Badalnare chehre - 3 - last part in Marathi Thriller by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | बदलणारे चेहरे! - 3 - अंतिम भाग

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

बदलणारे चेहरे! - 3 - अंतिम भाग

भाग - ०३.

गाडी गेटमधून आत शिरताना पाहून वॉचमनने तिला अडवले. अनोळखी गाडी पाहून त्याने तसे केले.

"कोण आहे?"

तिने काच खाली केली; तोच त्याने सलाम ठोकला.

"अरे मॅडम तुम्ही!"

"का?"

"काही नाही!"

तिने वेगाने गाडी गेटमधून आत घुसवली. गाडीतून बाहेर पडत नोकरांना प्रश्न न विचारता सामान आत ठेवायचा इशारा केला. सर्व काही पाहून सुद्धा नोकरांनी शांतपणे सामान आत ठेवून घेतले.

ती थेट तिच्या खोलीत निघून गेली. दमली असल्याने तिला लवकरंच झोप लागली.

सकाळी १० च्या सुमारास तिला जाग आली. तिने स्वतःचे आवरले आणि ऑफिस निघून गेली.

ऑफिसमध्ये तिला शांत पाहून अक्षत तिच्या जवळ येऊन बसला.

"Hey, how was your tour?"

"What?"

"Wedding ceremony?"

"Good!"

"पण लग्न तर आजचं होतं ना?"

"हो, मला बरं नव्हतं म्हणून निघून आले."

"Okay!"

"Hmmm"

"By the way, coffee?"

"What?"

"किती दिवसांचं तुझ्या सोबत कॉफी प्यायचे स्वप्न आहे. Please?"

"Sure! Evening 6 PM."

"Done!"

गालात हसतंच तो जागेवर जाऊन बसला आणि सायंकाळ होण्याची वाट पाहत स्वप्नात हरवला.

सायंकाळी सर्वांनीच आपापली आवराआवर केली. अक्षत स्वतःचं आवरून जेनी जवळ येऊन थांबला.

"निघायचं?"

त्याने विचारणा केली.

"हो चल!"

तिचा होकार मिळताच दोघेही ऑफिस बाहेर पडले. थोड्याच वेळात दोघे जवळच्या कॉफी कॅफे पर्यंत येऊन पोहचले. अक्षत कॉफीचे ऑर्डर देऊन आला.

थोड्याच वेळात कॉफी आली. दोघांनी एक एक घोट घेत कॉफी संपवली. कॉफी संपवून दोघेही निवांत गप्पा मारत बसले.

"जेनी मला काही सांगायचं आहे."

"त्याआधी मला काही सांगायचं आहे."

"बोल ना!"

"Will you marry me?"

तिचे शब्द ऐकताच त्याचा चेहरा खुलला!

"काय खरंच?"

"हो!"

"अग मी तुला हेच सांगणार होतो. माझं तुझ्यावर खूप आधीपासून प्रेम आहे. पण मी बोललो नाही."

"उद्या सकाळी ९ वाजता कोर्टात पोहच!"

"अग पण?"

त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिले.

"पण बिन काही नाही!"

"बरं!"

असं म्हणत ती उठली आणि घरी निघाली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पहातंच राहिला. घेतलेल्या निर्णयावर त्याचा संशय होताच! पण जेनीसारख्या मादक स्त्रीला मिळवण्याचा आनंद देखील ओसंडून वाहत होता.

आंनदाच्या भरात तो घरी परतला आणि गोड स्वप्नात झोपी गेला.

जेनी घरी परतली आणि उद्यासाठी सर्व काही ठरवून झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने स्वतःचे आवरून घेतले आणि अक्षतला फोन लावला. दोन तीन वेळा प्रयत्न करून ही त्याने फोन उचलला नाही. शेवटी तिने ऑफिस मधल्या एका मित्राला फोन लावून त्याचा पत्ता मागितला.

"Hello! Hitesh listen na, मला अक्षतचा पत्ता दे ना!"

"Sorry! पण मी तुला त्याचा पत्ता देऊ नये असा त्याचा फोन होता."

"What?"

"हो!"

"Okay!"

