Raangard Kolhapur - 1 in Marathi Travel stories by Dr.Swati More books and stories PDF | रांगडं कोल्हापूर .. भाग १

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

रांगडं कोल्हापूर .. भाग १




"कवा आलासां ? "
"आज सकाळी आलो.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ने.."

"रातच्याला घरी या ..."

"नाही अहो, आजच मुंबईला परत निघायचं आहे, तिकीट आहे रात्रीच्या ट्रेनचे"

"यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय"

"इकडं पावणा आला की दोन चार दिस राहतूया बगा.."

"राजेंद्र, घिऊन ये पावण्यासनी संध्याकाळच्याला.."

अस्सल कोल्हापुरी भाषेत आमच्या पाहुणचाराला सुरवात झाली..

राजेंद्रच्या( अनिलचा मित्र) घरी आलो...
त्याची बायको राणी , माझीही मैत्रीण.. दोघंही नवरा बायको डॉक्टर आहेत..

"आज खूप वर्षांनी आलासा बगा.."

" आर्याला आणायचं होतसा.. पोरांनी चिक्कार मजा केली असती .."

"अगं, आर्याचे बारावीचे क्लास आहेत.. म्हणून नाही आली.."

"हर्ष आणि छोटा कसा आहे तुमचा.."

"हर्ष शांत आहे बगा.. पण बारका कधी कधी लई वांडगिरी करतंय..त्याला विजापूरला टाकला सैनिक शाळेत....."

अस आमचं प्रेमळ संभाषण सुरू असतं..
आणि तेवढ्यात..

"आगा कुठं चाललाय गा "

"आलोच, एक पेशंट आहे खाली.. तूही चल.."

"वट्ट येणार नाही .. तुम्हीच बगा आज!! "

"तू शुन्य मिनीटात आवर..😂😂 पेशंट बघून आपल्याला कोल्हापूरसाठी निघायचं आहे.. "

आम्हीही आंघोळ करून तयार झालो... एका दिवसात महालक्ष्मी, जोतिबा करून मुंबईसाठी रात्रीची ट्रेन पकडायची होती..

सकाळी दहाच्या सुमारास मानकापुराहून ( राजेंद्रचं गाव) आम्ही कोल्हापुरसाठी निघालो..

या मानकापूरचं वैशिष्ट्य म्हणजे.. हे गाव कर्नाटकात मोडतं आणि या गावाच्या हिकडचं आणि तिकडचं गाव महाराष्ट्रात येतं..

जाताना वाटेत हुपरी नावाचं गाव आहे.. तिथं अस्सल चांदी मिळते... असं राणीने मला सांगितलं..
तुम्ही कधी कोल्हापूरला आलात आणि चांदी खरेदी करायची असेल तर हुपरीला नक्की भेट द्या..

असच काहीसं, इचलकरंजी बद्दल... इथल्या कॉटन साड्या खूप प्रसिद्ध आहेत...

नितीन गडकरी साहेबांनी काय रस्ते बनवलेत राव!!.. एकदम गुळगुळीत आणि सप्पय...
गाडी कितीपण तराट असूद्या.. तुमच्या पोटातलं पाणीबी डचमळणार न्हाई बगा..😄😄

कोल्हापुरात प्रवेश केला आणि प्रवासाचा सगळा शिणवटा निघून गेला..

कोल्हापूरची हवाचं तशी आहे म्हणा..

जाताना रस्त्यात शिवाजी युनिव्हर्सिटी बघितली.. खूप मोठा कँपस आहे तिचा..विद्यापीठ ८५३ एकरामध्ये वसलं आहे. पूर्वी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यांपुरते होते; पंरतु सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन झाल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपुरतेच मर्यादित झाले.

कोल्हापूर आपल्या नैसर्गिक वातावरण आणि कोल्हापुरी दागिने, कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी मिसळ, लोणी डोसा , तांबडा- पांढरा रस्सा यासाठी प्रसिद्ध आहे.

येथील खाद्यपदार्थांपासून ते पर्यटनापर्यंतच्या सर्वच गोष्टी खास असल्याचं अनुभवायला मिळाले. इथलं नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृतीची सुंदरता पाहून आपलं मनच भरत नाही. कोल्हापूरमध्ये अशा बऱ्याच आकर्षक गोष्टी आहेत.

