You don't like me, I don't like you in Marathi Comedy stories by Geeta Gajanan Garud books and stories PDF | तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना!


©®गीता गरुड.

सौ: अहो,उठा की कितीवेळ लोळत रहाणार? जा की आंघोळीला.


श्री: काय कजाग बाई आहे,रविवारचीपण झोपू देत नाही. सकाळी उठल्याबरोबर भोंगा सुरु करते.


सौ: काय म्हणालात🙄मी कजाग,मी भोंगा सुरु करते.🙄आणि त्या बाजूच्या टेंबे वहिनी सकाळी उठून गळा काढत असतात त्यांच बरं कवतिक करता. काय तो मेला आवाज तिचा. कान विटतात नुसते. मी जरा हाका मारल्या तर भोंगा म्हणता😔


श्री: अगं बाई तसं नाही म्हणायचं होतं मला.


सौ: काही सारवासारव करु नका. ती टेंबीण सकाळपासून आआ$$ करत असते. नवरा तिचा पाणी भरतो,स्वैंपाक करतो तरीही ती बरी आणि मी पहाटे उठल्यापासून तुमचं,मुलांच सगळं करते तर माझं मेलं कौतुक नाही.


श्री: राधा तुझ्यासाठी आज मी फक्कड चहा करतो. तू बसून रहा बरं.


(सौ मोबाईल घेऊन बसते. दूध जळल्याचा वास येतो.)


सौ: अहो,चहा करत होता ना. अहो, दूधाचा वास कुठून येतोय?

त्या दळवीनीच्या घरातून येतोय वाटतं. लक्ष कुठे असतं कोणास ठाऊक बयेचं.


(श्री कुत्र पाठी लागल्यासारखे धावत सुटतात पण अखेर व्हायचं ते होतं. दूध गेसशेगडीवर,ओट्यावर उतू जातच.सौ किचनच्या दारात उभी. सौचा रुद्रावतार . श्री ची मात्र अत्यंत केविलवाणी अवस्था होते. गपगुमान साबण,काथा घेऊन श्री ओटा साफ करु लागतात. सौ ला श्री ची दया येते. सौ व श्री दोघं मिळून तो दुग्धराडा आवरतात. मग सौच चहा करुन आणते.


श्री. आन्हिकं उरकून मार्केटिंगला जातात, सोबत सौ च्या सूचना..आलं,लिंब,मिरच्या,कोथिंबीर, नारळ,कांदे,लसूण,एखादी भाजी,दादासाठी चिकन,चिंगीसाठी पापलेट,सौ साठी कलेजी. श्री खिसा चाचपून पहातो. सौ त्वरित पैसे आणून देते,सोबत दोन पिशव्या.


सौ मेथीचे ठेपले बनवायला घेते. ठेपल्यांचा सुवास घरभर दरवळतो. समोरचे बगळेभाऊ डोकावतात.)🏃


बगळेभाऊ: काय वहिनी आज मेथीचे पराठे वाटतं. बाकी तुमच्या हाताला चव भारीच.😋


(बगळेभाऊंना दोन मेथीचे पराठे विथ साईचं दही हे शेजारपाळं मिळतं.

श्री घरी येतात. सौ पिशवी हातात घेते. सर्व वस्तू काढते. एकेकीचा दर विचारते व श्री ला लोकं कसं गंडवतात आणि श्री कसे गंडले जातात ते मुलांना,फोनवर बहिणीला,मैत्रिणींना विषद करुन सांगते.)


सौ: हं,आज तुमच्या आवडीचे मेथीचे ठेपले केलैत. खाऊन बघा.


श्री: (दोन घास खातात.) अगं राधे,आमची आई काय सुंदर बनवायची मेथीचे ठेपले. आताशा सुधरत नाही म्हणून. नाहीतर गावी गेलो की तीला, मला काय खाऊ घालू अन् काय नको असं व्हायचं.🤗


सौ: सदानकदा आईचं कवतिक. मी एवढी मेथी आणली,साफ केली,तीनदा पाण्याने धुतली,बारीक चिरली..मग त्याचे ठेपले बनवले पण माझं मेलं कवतिकच नाही.

