Indraza - 18 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 18

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

इंद्रजा - 18


भाग - १८


संध्याकाळी सगळं आवरून जिजा आणि इंद्रा मुंबई ला परत यायला निघाले.....वातावरण एकदम थंड गार होता......बाहेर पाऊस पडत होता,जिजा गाडीतून बाहेरच सौंदर्य पाहत होती......इंद्रा मधे मधे तीच सौंदर्य आरशातून पाहत होता.....आणि रेडिओ वर गाणी ही चालू होते....
असं वातावरण म्हणजे अहाहा!!️



📻🎵

जलता है जिया मेरा भिगी भिगी रातो में.....
आजा गोरी चोरी चोरी....
अब तो रहा नाही जाये रे......
हा हा हाय रे हाय रे!!



जिजा - वाह काय छान गाणी लागलाय...अहो अहो चला आपण पण गाऊया ना....🤧😉



इंद्रजीत - हो हो नक्कीच!!💕



जिजा -👀
अभी ये फसाना.....
हमे ना सुनाना....
देखो राजा कदम ना बढाना.....
नहीं छेडो ऐसी वैसी बात.....
ओहो ओहो....



इंद्रजीत - जलता है जिया मेरा भिगी भिगी रातो में..
आजा गोरी चोरी चोरी अब तो रहा नहीं जाये रे....



जिजा - हा हा हाय रे हाय रे हाय रे ❤️😂



इंद्रजीत - 😂



जिजा - इंद्रा गप्पा मार ना माझ्याशी....एकदम असं दिल खोलून गप्पा आपण मारल्याच नाहीत रे बराच काळ....



इंद्रजीत - हो गं..तू बोल ना... मग मी ही बोलतो...



जिजा - हम्म...अम्म्म बोलू मी खरंच? सांगशील?



इंद्रजीत - हो कां नाही...



जिजा - आ अ मला सांग तुझी पिहू कशी होती? तुझी फिजा....? आणि त्यावेळी तू कसा असायचास??



इंद्रजीत - अचानक हा प्रश्न?
मी बोलो तर तुला वाईट नाय वाटणार ना...म्हणजे...



जिजा - छे! उलट आवडेल तू आणि ती कशी होती हे जाणून घ्यायला....मला आज वाटलं सो विचारलं....



इंद्रजीत - ओके....तुला तर माहित आहेच माझी आणि फिजाची भेट कशी झाली किंवा काय?
तर ती कशी होती??
खरं सांगू, भारी होती ती....नाजूक बाहुलीच जणू.... डोळे तर एकदम गडद ब्राऊन....बटली होती जास्त उंच ही नव्हती.....आवाज पण खूप गोड होता तिचा....बोलायची ना माझ्याशी खूप मस्त वाटायचं....घाबरट थोडी बिन्दास्त...सगळ्यांच मन जपणारी होती...मस्तीखोर पण तेवढीच...हिंदी भाषप्रमाणे प्रत्येक भाषा आवडीने शिकणारी.....तिची "इंद्रा जी" ही हाक म्हणजे एक वेगळीच फिलिंग....❤️तो एक अनमोल शब्द आहे माझ्यासाठी तो फक्त तिनेच म्हणावा💕 अजूनही आठवते पहिली भेट....विजे सारखी माझ्यासमोर चमकली होती...



जिजा - ओह म्हणजे माझ्यासाखीच....



इंद्रजीत - हो 💘



जिजा - आणि तू कसा होतास???



इंद्रजीत - मी..आता खरं सांगायचं झालं तर...मी खूप स्वप्न बघणारा होतो....teen ager होतो ना...पण जिद्द ही खूप ठेवायचो मी....अजूनही आहे म्हणजे.....त्यावेळी मला नीट राहणं....नवीन हेयर स्टाईल्स करतं राहणं..YoYo हनी सिंग चे सॉंग्स बोलण....म्हणजे Blue Eye's, Brown Rang, Aachko machko😂 असे....आणि मुलींशी फ्लटिंग पण करायचो मी...खूप करायचो....😂पण no affairs हा....फक्त फ्लर्टींग...
आणि खूप महत्वाची गोष्ट होती माझ्या आयुष्यात ती म्हणजे "ACP बनायचं स्वप्न" खूप प्रॅक्टिस करायचो मी खूप....ट्रेनींग चालू होती तेव्हा......पॅशन होतं माझं ACP व्हायचं...लहानपणी बघितलेला स्वप्न......ते फक्त माझंच स्वप्न नाही आबासाहेब माई अभि आम्ही पाहिलेला स्वप्न होता......पिहू आली आणि तीच ही ये स्वप्न बनलं.....माई नेहमी म्हणायची मला समाजाच्या उपयोगी याल असे कामं करा.....भारतासाठी कामं करा.....चांगली सर्व्हिस मिळवा.....बस्स तिथपासून मनात ठरवलं......त्या स्वप्नाकडे पोहोचलो पण होतो......फक्त काही महिन्यात माझ्या अंगावर वर्दी आली असती......नावापुढे ACP Indrajeet Bhosle असं आलं असतं......जीवाचा पाणी करून मी ते पूर्ण करायला गेलो......माझ आयुष्य सफळ झालं असतं.....पण मी अअअ....
असो मी काय म्हणतो चल इकडे जेवूया....



जिजा - अ हो हो...



इंद्रजीत - आणि इकडे एक हॉटेल आहे तिकडे थांबूया पण...म्हणजे रात्र झाले उगाच धोका नको....



जिजा - अ हा ठीके...
इंद्राss पिहू.....
(त्याने लगेच विषय बदलला....)



इंद्रजीत - हा हा पिहू पिहूच....फिजा ने तीच प्रेम सिद्ध केला.....मी तिला माझ्या मनात कायम ठेवून केला.....तिची इच्छा पूर्ण करून केला....ती म्हणायची लग्न करा, सुखी रहा तुमची पूर्ण फॅमिली पहिली की तेव्हाच मी मुक्त होईन.....



जिजा - मुक्त होईन???



इंद्रजीत - म्हणजे खुश होईल ती असा...



जिजा - अच्छा म्हणून माझ्याशी लग्न केलास होय 😒



इंद्रजीत - अग बाळा नाही गं...तुझ्यावर प्रेम झालं मला....कस असतं जनरली प्रेम दोनदाच होते....पहिलं सफळ नाही झालं तर दुसरं होतच.....आणि तू दुसरं, शेवटचं प्रेम आहेस माझं....💕 फिजा नंतर कुणाशी लग्न करेन असं नव्हतं वाटलं....पण तू मला वेड लावलास..😂



जिजा - ती अजून ही लक्षात आहे....?



इंद्रजीत - हो मग अगदीच ❤️ कायम असेल....बग ती आणि तिच्या आठवणी रोज मी काढत नसलो तरी माझ्यासोबत कायम आहे ती.....तिच्या आठवणी मनात एका बाजूला साठ्वल्यात....त्या आठवल्या की मी रडत नाही तर सुखवतो....इतकं मी स्वतः ला सावरून झालोय....आणि आता तू आहेसच....💕 शेवटी ती पहिलं प्रेम होती ना....❤️




जिजा - वाव!! किती गोड...💕 You are Great 💕



इंद्रजीत - वेडू 😂
.
.
.
.
.
रात्री जेवून दोघ हॉटेल वर येतात......इंद्रा बाल्कनी मध्ये बसलेला.....विचारात गुंगलेला.....रेडिओ वर हलक्या आवाजात गाणी चालूच होते....जिजा इंद्रा जवळ गेली आणि त्याच्या मांडीवर बसली.....




तिच्या येण्याने इंद्रा विचारातून बाहेर आला.....तिला जवळ घेतलं......गालावर हळूच किस केली.....आणि तिला उचलून घेऊन बेडवर झोपवलं.....मग तो ही तिच्या जवळ झोपला....





इंद्रजीत - बाहेर किती चांगला वातावरण आहे!! रोमँटिक.....तर आपण पण थोडं रोमँटिक होऊया...💌



जिजा - ओह हो😂
गप हा...




इंद्रा तिच्या जवळ जातो......हातात हात घेतो.....हळू हळू मानेवर त्याचे ओठ फिरवतो......पुन्हा तिच्यात बेधुंद होऊ पाहतो......तिच्या ओठांजवळ जातो.......तिला ही स्वतः मध्ये सामावून घेणायचा प्रयत्न करतो....पण जिजा कसल्या तरी विचारात पडली....



