Radha - Ranga - 2 in Marathi Love Stories by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | राधा - रंगा - 2

Featured Books
  • जंगल - भाग 12

                                   ( 12)                       ...

  • इश्क दा मारा - 26

    MLA साहब की बाते सुन कर गीतिका के घर वालों को बहुत ही गुस्सा...

  • दरिंदा - भाग - 13

    अल्पा अपने भाई मौलिक को बुलाने का सुनकर डर रही थी। तब विनोद...

  • आखेट महल - 8

    आठ घण्टा भर बीतते-बीतते फिर गौरांबर की जेब में पच्चीस रुपये...

  • द्वारावती - 75

    75                                    “मैं मेरी पुस्तकें अभी...

Categories
Share

राधा - रंगा - 2

२.

जेवण खाणं उरकून सारी वस्ती सामसूम झाली होती. मरीआईच्या मंदिरासमोरील ओढ्याचं पाणी खळखळत वाहत होतं. बंड्या पायऱ्यांच्यावर घाटावर येरझाऱ्या घालत होता. राधा रंगा दोघेही पाण्यात पाय सोडून पायऱ्यांवर बसले होते. थंडगार पाण्याचा स्पर्श पायांना होत होता. मधूनच एखादा चुकार मासा पायांना धडकून जायचा. आज खूप दिवसांनी त्यांना निवांत वेळ मिळाला होता. पाठीमागे हात टेकवून वर आकाशातल्या चांदण्या पाहण्यात रंगा दंग होऊन गेला होता.

"रंगा..."

"हं..."

"मला खरं खरं सांगशील?"

"राधा. मी फक्त खरंच बोलतो. तुलाही माहिती आहे. बोल."

"मी का आवडते तुला?"

"राधा. कितीवेळा सांगायचं तुला."

"तुझ्या तोंडून ऐकलं कि, मन भरून येतं. माझा मलाच हेवा वाटतो."

"हं."

"सांग ना."

"राधे. तुझा निमगोरा गव्हाळ रंग. तुझ्या रंगाला हा रंगा भाळला. तुझ्या रंगात रंगून गेला नि बेधुंद झाला."

त्याला हळूच चापट मारत राधा म्हणाली, "ये गप रे. काहीही काही बोलतो. नीट सांगणार आहेस कि नाही?"

"बरं बरं सांगतो. राधा. तुझ्या रंगाला साजेसा तुझा उभट चेहरा. हसल्यावर त्यावर पडणारी नाजूक खळी. गोंधळल्यावर एक भुवई उंचावून प्रश्नार्थक नजरेनं पाहणं. तुझे काळेभोर गहिरे डोळे. असं वाटतं साऱ्या जगाला विसरून तुझ्या डोळ्यांच्या खोल खोल डोहात मनसोक्त डुंबत राहावं."

"आणि???"

"राधा. तुझा समजूतदारपणा, तुझं लाघवी बोलणं. समोरच्याचं बोलणं पूर्णपणे ऐकून, समजून त्यावर गरज असेल तरच प्रत्युत्तर देणं. तुझं निखळ हसणं. हे सगळं मनाला भावतं. तू जवळ असलीस ना कि, आपलं माणूस जवळ असल्यासारखं वाटतं. मग वेळ, आयुष्य, आजूबाजूची माणसं सगळ्या सगळ्याचा विसर पडतो. तुझ्या सहवासात उरलेलं आयुष्य जगावं."

रंगाच्या हात हातात घेत राधाने विचारलं, "रंगा. माझ्याशी लग्न करशील ना?"

"राधा. वेडी आहेस का? करशील का म्हणजे काय? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही मी विचार नाही करू शकत. चल आत्ता करूयात का लग्न?"

राधाचा स्निग्ध हात हातात घेत रंगा म्हणाला. त्याच्या घाऱ्या डोळ्यांत पाणी आलं होतं.

"आत्ता या क्षणी मरीआई देवीच्या साक्षीनं तुझ्या कपाळात कुंकू भरून घरी घेऊन जाईन."

त्याच्या अशा बोलण्याने राधा आनंदली. भावनांना आवर घालत म्हणाली,

"असं नाही रंगा. अग्नीच्या साक्षीनं दोघे एकत्र होऊयात. आणि मला माहित्येय तुझं सगळ्या पहिलं मोठं काम गावाची मानाची शर्यत जिंकणं आहे. त्याच्या आड मी नाही येणार. जोवर त शर्यत जिंकत नाहीस तोवर मी नाही हट्ट करणार लग्नाचा. आयुष्यभर मा असेच राहिलो तरी चालेल."

