Guntagunt - 2 in Marathi Thriller by Dilip Bhide books and stories PDF | गुंतागुंत भाग २

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

गुंतागुंत भाग २

गुंतागुंत भाग  २

भाग १ वरून पुढे वाचा.........

 

पुण्याच्या डॉक्टरांनी नारायण ला बोलावून विचारलं की “आम्ही शेवटचा उपाय म्हणू शॉक ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आहे. तुमची काही हरकत आहे का ?” नारायण नी होकार दिला आणि डॉक्टरांनी पहिला शॉक दिला. छातीवर प्रेस आणि रीलीज करत तोंडाने एक दो तीन अस म्हणत होते.

करूणांवर काही परिणाम झाला नाही तेंव्हा थोडा जास्ती पॉवर चा शॉक देऊन झाल्यावर डॉक्टर प्रेस आणि रीलीज करत असतांना तिथेच उभ्या असलेल्या यमदूताने तिच्या शरीरात प्राण फुंकला. करुणा थोडी खोकली आणि तिचा श्वास सुरू झाला. मॉनिटर पुन्हा जीवंत झाला. VITAL SIGNS मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला. डॉक्टरांनी नि:श्वास टाकला. नारायणचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेवढ्यात सुलभा आणि आई आणि पोरं पण करूणाचं अन्त्य दर्शन करायला आली होती. त्यांना पण एक अतिशय सुखद धक्का बसला. सगळा आनंदी आनंद झाला.

***

आमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये पण यमदूतानी शॉक ट्रीटमेंटच्या वेळेसच प्राणज्योती करुणेच्या शरीरात घातली. करुणा थोडी खोकली आणि श्वास सुरू झाला. मॉनिटर पुन्हा जीवंत झाला. VITAL SIGNS मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला. डॉक्टरांनी नि:श्वास टाकला. संजय  आणि त्यांच्या शेजाऱ्यांना झालेला आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांनी संजय ला मिठी मारली आणि त्यांनी संजयचे अभिनंदन केले. करुणा अजून किमान एक दिवस ICU मध्येच राहणार होती. एक  दिवस ICU मध्ये ट्रीटमेंट झाल्यावर आणि डॉक्टरांना विश्वास आल्यावर तिला रूम मध्ये शिफ्ट केलं. त्याच दिवशी दुपारी तिला शुद्ध आली. सिस्टर त्या वेळी तिचं सलाईन लावत होती. संजय तिथेच होता. तिने डोळे उघडले अस पाहून सिस्टर तिच्याकडे पाहून हसली. आणि म्हणाली

“ताई, आता कसं वाटतंय तुम्हाला. ?”

करुणा क्षीण हसली आणि म्हणाली “बरं वाटतंय.”

“छान. आता आराम करा म्हणजे शक्ति भरून येईल. मी डॉक्टरांना सांगते म्हणजे ते येऊन तपासतील आणि खाण्या पिण्याच्या सूचना देतील.” नर्स म्हणाली.

करूणाने मान हलवली आणि परत डोळे मिटले.

डॉक्टरांचा राऊंड झाला तेंव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. डॉक्टरांनी तपासलं.

करुणानि डोळे उघडले आणि डॉक्टरांच्याकडे बघून हसली. आणि म्हणाली

“मला काय झालंय डॉक्टर ?”

“काही नाही थोडी चक्कर येऊन पडल्या होत्या तुम्ही. आता सगळं ठीक  आहे.” डॉक्टरांनी सांगितलं.

“डॉक्टर मला अस्वस्थ वाटत होतं आणि छातीतली धडधड खूप वाढून गेली होती म्हणून माझ्या नवऱ्याने मला इथे अॅडमिट केलं. पुढचं काही आठवत नाहीये. पण तुम्ही चक्कर आली असं का म्हणता ? आणि संजय कडे बोट दाखऊन म्हणाली, हे कोण आहेत ? तुमचे सहकारी डॉक्टर आहेत का ?” – करुणा म्हणाली.

संजयला धक्काच बसला. करुणा त्याला ओळखतच नव्हती. तो म्हणाला

डॉक्टर..

