Hold Up - 29 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 29 - अंतिम भाग

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 29 - अंतिम भाग








होल्ड अप प्रकरण २९ ( शेवटचे प्रकरण. )
“ काणेकर, तुम्हाला काय विचारायचं आहे?” –एरंडे.
“ मला या संपूर्ण साक्षीवरच हरकत नोंदवायची आहे. मूळच्या होल्ड अप च्या गुन्ह्याशी काहीही सबंध नसलेली ही साक्ष आहे.पटवर्धन यांनी पूर्ण पढवून तयार केलेली ही साक्षीदार आहे.बचाव पक्षाला हवयं ते बोलणारी आणि सरकार पक्षाच्या साक्षीदारांना वेगळ्याच प्रकरणात गोवू पाहणारी.” काणेकर म्हणाला.
“ तुम्हाला काय म्हणायचंय, पाणिनी पटवर्धन यांच्या ताब्यात ही साक्षीदार होती? ” एरंडे म्हणाले.
“ नक्कीच युअर ऑनर.केवळ पटवर्धन म्हणतात की ती त्यांच्या ऑफिस मधून पळून गेली.कशावरून पटवर्धन यांनीच तिला लपवून ठेवलं नसेल? ” –काणेकर.
“ मिस्टर काणेकर, मी स्वतः तुमच्या आणि पटवर्धन यांच्या समोर डॉ.डोळे यांच्याशी बोललोय.ते मारुशिका यांनीच नेमलेले डॉक्टर होते.सिया त्यांच्याच हॉस्पिटल मधे दाखल केली गेली होती.पटवर्धन यांच्या ताब्यात ती असती तर खटल्याच्या पहिल्याच दिवशी पाणिनी पटवर्धन यांनी तिला हजर केलं असतं.” एरंडे म्हणाले.
“ युअर ऑनर,सिया माथूर त्यांनी धनुष्य अपार्टमेंटमध्ये नेलं.जिथे मिष्टी रहात होती.मला सिया माथूर साक्षीदार म्हणून हवी होती हे त्यांना माहिती होते.मिष्टीलाच सिया म्हणून त्यांनी कोर्टात हजर करून खोटी साक्ष द्यायला लावली असती पण त्यात त्यांची एक पंचायत झाली की कनक ओजस ने खऱ्या सिया माथूर ला पाहिलं होतं.त्यामुळे समन्स घेऊन आलेल्या माणसा समोर आणि मृदगंधा समोर झोपेच्या गोळ्या घेण्याचं नाटक मिष्टीने केलं आणि त्या सिया माथूर ने घेतल्या असल्याची समजूत त्यांनी करून दिली.त्यांनी त्यांची अॅम्ब्यूलन्स खाली तयारच ठेवली होती.मृद्गंधा किंवा समन्स बजावायला आलेला माणूस यापैकी कोणीतरी पोलिसांना फोन करेल याचा त्यांना अंदाज होता, पोलीस अॅम्ब्यूलन्स ला बोलावतील हे त्यांना माहिती होतं.या सर्वांसाठी किती वेळ लागेल याचा अंदाज घेऊन त्यांनी बरोब्बर त्या अॅम्ब्यूलन्स ला पाठवलं आणि मिष्टी ला तिथून गायब केलं पण त्याच वेळी सिया माथूर ला मात्र त्यांनी बेशुद्ध करून कपाटात टाकलं. कोणीतरी डॉक्टर शुचिष्मंत ना बोलावलं. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि सिया ला हॉस्पिटल मधे हलवलं.पण शुचिष्मंत हे माझ्या परिचित असल्याने त्यांच्या कडून मला सिया कुठे आहे हे समजलं असतं म्हणून गौतम पिसे ने आपल्या स्त्री साथीदाराला बरोबर घेऊन आपण सिया चा नवरा आणि ती आई असल्याचा बनव रचून त्या हॉस्पिटल मधून पुन्हा तिला हलवून डॉ.डोळे यांच्या हॉस्पिटल मधे नेलं आणि डोळे डॉक्टरांनी तिला तब्येतीच्या कारणास्तव साक्ष द्यायला मनाई केली. कोर्ट स्वतः जेव्हा डोळे यांच्याशी बोललं तेव्हाच त्यांच्यातला फोल पणा लक्षात आला होता. ” पाणिनी म्हणाला
“ अगदी योग्य दिशेने आणि तर्काला पटेल असं बोलताय पटवर्धन, या सगळ्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय आणि पुरावे मात्र एकसंघ पणे काहीच शाबित करण्यास अपुरे पडत आहेत.”