असं म्हणत तिने रागातंच फोन बेडवर फेकून दिला. त्याने असे का केले हे विचार करून तिचा गोंधळ उडाला.

काही विचार करून तिने परत फोन उचलला आणि फेसबुक वर अक्षतचा आयडी शोधला. त्यावर त्याचे फोटो सर्च केले. एका फोटोत तो त्याच्या घरात उभा दिसला. डिस्क्रिपशन मध्ये त्याने लोकेशन शेअर केले होते. तिने त्यावर क्लिक केले आणि गूगल मॅप वर लोकेशन सेट करत बाहेर पडली.

गाडी सुरू करत ती थेट त्याच्या पत्त्यावर निघाली!

कोणी तरी तिला पाहिले आणि फोनवरून दुसऱ्या व्यक्तीला तिच्या हालचाली कळवल्या.

काहीच तासात ती ठरलेल्या पत्त्यावर पोहचली. जवळपास विचारपूस करत तिने अक्षतचे घर शोधून काढले.

त्याच्या घराच्या दिशेने जात असता तिला खिडकीतून बाहेर कोणीतरी बघत असल्याचे जाणवले. ती पळतंच जवळ गेली आणि आत बघण्याचा प्रयत्न करू लागली. आत अक्षत ओरडताना दिसला.

"तू का आलीस इथे? जा इथून! मला तुझ्याशी लग्न करायचे नाही."

तो असा का वागतोय? हा प्रश्न तिला पडला आणि ती त्याची समजूत काढू लागली.

"अक्षत ऐक माझं….!"

"तू इथून जा….! तो आपल्याला जिवंत सोडणार नाही!"

त्याच्या या बोलण्यावर मात्र तिला धक्काच बसला!

"कोण?"

आत अक्षतच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडणे बंद झाले. तो जेनीच्या मागच्या बाजूला ईशारा करू लागला.

"Are you okay?"

जेनी त्याला विचारू लागली! पण तो काहीही न सांगता फक्त घाबरून पाहत होता.

"Jennie!"

मागून एक विचित्र आवाज कानी पडताच, तिने घाबरून मागे वळून पाहिले!

"तू!"

ती पुढे काही बोलणार तोच रुमालाने तिचे तोंड बंद करण्यात आले. आतून अक्षत सर्व काही पाहत होता; मात्र त्यांच्या विरोधात जायला घाबरत होता.

जेनीला बेशुद्ध करून गाडीच्या मागच्या बाजूस टाकण्यात आले. वेगाने ती गाडी निघून गेली. अक्षतने पोलिसांना सांगण्याकरिता फोन हातात धरला खरा पण नंतर त्यांचा क्रूरपणा आठवून तो गप्प बसला. जेनीच्या जीवाची त्याने देवाकडे भीक मागितली आणि रडतंच समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई-बाबांच्या तोंडाकडे पाहत गुढघ्यांवर बसला!

तिकडे गाडी भरधाव वेगाने निघाली. काहीच तासात एका काळोख्या खोलीत जेनीला बांधण्यात आले. ती बेशुद्धावस्थेत असल्याने तिला काहीही जाणवले नाही.

ग्लासभर पाणी तिच्या चेहऱ्यावर झटक्याने फेकून देत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे ती दचकून शुद्धीवर आली.

समोर एक व्यक्ती धूसर दिसू लागली. जेनी त्या व्यक्तीला आधीपासूनच ओळखत असल्याचे तिला जाणवले.

"तू! का आलास परत माझ्या लाईफ मध्ये?"

"असं कसं चालेल Jana?"

"माझ्या पॅरेन्ट्सना मारून तुझं मन भरलं नाही का?"

"Wow! स्वतःच्या पॅरेन्ट्सला स्वतः संपवून दुसऱ्यांवर खापर!"

"तू मला इथे का घेऊन आलास?"

"क्राईम पार्टनर मी आणि लाईफ पार्टनर कोणी दुसरा? असं कसं चालेल?"

"म्हणजे?"

"लग्न करायला घेऊन आलोय!"

"My foot! लग्न आणि तुझ्याशी? Impossible!"