राधानं रंगाच्या खांद्यावर मान टेकवली. बराच वेळ दोघेही तसेच बसले होते. लुकलुकणाऱ्या चांदण्यांचा मंद पिठोरी प्रकाश ओढ्याच्या पाण्यावर पसरला होता. वाऱ्याच्या मंद झुळकेने पाणी चमकत होतं.

राधाला घरापर्यंत सोडून बंड्या माघारी आला. दोघांनी गुडघाभर खोल ओढा पार केला. ओढ्याच्या पलीकडे महादेवाच्या मंदिराशेजारी लावलेली सायकल घेऊन रंगा शेताच्या दिशेने निघाला. दुरून कुठून तरी टिटवी ओरडल्याचा आवाज येत होता. मरीआईदेवीच्या समोरच्या घाटावर कुणीतरी कमरेवर हात ठेऊन उभं होतं.

-----

सकाळची ११ वाजत आले होते. बापूपाटील वस्तीवरच्या शेतात होते. रंगालाही आज त्याच्या शेतात जायला उशीर झाला होता. आईने त्याचा आणि बापूंचा डबा त्याच्याकडे बांधून दिला. मरीआईच्या रस्त्याने रंगाची बैलगाडी खडखडाट करत चालली होती. बरोबर बंड्याही होता. सावतामाळीला गाडीतूनच नमस्कार करत गाडी देवीच्या देवळापाशी येऊन थांबली. उशीर झाल्यामुळे राधा कदाचित त्यांच्या कामगार बायकांबरोबर गेली असेल. रंगा खाल उतरून देवळात देवीच्या  पाया पडायला गेला. तोवर बंड्या राधाच्या घरी जाऊन एकटाच माघारी आला. राधा पुढे गेल्यामुळे तो काहीसा हिरमुसला. पायांत चपला चढवून त माघ वळणार तोच समोर संत्या अंडी त्याचे दोन साथीदार रंगाची वाट अडवून उभे राहिले. दोन सणसणीत शिव्या हासडत संत्या म्हणाला,

"का रे? *** **. तुझ्या जातीतल्या पोरी कमी पडल्या काय कि, आता आमच्या पोरींवर तुझा डोळा."

"संतुभाऊ. काय झालंय जरा समजल उमजल असं बोल कि."

"*** लई श्याणा झालास काय? **** परत राधेकडं बघितलं तरी डोळं काढून घिन.", संत्याने रंगाची कॉलर पकडली. राधाचं नाव येताच सगळा प्रकार रंगाच्या ध्यानी आला. संत्याचा कॉलर धरलेला हात सोडवत रंगा समजावणीच्या सुरात बोलू लागला.

"संतुभाऊ. भांडण कशासाठी? शांत बसून बोलू कि आपण या विषयावर."

"ये ****. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला. लांब राहायचं राधा पासून. लांब."

"हा बघ. संतुभाऊ. एक तर तुमचं कशातच काही नाही. राधाबद्दल फक्त तुझ्याच मनात आहे. तिच्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाहीये. मग उगाच माझ्या वाटेला जायची तुझी काहीच कारण नाही."

"मी लग्न करणारय तिच्यासंग. तू कोण रं. **. परत राधासंग बोलताना दिसला ना हातपाय मोडून गळ्यात बांधीन."

"राधा लग्नाला तयार असेल तर खुशाल लग्न कर. पण जर तिच्याच मनात नसेल तर मग तुझ्या मनात असून काय उपयोग?", रंगा मिश्किल हसत म्हणाला.

"त्ये आमचं आम्ही बघून घेऊ. तू कोण रं मला सांगणार. ***"

"संत्या. तोंडाला आवर. ऐकून घेतोय म्हणजे काहीही ऐकून घेणा नाही."

"ये, जा. ***. तुझ्या *** ** बापाला **** शिकवायचं नाय .", संत्याने पुन्हा एकदा आईमाईवरून शिवी हासडली.

रंगाने मागे सारून सणकन संत्याच्या मुस्काटात लगावली. एकदोन पावलं भेलकांडत संत्या मागे गेला. गालावर रंगाच्या चार बोटांची लाल गुलाबी नक्षी उठली होती. संत्याच्या दोस्तांनी रंगाला धरायचा प्रयत्न केला तोच बंड्या मध्ये आला आणि जोरजोरात गुरकावू लागला. संत्याही रंगाच्या अंगावर धावला. तोच बंड्या मध्ये येऊन जोरजोरात भुंकू लागला. त्याच्या भुंकण्याचा आवाजच एवढा होता कि, संत्या आणि त्याचे दोस्त कमालीचे घाबरले.

