Bhetli tu Punha - 14 in Marathi Love Stories by Sam books and stories PDF | भेटली तू पुन्हा... - भाग 14

The Author
Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

भेटली तू पुन्हा... - भाग 14

 
"मी सरांशी बोलतो यावर" आदि म्हणाला.
 
 
 
"ओके, चल आता झोप तू, मी ही झोपतो उद्या वरीष्ठ लोक येणार आहेत बँकेत तपासणीला" साहिल बेडवर आडवा होत बोलला.
 
 
"आता हे कधी ठरलं यार...." आदि चकित होत थोडा वैतागुन बोलला.
 
 
"थोड्या वेळापूर्वी कॉल आलेला " साहिल हसत बोलला.
 
 
"काय थोडा उसंत म्हणून देतात की नाही ही माणसं यार..." आदि खूपच वैतागला होता.
 
 
कारण महिना झाला त्याला काय काय कागदपत्रे गोळा करायला लावत होते त्याचे वरिष्ठ. आपलं काम सोडून त्याला या बाकी कामावर पण लक्ष द्यावे लागत होतं त्यामुळे त्याची चिडचिड होत होती.
 
 
 
"बर झोप तू आता, मी केलीये फाईल तयार तुझी" साहिल त्याला वैतागलेले पाहून हसत बोलला.
 
 
"खर की काय?" आदि आश्चर्यचकित होत बोलला.
 
 
 
"हो, तेच करत होतो आता, बस सकाळी एकदा नजरे खालून घाल फाईल म्हणजे झालं" साहिल म्हणाला.
 
 
 
"ओहsss थँक् यु यार" अस म्हणत आदिने त्याला जाऊन मिठी मारली.
 
 
 
"हो जा आता फ्रेश हो आणि झोप, गुड नाईट" साहिल कुस बदलत बोलला.
 
 
 
"हो आलोच" अस म्हणत आदि ही फ्रेश होण्यास निघून गेला.
 
 
 
********
 
 
 
अन्वी आज स्कूलमध्ये जाणार नव्हती. तिला ताप आला होता. त्यामुळे ती अजून ही झोपुनच होती.
 
 
 
आई बाबांना आता जास्तच काळजी वाटू लागली. कारण
अन्वी खूप नाजूक मुलगी होती. थंडी तिला सहन होत नव्हती सुरुवातीला, पण वर्षभरात आई बाबांनी तिला तस न जाणवू देता सांभाळली होती. त्यामुळे तिचा थंडीचा त्रास ही कमी झाला होता आता.
 
 
मुळात ती तिची स्मृती विसरल्याने तिला हेच माहीत नव्हते की तिला थंडी मानवत नाही. आणि तिची बॉडी ही सुरुवातीला तिला साथ देत नसली तरी तिच्या मनाची तयारी असल्याने काही महिन्यातच तिची बॉडी थंड वातावरणाला ही रेजिस्ट करू लागली होती.
 
 
 
पण आज तिला इतका ताप चढलेला पाहून आई बाबा दोघे ही काळजीत पडले होते. बाबांनी लगेच आदित्यला कॉल करून तिच्या तब्बेतीबद्दल सांगितले.
 
 
 
आदित्यने डॉक्टरला घेऊन येत असल्याचे बाबांना सांगितले. आता आई व बाबा आदित्य व डॉक्टर येण्याची वाट पाहत होते. आई तर अन्वीच्या उशालाच बसून होती.
 
 
बाबा हॉलमध्ये फेऱ्या मारत होते. आदी आला सोबत डॉक्टर ही होते.
 
 
 
 
"ये ये आदित्य..." बाबा त्याला आलेल पाहून बोलले.
 
 
 
" हो बाबा.... अन्वी कुठे आहे?" आदिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.
 
 
" आत आहे तिच्या रूममध्ये" बाबा मागे फिरून बोलले.
 
 
" चला डॉक्टर" अस म्हणून आदि डॉक्टरंना घेऊन आत निघाला.
 
 
अन्वी तापाच्या ग्लानीतच होती. तिचे अंग तापणे भाजत होते. डोळ्यांच्या भोवती काळे वर्तुळ दिसू लागले होते. ओठ तापाणे सुकून पांढरे दिसतं होते. चेहरा पार निस्तेज दिसत होता.
 
 
तिला अशा अवस्थेत पाहून आदीच्या हृदयात चरर्र झालं. त्याला खूपच वाईट वाटत होते तिला असे पाहून.
 
 
डॉक्टर तिला चेक करून, इंजेक्शन देऊन काही औषध लिहून दिली.
 
 
"काही काळजीने कारण नाही, टेम्प्रेचर जास्त असल्याने त्या ग्लानीत आहेत, इंजेक्शन दिले आहे आता तासाभरात ताप उतरेल, उठल्यावर त्याना थोडं जेवायला द्या आणि या गोळ्या खायला द्या दोन दिवस रेस्ट घेणे गरजेचे आहे" डॉक्टर एकदम पाठ केल्यासारखे बोलले.
 
