Chukiche Paaul - 13 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | चुकीचे पाऊल! - १३

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

चुकीचे पाऊल! - १३

आता पर्यंत आपण बघीतले.

प्रियांका गावडे यांनी माझी समजूत काढली होती. त्यानंतर मी माझे विचार बदलले. त्यांच्यामुळेच माझ्या प्रेमास पूर्णत्व प्राप्त झाले; ते माझ्या मुलीच्या जन्माने. पण तिच्या बाबतीत मी खूप जास्त पजेसिव्ह असल्याने आज तिच्या वागणुकीने मला संभ्रमात टाकले होते!

आता पुढे..!

आज जेव्हा ईशाचे सोसायटीतील शुभमकडे वेगळ्याच उद्देशाने बघून हसणे माझ्या डोळ्यास पडले; त्यावेळी माझ्या मनात परत त्या निश्चयाने उजाळा दिला आणि मला दोन चार कानशिलात भडकावत हे सांगितले की, हीच ती वेळ जेव्हा मी माझ्या ईशाची, दिशा होण्यापासून वाचवू शकते.

या विचारात असताच, "Mamma, कुठे आहेस तू?" या ईशाच्या आवाजाने मी भानावर आले.

"बेबी, आलीस?" : मी हसतंच तिला विचारले.

"हो Mamma, आले मी. हे काय?" : ईशा नेहमीप्रमाणे खोडकर हसत बोलली.

"अरे मेरा बच्चा! थकला असेल ना?"

"हो ना यार Mamma!"

"काय खाणार माझा बच्चा?"

"Mamma, bread omelette आणि मस्तपैकी Cold coffee!"

"आलेच हा. तू फ्रेश होऊन ये पटकन!"

"हो Mamma, आलेच!"

ईशा पळतंच फ्रेश व्हायला निघून गेली आणि मी तिच्याशी कसं बोलावं या विचारातंच स्वयंपाकघरात निघून आले.

ती फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसली. तिथून तिचं नाश्त्यासाठी ओरडणं रोजचंच! त्यामुळे यात माझ्यासाठी काहीच नवीन नव्हते. मी पंधरा मिनिटांत तिचा नाश्ता एका प्लेट मध्ये तिच्या पद्धतीने सजवून घेतला आणि फ्रीज मधून आधीच बनवून ठेवलेली कोल्ड कॉफी एका मग मध्ये ओतली. आजच्या तिच्या या फरमाईशची कल्पना मला होतीच; म्हणून मी आधीच तिच्यासाठी कॉफी बनवून ठेवली होती.

तिचा नाश्ता घेऊन मी तिच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसले.

"Mamma, तुला?"

"मी तुझ्यातलंच खाईल थोडं."

"Okay Mamma, Thank you for such yummy food!"

"Most welcome my princess!"

ईशाचा तो बालिशपणा बघून तिच्या मनात काही सुरू असेल, असे मला वाटले नाही. पण, खात्री म्हणून आज मी तिच्याशी बोलायचे हे मनाशी पक्कं करत पुढच्या खुर्चीतून तिच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसले.

"ईशा, तुला एक विचारू?"

"विचार ना Mamma! त्यात परमिशन कसली?"

मी सरळ मुद्द्यावर आले!

"Who was that guy outside in the parking lot?"

"कोण? तो शुभम!"

"Yes, Shubham?"

"Ohh! Mamma, he is Just a good friend. Nothing much!"

"Okay!"

"Mamma, मी एक विचारू?"

"विचार ना!"

"तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना?"

"हो ग माझी राणी!"

"मग तू कधीपासून असे बोरिंग प्रश्न विचारायला शिकलीस?"

"सहज विचारले बाळा."

"Mamma, I know. तुला काळजी असते. पण, मी तुला दुखावण्यासारखं काहीही करणार नाही."

"पण, मला वेगळं काही बोलायचं होतं!"

"बोल ना मग."

"हे बघ ईशू, या वयात तुझ्या भावना एखाद्या पुरुषाकडे तुला आकर्षित करू शकतात आणि ते सामान्य ही आहे. पण, त्यात तू वाहून जायचं नाहीस. स्वतःला सावरायचं, समजलं?"

मला जे काही वाटले, ते मी एका श्वासात बोलून मोकळे झाले.

"बस एवढंच! की अजुन काही कन्फुजन्स आहेत?"

"म्हणजे?"

"Mamma, अग यावर आमचे रोज सेशन्स होतात. एव्हरी विकेंड मोठं मोठ्या एक्सपर्ट्सचे लेक्चर्स अरेंज करण्यात येतात. Sex Education देण्यात येतं. त्यात आमच्याशी यावर संवाद साधला जातो. याविषयीच म्हणते आहेस ना?"

तिच्या गोष्टी ऐकून माझी आधुनिक शिक्षण पद्धती विषयी खात्री पटली. मागील वर्षात शिक्षण व्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल बघून खरंच मला गर्व बाळगावा वाटला. वाटलं जसं आता "चुकीचे पाऊल!" ही संकल्पनाच नाहीशी होईल.

ईशा विषयीची माझी काळजी पूर्णतः मिटली होती. मी स्वतःला एक यशस्वी आई समजत होते. कारण, माझी ईशा चुकीच्या पद्धतीने काहीही करणार नाही; यावर माझा पूर्ण विश्वास बसला होता.

खऱ्या अर्थाने आज लैंगिकता शिक्षण गटाची कामगिरी यशस्वी झाल्याची भावना माझ्या मनात होती.

"अच्छा हा, तुला एक सांगायचं राहूनंच गेलं. आमच्या स्कूल मध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे. पप्पा तर ऑफिस वर्क मध्ये बिझी असतात. त्यांना जमणार नाही. तसं तर दोघांचही येणं कम्पल्सरी आहेच. पण आता तूच ये उद्या. वाटल्यास माझ्या सोबतंच चल." : ईशा.

"कसली मीटिंग? गेल्याच आठवड्यात झाली ना? एवढ्यात परत मीटिंग?" : मी गोंधळून विचारले.

"हो, तुला यावंच लागेल." : ईशा, हट्ट करत बोलली.

"ओके, येईल. चल तू तुझा स्टडी कर मी स्वयंपाकाचं बघते. तुझे पप्पा येतीलंच." : मी, लगबगीने उठत स्वयंपाक खोलीत निघून गेले.
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.