Thats all your honors - 4 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-४)

Featured Books
  • इश्क दा मारा - 79

    यश यूवी को सब कुछ बता देता है और सब कुछ सुन कर यूवी को बहुत...

  • HOW TO DEAL WITH PEOPLE

                 WRITERS=SAIF ANSARI किसी से डील करने का मतल...

  • Kurbaan Hua - Chapter 13

    रहस्यमयी गुमशुदगीरात का समय था। चारों ओर चमकती रंगीन रोशनी औ...

  • AI का खेल... - 2

    लैब के अंदर हल्की-हल्की रोशनी झपक रही थी। कंप्यूटर स्क्रीन प...

  • यह मैं कर लूँगी - (अंतिम भाग)

    (भाग-15) लगभग एक हफ्ते में अपना काम निपटाकर मैं चला आया। हाल...

Categories
Share

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-४)

दॅट्स ऑल युअर ऑनर
(प्रकरण चार)


सायंकाळी बरोब्बर पाच चाळीस ला कनक ओजस ने पाणिनीच्या ऑफिस चा दरवाजा त्याच्या खास शैलीत वाजवला. पाणिनीने सौम्या ला मानेने खून करून त्याला आत बोलवायला सांगितले.

‘‘ हाय सौम्या, ‘‘ आत येत असतानाच ओजस म्हणाला. ‘‘पाणिनी तुला लुल्ला प्रकरणात अद्ययावत माहिती हवी आहे? ‘

‘‘ अर्थातच. काय आहे विशेष ?‘‘ पाणिनीने विचारले.

‘‘पाणिनी या प्रकरणात तुला किती माहिती झाली आहे याची मला कल्पना नाही आणि मला ते माहित करून घ्यायचे पण नाही. ही कंपनी काही विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करते. त्यांची कारखान्याची जागा बंदिस्त आहे ,म्हणजे कोणीही आले आणि आत गेले असे होत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पार्किंग आहे.दारावर रखवालदार असतो.येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवतो. आत जाणारे वाहन कंपनीचे स्टिकर लावलेले असते ना याकडे ते लक्ष देतो मात्रबाहेर जाणाऱ्या वाहनांकडे त्याचे फारसे लक्ष नसते. वाहन बाहेर जाताना तो फक्त ड्रायव्हर कडे नजर टाकतो ड्रायव्हर ओळखीचा दिसला तर काही बघत नाही. जर अनोळखी असेलतर गाडी थांबवून संपूर्ण चौकशी करतो. काल पावणेसहा वाजता तपन एका तरूणीला गाडीतून बरोबर घेऊन बाहेर पडल्याचं त्याला आठवतंय

त्यांनी पोलिसांना त्या स्त्रीचं वर्णन सांगितले. आत्ता तरी असे दिसते की ते वर्णन म्हणजे जे सर्व साधारण वर्णन आहे म्हणजे गडद रंगाचे केस, वयाने तरुण वगैरेवगैरे. त्यातून तिला ओळखण्यासाठी पोलिसांना मदत होईल असं ते वर्णन नाहीये. पोलीस असं गृहीत धरून चाललेत की तपन ने त्या स्त्री बरोबर कंपनीच्या टेकडीवरच्या आउट हाऊसमध्ये भेट ठरवली असेल ते दोघे तिथे गेले असावेत एकत्र दारू प्याले असावेत. त्याने तिथले स्वयंपाक घरातले साहित्य वापरून आमलेट, बिस्कीट बनवली असावीत नंतर त्या दोघातकाहीतरी भांडण झाली असावीत आणि तिने त्याला भोसकले. सहाजिकच पोलीस त्या तरुणीला शोधून काढून तिला प्रश्न विचारण्यासाठी खूप उत्सुकआहेत आणि बाहेर अशी बातमी आहे की तपन हा जरा स्त्री लंपट आहे ‘‘ओजस म्हणाला.