जिजा - इंद्राssss



इंद्रजीत - अम्म्मsss



जिजा - ऐक ना..मला सांग ना तुझ्या पास्ट मध्ये तुला पोलीस..अअअ.....



इंद्रजीत - शिईई झालं सुरु तुझा....अग मी तुझ्यावर प्रेम करतोय तू त्यात विलीन व्हायचं सोडून मला साथच देतं नाही आहेस...विचार करतं बसतेस सारखं....
(तिचा बोलण मधे तोडत.......)




जिजा - तस नाही बाळा...




इंद्रजीत - काय जिजा...मग कस?? अग नवीन लग्न झालं आहे आपलं.....या गोष्टी सातत्याने कराव्याशा वाटतात....आपण आपला खासगी वेळ भूतकाळात नको वाया घालवायला....समज जा जरा...घरी गेलो की मला ही कामं असेल आणि तुला ही....हा आनंदी वेळ वाया कां घालवायची.....




जिजा - बरं...पण हे आपण नंतर करू...तू पाहिले मला सांग....



इंद्रजीत - बरं बोल....तू कधी ऐकणार नाही...😡😒




जिजा - मला सांग तुला पोलीस व्हायचं होता मग कां नाही झालास त्यानंतर ही तू प्रयत्न कां नाही केलेस??




इंद्रजीत - नाही जमलं..माझं सिलेक्शन झालेला म्हणून तर ट्रेनींग ला होतो.....पण एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात ट्रेनींग, वेळ सगळं वाया घालवला मी म्हणून ती स्वप्न नाही पूर्ण झाली.....असं लोक म्हणतात...मला नाही कधी वाटलं......त्यानंतर ही मी शॉक मध्ये होतो म्हणून, मग हळूहळू काय सगळंच बंद झालं...आणि स्वप्न ही बंद झालं....संपलं....



जिजा - हम्म मी काय म्हणते.....त्यावेळी नाही होऊ शकलास....आता होऊ शकतोस की?



इंद्रजीत - काय...?



जीत - किती age limit असते अशी....तू आता पण ट्राय करू शकतोस ना....म्हणजे त्या घटनेला फक्त दोन ते तीन वर्ष झालेत...



इंद्रजीत - हा तस age limit आहे पण त्यात मी अजून बसतोय...वय नाही गेलं अजून...पण....



{मला काही माहित नाही हा....वय मर्यादा असते किंवा नसते ते.....हे काल्पनिक आहे लक्षात घ्या....उगाच चुकीची माहिती घेऊ नका.....IPS किंवा पोलीस होने सोपे नाही......❤️☺️}





जिजा - हा मग...नॉर्मली ACP एकवीस ते तेवीस वयाचे असतात.....तुझा वय सत्तावीस आहे...अजूनही फिट आहेस....मग काय हरकत आहे....



इंद्रजीत - नाही जिजा...हा विचार मनातून काढ... No..



जिजा - कां पण...



इंद्रजीत - नाही म्हंटल ना...बस्स म्हणजे बस...



जिजा - अरे पण माझी ही इच्छा आहे....



इंद्रजीत - सध्या माझी इच्छा तुझ्यासोबत असण्याची आहे.....
(तिच्या जवळ जात)



जिजा - इंद्रा ऐक ना....



इंद्रजीत - हम्म ह्म्म्म



जिजा - ऐकतच नाहीस तू...😒



इंद्रजीत - जाऊदे आपण झोपूयाच...हम्म गुड नाईट....



जिजा - अरे...🙄झोपला..



*****************************

(भोसले निवास)



ममता - अहो..आले हो मुलं....
या बाळांनो....



जिजा - कशा आहात माई....



ममता - मी बरी आहे हो बाळा..तुमचा फिरणं प्रवास नीट झालं ना??



जिजा - हो एकदम...



राजाराम - सुनबाई आपलं घरं आवडल ना? आणि गाव??



जिजा - हो आबासाहेब खूप छान आहे गाव आणि घर सुद्धा आपलं.....



राजाराम - वा वा वा...बरं झालं....चला या आत...



तारा - दिदा....इंद्रा.....



जिजा - अरे कसंय माझं बाळ...?



तारा - एकदम मस्त दिदा....



इंद्रजीत - काय डार्लिंग नीट राहिलीस ना आमच्याशिवाय...



तारा - हो मग पार्टनर...☺️
माई आणि आबा माझ्यासोबत झोपायचे रोज....माई रोज मला भरवायच्या....आबासाहेब शाळेत यायचे....



जिजा - थँक्यु माई आणि आबासाहेब.....



राजाराम - काय सुनबाई आमच्या मुलीला आम्ही फिरवलं म्हणून धन्यवाद म्हणताय काय....



ममता - बघा ना...आम्हाला आमची मुलगी मिळाली....आमची बऱ्याच वर्षा पासून असलेली इच्छा पूर्ण झाली मग आम्ही तिचे लाड नाही कां करणार....



तारा - हो ❤️



जिजा - हो...



इंद्रजीत - हा मग अगदीच...💕



राजाराम - बरं आणि काय म्हणता.....?



इंद्रजीत - अभि कुठंय?



ममता - तो गेलाय बाहेर कुठे....



ओवी - मामा मामा.....इंदला मामा......



इंद्रजीत - अरे सखू आज घरीच आहे तू??



ओवी - हो आज सुट्टी आहे शाळेत मामा...



जिजा - ओवी तुझ्यासाठी आम्ही खूप गिफ्ट्स आणलेत..



ओवी - खरंच सामी...थँक्यु...



जिजा - अर्चू ताई दिसत नाहीत कुठं?



ओवी - अग ती कामाला जाते की नाही...मग



जिजा - अरे देवा विसरलेच...😂


ममता - चल ओवे तुला खाऊ देते...मामा मामी ला अराम करू दे....




ओवी - हम्म आता तू मला कटवते ना....ठीके आता जाते मी...😒



जिजा - बाई 😂



ममता - ही मुलगी ना खरंच....तुम्ही जा आवरा हम्म मी बघते कुठे गेली ते....




राजाराम - हा मी पण माझी कामं करतो....तुम्ही आराम करा....



जिजा - हो....तारा होमवर्क झाला??



तारा - हो गं...



जिजा- आणि रिविजन?



तारा - 😜



जिजा - हम्म जायचं मग आणि करायच ओके... मग टीव्ही....



तारा - ओके हिटलर दिदा...



जिजा



इंद्रजीत - हम्म...
.
.
.
.

जिजा कपडे घेते आणि फ्रेश व्हायला निघून जाते......इंद्रा सुद्धा दार लावून घेतो अन तिच्या मागे जातो.....त्याला असं बघून ती थोडं घाबरते.....



जिजा - अअअ अरे इंद्रा तू बाथरूम मध्ये काय करतोयस...बाहेर जा...



इंद्रजीत - कां? करूयात ना सोबत अंघोळ...



जिजा - जिजा अग हे सगळ्या आठवणी,क्षण साठवून ठेवायचे असतात.....आणि तू 😔😒जाऊदे....जातो...



जिजा - अरे अरे बरं....घेऊयात ना सोबत बाथ....😂



इंद्रजीत - ओहो...😂बायको...ssssss
(तिला उचलून घेत....)



जिजा - इंद्रा सोड पडू अरे आपण...😂



इंद्रजीत - हम्म..💕👀




जिजा आणि इंद्रा दोघ ही सोबत फ्रेश होतं असतात......एका शॉवर खाली दोघेही त्यांचा मोमेन्ट एन्जॉय करतं होते......💕



इंद्रजीत - वाह मज्जा आली हू बायको....रोज असा बाथ मिळायला हवा....



जिजा - गप्प बस हू..ये इकडे केसं पुसते तुझे....




इंद्रजीत - येस..!!




जिजा - इंद्रा..



इंद्रजीत - हा बोल बायको...



जिजा - बोलते मी..पण तू काय हे नवीनच बायको बायको बोलायचं काढलास.... 😂



इंद्रजीत - कां गं आवडत नाही कां तुला?



जिजा - असं काही नाही तुला आवडत ना...बस झालं मग...जे तुला आवडत ते मलाही आवडत...



इंद्रजीत - हो....बोल मग?



जिजा - ऐक न..मी काय म्हणते....



इंद्रजीत - बोल



जिजा - माझं शिक्षण आता पूर्ण झालंच आहे...तर मी नोकरीं करू कां???






इंद्रजीत - कां? काही कमी आहे कां तुला किंवा छोटू पार्टनर ला....??