"Darling! Don't be so stupid! तुझ्या सर्व कारनाम्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तू कसं आपल्या पॅरेन्ट्सला संपवायचा प्लॅन केला आणि त्यात इतरांना कसं फसवलं! सर्व काही माझ्याकडे आहे."

त्याच्या या गोष्टीवर विचारपूर्वक ती पुढे बोलली.

"काय पाहिजे तुला?"

"How sweet! मला तू पाहिजे. तुझं हे मादक शरीर आणि महत्वाचं म्हणजे ५०० कोटींच्या संपत्ती मधला निम्मा हिस्सा!"

"आणि तुला काय वाटलं मी तुला ते देईल?"

"हे बघितल्यावर तर देशील ना?"

हातात रिमोट उचलून घेत त्याने प्रोजेक्टर वर एक व्हिडिओ सुरू केला. ज्यात जेनी तिच्या जन्मदात्र्यांना संपवताना दिसत होती. ते पाहून तिच्या पायाखालून जमीन सरकली!

"हे! तुझ्याकडे?"

"Baby! You are so stupid! तुझ्या बाबांचा PA होतो. एवढं लक्ष तर असणारंच ना? तुझ्यावर तर माझा खूप आधीपासनं डोळा होता! पण सोबतंच मला तुझ्या संपत्तीत निम्मा मालकी हक्क मिळवायचा होता. म्हणून मी तुझ्यावर डोळा ठेवला. बघ आज ते कामात आलं. तुला काय वाटलं, इथल्या गुन्ह्यानंतर काही दिवस तू दुसरीकडे कुठे निघून गेलीस, तर तो उघडकीस येणार नाही? जरी तू ते सुसाईड दाखवले, तरी त्याचा पुरावा आता माझ्याकडे आहे. जो मी कधीही पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो. म्हणून एकतर तू माझी हो नाहीतर मग….!"

असं म्हणत तो मोठ्याने हसला आणि तिच्या समोरच्या खुर्चीत बसला.

पुढे कसलाही विचार न करता ती बोलली.

"मला मान्य आहे!"

जेनीला पुढे कोणताही मार्ग दिसत नसल्याने तिने त्याचा प्रस्ताव मान्य केला.

तिचा होकार ऐकताच तो खुश होत उठला आणि तिच्या जवळ जात त्याने तिच्या ओठांचा चावा घेतला.

"आता तू माझीच असणार आहेस! मग एवढा हक्क तर बनतोच."

असं म्हणत त्याने तिला कुशीत घेतले. तिने हातांचा घेरा घट्ट करत त्याच्या ओठांना ओठ भिडवले आणि गालात हसली.

तिचा हा वेडेपणा पाहून त्याला वेड लागले. पण हा तिचा वेडेपणा होता, की एक नवीन कट हे लवकरंच उघडकीस येणार होते.

"चल आजच लग्न करूया!"

"हो, मी तर कधीचा तयार आहे."

असं म्हणत त्याने तिला उचलून धरले आणि गाडीत बसवत दार बंद केले. स्वतः दुसऱ्या बाजूने बसत दार आतून बंद करून घेतले आणि गाडी सुरू केली. गाडी थेट जेनीच्या बंगल्याच्या दिशेने घुमवली.

काहीच तासात ते घरी परतले. त्याने तिला उचलून धरले आणि आत घेऊन आला.

त्याने तिला तिच्या खोलीत आणून सोडले. बिछान्यावर हळूच ठेवत तो जायला वळला तेवढ्यात तिने त्याचा हात पकडला आणि थांबवून घेतले.

"What?"

तिने ओठांवर ओठ टेकवले. तसाच तो उत्तेजित होत तिच्या सर्वांगावर चावा घेऊ लागला.

त्याच्या डोक्यात तिच्या मादक शरीराचे चित्र छापले गेले. ज्याच्या नशेत तो पूर्ण बुडाला होता. तिने त्याची उत्तेजना शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

शेवटी काही तासांच्या प्रदीर्घ काळाने प्रणयक्रीडेचा शेवट झाला आणि तो झोपी गेला. ती उठली आणि कपाटाजवळ जात वेगळेच भाव चेहऱ्यावर आणत हसली. कपाट उघडत त्यातून धारदार शस्त्र काढले.