पाणिनी ने ही माहिती डोळे बंद करून शांतपणे ऐकली

‘‘पोलिसांचा असा अंदाज आहे ज्या अर्थी ऑफिसची वेळ संपल्यानंतर अर्ध्या पाऊणतासाने ते दोघे गाडीतून बाहेर पडले त्या अर्थी ती मुलगी त्या ऑफिसमध्येच काम करतअसावी आणि त्याने तिच्याशी त्या आऊटहाउस मध्ये भेट ठरलेली असावी. आता या सगळ्याचापरिपाक म्हणून पोलिसांचा अंदाज जर तुझ्या अशिला पर्यंत पोहोचत असेल तर तिला तिचीहकीकत काय आहे ते सांगायला सांग त्याने तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केलाम्हणून स्वसंरक्षणार्थ तिने त्याला भोसकले म्हणून..पोलीस तिला पकडून प्रश्न विचारण्याऐवजीतिने स्वतःहून हे सांगणे योग्य होईल असं मला वाटतं‘‘ओजस म्हणाला

‘‘धन्यवाद कनक‘‘ पाणिनी पटवर्धन म्हणाला ‘‘ तुझी माणसं कामाला लाव. ही आउट हाऊस ची जागा नक्की कुठे आहे ?

ओजस ने पाणिनी पटवर्धनला एक नकाशा काढून ही जागा नक्कीकुठे आहे हे समजावून सांगितले पाणिनी पटवर्धन ने , तो नकाशा घडी करून आपल्या खिशात ठेवला. ‘‘ ठीक आहे तुझे काम चालू कर. मी आणि सौम्या रात्री जेवायला बाहेर जायचं ठरवतोय मी तुला जेवण झाल्यानंतर पुन्हा संपर्क करीन. पुढे काय करायचं मला जरा विचार करू दे ‘‘ नंतर सौम्या कडे वळून पाणिनी पटवर्धन म्हणाला, ‘‘ पोलिसांना जरा तास-दोन तास काम करू देत मग त्यांना बरोबर उत्तर मिळेल आणि नंतर ते आकृती सेनगुप्ताला शोधायला सुरुवात करतील.

सौम्या, तुझ्याकडे आकृती सेनगुप्ता च्या मैत्रिणीचा फोनआणि पत्ता आहे ना देवनार मधील?‘‘

सौम्याने मानेने होकार दिला

‘‘हा मग लाव तिला फोन ‘‘पाणिनी म्हणाला.

‘‘फोन लावून सेनगुप्ताआहे काअसं विचारू का ? ‘‘सौम्या ने विचारले

‘‘ नाही नाही अजिबात नाही ‘‘पाणिनी म्हणाला मैथिली आहुजा आहे का असच विचार ‘‘

सौम्या सोहोनी ने त्याच्याकडे पटकन नजर टाकली आणि फोन लावला. थोड्या वेळाने ती म्हणाली ‘‘सर मैथिली आहुजा बोलते आहे ‘‘

पाणिनी पटवर्धन ने फोन उचलला आणि विचारले ‘‘ मिस आहुजा? ‘‘

‘‘ हो ‘‘ती म्हणाली.

‘‘ मी पाणिनी पटवर्धन, वकील. पण फोनवरून माझं नाव विचारू नकोस तू आकृती सेनगुप्ता शी बोलली आहेस का ? ‘‘

‘‘ हो अर्थातच ! पण माझा विश्वासच बसत नाहीये की मी तुमच्याशी बोलते आहे. मी तुमची फार मोठी चाहती आहे. ‘‘

‘‘ तिथे आहे का आकृती? ‘‘पाणिनी पटवर्धन ने विचारले

‘‘ हो ‘‘ ती म्हणाली

‘‘ माझ्यासाठी काही तरी तू करावं असं मला वाटतं ‘‘पाणिनी म्हणाला.

‘‘ हो नक्कीच करीन काय करू? ‘‘

‘‘ एक तर तू पलीकडून कमीत कमी शब्दात माझ्या प्रश्ना ना उत्तर दे म्हणजे सेनगुप्तालाकळणार नाही की तू कोणाशी बोलते आहेस ‘‘पाणिनीने तिला सांगितले

