The true meaning of the word rich in Marathi Motivational Stories by Shreyas Ghadge books and stories PDF | श्रीमंत शब्दाचा खरा अर्थ?

Featured Books
Categories
Share

श्रीमंत शब्दाचा खरा अर्थ?

 

"श्रीमंत" हा शब्द ऐकल्यावरती बहुतांश लोकांच्या मनात एक विचार नेहमी येतो की जो या व्यक्तीचा खरा हकदार आहे, व तसेच जो व्यक्ती मुळात या शब्दाचा मालक आहे, तो खरच किती नशीबवान व्यक्ती आहे. परंतु नेमका श्रीमंत या शब्दाचा अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर फार क्वचित लोकांना माहिती आहे. खरंतर सृष्टीचे बरेच असे नियम आहे ज्यांना व्यक्ती लोक आपल्या मनाप्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करतात परंतु फार कमी असे लोक आहे ज्यांच्या हातात ती शक्ती मिळाली असते समोरच्या व्यक्तीला आपल्या मनानुसार चालवण्याची ती क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये सारख्या स्थितीत उपलब्ध नसते. आज या संपूर्ण लेखांमध्ये अशाच एका व्यक्तीच्या इतिहासाविषयी थोडक्यात मांडण्यात येणार आहे ज्या व्यक्तीच्या नावाची सुरुवातच श्रीमंत या शब्दाच्या पहिल्या अक्षरापासून होते. त्या व्यक्तीच्या आडनावातच संपत्तीच सोन लपल आहे ,अश्याच त्या व्यक्तीचा स्थापत्य अभियांत्रिकी पासून एक नवीन प्रवास सुरू झाला होता.   

                 "सरकारी नोकरी" या शब्दाचे महत्त्व आताच्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात वाढलेल आहे, कारण अगदी डेटॉल या साबण प्रमाणे सरकारी नोकरी हे देखील 99% मनुष्याचे बरेचसे प्रश्न सोडून देते. आणि या सरकारी नोकरीच्या परीक्षेकरिता बहुतांश लोक त्याच्या सागरात उडी मारण्याकरिता तयार असतात. व याच सागरात श्रीनिवास सोनटक्के यांनी देखील आपली एक उडी मारून बघितली. कारण पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहण कधीच शिकू शकत नाही. ज्याकरिता सखोल पणे संपूर्ण गोष्टींचा ज्ञान ठेवून प्रत्येक क्षणाला प्रयत्न करून त्या सरकारी नोकरी करिता सतत मेहनत घेत होते. वास्तविक पाहता श्रीनिवास सोनटक्के यांच्याकरिता सरकारी नोकरी म्हणजे काही नवल विशेष करण्यासारखी गोष्ट नव्हती कारण त्यांच्याकडे परिवारातील त्यांची आई वडील याच क्षेत्रात कार्यरत होते. पण तरीदेखील त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि सतत अभ्यास करीत त्या सरकारी सिंहासनाचा पाठलाग करत होते. परंतु रस्त्याला कधी वळण येईल हे सांगता येत नाही त्याच दरम्यान 2020 मध्ये कोरोना वायरस चा एक भव्य असा मोठा वळण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आला ज्या मार्फत बहुतांश लोकांना आपले जीवन सुरुवातीपासून सुरू करावे लागले. जणू 2020 नंतर बहुतांश लोकांचा जन्म हा नवीन दृष्टिकोनाने निर्माण झाला. आणि श्रीनिवास सोनटक्के देखील यांच्यातूनच एक होते कारण कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नसल्या कारणास्तव वेळ गमविण्यापेक्षा हीच वेळ होती की स्वतःला काही वेगळ्या मार्फत तयार करण्याची. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की ज्या खुर्ची करिता आपण सतत मेहनत करत आहे त्या खुर्ची वरती बसणाऱ्या व्यक्तीला आपल्यासाठी कार्यरत ठेवावे. म्हणजेच स्थापत्य अभियांत्रिकीत सर्वात मोठा राजा म्हणजे "कॉन्ट्रॅक्टर". मुळात कुठली परिस्थिती कोणत्या वेळेस कोणत्या व्यक्ती वरती येईल त्याचा अंदाज येत नाही कारण सृष्टीचा नियमच काही त्या दृष्टिकोनांनी बनलेला असतो. खरे तर घरची परिस्थिती मुळात चांगली असल्या कारणास्तव त्यांना याबाबतीत फारसा विचार करण्याची वेळ आली नाही. परंतु सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे कुठल्याही गोष्टी करिता पारंगत असण्याचा. ज्या क्षेत्रात त्यांनी आता आपलं काराकीर्द बनवण्याचा निर्णय घेतला होता त्या क्षेत्राचा संपूर्ण अनुभव मिळण्याकरिता बरेच वर्षांची गरज होती. ज्याकरिता सामान्य लोकांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यायची देखील आवश्यकता वेळेनुसार भासत होती. जर गोष्ट स्वतःच्या नवीन राज्याची निर्मिती करण्याकरिता इतिहासातील कुठल्याही राजाचे उदाहरण घेतलं तर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली तेव्हा जाऊन त्यांचं भव्य असं राज्य बनलं. जसे आताच्या स्पर्धेच्या जगात मोठे उद्योगपती म्हणतात. कुठलाही उद्योगपती हा सर्वप्रथम स्वतःसाठी पहिला पायरीवरूनच कामाची सुरुवात करतो तेव्हा जाऊन हजार रुपये म्हणून त्यावरती लाखो लोकांना आपल्या हाताखाली रोजगार मिळवून देण्याची संधी उपलब्ध करतो. येथे देखील तशाच काही घटना आढळल्या.खरे तर दोन वर्षा आधीच स्पर्धा परीक्षेचाअभ्यास श्रीनिवास सोनटक्के यांनी सोडला होता परंतु या गोष्टीचा अंदाज मुळीच नव्हता की दररोज नवीन काही शिकण्याची वेळ येईल नवीन गोष्टींचा अभ्यास करण्याकरिता अभ्यासक्रम निर्माण होईल. आणि ही फक्त आणि फक्त तुमच्या काराकीरदीतच घडते असं मुळीच नाही. आयुष्यभर शिक्षण हे घ्यावच लागतं कारण जीवन हे शिकवण थांबत नाही. परंतु ज्या क्षेत्रात त्यांचा आता नवीन प्रवास सुरू झाला होता त्यात बारीक गोष्टींना देखील समजण्याची अत्यंत गरज असते तुमच्या भावनांवरती मोठ्या प्रमाणात पकड असणे महत्त्वाचे असते वेळेचे नियोजन करण्याची तेवढीच गरज असते जेवढी गरज पैशाच्या नियोजनाची गरज वेळोवेळी मनुष्याला पडते.   