जिजा - नाही इंद्रा...पण मग माझ्या शिक्षणाचा उपयोग काय? मला स्वतः च्या पायावर उभ करायच स्वप्न होतं बाबा आणि आईच....एखाद्या चांगल्या बँकेत नोकरीं बघायचं विचार करते मी....मला पगार जास्त असावं किंवा दुसरं काही अशी इच्छा नाही फक्त स्वकमाई करायची आहे....माझ्या शिक्षणाचा उपयोग व्हावा असं काहीतरी करायच....आई बाबा पण खुश होतील हे पाहून...



इंद्रजीत - माझी परवानगी नाही.....तू जायचं नाहीस...आता कारण नको विचारूस



जिजा - अरे पण कां?



इंद्रजीत - नाही म्हंटल ना कळत नाही कां तुला? 😡 सतत प्रश्न विचारते....



जिजा - कां नको करू प्रश्न कां नको 😡 माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे...माझा हक्क आहे..



इंद्रजीत - हो कां बरं...



जिजा - तुला विचारते कारण कर्तव्य आहे माझा...नाहीतर मला कोणाच्या परवानगी ची गरज नाही..😒😡नवरा आहेस म्हणून तुझ्या मर्जीने कां वागू... कुठे ही जाईन काहीही करेन...😒



इंद्रजीत - जिजाssss 😡
जास्त बोलतेस हू...तोंड सांभाळून जरा....
(ओरडत.....)



जिजा - अ अ अ ओरडतोयस कां 😕



इंद्रजीत - मग तू पण नीट बोल...नवरा आहे मी तुझा समजलं...नाही म्हणतोय तर कारण असेल ना....उगाच बोलतो कां मी....कधी ऐकत नाहीस तू स्वतःच्या मनाचं करतेस मग फसतेस....



जिजा - स स स सॉरी 😔 पण....



इंद्रजीत - चूप......😡
(खाली निघून जाताना.....)




जिजा - इंद्रा....इंद्रा....अरे....
(त्याच्यामागे पळताना...)



ममता - अरे अरे जिजा काय झालं...



राजाराम - इंद्रा थांब....



ममता - काय झालं इंद्रा?



इंद्रजीत - तिला विचारा...



अभिजीत - अरे....अ काय झालं गं जिजा?? किती गोंधळ चालाय....



जिजा - मी.... (सगळं सांगते....)



ममता - इंद्रा अरे नको कां म्हणतोयस मग... ती बरोबर बोली....



राजाराम - हो ना नोकरीं केलीच पाहिजे ना... नाहीतर तिचा शिकून उपयोग काय...



अभिजीत - आणि भाऊ आजच्या काळात स्त्रिया सुद्धा नोकरीं करताच की....



इंद्रजीत - मान्य...मान्य आहे...पण तारा आणि जिजाच्या जीवाला धोका आहे....माहिते ना....त्यात आता दोघी आपल्या घराशी जोडल्यात म्हणजे जास्त खतरा या सगळ्या रिस्क मध्ये जिजाला कस पाठवू मी?? काय झालं तर?? शिवराज काका आणि दिव्या काकूंच्या इन्सिडेंट नंतर मी रिस्क नाही घेऊ शकत.....आणि पॉजिटीव्ह विचार ही नाही करवत जास्त....काळजी वाटते मला तिची.....भीती वाटते.....दरवेळीस मीच येईन वाचवायला असं नाही ना.....चुकीचं आहे कां?
कधी मला उशीर झाला आणि जिजा?.....वचन दिलंय मी हिच्या आई बाबांना....समजलं......तरी पण तुम्हाला योग्य वाटतं ते करा......
😕💔
(तो शांत झाला.....आणि निघून गेला......)




जिजा - इंद्रा....😔



तारा - दिदू डार्लिंग बोलतो ते बरोबर आहे....आपल्यावर खतरा तर आहे....
तुला काय झालं तर माझं कोण नाही 😕




जिजा - गप्प बस काही नाही होतं....



ममता - इंद्रा बोलतोय तर बरोबर..पोरीला धोक्यात कस टाकणार....



राजाराम - गप्प बस ममता...बरोबर तो बोलत ही असेन...पण बाहेर खतरा आहे म्हणून मी जर घरा बाहेर जायचं बंद केलं असतं तर आज हे साम्राज्य उभ राहील असतं....???




अभिजीत - नसतं आबासाहेब....



राजाराम - मग हा कधी पासून घाबरायला लागला....



अभिजीत - आधी पण त्याने त्याचा प्रेम गमवलंय आबासाहेब.....ते ही खूप बेकार पद्धतीने.....म्हणून तो घाबरतो💔 गमवायचं दुःख मी ही समजतो आबासाहेब.....



ममता - अ काय?



अभिजीत - म्हणजे तेच माई....त्याचा घाबरण सहाजिक आहे...



ममता - हो पण हे सुद्धा योग्य बोलतात...घाबरन हा प्रकार नाही भोसले कुटूंबात.....आणि तो खतरा कधी ना कधी टळणार आहेच....... मग आपण आपलं आयुष्य जगू नये कां......जिजा तू कर नोकरीं पण ते ही पूर्ण सुरक्षेसहं ठीके ना?



जिजा - हो माई मान्य....😃



राजाराम - हो कर तू बिन्दास्त...फक्त काळजी घे...एकटी जाऊ येऊ नको..आम्ही सांगू तस कर....



जिजा - हो....



अभिजीत - पण भाऊ??



ममता - तो पण ऐकेल...मजवून आपण...😅




अभिजीत - हो नको काळजी करुस जिजा...



जिजा - चालेल....




अभिजीत - खुश आता 😃



जिजा - हो 😃



तारा - अभिनंदन दीदी...



जिजा - थँक्यु छोटी....
खरंच थँक्यु आबासाहेब माई आणि अभ्या...❤️



अभिजीत - अरे बस कां...



राजाराम - तुमच्यासाठी काय पण...



ममता - 😂



तारा - 😂



जिजा - 😂😂




मध्यरात्री उशिराच इंद्रा घरी आला....त्याने थोडी ड्रिंक ही केलेली.....जिजा वाट पाहत डायनींग टेबल वर झोपली.....इंद्रा तिच्या जवळ आला.....तिच्या डोक्यावरून हात फिरवणारच होता की त्याला समोर ठेवलेल्या लॅपटॉप मध्ये दिसलं की जिजाने नोकरीसाठी अप्लाय ही केला.....हे पाहून त्याला जास्त राग आला.....आणि तो तसाच रागात वर निघून गेला.....
त्याच्या पावलांच्या आवाजाने जिजाला जाग आली..



जिजा - अम्म अम्म कोण?
अरे इंद्रा...इंद्रा....आताच आला वाटतं....जेवण घेऊन जाते.... भूक लागली असेल....
.
.
.
.

इंद्रजीत - जिजा असं करूच कस शकते हा....मी नाही म्हंटलो तरी अप्लाय सुद्धा केला....नोकरीं पहिली सुद्धा....माझी परवानगी ही घ्यावी नाही वाटली म्हणजे माझी काळजी करणं सगळं वाया...😡😡



जिजा - इंद्रा....माय डार्लिंग....आज मी आमरस पुरी बनवले....तुला आवडते ना...म्हणून.... चल पटकन जेवून घेऊया....मला ही भूक लागले....



इंद्रजीत - जेवून घ्यायचं मग तू.? तुला थांब कोण म्हंटल....



जिजा - मी. माझ्या मनाने थांबले....



इंद्रजीत - हम्म बरोबर तू तुझा मनाचं ऐकते...मग मला विचारायचं परवानगी घ्यायची नाटक कां करतेस 😡



जिजा - अरे म्हणजे?



इंद्रजीत - नोकरीं साठी अप्लाय सुद्धा केलास 😡😡मला विचारलंस....स्वतः च्या मनाचं करायच होतं मग मला विचारायचं नाटकं कां? शिई इतकं खोटं वागतेस...एकदम बनवटी....



जिजा - अरे मला घरातले म्हणाले....सुरक्षेसह जा....आणि मी तुला आल्यावर सांगणार होते....पण.



इंद्रजीत - हम्म सांगणार होते.....



जिजा - हो मी...इंद्रा...are u drunk??
(त्याच्यापासून लांब होतं......)



इंद्रजीत - yes im drunk....fully....😡you have any problem???



जिजा - yes...मला नाही चालणार ड्रिंक केलेली....



