठे आहे हे लोकेशन घेऊन चल आम्हाला तिथे" साहिल पटकन बोलला.

"हो चला की मग जाऊया"

"वेट साहिल,तिथे कियी लोक आहेत याची आपल्याला काही कल्पना नाहीये त्यामुळे तयारीनिशी व सावधपणे तिथे गेलं पाहिजे. आणि त्या हृदरला रंगे हात पकडायचे आहे, समजलं का मोरे" आदि मोरेच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून बोलला.

********




" म....म....माय.....रा...... ????"


काही गुंड एका मुलीला पकडून आणलेलं पाहून जीवन बोलले.

तसा रुद्र मागे फिरवून बघत बोलला," या या या बहिणा बाई...खूप शोध घ्यावा लागला आम्हाला तुमचा. खूप त्रास सहन केला आम्ही तुझ्यामुळे पण तरी तुम्ही सापडलाच शेवटी"

ती मुलगी म्हणजे अन्वी होती. ती खूप घाबरलेली दिसत होती. सारेजण अनोळखी आणि हा माणूस काय बडबड करतो असे तिला मनातून वाटत होते. कारण तिला दोन वर्ष्या पूर्वी काय झाले होते हे काहीच आठवत नव्हते.


जीवन मात्र तिला सुखरूप पाहून आनंदाश्रू ढाळत होते.
खूप उशिरापर्यंत बडबड करून रुद्रने त्यांच्या समोर प्रॉपर्टीचे पेपर्स पकडले व सही करण्यास फोर्स करू लागला.


" माझ्या मुलीला सोड तिला काही करु नको तरच मी यावर सही करेन" जीवन बोलले.

" ओ माय गॉड...काका तुम्ही बोलू शकता , मी किती किती खुश आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही" रुद्र हसत बोलता बोलता शेवटी शब्द रागाने दात ओठ खात बोलला.

"मायराला सोड आधी" जीवन बोलले.

" हो पूज्य काकाश्री तुमच्या लाडक्या मुलीला मी नक्कीच सोडेन त्या आधी यावर सही करा" रुद्र पुन्हा त्यांच्या समोर पेपर पकडत बोलला.

" आधी मायरा ला सोड"

अन्वीला त्यांचे बोलणे काहीच समजत नव्हते

" मी मायरा नाहीये मी अन्वी आहे तुमचा काही तरी गैरसमज होतोय दादा मला सोडा चुकून तुमच्या लोकांनी मला मायरा समजून पकडून आणले आहे मी मायरा नाहीये" तिला घाबरतच पण हिंमत एकवटून बोलली.

" नाटक करू नको निमूटपणे सही कर आणि मग इथून निघून जा" रुद्र तिची हनुवटी रागाने पकडून दात ओठ खात खेकसला.

" म....म....म...मी नाटक करत नाहीये खर सांगतीये, मी अ.....अ.... न्वी, मी एक स्कूलटीचर आहे" अन्वी घाबरत घाबरत बोलली.

"थांब थोडा वेळ तुझा खेळ संपवायला माझी माणसं अली आहेत" रामचंद्र कुत्सित हसत बोलले.

तस रुद्र कां देऊन बाहेरून काही वाज येतो का ते पाहू लागला. पण त्याला कसला ही आवाज आला नाही त्यामुळे त्याला रामचंद्र च बोलणं खोटं वाटलं.


" ये म्हाताऱ्या मला भीती दाखवतो का ? हे बघ मी घाबरलो...." अस म्हणून रुद्र भिण्याची नक्कल जरत बोलला.

पण रामचंद्रच्या चेहऱ्यावरील स्मित काही कमी झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास पाहून रुद्र विचारता पडला.

पण काहीच हलचाल त्याला जाणवली नाही म्हणून पुन्हा तो हसू लागला. रुद्र जोरात हसत होताच की त्याच्या कानावर कोणी तरी बंदूक ठेवल्याची त्याला जाणीव झाली.


तसा तो बवचळला. आता तो मनातून थोडा घाबरला.

"क....क.....कोण?"

" तुझा बाप...." साहिलचा कडक आवाज त्याच्या कानात घुमला.

" साहिल तू इथे, आणि आदि....??" अन्वी बोलली.

