Hold Up - 26 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 26

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 26



होल्ड अप प्रकरण २६
“तुम्हाला फेर तपासणी घ्यायची आहे?” आरुष ला एरंडे यांनी विचारलं.
“ हो.” आरुष म्हणाला.आणि साक्षीदाराकडे वळला. “ मला समजल्यानुसार अत्ता तरी तुम्हाला माहिती नाहीये की तुम्ही मारुशिका व्हिला ला फोन लावलात की नाही.सहाजिकच आहे कारण हे घडून बरेच दिवस झालेत.म्हणूनच तुम्ही अशी भूमिका घेतल्ये की तुम्हाला आठवत नाहीये, बरोबर आहे की नाही?”
“ अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते.”-कामोद म्हणाला.
“ दॅट्स ऑल युअर ऑनर.” आरुष काणेकर खुष होवून म्हणाला.
“ एक मिनिट, कामोद.” पाणिनी म्हणाला “ त्या वेळी घडलेले अन्य सर्व प्रसंग तुम्हाला लख्ख आठवताहेत, बरोबर ना?” पाणिनी ने विचारलं.
“ होय.”—कामोद
“ म्हणजे कोणत्या हॉटेलात जेवलात, त्याचं नाव?”
“ हो.”
“जेवताना सोल कढी घेतल्याचं?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.” कामोद अस्वस्थ होत होता प्रत्येक प्रश्नाला.
“ फक्त तुम्हाला व्हिला ला फोन केला होता की नाही आठवत नाहीये. बरोबर?”
“ युअर ऑनर, हल्ला होण्यापूर्वी कामोद ची मनस्थिती गोंधळलेली नव्हती त्यामुळे त्याला आधीचे आठवतंय पण हल्ल्यामुळे तो खूप घाबरला त्यामुळे नंतर चे त्याला आठवत नसणार.” आरुष काणेकर त्याच्या मदतीला येत म्हणाला.
पाणिनी हसला. “ तसे असेल तर पोलिसांना फोन केल्याचे पण त्याला आठवायला नको होत मिस्टर काणेकर.कारण पोलिसांना केलेला फोन सुध्दा त्याने हल्ला झाल्यावरच केला होता. घाबरल्यामुळे आणि गोंधळात पडल्यामुळे त्याला मरुशिका व्हिला ला फोन केल्याचं आठवत नसेल तर त्याच मानसिक अवस्थेत त्याने केवळ एक सेकंद पाहून आरोपीला ओळखलं हे कोर्ट कसे खरं मानेल? ”
“ तुम्हाला यावर काही युक्तिवाद करायचाय मिस्टर काणेकर?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ नाही युअर ऑनर” काणेकर थकून म्हणाला.
“कोर्ट आता दुपारी दोन वाजेपर्यंत आपलं कामकाज तहकूब करतंय. दोन नंतर पुन्हा कामकाज चालू करूया ”. न्यायाधीश एरंडे यांनी जाहीर केलं. कामोद कुमठेकर आपल्या पिंजऱ्यातून बाहेर आला. “ फारच खट्याळ वकील आहात तुम्ही मिस्टर पटवर्धन ” तो पाणिनीला उद्देशून म्हणाला.
“ धन्यवाद ” पाणिनीने सुद्धा त्याला तसंच उत्तर दिलं. त्याला बघून कनक ओजस पुढे आला.
“ घटना घडायला लागलेत पाणिनी.” “ मी त्या मॉडेलिंग एजन्सीच्या मागे आम्ही होतो ती मॉडेलिंग एजन्सी धनुष्य अपार्टमेंट मध्ये आहे सुरेल कंपन नावाचा माणूस ती चालवतो त्याचा फ्लॅट नंबर ४०९-१ आहे.
“अरे वा मस्तच पण तो पत्ता तुला कसा काय मिळाला कनक?”
