A New Nationalist Democracy for a new age in Marathi Philosophy by ADV. SHUBHAM ZOMBADE books and stories PDF | नव्या युगाची नवी राष्ट्रवादी लोकशाही

Featured Books
  • BTS ???

    Hello Army Sorry army मैं इतने दिनों बाद  BTS के लिए लिख रही...

  • AI का खेल... - 3

    रात का तूफान: कुछ बदल रहा है...रात के तीन बज रहे थे। आसमान म...

  • My Devil President - 1

    अथर्व रस्तोगी जिसकी बस पर्सनालिटी ही अट्रैक्टिव है पर उसका द...

  • शोहरत का घमंड - 149

    तब आलिया बोलती है, "नहीं.... मगर मुझे करना क्या है ??????तब...

  • The Hustel 2.0 - Show Of The Review - E 02 S 22

    ठीक है, मैं Hustle 2.0 के फिनाले एपिसोड का पूरा रिव्यू तैयार...

Categories
Share

नव्या युगाची नवी राष्ट्रवादी लोकशाही

         नव्या राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीतून नव्या युगाच्या नव्या प्रवाहाकडे जाण्यासाठी आपण किती सज्ज आहोत; याची माहिती घेत, राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनावयाचा आहे, त्यासाठी मी प्रामाणिक संशोधनातून यावर सुर्यप्रकाष टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.                                                                                              जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या भारत देशाची ओळख आहे. भारत देशाच्या विकासरूपी महारथाचे लोकशाहीरूपी विधीमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, आणि प्रसारमाध्यमंडळ अशा चार चाकांचे आधार स्तंभातून राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीतून लोककल्याणाचे स्वप्न ऊराशी बाळगून या साÚया विश्वाला विविधतेतून एकता आणि वसुधैव कुटुंबकम हा संदेश देण्यासाठी लोककल्याणाच्या मार्गावर निघला तर आहेच. परंतू अद्यापही पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद प्रणाली अंतर्गत राष्ट्रवादीरूपी महारथी त्या महारथावर स्वार झालेला नाही. याची कल्पना आपणा भारतीयांना बहुधा नसल्यासारखेच वाटत आहे.
        कोणत्या देशामध्ये लोकशाही मजूबत आहे; आणि कोणत्या देशामध्ये लोकशाही कुमकुवत आहेः याबद्दलची यादी उतरत्या क्रमाने देशाच्या नावासहित प्रदर्षित होत असते. लोकशाही निर्देशांक प्रणालीचा वापर हा जगामधील विविध देशातील लोकशाहीचे मुल्यमापन करण्यासाठी वापरला जातो. लोकशाही निर्देशाकांचा आकडा ठरविण्यासाठी साधारण चार प्रश्न गट वापरले जातातः 1) राष्ट्रीय निवडणुका स्वायत्तपणे व न्यायोचित होतात का, 2) देशामधील मतदारांची सुरक्षा, 3) विदेशी महासत्तांचा देशातील सरकारवर अंमल आहे का, 4) धोरणे लागू करण्याचे अधिकार सरकारी कर्मचाÚयांना लागू आहेत का, या चार सुचकावर लावला जातो.
          भारतीय लोकशाही मुल्यांची पायमल्ली होत जगाच्या पाठीवरील लोकशाही निरीक्षक मंडळाच्या यादीत लोकशाही निर्देशांकमध्ये होणाÚया घसरणामुळे आपल्या राष्ट्राकडे विदेशी मंडळी संशयाच्या नजरेतून तीक्ष्ण बाणा मारीत आहे. आपल्या भारतीय लोकशाही समोर कोण-कोणती आव्हाने हिमालय पर्वतासारखी आहेत; हे आपण पाहावयास पाहिजे.
माझ्या मनातुसार राष्ट्रवादी लोकशाही ही संकल्पनाः राष्ट्रवादी लोकशाही या संज्ञेचा शब्दशः अर्थ ‘राष्ट्रीय भावनेच्या प्रेरणेतून लोकांनी लोकांनद्वारे लोकांच्या विकासासाठी चालविलेली शासन प्रणाली म्हणजे राष्ट्रवादी लोकशाही होय.’
लोेकशाहीची विभागणी आपल्याला दोन प्रकारे करता येते, ती म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही व अप्रत्यक्ष लोकशाही याची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणेः
1) प्रत्यक्ष लोकशाहीः
   नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारित असणारी लोकशाही म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही होय. प्रत्यक्ष लोकशाहीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. अशी लोकशाही जगात क्वचितच अस्तित्वात आहे.