डॉक्टरांनी त्याला हातांनीच गप्प बसायला सांगितलं आणि इंजेक्शन तयार केलं. इंजेक्शन देता देताच कारूणाने विचारले की “माझा नवरा आणि दोन्ही मुलं का नाही आली ?” पण इंजेक्शन चा परिणाम झाला आणि तिने डोळे मिटले.

संजय च्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं. ते पाहून डॉक्टर म्हणाले-

“चिंता करू नका मोकाशी, गुंगीच्या औषधांमुळे अस होतं कधी कधी. एक दोन दिवसांत सर्व ठीक होईल.” आणि ते चालले गेले.

डॉक्टर तर गेले पण संजय च्या मनात करुणानी विचारलेला प्रश्न घर करून होता. “माझा नवरा आणि दोन्ही मुलं का नाही आली ?” संजयचं डोकं विचार करकरून फुटायला आलं होतं. काय झालंय करूणेला ? तो खूपच घाबरला होता. आता रात्री शुद्धीवर आल्यावर हाच प्रश्न विचारला तर काय उत्तर देऊ ? त्याला काहीच सुचेना.

***

करुणाला आता रूम मध्ये शिफ्ट केलं होतं. नारायण, आई, सुलभा आणि दोन्ही मुलं पण होती. विजिटिंग अवर्स संपत आले होते आणि सिस्टर ने येऊन सांगितलं की फक्त एक जण थांबा बाकी सगळी घरी जा. आता पेशंट ओके आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. रात्रभर छान झोप झाली की सकाळी पेशंट एकदम नॉर्मल असेल. मग नारायण तिथे थांबला आणि बाकी घरी गेलेत. नारायण खाली जाऊन जेवून आला, आणि खुर्चीवर बसला. साधारण रात्री अकरा वाजता करुणाला जाग आली. तिला पाणी हवं होतं. नारायण ने तिला पाणी दिलं. ती थकलेल्या नजरेने नारायणकडे पहाट होती. नजरेत अनोळखी भाव होता. नारायणला जरा विचित्रच वाटलं पण तरी त्यानी विचारलं की “आता कसं वाटतंय ?”

“बरं वाटतंय. किती वाजले ?” – करुणा

“रात्रीचे अकरा वाजलेत. काही हवय का ?” – नारायण

“नको. पण तुम्ही कोण आहात ? आणि एवढ्या रात्री माझ्या रूम मध्ये काय करता आहात ?” करूणेचा प्रश्न

नारायणला धक्काच बसला. तो बावचाळून गेला. पण करुणा पेशंट होती. जरा दमानच घ्यायला हवं असा विचार करून तो म्हणाला-

“थांबा हं. मी आत्ता येतो.” आणि तो डॉक्टरला शोधायला निघाला. डॉक्टरांना त्यानी करुणा काय म्हणते आहे ते सांगितलं आणि आपल्या बरोबर या म्हणून विनंती केली.

डॉक्टर आले म्हणाले

“काय म्हणतो आमचा पेशंट ? बरं वाटतंय का आता ?”

“आता ठीक वाटतंय. पण हे कोण आहेत ? माझे मिस्टर का आले नाहीत? त्यांना माहीत नाही का ?” करुणानी डॉक्टरांना सरळच विचारलं.

आता रेसिडेंट डॉक्टर पण चक्रावून गेले. ते नवीनच होते आणि त्यांना फारसा अनुभव पण नव्हता. पण त्यांना हे कळलं की आत्ता आपण जर काही बोललो तर नाटकाचा हा अंक रात्रभर सुद्धा चालेल. मग त्यांनी कारूणाला झोपेच इंजेक्शन दिलं आणि म्हणाले की “हे माझे असिस्टंट आहेत. तुम्हाला ते मॉनिटर करताहेत. तुमची काळजी घेण्यासाठी त्यांना नेमलं आहे.” हे ऐकून करूणाचं समाधान झालं आणि ती झोपली. रूम च्या बाहेर आल्यावर नारायणने विचारले की “हे काय चालले आहे ? काय प्रकार आहे हा ?”