सौम्याने आणि माझ्या एका गुप्तहेर मुलीने वेगळ्या नावाने एक अर्ज केला होता त्यांच्याकडे मॉडेल म्हणून काम मिळावं याकरता त्या अर्जावर दोघींनी त्यांचा फोन नंबर लिहिला होता त्या अर्जाला प्रत्युत्तर म्हणून एजन्सीच्या त्या माणसाने तिला फोन केला आणि येऊन भेटायला सांगितलं. धोका नको म्हणून मी सौम्या ऐवजी माझ्या दोन स्त्री हेर पाठवल्या.आणि तिथे गेल्यावर कोण भेटलं असेल ? ”
“ सुरेल कंपन?” पाणिनी ने विचारलं.
“ गौतम पिसे. ” कनक म्हणाला आणि पाणिनी उडालाच. “ याचा अर्थ सुरेल कंपन आणि पिसे एकत्रच काम करताहेत कुठल्यातरी विषयावर.कनक, एक काम कर त्या दोघांत नेमके काय चालू आहे ते मला हवंय.तुला आठवत असेल तर तुझा हेर सर्वेश जेव्हा धनुष्य अपार्टमेंट वर नजर ठेवायला नेमला होता तेव्हा तो म्हणाला होता की ४०९-१ या फ्लॅट मधे सारख्या कोणीतरी मुली येत जात असतात.”
“ बरोबर त्याने मला सादर केलेल्या रिपोर्ट मधे पण तसा उल्लेख आहे.” कनक म्हणाला.
“ तर तू आता माहिती काढायला सुरुवात कर. आणखी एक महत्वाचं काम कर.ज्योतिर्मयी सुखात्मे आणि गौतम पिसे हे मला बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून कोर्टात अवे आहेत.त्यांना समन्स सर्व कर. ” खिशातून दोन कागद काढून त्यावर सह्या करून देत पाणिनी म्हणाला
“ ओके.”—कनक म्हणाला.
दुपारी दोन वाजता पुन्हा कोर्ट सुरु झालं. न्या.एरंडे आपल्या खुर्चीत येऊन बसले.
“मिस्टर कामोद कुमठेकर यांची उलट तपासणी पूर्ण झाली होती. पुढचे कामकाज चालू करा. ” एरंडे म्हणाले.
पाणिनी उठून उभा राहिला. “ युअर ऑनर, आपल्या केबिन मध्ये मला आणि सरकारी वकील काणेकरांना तुम्ही बोलावलं तेव्हा डॉ.डोळे यांना तुम्ही फोन केला होता.आणि आज दुपारी दोन वाजता सिया माथूर ला साक्षीसाठी हजर करण्यात यावं असा आदेश तुम्ही दिला होता. मला वाटत की सरकार पक्षाने पोलिसांच्या मदतीने सिया माथूर ला इथे हजर केलं असावं.”
न्यायाधीशांनी आरुष काणेकर कडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिलं.
“ आम्ही डॉक्टर डोळे यांच्यावर दबाव टाकून तिला इथे हजर करायची व्यवस्था केली आहे.येईलच ती कोणत्याही क्षणी.” आरुष म्हणाला.
“ मिस्टर पटवर्धन, तुम्हाला सिया इथे येई पर्यंत आणखी काही पुरावे सादर करायचे आहेत? किंवा साक्षीदार तपासायचे आहेत?” एरंडे म्हणाले.
“मला हिमानी दुनाखे खून प्रकरणातील पोस्ट मार्टेम अहवाल बचाव पक्षातर्फे पुरावा म्हणून सादर करायचा आहे.परंतू तो आमच्या कडे अत्ता उपलब्ध नाही तो पोलिसांकडे आहे.माझी कोर्टाला विनंती आहे की तो सादर करावा.” पाणिनी म्हणाला
“ त्याचा या खटल्याशी काहीही संबंध नाही.पटवर्धन यांना तो अहवाल हवा असेल तर त्यांनी तो अन्य मार्गाने मिळवून सादर करावा. ” काणेकर म्हणाला.