“ युअर ऑनर, मला वाटत मला नेमकं काय घडलं असावं याचा मला अंदाज आलाय.जर अनुमती असेल तर काय घडलं असावं ते मी अगदी सविस्तर सांगू शकतो. अगदी क्रमाने पण मला विनंती करायची आहे की माझं निवेदन पूर्ण ऐकून घेतलं जावं, सलग पणे, कोणतेही ऑब्जेक्शन न घेतले जाता. माझं पूर्ण निवेदन झाल्यावर मी सरकार पक्षाच्या किंवा कोर्टाच्या शंकांचे निरसन करीन.”
“ बोला.” एरंडे म्हणाले.
“ आणखी एक विनंती, मी गौतम पिसे च्या हाताचे जे ठसे मिळवले आहेत त्यांची तुलना गाडीतल्या व्हील वर आणि रीयर मिरर वरच्या तसेच डिकी च्या मुठी वरच्या ठशांशी केली जावी असे मी सुचवले होते ते अहवाल तातडीने मिळावेत. अत्ता या कोर्टात गौतम हजर आहेच, माझ्या निवेदनाच्या दरम्यान मरुशिका आणि कामोद यानाही कोर्टात हजर राहण्यास सांगावे. ”
कोर्टाने तशी आज्ञा दिली दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले.
“ युअर ऑनर, अनेक वेळा खुनात किंवा अन्य गुन्ह्यात परिस्थिती जन्य पुराव्यावर अवलंबून रहावे लागते कारण गुन्हा घडताना पाहणारा साक्षीदार क्वचितच उपलब्ध असतो. माझ्या मते परिस्थिती जन्य पुरावा हा सर्वोत्कृष्ट पुरावा असतो, अगदी प्रत्यक्ष दर्शी पुराव्यापेक्षा.फक्त सर्वच्या सर्व घटना त्या परिस्थितीजन्य पुराव्यात बरोब्बर बसणाऱ्या असाव्यात. मुद्दाम ओढून ताणून बसवायचा प्रयत्न केला तर चुकीच्या माणसाला त्या गुन्ह्यात गोवले जाऊ शकते. ” पाणी पिण्यासाठी पाणिनी थांबला आणि पुन्हा बोलू लागला.
“ तर युअर ऑनर, कामोद आणि मरुशिका हे अरब देशात ड्रग्ज विक्री करत असावेत.मरुशिका क्लब किंवा व्हिला मधल्या बारबालांचा वापर त्यासाठी केला जात असावा.आणि त्या पुरवण्याचे काम ऐश्वर्या मोडेलिंग एजन्सी करत असावी. मॉडेलिंग च्या निमित्ताने या बारबालाना अरब देशात पाठवताना जे कपडे ,हॅन्डबॅग , पर्सेस दिले जात होते त्या पर्स मधून ड्रग्स पाठवली जात असावी. मरूशिका मॅडम यांच्या बरोबर जी पर्स असायची त्याला आरशाच्या मागे एक विशिष्ट कप्पा असल्याचे आपल्याला आढळून येईल अशाच प्रकारच्या पर्स बारबालांना अरब देशात पाठवताना दिल्या जात असत. तिथल्या हॉटेलमध्ये पोचल्यानंतर त्यांना मॉडेलिंग साठी जेव्हा बाहेर नेण्यात येई, तेव्हा त्यांच्या पर्स हॉटेलमध्येच ठेवण्यात येत असत त्या पर्सेस उघडून त्यातील ड्रग्स काढून घेतली जात असावी.गौतम पिसे हा ड्रग्स पुरवठ्यामधील मरूशीका आणि कामोद यांचा त्यातला साथीदार होता. तो ड्रग्ज चा पुरवठा स्थानिक लोकांना करण्यासाठी गाड्या चोरत असे. ”
“ हिमानी दुनाखे ला या ड्रग्स चा आणि मरुशिका क्लब आणि ऐश्वर्या मोडेलिंग एजन्सी मधल्या परस्पर् संबंधांचा संशय आला होता. त्या बदल्यात तिने या दोघांकडे मोठया रकमेची मागणी केली होती आणि नाईलाजाने ती पूर्ण करण्याचे मरुशिका आणि कामोद ने मान्य केले होते. ”