इंद्रजीत - मग मी. कां ऐकू तुझा...मी पण तर माझ्या मनाचा राजा आहे...



जिजा - पण मी तुझ्या चांगल्याच सांगते....



इंद्रजीत - हा मग मी पण तुझ्या भल्याच सांगतो....
काका काकूंना गमवाल्यानंतर तुझी अवस्था बघून खूप खचलो मी पण.....तुला सावरायचं होता म्हणून कणखर म्हणून राहिलो....मला सतत काळजी वाटते....तारा स्कुल्ला गेले...हे विचार मनात आलं की काळजी सुरु होते....मग मी जीवाला तिच्यासोबत पाठवतो.....मल्हार ला घरी थांबवतो....तारा शाळेतून आली की मला चैन पडतो.....तुला पण बाहेर जाऊदेत कां नाही? कां नाही? हेच कारण....तुझ्या वडिलांचा दुष्मन जो पण आहे त्यांचा हेतू काका काकूंना मारणं आणि मग त्यांचा वंश संपवन असं आहे.....मला हे कळून चुकलं तेव्हापासून मी सतर्क राहायचं प्रयत्न करतोय....आता सांग मी खरंच चुकतोय...am i wrong??? 😔



जिजा - नाही इंद्रा तू नाही चुकीचा.....मी तुला चुकीचं समजलं.....मला माफ कर...पण आपण काळजी घेऊ ना....सेफ्टी घेऊ.....पण प्लिज मला नोकरीं करू दे...



इंद्रजीत - म्हणजे मी इतकं बोलण्याचा काहीच उपयोग नाही....😡😡 You are Impossible 😡 आजपासून माझ्याशी बोलायचं नाही तू....कारण मला प्रचंड राग आलाय तुझा.....आपले वाद नको म्हणून मी गप्प बसतोय नाहीतर 😡सांगितलं असतं तुला.....अजिबात बोलायचं नाही तू माझ्याशी.....मी इतकं बोलतोय तरी तेच....माझ्यापेक्षा जास्त जरुरी ते आहे तुला.....



जिजा - हो आहे कारण माझ्या बाबांचं स्वप्न आहे.....आणि तू मधे अडचण बनतोयस....



इंद्रजीत - म्हणजे मी? अडचण.....? अग मी नाही असं म्हणत नाही आता नाही असं म्हणतोय गं....नंतर जा ना...काही वर्ष थांब....



जिजा - असं घाबरून मी कां घरातच राहू....??? माझ्या पायावर उभ नको राहू....घाबरले तर मी जिजा कसली....घाबरले तर नाही मी एका पोलिसांची मुलगी आहे आणि नाही भोसलेंची सून....



इंद्रजीत - ठीके तुझा ठरलंय...मग माझं ही ठरलंय....समजलं.... 😡 don't talk with me..sssssss😡
(ओरडून.....)



जिजा - इंद्रा....😭इंद्रा......




इंद्रजीत - सोड हात..सोड....
(बाहेर निघून जाताना......)




जिजा - इंद्रा....😭😭😭
.
.
.
.

इंद्रजीत टेरेस वर गेला......तिकडेच पलंगावर झोपला.....डोळ्यात नकळत पाणी साचले......सगळं विसरायला त्याने कानात इअरफोन लावले...त्याचे आवडते जुने गाणे लावले.....डोळे बंद केल्यावर त्याला जिजासोबतचे सगळे क्षण आठवले.....जिजा ही दिसली....तो त्या क्षणामध्ये हरवून गेला....



🎶 💭 🎶


मेरे रंग में.....
रंगने वाली...
परी हो या हो परियो की राणी.....
या हो मेरी प्रेम कहाणी.....
मेरे सवलो कां जवाब दो?
दो ना?....


🎶


"तू?...........हो मगापासून मीच होतो लाईट गेल्यावर बदलोय नाही मी......."


"तू गप्प बसायचे काय घेशील?..............दहा करोड😂.............अअअअअ I Will kill uh😡"



"देवा मला या माणसांसोबत कां फसवलंस इकडे लिफ्ट मध्ये...ज्याच्यासोबत मी श्वास ही नाही घेऊ शकत.......

मग तू अजून जिवन्त कशी? 😂🙄"


"तू गब्बरच आहेस.......मग तू हाहाकारी आहेस.....😡"



"अरे बिन्दास्त शिट्टी वाजवायची त्यात काय..."



"हो मला राग येतो तू अनु सोबत बोलशील की...."



"अरे तुमको क्या लागया....हम कोई भिकारी नहीं ये कौन है माहित है क्या तुम्हारे को...."




"अरे मै है ना तुला क्यू टेन्शन आता है हा..."



" हा हा माझी हिंदी खराब आहे म्हणून काय झाले..मी बोलणार..... "



"चल ना जाऊया पहिल्या पावसात भिजायला...अहाहा..."



"इंद्रा I Love You❤️"



"त्याचं लग्नातले क्षण.........❤️"




बोलोना क्यू ये चाँद सितारे......
तकते है यू मुखडे को तुम्हारे......
छुके बदन को हवा क्यू मेहकी......
रात भी क्यू बेहकी बेहकी......
मेरे सावलो कां जवाब दो.....
दो ना.....



"त्यांच्या पहिल्या रात्रीचे क्षण.....तो पहिला वहिला स्पर्श......❤️त्याचं मिलन......जिजाच रूप❤️"



क्यू हो तुम शरमई हुई सी.....
लगती हो कुछ घबराई हुई सी.....
ढलका हुआ सा आंचलं क्यू है......
ये मेरे दिल में हलचलं क्यू है......
मेरे सावलो कां जवाब दो......


दो ना..... ❤️




सकाळी इंद्राचं डोकं जड झालेला.....
तो फ्रेश होऊन खाली आला, सगळ्यासोबत बसला......




ममता - हे घे इंद्रा चहा....डोकं थांबेल...असं अचानक कां दुखतंय...




राजाराम - ड्रिंक करून आले असतील रात्री....काय? बंद करा आता...



इंद्रजीत - केव्हातरी असतं आबासाहेब रोज नाही....




राजाराम - तरी बंद करा...कधीतरी करता आणि एकदाच भर काढता...लग्न झालंय आता तुमचं...उदयाला बाप पण व्हाल...असच चालू असलं तर काय उपयोग...जिजाची सेफ्टी ठेवायच्या बदली चांगलीच लपरवाही चालले....



इंद्रजीत - नाही आबासाहेब!!



जिजा - हम्म हे घे...लिंबू पाणी...कमी होईल दुखायचं....



इंद्रजीत - नकोय..मी गोळी घेईन....मला हँगओव्हर नाही झालाय.... 😒



जिजा - मगं?



इंद्रजीत - मला ते...
अ अ अ अ काही नाही...मी निघतो माई...



ममता - अरे नाश्ता कर...



इंद्रजीत - नको नको....



राजाराम - जिजाबाई इंटरव्हिव कधी?



जिजा - त्याच्याकडून रिप्लाय आला की लगेच इंटरव्हिव....



ममता - अरे वाह बरं झालं...
.
.
.
.

इंद्रजीत - वाह खूप चांगला रिपोर्ट दिलाय हू तुम्ही तिघांनी पण...



समर - थँक्यु सर...



अनुसया - थँक्यु...



माधुरी - हो सर...



इंद्रजीत - बरं असच कामं चालू असुद्या...मी आता निघतो माझी एक मिटिंग आहे ती पूर्ण करतो..



अनुसया - हो तू....



माधुरी - हो सर अ तुम्हाला ऍड्रेस सेंड केलाय मी...जाऊन या सर...



इंद्रजीत - हो



अनुसया - माझं बोलण मधे तोडते....आणि ही कधीपासून हे कामं करायला लागली.....
(मनात....)



इंद्रजीत - चला येतो..



अनुसया - हो...








इंद्रा त्याच्या एक दोन बॉडीगार्डस सोबत मोठ्या हॉटेल मध्ये बसून क्लायेंट्स ची वाट बघत होता......


थोड्यावेळाने एक वेटर पाण्याचा ग्लास सोबत एक चिठी घेऊन आला......


📩
"एवढा बिन्दास्त बसलायस........ वाह!........जिचा प्राण वाचवायचा तू प्रयत्न करतोयस त्याच्याआधी तुझेच प्राण घेण्याचा आमचा विचार चालू आहे......तू मेलास की जिजाला मारणं म्हणजे मुंगी मारण्याचा कामं......नाही कां??
काय कशी वाटली कल्पना.......?"



