MANAGERSHIP - 4 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | मॅनेजरशीप - भाग ४

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

मॅनेजरशीप - भाग ४

मॅनेजरशीप भाग ४

 

भाग 3 वरुन  पुढे वाचा ........

 

दुसऱ्या दिवशी मधुकर जरा लवकरच फॅक्टरी मध्ये पोचला. आदल्या रात्री सातपुते जे काही सांग होते त्यावरच डोक्यात विचार चालू होते. कार मधून उतरता उतरताच त्यांच्या लक्षात आलं की ट्रक लोडिंग चालू आहे. मधुकरला आश्चर्य वाटलं. आज तर कुठलेच dispatches नव्हते. असते तर त्याला माहीत असायला हव होतं. काय प्रकार आहे ते बघायला तो ट्रक पाशी गेला. तिथे स्टोर ऑफिसर बर्डे उभे होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली लोडिंग चालू होतं.

“काय बर्डे कोणाच मटेरियल पाठवता आहात ?” – मधुकर.

“साहेब मटेरियल नाहीये. स्क्रॅप पाठवतो आहे.” – बर्डे.

“एकदम अचानक ?” – मधुकर.

“नाही साहेब दर चार पांच महिन्यांनी पाठवतो साहेब.” – बर्डे. 

बोलता बोलता मधुकर ट्रक च्या पाठीमागे गेला आणि काय काय स्क्रॅप आहे हे

बघायला लागला. ट्रक मध्ये खाली बरेचसे इनगॉट होते आणि त्यावर हॉट चॉक ने नंबर पण टाकले होते. त्यांच्या वरती बरीचशी कास्टिंगस पण लोड झाली होती. हे तसं बरोबरच होतं कारण फौंडरी मध्ये अजून काय असणार ? पण मधुकरला जी गोष्ट खटकली  ती ही की त्याला या बद्दल काहीच सांगण्यात आलं नव्हतं.

“हे स्क्रॅप disposal कोण अप्रूव करतं ? सातपुते ? का वेणुगोपाल ?”

 

“नाही साहेब सातपुते साहेब जे जे मटेरियल रीजेक्ट करतात, ते आम्ही बाजूला ठेवतो. जागा भरत आली की विकायला काढतो.” – बर्डे. 

“ओके. हरकत नाही, आता एक काम करा, हे मटेरियल खाली उतरवा आणि ट्रकला सोडून द्या.” – मधुकर. 

“साहेब, त्याचं भाडं ?” – बर्डे.

“देऊन टाका.” – मधुकर. 

“साहेब, मग हे केंव्हा पाठवायचं ?” – बर्डे.

“ते बघू नंतर, आधी मला सातपुते साहेबां बरोबर मटेरियल चेक करू द्या.” – माधुकरने आता जरा आवाज चढवला.

“साहेब excise invoice पण बनला आहे.” – बर्डेची कुरकुर. 

“Cancel  करा.” – मधुकर.

“साहेब excise invoice मध्ये खाडा खोड केलेली सुशील बाबुना चालत नाही. माझी शाळा घेतील ते.” – बर्डे आता घाबरला होता.

“ते मी बघेन . तुम्ही काळजी करू नका माझं नाव सांगा आणि मोकळे व्हा.” मधुकरनी फायनल सांगितलं.

 

“साहेब सुशीलबाबूंचा राग फार भयंकर असतो. तुम्हाला त्रास होईल. बर्डे साहेब जे करताहेत ते त्यांना करू द्या. कितीतरी वर्षं ते, हे काम करताहेत.” चक्रवर्ती तिथे आला होता आणि तो मध्येच बोलला.

 

माधुकरने चक्रवर्तिकडे लक्षच दिलं नाही. म्हणाला “बर्डे जे सांगितलं ते करा. लगेच. वेळ न घालवता.” आणि तो ऑफिस कडे चालायला लागला. ऑफिस मध्ये गेल्यावर त्यानी गेट वर फोन केला आणि सांगितलं की “जे ट्रक उभे आहेत ते रिकामेच गेले पाहिजेत. त्यात जर माल असेल तर जावू देऊ नका आणि मला तबडतोब फोन करा.”

अर्धा तास झाला गेट वरुन काहीच फोन आला नाही तेंव्हा त्यांनीच गेटला फोन

लावला, तेंव्हा कळलं की ट्रक मध्ये सामान भरणं चालूच आहे. माधुकरने  जरा विचार केला आणि किरीट साहेबांना फोन लावला.