‘‘ ठीक आहे ‘‘

‘‘आता मला सांग की तू तिला मदत करायला तयार आहेस? ‘‘

‘‘ हो नक्कीच ‘‘ती म्हणाली

‘‘ तुझ्याकडे गाडी आहे ना ? ‘‘

‘‘हो ‘‘ तीम्हणाली

‘‘सेनगुप्ता कुठे राहते तुला माहित आहे ना? ‘‘

‘‘ हो ‘‘ती म्हणाली

‘‘तिला काहीतरी बहाणा सांगून तिथून बाहेर पड. सांग हव तर की तू तुझ्या मित्राला भेटायला चाललीस. तिला सांगू नको की मी तुला तिच्या अपार्टमेंटमध्ये बोलवले आहे म्हणून .नंतर तू तुझ्या गाडीत बस आणि सरळ आकृतीच्या अपार्टमेंटपाशी ये, पण घराजवळ गाडी लावू नकोस एखादा चौक अलीकडेच गाडी लाव. तू सिगारेटओढतेस? ‘‘

काहीही काय हो ? ‘‘ती म्हणाली

‘‘जेव्हातू त्या अपार्टमेंटच्या समोर येशील तेव्हा एक सिगरेट शिलगाव. ‘‘

‘‘ अहो हे जरा विचित्र नाही का?‘‘ तिने विचारले

‘‘ म्हणजे रस्त्यावर सिगरेट ओढणे हे विचित्र आहे असे म्हणायचे आहे का तुला?‘‘पाणिनीने विचारले

‘‘ हो तसेच विचारायचे होते ‘‘

पाणिनी म्हणाला, ‘‘ ते विचित्र दिसावे म्हणूनच मी तुला तसे सांगितले आहे विचित्र दिसेल पण कुणाला संशय येणार नाही. तू सिगारेट ओढलीस की तूच मैथिली आहेस असे मला कळेल आणि मी तुझ्याकडे येईन. ‘‘

पण समज सिगारेट ओढल्या नंतर सुध्दा मी पुढच्या मिनिटात तुला भेटायला आलो नाही तर काहीतरी धोका आहे म्हणून मी येणार नाही असे समज आणि तशीच पुढे चालत रहा. एखादा चौक पुढे जा, नंतर सरळ गाडीत बस आणि निघून जा. नीट समजलंय काय सांगितलं ते ?‘‘ पाणिनीने पुढे विचारले.

‘‘ मला वाटतंय मला समजलंय नीट.‘‘

‘‘ तुला इथे पोचायला किती वेळ लागेल?‘‘

‘‘ मी साधारण अर्ध्या तासात पोचू शकते ‘‘

‘‘ छान. नीघ तर मग. सांगितलेले सर्व नीट लक्षात ठेव.‘‘

त्याने फोन ठेवला. नंतर सौम्याला म्हणाला ‘‘ तुला जरा इथे थांबायला लागेल फोन जवळच. माझ्या बरोबर नाही येता येणार. माझा छोटा कॅमेरा दे मला आणि बॅटरी पण दे. आणखी एक, आपल्या फोटो वाल्याला सांग की मला काही प्रिंट्स काढून घ्यायच्या आहेत उशिरा पर्यंत आज रात्री,तर स्टुडिओत थांब.‘‘

‘‘ तुम्हाला किती वेळ लागेल यायला ? पण काळजी नका करू, मी थांबेन तुम्ही येई पर्यंत.’’

पाणिनी पटवर्धन लगेच गाडी काढून निघाला, आकृतीसेनगुप्ता च्या अपार्टमेंट पासून थोडी दूर गाडी लावली, आपला कॅमेरा घेतला, आणि एका इमारतीच्या सावलीत सिगारेट शिलगावीत सहज कुणाला दिसणा नाही अशा पद्धतीने वाट बघत उभा राहिला. थोड्याच वेळात एक तरुणी झपझप चालत अपार्टमेंट जवळ आली.समोर थांबून तिने निवांत पणे सिगारेट बाहेर काढली.ओठात ठेवली. नंतर आपल्या पॅन्टचे खिसे चाचपून काडेपेटी शोधण्याचा जरा अभिनय केला. जेणे करून पाणिनीचे लक्ष वेधून घेण्यास पुरेसा वेळ मिळेल अशी दक्षता तिने घेतली. एकंदरीत पोरगी तयारीची दिसत होती. पाणिनी खुष झाला. तो तिच्या दिशेने गेला. ‘‘मैथिली?’’

‘‘पाणिनी पटवर्धन?‘‘ तिने उलट प्रश्न केला.