चिट्ठी वाचल्या बरोबरच इंद्रावर फायरिंग सुरु झाली...
कुठून कशी? काही समजलं नाही....कुणी दिसतच नव्हतं......
इंद्रा लपत लपत एका टेबल मागे गेला......
फायरिंग चालू असताना एक गोळी त्याच्या दंडाला लागली......

त्याचे बॉडीगार्डस फायरिंगं करतच होते.......
इंद्रा लपून पाहत होता फायरिंग कुठून होतेय......
त्याचा लक्ष समोरच्या अपार्टमेंट कडे जात....तिकडून दोन माणसं फायरिंग करतं होते.......


इंद्राने त्याची बंदूक काढली आणि सरळ त्या दोघांवर गोळी बार केला........
त्यांनी इंद्राला मारण्याआधी इंद्रानेच त्यांना मारलं......
हॉटेल मध्ये गोंधळ सुरु झाला.......
मॅनेजर ने पोलीस बोलावले होते, त्यांनी त्यांची बॉडी ताब्यात घेतली.......इंद्राची थोडी चौकशी केळी.....
मग ताबडतोब इंद्राला हॉस्पिटल ला हलवलं गेलं....


**************************



ममता - जिजा वाटपौर्णिमा येतेय हू...तुझा लग्नानंतरचा हा पहिलाच सण असेल नाही कां गं???



अर्चना - हो गं माई...



ममता - यावेळी आपल्या घरातही साजरा होणार तर...



तारा - माई वाटपौर्णिमा कां साजरी करतात गं??



ममता - सांगते हू,
असं म्हंटल जात की वाटपौर्णिमा या सणाला वडपौर्णिमा किंवा सावित्रीपौर्णिमा किंवा वडसावित्री म्हंटल जायचं.....
सावित्री ही तुमच्या सारखीच गोड मुलगी होती...पूजा पाठ आणि संस्कारात वाढलेली.....तिचा लग्न सत्यवान नावाच्या तरुणशी झालं......सावित्री खूप पतीव्रता होती.....पती जेवत नाही तोवर न जेवण...त्याचे पाय दाबन...पुरेपूर काळजी घेणं.....तिचा हा पतीव्रता धर्म देवांना ही आवडायचा....देव ही तिच्यावर खुश होते त्यांचा पण आशीर्वाद तिच्यावर होता.....नंतर असं समजलं की सत्यवानचा मृत्यू याच वयात होणार आहे......
सावित्री घाबरली नाही तिने मनाशी ठाम केलं की सत्यवान ला ती मरू नाही देणार.....त्याचे प्राण कोणाला घेऊन जाऊ देणार नाही.....

जेव्हा यमाने सत्यवान चे प्राण घेतले तेव्हा ती यमच्या मागे गेली......आणि यमाशी भांडून बिंडून तिच्या नवऱ्याचे प्राण परत आणले.......तो शंभर वर्ष जगेल असा आशीर्वाद घेतला.....त्यावेळी सत्यवान च देह हा वड वृक्षा खाली होता.....तिकडेच त्याचा प्राण मिळाले शभर वर्ष जगण्याचं आशीर्वाद मिळाला.....सावित्रीने प्रथम वटसावित्री ची पूजा केली......सात जन्म हा पती मिळावा तो शंभर वर्ष जगावा म्हणून प्रार्थना केली......
तिथपासून ही प्रथा सुरु झाली.....वटसावित्री याच नाव वाटपौर्णिमा पडलं....




तारा - वाव!! पण माई यम देव हे कस दिसलें तिला?



ममता - अग तो युग दुसरा होता...कायतरी द्वापारयुग कां काहीतरी गं....पक्क आठवेना पण त्या युगामध्ये देव यम सगळे दिसायचे म्हणे....देव सुद्धा दर्शन द्यायचे....



तारा - that's great!!



ओवी - ओह ओह
(टाळ्या वाजवत....)



जिजा - मस्त माई...छान पद्धतीने सांगितलं...
बरं मी आले हू गॅसवर जेवण ठेवलंय....



अर्चना - हा ये,माई मस्त सांगितलंस गं...



जीवा - भाऊ सावकाश या हा....



मल्हार - भाऊ हळू हा हळू....



इंद्रजीत - अरे हाताला लागलंय पायाला फक्त घासलंय...चालू शकतोय मी....



जीवा - भाऊ काळजी वाटते तुमची....



ममता - हू इंद्रा इंद्रा...काय झालं??



अभिजीत - भाऊ...



अर्चना - अरे काय झालं?



तारा - ए डार्लिंग काय झालं तुला...




जिजा - तारा...अरे काय झालं...?



जीवा - वहिनी भाऊ....



जिजा - काय झालं इंद्रा ला..इंद्रा... हू काय झालं?



राजाराम - आज इंद्रावर फायरिंग झाली...आणि त्यात त्याला गोळी लागली हाताला....पायावर घासलं....



जिजा - काय इ इंद्रा जास्त लागलं कां तुला हू..जास्त लागलं कां....?



इंद्रजीत - नाही मी ठीक आहे...



अर्चना - अचानक कस?



राजाराम - त्याला एक चीट्ठी आली होती.......
(सगळं सांगितलं.......)



अर्चना - काय म्हणजे ते फायरिंग करणारे जिजाचे दुष्मन......हं होते.....



जिजा - काय? म म्हणजे माझ्यामुळे....



इंद्रजीत - ताई असं काही नाही समजलं...उगाच काय पण नको बोलूस....
कुणीही माझा विचार नका करू.....मी ठीक आहे सनी नेहमीच असेन....मी वर जातोय....



ममता - सावकाश जा....सावकाश....




इंद्रजीत - हो....माई.... ते....




अभिजीत - जिजा.....जिजा....काय झालं??
(तिच्या मागे पळत जाताना.....)



अर्चना - जिजाला हर्ट झालं बहुतेक....



ममता - मग तुला कोण म्हंटल असं बोल म्हणून हू...



राजाराम - जिजा आता आपली आहे...तिचे प्रॉब्लम्स पण आपलेच आहेत.....यात तिची काय चूक आहे पण...



तारा - मी जाऊ कां?



ममता - नको बाळा अभि दादा समजवेल तिला....



अर्चना - सॉरी...



इंद्रजीत - मी पण जातो.....टेरेस वर गेले वाटतं....



ममता - सावकाश जा इंद्रा...



अभिजीत - ए काय झालं? रडतेस कां??



जिजा - माझ्यामुळे इंद्राला....😭



अभिजीत - अग असं काही नाही....तुझ्यामुळे म्हणजे तू पाठवले होतेस कां ते गुंड....अग दुष्मनी अशीच असते....खतरा तर असतोच ना.....पण माझा भाऊ फायटर आहे तो कधीच हरत नहीं.....तू कां काळजी करतेस....



जिजा - हो पण इंद्रशिवाय कुणी नाही माझं....😔



अभिजीत - हो गं त्याला काही नाही होणार...डोन्ट वरी...आम्ही पण आहोत ना.....बाप्पा पण आहे हू तू घाबरू नकोस.....



इंद्रजीत - जि........
(बोलताना थांबत....)



अभिजीत - रडू नको ये इकडे....
(तिला मिठी मारत.....)



जिजा - हू...



अभिजीत - शांत हो...शुईईईई




जिजा - हम्म जाते मी पण मला जरा मळमळत आहे....




अभिजीत - ओके रेस्ट कर... हू... आणि पुन्हा असं विचार नाही करायचा....
.
.
.
.

रात्री इंद्रा ला शर्ट बदलायचं होतं......पण हाताने जमत नव्हतं.....जिजा तेवढ्यात जेवणाचं ताट घेऊन आली.....त्याची चुळबुळ बघून ती त्याला मदत करायला गेली....



जिजा - दे मी हेल्प करते...



इंद्रजीत - No Thanks....



जिजा - अरे दे...बँडेड मधून उगाच रक्त येईल....
नको नाटकं करुस...



इंद्रजीत - पण... मी....



जिजा - शुईईईईईई दे....



जिजा त्यांचा शर्ट काढते.......जवळ आल्यावर तिच्या शरीरातून येणारा पर्फ्यूम चा स्मेल इंद्राला वेड लावत होतं......त्यांचा राग वितळत होता......पण त्याला तस होऊ द्यायचं नव्हतं.....



इंद्रजीत - हम्म थँक्यु....



जिजा - जेवून घे मग गोळी पण खायची आहे....