"बघून घेईन तुला पुन्हा. लक्षात ठेव.", म्हणत शिव्या हासडत संत्या आणि त्याचे टवाळ मित्र निघून गेले. रंगाचं विचारचक्र फिरू लागलं. संत्या एकतर्फी राधावर मरत होता. पण संत्या काय लायलीचा आहे, रंगाला आणि राधालाही चांगलंच माहिती होतं. रागाच्या भरात संत्या काहीही करू शकतो. रंगाला आता सावध राहणं गरजेचं होतं. आणि राधालाही!

ओढा पार करून बैलगाडी शेताच्या दिशेने चालली होती.डोक्यात संत्याबद्दलचे विचार घोळत होते. एकतर्फी प्रेमात वेडी असलेली माणसं खूप धोकादायक असतात. कोणत्याही थराला जाऊ शकतात. काहीही करू शकतात. ज्याच्यावर प्रेम आहे त्याचा आणि मध्ये येणाऱ्या कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे अशा माणसांपासून कायम सावध असलेलं बरं!

बापूंसोबत जेवण वगैरे उरकून रंगा थोडा वेळ गोठ्यात बसला होता. आण्णाच्या शेतात उसाला खत टाकण्याचं काम चालू होतं. धापटेमामांच्या शेतात गवत काढायच्या कामावर राधा गेली होती. रंगाच्या शेतापासून चार पाच एकरावर त्यांचं शेत होतं. बापूंना विचारून रंगाने बैल गाडीला जुंपले आणि शेतावर निघाला. झोपडीच्या बाहेर लिंबाच्या सावलीला छग्या बग्याला बांधून गवत पाणी ठेवलं. आतमध्ये बाजेवर येऊन बसला. पिशवीतले वही पेन काढून राधासाठी एक चिठ्ठी लिहिली. बंड्याच्या गळ्यातल्या पट्टयात व्यवस्थित अडकवून त्याला पाठवून दिलं.

धापटेमामांच्या शेतात कापसाचं पीक घेतलं होतं. गवत वाढल्यामुळे मामांनी बायांना कामावर लावलं होतं. जेवण उरकून बायका आंब्याच्या झाडांखाली गप्पा मारत बसल्या होत्या. तोच त्यांच्या दिशेने बंड्या धावत येत होता. राधाला ओळखून त राधाजवळ गेला. तिला गोल गोल चकरा मारू लागला.

"राधे. चांगलीच वळख झाली बया तुझी बंड्यासंग.", अलकामावशी चेष्टेनं म्हणाली.

"अंग काय ना गं मावशे. पाटलांच्या रानात कामाला जात होतो ना. तवाच येता जाता वळख झाली इतकंच."

नेहमीप्रमाणे राधाने बंड्याचा पट्टा चापसून पहिला. हाताला चिट्टी लागली. भरभर दोनचार ओळी तिनं वाचून काढल्या. रंगाने तिला शेतावर बोलावलं होतं. महत्वाचं बोलायचं होतं.

"मावशे. मी आल्येच जरा."

"राधे. लवकर ये बाई. लई उशीर नगा लावू.", हसत अलकाबाई राधाच्या पाठीवर थाप मारत म्हणाली. अलकामावशीला राधा आणि रंगाच्या प्रेमाबद्दल माहिती होतं. दोघांचा स्वभाव माहिती होता. मावशी राधाच्या पाठीशी होती. राधालाही मावशीचा आधार होता.

बाहेरच्या पडवीत बाजेवर रंगा पहुडला होता. खुंटीवर अडकवलेल्या रेडिओवर विविधभारती चॅनेलवर जुनी अवीट गाणी चालू होती. डोळे बंद करून रंगा गाणी गुणगुणत होता. अर्ध्या तासात बंड्या पाठोपाठ राधा रंगाच्या शेतात आली. वाळ्याचा पडदा अलगद सोडून राधा आतमध्ये आली. उकडत असल्यामुळे बाजेवर उघड्या अंगाने रंगा पहुडला होता. बाजूला हळू आवाजात रेडिओ चालू होता. त्याची भरदार रुंद छाती, पिळदार दंड, गोरेपान शरीर आणि पिळलेल्या मिश्यांमुळे रंगा भारदस्त दिसत होता. राधा हळूच आतमध्ये त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याला निरखून पाहू लागली. बाहेर बंड्याचा भुंकण्याचा आवाज येताच रंगा जागा झाला. शेजारी अचानक राधाला पाहून दचकला. बाजूचा टॉवेल कसाबसा घेऊन अंगावर पांघरला.

"मला हाक तरी द्यायची. असं अचानक आलीस."

"ते जाऊदे. बोल मला कशापाई बोलावलंस.", लडिवाळ स्वरात राधा बोलू लागली.

