Bhetli tu Punha - 16 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | भेटली तू पुन्हा... - भाग 16

The Author
Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

भेटली तू पुन्हा... - भाग 16












दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आदित्य सर्वांच्या आधी उठून बिच वर गेला. सहा सात ची वेळ असेल. सकाळीचे गार वारे अंगाला झोंबत होत. आदि कॅमेरा घेऊन निघाला होता.


त्यावेळी बिच वर अजिबात गर्दी नव्हती. दहाबारा जण असतील फक्त ते ही लोकलच वाटत होते जे की मॉर्निंग वॉक साठी आले होते.


खूपच शांतता जाणवत होती. त्या शांततेत समुद्राच्या लाटांचा आवाज कानाला सुखावून जात होता. जवळच असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांचा गोड किलबिलाट सुरु होता.
सगळ्या मोहक गोष्टींचे फोटो घेत तो पुढे निघाला.

तो फिरत फिरत थोडं बाजूच्या किनाऱ्यावर गेला. आणि एक मुलगी त्याला दिसली. जी पाण्यात पाय ठेवून लाटांचा पायांना होणार स्पर्श अनुभवत होती.


पाण्याचा पायाला स्पर्श होताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येत होती. पिंक फुल्ल स्लीवड टॉप आणि ब्लॅक हेरम घालून, केसांना सेंटर क्लिप लावून बाकी केस मोकळे सोडले होते व ती दोन्ही हात पसरून उभी होती.



आदीला तिचा चेहरा दिसत नव्हता पण तो तिच्याकडे खेचला जात होता. तिला अस पाहून नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने तिचे मागून फोटो घेतले.

तो हळूहळू तिच्याकडे चालू लागला. आदीला एका बाजूनेच तिचा चेहरा दिसत होता. पण ती खूप सुंदर आहे हे त्याला जाणवलं.

खूप उशिरापर्यंत लाटांचा स्पर्श अनुभवून ती पाण्यातून बाहेर येण्यासाठी वळली. ती वळताच आदि तिला पाहतच राहिला.

जस त्याने इमॅजिन केलं होतं तशीच ती खूप सुंदर दिसत होती. ती तिथेच थोडं अंतर सोडून बसली. आदि तिच्या हालचाली पाहत होता. तिचे फोटो घेत होता.

त्याच्या मनात विचार आला की,' ही एकटीच का आहे इथे? इथेच रहात असेल का? हो असेल म्हणून तर एकटी आली आहे. बोलू का तिच्याशी?'

तो तिला पाहत विचार करत होता. तर ती हातातील घड्याळात वेळ पाहून तिथून जायला निघाली. आदित्य मात्र अजून ही विचारच करत होता. ती जात असताना त्याने तिला पाहिले पण ती खूप पुढे निघून गेली होती.

तो तिच्या मागे जाणारच होता की तिथे असणारे कपलने त्याला आवाज दिला.

"एक्सक्युज मी, आमचा एक फोटो घेता का प्लिझ?" त्या मुलाने विचारले.

त्यांना पाहता जाणवले की त्यांचे नुकतेच लग्न झाले असावे.

"हो" आदि हसत त्यांचा फोटो काढू लागला.

एक दोन फोटो काढून त्याने मोबाईल परत केला व तिथून निघाला. तो त्या मुलीला शोधू लागला पण ती कुठेच त्याला दिसली नाही. हताशपणे तो रूमकडे निघाला.



रूममध्ये येताच त्याने पाहिले की अजून कोणीही उठलेले नाहीये. तसं त्याने साहिलला उठवले. थोड्या वेळात एक एक करून सारे उठून अवरू लागले.


आदि रेडी होऊन बसला होता की त्याला काचेतून दिसले की जित आणि राहुल आले आहेत. तस तो उठून बाहेर गेला व त्यांना रूममध्ये घेऊन आला.



"साल्यानो कितीला निघाला बे..." विशाल केस पुसत बोलला.


"रात्रीच निघालो होतो त्यामुळे पहाटे पर्यंत पोहचू शकलो" जित बोलला.


"पहाट नाही रे राजा आठ वाजलेत" यश बोलला.


"अरे पिचलो तर पहाटेच आहे पण रिसॉर्ट शोधण्यातच वेळ गेला ना" राहुल बोलला.


"ओहह, ऐसा हुवा क्या..." विशाल जितला चिडवण्याच्या हेतूने बोलला.


"हा ना भाई, सारी रात ड्राईव्ह करके थक चूक हु मैं ,अब आरामसे सोवूंगा" अस म्हणतच जित बेडवर पसरला.


"हा तर झोपणार आहे आपण जाऊन येऊ का मग बंदरावर" साहिल हळूच बोलला.


"कल चलते हें ना यारो" जित पटकन उठून बसत बोलला.


"नाही आजच जायचं" विशाल जाणूनबुजून त्याला चिडवत होता.


"फिर जावो मैं अकेला ही यहा रहाता हुं" जित रागाने बोलला व चेहरा दुसरीकडे करून तोंडावर उशी घेऊन झोपून टाकला.


"ये विश्या का छळतो रे त्याला उगीच" राहुल बोलला.


"हो, याला ना धुतला पाहीजे" यश त्याला पाठीत मारत बोलला.


तस तो कळवला.