“हॅलो सर, मी मधुकर सरनाईक बोलतो आहे. I am sorry to disturb you, but I would like to share some information with you and seek your advice.”

“Go ahead” - किरीट साहेब.

 

“आज सकाळी मी फॅक्टरीत आलो तेंव्हा स्टोर ऑफिसर काही ट्रक भरून स्क्रॅप पाठवत असतांना बघितलं, मला आश्चर्य वाटलं की मला माहिती न देता फॅक्टरीतून  माल बाहेर कसा जातो आहे म्हणून मी ट्रक चेक केले तेंव्हा अस दिसलं की जे मटेरियल high molybdenum आणि  high tungsten मुळे reject  झाले आहेत तेच पाठवले जात आहेत. सर हे दोन्ही मटेरियल अतिशय कॉस्टली आहेत आणि मुळात त्यांचं प्रमाणा बाहेर अॅडिशन कसं झालं ह्याची चौकशी सुरू आहे. आणि पुनः हे स्क्रॅप, नॉर्मल स्टील स्क्रॅप च्या भावात चाललं आहे म्हणून मी ते रोकायला सांगितलं. पण स्टोअर ऑफिसर बर्डे ऐकायला तयार नाही आणि चक्रवर्ती त्याला धमकावतो आहे की सुशील बाबूंना सांगून नोकरीवरून काढून टाकेन म्हणून. मी दोघांचही suspension लेटर तयार केलं आहे. फक्त तुमची परवानगी पाहिजे. Trucks  ताबडतोब थांबावायला हवेत.” मधुकरनी किरीट साहेबांना डिटेल्स दिले.

 

“तुम्ही जे करता आहात ते बरोबर आहे अशी तुमची खात्री असेल तर go ahead with your planning. Don’t get scared of anybody. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की  If required, you will have to justify your actions. Only thing is that, just ensure that whatever you do, is in the interest of company. You have my support.” – किरीट साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला.

हे ऐकल्यावर माधुकरला समाधान वाटलं. मग त्याने क्लर्क ला बरड्यांच  सस्पेंशन लेटर टाइप करायला सांगितलं. लेट्टर झाल्यावर त्यांनी बरड्यांना बोलावणं पाठवलं.

“बर्डे ट्रक अजूनही इथेच का उभे आहेत ?”

“साहेब, चक्रवर्ती म्हणाला की माल पाठवला नाही तर तोच सुशील बाबूंना फोन

करेल मग माझी नोकरी जाईल साहेब.” – बर्डे. 

बसा पांच मिनिटं.

क्लर्क ला पुन्हा बोलावलं आणि चक्रवरतीचं लेटर पण टाइप करायला सांगितलं.

चक्रवर्तीला बोलावणं पाठवल.  तो आल्यावर दोघांच्याही हातात पत्र ठेवली आणि वॉचमनला बोलावून सांगितलं की “यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. दोघांनाही सस्पेंड केलं आहे. त्यांना त्यांच्या जागेवर सुद्धा जावू देऊ नका. जे काही सामान हव असेल ते तुम्ही जावून आणून द्या.” आणि मग मधुकर बाहेर पडला. स्वत: जाऊन त्यांनी ट्रक मधून माल उतरवायला लावला. शिंदे सुपरवायझर ला बोलावून त्याला ट्रक रिकामे करायला सांगितले. सातपुते साहेबांना बोलाऊन नीट वर्गवारी करून ठेवायला सांगितल. आणि सगळं झाल्यावर केबिन मध्ये यायला सांगितलं , मग तो ऑफिस मध्ये जाऊन बसला.

चक्रवर्ती आणि बर्डे दोघांनाही जे काही घडलं ते अगदीच अनपेक्षित होतं. दोघांनाही कळत नव्हतं की आता काय करायचं ते. शेवटी चहा पिता पिता विचार करू आणि काय ते ठरवू  असा विचार करून ते चहाच्या टपरीवर गेले. दोघांच्याही मते सुशील बाबूंना भेटून,सर्व घटना सांगणे आवश्यक होते. पण आत्ता या वेळी सुशील बाबू भेटणं शक्य नव्हतं. मग संध्याकाळी जाण्याचे ठरले. दोघांनाही दारूची अनिवार तलफ आली होती पण मग सुशील बाबूंच्या वॉचमन ने त्यांना गेट च्या आत पण घेतलं नसतं म्हणून त्यांनी तो विचार झटकून टाकला. रात्री बघू अस ठरवून घरचा रास्ता धरला.