“ याचा अर्थ हिमानी च्या खुनाशी या आरोपीला जोडले जाणार नाही याची हमी सरकार पक्षाने दिल्ये असा घ्यायचा का युअर ऑनर?” पाणिनीने थेट न्यायाधिशांना विचारलं.
“ काणेकर तुमच्याकडे तो अहवाल अत्ता आहे? ” न्यायाधीशांनी विचारलं.
काणेकर या प्रश्नाने वैतागला.त्याने उत्तर दिले नाही.
“ उत्तर द्या.”
“ आहे युअर ऑनर.”
“ मग तुम्ही तो पुरावा म्हणून सादर का केला नाहीत अजून पर्यंत? ” –एरंडे.
“ आम्ही तो....... म्हणजे आमचा प्लान....” आरुष अडखळला.
“ आरोपी सुषेम काणेकर चा, या खटल्यात काय निर्णय लागतो याचा अंदाज घेऊन त्यानुसार खुनाच्या आरोपात त्याला अडकवायचे नियोजन असणार त्यांचे.” पाणिनी ने उत्तर दिलं.
“ अहवाल सादर करून घ्यायला परवानगी देतोय मी पटवर्धन पण तुम्ही त्याचा संदर्भ जोडून दाखवण्याची हमी देत असाल तर.”-एरंडे.
“ मी हमी देतो तशी.” पाणिनी म्हणाला
“ ठीक, मिस्टर काणेकर, तो अहवाल सादर करा.”—एरंडे
काणेकर ने पोस्ट मार्टेम अहवाल न्यायाधिशांना दिलं त्यांनी तो काळजी पूर्वक वाचला आणि क्लार्क कडे दिला.
“ याला बचाव पक्षाचा पुरावा म्हणून क्रमांक द्या ”
“ मी आता अगदी केवळ एक दोन प्रश्न विचारण्यासाठी मरुशिका यांना पुन्हा हजर राहण्याची विनंती करतो.” पाणिनी म्हणाला
काणेकर उठून उभा राहिला.“ आता हे मात्र फारच झालं. सिया माथूर येईलच आता. त्यासाठी पुन्हा मरुशिका ना पुन्हा बोलावणे म्हणजे.....”
“ मला पोस्ट मार्टेम अहवाल लिंक करायचा आहे त्यासाठी मरुशिका हव्येत मला.”
“ ठीक आहे बोलवा त्यांना.” एरंडे म्हणाले.
मरुशिका कोर्टात आली.पिंजऱ्यात येऊन बसली.पण आता तिच्यात पूर्वीची मिजास दिसत नव्हती.
“ मरुशिका, मला फक्त एकच विनंती करायची आहे तुम्हाला, त्यासाठी इथे बोलावलं आहे. आमच्या लेडीज पोलीस इन्स्पेक्टर तुमची जरा शारीरिक तपासणी करतील.” पाणिनी म्हणाला
“ ओह, युअर ऑनर, काय चाललंय हे ! आय ऑब्जेक्ट.” काणेकर कडाडला.
“ पटवर्धन, मला सांगा तुम्हाला नेमकं काय हवंय? ” –एरंडे
“ मरुशिका यांच्या उजव्या पायावर गुढग्याजवळ एक डाग आहे तो त्यांनी कोर्टाला दाखवावा.त्यांना सर्वांसमोर हे सांगायला किंवा त्यांनी दाखवायला मला प्रशस्त वाटलं नाही म्हणून मी त्यांना तशी विनंती केली होती.” पाणिनी म्हणाला
कोर्टात एकदम कुजबुज सुरु झाली. एरंडे यांनी हातोडा वाजवून लोकांना शांत केलं.
“ माझ्या पायावर कोणताही डाग नाहीये. आणि ते मी इथल्या इथे सर्वांसमोर सिध्द करायला तयार आहे.आणि मुळातच माझ्या पायावरच्या डागाचा या खटल्याशी संबंधच काय?” मरुशिका खेकसली.