त्याच्या जवळ जात मानेवर सपासप वार केले. स्वतःच्या पॅरेन्ट्सना ज्याप्रकारे तिने संपवले होते, त्याचप्रमाणे त्याचा देखील अंत केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या मृतदेहासमोर बसून मोठ्याने हसली आणि एकटीच बरळू लागली!

"पैसा आणि शरीर! एवढ्या दोनच गोष्टी जीव जाण्यास कारणीभूत असतात. बापाला स्वतःच्या मुलीच्या शरीराची हाव होती; म्हणून त्याला संपवला! तू साला! तुला पण माझं शरीरच हवं होतं! विचार केला, अद्विक तसा नसेल; पण तो त्याहून पुढचा निघाला! संपवून टाकलं सर्वांना!"

तिच्या आवाजाने नोकर पळत खोलीत आला. समोरचा प्रकार पाहून घाबरला! स्वतःला धीर देत आत शिरला. आधी जेनीला उचलून भानावर आणले. तिला वॉश रूम जायला सांगून पूर्ण खोली साफ करून घेतली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली.

घटनेचा जेनीच्या मनावर परिणाम झाला होता. तीन तासांनी ती फ्रेश होऊन बाहेर पडली आणि खोली साफ झालेली पाहून आश्चर्यचकित झाली.

"रामू काका!"

"हा बेबी बोला?"

"एक विचारू?"

"विचारा?"

"बाबांना मारतेवेळी तुम्ही माझी अशीच मदत केली होती! आणि आज पण! मी चुकीचं करून तुम्ही नेहमीच माझ्या सोबत असता! असं का?"

हे ऐकताच त्यांच्या डोळ्यांच्या कडा भरून आल्या.

"सांगा ना काका?"

तिच्या केविलवाण्या नजरेने त्यांना सांगण्यास मजबूर केले.

"जेनी, तू माझी मुलगी आहेस पोरी!"

"काय?"

"हो!"

"मग मी इथे का?"

"साहेबांची तुझ्यावर नजर होती. त्यांनी एक कट रचून आधी मला फसवलं आणि मग माझी सुटका करत त्या बदल्यात तुला इथे ठेवून घेतलं!"

"काय?"

"मला माफ कर पोरी!"

"पण तुम्ही मला इथे ठेवायला का तयार झालात?"

"त्यावेळी तुझी आई खूप आजारी होती. ऑपेशन साठी पैशांची खूप गरज होती. त्याचवेळी माझ्यावर एका खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जो गुन्हा मी केलाच नव्हता, त्यात मी दोषी ठरलो. सुटण्याचे सर्व मार्ग बंद झाले! मी हतबल झालो. शेवटी माझ्यासमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि मी नाईलाजास्तव होकार दिला."

"स्वतःच्या पोरीचे लचके तोडायला तुम्ही तिला असं सोडून दिले?"

"माफ कर पोरी!"

"पण मग मला मागचं काहीच कसं आठवत नाही!"

"कारण तुझं निम्मं आयुष्य तुझ्या आठवणींतून काढून टाकण्यात आले आहे!"

"काय?"

"हो!"

"पण का?"

"कारण तुला आम्ही आठवू नये!"

"पण हे कसे शक्य आहे?"

"त्यांनी या कामासाठी फॉरेन वरून डॉक्टरांची टीम बोलावून घेतली होती."

"स्वतःच्या शरीरसुखासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणाचे अर्धे आयुष्य संपवणे! विचारही करवत नाही!"

"रडू नकोस! तू खूप स्ट्रॉंग आहेस!"

"थकले रे मी! आयुष्य जगण्यापेक्षा ते कट रचण्यात निघून गेले. एकावर प्रेम झाले; पण त्याच्या निचपणामुळे त्याचा जीव घ्यावा लागला."

"कधी कधी आपलं आयुष्य वाचवण्यासाठी दुसऱ्यांचे आयुष्य संपवावे लागते बाळा!"

"You are right बाबा!"

समाप्त!

©® खुशाली शेषराव ढोके.