😎 लगेच बाबूला आईची आठव आली.🤓


श्री गुपचूप ठेपले खातात व चिकन बारीक करायला घेतात.सौ पोळ्या,मासे,चिकन,भात सगळा स्वैंपाक आवरते. श्री ला हाताशी घेतेच.


जेवणं उरकल्यावर श्री व सौ टेरेसमध्ये बसतात.


श्री: अगं बघ ये ती बगळीन बगळ्याला कसा पिरेमाने कलप लावतेय नाहीतर..


सौ: नाहीतर काय.😠 बोला बोला. तरट्यावर केस आहेत का तुमच्या? कोंबडीच्या पिसासारखी झालर आहे. तिला कलप लावू का? तरट्यावर तेल घातलं तरी ओघळून खाली येतं. दिवास्वप्न बघतायत नुसते.


(श्री डोक्यावर हात फिरवत रहातात. थोड्या वेळाने)


सौ: अहो,जरा आत या बघू. हा घ्या विडा.


श्री: या गरीबावर ही मेहरबानी कशाला?😍


सौ: ते आपलं असंच. अहो ऐकाना.ऐकताय ना🙄


श्री: बोल तरी.


सौ: ते किनई आम्ही मैत्रिणींनी ठरवलंय. आपापल्या नवऱ्यासोबत सेल्फी काढून ग्रुपवर पोस्टायची.


श्री: हात्तेच्या एवढंच ना. ये जवळ काढूया सेल्फी.💏


सौ. तसं नाही ओ. सेल्फी किनई प्रॉपर पोजमध्ये हवा आहे. म्हणजे पोज तशी सोप्पीच आहे. तुम्ही मला दोन्ही हातांनी उचलून आडवं धरायचं आणि मग मी तसा सेल्फी काढणार. किती कित्ती इनोवेटीव नं.🤗


श्री: छे छे. मी आणि तुला उचलणार ? अगं दोन हाडं व्यवस्थित आहेत माझी. टिरेनमधून जातायेताना हवीत ती मला. तू काही कर तिकडे. मला हे असलं जमणार नाही.


सौ: दिवसरात्र तुमच्या संसारासाठी राबते. माझी क्षुल्लकशी मागणी नाही पुरी करु शकत.😇


श्री: बाकी काहीही सांग पण ते उचलण्याचं नको सांगूस.😒


सौ: मी एवढी दिवसभर मर मर मरते तुमच्या घरासाठी.😧 तुम्ही माझी एक मागणी नाही मान्य करत. मी जातेच आईकडे मग तुम्हाला कळेल माझं महत्त्व.


श्री: तुच जाणार.😉


सौ: काय बोललात🙄 आत्ता बघाच तुम्ही.


(सौ. पटापटा आपले दोन ड्रेस बेगेत भरते नी जायला निघते.)


चिंगी: ए मम्मा, तू कुठं चाललीस?


सौ: मसणात.


चिंगी: ए मम्मा माझा सगळा होमवर्क झालाय. मीपण येतेना तुझ्याबरोबर मसणात.


सौ: काही नको.


(सौ बाहेर पडते खरी पण बसस्टॉपवर बस निघून गेलेली असते. परत तिला ताटकळत उभं रहावं लागतं. बाजूला भुटावाला असतो. एक नवं जोडपं झाडाखाली उभं राहून एक भुटा चिमणीच्या दाताने शेअर करत असतं.💏 सौला तिची व श्रीची त्या झाडाखालची भेट व त्यांनी चिमणीच्या दातांनी खाल्लेला भुटा आठवतो. पण परत मग उचलून न घेतल्याची आठवण येते व ती त्या भूतस्वप्नलिलेतून बाहेर येते. तितक्यात बस येते. सौ कशीबशी बसमध्ये चढते व आत घुसते. बरीच माणसं सुट्टीच्या दिवशी कुटुंबाला घेऊन फिरायला निघालेली. त्यामुळे बसमध्ये चिक्कार गर्दी असते. त्यात एक मनुष्य साधारण श्रीच्या वयाचा चक्कर येऊन कोसळतो. तो घामाघूम झालेला असतो. कुणीतरी त्याला सीटवर बसवतं. त्याच्या शर्टाची बटणं खोलतात. त्याला पाणी पाजतात. बिस्कीटं देतात. सौला लगेच श्रीची आठव येते.)