 

संध्याकाळी दोघंही सुशील बबूंच्या घरी. सुशील बाबू घरी नव्हते, मग एका चहाच्या टपरीवर जाऊन चहा घेतला आणि वापस सुशील बाबू. ते अजून घरी आले नव्हते. त्या दोघांनी वॉचमनला म्हणाले की एकदा मॅडमला  विचारा की केंव्हा येणार आहेत ते. वॉचमन आत गेला आणि विचारून आला.

वॉचमन ने येऊन निरोप सांगितला की बाबूंना यायला रात्री उशीर होणार आहे तेंव्हा तुम्ही उद्या सकाळी येऊन बघा. झालं. सगळंच फिस्कटलं. आता काय करायचं ? सुशील बाबू तर भेटणार नव्हतेच मग सरळ दारूचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे ? दोघांचही यावर एकमत झालं आणि ते चालू पडणार इतक्यात सुशील बाबूंचीच गाडी येतांना दिसली. ते तिथेच गेटवर थांबले आणि बाबूंना नमस्कार केला. थोड्यावेळाने बाबूंनी त्यांना बोलावलं.

“आता काय गोंधळ घातला तुम्ही दोघांनी ?” – सुशील बाबू. 

 ‘गोंधळ आम्ही नाही, मधुकर साहेबांनी घातला आहे. ते मधुकर साहेब, आपल्याला वाटलं त्या पेक्षा जास्तीच हुशार आहेत. सुशील बाबू, खूपच गडबड झाली आहे. त्यांनी आम्हाला सस्पेंड केलं आहे. Suspended pending enquiry. असं लिहिलं आहे. म्हणजे जितके दिवस चौकशी चालेल तितके दिवस.” चक्रवर्तीने रडकथा सुरू केली.

“असं !, काय घडलं ते नीट सविस्तर सांगा.” – सुशील बाबू.  

बर्डे बोलले, “बाबू, तुमच्या सांगण्या प्रमाणे आम्ही स्क्रॅप चे ट्रक लोड करायला घेतले होते. ते ही अगदी सकाळी सकाळी, पण का कोण जाणे, मधुकर साहेब आज नेमके खूप लवकर आलेत. त्यांनी ट्रक पाहिले आणि चेक केलेत. मग माल जो लोड केला होता तो उतरवायला सांगितलं.” मग चक्रवर्ती म्हणाला की “आम्ही त्यांना सांगितलं

की सुशील बाबूंच्या ऑर्डर्स आहेत म्हणून पण त्यांनी ऐकलं नाही.”

“मग काय झालं ?” – सुशील बाबू.

“आम्ही ट्रक लोडिंग सुरूच ठेवलं. तुमचे आदेशच होते तसे.” – बर्डे.

“मग ?” – सुशील बाबू.

“मग आम्हाला बोलावून काही न बोलता सरळ  ही पत्र हातात दिली. आम्हाला आमच्या टेबलावर सुद्धा जावू दिलं नाही, सरळ बाहेर काढलं.” – चक्रवर्ती.  

“लेटर मध्ये काय आरोप लावला आहे ?” – सुशील बाबू.

“वरिष्ठांना अंधारात ठेऊन आणि त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कंपनी चा माल परस्पर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे हा आरोप ठेवला आहे साहेब. वरतून pending enquiry,” चक्रवर्तीने वाचून दाखवलं. “म्हणजे आता चौकशी अधिकारी नेमणार आणि चौकशी पूर्ण होईपर्यन्त आम्ही बाहेर, मग साहेब सगळंच बाहेर येणार. सुशील बाबू आता तुम्हालाच काहीतरी करांव लागणार आहे. त्या माधुकरला आवरा साहेब. तो फार भयंकर माणूस आहे.”

“ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. आता तुम्ही जा. मेहरबानी करा आणि भांडू

नका. शांत रहा.” – सुशील बाबू.  

सुशील बाबू भयंकर संतापले होते. मधुकर आल्या नंतर जवळ जवळ चार महीने सर्व काही ठीक चाललं होतं. त्यांना  वाटलं होतं की हा माणूस पण इतरांसारखाच आहे. याला आपण सहज आपल्या बाजूने वळवू. पण गेल्या महिन्यायाभरात मधुकरने जे उद्योग केले होते त्यावरून हे प्रकरण काही साध सरळ दिसत नव्हतं.

आज तर हद्दच झाली होती. त्यांचा माल रोकण्यात आला होता.

त्यांनी वकील साहेबांना फोन लावला.

“हॅलो, वकील साहेब, मी सुशील अग्रवाल बोलतो आहे. मी दहा बारा दिवसांपूर्वी तुमच्यावर एक काम सोपवलं होतं त्याचा काहीच रिपोर्ट मला अजून मिळाला नाही.”