"साल्या तू त्याच्या नावावर बिल फाडून स्वतःच्या सुप्त इच्छा पूर्ण करू पाहतो का बे"



तसे सगळेच हसू लागले. थोडावेळ विश्रांती घेऊन ते तिथेच आजूबाजूला फिरून आले. संध्याकाळी बिच वर जाऊ अस ठरवून ते रूममध्ये मजा मस्ती करत बसले.


संध्याकाळी बिचवर खूप मस्ती सुरू होती पण आदित्यची नजर मात्र त्या मुलीला शोधत होती. हे साहिलचा लक्षात आले.


" हे हिरो... के चाललंय काय तुझं" साहिल त्याच्या जवळ येत बोलला.


" कुठे काय? काहीच तर नाही" आदि बोलला.


" हो का ! म्हणजे आता मी जे पाहिले ते खरं आहे"


"काय?"


"हेच की तुला तुझी ड्रीमगर्ल मिळाली आहे" साहिल त्याच्या खांद्याला खांदा मारत बोलला.


"नाही... तस काही नाही" आदि नजर चोरत बोलला.


"हो ना मग का नजर फिरवत आहे"


"अरे तिथे बघ ती दोन लहान मुलं कशी खेळत आहेत" आदित्य विषय बदलत बोलला.


"तू विषय बदलू नको रे!"


इतक्यात विशालने त्यांना आवाज दिला.


"ये! तिथे काय करताय? इकडे या खूप मजा येतीये" विशाल थोडं मोठ्याने बोलला.


"चल, नंतर बोलू यावर आपण" आदित्य विषय टाळण्यासाठी त्याला म्हणाला व ओढत पाण्यात घेऊन गेला.




रात्री सगळे रूममध्ये बसून कार्ड्सनी खेळत होते. रूममधील सारे पडदे बाजूला केल्याने रूममधूनच बाहेरचे सारे दिसत होते.


काही वेळाने आदित्यचे लक्ष बाहेर गेले. त्यांच्या दोन्ही गाड्या जिथे उभ्या केल्या होत्या त्याच्या भोवती एक मुलगी पळत होती तर तिच्या मागे एक दोन अडीच वर्ष्याची छोटी मुलगी पळत होती.


ती छोटी मुलगी खूप छान होती. दुडूदुडू पळत होती व त्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न करत होती. ती हसताना खूपच गोंडस दिसत होती. आदी त्या छोट्या मुलीला पाहण्यात हरवला होता.


ती लहान मुलगी जिच्या मागे लागली होती ती अंधारात उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता. त्याला अस बाहेर पाहताना बघून सगळेच त्या दिशेने पाहू लागले.


"ओहो! काय ड्रीमगर्ल का?" विशाल हसत हळूच बोलला.


तस साहिल मात्र उठून काचे जवळ गेला व बोलला,
"कुठे, कुठे आहे?"


"अरे! तस कशी नाहीये मी जस्ट त्यास साहित्य मुलीला पाहत होतो" आदित्य त्यांना सांगू लागला.


"हो का... आम्हाला वाटले की..." राहुल ही हसत बोलला.


"तुम्हाला काही ही वा..." आदित्या बोलत बोलता थांबला.


कारण बाहेरून एक कार आली आणि तिच्या लाईट्स त्या अंधारात उभ्या असणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर पडले.तस तिचा चेहरा आदिला दिसला आणि तिला पाहतच तो तिला पाहण्यात गुंतला.


"ओहो! ओहो! ड्रीमगर्ल इज कमिंग सून..." जित ओरडला.


"साल्या! खोट बोलतो आमच्याशी हा..." विशाल त्याची मान पकडत बोलला.


"अरे! तस काही नाहीये, मी जस्ट पाहत होतो"


"हो का...बरं... आणि हे काय आहे" साहिल कॅमेरा दाखवत बोलला.


"ये! तो माझा कॅमेरा आहे दे इकडे"


आदि त्याच्या हातात कॅमेरा पाहून त्याच्याकडून कॅमेरा काढून घेण्यासाठी गेला. तस साहिल पळू लागला. साहिल पुढे आणि आदि मागे मागे रूमभर पळून खेळत होते.


त्यांचा हा गोंधळ पाहून बाकीचे हसू लागले व 'कॅमेरा त्याला देऊ नको' असे ओरडू लागले. साहिल आता बाहेर पळून गेला.


बाहेर ही त्याची पकडम पकडायी सुरूच होती. साहिल थोडा पुढे गेला व वळला. त्याच्या मागे आदि ही गेला आणि जाऊन त्याच मुलीला धडकला.


ती कोसळणार होतीच की त्याने तिला कमरेत पकडले. आदिची वेल मेंटेंड बॉडी समोर त्या नाजूक परीचा कुठे निभाव लसगणार होता त्यामुळे तो जरी धडकला असला तरी तिचाच तोल गेला.

दोघेही ही एकमेकांच्या डोळ्यात हरवले. साहिल त्यांचा पटकन फोटो घेतो व त्यांच्या जवळ येऊन घड खाखरतो तसे दोघे ही भानावर येतात.

"ओह! आम सॉरी" आदित्य बोलला.

"इट्स ओके" अस म्हणून ती ही तिथून लगेच निघून
गेली.

ती जातच साहिल आदि जवळ येऊन खांद्याला मारत हसत बोलतो," वहिनी मस्त आहे मला आवडली"

तस आदि लाजून हसला. साहिल त्याला चिडवू लागला.
रूममध्ये जाऊन साहिल घडला प्रकार रंगवून रंगवून सांगू लागला.