Asam Meghalay Bhramanti - 6 - Last Part in Marathi Travel stories by Pralhad K Dudhal books and stories PDF | आसाम मेघालय भ्रमंती - 6 - अंतिम भाग

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

आसाम मेघालय भ्रमंती - 6 - अंतिम भाग

#आसाम_मेघालय भ्रमंती ६

सकाळी उठून लगेज आवरून बाहेर ठेवले आणि नाष्टासाठी खोलोंग रेस्टॉरंट या डोंगर गुहेचा फिल देणाऱ्या हॉटेलच्या हॉलमध्ये आलो.भरपेट नाश्ता करून तिथे बाहेर असलेल्या भव्य टारझन द ऍप मैंन पुतळ्याबरोबर भरपूर फोटो काढले.एकूणच इथला परिसर मस्त होता .
पुढचा प्रवास सुरू झाला.
काझिरंगा ते गुवाहटी हा प्रवास दोनशे किलोमीटरचा पल्ला होता त्यामुळें आजचा दिवस प्रवासातच जाणार होता.आमची सहल आता शेवटच्या टप्प्यात आली होती. प्रवासादरम्यान आमच्या कारचालकाशी गप्पा चालल्या होत्या.पर्यटन व्यवसायावर त्यांचे जीवन अवलंबून असल्याने लॉक डाऊन काळात त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर फारच वाईट परिणाम झाल्याचे त्याच्या बोलण्यात जाणवले...
गप्पा टप्पा करत आमचा प्रवास चालू होता.रस्त्यात कालाजुगी येथील प्रचंड मोठे शिवाचे मंदिर बघण्यासाठी आम्ही थांबलो.
इथे प्रचंड आकाराचे शिवलिंग उभारले आहे व या शिवलिंगाच्या आतच मंदिराचा गाभारा साकारलेला आहे.होळी निमित्ताने बहुतेक इथे इथल्या स्थानिक समुदायाचा एखादा सण किँवा यात्रा असावी कारण मंदिरात नैवेद्य घेऊन स्थानीक मंडळींनी बरीच गर्दी केलेली होती. इथे आजूबाजूला अगदी ओसाड रान होते.उन्हाचा कडाका जाणवत होता.देवदर्शन करून आम्ही पुन्हा गाडीत बसलो.दुपारपर्यंत प्रवास करून गाड्या जेवणासाठी सोनापूर येथील आतिथ्य रिसॉर्ट येथे थांबल्या.फुलांच्या ताटव्याने हॉटेलचा परिसर मस्त सजवलेला होता.जेवणही छान होते.
लंचनंतर सलग प्रवास करून आम्ही गुवाहटी शहरातील Gateway Grandeur हॉटेलमध्ये पोहोचलो.प्रवासाचा मोठा पल्ला पार झाला होता. आज दुपारचा चहा चुकल्याने रूममध्ये गेल्या गेल्या तिथे असलेल्या इलेक्ट्रिक किटलीत चहा करून घेतला.
यानंतर दोन तास खरेदीसाठी ठेवले होते.थोडासा आराम करून मार्केटमध्ये फेरफटका मारला.विंडो शॉपिंग करावे अशी इच्छा झाली नाही कारण खास असे काही खरेदी करण्यासारखे आढळले नाही. त्यामूळे खरेदीचा उत्साह आवरता घ्यावा लागला ...
संध्याकाळी ब्रह्मपुत्रा नदीच्या विशाल पात्रातल्या क्रुझवर ऑर्केस्ट्रा आणि आदिवासी नृत्याच्या साथीत आमचे डिनर होणार होते .सर्वजण तयार होऊन ठरलेल्या वेळी गाडीत जाऊन बसलो.साडेसात वाजता आम्ही ब्रम्हपुत्रा नदीच्या तीरावर हजर होतो....
आठ वाजता क्रुझवरच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाऊन बसलो.आज आमच्या सहलीचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांचा पार्टी मुड होता. आसाममधील आदिवासी नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.नंतर जुन्या हिंदी गाण्यांचा फर्माईशी कार्यक्रम झाला.अनेक जुन्या गाण्यांचा आस्वाद आम्ही घेत होतो.
आमची बोट ब्रह्मपुत्रेच्या पात्रात फिरत होती.नंतर आमच्यातल्या कुणीतरी सैराटच्या गाण्याची फर्माईश केली आणि आमच्या सहलीत असलेले आबालवृध्द झिंगाट तालावर नाचात रमून गेले .विशेष म्हणजे प्रत्येकजण न लाजता जसे जमेल तसे थिरकत होता... आम्हीही मस्त अंग रिकामे करून घेतले. सहलीतल्या आनंदाच्या टीपेचे ते क्षण होते. एकंदरीत मस्त मजा आली...
क्रुझवरील स्वादिष्ट डिनरचा आस्वाद घेऊन आम्ही दहा वाजता परत हॉटेलकडे निघालो. आज आमचा सहलीतला शेवटचा मुक्काम होता ....
दिनांक २० मार्च हा आमच्या सहलीचा शेवटचा दिवस.
सात दिवसात सहवासाने सगळ्यांचे छान ट्यूनिंग जमले होते.सगळ्यांना आपापल्या घरी परतण्याचे वेध लागले होते.
बऱ्याचजणांना साडे अकरा वाजता एअरपोर्टला पोहोचायचे होते त्यामुळे आज फक्त कामाख्या मंदिराला भेट देणार होतो. कोरोना निर्बंध नुकतेच उठल्यामुळे मंदिराच्या दर्शन रांगेत खूप गर्दी होती.
वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आम्ही देवीचे फक्त मुखदर्शन घेतले.मंदिर परिसरात फोटो काढले आणि पुन्हा गाडीकडे परतलो....
बरोबर अकरा वाजता आम्ही एअरपोर्ट जवळील एका हॉटेलमध्ये पोहोचलो होतो.या हॉटेलातून केसरी टूरतर्फे सर्वाँना प्रवासात खाण्यासाठी लंच पॅक तयार करून देण्यात आला....
सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला...
निरोप घेताना प्रत्येकाने मनोमन आमचे कारचालक तसेच टूर गाईड केशव आणि तेजस यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. निरोपाचे ते क्षण मनात कायमसाठी साठवून आम्ही गुवाहाटी विमानतळावर आलो...
आमचे फ्लाईट तीन तासानंतर होते त्यामुळे सिक्युरिटी चेक करून आम्ही एअरपोर्टवर येऊन बसलो. बरोबर आणलेल्या लंच पॅक चा समाचार घेतला...
निर्धारित वेळेवर आमच्या प्लेनने टेक ऑफ केले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.....
हैद्राबादला तीन तास थांबून कनेक्टेड प्लेन होते,पण आता त्याचे फारसे काही वाटले नाही....
रात्री साडेअकरा वाजता आम्ही पुणे एअरपोर्टवर उतरलो....
आमच्या गृप सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेतानाच लवकरच नव्या डेस्टिनेशनला सहलीला जायचे ठरवून टाकले...
(समाप्त)
©प्रल्हाद दुधाळ.