इंद्रजीत - हम्म मी जेवतो तू जा...झोप....



जिजा - कां इकडे बसून तुला कंपनी देते ना....😃



इंद्रजीत - नकोय तुझी कंपनी...जा बोल ना इकडून 😡



जिजा - काय झालंय तुला ओरडतोयस कां इतका.... 😔



इंद्रजीत - समजतं नाही न तुला आणि हे स्वतः ची मर्जी माझ्यावर नाही लाधायची.....😡मी पण हवं ते करेन....लग्न झालो म्हणजे तुझा गुलाम नाही....



जिजा -ह्म्म्म 😔



इंद्रजीत - जा आता....



जिजा - तुला मी इतकी वाईट वाटते.....मी फक्त नोकरीं करते बोलली तर इतकं.....मला कळत की तुला काळजी आहे माझी म्हणून बोलतोस....पण बस ना आता....नको ना दुरावा.....नको रुसवा.....मला नाही राहवत तुझ्याशिवाय.....माझं कोण आहे सांग या जगात 😭आई बाबा नंतर तूच आहेस.....आता तू पण मला सोडतोयस माझ्याशी बोलण सोडतोयस.....😭कस जगू मी😭😔
(जोरजोरात ओरडत....)



इंद्रजीत - अरे यार.....जास्त बोललो मी....काय यार शीटssss........😕
(मनात...)



जिजा - ठीके जाते मी...जेवून घे गोळ्या घे....बाय....😭



इंद्रजीत - बाळा सॉरी मला माफ कर......ह्या इंद्रजीत भोसलेचा रागच खूप महागात पडतो त्याला......काय करू? तू ऐकत नाहीस.....मला जे आवडत नाही ते करतेस? भीती इतकी मनात बसले की तुला एकटं सोडावंसं वाटतं नाही....😔सॉरी....


**************************



सकाळी सगळे नाश्ताच करतं बसलेले.......वातावरण एकदम शांत, प्रसन्न होता.......जिजा खाली आली नाही म्हणून सगळे जरा विचारात पडले.......तेवढ्यात शांतता भंग करतं जिजा पळत खाली आली....



जिजा - माईss आबासाहेबsss अभिssss इंद्राssss इंद्राssssssssssssss😃😃



ममता - अग अग हळू बाळा पडशील....?



राजाराम - धावताय कां सुनबाई??



अभिजीत - काय मॅडम काय झालं???



जिजा - अ ते माझ्याकडे गुड न्यूज आहे...गुड न्यूज...😃




समोर नाश्ता करतं बसलेल्या इंद्राला आणि अभिला हे ऐकून जोरात ठसका लागला........दोघ ही खोकायला लागले.......मग एकमेकांना पाहत होते......




अभिजीत - हो भाऊ ती गुड न्यूजच बोलली.....
हो 😃



इंद्रजीत - हा...😃
पण..... 🙄



काही क्षण इंद्रा सुद्धा खुश झाला......😃 पण थोडं गडबड वाटली....? 🙄



ममता - काय सांगतेस जिजा??



जिजा - हो माई...आताच समजलं मला तस धावत आले तुम्हाला सांगायला....😃🤧



राजाराम - अरे वाह वाह!! सकाळीच आनंदाची बातमी...ती ही इतकी मोठी....



अभिजीत - जिजा अग मग तू धावत कां आलीस?



जिजा - मग कस येऊ???



अभिजीत - अग हो पण सावकाश ये तुझी तब्बेत पण खराब आहे ना काल पासून मळमळत होतं म्हणतेस....



जिजा - आता मी एकदम मस्त आहे हे बग....
(उडी मारून दाखवताना.....)



अभिजीत - ए ए ए अग....



ममता - जिजा जिजा जिजा....आशा वेळेत उडी नाही मारायची.....



जिजा - काही नाही हो माई...बरं आहे...



इंद्रजीत -जिजा...खरंच गुड न्यूज??



जिजा - हो इंद्रा...😃



ममता - आता भरपूर तयारी करावी लागेल ना...



जिजा - मी केले सगळी...आजच इंटरव्हिव ला जायचंय..फक्त आता थोडी शॉपिंग करायची आहे...बॅग काही कपडे ऑफिशिंयल.....



ममता - इंटरव्हिव???



जिजा - हो अहो माई ज्या बँकेत अप्लाय केलं होता तिकडून रिस्पॉन्स आला आज बारा वाजता इंटरव्हिव ला बोलवलय...हेच सांगायला मी पळत आले....पण मी सांगायच्या आधीच तुम्हाला खबर लागली वाटतं....



राजाराम - तू हे बोलत होतीस?



अभिजीत - तुझी ही गुड न्यूज होती??



जिजा - हो...कां??



ममता - अग बाई..... 😂😂😂



राजाराम - 😂😂😂😂😂



अभिजीत - 😂😂😂😂



इंद्रजीत - 😏😑😑😑😑😑



जिजा - काय झालं हस्ताय कां??? 😃



ममता - अग अ अ आम्हाला वाटलं की तू..प्रेग्नेंट आहेस....ही गुड न्यूज.....



जिजा - काय...😑बापरे....🤧😅 नाही नाही माई...



ममता - वेडी...🤣



इंद्रजीत - हम्म तरी मला गडबड वाटलेलीच...लग्न झाल्यापासून फक्त दोनदा - तीनदाच आलोय सबंधात त्यानंतर महिना उलटला अजून नाही.....मग ही प्रेग्नेंट होईलच कशी.....😏वेडी नुसती....
(हळू पुट पुटत...)



अभिजीत - भाऊ....🙄मी बाजूलाच आहे....



इंद्रजीत - अअअअ अरे तू...🙄कधीपासून 🙄



अभिजीत - जेव्हा तू मोजत होतास.....दोनदा - तीनदा तेव्हापासून 😂😂😂😂



इंद्रजीत - अ हे आपल्यातच राहू दे काय??



अभिजीत - ओके नंतर गुगल पें ला पाच हजार पाठव....फिर ये बात आपने में ही रहेगी भाऊ.... 😂



इंद्रजीत - भाई है की कसाई.... 🙄



अभिजीत - हू भाई... 😂



राजाराम - असो सुनबाई अभिनंदन!!



अभिजीत - अभिनंदन जिजाबाई 😂



ममता - अभिनंदन बाळा...



जिजा - इंद्रा तू नाही करणार विष???




इंद्रजीत - सर्वात आधी तू पूर्ण वाक्य बोलायला शिक...😡आणि कां करू? जि गोष्ट माझ्या मर्जी शिवाय होतेय मी कां खुश होऊ....😏जा काय करायच ते करा....
येतो माई....



जिजा - इंद्रा.... 😔



ममता - जिजा बाळा उदास कां होतेस? तो असच आहे कमी रागावतो पण जेव्हा रागावतो भयानक....होईल आता शांत.....त्याचा मार्गांवर आहे सध्या 😂हम्म तू जा मस्त शॉपिंग ला....



जिजा - हो माई...
मी आले....



ममता - हो



राजाराम - ममता मी काय म्हणतो जरा समजवून सांगा चिरंजीवांना......जास्तच राग राग करता आहेत.....आई वडील नाहीत तिचे.....बिचारी कुणाकडे बघेल हम्म? असं रागवण बरोबर नाही.....



ममता - मी समजवते त्याला...









राजाराम - हम्म बरं निघतो आम्ही आंबिवलीत दौरा आहे...रात्री जरा वेळ होईल....



ममता - सावकाश जा हू...



राजाराम - येतो...



जिजा - माई निघू मी??



ममता - एवढ्या सकाळी शॉपिंग ला???



जिजा - त्यात काय माई..नऊ तर वाजलेत जवळच जाऊन येते बारा - एक ला पोहोचायचं आहे



ममता - बरं जा..सोबत अभिला पाठवू कां?? एकटी नकोच जाऊस.... आज ड्राइव्हर पण नाहीत फ्री....



जिजा - माई अहो काळजी नका करू...मी जाऊन येते लगेच....काही नाही होणार....



ममता - नको अग मला काळजी वाटेल गं...आणि इंद्राला समजलं तर ओरडेल.....



जिजा - त्याला नाही सांगायचं आपण...नका काळजी करू ना माई....आणि मी पण एकटी नाही गेले कुठे प्लिज जाऊद्या ना.....



ममता - बरं जा पण लवकर ये आणि फोन करतं रहा...



जिजा - हो येते...
.
.
.
.