2) अप्रत्यक्ष लोकशाही (प्रतिनिधिक लोकशाही)ः
    नागरिकांच्या अप्रत्यक्ष सहभागावर आधारित असणारी लोकशाही म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही होय. अप्रत्यक्ष लोकशाहीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व नागरिकांचा अप्रत्यक्ष सहभाग असून, त्यांनी निवडलेले प्रतिनिधी त्यांच्या मार्फत सहभाग घेत असतात. आजच्या आभाळागत वाढत्या लोकसंख्येच्या निकशावर जगामधील अनेक देश या प्रणालीचा स्वीकार करीत आहेत.
अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये दोन प्रकार असतातः अ) अध्यक्षीय लोकशाही आणि ब) संसदीय लोकशाही यांचीही संक्षिप्त माहिती खालील प्रमाणेः

अ) अध्यक्षीय लोकशाहीः
     अध्यक्षीय लोकशाही म्हणजे अध्यक्ष थेट लोकांकडून निवडला जातो आणि तो देशाचा सर्वेसर्वा असतो. तसेच याप्रणालीमध्ये अधिक राजकीय स्थैर्य असते. विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळीची त्या त्या खात्याच्या मंत्रीपदी थेट नियुक्ती करता येते.
उदा. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी

ब) संसदीय लोकशाहीः
   संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्राध्यक्ष हा लोकांकडून थेट निवडला जात नाही परंतू लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे निवडला जातो आणि त्याचे पद हे औपचारिक असते व सरकार चालवण्याचे सर्व वास्तविक अधिकार प्रधानमं़त्री यांच्याकडे असतात. याप्रणालीमध्ये लोक प्रतिनिधींच्या ईच्छेवर राजकीय स्थैर्य असते. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीपैकीच कोणाचीतरी त्या त्या खात्याच्या मंत्रीपदी नियुक्ती प्रधानमंत्री यांच्या शिफारशीवर राष्ट्राध्यक्ष/राष्ट्रपती करीत असतात.
उदा. भारत, इंग्लंड

    लोक सहभागः माझ्या मते लोक सहभागाची विस्तृत व्याख्या ‘‘लोकहितांचे उद्दिष्ट लोकांसमोर ठेऊन त्याची पुर्ती करण्यासाठी विविध समूहातून ते एकसंघ होत; त्यासाठी त्यांनी घेतलेला सहभाग म्हणजे लोक सहभाग होय.’’

