Hints of dreams - 1 in Marathi Short Stories by ️V Chaudhari books and stories PDF | स्वप्नांचे इशारे - 1

Featured Books
  • इश्क दा मारा - 79

    यश यूवी को सब कुछ बता देता है और सब कुछ सुन कर यूवी को बहुत...

  • HOW TO DEAL WITH PEOPLE

                 WRITERS=SAIF ANSARI किसी से डील करने का मतल...

  • Kurbaan Hua - Chapter 13

    रहस्यमयी गुमशुदगीरात का समय था। चारों ओर चमकती रंगीन रोशनी औ...

  • AI का खेल... - 2

    लैब के अंदर हल्की-हल्की रोशनी झपक रही थी। कंप्यूटर स्क्रीन प...

  • यह मैं कर लूँगी - (अंतिम भाग)

    (भाग-15) लगभग एक हफ्ते में अपना काम निपटाकर मैं चला आया। हाल...

Categories
Share

स्वप्नांचे इशारे - 1

थंडगार हवा, नदीच्या पाण्याची मधुर धून, पाखरांची किलबिल, त्यात नदीच्या पाण्यात होणारा सूर्यास्त, अशा मस्त निसर्ग सानिध्यात बसली असताना अचानक तिचा डोळा लागतो. ती प्रिया अशीच निसर्ग सानिध्यात रमणारी आणि तिच्या होणाऱ्या राजकुमाराचे स्वप्न बघणारी. दिसायला अशी की जो बघेल तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडेल. गोरा वर्ण, काळे भोर लांब सडक केस, पाणीदार डोळे त्यावर तिचे ते स्मित हास्य.आताही तिच्या राजकुमाराच्या सप्नात हरवलेली, तो कोण असेल याचं विचारात गुंतलेली . स्वप्नात पाहिले तिने त्याला समोरून येताना रुबाबदार सुट बुट मधे गाडीतून उतरताना , ती टक लावून बघू लागली कोण आहे तो, कसा आहे तो ,त्याचा चेहरा दिसणार तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला . तसेच ती झोपेतून जागी झाली आणि बघते त काय एकटीच नदीकिनारी बसलेली आजूबाजूला निरव अशी शांतता ,थोडी घाबरली तेवढ्यात बाजूला पडलेल्या मोबाईल वर तिची नजर गेली बघते त काय आई बाबांचे आठ दहा miss call...पटकन मोबाईल घेऊन आईला फोन केला आणि तशीच धावत घरा कडे निघाली . तसे फार लांब नव्हते तिचे घर 5 मिनटात पोचली घरी .आई बाबा जेवणासाठी वाट बघत बसले होते .परत झोपून गेली होतीस ना तिथं? आईने विचारले .ती हळूच मान खाली घालून हो म्हटली.तसेच बाबा हसले आणि बोलले चल आता जेवायला लवकर फार भूक लागली ..हे काही प्रिया ने पहिल्यांदा केले नव्हते त्यांना ते नेहमीचेच होते ..एकुलती एक असल्यामुळे त्यांची फार लाडकी होती तिला सहसा कोणी काही बोलत नसे .असेच काही दिवस गेले तिचे तिच्या राजकुमाराच्या स्वप्नांत हरवत.शेवटी आले ते दिवस ज्यांची ती कधीची डोळ्यात तेल टाकून वाट बघत होती.तिचे शिक्षण पूर्ण झाले आणि तिच्या आई वडिलांनी तिच्या साठी स्थळ बघण्यास सुरुवात केली.खूप गोष्टी आल्यात पण तिच्या मनात कोणी बसेना ...अशीच एक गोष्ट तिच्या मामाच्या मुलाने म्हणजे केशव ने सुचवली ...तो त्याचाच मित्राचा भाऊ लहान पणा पासून तो त्याला चांगलाच ओळखत होता ... त्याच्या पूर्ण परिवाराला ही तो बघून होता .मित्राचा भाऊ म्हणजे त्याचा ही तो भावासारखा होता ..तो राजेश रुबाबदार उंच दिसायला जेवढा देखणा तेवढाच स्वभावाने ही अत्यंत सुशील होता .हुशार असल्याने मुंबई ला एका चांगल्या कंपनी मधे चांगल्या पोस्ट वर होता ..दोन भाऊ आई वडील येवढं त्यांचं सुखी कुटुंब ...प्रिया चा आई वडिलांना ही स्थळ आवडल ...त्यांनी पुढची बोलणी करायला केशव ला सांगितलं. केशव ही कंपनी मधून घरी आला आणि लगेच राजेश च्या घरी जावून पोचला .सोबत प्रिया चा बायोडेटा आणि फोटो घेऊन गेला. काय रे केशव कस येणं झालं ? तिकडून केशव चा मित्र समीर ने विचारले. काही नाही रे भाऊ साठी मुलगी शोधताय सांगत होता तु त्या दिवशी तर म्हटल आपणही एखाद स्थळ सुचवाव. तितक्यात समीर चे आई बाबा आलेत. अरे वा सांग की कोणतं स्थळ आहे ते .अरे पाहिले त्याला चहा नास्ता तर करव मग स्थळाच बघुया. समीर चे बाबा म्हणाले.नको नको नंतर येईल त्यासाठी, केशव बोलला. नाही नाही असं कसं मी आलीच घेऊन थांब थोड म्हणत सीमा ताई किचन मधे गेल्या आणि गरम गरम चहा आणि नाष्टा घेऊन आल्या. आता सांग बर कोण आहे मुलगी कुठलं स्थळ आहे ? अहो जास्त लांब जायची गरज नाही माझ्या मिनू आत्याला ओळखतच असणार तुम्ही, केशव म्हणाला. हो हो चांगलेच ओळखतो , फार मस्त आहेत त्या स्वभावाने सीमा ताई बोलल्या. त्यांचीच मुलगी प्रिया ती ही स्वभावाने तेवढीच प्रेमळ आहे आणि दिसायला तर विचारू नका.राजेश भाऊ आणि तिची जोडी एक नंबर राहील केशवने फोटो खिशातून काढला आणि सीमा ताई कडे देता झाला. सीमा ताईंना प्रिया खूपच आवडली , समीर आणि त्याच्या बाबाला ही स्थळ पटल. आधीच केशव आणि त्याची फॅमिली ओळखीची असल्यामुळे त्यांनी काही जास्त विचार न करताच स्थळाला पसंती दर्शवली. आता प्रश्न होता तो फक्त राजेश चा.