Gunjan - 16 in Marathi Women Focused by Bhavana Sawant books and stories PDF | गुंजन - भाग १६

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

गुंजन - भाग १६

भाग १६.


स्थळ :- मुंबई, महाराष्ट्र.

हल्ली गुंजन घरात नसल्याने वेदने स्वतःला कामात झोकून टाकले होते. घरी आल्यावर पुन्हा त्याला एकट राहावे लागणार हे माहीत असल्याने तो अस करत असायचा. गुंजनसमोर जरिही ती स्ट्राँग असा दाखवत असला, तरीही घरात आल्यावर मात्र तो हतबल व्हायचा!! जास्तच सवय तिची त्याला लागली असल्याने त्याला एकांत नको वाटत असायचा. पण घरी तर जावे लागणार होते. याचा विचार करून तो थोडा लेट घरी जायचा. गुंजनचे शो दिल्लीत चालू झाले होते. तो टीव्हीवर न चुकता ते पाहायचा. तिला अस डान्स करताना पाहून त्याचा थकवा कुठल्या कुठे गायब होत असायचा.


आजही तो थोडा उशिराच घरी आला. बंगल्यात त्याने प्रवेश करताच पटकन रखुमाई आजी त्याच्या समोर येऊन उभ्या राहतात. तसा वेद त्यांना पाहून आतून सुखावतो.


"आजी, तुम्ही आहात म्हणून तरी मला तेवढं काही वाटत नाही. नाहीतरी हल्ली गुंजन नसल्याने घरात एकदम एकट एकट अस वाटत.",वेद आपले ब्लेझर काढत म्हणाला.



"साहेब, घरात बाई माणसाचे स्थान वेगळंच असत. आपल्या गुंजन मॅडम तर वेगळ्याच आहेत. जिथे जातील, तिथे सर्वांना आपलंसं करतील. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. मी कालच त्यांचा कार्यक्रम पाहिला. खूप भारी नाचल्या त्या. ",रखुमाई आजी जेवणाच ताट डायनींग टेबलवर लावत बोलत होत्या. त्यांचे ते बोलणे ऐकून वेद समाधानी होतो.



"हम्म. आहेच ती तशीच अगदी नावाप्रमाणे गुणगुण करणारी.",वेद हसूनच फ्रेश व्हायला जाता जाता म्हणाला. त्याच बोलणं ऐकून रखुमाई आजी हसते आणि आपलं काम करायला लागते.



काहीवेळात वेद फ्रेश होऊन कपडे बदलून खाली येतो. तो तसाच जाऊन चेअरवर जेवायला बसतो. मोठा असा बिझनेसमन असल्याने त्याला टेबल रुल माहीत होते. त्यामुळे तो अगदी शांतपणे चमच्याने मस्त अस जेवण करत होता. खाता खाता आजीला देखील तो घरातील सगळं आजच विचार होता आणि त्यांना सूचना देत होता.




"साहेब, तुम्ही आणि गुंजन मॅडम बरोबर असले की, खूप छान दिसतात. एक वेगळी अशी जोडी आहात तुम्ही दोघे. गुंजन मॅडम होत्या तेव्हा देखील, त्या घरातील सगळं काही बारकाईने पाहत असायच्या. त्यांनी तर तुमच्या जेवणाचा देखील चार्ट तयार केला आहे. त्याप्रमाणे आम्ही लोक जेवण बनवत आहोत!!",रखुमाई आजी हसून म्हणाल्या. त्यांचे ते बोलणं ऐकून वेद गालात हसतो.




"मॅडम बाहेर गेली तरीही माझ्यावर लक्ष ठेवणे सोडणार नाही. ओ, गुंजन तुझ्यावर पुन्हा पुन्हा फिदा व्हावे, वाटते मला!!",वेद मनातच गालात हसत म्हणाला. तो जेवत असताना त्याचा मोबाईल वाजतो. तसा वेद स्क्रीनवर नाव पाहून हसूनच कॉल उचलतो.