     मानव समुहाशिवाय उत्तम प्रकारे जीवन जगूच शकत नाही. सततच्या होणाÚया मानवी जातीच्या उत्क्रांतीमुळे आज हा मानव अस्तित्वात आला; जरी मानवाला एकसंघ राहण्याची आवड नसली तरी त्याला कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी अधिकचे श्रम करावे लागत असे. त्यामुळे मानवी विकास हा अत्यंत मंद गतीने होऊ लागला; इतर व्यक्तीकडून त्यावर होणारे हल्ले आणि उपजीवेकासाठी करावी लागणारी अधिकची मशागत यामुळे त्याचे जगणे कठीण होऊ लागले. यावर त्यांनी होणाÚया हल्यापासून संरक्षण आणि उपजीवीकेसाठी करावी लागणारी अधिकची मशागत कशा पध्दतीने दूर करता येईल; यावर ते विचार करू लागले. यातूनच ते समूह तयार करून रहावयास लागले; जेणेकरून ते सामूहिकरीत्या मनुष्यबळाच्या जोरावर गोष्टी सहजरीत्या साध्य करू शकेल. कालांतराने समूह करून तो ज्या क्षेत्रावर स्थायिक झाला; त्यावर आपले राज्य उभारून तो राज्य करू लागला. आणि स्थापन केलेल्या राज्याचे संरक्षण आणि लोकांकडून लोकांसाठीचे संरक्षण आणि लोककल्याण करण्यासाठी त्यांनी नवी प्रणाली लोकशाहीप्रणाली अस्तित्वात आणली.
      लोकशाही प्रणाली, राज्यामध्ये स्थापन करून त्यांनी त्यातील सर्व लोकांना मानसिक आणि भावनिक संकल्पनेतून एकत्र केले; त्यामुळे राज्यास राष्ट्र ही मानसिक/भावनिक पदवी मिळाली. तसेच स्थापन केलेल्या राज्याचे संरक्षण आणि त्यातील लोकांचे कल्याण करण्यासाठी अस्तित्वात आणलेली लोकशाही कायम राखण्यासाठी सार्वजनिक लोक ईच्छेवर राज्य चालावे यासाठी त्यांनी लोकशाहीप्रणालीमध्ये लोकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लोक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला.
      कोणत्याही राज्यामध्ये संपूर्ण लोकशाही असल्याशिवाय आणि तेथील जतना एकत्र असल्याशिवाय राज्याला राष्ट्र ही पदवी मिळवू शकत नाही; तसेच राष्ट्रामध्ये लोकशाही कुमकुवत झाल्यास हुकूमशाहीचा उद्य होतो. त्यामुळे लोकशाहीचा गाभा हा लोक सहभागातून सार्वजनिक लोकईच्छेवर आधारित असल्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीमधील लोक सहभाग जिवंत ठेवला पाहिजे. तसेच लोकशाही प्रणालीमध्ये राष्ट्रवादाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रबांधव ही राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रीय विकास ही धारणा अबाधित ठेवता येणार नाही.
राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीतून राष्ट्रबांधव ही भावना आणि राष्ट्रहित तसेच लोकहित ही धारणा संकल्पित करून लोक सहभागाद्वारे लोकश्क्ती संपादित करून कोणतीही व्यापकता असणारी गोष्ट सततच्या प्रयत्नातून मिळविता येते.
      परंतू आपण हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की, लोकशाही प्रणालीतून लोक सहभागाला दूर केल्यास अराजकता येऊन नरसंहाराची होळी खेळून गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लोकशाहीत लोक सहभागाची कमतरता ही लोकशाहीपुढील एक आव्हानच असते.
लोकशाहीपुढील सर्व आव्हाने दूर करण्यासाठी पुरोगामी राष्ट्रवादातून मानवतावाद या प्रणालीतून राष्ट्रवाद अत्यंत गरजेचा असतो; यामुळे लोकांमध्ये राष्ट्रबांधव ही आपलेपणाची भावना निर्माण होते; त्यामुळे लोकशाहीपुढील सर्व आव्हाने प्रभावीपणे सोडवता येतील.

= माझे प्रश्न आणि तुमचे उत्तरः
1. नव्या राष्ट्रवादी लोकशाही प्रणालीतून नव्या युगाच्या नव्या प्रवाहाकडे जाण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का ?
2. राष्ट्रवादाच्या अभावाने भारतीय लोकशाही मुल्यांची पायमल्ली होत आहे का ?
3. राष्ट्रामध्ये लोकशाही कमजोर झाल्यास हुकूमशाही उद्यास येईल का ?
4. लोकशाही प्रणालीमध्ये राष्ट्रवादाचा मृत्यू झाल्यास राष्ट्राबांधव ही राष्ट्रीय भावना आणि लोकविकास ही धारणा साधता येणार की नाही ?
5. लोकशाहीचा गाभा हा लोक सहभाग असल्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीमधील लोक सहभाग जिवंत ठेवला गेला पाहिजे का ?
6. लोक सहभागातून लोकशक्ती मिळवून कोणतीही व्यापकता असणारी गोष्ट सततच्या प्रयत्नातून मिळविता येते का ?
7. लोकशाहीत लोक सहभागाची कमतरता ही लोकशाहीपुढील एक आव्हानच ठरते किंवा नाही ?
8. नागरिकांमध्ये आपुलकीपणाची भावना निर्माण करणे गरजेचे असते किंवा नाही ?