अनोळखी व्यक्ती - आज तावडीत घावली....काय करू मालक? बाहेर निघाली आताच ती...एकटी....... 📲



समोरील व्यक्ती - हम्म ऐक जास्त काही नको करू.....फक्त घाबरव आणि जराशी हलकी फुलकी जखम......सध्या आपल्याला कुणालाच काही नाही करायचंय.....फक्त घाबरवायचय.....काय बोलायचंय ते पण लक्षात ठेव.......इंद्रा आणि त्याच्या परिवाराला........जि भीती टेन्शन इंद्राच्या चेंजऱ्यावर दिसत ना अहाहाहा!!! लई भारी वाटतं......आता समजलं ना? हा पण कुनाच्या हाती लागू नग्स समजलं नव्ह.....पैसे ट्रान्सफर व्हतील....तुझ्या फुन पी ला.....📲



व्यक्ती - चालतंय...📲




जिजा जवळच्या मॉल मध्ये पोहोचली......
तिकडे तिला हवं असलेलं सगळं सामान तिने विकत घेतलं.....सामान जास्त होतं म्हणून तिने होम डिलिव्हरी करायला सांगितली......बॅग्स काउंटर ला देऊन ती पुन्हा वर आली......वेळ होता म्हणून ती जरा वेगळ्या सेक्शन्स मध्ये फिरू लागली....



मग काहीवेळाने ती घरी जायला निघाली......चालत पुढे गेली रोडवर कुणी दिसत नव्हतं.....ऑटो पण भेटत नव्हती....



तो माणूस तिच्या मागवर च होता.........जिजाने इंद्राशी बोलायला म्हणून फोन लावला.........त्याने बऱ्याचदा फोन कट केला.........शेवटचा फोन त्याने उचलला.......ती बोलणार तेवढ्यात त्या माणसाने मागून येऊन जिजाच्या गळ्यात दोरी टाकली......आणि ती दोरी घट्ट फिरवू लागला......तिचा फोन खाली पडला....



जिजा च्या गळ्याला फास बसला.......त्याच्या या अचानक कृत्याने ती घाबरली.....तिचा श्वास गुदमरला......मग त्या व्यक्तीने तिला सोडल आणि खाली आपटलं....ती विव्हळली......




जिजा - अअअअ कोण आहेस तू?? कोण?




व्यक्ती - ते तुला काय करायचंय राणी....सध्या आपलं जे कामं आहे ते करूया?.....वाह काय सुंदर दिसतेस गं तू? अप्सरा फिकी तुझ्या समोर......असं वाटतं तुला आता घेऊन खोलीत जावं आणि.......पण तशी अजून परमिशन नाही आम्हाला.....



जिजा - तं तुझ्यात तेवढी हिंमत पण नाही.....इंद्रजीत भोसलेच्या बायकोवर नजर टाकायची.....असच घाबरतं नसते मी..माझे वडील पोलीस आणि नवरा तर विचारूच नकोस कोण आहे ते? मी नाही घाबरतं तुला....



व्यक्ती - एवढा रुबाब.....
😡😤🤚



जिजा - अ आ हो...



व्यक्ती - हे बग मगाशी दोरी सोडली आता डायरेक्ट फाशी...समजलं....



जिजा - मरणाला घाबरतं नाही जिजा भोसले



व्यक्ती - हे बग तुझ्या बापाने जे कामं केलंय त्यांचा बदला आम्ही तुझ्याशीच घेणार....पण तुझा नवरा आता मधे आलाय तर त्याच्याशी पण.....😡तुझ्या बापाने जे कामं केलंय आज त्याची भरपाई तुला करावी लागणार आहे....



जिजा - अ अ अ अ माझी केसं सोड....अअअअअ इंद्राssssssssss...............😨




इंद्रजीत - हॅलो...जिजा जिजा....हॅलो.
जिजा....जिजा.......ए जिजा....😕........📲





व्यक्ती - येतो डार्लिंग आता एवढ्यावरच जातोय पण पुढल्या वेळी जबरदस्ती केल्याशिवाय नाही जाणार.....येतो 😡🤨😌




तो जिजाला रस्त्यावर जोरात आदळतो.......तस जिजा बेशुद्ध पडते........ इंद्राला हे सगळं ऐकून टेन्शन आलं.......



इंद्रजीत - हॅलो जिजा....📲



समर - काय झालं सर?



इंद्रजीत - जिजा...काय तरी गडबड आहे...



अनुसया - इंद्रा काय झालं??



इंद्रजीत - नंतर सांगतो अनु...प्लिज आता मी निघतोय...खूप अर्जंट आहे.....



अनुसया - हो ठीके जा...पण...



माधुरी - सर टेन्शन नका करू सगळं नीट होईल.....धीर ठेवा.....



इंद्रजीत - हो हो हो.....
जीवा जीवा गाडी काढ....जीवाsssss



अनुसया - काय झालं अचानक?



समर - सर फोन वर बोलत होते जिजा मॅमचा जीव धोक्यात आहे असं काहीतरी.....बिचारे सर आणि मॅम त्यांच्या आयुष्यात त्रास कमी होतच नाही...




अनुसया - बापरे? नेमक काय चाललंय हे??
खरंच कधी संपणार हा त्रास....




जीवा - काय झालं भाऊ?? भाऊ सांगा की टेन्शन मधी दिसायलाय....



इंद्रजीत - जाता जाता सांगतो चल चल.....जीवा चल यार....



जीवा - कुठं जायचं....




इंद्रजीत - अरे ते मला ही नाही माहित....मी मी सांगतो तू गाडी स्टार्ट कर....
थांब....📲



ममता - हा बोल इंद्रा........ 📲



इंद्रजीत - माई जिजा कुठे आहे?? 📲



ममता - ती खोलीत आहे कां रे 📲



इंद्रजीत - माई खोटं नको बोलूस लवकर सांग जिजा कुठंय? 📲



ममता - ती ती जवळयांच्या शॉपिंग मॉल ला गेली सकाळी.... 📲



इंद्रजीत - काय? तू तू एकटं कां पाठ्वलंस तिला😡📲



ममता - काय झालं पण? 📲



इंद्रजीत - काय झालं काय विचारतेस माई....मी मी नंतर सांगतो आता.... 📲
जीवा लवकर चल........




जीवा - भाऊ भाऊ...वहिनी इकडे आहेत......भाऊ....



इंद्रजीत - अअअ जिजा....जिजा....काय झालं जिजा उठ ना...
जीवा डॉकटर ला कॉल कर घरी बोलवून घे...लवकर...



जीवा - हो भाऊ..या गाडीतं बसा....



इंद्रजीत - जिजा...जिजा काय झाला तुला बाळा?? उठ ना जिजा...
जीवा लवकर चल अरे.... 😡😔



जीवा - हो भाऊ... 😔

.
.
.
.


डॉकटर - डोन्ट वरी मिस्टर भोसले...त्यांना जरा चक्कर आलेली.....आणि हाताला थोडं खरचटलं आहे कोपर ला...ती काही दिवसात बरी होईल जखम....



इंद्रजीत - नक्की? आणि ते गळ्याला??



डॉकटर - हो मी बघितलंय तिकडे फारस खून नाही आणि काही त्रास नाही झालेला गळ्याला आतून ही नाही बाहेरून ही नाही....काळजी नका करू काही वाटलं तर कॉल करा....



इंद्रजीत - थँक्यु



ममता - इंद्रा अरे बाळा असं काही होईपर्यंत वाटलं नव्हतं....तरी मी तिला बोलले....😔



इंद्रजीत - काय बोलें? हा काय बोलले? मी सांगितलं होतं ना तारा आणि जिजा एकट्या जाणार नाहीत बाहेर वर्षभर तरी नाही....बोललो होतो ना मग कां असं? किती पण हट्ट केला तरी झुकता कामा नये? आता जीव गेला असता तर?? तू वाचवलं असतंस माई? की मी? कोणी? म्हणजे मी जिजाला पण गमवू? तुम्हाला नाहीते तुम्हाला आणि जिजाला गमवू नाही शकत मी तरी असं करता? तुला पण लक्ष ठेवायचं होतं माई तिच्यावर तिला बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं...😡😔



ममता - सॉरी इंद्रा...😔
मला माफ कर बाळा....



इंद्रजीत - 😔हम्म



ममता - बरं मी जिजा साठी ज्यूस आणते हू...



इंद्रजीत - हम्म



जिजा - अअअअअ
(शुद्धीत येतं.....)