‘‘लगेच जाऊ.‘‘ पाणिनी म्हणाला..

‘‘ कुठे जायचंय ‘‘ तिने विचारले.

‘‘ अत्ता तरी आकृती च्या घरात.‘‘

‘‘ मी तिला काहीही मदत करीन पटवर्धन, पण मला सांगा काय भानगड आहे ही ? मी अत्ता रेडियो लावला होता गाडीतून येताना तेव्हा मी ऐकले की तपन चा खून झालाय, मला माहीत आहे की आकृतीची काल त्याच्याशी झटपट झाली. या दोन गोष्टींचा परस्परांशी संबंध आहे ? ’’

तिच्या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी पाणिनीने तिला विचारले ‘‘ तू म्हणालीस की तू तिला काहीही मदत करायला तयार आहेस म्हणून ?‘‘

‘‘ अर्थातच, पण पटवर्धन, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेत.‘‘

‘‘ तुझं निरीक्षण म्हणून बरोबर आहे ते. पण आता उत्तर द्यायची वेळ नाही.‘‘

बोलता बोलता ते दोघे आकृती रहात होती त्या मजल्यावर आले..पाणिनीने तिच्या हातात किल्ली दिली. पुढे हो आणि उघड दार. एकदम सहज वावर. जणू काही तूच आकृती आहेस ‘‘

तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले हातातून किल्लीघेतली आत जाऊन दिवे लावले आणि पाणिनी पटवर्धनसाठी दरवाजा उघडा ठेवला.

‘‘ठीक आहे‘ ‘तीम्हणाली‘ ‘आता पुढे काय? ‘‘

‘‘तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे‘‘ तो म्हणाला.

‘‘मी पहिल्यापासूनच ठेवला आहे विश्वास तुमच्यावर ” ती म्हणाली.

‘‘आकृती म्हणते की तू तिची खूप जीवश्चकंठश्च मैत्रीण आहेस‘‘

‘‘हो आहे मी‘‘

‘‘आणि तू मैत्रिणींशी खूप प्रामाणिक आहेस‘‘

‘‘हो मी प्रयत्न करते तसा. ‘‘

‘‘तू किती वर्षे तिला ओळखतेस?‘‘

‘‘.जवळजवळ सात वर्ष. ‘‘

इथे येण्याआधीपासून तू तिला ओळखतेस? ‘‘

‘‘हो आम्ही एकत्र होतो पूर्वी. मग मी इथे आले आणि एकमेकांना बघितलं नाही भेटलो हि नाही पण आम्ही एकमेकांशी संपर्कात होतो आकृती खूपच चांगली मुलगी आहे ती माझ्यासाठी काहीही करेल आणि मी ही तिच्यासाठी काहीही करीन‘‘

‘‘तू खूपच तिच्या सारखी दिसतेस ग. ‘‘पाणिनी म्हणाला..

‘‘हो.आश्चर्य नाही का ते ! लोक आम्हाला बहिणी आहोत असे समजतात.‘‘


‘‘आकृती तिचे कपडे कुठे ठेवते माहिती असेल ना तुला? ‘‘

‘‘हो.तिथेच त्या कपड्यांच्या कपाटात. ‘‘ती म्हणाली

‘‘ते कपाट उघड आणि तू काय कपडे घालू शकतेसते घाल.जा त्या बाथरूम मध्ये जा आणि तिचे कुठलेतरी कपडे घाल तुझा तो स्कर्ट काढून माझ्याकडे दे‘ ‘पाणिनी म्हणाला. ‘‘

‘‘आणि नंतर? ‘‘तिने विचारले

‘‘नंतर जर का तुला कोणी प्रश्न विचारले तर तू काहीही उत्तर देणार नाहीस एकदम शांत बसून रहा. आता मला काही फोटो घ्यायचेत. ‘‘पाणिनी म्हणाला

आणि त्याने त्याचा छोटा कॅमेरा बाहेर काढला आणि खोलीतले वेगवेगळे फोटो घेतले

‘‘ठीक आहे तर जा कपडे बदल‘‘ तो म्हणाला.