“ आता आपण प्रत्यक्ष काय घडलं होल्ड अप च्या रात्री आणि बनाव काय केला गेला ते पाहू. होल्ड अप हा खरोखरीच घडला.पण तो आरोपी इनामदार ने नाही केला तर तो वेगळाच इसम होता.त्याला अजून पोलिसांनी पकडलाच नाहीये. त्याने केवळ पैशांसाठीच कामोद आणि त्याच्या बरोबर बसलेल्या बाईला ला वेठीस धरून त्यांची पर्स आणि पाकीट पळवलं आणि त्यातले पैसे काढून ते एका कचऱ्याच्या कंटेनर मधे फेकून दिले. सुषेम इनामदार हा कचरा डेपो जवळ राहतो त्याला या दोन गोष्टी केराच्या कंटेनर मधून पडलेल्या सापडल्या त्याने त्या पोलिसांना नेऊन दिल्या. आता पोलिसांनी त्यालाच आरोपी म्हणून का पकडलं ते मी नंतर पुढे सांगतो. ”
“ होल्ड अप च्या रात्री कामोद च्या गाडीत बसलेली बाई ही मरुशिका नसून हिमानी दुनाखे होती.अगदी संध्याकाळी त्यांनी हॉटेलात जेवणही एकत्र घेतलं होतं.जेवणानंतर ते कॉलेज रोड ने मरुशिका क्लब कडे जायला निघाले होते.आणि अचानक हल्ला झाला. हल्लेखोराने त्यांना हात वर करायला सांगितलं तेव्हा कामोद गाडीतला लायटर हातात धरून सिगारेट पेटवायच्या तयारीत होता.अचानक हात वर करताना त्याच्या हातातला लायटर निसटून हिमानीच्या पायावर पडला आणि भाजून तिची पायावरची कातडी भाजली.पोस्ट मार्टेम रिपोर्ट आणि फोटोत तिच्या पायावरचा डाग स्पष्ट दिसतोय. पोलिसांनी लायटर ची फोरेन्सिक तपासणी केली तर त्या लायटर ला हिमानीच्या त्वचेचे अंश आढळतील.”
“ खऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी पकडलं असतं तर त्याच्या चौकशीतून आणि रस्त्यावर जमलेल्या बघ्यांच्या माहितीतून शेजारी बसलेली स्त्री हिमानी असल्याचे पोलिसांना कळलं असतं आणि तिच्या चौकशीतून ड्रग्ज चे रॅकेट पकडलं गेलं असतं म्हणून हिमानी ऐवजी दुसरी स्त्री असल्याचा बनाव रचणे आवश्यक होते.म्हणून कामोद ने पोलिसांना फोन करण्यापूर्वी मरुशिकाला फोन लावून बोलावून घेतलं. आणि गाडीत असलेली बाई मरुशिका होती असा बनाव रचला.आपण संध्याकाळ पासून मरुशिका बरोबरच हॉटेलात जेवलो,असा आभास त्यांनी निर्माण केला.त्यासाठी जेवणात काय घेतले, नंतर कुठल्या रस्त्याने निघालो हे मरुशिका ला समजावे म्हणून कामोद ने पोलीस चौकशी ला मरुशिका आत जाण्यापूर्वी चिट्ठी लिहून तिला हे सर्व कळवलं. ”
“ कामोद चा फोन येताच मरुशिका सिया माथूर ला घेऊन होल्ड अप च्या ठिकाणी आली आणि तिने हिमानी ला व्हिला-क्लब ला पाठवलं.आणि तिच्या जागी स्वतः गाडीत बसली.”
“ आता असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की होल्ड अप करणाऱ्या माणसाचे वर्णन आणि त्याच्या गाडीचे वर्णन कामोद ने पोलिसांना कसे सांगितले आणि त्यावरून त्यांनी आरोपी म्हणून सुषेम इनामदार ला कसे पकडले. तर त्याचे उत्तर हे आहे की हे वर्णन, म्हणजे आरोपीचे आणि गाडीचे वर्णन हे काल्पनिक नव्हते तर खरे होते ! ” पाणिनी म्हणाला आणि न्यायाधीश आणि आरुष काणेकर दोघांच्या भुवया ताठ झाल्या. कपाळावर आठ्या उमटल्या.
