akher prem jinkle in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | अखेर प्रेम जिकंले

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

अखेर प्रेम जिकंले

राघव कॉफी चा मग घेऊन खिडकी समोर बाहेर पडणाऱ्या पाऊसाच्या सरींना न्यहाळात उभा होता जणू त्या सरी त्याला काहीतरी सांगत होत्या

राघवला तो दिवस आठवला जेव्हा तो आणि मीरा पहिल्यादाच भेटलेले त्या दिवशी असाच पाऊस पडत होता तो दिवस त्याचा फक्त ओळखीचा दिवस होता मग मैत्री झाली हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी जीवनभराची साथ निभवण्याचे ठरवले आणि संसाराच्या बेडीत दोघेही अडकले

पण म्हणतात ना पाऊसच्या सरी प्रमाणे विजेचा कडकडाट हि असतो तसेच झाले अवघ्या दीड वर्षात ते वेगळे राहायला लागले पण डिवोर्स साठी मात्र अँपलय केलं नाही मीरा आपल्या आईबाबांबरोबर तर राघव ह्या शहरात नोकरी निमित्त एकटाच राहायच्या जेव्हा पासून मीरा सोडून गेली तेव्हा पासून त्याने आपल एकट्याच असं जग निर्माण गेलेलं न कुठे जाण येणं


राघव अचानक भानावर आला आज त्याला मीराची खूप आठवण येत होती त्याने मीराला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला नंबर मात्र अजून सेव्ह होता रिंग होत होती पण पलीकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता त्याने मोबाईल ठेवला आणि शांत पणे तो बसला पण त्याला डोळ्यासमोर फक्त मीरा दिसत होती त्याने परत मोबाइल हातात घेतला आणि फोन लावला पण प्रतिसाद काहीच नव्हता

एक मन त्याच तू का झुकतोस असं म्हणत होत तर दुसरं मन तुझं प्रेम तूचि वाट पाहत आहे ह्या दोन्ही विचाराने तो अस्वस्त होत होता तेव्हा त्याला मीराची एक गोष्ट आठवली ती नेहमी सांगायची कि जेव्हा मन कॉन्फयुज्ड असेल तेव्हा डोळे बंद करून शांत बसावं आणि जे समोर येईल ते आपलं उत्तर असेल हे राघवने केलं आणि लगेच तो तयार होऊन मीराच्या घरी निघाला जाताना मीराचं फेव्हरट चॉकलेट घ्याल तो विसरला नाही

त्याने बेल वाजवली मीराच्या आईने दरवाजा उघडला

त्याला पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या पण काही न विचारता आता ये म्हणाल्या

"आई मला मीराला भेटायचं आहे "

"आता कशाला आला आहेस "

"बाबा पिल्झ मला भेटु द्या"

मीराच्या आईने तिच्या बाबांना खुणेने गप्प राहण्यास सांगितले

"मीरा राघव आला आहे तुला भेटायचं म्हणतोय"

"कांय आज आठवण आली त्याला"

"ना हे बघ मिरा त्याला भेटणं न भेटण हे तूझ्या वर आहे पण एक सांगु कुठलीही गोष्ट जेवढी ओढली जाते ना ती तुटते आणी तो आला आहे मग बघ तरी तो काय म्हणतो ते ..."

"बरं त्याला इथे पाठवं"

"हो इथेच पाठवते आमच्या समोर तुम्ही संकोच कराल बोलायला"

"राघव मीरा बोलावते तुला"

मिरा खिडकी समोर उभी होती तिही आतुन तुटली होती पण सामान्य असल्याच भासवत होती

"मीरा मीरा आज तुझी खुप आठवण येत होती तुला काॅल पण लावलेला पण तु रिसीव्ह केला नाही म्हणून तुला भेटायला आलो घे तुझं फेवरेट चाॅकलेट"

" बरं इथे ठेवतो नक्की खा हा किती दिवसांनी तुला पाहतोय मी "

"मिरा मी तुझ्या शी बोलतोय आणी तु गप्प काहीतरी बोल ना"

"काय बोलु "?

"अगं एवढ्या दिवसांनी आपण भेटतोय तुला माझ्याशी काहीच बोलावंसं नाही वाटत "

"मग एवढे दिवस तुला भेटावसं नाही वाटलं मी आज पण तो काळा दिवस विसरले नाही आहे "

"आय नो‌ तो दिवस आपल्या आयुष्यात नसता तर आपण असे दुरावले नसतो त्या एका दिवसाने आपल्याला एकटं केलं पण मीरा दुरावलेल्या दिवसांनी मला जाणीव करुन दिली की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत माझा श्र्वास आहेस तु मीरा आणी त्या दिवशी मी तूझ्यावर हात उचलायला नको होता "

"तुला काय वाटतं मी मजेत जगत आहे एक दिवस असा गेला नाही ज्यात तुझी आठवण आली नाही आणि मी पण मग विचार केला त्या दिवशी मी पण तुझ्यावर जरा जास्त चिडले "

"मीरा मला माहीत आहे आपण एकमेकांशिवाय नाही राहु शकत पण आपल्या इगोने आपल्या ला एवढं दुर केलं "

"खरंच आपलं प्रेम एवढं कमजोर होत का की क्षणात ढासळ"

"नाही मीरा आपलं प्रेम मनाने मजबुत आहे म्हणून तर आपण एकमेकांच्या आठवणीने बांधले होतो मिरा जे झालं ते विसरून आपण नव्याने सुरुवात करुया "

"पण राघव मी विसरू शकत नाही तो दिवस त्या दिवसाचा तिरस्कार अजून हि माझ्या मनात आहे "

"आय कॅन अंडरस्टँन्ड बट हे पण खर आहे ना कि आपण वेगळे राहून खुश राहू शकत नाही "

'का कोण जाणे आजच्या पाउसाच्या सरी हेच सांगण्याच पर्यत करत होत्या वाटतंय राघव "

"तुला पण "

"म्हणजे "?

"मीरा मला पण आजच्या पाउसाच्या सरीने तुच्या आठवणीने इतके व्याकुळ केले कि मी इथे पोहोचलो बघ मीरा निसर्गाला सुद्धा आपला दुरावा पटला नाही "

"प्लीज बोल ना मीरा खरं आहे ना "

"राघव आज डिनर साठी काय करू"

"म्हणजे?"

"अखेर आपलं प्रेम जिकंल राघव निघूया आपण "

"रिअली आ एम टू हॅपी "

"हो चल माझं घर माझं वाट पाहत असेल "

आणि राघवने मीरा सोबत आपली गाडी आपल्या घरी वळवली