           परंतु आता सर्वात मोठा प्रश्न तो येतो की श्रीमंताचा खरा अर्थ काय? ही गोष्ट तेवढीच खरी आहे की आतापर्यंतचा रचलेला पराक्रम कदाचित उद्याच्या भविष्याला आणखी मोठ्या मार्फत यशाचा पारितोषिक श्रीनिवास सोनटक्के यांच्या पायथ्याशी ठेवून जाईल. दररोज एकच गोष्टी करिता लक्ष केंद्रित करून त्यावरती सतत मेहनत घेऊन शिस्तप्रिय राहून त्याबद्दल सगळ्या गोष्टींना पूर्ण करून प्रगती तर घडल्या जाईल. परंतु महत्त्वाचा आहे ते म्हणजे मनुष्याची स्वतःची ओळख.जर  श्रीनिवास सोनटक्के यांच्या बद्दल सांगतो म्हटलं तर त्यांच स्थापत्य या क्षेत्रात इंजीनियरिंग हे चार वर्षात पूर्ण झालं. आश्चर्य करण्याची गोष्ट असते की ज्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत सदन घरची असते त्यातील क्वचित अशी लोक असतात की ज्यांचं वेळेत शिक्षण पूर्ण झाल. एवढेच नव्हे तर त्यांचा सामोरील शिक्षण देखील त्याच क्षेत्रात (ME structure) यात पूर्ण झाले.खरे तर ज्या क्षेत्रात त्यांचं काराकीर्द सुरू आहे त्यात एवढ्या शिक्षणाची काय गरज असा देखील प्रश्न बहुतांश लोकांना येऊ शकतो. तर याचा सरळच उत्तर आहे की जेवाय कुठल्या सरकारी क्षेत्रात काही कामानिमित्त जायची गरज पडते तर पहिला प्रश्न जेव्हा विचारतात की तुमचं शिक्षण किती झालाय तेव्हा गर्वाने जेव्हा आपलं शिक्षण त्यांच्यासमोर मांडतो. तेव्हा त्या व्यक्तीचा आपल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन अतिशय वेगळ्या प्रमाणे असतो. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की परिस्थिती कशी पण असो जर तुमचा शिक्षण हे चांगल्या मार्फत पूर्ण असेल तर बहुतांश लोक तुम्हाला एक वेगळ्या दृष्टिकोनाने मान देतात. सध्याच्या परिस्थितीत लोकांना मान मोठ्या प्रमाणात हवा आहे परंतु शिकण्याची पाहिजे तशी इच्छा आताच्या पिढींमध्ये दिसत नाही.खरे तर दिवसेंदिवस प्रगती देखील बऱ्याच लोकांची झालेली आहे परंतु संवाद साधण्याकरिता चार भिंतीं शिवाय देखील कोणीच नाही कारण बहुतांश लोकांमध्ये प्रगती सोबत अहंकार देखील त्याच प्रमाणात बघायला मिळतो श्रीनिवास सोनटक्के यांच्या बाबतीत ही गोष्ट पूर्णपणे विरुद्ध दृष्टिकोनाने बनलेली आहे त्यांचे जर नात्यांची गोष्ट केली तर सगळ्या क्षेत्रात त्यांची नाते मोठ्या प्रमाणात च दिसून येईल.  

                   तर खरे तर घरची परिस्थिती चांगली असणे आणि तुमच्याकडे संपूर्ण गरज पूर्ण करण्याइतकी रक्कम असेल म्हणजेच तुम्ही श्रीमंत आहात असे मुळीच नाही. खरी श्रीमंती ती आहे जात व्यक्तीचा व्यक्तिमत्व ऐकल्यावर ती त्याची सकारात्मक प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर येईल म्हणजेच त्याचं शिक्षण, समाजातील त्याचा मान, लोकांसोबत बोलण्याचा त्याचा एक अनमोल स्वभाव, नाती टिकून ठेवण्याची ती मजबुती ही असते खरी संपत्ती जे श्रीनिवास सोनटक्के यांच्याकडून बघण्यात मिळालेली आहे आणि हाच तो श्रीमंत या शब्दाचा खरा अर्थ.  

              लेखक - श्रेयस घाडगे

(B tech Civil Engineering)