" गुड जॉब आदि..." रामचंद्र हसत अभिमानाने मागून येणाऱ्या आदिकडे पाहत बोलले.

सावित्रीबाईच्या डोळ्यात ही आता चमक दिसत होती. बाकी पोलीस ही तिथे आले आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक गुंडाला पकडण्यात आले.

दोन हवालदार जाऊन रामचंद्र व सावित्रीबाईना सोडवले. आणि जीवन व अन्वी ला ही सोडवण्यात आले.

" रुद्र तुझा खेळ संपला....आज तुला रंगे हात पकडण्यात आले आहे पुराव्या अभावी प्रत्येकवेळी तुला सोडलं गेलं पण आता नाही" आदि त्याच्या पोटात गुच्ची घालत बोलला.

"खूप महागात पडेल तुला हे तुला " रुद्र दात ओठ खत बोलला.

तशी त्याच्या तोंडावर एक चपराक बसली.

"निर्लज्ज माणसा, इतका निर्दयी कसा बनलास रे....हा; काय कमी केलं मी की तू माझ्या प्रेमाचे असे पांग फेडलेस. तुझे आई बाबा गेले तेव्हा तुला अनाथाश्रममध्ये ठेवायला हवं होतं मी म्हणजे तुला नात्यांची किंमत समजली असती. त्या तुझ्या पीएच्या नादात तू या थरावर पोहचलास की आपल्या छोट्या बहिणीला मारायला ही मागे पुढे नाही पाहिलं तू....इतका कसा कठोर बनला रे तू ..." जीवन त्याच्या कॉलर ला पकडून जाब विचारत होते.

"इंस्पेक्टर घेऊन जा याला..." जीवन म्हणले व बाजूला झाले.

अन्वी अजून ही गोंधळली होती. समोर काय सुरु आहे हे तिच्या आकलना पलीकडे होतं.

"आणखी एक ज्या प्रॉपर्टी साठी तू इतक्या खालच्या पातळीवर पोहचलास ती सर्व प्रॉपर्टी आम्ही तुझ्याच नावावर करण्याचे ठरवले होते पण तुझा बदलता स्वभाव पाहून काही काळ शांत बसून विचार बदलला . पण आता अस वाटत आहे मी भावाच्या मुलाला नाही तर एका सापाला दूध पाजून जतन केले आणि आता तोच आम्हाला दंश करत आहे, चालत हो माझ्या नजरे समोरून" जीवन शेवटी गरजले.


सगळ्यांना अटक करण्यात आली. अन्वी मात्र अजून ही प्रश्नपत्रिका घेऊन बसली होती. आता तिथे रामचंद्र, सावित्रीबाई, आदि, साहिल, मोरे, जीवन व अन्वी होते.

आदि व साहिलने रामचंद्रना व सावित्रीबाई यांना सॅल्यूट केला. हे पाहून तर अन्वी व मोरे चकित झाले.

आदि सारखा मुलगा या नोकराला का सॅल्युट ठोकतो आहे हे त्याला समजत नव्हते.

त्यांचे चेहरे पाहून जीवन हसू लागले.

"हे आहेत सिनियर पोलीस इंस्पेक्टर राम गावडे आणि या
त्यांच्या पावलांवर पावूल टाकणाऱ्या त्यांचा सहचारिणी मिसेस सावित्री गावडे. गेले दीड वर्ष ते माझी काळजी घेत आहेत आणि कोणाला ही याची खबर न लागू देता."


"तू कोण आहेस...?" अन्वी पुन्हा आदिला तोच प्रश्न विचारत होती.

"हा आमचा वाघ आदित्य वैद्य अंडर कव्हर ऑफिसर आणि हे त्यांचे साथीदार साहिल... आणि बाकी तुमची टीम कुठे आहे?" राम यांनी विचारले.

"यशच्या बायकोची आज डिलिव्हरी होणार आहे त्यामुळे तो काम आवरून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेला आहे आणि बाकीचे गोव्याला गेलेत छापा टाकायला"

"ओहह आय सी...बर चला आता इथून निघुया"


"पण मला माझ्या प्रश्नांचे उत्तरे नाही मिळाली अजून" अन्वी बोलली.

"घरी चल तुला सगळं सांगतो मी..." अस म्हणून आदिने तिला जवळ घेतले.