 
"हो...." अस म्हणून आईने डॉक्टरांच्या हातातून गोळ्या व चिट्टी घेतली.
 
 
" ती चिट्टी मला दे आई, मी औषधे घेऊन येतो" आदि म्हणाला.
 
 
"हो घे" आई म्हणाली व चिट्टी आदिच्या हातात दिली.
 
 
आदि डॉक्टर सोबत बाहेर निघून गेला.
 
 
" अहो ! तुम्ही जा दुकानात मी आहे इथे, मी घेईन
तिची काळजी" आई म्हणाली.
 
 
" हो! आदि येऊ दे मग जातो मी " बाबा जवळच्या खुर्चीत बसत बोलले.
 
 
" मग मी काही तरी खायला बनवते दोघे ही खा आणि मगच जा" आई उठत बोलली.
 
 
" बर कर, मला ही गोळी घ्यायची आहेच" बाबा मोबाईल हातात घेत बोलले.
 
 
"हो आलेच हा" म्हणून आई बाहेर निघून गेल्या.
 
 
थोड्या वेळात आदि औषध घेऊन आला.
 
 
"बाबा ही औषधे मी इथे ठेवतो तिला जाग आली की तिला द्या" आदि टेबलवर औषध ठेवत बोलला.
 
 
"हो, तुझ्या आईला सांग , मी ही आता दुकानात जाणार आहे" बाबा म्हणाले.
 
 
"बर मी तिला ही सांगतो, आणि मी ही निघतो आता बँकेत आज तपासणीसाठी वरिष्ठ लोक येणार आहेत" आदि घड्याळ पाहत बोलला.
 
 
"थोडं खाऊन जा, आई बनवून आणते लगेच" बाबा म्हणाले.
 
 
"नको बाबा उशीर होईल " आदि म्हणाला
 
 
"नाही होणार फार उशीर, हे घे खा पटकन आणि जा" आई आदीच्या हातात प्लेट देत बोलली.
 
 
"आई कशाला हे करत बसली, मी केला असता बाहेर नाष्टा" आदि खुर्चीवर बसत बोलला.
 
 
"होss तू केला असता पण बाबा ही काही खाल्ले नाही सकाळ पासून त्यामुळे आता दोघे ही बसा आणि खाऊनच जा" आई मंद हसत बोलली.
 
 
" हो तुम्ही ही बसा सरकार" बाबा आईचा हात पकडुन जवळच्या खुर्चीत बसवत बोलले.
 
 
"अहो....मी आणि कशाला ?" आई थोडी लाजतच बोलली.
 
 
आई बाबांचे खूप गोड सवांद सुरू होते. त्यांना अस प्रेमाने एकमेकांशी हितगुज करताना पाहून आदि मनातून सुखावला. कौतुकाने तो आई बाबांना पाहत होता.
 
 
अचानक अन्वीने कुस बदलली तसे आदिची नजर तिच्यावर गेली. तसा तो उठला व तिच्या जवळ जाऊन बसला.
 
 
 
ती अजून ही ग्लानीतच होती. आदित्य तिच्या शेजारी बसून तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. आई बाबा ही त्यांना पाहत होते.
 
 
बाबा जाऊन आदित्यच्या खांद्यावर हात ठेवून थोपटू लागले. तसा आदित्य डोळे पुसत स्वतःला सावरून बेडवरून उठला.
 
 
" बर मी निघतो, बाबा तुम्हाला सोडू का मी दुकानाकडे" आदी बेड वरून उठत बोलला.
 
 
" हो चालेल, सरकार निघतो आता आम्ही, तुम्ही पोरीची काळजी घ्या आणि नंतर जेवायला देऊन गोळ्या ही द्या" बाबा आईला म्हणाले.
 
 
 
" हो, जा तुम्ही दोघे ही आता मी आहे तिची घेईन काळजी" आई हसत बोलली.
 
 
थोड्या वेळातच आदित्यने बाबांना दुकानाजवळ सोडले व बँकेकडे निघाला.
 
 
बँकेच्या दरवाज्यामध्ये पोहचताच आदिचा मोबाईल वाजला.
 
 
" येस सर...." आदि आदराने बोलला.
 
 
 
समोरून काही तरी बोलन झालं.
 
 
 
" ओके सर.... मी संध्याकाळी कॉल करतो तुम्हाला म्हणजे आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल आता थोडं काम आहे"
 
 
आत जाताच साहिल त्याच्या समोर फाईल घेऊन उभा राहिला.
 
 
 
" आदि, ही फाईल घे आणि नजर खालून घाल एकदा म्हणजे नंतर तुला अवघड जाणार नाही" साहिल फाईल त्याला देत बोलली.
 
 
 
" हो! थँक्स साहिल" आदि हसत बोलला.
 