“ वर्णन काल्पनिक नव्हते म्हणजे आरोपी म्हणून केलेले वर्णन हे गौतम चे होते आणि गाडीचे वर्णन हे गौतम ने चोरलेल्या गाडीचे होते. आता कोर्टाला आणि सरकार पक्षाला अशी शंका येऊ शकते की आरोपी म्हणून कामोद ने गौतम पिसे चे वर्णन का केले असावे आणि आरोपी ची गाडी म्हणून गौतम ने चोरलेल्या गाडीचे वर्णन का केले असावे.” पाणिनी म्हणाला
तेवढ्यात पोलिसाने पुढे येऊन एक बंद पाकीट कोर्टाच्या क्लार्क कडे दिले. क्लार्क ने ते न्या.एरंडे यांना दिले.
“ माझ्याही मनात तीच शंका होती पटवर्धन.” हातातील पाकीट उघडून त्यावरील मजकुरावरून नजर फिरवत एरंडे म्हणाले.
“ हिमानी ला ड्रग्ज रॅकेट चा शोध लागल्यामुळे तिला पैसे देऊन शांत करण्यासाठी कामोद ने गौतम पिसे ला सांगितलं.त्याने गौतम कडे पैसे देऊन ठेवले. पण गौतम ने ते पैसे तिला दिलेच नाहीत,ते स्वतःसाठीच ठेवले.पैसे मिळाले नाहीत याचा बोभाटा हिमानीने करू नये म्हणून तिला ठार केलं.गळा आवळून.दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, कामोद आणि मरुशिका यांना हे माहिती नव्हतं की गौतम ने तिला संपवलंय, ते त्यांना दुसऱ्या दिवशी पेपरात वाचून समजलं.”
“ अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने रचलेली सुरस कथा.” आरुष इनामदार म्हणाला. “ पण पुराव्याशिवाय रचलेली.आणि पटवर्धन यांना हे माहिती आहेच की कोर्टाला पुरावे लागतात.”
“ माझ्या निरीक्षणानुसार न्यायाधिशांच्या हातात ते पाकीट अत्ता आलंय त्यात गौतम च्या बोटांचे ठसे त्या गाडीवर आढल्याचे पुरावे असणार आहेत.” पाणिनी म्हणाला
“ त्यातून फार तर गौतम ने ती गाडी चोरल्याचे सिध्द होईल.त्याने होल्ड अप केल्याचे नाही.” काणेकर म्हणाला.
“ त्याने ती गाडी चोरल्याचे तुम्ही मान्य करताय?” पाणिनी ने विचारलं
“ हो. काय हरकत आहे?” काणेकर उद्गारला.
“ मग ती गाडी जर गौतमच्या ताब्यात होती तर आरोपी इनामदार ती कशी वापरेल?” पाणिनी ने विचारलं
न्यायाधीशांनी हातोडा आपटून दोघांना शांत केलं.
“ पटवर्धन तुमचा अंदाज बरोबर आहे. गाडीवर आढळलेले ठसे हे गौतमचेच आहेत. एवढंच नाही तर लायटर ला लागलेले त्वचेचे अंश हे हिमानीच्या त्वचेचे आहेत.गाडीच्या सीट कव्हर वर जिथे जळका डाग पडला तिथे पण हिमानीच्या त्वचेचे अंश आढळले आहेत. ” एरंडे यांनी पाकीतातला अहवाल वाचून जाहीर केलं. “ काणेकर एकंदर हा पुरावा बघता गाडीत दरोड्याच्या दिवशी मरुशिका नाही तर हिमानी असल्याच्या संशयाला पुष्टी मिळते आहे. आरोपी इनामदार चे पूर्वीचे रेकोर्ड गुन्हेगारीचे नाही. कामोद आणि मरुशिका दोघांनीही दरोडा पडत असतांना केलेल्या आरोपीच्या वर्णनातील फोल पणा कोर्टाच्या नजरेस आला आहे. कुठलाही आरोपी हा गुन्हेगार नसेल असा जरा सुद्धा संशय असेल तर त्याला शिक्षा देऊ नये असं कायदा सांगतो. गौतम आणि आरोपी इनामदार च्या देह यष्टीत शंभर टक्के साम्य आहे आणि त्यामुळे ज्योतिर्मयी सुखात्मे ने चुकीची ओळख पटवली असावी. हा गुन्हा म्हणजे होल्ड अप, वेगळ्याच माणसाने केला असावा.पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा व स्वतंत्र खटला त्याच्या विरुध्द चालवावा. पण मला एक कळलं नाही की जरी गौतम पिसे आणि आरोपी इनामदार च्या देहयष्टीत साम्य होतं म्हणून पोलिसांनी त्याच्या ऐवजी इनामदार ला पकडलं पण पूर्वीचे गुन्हेगारीचे रेकोर्ड नसलेला इनामदार पोलिसांच्या समोर आला कसा? ” एरंडे म्हणाले.