इंद्रजीत - जिजा....जिजा कस वाटतय आता??



जिजा - हम्म बरी आहे मी काळजी नको करू..



इंद्रजीत - तुला काही गरज होती कां गं? एकटं जायची मी बोललो होतो ना नको एकटं जाऊस पण नाही ऐकणार कुठे? स्वतःच खरं नेहमी.....माझं तर ऐकूच नका..... फ्रीडम हवाय यांना आणि चार गुंडाना बघून घाबरतात.....😡तुला मी सांगून दमलो त्या ताराला समजलं पण तुला नव्हे? लहान आहेस कां तू अजून पण...म्हणून बोलतो नोकरीं नको तरी नाही....मी.....😡



जिजा - इंद्रा....😭😔
(मिठी मारून )



इंद्रजीत - अअ काय झालं जिजा?



जिजा - घाबरली मी इंद्रा...त्याने गळ्यात फास टाकला....मला मारलं केसं ओढली😭 आणि जाताना म्हणाला मी परत येणार पुढल्या वेळी जबरदस्ती करनार माझ्यावर म्हणून....😭



इंद्रजीत - त्याच्या गा**&& दम नाही या इंद्रा भोसले ची बायको आहेस तू.....😡आता तर खुप झालं यावर मार्ग लवकरच शोधायला हवा आता....खूप लाईटली घेतलं आधी मी आता तू....जिजा काळजी नको करुस मी आहे हू...



जिजा - हू बरं इंद्रा ऐक ना माझा इंटरव्हिव आहे....प्लिज तो देऊन येते मी.....माझ्यासोबत कुणीतरी चला...



इंद्रजीत - झालं एवढं होऊन ही नोकरीं आहेच कां डोक्यात...माझा शब्द म्हणून महत्वाचा नाही....आता अपघात झाला तरी बाहेर जायचंय....भीती कशी नाही वाटतं गं.... 😡



जिजा - तुझ्या मिठीतुन बाहेर आले की बरं वाटतं ना ❤️सगळी भीती नाहीशी होते.....❤️ आणि नोकरीं हा खूळ मेल्यावर ही बाहेर नाही जाणार.....आता जाऊदे ना मला प्लिज? प्लिज....



इंद्रजीत - 😡 मल्हारsssss जीवाssssss



मल्हार - हा भाऊ....



जीवा - हा भाऊ...



इंद्रजीत - तुमच्या वहिनी ला त्या म्हणतील तिकडे सोडून सुखरूप घेऊन या....जा.... 😡



मल्हार - ठीके भाऊ



जीवा - हो भाऊ




जिजा - थँक्यु इंद्रा.....



इंद्रजीत - 😡



जिजा - अरे...😔


********************************


जिजा इंटरव्हिव उत्तम प्रकारे देते.......तिला सिलेक्ट केलं जाता.......सगळे घरातले खुश होते........पण इंद्राला राग पण आलेला आनंद ही झालेला आणि काळजी ही होती....... त्याला काय? आणि कस व्यक्त होऊ समजतच नव्हतं?.......तिला दोन - तीन दिवसांनी जॉईन व्हायला सांगितलं होता.....रात्री इंद्रा जेवायला पण खाली येतं नाही.....जिजा त्याला बोलवायला खोलीत येते.......तर इंद्रा बाल्कनी मध्ये बसून एका हाताने सिगरेट ओढत बसलेला........हा प्रकार पाहून जिजाला खूप राग आला.....




जिजा - इंद्राsss 😡



इंद्रजीत - ए कोण? अ जिजा बाई या या....



जिजा - काय करतोयस हे इंद्रा...कधी न पिणारा आज तू हे सगळं? ते ही दररोज? याने टेन्शन कमी होणारे कां?? 😡अती होतंय तुझा आता.....



इंद्रजीत - ए मला बोलणारी तू कोण?
माझं ऐकतेस कां तू? मग मी कां तुझा ऐकू? एवढं झालं तरी मनात भीती नाही गेलीस इंटरव्हिव ला....



जिजा - इंद्रा अरे जखम दुखेल तुझी....



इंद्रजीत - दुखली तर दुःखली मला होईल ना त्रास....



जिजा - अच्छा म्हणजे मला नाही होणार?



इंद्रजीत - माहित नाही....



जिजा - बरं हा विषय सोड....पण हे सगळं तर बंद कर इंद्रा... सिगरेट? आम्हाला हवाय तू अजून....



इंद्रजीत - मला पण हवेत तुम्ही?



जिजा - आम्हाला काही नाही होणार...तू आहेस तोवर....



इंद्रजीत - हम्म, मला आता राग देऊ नकोस...



जिजा - इंद्रा ऐक मग आता झोप थोडावेळ बस्स झालं ना....जेवायला नको निदान झोप तरी पूर्ण कर..चल बाळा



इंद्रजीत - तुला समजतं नाही कां गं 😡



जिजा - अरे घे ना मला समजून इंद्रा प्लिज.....नको ना इंद्रा असं वागूस माझ्याशी......😔



इंद्रजीत - कां कुणास ठाऊक तुझ्यावर खूप रागराग येतोय.......माझं ऐकत नाहीस हल्ली......चीड येतेय मला खूप..... 😡खूप चेंज झालेस?



जिजा - असं कां बोलतोस इंद्रा....तस तर तू पण खूप बदलून गेलायस रे....आधी किती पण बोलें तरी चिडायचा नाहीस....बरेच दिवस झाले नाही माझ्यासोबत टाइम स्पेंड करतोयस नाही बाहेर घेऊन जातोयस असं रागराग करायला मला बायको बनवलेस कां स्वतःची....



इंद्रजीत - जिजा तोंड संभाळून बोल....जास्त बोलीस तर पाठवून देईन माहेरी समजलं.....एकटी रहा जा मग...



जिजा - माहेरी कुणाकडे?



इंद्रजीत - जा जा तुझ्या आई बाबा....क कडे... 🙁



जिजा - 😔😭 आज ते असते तर गेलीच असती...😭नाहीत ना ते मी एकटी आहे म्हणून तू माझा फायदा उचलायस काय 😔



इंद्रजीत - अरे देवा...काय बोलो मी ह?😔
म म मला.....



जिजा - बस्स आता खूप झालं...😭



इंद्रजीत - अरे जिजा....



जिजा - असं कस बोलास तू इंद्रा??



इंद्रजीत - जिजा...सॉरी...यार आपण कां भांडतोय..खरंतर माझीच चूक आहे....ऐक ना मला माफ कर....मी उगाच चिडचिड करतं होतो......😔



जिजा - हम्म



इंद्रजीत - माझा हेतू वाईट नव्हता फक्त तुझी काळजी आहे गं....आज काय झालं पाहिलंस ना...😔मला तुला गमवायची भीती वाटते गं....



जिजा - इंद्रा बाळा नेहमी पॉजिटीव्ह राहायचं नको ते विचार करून आपलं आयुष्य कां वाईट बनवायचं...



इंद्रजीत - हायपर टेन्शन मुळे मला चिडचिड होतं होती....आता भांडण नको करूयात मला माफ कर प्लिज....😔








जिजा - हम्म ठीके केलं माफ...झोपू आता मी...



इंद्रजीत - तूच कां मी पण झोपतो....



जिजा - तू थोडं लांबच झोप मला स्मोक केलेली माणसं आवडत नाहीत....🤣



इंद्रजीत - हो कां..बरं...आता कसला जातोय मी लांब....आता तर आणखी जवळ येणार....



जिजा - नाही हू इंद्रा...



इंद्रजीत - कां नाही...अ अ हा हा हा.... 🤣
(तिला गुदगुल्या करीत......)



जिजा - इंद्रा नको ना...🤣🤣🤣 आई गं पोट दुखतंय इंद्रा....



इंद्रजीत - बरं चल झोप आता...



जिजा - इंद्रा तुझ्या कुशीत झोपू बरेच दिवस झाले तुझ्या कुशीत नाही झोपले.....



इंद्रजीत - अरे बायको विचारतेस कां? ही तुझी जागा आहे हक्काची.....आणि मी पण यासाठी तरसलोय....ये ना.....



जिजा - हम्म...आह! बरं वाटतय आता....🤗



इंद्रजीत - मला पण.... 💞



जिजा - आय लव्ह यूं ❤️



इंद्रजीत - लव्ह यूं टू❤️



क्रमश :


Do Share.........Comments.........Keep Supporting......




©®Pratiksha.Wagoskar