मैथिली थोडीशी अडखळली‘‘ मिस्टर पटवर्धन तुम्ही काय करत आहात तुम्हाला नीट माहिती आहे ना?” तिने विचारले

‘‘मला नीट समजतंय सगळं‘‘पाणिनी म्हणाला, ‘‘तूआकृतीला मदत करायला तयार आहेस ना मग तेवढेच पुरेसे आहे. आता.. आपल्याला वाद घालायला वेळ नाही‘ ‘तो म्हणाला.

‘‘तू तुझे कपडे देवनार मधूनच खरेदी करतेस ना? ‘‘त्याने अचानक विचारले.

‘‘हो जवळ जवळ सगळेच.‘‘

‘‘त्यावर देवनारचे लेबल असेल ना ? ‘‘

‘‘हो असेलच.‘‘

बोलता-बोलतातो खिडकीजवळ आला त्याला खाली पोलिसांची गाडी दिसली अगदी अपार्टमेंटच्या समोरच.

‘‘चल निघायला हव आपल्याला आता. पोलीस आलेत तिथे खाली. ‘‘तो तिला म्हणाला.

‘‘हे सगळं आपण अत्ता जे केले त्याची आकृतीला मला मदतच होईल ना? ‘‘तिने विचारले.

‘‘मला वाटतंय की मदत झाली असती पण आता जरा उशीर झालाय. ‘‘पाणिनी म्हणाला.

अचानक तिने निर्णय घेतला. आपल्या स्कर्ट चा पट्टा तिने बाहेर खेचला. चेन खाली ओढली आणि सरळ जमिनीवर स्कर्ट टाकला ‘‘मला पटकन कपाटातल्या त्या हँगरला अडकवलेला स्कर्ट द्या‘‘ तीम्हणाली.

पाणिनीने नकारार्थी मान हलवली

‘‘आपल्याला तेवढा वेळ नाहीये‘‘ पाणिनी म्हणाला.

‘‘माझं जरा ऐका ‘‘ती किंचाळत म्हणाली

पाणिनी ने तिने सांगितल्याप्रमाणे हँगर चा स्कर्ट काढून तिला दिला.

त्याने कपाटातून तिला दिलेला स्कर्ट ती घालेपर्यंत पाणिनीने आपल्या खिशातूनएक छोटा चाकू बाहेर काढला आणि तिने काढून टाकलेल्या स्कर्टच्या कापडाचा एक तुकडा ओढून कापून टाकला.

स्कर्ट घालता घालतात तिने एका हाताने अपार्टमेंटचे दार उघडले आणि घाईघाईतदोघेही बाहेर पडले. बाहेर पडून लिफ्टच्या उलट बाजूला पॅसेजच्या दिशेने जात असतानाच त्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि इन्स्पे. तारकर आणि साध्या वेषातला एक पोलीस लिफ्टमधून बाहेर पडताना त्यांना दिसले.

‘‘आता आपण दोन मजले खाली जिन्याने उतरु आणि मस्तपैकी जिन्यातच गप्पा मारत बसू‘‘ पाणिनी म्हणाला.

‘‘पण इमारतीत राहणारे काही लोक जर जिन्याचा वापर करत असतील तर? ‘‘तिने शंका व्यक्त केली

‘‘तरीसुद्धा आपण जिन्यातच हळू आवाजात कुठल्याही फालतू विषयावर गप्पा मारत बसू; म्हणजे दोन प्रेमी युगुल जशी एकमेकांना चिकटून बसतात आणि ते काय बोलतात हे इतरांना कळत नाही तसं आपण गप्पा मारण्याचा अविर्भाव करू. तुला अभिनय कितपत येतो? ‘‘

‘‘येतो बऱ्यापैकी. मी प्रयत्न करीन. पण हे असं किती वेळ चालू ठेवणार?‘‘ तिने विचारले

‘‘अर्धा तास तरी करू. कदाचित जास्त वेळ सुद्धा करायला लागेल. आपण दोघे मिळूनदहा-बारा सिगरेट ओढू आणि त्याची थोटकं तिथेच ठेवू म्हणजे एक पुरावाच तयार होईल कीआपण बराच वेळ गप्पा मारत होतो ‘‘पाणिनी ने सुचवले