"अजून तुम्ही पुरं कोल्हापूर कुठं बघितलयासा, एक डाव आक्षी निवांत येळ काढून या.. आपसूकच तुम्ही कोल्हापूराच्या पिरिमात पडताया की नाय ते बगाच.."

कोल्हापूर जर अनुभवायचं असेल तर खरचं निवांत यावं आणि पायी पायीच अख्खं शहर पालथं घालावं..

आम्ही आता गाडी पार्क करून महालक्ष्मी मंदिराकडे निघालो..

श्री महालक्ष्मी मंदिर, ज्याला "दक्षिण काशी" असेही म्हटले जाते. महालक्ष्मी देवीला समर्पित असलेले हे मंदिर ५२ शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे ..
हे मंदिर रेल्वे स्टेशन आणि शहराच्या मध्यवर्ती बस आगारापासून साधारण ५ किमी अंतरावर आहे...

पर्यटनाला निघालेला पर्यटक कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील उत्तम कोरीवकाम असलेले हे मंदिर!!
नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्या वरील कोरीव काम प्रेक्षणीय आहे.

"किरणोत्सव" हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात वर्षातील ठराविक सहा दिवसंच अनुभवायला येणारा किरणोत्सव म्हणजे आपल्या पूर्वजांनी दिशासाधनेद्वारे साधलेला अलौकिक, देवदुर्लभ चमत्कारच मानायला हवा.

दिवसभर तेजाने तळपणारा सूर्यनारायण सूर्यास्तसमयी पश्चिम दिशेकडे मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याची तेजस्वी सूर्यकिरणे क्रमाक्रमाने महालक्ष्मी देवीची पावलं, नंतर मूर्तीच्या मध्यभागी आणि अखेरीस काही वेळात मुखमंडलासह महालक्ष्मी देवीचे सर्वागच उजळवून टाकतात.

प्रत्यक्ष आलम दुनियेचा तारणहार सूर्यनारायणच भूतलावरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी किती आतुर आणि उत्सुक आहे याची प्रचिती या किरणोत्सवप्रसंगी येते. महालक्ष्मी मंदिर शिल्पाकृतीसह हा अद्भुत आणि रोमांचित करणारा चमत्कार ज्याने "याची देहि याची डोळा" अनुभवला तो खरंच भाग्यवान!!
हजारो वर्षांपूर्वी ही असामान्य कलाकृती निर्माण करणारे शिल्पकार किती प्रतिभासंपन्न होते. त्या अज्ञात कलाकारांना त्रिवार वंदन..🙏🙏

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।

क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।

अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा।

नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा🙏🙏

मंदिराच्या परिसरात खास कोल्हापुरी प्रसिद्ध दागदागिने जसं की कोल्हापुरी साज, ठुशी, नथ ....इत्यादी मिळणारी बरीच दुकानं आहेत...

मंदिराच्या आवारात असणारे गजरेवाले माझं लक्ष वेधून घेत होते, गजरा म्हणजे माझा जीव की प्राण!! ....🌼🌼

मोगरा, जाई जुई, अबोली या फुलांच्या सुवासाने मी मंत्रमुग्ध झाले होते.. राणीला बहुतेक माझं गजरा प्रेम लक्षात आलं असावं, तिने लगेच आम्हा दोघींसाठी गजरे विकत घेतले..
गजरा ओंजळीत घेऊन मन भरेपर्यंत त्याचा सुवास घेतला आणि मग केसात माळला..

मंदिराच्या परिसरात "दावणगिरी लोणी" डोसा मिळतो.. आवर्जून खावा अशीच चव आहे त्याची...
"एकदा खाऊन तर बगा.. नाय परत परत खाल्ला तर नाव सांगणार नाही... "
शुद्ध लोण्यात बनवलेला हा आगळा वेगळा डोसा खाल्ल्यावर ,
व्वा !! काय भारी चव आहे राव !! याची अनुभूती नक्कीच येईल..😋😋

मस्त पोटपूजा झाली.. थोडी खरेदीही केली... नवरा मात्र आता घाई करू लागला..

"स्वाती, चल उशीर होतोय , अजून जोतिबाचे दर्शन बाकी आहे.."