 
 
" फक्त थँक्स ने काम नाही चालणार, ट्रीट हवी मला" साहिल हसत बोलला.
 
 
 
" हो नक्कीच" आदि बोलला व फाईल ओपन करून वाचू लागला.
 
 
साहिल तिथून निघून गेला. तासाभरातच बँकेचे संचालक व बाकी लोक तिथे उपस्थित होते. सर्व काही पाहून झाल्यावर त्यांनी आदित्यचे कौतुक केले.
 
 
 
दुपार नंतर सगळे निघून गेले. सगळे जाताच आदित्य ने सुटकेचा निश्वास सोडला. टाय लूज करून तो खुर्चीत डोळे मिटून आरामात बसला.
 
 
 
अचानक त्याला अन्वीची आठवण झाली. तस लगेच तो उठून बसला व आईला कॉल केला. तो कॉल वर होता की साहिल ही त्याच्या केबिनमध्ये आला.
 
 
 
"हॅलो! आई... अनु कशी आहे?" आदित्य काळजीने विचारत होता.
 
 
 
"हो ती ठीक आहे आता थोडी, कशी वेळापूर्वीच ती जेवून गोळी घेऊन पुन्हा झोपली आहे" आई म्हणाली.
 
 
 
"ताप कमी आहे का आता?"
 
 
 
"हो आहे कमी"
 
 
 
"ओके, तू जेवली का?"
 
 
 
"नाही अजून बाबा येत आहेत म्हणून थांबले, तू जेवलास का बाळा"
 
 
 
"नाही, आता काम संपले "
 
 
 
"हो का.... बर बर आता आवरलं ना काम मग जेवून घे आधी"
 
 
 
"हो आई, येतो मी संध्याकाळी"
 
 
 
"हो ये ये"
 
 
 
आदित्यने मोबाईल बाजूला ठेवला व साहिल कडे पाहू लागला.
 
 
 
"ते तुला सरांचा कॉल आलेला का?" साहिल हळूच बोलला.
 
 
 
"हो, पण मी संध्याकाळी कॉल करतो म्हणालो , का ? काय झाले का?" आदी शंकेने साहिल कडे पाहत बोलला.
 
 
"काही नाही ते आपलं सहजच"
 
 
 
" बर ते सोड, गोखलेच काय झाल?" आदित्या डोळे बाकीर करून साहिल कडे पाहत बोलला.
 
 
"काय होणार.... आयसियु मध्ये आहे"
 
 
"हम्मम"
 
 
 
"पोलीस केस झालीये" साहिल बोलला.
 
 
 
"तू करशील हँडल आय नो" आदित्य थोडं हसतच बोलला.
 
 
 
"ते मी कालच केलं आहे " साहिल ही हसत बोलला.
 
 
"बर तुझं आवरलं ना चल ना मग लंच ब्रेक आहे, पोटात कावळे डान्स करू लागले" साहिल पोटावरुन हात फिरवत बोलला.
 
 
त्याला अस पाहून आदित्या हसला.
 
 
 
" बर चल" आदित्या खुर्चीतून उठत बोलले.
 
 
 
"बाय द वे, हॉव इज अनु" साहिल बोलला.
 
 
 
"नॉव शी इज फाईन, टेम्प्रेचर ही कमी आहे आता"
 
 
 
"ओहहह , अजून काय लिहिलंय या मुलीच्या नशिबात देव जाणे" साहिल हळहळ व्यक्त करत बोलला.
 
 
 
" काही हि लिहिलं असलं तरी मी तिच्या सोबत असू पर्यंत तिला काही होणार नाही" आदित्या शून्यात नजर लावून बोलला.
 
 
 
"आय नो भाव, अँड आय आल्वेज विथ यु" साहिल आदित्यच्या हातावर थोपटत बोलला.
 
 
तस आदित्य हसला.
 
 
 
"बर संध्याकाळी तू येतोय ना माझ्यासोबत अनु कडे"
 
 
 
"हे काय विचारन झालं का? ऑफकोर्स मी येणार आहे. खूप महिने झाले काकीच्या हातचे कटलेट्स खाऊन त्यांना सांग करून ठेवायला " साहिल ओठांवरून जीभ फिरवत बोलला.
 
 
 
त्याची रीअकॅशन पाहून आदित्यच्या ओठांवर हसू आलं.
 
 
"हो सांगतो, जेव आता" आदित्य ही हसत बोलला.
 
 
 
 
********
 
 
 
सॉरी थोडा प्रॉब्लेम असल्याने कथेचे पार्ट लिहू शकट नाहीये. तुम्हाला त्रास देण्याचा कोणताही विचार नाहीये.
 
लवकरच घरी आले की नवीन पार्टस लिहून तुमच्यासाठी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन.
 
 
हा भाग कसा वाटला नक्की कळवा.
 
 
 
 
धन्यवाद!🙏