‘‘हे बघा मी स्वतःला तुमच्या हातात सोपवलेले आहे तुम्हाला जे योग्य वाटेल तेआणि जे कायद्यात बसेल ते करा आणि माझ्याकडून करवून घ्या‘‘

‘‘कधी कधी मला वाटतं की मी अगदी नाकपुडी पर्यंत धोका पत्करून वागतो. पण त्यामागे माझा हेतू माझ्या अशिलाला जास्तीत जास्त संधी मिळावी हा असतो. बरेच जण असे समजतात की परिस्थितीजन्य पुरावा हा योग्य तो न्याय मिळण्यासाठी उपयुक्त नाही तो बरेच वेळा चुकीचा असतो पण प्रत्यक्षात माझं मत या अगदी उलट आहे परिस्थितीजन्य पुरावे याचा अर्थ तुम्ही कसा काढता आणि त्याला तर्कशुद्ध पद्धतीने कसे मांडता यावर त्याची उपयुक्तता अवलंबून असते परिस्थितीजन्य पुराव्या पेक्षा साक्षीदाराने ओळख परेड मध्ये गुन्हेगाराला ओळखण्याचे म्हणणे हे जास्त धोकादायक असते‘‘ पाणिनी म्हणाला

‘‘मला वाटतं आता आपण जे काही करतोय त्याचा संबंध आरोपीची ओळख पटवण्याशी आहे.बरोबर आहे का मला वाटते ते? ‘‘तिने शंका म्हणून विचारले.

‘‘हो संबंध आहे ‘‘

पाणिनी पटवर्धन म्हणाला

‘‘आणि मला असं वाटतं की पोलीस लोक एखाद्या साक्षीदाराला असं सांगायला लावतील की त्यांनी एका विशिष्ट गाडीमध्ये विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट व्यक्तीबरोबर बघितलं ‘‘

‘‘हे फारच गुंतागुंतीचा आहे पण अशा माणसाची उलटतपासणी तुम्ही देऊ शकत नाही का आणि त्यातला खरेखोटेपणा उघड करू शकत नाही का?‘‘तिने विचारले

‘‘तसा अधिकार मला नक्कीच आहे पण त्याचा कितपत उपयोग होईल? माझ्या शास्त्रानुसार एखाद्या साक्षीदाराला उलट तपासणीला घेतल्यानंतर त्याची आधीची उत्तरेआणि नंतरची उत्तरे यातला विरोधाभास न्यायाधीशांना दाखवण्यापेक्षा त्याची उत्तरे आणि ती उत्तरे देत असताना त्याच्या होणाऱ्या अनुषंगिक शारीरिक हालचाली यातील विसंगती न्यायाधीशांच्या निदर्शनाला आणून देणे हे अधिक उपयुक्त ठरतं ‘‘

‘‘हे तुमचं उत्तर म्हणजे अगदी वकिलीच्या थाटातले झालं आणि खास करून पाणिनी पटवर्धनच्या शैलीतलं होतं ‘‘ ती म्हणाली.

‘‘मिस्टर पटवर्धन तुमची हरकत नसेल तर आता आपण आणखीन दोन जिने उतरून खाली जायचं का आणि आपण ठरवलेला अभिनय करायचा का? ‘‘तिने पुढे विचारणा केली.

ते दोन मजले उतरून खाली आले आणि एका पायरीवर बसले आकृतीच्या स्कर्टचा पसारा तिने जरा आवरता घेतला आणि पाणिनीला तिच्या अगदी जवळ बसायला जागा करून दिली.

पाणिनी पटवर्धन ने एकामागोमाग एक सिगारेट ओढायला सुरुवात केली आणि त्याची थोटकं आणि राख तिथेच साठवून ठेवली

‘‘हे बघितल्यावर कोणाला खरं च वाटेल की आपण दोघं खुप वेळ इथे गप्पा मारत बसलो होतो ‘‘ ती म्हणाली

‘‘अगदी बरोबर ‘‘पाणिनीने कबूल केले

‘‘मिस्टर पटवर्धन तुमचा हात खूप लांब आहे‘‘ ती म्हणाली

‘‘लांब आहे म्हणजे? ‘‘

अहो, तो माझ्या कमरेभोवती लपेटा. आपण प्रेमिक असल्याचा अभिनय करतोय ना ? मग माझ्याजवळ या, असे आणि मी तुमच्या खांद्यावर मान ठेवून विचारते की तुम्ही एवढ्यात कुठलं चांगलं पुस्तक वाचलय का ?