सौ(स्वगत): श्रीने गोळ्या घेतल्या असतील का? त्याचाही असाच लो बीपीचा प्रॉब्लेम. मी नाही म्हणजे रात्रीची गोळी हमखास विसरणार. उद्या सकाळीही तीच गत आणि परत या तुडुंब भरलेल्या बसमधून प्रवास करणार. खरंच श्री किती करतो माझ्यासाठी. माझं वजनही जरा वाढलंय हल्ली. मेलं दिक्षितांच डायट करा नाहीतर दिवेकरनीचं करा तो वजनाचा काटा जरा उभं राहिलं की गरागरा फिरतो.🤦


(सौला त्या भोवळ आलेल्या माणसाजागी तिचा श्री दिसू लागतो. श्रीच्या बाजूला बसलेली सुंदर युवती तिची पाण्याची बॉटल त्याच्या तोंडाला लावतेय,श्रीला तिच्या पर्समधली बिस्कीटं भरवतेय असं सगळं दिसू लागताच सौ कंडक्टरला जोरात हाक मारते.)


सौ: कंडक्टर प्लीज गाडी थांबवा.(सगळीजणं सौकडे काय विचित्र बाई आहे या नजरेने बघू लागतात.सौ गर्दीतून वाट काढत दारापाशी जाते व कंडक्टरने बेल मारताच खाली उतरते.घराच्या दिशेने झपझप पावलं टाकते.सौ दारात दिसताच.)


चिंगी: हे काय मम्मा, तू जाऊन आलीसपण☺️


(श्री पेपरातून बघत हसत असतात. सौ हातपाय धुवून बाहेर येते तोच )


चिंगी: अगं मम्मा भात लावू नको हा. पप्पानी तुझी फेवरेट प्रॉन्स बिरयानी मागवलेय आणि ही बघं तुझ्यासाठी फुलांची पुडीपण आणून ठेवलेय. मी म्हणत होते त्यांना, ममा मसणात गेलेय,मग सगळं ममाचं फेवरेट कशाला आणताय तर म्हणाले, अर्ध्या तासात बँक टू पेविलियन येते की नाही बघ तुझी मम्मा.


(सौ पुडीचा धागा सोडते व अलगद पानं उलगडते. आतमध्ये त्यांच्या प्रेमाचं प्रतिक असलेली केशरी सोनचाफ्याची फुलं तिच्याकडे पहात असतात. सौ त्या केशरी चाफ्याच्या फुलांचा सुगंध उरात सामावून घेते व श्री.च्या दिशेने तिरपा लाजरा कटाक्ष टाकते. श्रीही तिच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकतात. चिंगी अचंबित. दादाच्या खोलीत जाते.)


चिंगी: ए दादा, ही दोघना मला टॉम एण्ड जेरीसारखी वाटतात. सारखं कट्टीबट्टी खेळत असतात.👩


दादा: अगं आपले गावचे आजोबा म्हणतात नं नवराबायकोच्या भांडणात कोणी पडू नये ते अगदी शंभर टक्के खरं आहे.


सौ: काय रे दादा काय सांगतोयस तिला?


दादा: हं ते आपलं तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना या म्हणीचा अर्थ समजावून सांगतोय तिला.


चिंगी: हो ग मम्मा तेच ते तुझं माझं माझं तुझं दादा सांगतोय मला.👩


मम्मी: शिकव रे बाबा तिला. पुढच्यावर्षी स्कॉलरशिपला बसायचय तिला.


( ही टेंबीनीची वाटी इथे कशी आली🙄)


चिंगी: अगं मम्मा टेंबेकाकूंनी शेवयांची खीर आणून दिलेली. पप्पांनी चाटूनपुसून खाल्ली. त्यांना म्हणालेही खूप छान झालेय म्हणून.


सौ: 🙄🙄काय हो, शेवयांची खीर आवडत नाही नं तुम्हाला. टेंबेकडची बरी आवडली.😎


श्री: मी जरा बाहेर चक्कर मारुन येतो हं.🚶🚶


--------समाप्त