“ युअर ऑनर , तो कचरा डेपो जवळच्या चाळीत राहतो.त्याच्या घरा बाहेरून रोज कचऱ्याचे कंटेनर ये-जा करत असतात.त्यात त्याला पर्स आणि पाकीट सापडलं आणि त्याने ते चौकीत नेऊन दिलं. पोलिसांनी त्यांची जबानी वगैरे घेतली, पाकीट,पर्स ठेऊन घेतलं तो पर्यंत तो पोलिसांच्या लक्षात राहिला होता. पुढे कामोद ने होल्ड अप करणाऱ्याचे वर्णन करताना गौतम चे वर्णन केलं आणि पोलिसांना ते इनामदार च वाटलं. इनामदार कडे पाकीट आणि पर्स मिळालं म्हणजे तोच गुन्हेगार, आणि दिसायलाही कमोद ने केलेल्या वर्णनाबरहुकुम ! ”. पाणिनी म्हणाला.
“ अरे हो, आरोपी म्हणून कामोद ने गौतम पिसे चे वर्णन का केले असावे आणि आरोपी ची गाडी म्हणून गौतम ने चोरलेल्या गाडीचे वर्णन का केले असावे. हे तुम्ही सांगणार होतात पटवर्धन.” एरंडे उत्सुकतेने म्हणाले.
“ दोन हेतू होते त्याचे.” पाणिनी म्हणाला “ खरा हल्लेखोर पकडला जाऊ नये हा मुख्य हेतू होताच कारण त्यातून हिमानीची ओळख व ड्रग्ज प्रकरण पुढे आले असते. म्हणून खऱ्या हल्लेखोराचे मुद्दामच चुकीचे वर्णन करायचे आणि त्याला पोलीस तपासापासून दूर ठेवायचे, आणि प्रत्यक्षात त्याने गाडी वापरली नसतांना गाडी वापरली असे सांगून पोलिसांची दिशाभूल करायची हा कामोद चा हेतू होता. खरा होल्डअप करणाऱ्या माणसाचे वर्णन करायचे नसेल तर मग एकदम दुसऱ्या कोणाचे वर्णन करणार आरोपी म्हणून? असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला गौतम चे नाव सुचलं. आयत्यावेळी नाही तर जाणून बुजून.कारण त्याने हिमानी ला ठार करायचा निर्णय त्याला न सांगता घेतला होता.भविष्यात तो माणूस हाताबाहेर जाऊ शकेल अस कामोद ला वाटत असणार. त्याला होल्ड अप मधे लटकवला की त्याचा परस्पर काटा काढला जाणार होता. ” पाणिनी म्हणाला
“ पण पटवर्धन, त्याने कामोद वर सूड उगवण्यासाठी त्याच्या ड्रग्ज प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असती तर कामोद ला धोका होता, मग तो गौतम ला अडकवण्याची जोखीम का घेईल? ”
“ तुमच्या माहिती साठी सांगतो युअर ऑनर,” पाणिनी म्हणाला “ गौतम असं कधीच करू शकलं नसता कारण हिमानीचा खून गौतम ने केल्याचे कामोद ने पोलिसांना सांगायचे ठरवलं होतं.” पाणिनी म्हणाला
एवढ्यात कोर्टात इनामदारच्या पिंजऱ्याजवळ उभ्या असलेल्या गौतम पिसे ने अचानक हालचाल केली, आपल्या खिशातील चाकू काढून पुढच्याच रांगेत बसलेल्या कामोद वर हल्ला केला. “ मा**** ” अश्लाघ्य शिवी देऊन तो त्याच्या अंगावर धावला. “ तुझ्या साठी एवढं केलं आणि मला लटकवयाला बघतोयस? सोडणार नाही तुला.”
पोलीस लगेच पुढे धावत गेले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं.मरुशिका आणि कामोद ची सुटका केली.