‘‘मला पुस्तक वाचायला वेळ नाही होत. ‘‘ एखाद्या प्रियकराला शोभेल असं तिच्या डोळ्यात पहात, पाणिनी तिच्या कानात कुजबुजला.

‘‘तुमचं आयुष्य खूपच रहस्यमय आहे , मी वर्तमानपत्रातून अनेकदा तुमची कोर्टातली गाजलेली प्रकरण अभ्यासली आहेत. ‘‘ ती त्याच्या कानात कुजबुजली.

‘‘मी जी प्रकरण हाताळतो, मी जे कोर्टात बोलतो त्यामध्ये न्यायाधीशांना रस वाटेल याची मी दक्षता घेतो नाहीतर दैनंदिन कामकाजाचा एक भाग म्हणून ते सर्व गोष्टींकडे रुक्षपणे बघतील आणि आपल्याला हवा तो निकाल देतीलच असं नाही आपण आपल्या वागणुकीतून आणि बोलण्यातून त्यांच्या मनात रस निर्माण केला तर ते आपला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकतात असा माझा अनुभव आहे.‘ ‘पाणिनी म्हणाला..

एकदा त्यांचा रस संपला, की तुमच्या दृष्टीने तुम्ही दावा हरलात असे समजा.‘‘ पाणिनी म्हणाला.

‘’ म्हणजे तुमचे अशील हरले असे समजा.‘‘ तिने दुरुस्ती केली.

‘‘ माझ्या दृष्टीने मी हरणे आणि माझे अशील हरणे एकच अर्थ आहे.‘‘पाणिनीने स्पष्ट केले.

‘‘ सर्व वकील असा विचार नाही करत.‘‘ प्रेमाने त्याच्या डोळ्यात बघितल्याचा अविर्भाव करत ती पुटपुटली.

पुढचा अर्धा तास ते असेच काहीतरी बोलत राहिले. त्यांच्या चेहेऱ्या वरचे भाव आणि ते बोलत असलेली वाक्ये यांचा एकमेकांशी सुतराम संबंध नव्हता.शेवटी सुटकेचा निश्वास टाकून पाणिनीउद्गारला.‘‘ मस्त गेला अर्धा तास.आता दुसऱ्या मजल्यावरून लिफ्ट ने खाली उतर.दारातून बाहेर पड जर पोलिसांची गाडी बाहेर असेल तर चालणे चालूच ठेव, मागे येऊ नको.जर पोलिसांची गाडी नाही दिसली तर काहीतरी विसरल्याचं भासवून पळत पळत लिफ्ट पाशी ये. लिफ्ट पकडून दुसऱ्या मजल्यावर ये . जिन्याच्या दारा पाशी ये आणि मला खूण कर. ‘‘

पाणिनीने सूचना दिली.

‘‘ जर पोलीस असतील बाहेर तर मी परत न येता चालत राहायचं? आणि कुठे जायचं? ‘‘

‘‘ देवनारला.‘‘पाणिनी म्हणाला..

‘‘ परत कधी भेटता येईल तुम्हाला ? ‘‘

‘‘ नाही सांगता येणार ते मला अत्ता तरी.‘‘ पाणिनी म्हणाला; ‘‘ पण जमलं तर उद्या ऑफिसला न जाता रजा घे.म्हणजे तुला फोन वर उपलब्ध होता येईल.‘‘पाणिनीने सूचना दिली.

‘‘ निघाले मी.‘‘ ती म्हणाली.

बराच वेळ झाला ती परतली नाही. पाणिनी पुढची वीस मिनिटे तिथेच बसून होता. त्यातील शेवटची दहा मिनिटे त्याने किमान डझन भर वेळा घड्याळात बघितले असेल. शेवटी उठला तो.आपले कपडे झटकले, लिफ्ट ने खाली लॉबी पर्यंत गेला, बाहेर पडला, कुठेच पोलिसांचा मागमूस दिसत नव्हता.त्याने सरळ आपली गाडी पकडली आणि ऑफिसलला आला.

( प्रकरण चार समाप्त.)