"बोला मॅडम, काय काम आहे?",वेद आपला हात टिश्यूने पुसत विचारतो. त्याच ते बोलणे ऐकून आजीला कळते, कोणाचा कॉल आहे तो? तश्या त्या हसूनच आपलं तिथून निघून जातात.




"अहो, मॅडम नका ना म्हणू तुम्ही.",पलीकडून कॉलवर गुंजन थोडीशी वैतागत हळू आवाजात म्हणाली.




"ओके बाबा सॉरी. ",वेद हसूनच आपलं चेअरवरून ताट बाजूला करून उठत म्हणाला.




"वेदऽऽऽ, तुम्ही जेवण करणार आहात. प्लेटमध्ये काही शिल्लक ठेवायचं नाही",गुंजनचा चिडलेला आवाज त्याच्या कानावर पडतो. तो मात्र तिचं ते बोलणं ऐकून शॉक होतो आणि आसपास पाहायला लागतो.



"तू इथे आली आहेस का? ",वेद खाली पुन्हा चेअरवर बसत विचारतो.



"मी आली नाही तिथे. पण मी तुम्हाला ओळखते चांगल्या प्रकारे. त्यामुळे गुपचुप जेवण करा.मी पण करते तुमच्यासोबत इथे बसून.",गुंजन काहीशी हसून म्हणाली. यावर वेद काहीही न बोलता शांत राहणे पसंत करतो. इकडे गुंजन देखील त्याच्यासोबत बोलताना आपलं जेवण खायला लागते.



"गुंजन, तू मस्त काल डान्स केला. मला एक आवडलं तुझे कौतुक जजेसनी केलं ते.",वेद तिचं कौतुक करत म्हणाला.



"थँक्यू ,वेद. जजेस पेक्षा तर मला तुमच्याकडून कौतुक ऐकल की, चांगलं वाटत. नवऱ्याकडून ऐकणे वेगळं असत ना!!",गुंजन आनंदात म्हणाली.



"आता जर तू इथे असली असती ना? तर तुला किसच केलं असत मी. एवढं छान छान बोलताना तुझ्या चेहऱ्यावर भरपूर क्युट असे एक्स्प्रेशन येत असतात आणि मला ते आवडतात.",वेद खट्याळपणे हसत म्हणाला. पण त्याच ते बोलणं ऐकून गुंजन लाजते. काही क्षण तर त्याला तिचा आवाजच येत नाही.




"ओके, खूप झालं आजच बोलणं. आता झोपा मॅडम तुम्ही.",वेद भानावर येत म्हणाला. त्याच बोलणं ऐकून गुंजन तिच्या रूममधील घड्याळाकडे पाहते.




"अहो, गुड नाईट. लव्ह यू पण तुम्हाला. खूप सारं मिस यू.",गुंजन हसून अस बोलून लाजूनच फोन कट करते. तसा वेद तिच्या बोलण्यावर हसून मोबाईल ठेवतो.



"लव्ह यु टू गुंजन.",वेद त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरकडे पाहत म्हणाला. तो फोन बाजूला ठेवून पटापट आपलं जेवण करून बेडरूममध्ये झोपायला जात असतो, की तेवढ्यात एक मुलगी त्याच्या घरात प्रवेश करते.




"हाय हँडसम, मला विसरला तर नाही ना?",ती मुलगी हसूनच आपली बॅग सांभाळत म्हणाली. पण तिचं ते बोलणं ऐकून आणि तिला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या उमटतात.



"हाय सेजल, एवढ्या रात्री परपुरुषाच्या घरी यायला तुला काही वाटत नाही का?",वेद थोडस रागात पण शांततेत तिला विचारतो.




"लाज कसली? आपलं तर लहानपणी लग्न ठरलं होतं?तुला आठवत नसलं तरीही मला आठवत ना? त्यामुळे आता मी इथे राहायला आली आहे. तुला जाणून घेण्यासाठी माझ्या काकांनी मला तुझ्याकडे पाठवलं आहे.",सेजल हसूनच म्हणाली.