न्यायाधीशांनी हातोडा आपटून कोर्ट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. “ तुला जर काही सांगायचं असेल तर शपथ घेऊन आणि पिंजऱ्यात उभा राहून सांग.” न्यायाधीश म्हणाले.
अजूनही गौतम धुसपूस करत होता. त्याला पोलिसांनी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं केलं.
“ पटवर्धन यांनी सांगितलेलं शब्दशः खरं आहे. मला अडकवण्यासाठी आयत्यावेळी हा हरामखोर कामोद कुमठेकर माझ्याशी अशी डबल गेम करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. यात पकडला गेलेला आरोपी इनामदार याचा होल्ड अप शी काहीही संबंध नाही हे कुमठेकारांनीच मला सांगितलं होतं आणि गरज पडल्यास हिमानीला कधीतरी संपवावं लागेल असं त्याने सूचित केलं होतं. इनामदार जर त्याला सापडलेली पर्स आणि पाकीट पोलिसांना द्यायला स्वतःहून गेला नसता तर पोलिसांना तो माहीत व्हायचं कारणच नव्हतं.त्यांनी त्याला कधीच पकडला नसता. यापेक्षा मला काहीही सांगायचं नाहीये. ” गौतम म्हणाला.
एरंडे यांनी हातोडा आपटला.
“ आरोपी सुषेम इनामदार याने होल्ड अप केल्याचा ठोस पुरावा सरकार पक्ष समोर आणू शकलेले नाही.होल्ड अप होतांना पाहणारा आणि सरकार पक्षाने हजर केलेला एकमेव साक्षीदार हा कामोद कुमठेकर हा एकच आहे.आणि होल्ड अप होतानाच्या प्रसंगाचे वर्णन करताना,आरोपीचे वर्णन करताना, ओळख पटवताना त्याची उडालेली भंबेरी कोर्टाच्या निदर्शनाला आलेली आहे. त्याने खऱ्या आरोपीला अटक होवू नये म्हणून खोट्या आरोपीचे काल्पनिक वर्णन करायच्या ऐवजी आरोपी हाणून गौतम चं वर्णन केलं आणि ते इनामदार शी जुळणारं निघालं, हे लक्षात आलं आहे.त्या सर्वांचा विचार करता आरोपी इनामदार याला हे कोर्ट निर्दोष मुक्त करत आहे. पोलिसांनी खरा आरोपी पकडून त्यावर खटला चालवावा आणि त्याच बरोबर खुनाच्या आरोपा खाली गौतम ला अटक करावी आणि कामोद आणि मरुशिका हे त्यात सामील आहेत का या शक्यतेचा विचार करावा असा आदेश देत आहे. ” न्या, एरंडे म्हणाले.
पाणिनी ने उठून त्यांना अभिवादन केलं.
“ तुमच्यावर एका अर्थी लादल्येल्या अशिलाला अत्यंत कौशल्याने सोडवल्याबद्दल तुमचे आभार.” एरंडे आपल्या खुर्चीतून उठल्यावर पाणिनी ला म्हणाले.
कोर्टातून सौम्या, मृदगंधा, सर्व बाहेर पडत होते. कनक जरा मागेच रेंगाळला. मृदगंधा चे डोळे अश्रूंनी डबडबले होते.दारातून बाहेर पडत असतांनाच कनक चा हात पाणिनीच्या खांद्यावर पडला.
“ तुला आणखी एक क्लाएंट मिळतोय पाणिनी.” तो म्हणाला.
पाणिनी ने भुवया उंचावल्या.
“ गौतम बरोबर खुन्याची साथीदार म्हणून पोलिसांनी नाव गोवलं तर माझे वकीलपत्र घेणार का अस मरुशिका विचारत्ये !” कनक म्हणाला.
******* प्रकरण २९ आणि संपूर्ण कादंबरी समाप्त. ********

(मित्रांनो तुम्हाला ही रहस्य कथा आवडली असेल तर आपल्या परिचित आणखी दोन-तीन मित्र-मैत्रिणींना ही कथा वाचायला सांगा आणि तुम्ही स्वतः सुद्धा या कथेला समीक्षा द्या.)

.......पाणिनी पटवर्धन ची नवीन रहस्य कथा लिहायला घेतली आहे .लवकरच भेटू ........
नवीन कथेचे नाव असणार आहे ,
सावध..,......