"संत्या भेटला होता."

"नाव नको घेऊ त्या मुडद्याचं."

"बाचाबाची झाली. माझी कॉलर पकडून शिव्या देत म्हणाला, राधा पासून लांब रहायचा."

"त्या शिवाय येतं काय त्याला. वस्तीतल्या साऱ्या बायकांवर घाणेरडी नजर त्याची. तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे.", ती त्याच्या जवळ सरकत येत म्हणाली.

"राधा. अशी माणसं खूप धोकादायक असतात. आपल्याला सावध असायला पाहिजे."

त्याच्या पिळदार दंडावरून बोट फिरवत लाडात ती म्हणाली, "हं. त्ये बरोबर आहे तुझं पण आता नाक त्याचा विषय."

तिच्या अशा जवळ येण्यानं आणि लडिवाळ बोलण्यानं रंगाच्या शरीरावर शिरशिरी उठली. हृदय धडधडू लागलं. अंगावरची लव न लव तटकन उभी राहिली.

"राधा. विषय काय तुझं चाललंय काय. बाहेर कुणीतरी आलं तर सगळं खेळ होईल.", तिचा हात धरत रंगा म्हणाला.

"बंड्या हाय ना बाहेर. आलंच कुणी तर देईल कि आवाज."

"पडदा?"

"लावलाय मी. तू गप्प बस आता.", त्याच्या तोंडावर बोट ठेवत राधा त्याच्या अगदी जवळ आली. दोघांनाही एकमेकांचे श्वास जाणवत होते. विस्फारलेल्या डोळ्यांनी रंगा राधाच्या काळ्याभोर नजरेत हरवून गेला होता. दोघांचीही हृदये धडधडत होती. राधाने हळूच पुढे होऊन रंगाच्या लालेलाल ओठांवर तिचे डाळिंबी ओठ टेकवले. रेडिओवर मोहम्मद रफी यांचं मंजुळ आवाजात गाणं वाजत होतं.

छू लेने दो नाज़ुक होठों को,
कुछ और नहीं हैं जाम हैं ये ।
क़ुदरत ने जो हमको बख़्शा है,
वो सबसे हंसीं ईनाम हैं ये ।

दोघांचेही उष्ण श्वास एकमेकांत मिसळून गेले. रंगाने गपक्कन डोळे मिटू घेतले. तिचेही डोळे आपोआप मिटले गेले. तिचे हात त्याच्या उघड्या छातीवर पाठीवर फिरू लागले. त्यानेंही तिच्या कमरेला हातांचा विळखा घातला. तिच्या स्पर्शाने शिवाच्या सर्वांगात वीज सळसळली. त्याचं सारं शरीर तिच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या कोमल स्पर्शाने, अनामिक हुरहुरीने रोमांचित होऊन उठलं. काळजाची धडधड आणि श्वासांची गती वाढू लागली. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. कपड्यांचा अडसर कधीच दूर झाला होता. शरीरं कधी एक झाली दोघांनाही कळलं नाही. आता फक्त डोळ्यांची भाषा अन ओठांचे मुलायम स्पर्श बोलत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर फिरत होते, केसांची खेळत होते. तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होता. तीही त्याला तितक्याच आवेगाने प्रतिसाद देत होती. प्रणयात डोळे बोलतात, ओठ आस्वाद घेतात तर हातांचे स्पर्श ते सुख, तो आनंद, ती भावना अनुभवत असतात. पाठीमागे रेडिओवर गाणं वाजत होतं.

आज फिर तुमपे प्यार आया है l
बेहद और बेशुमार आया है l

        धुंद आणि रोमांचित शरीरं, आसुसलेले क्षण, गंधाळलेले एकमेकांचे श्वास. आज त्याला ती, अन तिला तो वेगळेच भासत होते. प्रणयाचा उत्कट आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मनुष्याच्या आयुष्यातील तो उत्कट क्षण, निर्भेळ आनंद दोघेही अनुभवत होते. ती त्याच्या कुशीत निर्धास्त पहुडली होती. मागे रेडिओवर मराठी गाणं वाजत होतं.

दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे...
जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे!

बाजूच्या खिडकीतून आत येणाऱ्या थंड हवेच्या झुळुकेने दोघेही काहीवेळ सुखाधीन झाले. रंगाने बारामतीहून तिच्यासाठी करून आणलेलं बोटाच्या पेराएवढं सोन्याचं मोरपंख तिच्या गळ्यांत घातलं. राधाला आकाश ठेंगणं झालं होतं. त्यावर दोघांची नावं कोरली होती. 'राधा - रंगा'

क्रमशः