"माझं लग्न झालं आहे सेजल. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. त्यामुळे तू निघ इथून. नाहीतर पोलीस स्टेशनला कॉल करून रात्रीचे दीड वाजता माझ्या घरात येऊन धिंगाणा घालत आहे. याची तक्रार करेन मी.",वेद शांतपणे पण आवाजात एक जरब ठेवत म्हणाला. मात्र, त्याचे ते बोलणं ऐकून ती मुलगी शॉक होते.




"कक्क....काय.....तुझं...लग्न?",सेजल शॉकमध्ये अडखळत विचारते.



"हो, जे ऐकलं आहेस ते. लग्न काही खेळ नाही आहे. भातुकलीचा लहानपणी ठरवून मोकळं व्हायला. लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन असत. ते जेव्हा होत तेव्हा लग्न होत. माझं आणि गुंजनचे नाते तस आहे. त्यामुळे आमचं झालं लग्न. तू देखील दुसरा मुलगा पाहून लग्न करून मोकळी हो!!",वेद म्हणाला.




"नाही, तू फक्त माझा आहेस!! मी हे नाही होऊ देणार. तुझ्या घरातील लोकांनी मला सांगितले होते.",सेजल चवताळून रागात बडबडते. तिचा तो आवाज ऐकून रखुमाई आजी आणि घरातील बॉडीगार्ड तिथं येतात.



"ऐ दिवटे, तुला कितीवेळा सांगितले ग? इथं येऊ नको, तरीही येतेच स्वतःचा पाणउतारा करवून घ्यायला.", रखुमाई आजी आपल्या नव्वारी साडीचा पदर कंबरेला खोचत म्हणाल्या.



"ऐ ओल्ड लेडी गप्प बस तू. तुला काय ग माहीत वेद बद्दल? उगाच आमच्या मध्ये पडू नको. वेद तू नाही ना अस करू शकत. अरे, आपण लहानपणी पासून एकत्र आहोत. तू त्या कोण कुठल्या मुलीला घटस्फोट दे आणि माझ्यासोबत लग्न कर..आपण आनंदी राहू..",सेजल त्याच्याजवळ येत रडतच म्हणाली. पण तिचं ते बोलणं ऐकून वेद रागातच तिला पाहतो.




"अक्कल तरी आहे का तुला? काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळत आहे का सेजल? आमचं नातं खूप पुढे गेलं आहे. मुळात आमचं एकमेकांवर भरपूर प्रेम आहे. आजवर जी फिलिंग मला गुंजन सोबत आली ती कधीच कोणत्याही मुलीबरोबर आली नाही. माझ्या गुंजनला कोण, कुठली म्हणायचं नाही. ती मिसेस वेद आहे.",वेद रागातच 'मिसेस वेद' या शब्दांवर जोर देत म्हणाला. त्याच ते बोलणं ऐकून ती मोठ्याने ओरडते.



"वेदऽऽऽऽ तू माझा झाला नाही तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही.",सेजल विचित्र पणे हसतच पटकन आपल्या साईड पर्स मध्ये लपवलेली गन काढून वेदच्या दिशेला निशाणा साधत त्याच्यावर गोळी झाडते. त्या गोळीच्या आवाजाने पूर्ण बंगल्यात सगळेच जण सुन्न होतात.


"वेद साहेबऽऽऽऽ",रखुमाई आजी ओरडते.



स्थळ :- दिल्ली.

दिल्लीत गुंजन आपल्या रूममध्ये रात्रीची अचानक घाबरून उठून बसते. तिच पूर्ण अंग घामाने भिजून गेलं होतं. अस अचानक घाबरून उठल्याने तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढले होते. नकळतपणे तिचा हात तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर जातो. तस तिला तिच्या मंगळसूत्राचा एक धागा तुटलेला दिसतो. त्या धाग्यातून काही काळे मणी बेडवर पसरलेले असतात. ते पाहून ती घाबरते.



"वेदऽऽऽऽ", तिच्या तोंडून भितीने निघते.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
-----------------