“साहेब मी आता तुम्हाला फोनच करणार होतो की केंव्हा भेटायला येऊ म्हणून. आत्ता येऊ ?” – वकील साहेब.

“या. मी वाट पाहतो आहे.” – सुशील बाबू.  

वकील आल्यावर सुशील बाबू म्हणाले की “Let us get in to the business No preamble. तुम्हाला जे काही कळलं आहे ते लगेच आणि सर्व सांगा.”

“होय सुशील बाबू.” – वकील.  

“मधुकर हा मूळचा इंदोऱ् चा. त्याचे आई वडील इंदोऱलाच होते.” वकील ने सांगायला सुरवात केली. “त्यांचा तिथे मोठा वाडा आहे. दहा पंधरा भाडेकरी राहतात. जवळ जवळ 30000 sq. फूटाची जागा आहे आणि तीही मोक्याच्या जागी. दोन वर्षांपूर्वी सहा महिन्याच्या अंतराने त्यांचे आई आणि वडील दोघंही मृत्यू पावले. एक मोठी बहीण आहे. तिचा नवरा व्यावसाईक आहे आणि ते ही गडगंज श्रीमंत आहेत. प्रॉपर्टी ची देखभाल तेच करतात. मधुकरला प्रॉपर्टी मध्ये फारसा interest नाहीये.”

वकील थोडा थांबला. हातातले कागद नजरेखालून घातले, आणि पुढील माहिती सांगायला सुरवात केली. “मधुकर हा आखाड्यात घुमलेला माणूस आहे. पिळदार शरीरयष्टी लाभलेला हा माणूस अतिशय हुशार आहे. आणि त्याच बरोबर निर्व्यसनी पण आहे. हा माणूस एकदम स्वछ चारित्र्याचा आहे. Metallurgical इंजीनीरिंग मध्ये डिग्री घेतल्यावर त्यांनी M. tech केल. फौंडरी वर्तुळात त्याचं नाव फार आदराने घेतल्या जातं. साहेब, हा माणूस फक्त आणि फक्त कामावर प्रेम करतो. याचं लग्न झालेलं नाही आणि कुठल्याही मुलीबरोबर याच संधान पण नाही.”

सुशील बाबू विचारात पडले. थोड्या वेळाने म्हणाले की “वकील साहेब, इतकी सारी माहिती तुम्ही गोळा केलीत. पण यात एकही अशी गोष्ट नाही की जिचा आम्हाला उपयोग करून घेता येईल. मी तुम्हाला म्हंटलं होतं की यांचे weak points शोधा जेणेकरून त्याला कंपनीतून घालवता येईल. पण तुम्ही तर फक्त त्यांची तारीफच करता आहात.”

“सुशील बाबू आम्ही investigator आहोत. मिळेल ती माहिती गोळा करणे आणि  ती तुमच्यापर्यंत पोचवणं हे आमचं काम. मिळालेल्या माहितीतून तुमच्या उपयोगाचं काय आहे ते आम्हाला कसं कळणार ? ते तुम्ही शोधायचं. Weak points च म्हणाल तर हा माणूस  work alcoholic आहे. काम, काम आणि काम हाच यांचा Weak point आहे. बरं अजून काही नसेल तर मी निघू आता ?” – वकिलने  त्यांची बाजू मांडली.

सुशील बाबूंनी मान डोलावली. म्हणाले की “काही वाटलं तर सांगतो.”

 

दोन महत्वाचे मोहरे चक्रवर्ती, आणि बर्डे, गळाले होते. धंद्यावर चांगलाच आणि तो ही लॉन्ग टर्म परिणाम होणार होता. मधुकर च्या चाली वरुन तो पूर्ण investigation केल्या शिवाय थांबणार नव्हता हे लक्षात येत होतं. मधुकरची नेमणूक जयंत आणि किरीट ने केली असल्याने त्याला हात लावणं अवघड होतं. सुशील बाबू विचार करत होते की काय करांव ? Investigation त्यांच्या पर्यन्त पोचण्याची शक्यता त्यांच्या ध्यानात आली होती.  प्रकरण आंगावर येण्या आधीच झटकणं आवश्यक होतं. पण कसं ? धवन ला हे सगळं सांगण्याची त्यांची इच्छा नव्हती पण आता त्यांना दूसरा मार्ग दिसत नव्हता. त्यांनी धवन ला फोन लावला.

 

क्रमश: .....

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com