“मलाही समाजत नाहीये. पण कधी कधी गुंगीच्या औषधांमुळे अस होतं . उद्या सकाळ पर्यन्त सर्व ठीक होईल, काळजी करू नका.” नारायण रात्रभर टेंशन मध्ये. पहाटे केंव्हा तरी त्याचा डोळा लागला. त्या मुळे सकाळी BP घ्यायला नर्स आली तेंव्हाच त्याला जाग आली. तो पर्यन्त करुणा पण जागी झाली होती आणि त्याच्याच कडे त्रासिक नजरेने बघत होती. नारायण बाहेर आला.

“हा माणूस रात्रभर माझ्याच रूम मध्ये होता ?” करूणेनी नर्सला विचारलं.

नर्स नी मान डोलावली.

“अस कस ? या हॉस्पिटल मध्ये बायकांच्या खोली मध्ये पुरुषांना झोपायला देतात ? मला तक्रार करावी लागेल. माझा नवरा आला की त्याला सांगेन.” – करुणा

“अहो पण ते तुमचे मिस्टर आहेत. त्यांना तुम्ही ओळखलं नाही का ?” – नर्स आता गोंधळली होती.

“अहो अस कस माझा नवरा संजय २८ वर्षांचा आहे हे गृहस्थ तर पन्नाशीचे दिसताहेत.” – करुणा आता चिडली होती.  

“अहो यांचं नाव नारायणराव आहे आणि त्यांनीच तुम्हाला इथे भरती केलं. तुम्हाला हार्ट अटॅक आला होता म्हणून. तुम्ही खूप सिरियस होता.” नर्सनी तिला असलेली माहिती पुरवली.  

करुणा विचारात पडली. म्हणाली “सिस्टर तुमची काहीतरी चूक होते आहे. तुम्ही म्हणता अस काहीही झालेलं नाहीये. तुम्ही डॉक्टरांना बोलवा.”

नर्स पण कन्फ्युज झाली होती. ती बोलावते अस म्हणून निघाली. जातांना नारायण ला सांगून गेली की तुम्ही आत्ता खोलीत जाऊ नका पेशंट चा मूड चांगला नाहीये. मी डॉक्टरांना घेऊन येते आहे.

“डॉक्टर हा काय प्रकार आहे ? भलत्याच माणसाला तुम्ही माझा नवरा समजून रात्रभर माझ्याच खोलीत झोपू दिलं. ?” करुणाचा  संताप आता दिसायला लागला होता.

“अहो हे तुमचेच मिस्टर आहेत. काल  दिवसभर हे आणि तुमची दोन्ही मुलं पण इथे होती.” – डॉक्टर.  

“मुलं ? डॉक्टर माझं लग्न होऊन जेमतेम दीड वर्ष झालं आहे आणि मला अजून मूल झालं नाहीये. तुम्ही हा संसार माझ्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न का करता आहात ? ताबडतोब माझ्या नवऱ्याला बोलवा.” करुणा आता खरंच संतापली होती.  

“हे बघा करूणांबाई तुमची काही तरी चूक होते आहे. औषधांच्या परिणामामुळे होतं अस कधीकधी. तुम्हाला आत्ता आरामाची जरूर आहे. मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो तुम्ही थोडा आराम करा. रीलॅक्स व्हा. मग आपण बोलू.” – डॉक्टर.

“नाही मला इंजेक्शन नको. मी विचार करते. राहू द्या  यांना इथे.” करूणा आता शांत झाली होती. डॉक्टरांना बरं वाटलं. नारायणला सुद्धा थोडं सुटल्या सारखं वाटलं.  

डॉक्टर गेल्यावर करुणा नारायणला म्हणाली की “माझा फोन  जरा देता का ?”

“कशाला ?” – नारायण.

“सहज.” – करुणा.

त्यांनी फोन दिला. आणि बाहेर गेला.

आणि करुणाने पोलिस कंट्रोल रूमचा १०० नंबर फिरवला.

***

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com