“ होल्ड अप च्या वेळी कामोद च्या हातातून जेव्हा लायटर सटकला, तेव्हा तो सीट कव्हर वर पडून त्याला भोक पडलं हे आपल्याला माहिती झालंय पण त्या आधी तो मरुशिका च्या पायावर पडला आणि त्यांना भाजल्याचा डाग पडला. ” पाणिनी म्हणाला
“ धादांत खोटं आहे हे ! ”
“ हे खोटे असेल तर माझ्या अंदाजाला पुष्टीच मिळत्ये.” पाणिनी म्हणाला
“ कसला अंदाज आहे तुमचा?” एरंडे यांनी विचारलं.
“ हाच की होल्ड अप च्या दिवशी कामोद बरोबर गाडीत त्याच्या शेजारी बसलेली स्त्री ही मरुशिका नव्हती ! ” पाणिनी म्हणाला
“ मग कोण होती?”
“ ती हिमानी दुनाखे होती. जिचा खून झालाय आणि ज्या खुनाचे बालंट सरकार पक्ष आरोपी सुषेम इनामदार वर आणू इच्छितोय. अत्ता जरी सरकार पक्षाने थेट आरोप केलं नसला तरी ते या तयारीतच आहेत नाहीतर मग हिमानीचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट या कोर्टात त्यांनी कशाला आणून ठेवला असता? ” पाणिनी ने बिनतोड सवाल केला.
“ युअर ऑनर, मरुशिका च्या पायावर डाग नाही म्हणजे ती गाडीत नव्हतीच हे विधान हास्यास्पद आहे. लायटर पडताना पाहून तिने पटकन पाय बाजूला घेतला असेल.” काणेकर ने युक्तिवाद केला.
“ समोर हल्लेखोर कामोद च्या डोक्याला बंदूक लाऊन उभा असतांना आणि दोघांना त्याने हात वर करायची आज्ञा दिली असतांना तिचे लक्ष लायटर पडतोय म्हणून पाय बाजूला करण्याकडे जाईल की हल्ला करणाऱ्या माणसाकडे?” पाणिनी ने विचारलं.
न्यायाधीश काहीतरी बोलणार होते पण पाणिनी ने पुढचा बॉम्ब टाकला. “ युअर ऑनर आपण पोस्ट मार्टेम रिपोर्ट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की तिच्या उजव्या पायावर एका नाण्याच्या आकाराचा भाजल्याचा डाग असल्याचा उल्लेख त्यात आहे.गाडीतल्या लायटर चा व्यास बरोब्बर त्या आकाराचा आहे. युअर ऑनर, हिमानीच्या पायाला गरम झालेल्या लायटर चा स्पर्श होऊन तिची कातडी लायटर ला चिकटली असेल आणि नंतर तो लायटर सीट कव्हर वर पडला असेल तर भोक पडलेल्या ठिकाणच्या आसपास हिमानीच्या त्वचेचे कण सापडू शकतील, त्या दृष्टीने फोरेन्सिक टीम कडून तपासणी केली जावी अशी मी विनंती करतो.मयताचे पोस्टमार्टेम होते तेव्हा त्याच्या नखाचे,केसांचे, कातडीचे नमुने जतन केले जातातच त्यामुळे मी म्हणतो तशी तुलना केली जावी.” पाणिनी म्हणाला
“ पोलिसांनी अशी काही तुलना केल्ये काय? ” एरंडे यांनी विचारलं.
“ नाही युअर ऑनर.” काणेकर म्हणाला. “ म्हणजे गाडीत हिमानी असेल.....”
“ कोणताही युक्तिवाद करू नका. नमुने घ्या आणि उद्या पर्यंत रिपोर्ट हवाय मला.” एरंडे कडाडले.
( प्रकरण २६ समाप्त.)